बाबर , अकबर , पिअर्स

आंबोळी's picture
आंबोळी in काथ्याकूट
4 Nov 2009 - 10:49 am
गाभा: 

लोकहो,
गेले बरेच दिवस पिअर्स साबणाची एक जाहिरात टिव्हीवर दाखवत आहेत. ज्यात "बाबरचा मुलगा हुमायुं... हुमायुंचा ... अकबर" असे वाक्य (कॅची लाईन का काय म्हणतात ते...) आहे. मला इतके दिवसात त्या जाहिरातीचा अर्थ कळालेला नाही. बाबराचा किंवा अकबराचा आणि त्या पिअर्स साबणाचा काय संबंध? बर या कोणी ऐतिहासिक थोर विभुती न्हवेत की ज्यांचे स्मरण करावे वा त्याना आदरांजली द्यावी, त्यांची आठवण रहावी यासाठी हा खटाटोप करायला. भारत घडवण्यात त्यांचे अमुक अमुक योगदान आहे किंवा भारतिय लोकांवर या (परकीया)नी अमुक अमुक उपकार केलेत असे क्षणभर ग्रुहित धरले तरी त्यांच्यापेक्षा अनंत पटीने उपकार केलेल्या अनेक ३ पिढ्या भारतीय इतिहासात उपल्ब्ध असताना या तिघांचीच नावे घ्यायचे काय कारण?
ऐतिहासिकच हवे असतिल तर "शहाजी--शिवाजी--संभाजी" का नकोत? यातल्या प्रत्तेकाचे योगदान आणि उपकार वरच्या तिघांपेक्षा नक्कीच जास्त आहेत.
किंवा "बाजिराव्(१)--नाना--माधवराव(१)" ला ही हरकत नसावी.
स्वातंत्र्यपूर्व काळातले पाहिजे असतिल तर " मोतिलाल्--जवाहरलाल्--इंदिरा" घ्या. औध्योगिक मधिल पाहिजे असतिल तर टाटा किंवा बिर्लांच्या ३ पिढ्या घ्या....
बाबरालाच असे काय सोने लागलय?

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालक्,संपादक यांसी,

बाबर्,अकबर किंवा पिअर्स साबण याविषयी लेखन करण्यास कोणत्याही प्रकारची बंदी असल्याची सुचना न आढळल्याने लेखन केले आहे. तशी काही बंदी असल्यास हे लेखन उडवल्या (हा शब्द अश्या वाक्यांमधे असाच लिहायचा असतो) गेल्यास आमची हरकत नाही.

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

4 Nov 2009 - 11:28 am | अमोल केळकर

जाऊ द्या हो. जहितात आहे म्हणून सोडून द्या. खरं म्हणजे ह्या नावावरुन कुणाच्या धार्मीक भावना दुखावल्या नाहीत हे विशेष. नाहीतर आत्तापर्यंत कुणा संघटनांनी या साबणावर बंदी घालण्याची मागणी केली असती ( आणि या उत्पादनाची आपसूकच मोठी जहिरात झाली असती . मला वाटते या कंपनीचा ही नावे घेण्यामागे हाच हेतू असावा )
लहान मुलात मात्र ही जहिरात बरीच प्रिय आहे असे दिसते. या साबण कंपनीला विनंती आहे की अशाच प्रकारच्या अनेक जहिराती काढून मुलांना इतिहास पाठ करावयास मदत करावी. :)

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

बाबर -हुमायूं चं काय घेऊन बसलात .. मी पाहिलेल्या सुपर कॉमेडी(होपलेस) जाहीराती सांगतो आंबोळ्या ...
१. हमाम का कोणता साबण : तथाकथित केयरींग मम्मीची मुलगी सकाळी सकाळी साबण आणायला दुकाणात जाते (जसं आपण तहाण लागल्यावर विहीर खोदतो तसं). पण केयरींग मम्मी मुलीला "फक्त हमामंच घेऊन ये हो" हे सांगायला विसरते ... आणि लगेच अशी भयानक काळजीत पडते .. ती मुलीच्या पाठीमागे धावत सुटते .. जाताना विचार करते "आता माझ्या मुलीचे कसे होणार " .. "आता तिच्या तोंडावर मुरुम्स (फोड्स) येणार" .."तिची त्वचा काळवंडणार" .."आता तिचं लग्न कसं होईल" .... "तिला शाळेत सगळे चिडवतील " ... "ती डिप्रेशन मधे जाऊन आत्महत्या करेल " ... "आता मी काय करू " असं म्हणत ती पोरी ला शोधत पळते .. पोरगी काय सापडत नाय .. आणि केयरींग मम्मी चे हावभाव अगदी आपल्या ब्लड टेस्ट च्या रिझल्ट मधे "एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह असल्यासारखे होतात... घरी येऊन पहाते तर पोरगी मस्त आरामात शॉवर घेत असते ....केयरिंग मम्मी अजुनंच बिथरते ... लगेच पोरीला मम्मीचे मनोगत टेलेपथीने कळते .. आणि पोरगी म्हणते .. आई ....मी हमामच घेऊन आले ... आणि मग मम्मी ला ब्लड टेस्ट चुकीचा असल्या सारखा आनंद होतो ... इथे मम्मी ला पोरगी येई पर्यंत थांबता येत नव्हतं का ? की पोरगी साबण घेतल्या घेतल्या शॉवर घेणार होती ? असो .....

दुसरी जाहीरात तर त्याहून भयानक
२. विम बार ची मराठीतली जाहितात : एका भांड्यात ऑर्डिनरी साबण ठेवलेला असतो न एका भांड्या विम बार ... मग बॅकग्राऊंड मधुन एक माणूस लै भारी टोन मधे गातो ... "गळेल ... की टिकेल ?..... गळेल .. की टिकेल ? ... गळेल.. गळेल... गळेल.... टिकेल.. टिकेल .. टीकेल.... " (हॅतला एकही शब्द माझा नाही बरं ... :) ) नविन बिम बार ला आहे प्लास्टिक कोट .. जो साबणाची झिज होऊ देत नाही .. ब्लाह् ब्लाह् ब्लाह्
ही जाहिरात प्रथम पाहिल्यावर मी अल्मोस्ट कॉमात जायचा बाकी होतो !! बहुदा दुसर्‍याच कुठल्या प्रॉडक्ट साठी बनवली असावी ... पण त्यांनी पुर्ण पेमेंट न केल्याने जाहिरात कंपनीने विम ला विकली असावी असा माझा संशय आहे !!

- तांबोळी
हमाम,विम किंवा गळणे-टीकणे याविषयी लेखन करण्यास कोणत्याही प्रकारची बंदी असल्याची सुचना न आढळल्याने प्रतिसादीत केले आहे. तशी काही बंदी असल्यास हे लेखन उडवल्या (सौजन्य खरडफळा स्वागत मजकूर) गेल्यास आमची हरकत नाही.

प्रभो's picture

4 Nov 2009 - 1:22 pm | प्रभो

२. विम बार ची मराठीतली जाहितात : एका भांड्यात ऑर्डिनरी साबण ठेवलेला असतो न एका भांड्या विम बार ... मग बॅकग्राऊंड मधुन एक माणूस लै भारी टोन मधे गातो ... "गळेल ... की टिकेल ?..... गळेल .. की टिकेल ? ... गळेल.. गळेल... गळेल.... टिकेल.. टिकेल .. टीकेल.... " (हॅतला एकही शब्द माझा नाही बरं ... Smile ) नविन बिम बार ला आहे प्लास्टिक कोट .. जो साबणाची झिज होऊ देत नाही .. ब्लाह् ब्लाह् ब्लाह्
ही जाहिरात प्रथम पाहिल्यावर मी अल्मोस्ट कॉमात जायचा बाकी होतो !! बहुदा दुसर्‍याच कुठल्या प्रॉडक्ट साठी बनवली असावी ... पण त्यांनी पुर्ण पेमेंट न केल्याने जाहिरात कंपनीने विम ला विकली असावी असा माझा संशय आहे !!

=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

शक्तिमान's picture

4 Nov 2009 - 8:17 pm | शक्तिमान

=)) =)) =)) =))

हुह.., खतरनाक बुवा!

अमोल केळकर's picture

4 Nov 2009 - 1:26 pm | अमोल केळकर

:D :D
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

झकासराव's picture

4 Nov 2009 - 5:25 pm | झकासराव

=)) =)) =)) =)) =))

फाइव्ह स्टार हलकट :)

झकासराव's picture

4 Nov 2009 - 5:27 pm | झकासराव

=)) =)) =)) =)) =))

फाइव्ह स्टार हलकट :)

अश्विनीका's picture

7 Nov 2009 - 1:39 am | अश्विनीका

निगेटिव्ह अ‍ॅड्व्हर्टायजिंग पण बर्‍याचदा प्रॉडक्ट च्या दृष्टीने फायदेशीर असते. एखादा प्रॉडक्ट जसा त्याच्या चांगल्या जाहिरातीमुळे लक्षात रहातो तसाच एखाद्या प्रॉडक्ट चे नाव हास्यास्पद/ टुकार जाहिरातीमुळे लोकांच्या लक्षात रहाते.- अश्विनी

चिरोटा's picture

4 Nov 2009 - 11:29 am | चिरोटा

मोगल बादशहा हमाम वापरत असा बर्‍याच लोकांचा गैरसमज असेल्.तो पुसुन टाकण्यासाठी ही अशी जाहिरात कदाचित.
भेंडी
P = NP

उर्दूत स्नानगृहाला हमामखानाच म्हणतात!
किती चपलख नाव दिलंय साबणाला!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे!

विजुभाऊ's picture

4 Nov 2009 - 12:04 pm | विजुभाऊ

ती झैरात कोण्या दिल्लीकर भय्याने केली असावी.
सी बी एस ई च्या सिलॅबस मध्ये मराठ्यांच्या इतिहासासाठी केवळ ४ पाने खर्ची घातली आहेत त्या दिल्लीकरानी.
ही तर केवळ एका ओळीची झैरात आहे.

जेते इतिहास लिहितात आणि थोर म्हणवले जातात . इथे तर उरफाटीच रीत आहे.

मदनबाण's picture

4 Nov 2009 - 12:10 pm | मदनबाण

आंबोळी शेठ हाच विचार माझ्या देखील मनात आला होता...पण काय आहे या आपल्या हिंदूस्थानात हिंदू लोकचं मूग गिळुन बसतात त्याला जाहिरात वाले तरी काय करणार !!!
साबणात चंदन असो वा तुळस कोण संशोधन करायला जातं का ? नाही ना,तसचं हे देखील.
त्यांच्यापेक्षा अनंत पटीने उपकार केलेल्या अनेक ३ पिढ्या भारतीय इतिहासात उपल्ब्ध असताना या तिघांचीच नावे घ्यायचे काय कारण?
ह्म्म...असा प्रश्न किती जणांना पडतो? ज्या अर्थी अशा जाहिराती चालतात...त्या अर्थी त्यांची संख्या कमीच दिसते.
तुमच्या टाळक्यातरी आला याचा फार आनंद झाला.
बाबरालाच असे काय सोने लागलय?
जे होतं ते देखील या मंडळींनी ओरबाडुन नेलं...तेव्हा सोने काय आणि प्लाटिनम काय.
कोणीही यावं आणि राज्य करुन जावं...इतकं सोपं आहे ते...मग घोरी असो वा बाबर...
ज्या लोकांची मानसिकता गुलामीची झाली आहे ते विरोध तरी कशाचा करणार ?
बैटन रॅली मधे संस्कृत श्लोक म्हंटले जातात आणि आपल्या शाळेत mary had a little lamb शिकवले जाते...पहा कोण कोणाच कायं घेत आहे ते.

थोडक्यात:--- सिमी वाले सुटतात आणि सनातनवाले गोवले जातात का ? याही प्रश्नाचा विचार केला आणि जर त्याचे उत्तर मिळाले तर बहुधा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील मिळेल.

अवांतर :--- बैटन रॅली मधील संस्कृत श्लोकाचा इडियो कोणाला मिळाला तर जरुर सांगा.

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

नेहमी आनंदी's picture

4 Nov 2009 - 12:46 pm | नेहमी आनंदी

काही नाही हो....
त्यच काय आहे की शहाजी-शिवाजी-संभाजी ही नाव सगळ्यांना तोंड्पाठ आहेत.:)
त्यो कोण बाबर का हुमायू त्यो मेला लक्षातच राहात नाही. त्यामुळे हे बरं, मुलांचा आपसूक अभ्यास होतोय तर काय वाईट ?

पर्नल नेने मराठे's picture

4 Nov 2009 - 1:04 pm | पर्नल नेने मराठे

मुलांचा आपसूक अभ्यास होतोय तर काय वाईट ?
+१
चुचु

हर्षद आनंदी's picture

4 Nov 2009 - 2:06 pm | हर्षद आनंदी

मरु देत हो..

बाझवला त्या पिअर्सच्या !!! जाऊ दे ना... मस्त साबण लावा स्वच्छ रहा

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Nov 2009 - 2:08 pm | ब्रिटिश टिंग्या

शिवाजी संभाजी साबणाच्या जाहीरातीत नाही हेच बरे!

- टिंग्या

टारझन's picture

4 Nov 2009 - 2:13 pm | टारझन

सहज यक विचार आला .. जर तात्यानं साबण काढला (म्हणजे साबण कंपणी काढली) तर तात्या साबणाची जाहिरात कशी करेल ?
;)

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Nov 2009 - 2:15 pm | ब्रिटिश टिंग्या

लावायचा तर लावा नायतर चालु पडा :)

Nile's picture

4 Nov 2009 - 2:16 pm | Nile

ही आमची फलाना फलाना, हीचा आमच्या साबणावर भारी जीव.

=))

टारझन's picture

4 Nov 2009 - 2:22 pm | टारझन

बरा 'ब' चा 'मा' नाय केलास ! =))

आंबोळी's picture

4 Nov 2009 - 3:01 pm | आंबोळी

टार्‍या... _/\_

तात्याच्या साबणाच्या कंपणीचे घोष (धोशा सुधा चालेल) वाक्य
"वापरेन वापरे आणि एके दिवशी फेस करून टाकेन"

जाहिरात म्हणशील तर टेलेमॉल सारखे टिव्ही वर रोज वेगवेगळ्या विशिष्ठ सेवा पुरवणार्‍या स्त्रीया त्यांच्या पाठीचा अनुभव कथन करतील.
साबणाच्या कव्हरवरही रोज "आजची पाठाडी" असेल.

आंबोळी

विजुभाऊ's picture

4 Nov 2009 - 5:08 pm | विजुभाऊ

साबणाच्या कव्हरवरही रोज "आजची पाठाडी" असेल.

चुकतोस रे आंबोळ्या . पाठाडी नाय आजची पाठ.
अवांतरः आमचे एक मास्तर 'पुढचे पाठ मागचे सपाट" असे का म्हणत असतील बरे ;)

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

सूहास's picture

4 Nov 2009 - 8:53 pm | सूहास (not verified)

जर तात्यानं साबण काढला (म्हणजे साबण कंपणी काढली) तर तात्या साबणाची जाहिरात कशी करेल ?>>>

हा आमचा साबण ,जसा आहे तसा आहे ,ज्यांना पटत नाही त्यांना आम्ही फाट्यावर मारतो...

आमच्या आवडत्या स्त्रीला आवडणारा आवडता साबण..

आणी खाली सही असेल ..

आपलाच,
तात्या
आमच्याच साबणाचा फॅन किंवा मित्र..

@आंबोळी :: ते कंदील वाचुन झाल्यावर, मी जरा घाबरतच घागा उघडला बघतो तर ..जाहीरातीविषयी...

जाहीरातींची पातळी सध्या हीन दर्जाची झाली आहे...एकवेळ होता...ढुंढते रह जाओगे म्हणायचा..त्यात ती आसावरी बोट फिरवायची ते बघायला मजा यायची !!!

सू हा स...

सूहास's picture

4 Nov 2009 - 8:54 pm | सूहास (not verified)

प्रसादटाका

सूहास's picture

4 Nov 2009 - 8:55 pm | सूहास (not verified)

प्रसादटाका

अविनाशकुलकर्णी's picture

4 Nov 2009 - 10:21 pm | अविनाशकुलकर्णी

बाबर म्हणजे सरोजनि बाबर तर नाहि ना?????????

सुनिल पाटकर's picture

6 Nov 2009 - 9:30 pm | सुनिल पाटकर

प्रश्न बाबर, हुमायुं, अकबर"यांचा नाही .आनंददायी शिक्षण ही आजची गरज बनली आहे.मुलांना हसत खेळत शिकवले जावे हा उद्देश. या जाहिरातीत आई आपल्या लहान मुलिला स्नान घालता घालता इतिहास विषय शिकवते.इतकेच यातुन शिकु. यातुन बाबरला कुणीही मोठे करत नाही.

मदनबाण's picture

6 Nov 2009 - 9:35 pm | मदनबाण

पण बाबरच का ? हिंदू चे राजे या देशात जन्माला आलेच नाहीत का?
त्यांचा इतिहास शिकवायला यांना का जमत नाही?

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

धमाल मुलगा's picture

6 Nov 2009 - 9:37 pm | धमाल मुलगा

काय हे? मदन्या, लेका अश्यानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील बरं का!
असं बोलु नये!
जा बरं, दिल्लीकडं गुढगे टेकुन सजदे कर!

मदनबाण's picture

6 Nov 2009 - 9:41 pm | मदनबाण

लेका अश्यानं विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील बरं का !
हा.हाहा..अगदी योग्य बोललास रे मित्रा...त्यांच्या भावनांची यांनाच जास्त काळजी आणि आपल्या भावना मात्र शून्य !!!
मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

अडाणि's picture

7 Nov 2009 - 3:00 am | अडाणि

आज काल कश्याने कुणाच्या भावना दुखावतील याचा नेम नाही ;)

हिच जाहिरात हिंदु राजे / महाराज ह्याच्या नावाने काढली असती तर महाराजांच्या नावे कैवार घेतलेल्यांच्या पोटात दुखले असते. फालतू साबणाच्या जाहिरातीत राजेंचे नाव घेवून त्यांचा अपमान केला अशीही ओरड चालू झाली असती, कुणी सांगावे...

(|:

-
अफाट जगातील एक अडाणि.

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 3:02 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री अडाणी, तुम्ही मांडलेली शक्यता खरी ठरू शकली असती. संवेदनशीलतेचा अतिरेक सर्व धर्मात वाढला आहे.

भारत सरकार सोडा हो आपले मायबाप मिपा संपादकिय पण हेच करताना दिसतात. हा धागा बघा..

आधीचे शिर्षक "डोकेफिरु मुसलमान सैनिकाचा धिंगाणा" बदलून आता काय केले "डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)". भावना दुखावतात ना बाप्पा!!

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 12:44 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नाटक्या, येथे मिपाचा आणि संपादकांचा काय संबंध? तात्यांनी अफजलखानवधाचा फोटो लावल्याचे तुम्ही पाहीले नाही काय? मिपावर आरोप करतांना इतिहास समोर ठेवावा.

नाटक्या's picture

7 Nov 2009 - 12:49 am | नाटक्या

पण मग मुसलमान हा शब्द गाळण्याचे प्रयोजन?????

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 12:56 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नाटक्या, कारण संपादकांना विचारावे. मला वाटते त्यांची भुमिका अशी असावी: ज्या व्यक्तिने हा गोळीबार केला, ती व्यक्ति मुस्लीम धर्माची आहे पण त्या व्यक्तिचा धर्म अधोरेखित करण्याची आवश्यकता नसावी. त्याचा माथेफिरुपणा हे या घटनेस जबाबदार आहे, त्याचे मुस्लिम असणे हे नव्हे. उद्या मालेगाव बाँबस्फोटात हात असलेल्या पुरोहीतांमुळे कोणी 'माजी हिंदु सैनिकाचे दुष्कृत्य' असे म्हटल्यास (वास्तवात जरी पुरोहीत हिंदू असले तरी) विपर्यस्त ठरेल. संपादकांचा निर्णय कौतुकास्पद आहे असे मला वाटते. त्या लेखातील काही वाक्ये खटकणारी आहेत ती संपादीत केल्यास मिपाविषयी वाटणारा अभिमान वृद्धिंगत होईल.

Nile's picture

7 Nov 2009 - 1:02 am | Nile

सहमत आहे.

विशाल कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

सहमत आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विशाल कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 9:40 am | विशाल कुलकर्णी

सहमत आहे.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पक्या's picture

7 Nov 2009 - 1:07 am | पक्या

पण तो सैनिक मुसलमानच आहे ना. मुसलमानाला मुसलमान म्हटले तर काय बिघडले त्यात? जिथे जिथे न्यूज वाचली तिथे तर हसन चा मुस्लीम म्हणून उल्लेख आलेला आहे.
संपादकाने शीर्षकाला कात्री लावली असेल तर संपादकाचे चूकलेच आहे.

मदनबाण's picture

8 Nov 2009 - 6:34 pm | मदनबाण

.आनंददायी शिक्षण ही आजची गरज बनली आहे.मुलांना हसत खेळत शिकवले जावे हा उद्देश.
अशा जाहिरातीतुन काय शिकायला मिळते ते पहा...
http://www.youtube.com/watch?v=8kCDY2oOAWs
शिकण्यासाठी आपल्या संस्कृतीत बरेच काही आहे... तेव्हा बाबर नकोच !!!

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाजीराजांबद्दल शिकावं लागत नाही, गोष्टी आपोआप लक्षात रहात असाव्यात! परकीय आक्रमकांबद्दल शिकवण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात असं लॉजिक तर नसेल ना?

अदिती