नमस्कार मंडळी आज आपल्या शाकाहारी मित्रांसाठी एकदम सोप्पी आणि झटपट पाककृती घेउन आलोय.
बरेच जण सुरण म्हटल की नाक मुरडतात. ही डिश खास त्यांच्या साठी आहे.
सर्व प्रथम लागणार साहित्य :
सुरण १/४ किलो लहान तुकडेकरुन .
असल्यास पाती कांदा नाही तर १ लहान कांदा.
२ चमचे मक्याच पीठ
१ चमचा जीरेपुड.
१ चमचा लाल तीखट
२ मिरच्या बारीक चिरुन.
३-४ चमचे तांदळाच पीठ.
१ चमचा आल पेस्ट.
चिमुट भर हळद.
मीठ स्वादानुसार.
१) आधी सुरण कुकरला लावुन उकडुन घ्या. उकडल्या नंतर चांगल स्मॆश करुन घ्या.
२) त्यात वरील सर्व पदार्थ टाकुन चांगल एकजीव करा. त्याचे लहान लहान गोळे करा.
३) तेलात खरपुस तळुन घ्या. चटनी सॉस आणि गरमा गरम चहा सोबत सर्व्ह करा.
यात काल एक अॅडिशन केली.
दह्यात टाकुन पाहिले. मस्त लागले.
ताज दही घेउन त्यात साखरे ऐवजी थोड मीठ टाकल.
प्रतिक्रिया
8 Oct 2009 - 2:38 pm | श्रावण मोडक
चांगले लागतील हे वडे.
बाकी बरंच लिहायचं होतं. संपादित केलं माझं मीच.
8 Oct 2009 - 2:38 pm | JAGOMOHANPYARE
लई भारी......... आता वेज चालू करा.....
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
8 Oct 2009 - 2:38 pm | प्रभो
ए बाबा,
कधी आम्हाला पण भाव खाउ दे की.
एक दिवस लेट केला असतास तर काय झालं असतं???
आता आमच्या पाकृ कडे कोण पाहणार???..
(गणपाचा शिष्य)प्रभो
8 Oct 2009 - 2:49 pm | गणपा
हा हा हा सोरी हा भाउ साला हे डोस्क्याताच आला नाय बग..
नेक्स्ट टाईम ध्याना मंदी ठेवेन. :)
8 Oct 2009 - 2:40 pm | प्रभो
वडे मस्तच......फोटो अ प्र ति म !!!
8 Oct 2009 - 2:40 pm | अवलिया
लै भारी रं गणपा... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
8 Oct 2009 - 3:05 pm | सहज
"सुरणाचे काप"ला हा पर्याय करुन पाहीला पाहीजे पण डीपफ्राईड म्हणल्यावर उत्साह बारगळतो. :-)
8 Oct 2009 - 3:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडे सपाट बनवून शॅलो फ्राय करा ...
गणपा, तू एक रेस्तराँ का नाही उघडत?
अदिती
8 Oct 2009 - 3:56 pm | गणपा
उत्तम सल्ला, दोघां साठी :)
8 Oct 2009 - 4:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गणपा, एक वडा तळल्यातळल्या लगेचच तोंडात टाकला आहे आणि नंतरच फोटो काढला आहे ते समजलं! ;-)
अदिती
8 Oct 2009 - 4:09 pm | प्रभो
काय ग, एक तर वडा बनवायचा त्याने, पाकृ टाकायची त्याने तुम्ही नुसतं बघणार आणी वर टोमणे मारणार.....
राजेच्या भाषेत मालकापेक्षा वेटर जड (का जाड)
--प्रभो
8 Oct 2009 - 4:19 pm | गणपा
हॅ हॅ हॅ शबरीचा आदर्ष ठेवला.
उगाच कच्च खिलवल तर पोटात दु़खेल ना.
8 Oct 2009 - 3:07 pm | पर्नल नेने मराठे
थॅन्क्स गणपा :D
चुचु
8 Oct 2009 - 3:32 pm | भाग्यश्री कुलकर्णी
भारीच्च आहेत हे वडे. करुन पाहिन एकदा.
8 Oct 2009 - 4:09 pm | विंजिनेर
ह्म्म.. सुरण...
ही एक मठ्ठ भाजी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे आम्ही बाद...
8 Oct 2009 - 4:26 pm | स्वाती२
छान दिसतायत वडे
8 Oct 2009 - 5:35 pm | किट्टु
मला सुरण अजिबात आवडत नाही.. पण वडे मस्त दिसताहेत.... =P~
करुन पाहायला हवे...
8 Oct 2009 - 5:37 pm | नंदू
झकास दिसताहेत. हे तुमचं innovation का?
आत्ताच खावेसे वाटतायत.
नंदू
8 Oct 2009 - 5:57 pm | लवंगी
:( पण वडे खास
9 Oct 2009 - 12:14 am | स्वाती२
देशी ग्रोसरी स्टोअर मधे मिळेल फ्रोजन सुरण.
9 Oct 2009 - 3:30 am | लवंगी
यामचे करून पाहीन
8 Oct 2009 - 6:26 pm | धनंजय
[पण हा सुरण कुठे मिळाला - आणि चिनी दुकानात त्याला म्हणतात तरी काय? गोव्यात मिळणारा सुरण आत करडा असे. इथे दाखवलेला सफेत सुरण म्हणजे या भाजीची थोडी वेगळी जात आहे का?]
वडे छानच लागले असणार, शंका नाही.
8 Oct 2009 - 6:37 pm | गणपा
शुद्ध मराठीत 'याम' (YAM) म्हणतात. :) गुगलुन पाहिलत तर फोटो मिळतील.
8 Oct 2009 - 6:48 pm | धनंजय
या "याम"चे वडे आता करूनच बघतो.
(याम खाताना मला सुरणापेक्षा अगोड रताळ्याची आठवण अधिक येते. मी याचा कीस जिर्याची फोडणी, दाण्याचे कूट घालून शिजवतो - उपवासासाठी रताळ्याचा किंवा बटाट्याचा कीस करावा तसा.)
8 Oct 2009 - 9:51 pm | बेसनलाडू
याम ला सुरणाची चव नाही, हे १००% खरे.
वडे उत्तम गणपाशेठ! चालू द्यात.
(खवय्या)बेसनलाडू
8 Oct 2009 - 7:29 pm | प्राजु
मस्त!!
गणपाने एक रेस्टॉरंट काढावे ....
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Oct 2009 - 3:38 am | चित्रा
आवरा कोणीतरी याला असे अलिकडेच कोणीतरी म्हणाले असे वाटते.
(वडे झकास. करून पाहीन. खूप दिवसांत तळण केलेले नाही, त्यामुळे काही वाटणार नाही. असेच मला केळफुलाचे वडे आवडतात. तेही मिळते का नायजेरियात? )
9 Oct 2009 - 12:52 pm | गणपा
केळफुलाचे वडे आणि भाकरी (बोंडाची भाकरी) क्लास लागते.
इकडे मिळलतर करुन चढवीन मिपावर.
9 Oct 2009 - 12:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
चालूद्यात तुमचे पालथे धंदे गणपासेठ! ;-)
अदिती
9 Oct 2009 - 5:28 am | मीनल
आज चक्क शाकाहारी पदार्थ?
हा नक्की करून पाहू शकते.
मीनल.
9 Oct 2009 - 8:41 am | क्रान्ति
खासच दिसताहेत वडे. दिवाळीसाठी अजून एक सोपा पदार्थ मिळाला! :)
क्रान्ति
अग्निसखा
9 Oct 2009 - 8:58 am | हर्षद आनंदी
आता काही अश्याच शाकाहारी पदार्थांच्या पाकृ पाठव रे.
कोंबडी, बकरे, डुकरे, साप, पाली व अन्य जीवांना यांना काही दिवस अभय द्यावे म्हणतो.
भुतदयेवर विश्वास ठेवणारा पण भुतांना घाबरणारा
9 Oct 2009 - 12:52 pm | मसक्कली
=D> सोपे आनि छान दिसत आहेत.
चव ही चान्गलीच आसेल नाही का गणू.... ;)
9 Oct 2009 - 1:40 pm | आशिष सुर्वे
हम्मम्म..
ओगा..
'याम' मुबलक मिळतो ना आपल्याकडे!!
छान आहे ही पाककृती!
-
कोकणी फणस