माझे रिकामपणाचे उद्योग--- भाग १!!!
तसं पाहता गेलं तर माझं नी एखाद्या कलेचं एकदम वाकडं... म्हणजे एखादं काम करायला लागणारी नजाकत कशाशी खातात हेच माहीत नाही.. त्यामुळं आईच्या भाषेत माझ्याकडे एखादं नाजूक काम... म्हणजे फक्त 'धडा'चा विध्वंस!!!! नी याबाबतीत घरी तसंही कुणाचं दुमत नाही...
लहानपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शनचं राज्य होतं.... तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे.. नि लोक कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून आपली कामं करायचे... पुन:प्रक्षेपण पण तितकंसं व्हायचं नाही.. नि झालं तरी त्याच्या आगाऊ सूचना तर नसतच नसत.... नि नेमके हे दिल्ली दूरदर्शनवाले लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत काहीतरी टाकाऊतून टिकाऊ बनवायला शिकवणारे कार्यक्रम लावायचे.. नि मला याची भयंकर चीड यायची.. एकतर माझ्या वयाच्या लोकांवर ताईगिरी केल्याने माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत खेळायला तयार नसायच्या.. नि म्हणून आईकडून बहिणींच्यावर खेळण्यासाठी दट्टया आणायचा तर त्यांना हे असले काहीतरी प्रकार टीव्ही वर बघायचे असायचे...
एकदा असंच मला बळेबळे टीव्ही समोर बसायला लावलं होतं.... नि आईच्या दुर्दैवानं त्यादिवशी जुन्या साड्यांचे पायपुसणे कसे करायचे ते दाखवले.. झालं...!!!!! मग मला पण ते बनवायचं होतं.... नि नेमक्या मला आवडलेल्या साड्या आईच्या चांगल्या रोजच्या वापरातल्या होत्या... तिनं व्हेटो वापरला... मी भोकाड पसरलं... नि त्याची परिणीती आईनं मला चांगलंच बदडण्यात झाली... कुठे शिकलीये कोण जाणे.. पण तिचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का आहे... मी अजूनही तिचा एकही फटका हातावर झेलू शकले नाहीये... मग रूसवा.. फुगवा... असं सगळं होऊन बिचारीनं या सुटीत तुला निदान एक वस्तू बनवू देईन असं सांगितलं... त्यात पण बर्याच अटी होत्या... पहिली म्हणजे कात्री वापरायची नाही.. त्याचं कारण असं होतं की एकदा घरातले सगळे झोपले असताना मला नि माझ्या भावाला व्यापार व्यापार खेळायची हुक्की आली होती.. नि मी ट्रंकेत एक कसलंतरी खरेदीखत पाहिलं होतं... त्याच्यावरची नोटांची चित्रे कापून त्यादिवशी आम्ही पैसे म्हणून वापरली होती.... भाऊ लहान म्हणून वाचला.. पण पुन्हा एकदा आईनं रँडमायझेशन अल्गोरिदमचा प्रयोग केला होता... :( बाकीच्या अटी पण अशा बर्याचशा अनुभवातूनच बनल्या होत्या...
मग एक दिवस टीव्ही वर बुकमार्क्स कसे बनवायचे ते दाखवले... नि सतत माझी भुणभुण ऐकून कंटाळलेल्या आईनं हार पत्करली.... थोडे कागद.... एक स्केचपेनचं पाकीट... अगदी अंगावर रंगवलं तरी हरकत नाही असा चांगला मळखाऊ पोषाख...... एक कात्री... एवढं सगळं देऊन नि जे काही पराक्रम गाजवायचे ते दिलेल्या सामानावरच... असा दम देऊन एका काल्पनिक रिंगणात बसवून ती गेली...
अगदी सहज सोप्पं होतं ते!!!! कागदाला घडी घालायची... वरती एक छोटेखाने नी खाली तुलनेने थोडा मोठा आकार कापून घ्यायचा... घडी उलगडून त्यावर थोडं रंगकाम..... असा बाकीच्यांच्या दृष्टीनं चांगला निरूपद्रवी प्रकार होता तो...
नंतरही बहिणींनी भरतकाम.. रंगकाम... काहीही केलं मी मध्ये घुसायचं नि त्या दोघींनी गनिमी काव्याने ते प्रयत्न हाणून पाडायचे हे ठरलेलंच असायचं... बिचार्याना करण्यापेक्षा निस्तरणंच भारी पडायचं ना... नंतर एका वसतीगृहात रहात होते तेव्हाची गोष्ट!!! हे होतं नोकरी करणार्या मुलींचे वसतीगृह.. पण काही विद्यार्थिनीपण तिथे रहायच्या... मी इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवत असल्याने माझ्या ग्रुपमध्ये पण त्यांचाच भरणा जास्त होता... असेच एकदा त्यांच्या परीक्षा चालू होत्या... आम्ही निशाचर... रात्री १-२ वाजता कधीतरी शेजारच्या खोलीत डोकावले तर ती मुलगी पांढर्या कागदावर रंगीत खडू.. स्केचपेनने काहीतरी करत होती....
मी म्हटलं.. 'अगं आज पेपर झालाय.. कशाला उगाच जागतेस... मस्त झोप ना!!'
त्यावर तिचं उत्तर होतं..'चेंज एन वर्क इज रेस्ट... मला हे आवडतं.. त्यामुळं मला हे आरामासारखंच आहे. आईच्या वाढदिवसाला मी हे माझ्या हातांने बनवलेलं भेटकार्ड देणार आहे!!!'
अस्सं??? मी लगेच ती नि तिचं ड्रॉईंग याच्या मध्ये..... @)
'मी करू तुला काही मदत चित्र काढायला नि रंगवायला????'
दोन-तीन वर्षांच्या सहवासात तीनंही माझ्यातले सुप्त गुण चांगलेच ओळखलेले.....
'त्यापेक्षा मॅम तुम्ही स्वतःचं छानसं भेटकार्ड बनवा ना!!!!'
दोन कागद, ग्लीटर पेन्स, रंग.. असं काही साहित्य देऊन मला समोरच्या रिकाम्या बेडवर पाठवून तिने सुटका करून घेतली.... मी पण वॉशिंग्टनच्या उत्साहात थोडीफार अक्कल पाजळायचा प्रयत्न केला.. एका कागदावर वेड्यावाकड्या चित्रांनी गिरगटून झाल्यावर कळलं... हे भेटकार्ड जरा जास्तच होतंय.... आपण त्यापेक्षा लहान आकारातलं काहीतरी करायला हवं.... नि मला आठवली... आयुष्यात एकदाच काहीतरी बनवलेली कलात्मक वस्तू... बुकमार्क्स!!!!!! :D
पण कसं बनवणार?? एकदा चित्रकलेच्या बाईंनी हट्टानं इंटरमिजिएट की कसलीशी परीक्षा असते.. ती द्यायला लावली होती.. नि मी माझ्या अपेक्षेप्रमाणं त्यात झक्कपैकी नापास झाले होते.... त्यामुळं तिथंपण बोंब....
मी परत एकदा तिच्या चित्रात डोकं खूपसून....
"हे डिझाईन तुला कसं सुचलं???"
तीनं मी खराब केलेले कागद पाह्यले... माझी एकंदर चित्रकलेतली गती तिला कळली असावी....तीनं एक मेहंदीचं पुस्तक काढून दिलं... मग ते बघून बघून एक काहीतरी बनवलं... नि फ्रेंडशिप डे ला मीच तिला बांधलेली सॅटिनची फीत मागून घेऊन त्याला बांधली...
खूप पण काही चांगलं झालंय असं तरी वाटत नव्हतं... म्हणून जरा वेळ देऊन एक छानसं चित्र काढलं...
पण हे बनवता बनवता माझीच वाट लागली.. नि तसंही चित्रकला काही माझा प्रांतही नाही.. नि तसंही हे इतकं तकलादू वाटत होतं की माझ्या नाजूक हातात यांची अर्ध्या तासात वाट लागली असती... त्यामुळं आता याच्यावर प्रयोग चालू केले...
पहिल्यांदा आणले हँडमेड पेपर्स!!!!
त्यात स्केचपेनांनी तितकीशी रेखीवता नि सफाई येत नव्हती.... म्हणून वेगवेगळ्या रंगांचे फाईनलाईनर्स..... नि वेगवेगळ्या रंगांचे रेशमी धागे..... (धाग्यांचा फोटो काढायचा कंटा़ळा आलाय..)
नि मग.... धडाड धूम....!!!!!
भेटकार्डे----
यावर फक्त एक पारदर्शक कागद लावला नि त्यावर छानसा संदेश लिहिलं की झाssssssssssssssssssलं.... यातपण अनुभवातून बरेचसे बदल झाले... हँडमेड कागद पण वेगवेगळ्या जाडीचे नि वेगवेगळ्या पोतांचे असतात.. पातळ कागदाला पांढरा ड्रॉईंगचा कागद मजबुती देण्यासाठी वापरत होते.. आता मुद्दाम जाडसर कागदच आणते... जाड रेशमी धागे ओबड्धोबड वाटतात.. तेच जरा पातळ असतील तर नाजुक दिसतात.... गेल्या दीड वर्षांत बरेचसे बुकमार्क्स बनवले.. त्यातल्या बहुतेकांचे फक्त फोटोजच माझ्याकडे आहेत.... :) नि ते माझ्या मित्रमैत्रीणींच्या पुस्तकात मस्त विराजमान आहेत.... अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा अस्मादिक स्वतःवर खूप खूष आहेतच..... नि इतरांनी कौतुक केल्यावर मग तर काय..!!!!! :D गंमत म्हणून चालू केलेला छंद मात्रा आता जास्तच भावलाय... पहिला अतिशय फालतू बुकमार्क मोठ्या प्रेमाने काहीही टोमणे न मारता घेणार्या भावाने आता स्वतःला दा विन्ची समजतेस काय म्हणून विचारायला सुरूवात केलीय.... :)
प्रतिक्रिया
23 Sep 2009 - 7:33 pm | दशानन
=))
=))
मस्त लिहले आहेस... कला तर एकदम भारी आहे बॉ.. !
फोटो जबरदस्त... !
***
राज दरबार.....
23 Sep 2009 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते
मक ने इतकं छान लिहिलंय आणि राजेला काय आवडली तर म्हणे कला... ;) (राजे, कला सापडली तुम्हाला एकदाची... ;) )
बिपिन कार्यकर्ते
23 Sep 2009 - 11:54 pm | चतुरंग
घ्या की जरा 'कला'कला'ने! ;)
(कललेला)चतुरंग
23 Sep 2009 - 7:46 pm | रेवती
लेखन तर आवडलच पण बुकमार्क्स फारच भारी भारी झालेत. मला फार आवडतात बुकमार्क्स्.....करायला नव्हे.......पुस्तकात ठेवायला. निळे आणि ब्राऊन तर 'मला हवेत' असे झालेत. त्रिकोणी बुकमार्क एकदम वेगळा. आणि तसे सगळेच छान आहेत.
रेवती
23 Sep 2009 - 7:49 pm | सुबक ठेंगणी
मला कधी देते आहेस करून एखादा?:?
तो स्नोमॅनचा तर फारच क्युट आहे...
23 Sep 2009 - 7:55 pm | निखिल देशपांडे
हुश्श...
मक चा लेख म्हणुन जरा भीत भीतच उघडला..
मॅरेज लाईफ नंतर आता काय?? परत एकदा माझी वाट लावणार का?? त्या नंतर परत धुरळा उडणार का?? अषे अनेक प्रश्न मनात होते. वाचुन झाल्यावर म्हणुन पहिली प्रतिक्रिया हुश्शच!!!
... त्याच्यावरची नोटांची चित्रे कापून त्यादिवशी आम्ही पैसे म्हणून वापरली होती...
=)) =)) =)) =))
कठीण आहे...
बाकी हे बुकमार्क बणवण्याचे शिकवण्याचे क्लासेस नाहीत का गं तुझे???
तसे सोपं वाटत आहे खरे!!! अगदी चालता बोलता करण्या लायक..
काही काही बुकमार्क क्लासच आहेत हा!!!
(बुकमार्क गिफ्ट मिळालेल्या दोन मिपाकरांपैकी एक)
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
23 Sep 2009 - 7:53 pm | धमाल मुलगा
_/\_ धन्य आहेस गं!
काकूंचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का कसा आणी का आहे ह्याची उत्तरं लेखातच मिळाली! ;)
खरेदीखताच्या नोटा???? आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला फाशी दिली असती राव :D
अवांतरः बुकमार्क्स लै भारी :)
मला गिफ्ट कधी देणार? :)
23 Sep 2009 - 7:57 pm | निखिल देशपांडे
खरेदीखताच्या नोटा???? आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला फाशी दिली असती राव
+१ सहमत आहे राव..
बाकी रँडमायझेशन अल्गोरिदम बद्दल खुप एकुन आहे...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
23 Sep 2009 - 8:01 pm | मस्त कलंदर
कधीही.... फायनल परीक्षा संपल्यानंतर पुण्याला एक दोन दिवस यायचा विचार आहे.. तशीही धमीला भेटायची इच्छा आहे... तेव्हा पाहू....
निखिल नि बिकांना बुकमार्क्स आधीच मिळालेत.. अदितीसाठी पण पाठवले होते.. पण बहुतेक बिका तिला द्यायला विसरले... चालायचंच... आता व्हायचंच असं त्यांच्याकडून वयोमानानुसार कधीतरी!!!! :P
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
23 Sep 2009 - 8:08 pm | श्रावण मोडक
आता व्हायचंच असं त्यांच्याकडून वयोमानानुसार कधीतरी!!!!
फट्टाक!!!
23 Sep 2009 - 8:09 pm | धमाल मुलगा
घर आपलंच आहे...कधीही येवा :)
23 Sep 2009 - 11:43 pm | बिपिन कार्यकर्ते
मी बोलू का काही? ;)
बिपिन कार्यकर्ते
24 Sep 2009 - 9:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिका३, तुम्ही काहीही बोलू नका. ढापायचेच होते बुकमार्क्स तर सरळ सांगायचंत ना ...
मक, झकास लिहिलं आहेस. रेशमी धाग्यांचा फोटो काढायचा कंटाळा आला हे तर भारीच आहे. माझी सख्खी मैत्रिण शोभतेस! :-D
तुला गुरूस्थानी ठेवून ट्रान्सपरन्सीजवर रंगवायला सुरूवात केली आहेच. आता हे पण सुरू करते.
(बुकमार्क मिळूनही न मिळालेली) अदिती
23 Sep 2009 - 7:58 pm | स्वाती२
बुकमार्क आवडले आणि लेखनही. तो बाप्पाचा खूप आवडला.
23 Sep 2009 - 8:04 pm | प्राजु
मस्तच!!
लेखन तर मस्तच!! बुकमार्क्स सुद्धा मस्त झाले आहेत.
तुम्ही ऑर्डर्स घेता का?;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2009 - 11:34 pm | संदीप चित्रे
खूप आवडला.
बाकीचेही आवडले.
अजून अनेक चांगले बुक मार्क्स तयार करण्यासाठी शुभेच्छा.
23 Sep 2009 - 11:38 pm | बिपिन कार्यकर्ते
परत एकदा कहाणी ऐकून मजा वाटली. लिहिलंयही झक्कास. बाकी मला बुकमार्क्स कधी दिलेस ते आठवतो आहे. पण आता तू म्हणतेसच आहे तर कोणी विचारलं तर मी म्हणेन की तू दिले होतेस बुकमार्क्स म्हणून. (निखिल, गप्प बस, आधीच सांगून ठेवतोय).
काही विचार मनात आले ते सांगतो:
काकूंना नमस्कार सांग. आणि माझा एक निरोपही सांग, त्यांना म्हणावं, "तुम्ही जगावर किती उपकार केलेत ते तुम्हालाच माहित नाहीये."
दादांना माझा नमस्कार सांग. आणि माझा एक निरोपही सांग, "उशिरा कळले तरीही सत्य हे सत्यच असते."
याव्यतिरिक्त, घरातील सगळ्यांना माझी सहानुभूती कळव.
बिपिन कार्यकर्ते
24 Sep 2009 - 1:58 am | शाहरुख
छान छान !!
अभ्यासाच्या पुस्तकांसाठी आम्हाला बुकमार्क लागायचे..नाहीतर तेचतेच वाचले जायची भिती..
(काजोलचा फोटो बुकमार्क म्हणून वापरलेला) शाहरुख
24 Sep 2009 - 2:52 am | रेवती
अभ्यासाच्या पुस्तकांसाठी
आईग्ग! हे शाहरूखभाऊ तर एकदम भारीच्चेत!
=))
उच्च ज्योक होता हां!
रेवती
24 Sep 2009 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
अभ्यासाच्या पुस्तकांसाठी
=)) =))
शाहरूखमियां, तुम्ही परीक्षेच्या किती दिवस आधी पुस्तकं आणायचात हो? ;-)
अदिती
24 Sep 2009 - 11:00 am | शाहरुख
अवांतर होतंय खरं पण तरीही...
आम्हीही इंजिनिअरींगला दर परिक्षेच्या आधी फक्त ३-४ आठवडे वगैरे अभ्यास करून पदवी संपादन केली असली तरी आम्हास त्याचा अजिबात अभिमान नाहीय..पदवी सारखी गोष्ट येवढ्या 'चीप' रितीने मिळावी याचा खरंतर खेद वाटतो..असो.
विनोद आवडल्याचे आवर्जून सांगितल्याबद्दल आपल्या दोघींचे आभार.
24 Sep 2009 - 2:14 am | चतुरंग
बुकमार्क्स आवडले.
मारण्याचा रँडमायझेशन अल्गोरिदम हा प्रकार भारीच! ;)
(आम्ही मोठ्या जाड पुस्तकांना छोटी पुस्तकेच बुकमार्क्स म्हणून वापरायचो! ;) )
(रँडम)चतुरंग
24 Sep 2009 - 5:23 am | चित्रा
बुकमार्क छान आहेत, मी नेहमीच आणते आणि ते वापरताना इकडे तिकडे पडून जातात.
24 Sep 2009 - 6:02 am | लवंगी
आणी छान बुकमार्क..
24 Sep 2009 - 7:19 am | नंदन
लेखन आणि बुकमार्क्स दोन्ही मस्तच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Sep 2009 - 7:27 am | अवलिया
हेच बोलतो
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
24 Sep 2009 - 8:25 am | सहज
हेच म्हणतो.
24 Sep 2009 - 3:14 pm | सूहास (not verified)
वाहवा
सू हा स...
24 Sep 2009 - 3:44 pm | स्वाती दिनेश
तुझा लेख आणि बुकमार्क दोन्ही मस्त..
स्वाती
27 Sep 2009 - 2:31 pm | क्रान्ति
खुसखुशीत लेखन नेहमीप्रमाणेच! आणि कलाकारी तर भारीच!:)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
4 Oct 2009 - 10:02 pm | चतुरा
हे फाइनलायनर्स अमेरिकेत कुठे मिळतील?
5 Oct 2009 - 9:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'स्टेपल्स', हॉबीशॉप्स किंवा तत्सम दुकानांमधे पहा.
अदिती
5 Oct 2009 - 11:45 am | नीधप
एकपण फोटू दिसत नाहीये. काय घोळेय?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
13 Oct 2009 - 12:30 am | वेदश्री
खूपच सुंदर लिहिले आहेस, मस्त कलंदर! तू दाखवलेले बुकमार्क्सचे नवनवे प्रकार पाहून मलाही आता नवनव्या आयडीया सुचतायत. आता वेळ कधी मिळतो ते बघून करणार! :-) कधीची ठरवत होते प्रतिसाद द्यायचं.. अखेर आज वेळ मिळाला!
शाळेत असताना मी एका सुरेखशा पिवळ्या पडलेल्या पिंपळाच्या पानाला फरशी पुसायला वापरल्या जाणार्या अॅसिडने घासून त्याची जाळी तयार केली होती. मग त्याला एक हलकासा रंग देऊन सुकवले. पेपरमध्ये आलेल्या एका बालगणपतीचे मला अत्यंत आवडलेले चित्र ट्रेस पेपरवर ट्रेस करून घेतले. तो ट्रेस पेपर मध्ये एक कार्बन पेपर ठेवून त्या जाळीदार पानावर ठेवला आणि त्या बालगणूला त्या पिंपळाच्या पानावर उतरवले. मग आईला विचारून विचारून रंगसंगती ठरवून तो बालगणू रंगवला आणि झाला माझा बुकमार्क तयार!
अतिशय बारीक दोर्याची क्रोशा विणाकाम करून एक नक्षीदार लेस बनवायची आणि मग ती स्टार्च करून सुकवायची, की झाला बुकमार्क तयार!
13 Oct 2009 - 11:01 am | अमोल केळकर
बुकमार्क करुन ठेवण्यासारखा धागा. मस्त छंद जोपासलाय आपण
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Oct 2009 - 1:22 pm | विसोबा खेचर
छान रे!
13 Oct 2009 - 3:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्या, सूर अंमळ चुकलाच तुमचा! रे नाही, ग आहे मस्त कलंदर.
अदिती
13 Oct 2009 - 3:13 pm | श्रावण मोडक
तात्यांचा सूर चुकला! ;)
14 Oct 2009 - 12:51 am | शाहरुख
हा हा..
आणि रे कशाला असल्या भानगडीत पडतोय ?
- शाहरुख रे
13 Oct 2009 - 6:31 pm | गावरान
मी आपला आळशी. चक्क 'पोस्ट इट्ट' चे 'बुकमार्क' ह्मणून वापरतो.
(१ प्रश्णः इन्ग्रजी शब्द रोमन बाराखडीत कसे लिहायचे?)
गावरान