गाभा:
विकास ह्यांनी सुरू केलेल्या चर्चेत अधिक अवांतर नको म्हणून इथे नविन चर्चा सुरू करत आहे..
काही मुद्दे -
हिंदू धर्म म्हणजे नक्की काय?
हा धर्म आहे काय?
ही जीवनपद्धती आहे काय?
जीवन पद्धती म्हणजेच धर्म नव्हे काय?
नसेल तर जीवन पद्धती आणि धर्म ह्यामध्ये फरक काय?
संप्रदाय म्हणजे काय?
हिंदू संप्रदाय की हिंदू धर्म?
हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा कुणाला अधिकार आहे?
हिंदुत्व आणि हिंदू मधला फरक काय?
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 10:48 pm | मदनबाण
हे वाचा आणि बघा काय बोध होतो ते :---
http://www.vivekananda.org >>> Readings >>>Addresses at the Parliament of Religion, Chicago >>>Paper on Hinduism
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
30 Aug 2009 - 12:15 am | विजुभाऊ
धर्म म्हणजे काय . पूजा करताना घंटा उजव्या हातात असावी की डाव्या? शेंडीची लांबी काय असावी? ताम्हन हे शास्त्रशुद्ध की पळी पंचपात्र योग्य?
ह्या असल्या चर्चाचर्हाटामुळे हिंदु धर्माचे डबके झाले आहे असे विवेकानन्द शंभर वर्षापूर्वी म्हणाले होते
30 Aug 2009 - 12:58 am | निमीत्त मात्र
मिसळभोक्ता, यशोधरा वगैरे सभासदांनो,
स्वामी विवेकानंदही हिंदू'धर्म' असा उल्लेख करत आहेत. तुमचे ह्यावरील मत जाणून घ्यायला आवडेल.
नक्की कुणाचे ऐकावे? सर्वोच्च न्यायालयाचे, सावरकरांचे, विवेकानंदांचे, टिळकांचे की अजून कुणाचे?
30 Aug 2009 - 9:33 am | युयुत्सु
आपण जी यादी दिली आहे त्यात सर्वोच्च न्यायालय हे श्रेष्ठ आहे
30 Aug 2009 - 8:47 am | विसोबा खेचर
माहीत नाही..
हो. निदान लहानपणापासून तरी असेच कळले आहे..
माहीत नाही..
असं म्हणता येईल असं वाटतं!
'ठराविक पद्धती/रितीरिवाज मानणारा एक समूह' अशी माझ्या लेखी व्याख्या आहे..
सांगता येत नाही...
माहीत नाही...
मला माहीत नाही. कदाचित याचं उत्तर बाळासाहेब ठाकरे देऊ शकतील..
तात्या.
30 Aug 2009 - 9:18 am | युयुत्सु
Religion Explained हे Pascal Boyer या मानववंशशास्त्रज्ञाचे पुस्तक मिळ्वून वाचावे. जमल्यास संक्षेपाने त्याचा परिचय करून द्यायचा प्रयत्न करीन. एखाद्या मानवसमूहाने स्वीकारलेला जीवनविषयक आणि वैश्विक दृष्टीकोन म्हणजे धर्म अशी सोपी सुटसुटीत धर्माची व्याख्या करता येईल. जीवनविषयक दृष्टिकोनात आचरण, नीति यांचा समावेश होतो. चार वर्ण आणि आश्रम हे हिंदूंचें पायाभूत जीवनविषयक दृष्टीकोन आहेत.
31 Aug 2009 - 9:41 pm | अजुन कच्चाच आहे
चार वर्ण आणि आश्रम हे हिंदूंचें पायाभूत जीवनविषयक दृष्टीकोन आहेत.
चातुर्वर्ण्य हा हिंदुत्वाचा (आजही) पाया असेल तर मला हिंदू म्हणवून घ्यायला लाज वाटेल.
.................
अजून कच्चाच आहे.
30 Aug 2009 - 9:23 am | यशोधरा
निमा, भरपूर काथ्याकूट करता येईल, पण पुन्हा, पुन्हा तेच तेच काय बोलायचे? स्वामी विवेकानंदांच्या विचारांची/ लिखाणाची लिंक तर वर बाणाने दिलीच आहे, तिथे सुरुवातीलाच म्हटले आहे,
हे एक. त्यातील he began to speak it was of "the religious ideas of the Hindus", हे मला फार महत्वाचे वाटते. ह्यात केवळ वैदिक धर्म अनूस्यूत नाही असे मला वाटते, माझे चुकत असेल तर जाणकारांनी जरुर सांगावे. हिंदूस्तानच्या भूमीवर जन्मलेला/ली/ले जो/ जी/ जे, आणि म्हणून तो/ती/ते हिंदू (सिंधू व अल् हिंद चे संदर्भ) , त्यांच्या पंथातील सांगितल्या गेलेल्या (त्यांच्या) धार्मिक निष्ठा...
आणि मग
हे देखील पहा,
आणि हे,
याहून अधिक स्पष्ट ते काय? असो.
30 Aug 2009 - 4:49 pm | निमीत्त मात्र
ह्या निकषानुसार अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतिय (हिंदू) लोकांना अमेरिकेत झालेली अपत्ये हिंदू नाहीत का? कारण त्यांचा जन्म हिंदूस्थानाच्या भूमीवरचा नाही.
31 Aug 2009 - 4:18 pm | यशोधरा
>> भारतिय (हिंदू) लोकांना अमेरिकेत झालेली अपत्ये हिंदू नाहीत का?
निमा, शब्दच्छल करताय. ठीके :) पण काय हो, अमेरिकेतले पालक त्यांच्या मुलांवर अमूक एक जीवनपद्धती स्वीकार असे बंधन कसे आणू शकतील? शकतील का? :)
असो. अपूर्ण व्याख्या नव्हे. मी व्याख्या करतच नाही आहे. इतकी सरळ सोट आणि संकुचित चौकटीत ही व्याख्या कशी बसवता येईल? की तुम्हाला तुमचे म्हणणे ग्राह्य ठरावे, त्यासाठी ती चौकटीत बसवूनच हवी आहे? झोडपायचे काम सोपे होईल का त्यामुळे? हे खाली उधृत केलेले वाचले नाहीत की सोयीस्कर रीत्या वगळलेत?
असो.
31 Aug 2009 - 6:32 pm | निमीत्त मात्र
मी शब्दछल नाही करत आहे. प्रामाणिकपणे माझ्या शंका विचारत आहे. तो तुम्हाला शब्दछल वाटू शकतो.
व्याख्या ही चौकटीत (ही चौकट संकुचितच असावी असे मी म्हणत नाही.) बसवावी असा माझा आग्रह आहे.कारण चौकट नसेल तर कुणीही काहीही अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे लावेल आणि जगातील प्रत्येक माणूस हा हिंदूच असे सिद्ध करता येईल.
ही मात्र अकारण गरळ कशासाठी? एक ठाम चौकट बसवली तर उलट झोडपण्यापासुन सरंक्षणच मिळेल.
31 Aug 2009 - 7:14 pm | यशोधरा
गरळ :) बापरे! गरळ वगैरे नाही हां काही.
31 Aug 2009 - 5:18 pm | श्रावण मोडक
प्रश्न मला नाही. तरी हा थोडा आगाऊपणा...
अमेरिकेत जन्माने नागरिकत्त्व मिळते का? नागरिकत्त्व ही एक आयडेंटिटी आहे ना या काळात? त्या अर्थाने अमेरिकेत किंवा इतरत्रही गेलेल्या हिंदू (भारतीय - अल हिंद, सिंधू वगैरे यशोधरा यांनी मांडलेल्या मुद्याच्या अनुषंगाने) व्यक्तींची मुले ही 'हिंदू' नाही ठरणार. त्यांची आयडेंटीटी धार्मिक अंगाने जाल तर वैदिक धर्म, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन, मुस्लीम हीच असेल. जिओ-पॉलिटिकल अंगाने ती अमेरिकन हीच असेल. बॉबी जिंदाल हे त्यांच्याइथलं चांगलं उदाहरण होईल.
मार्क टुल्ली, गेल ऑम्व्हेट, अर्थतज्ज्ञ ज्यॉं ड्रीझ (उच्चार बरोबर आहे ना?) बर्नस्टीन मावशी ही इथली उदाहरणं...
जाऊ द्या. या प्रश्नांची ब्लॅक अँड व्हाईट उत्तरं नसतातच.
भोचक यांच्या धाग्यात नंदन यांनी लिहिलं आहे - "स्थलांतरितांना आपल्या संस्कृतीत सामावून घेण्यासाठी जे जाणीवपूर्वक प्रयत्न..." हे सामावून घेणं जे आहे ना त्यात या प्रश्नांच्या उत्तरांची एक छटा मिळते पहा. तुल्ली, गेल वगैरे आता इथं सामावून गेल्यातच जमा आहेत. त्यांची धार्मिक ओळख (गेल, ड्रीझ यांच्याबाबत हा मुद्दा नसावा, स्टेन्सबाबत असावाच) ही वेगळी. बाकी ते भारतीयच आणि त्याच जिओ-पॉलिटिकल (म्हणजेच अल हिंद, सिंधू वगैरे संदर्भांच्या अनुषंगाने) अर्थाने हिंदू!!!
31 Aug 2009 - 6:39 pm | निमीत्त मात्र
होय. अमेरिकन भुमीवर जन्मलेला प्रत्येक मानवी जीव हा अमेरिकेचा नागरीक ठरतो.
यशोधरा यांनी मांडलेला मुद्दा अपूर्ण आहे हे त्यासाठीच मी म्हणालो. तुम्हाला तो शब्दछल वाटला नाही म्हणून आभारी आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या (बहुतांश हिंदूना) तुमची मुले हिंदू नाहीत का? असे विचारुन पाहा. तुम्हाला उत्तर मिळेल.
बॉबी जिंदाल ह्यांनी धर्मांतरण करुन ते ख्रिश्नच झाले आहेत म्हणतात. ते मुळात हिंदू नव्हतेच तर त्यांना धर्मांतर करायची काय गरज?
31 Aug 2009 - 6:58 pm | श्रावण मोडक
अमेरिकेत स्थायिक झालेल्या (बहुतांश हिंदूना) तुमची मुले हिंदू नाहीत का? असे विचारुन पाहा. तुम्हाला उत्तर मिळेल.
हे बहुतांश हिंदू (ते माझ्यालेखी हिंदू म्हणजे भारतीय या अर्थाने) या शब्दाचा अर्थ कसा घेतात? ते हिंदू हा धर्म आहे असे (माझ्या मते जे चूक आहे) मानत असतील तर त्यांचे उत्तर हिंदू हेच येईल. येऊ दे.
बॉबी जिंदाल ... मुळात हिंदू नव्हतेच तर त्यांना धर्मांतर करायची काय गरज?
धार्मिक आयडेंटिटी (एकतर आधी असलेली खोडून टाकण्यासाठी, किंवा नसेल तर ती, त्यांच्या मते असणारी, पोकळी भरून काढण्यासाठी) हवीशी ठरली असेल. असू दे.
मूळ मुद्यानुसार, हिंदू ही जिओपॉलिटकल आयडेंटीटी असेल तर, आता इतरत्र गेलेल्या मंडळींची पुढची पिढी त्या जिओपॉलिटिकल आयडेंटीटीतच बसेल.
अवांतर : मागे एका धाग्यावर मिभो यांनी एक मुद्दा काढला होता. मार्मीक मुद्दा. अशा मंडळींनी उद्या समजा त्यांचा आत्ताचा देश आणि भारत यांच्यात युद्ध झाले तर कोणाची बाजू घ्यावी? हा तो प्रश्न. याचे उत्तर या संदर्भात काय असावे बरे?
31 Aug 2009 - 7:11 pm | निमीत्त मात्र
तोच तर गोंधळ होतो आहे. बरं उहापोह करावा तर लोकांना शब्दछल/झोडपण्याचे निमीत्त वाटते.
म्हणजे हिंदू हा धर्म आहे की नागरिकत्व/जियोपॉलीटीकल आयडेंटीटी हा गोंधळ तसाच राहतो ना.
आधी असलेली खोडून टाकण्यासाठी असू शकत नाही कारण जिंदाल हे (जियोपॉलीटीकल व्याखेप्रमाणे) हिंदू नव्हेतच.
निव्वळ पोकळी भरून काढण्यासाठी केले असेल तर धर्मांतर/ कन्वर्जन हा शब्द कसा काय वापरला जातो?
31 Aug 2009 - 7:36 pm | श्रावण मोडक
म्हणजे हिंदू हा धर्म आहे की नागरिकत्व/जियोपॉलीटीकल आयडेंटीटी हा गोंधळ तसाच राहतो ना.
मी आत्तापर्यंत जे लिहिले आहे, त्यानुसार हा गोंधळ नाही. यशोधरा यांनी दिलेल्या मूळ संदर्भाच्या मांडणीच्या संदर्भात हिंदू ही फक्त जिओपॉलिटिकल आयडेंटीटी आहे. ज्या काळात हा हिंदू शब्द आला (अल हिंद वगैरे) तेव्हाचे भू-राजकीय वास्तव भिन्न होते. तेव्हा आलेला हा शब्द आत्ताच्या परिस्थितीत अॅप्रोप्रिएट झालेला आहे. तेव्हा त्यात नागरिकत्व येईलही, येणारही नाही. कारण नागरिकत्त्वाला राष्ट्राच्या सीमा येतात. ही राष्ट्रे आत्ताची, म्हणजेच हिंदू हा शब्द जिओपॉलिटिकल आयडेंटीटीने वापरण्यानंतरची, आहेत.
आधी असलेली खोडून टाकण्यासाठी असू शकत नाही कारण जिंदाल हे (जियोपॉलीटीकल व्याखेप्रमाणे) हिंदू नव्हेतच.
नसू दे. त्यांना ती नव्याने घ्यावीशी वाटली असेल. त्यामुळं आपण लोकांशी अधिक रिलेट होऊ शकू, मते मिळतील असेही त्यांना वाटले असू शकेल.
निव्वळ पोकळी भरून काढण्यासाठी केले असेल तर धर्मांतर/ कन्वर्जन हा शब्द कसा काय वापरला जातो?
तसे असेलच तर तो शब्द नाही वापरायचा. त्यांनी ख्रिस्ती धर्मात प्रवेश केला इतके म्हणता येईल.
31 Aug 2009 - 10:54 pm | निमीत्त मात्र
अर्थातच! त्यांचे कन्वर्ट होण्यामागे काहीही कारण असेल, त्याचा ह्या चर्चेशी संबध नाही. माझा मुद्दा इतकाच आहे की ते 'कन्वर्ट' झालेच नाहीत. परंतू आपण बॉबी जिंदाल नावाने शोध घेतलात तर सगळीकडे ते कन्वर्ट झाले असेच म्हणत आहेत. असो..बॉबी जिंदाल वरुन विषयांतर पुरे करतो
31 Aug 2009 - 10:06 pm | मिसळभोक्ता
होय. अमेरिकन भुमीवर जन्मलेला प्रत्येक मानवी जीव हा अमेरिकेचा नागरीक ठरतो.
एक क्षुल्लक चूक आहे, पण त्याचा मूळ विषयाशी काहीही संबंध नाही.
अमेरिकेच्या भूमीवर, अगर हवाई सीमेत, अगर सागरी सीमेत जन्मलेल्या बालकाला/बालिकेला अमेरिकेचे नागरीकत्त्व घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो. (म्हणजे, समजा नसेल घ्यायचे अमेरिकेचे नागरीकत्व, तर तसाही पर्याय उपलब्ध आहे.)
बाकी, हिंदूत्व ह्या जीवनपद्धतीची व्याख्या १८९३ मध्ये विवेकानंदांनी अमेरिकेत केली. हे आपणच लिहिले आहे.
-- मिसळभोक्ता
30 Aug 2009 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा धर्म आहे काय?
मागील चर्चेत 'धारयते इति धर्म' असा उल्लेख आलाच आहे. धर्म शब्दाचा अर्थ नेमकेपणाने सांगणे अवघड आहे. पण धृ= धारण करणे, आधार देणे, पोषण करने, या धातूपासून तो शब्द बनला आहे, असे वाचायला मिळते.
धर्माच्या व्याख्या : जैमिनीने पूर्वमी. सूत्र (१.१.२) मधे 'चोदनालषणो S धर्म' (आज्ञास्वरुपाच्या वेदवचनांवरुन ज्याचा बोध होतो तो धर्म) अशी व्याख्या केली आहे.
वैशिषिकांनी 'यतोभ्यूदयनि:श्रेयससिद्धि: स धर्म:' (ज्याच्यापासून ऐहिक आणि पारलौकिक सुखाची प्राप्ती होते तो धर्म)
हारिताने धर्माची व्याख्या ' श्रुति प्रमाणकः ' (वेदावर आधारलेला) अशी व्याख्या केली आहे.
आचरणाची निश्चित तत्त्वे अथवा नियम असा ढोबळ अर्थ असावा.
जीवन पद्धती म्हणजेच धर्म नव्हे काय?
जीवनपद्धती म्हणजे धर्म मानायला हरकत नसावी. जीवनपद्धतीचे काही नियम असावे असे वाटते.
संप्रदाय म्हणजे काय? संप्रदायाचा शब्दशः अर्थ. चाल, रीत,मार्ग, धर्मपंथ असा आहे. तेव्हा 'विशिष्ट विचारांचा' या अर्थाने त्याचा अर्थ घ्यावा असे वाटते. उदा. हिंदू हे धार्मिक, आध्यात्मिक, पण त्यातही जरासे वेगळे विचार सांगणारे जसे, नाथ संप्रदाय, महानुभाव,वारकरी ,दत्त,समर्थ, इत्यादी . या संप्रदायांनी पौराणिक धर्मात काही बदल करण्याचा प्रयत्न केला असावा म्हणून संप्रदाय असा एक अर्थ त्यासाठी वापरल्या जात असावा.
हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा कुणाला अधिकार आहे?
असा अधिकार कोणा एका व्यक्तीला तर नक्कीच नसावा. सर्वांनी मिळून काहीएका जीवनपद्धतीला मान्यता दिली असावी आणि ते नियमांना धर्म मानन्यात येत असावे असे वाटते. (चुभुदेघे)
धर्माच्या व्याख्या : काणेकरांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासातून घेतल्या आहेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Aug 2009 - 11:19 am | युयुत्सु
हे काणेकर कोण? मला History of Dharmashastra लिहिणारे भारतरत्न पां.वा. काणे माहित आहेत. आपण उधृत करताना बराच गोंधळ करता असं माझ्या लक्षात आले आहे.
30 Aug 2009 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>आपण उधृत करताना बराच गोंधळ करता असं माझ्या लक्षात आले आहे.
गोंधळ होतो हे खरं आहे. (बराच म्हणजे लैच झाले राव..तुमच्यागोंधळापूढे आमचा गोंधळ फिका आहे) काणेकृत म्हणायचे होते. डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्याच History of Dharmashastra चा अनुवादीत पुस्तकाबद्दलच म्हणायचे होते.
चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू....!
-दिलीप बिरुटे
(साक्षात युयुत्सू यांनी चूक लक्षात आणून दिल्याने नर्व्हस झालेला :( )
30 Aug 2009 - 10:36 am | JAGOMOHANPYARE
१. हिन्दु धर्म हा एक स्वतन्त्र धर्म नसून अनेक सम्प्रदाया.म्चे व धर्मांचे मिश्रण आहे. प्राचीन भारतात शिव पूजक असा शैव धर्म होता.. ( आपण याला आज सम्प्रदाय म्हणतो.) शन्कर व पार्वती हे मुख्य दैवत, लिन्ग पूजा, शोडष्पचार मूर्तीपुजा करणे, म्रूत्यू नन्तरचे जीवन, ८४ लक्ष योनी, त्यात फिरणारा आत्मा या सन्कल्पना याच धर्मातल्या.
२. याच्या इतकाच जुना दुसरा प्रमुख धर्म म्हणजे 'वैदिक धर्म' . हा आर्यांचा धर्म... हा मुळचा भारतातला की उत्तर ध्रुवावरचा हा मुद्दा आता विचार करण्याचे आता कारण नाही... इन्द्र, वरूण, मित्र, सविता,प्रजापती, भग, पूषण, रुद्र, आश्विनी अशा काही यातल्या देवता... मुळात या देवता निराकार असल्याने त्यान्च्या मूर्ती, देवळे न्व्हती... यज्ञ रुपात उपासना होती, ८४ लक्ष योनी- फिरणारा आत्मा वगिरे सन्कप्लना मात्र या धर्मात नव्हत्या.. तीर्थक्षेत्र ही सन्कल्पना नव्हती.. मूळ धर्म ग्रन्थ तीन वेद... रुग, यजु, साम
३. याखेरीज ब्रम्हदेव, मूर्तीरुप विष्णू व लक्ष्मी, गणपती, दत्त... याना मानणारे असे अनेक छोटे छोटे सम्प्रदाय ( की धर्म?) होते.
४. वर्षानु वर्शे हे सम्प्रदाय- धर्म आपापसात भान्डत होते.... व्यासानी जेन्व्हा पुराणे लिहिली ( सन्कलीत केली) तेन्व्हा मुख्य उद्देश होता... सगळे मिळून एक्सन्ध एक धर्म करणे.... यात वैदिक देवाना सारख्या अशा देवतान्चा प्रामुख्याने विचार झाला... प्रजापती= ब्रह्मा, वैदिक विष्णू= मूर्तीरूप विष्णू, रुद्र= शिव ... अशा सन्कल्पनातून मूळ वैदिक देव बाजूलाच राहिले... वेद देखील बाजूला राहिले.... वेदातील काही रुचा या यान्चे स्तवन करताना वापरल्या जाऊ लागल्या आणि मूर्ती व देवळे मात्र मूर्ती पूजक धर्मातून उचलले गेले... हे सर्व पौरोहित्य करणारे ब्राह्मण मात्र मूळचे वैदिक... अशा प्रकारे धेडगुजरी पुराणोक्त हिन्दु धर्म तयार झाला.... अथर्ववेद हा साधारण याच काळात झाला.. त्यात दोन्ही धर्मान्चे मिश्रण स्पष्ट दिसते... त्यामुळे अथर्ववेदाला पूर्वी वैदिक धर्मात स्थान नव्हते.. तेन्व्हा चतुर्वेद नव्हते--- वेद त्रयी ही सन्कल्पना होती.. गणपती अथर्व शीर्शात हे पहायला मिळते... एकीकडे मूर्ती रूप गणेशाचे वर्णनही आहे. आणि त्याच वेळी तू ब्रह्म, इन्द्र, विष्णू, अग्नि, रुद्र, वायू, सूर्य, चन्द्र आहेस, असेही लिहिलेले आढळते..
५. पण व्यासानी जरी दोन धर्म मिसळले असले, तरी त्यापूर्वीही अनेकानी दोनी धर्मान्चा आदर केलेला दिसून येतो... उदा : राम- अश्व्मेध यज्ञ- वैदिक परम्परा... रामेश्वर लिन्ग स्थापना- शैव परम्परा...
६. आज सावरकरानी केलेली हिन्दु धर्माची व्याख्या वापरली जाते...
७. त्यामुळे हिन्दु धर्माला एक ईश्वर, एक पुस्तक, एक प्रेशीत असा प्रकार नाही... याचा गैर फायदा घेऊन 'इतर धर्माचे लोक' हिन्दु धर्माला एक पुस्तक नाही, एक प्रेशीत नाही.. त्याची व्याख्या नाही अशा कुटाळक्या करत असतात... पण त्याचा विचार करण्याचे कारण नाही... धर्म ठरव्ण्यासाठी या सगळ्या गोष्टी एक एक च असाव्यात असा कुठेही नियम नाही...
30 Aug 2009 - 4:45 pm | निमीत्त मात्र
म्हणजे काय? नक्की कुठं वापरली जाते? त्यांना हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा अधिकार कसा काय मिळाला? आणि समस्त हिंदू धर्मियांनी ही व्याख्या मान्य केली आहे का?
31 Aug 2009 - 5:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणाच्या व्याख्या तुम्हाला हव्या आहेत ते विचारा ना मग ... सावरकरांचा अधिकार अप्रत्यक्षपणे नाकारताना अमुक अमुक लोकांची हिंदू धर्माबद्दलची मतं काय होती यावर चर्चा घडवून आणा ना मग ...
... किमान हा प्रश्न विचारू तरी नका. अहो, हिंदू धर्मात स्वयंभू देव असतात, लोकं त्यांना देव मानतात, श्रद्धा ठेवतात, पूजतात. तर स्वयंघोषित धर्मव्याख्यातेही असू शकतील, कोणी त्यांना मानो अथवा न मानो.
आधी स्वतः काही वाचा, स्वतःची मतं बनवून ती मांडा. मग इथले वाचकही आपापली मतं सांगतील.
अदिती
31 Aug 2009 - 6:46 pm | निमीत्त मात्र
अदितीजी मी कुणाचाही अधिकार प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या नाकारलेला नाही. हिंदू धर्माची सर्वामान्य व्याख्या काय? एखाद्या माणसाला तो हिंदू आहे की नाही हे कसे ठरवता यावे इतका साधा शोध घ्यायचा मी प्रयत्न करत आहे. त्याला अजून उत्तर मिळालेले नाही. इंग्रजीत म्हणतात तसे बिटींग अराउंड बुशेस चालले आहे.
हिंदू धर्म म्हणजे काय हेच मुळात जर निश्चित नसेल तर, 'आपण सारे हिंदू..' , 'हिंदूंनाच फक्त का झोडपता?', असल्या चर्चांना काय अर्थ आहे? इतकाच सोपा माझा मुद्दा होता/आहे.
धन्यवाद. जरुर प्रयत्न करेन. तुमचे असेच मौलिक मार्गदर्शन मिळत राहो.
30 Aug 2009 - 3:02 pm | मन
म्हणजे नक्की काय??
--कळलं तर नक्की सांगेन.
पण माझ्या एका मित्रानं सांगितलं ते असं :-
"शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत ... गणपतिबाप्पा मोरयाची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारूतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळाचे पाणी ... दुसर्याचा पाय चुकून लागल्यावरही आपण प्रथम केलेला नमस्कार ... दइव्या दिव्या दिपत्कार ... आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी ... मारूतीची न संपणारी आणि हवी तेव्हा लहान-मोठी होणारी शेपटी ... दरर्याला वाटायची आपट्याची पाने ... पंढरपुरचे धूळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफुटाणे ... सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मूठभर अस्थींच्या गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श ... कुंभाराच्या चाकावर फिरणार्या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हा अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो.
कुणाला देशी मडक्याचा आकार येतो, कुणाला विदेशी कप-बशीचा ..."
त्यानं हे सांगितलं "संस्कृती " च्या संदर्भात. पण त्याऐवजी "धर्म" शब्द ठेउन पहा बरं. मला तरी मोठ मोठ्या विद्वानांच्या गंभीर चर्चेपेक्षा हे सरळ साध(आणि जरास्स ढोबळ) वर्णन पचनी पडतं.
अवांतरः-
माझ्या (मानलेल्या)मित्राचं नाव आहे पु ल दे.
आपलाच,
मनोबा
31 Aug 2009 - 7:07 pm | सूहास (not verified)
हे लई आवडल...
आणी नि.मा..........
चर्चा नको होती....पण तरीही...
सर्वांत पहिले मी माणुस आहे का ? मी कुठुन आलो ? माझा धर्म काय ?कुठे चाललोय..ह्या प्रश्नाची उत्तरे द्यायला आणी विचारायला देखील मी समर्थ आहे का ?.......
नाही...मग कशाल उगाच डोकेफोड करुन घेउ...ह्यात बराच विस्कळीत पणा आहे...
तरी ही ..एक छान चर्चेचा दुवा देतो आपल्याला...वाचत बसा
http://www.loksatta.com/lokprabha/20090717/cover.htm
हा धागा मुळ लेखाचा...
आणी हे दोन प्रतिक्रियात्मक..
http://www.loksatta.com/lokprabha/20090904/pratikriya.htm
http://www.loksatta.com/lokprabha/20090904/pratikriya01.htm
सू हा स...
31 Aug 2009 - 3:29 pm | विसुनाना
हिंदू धर्म ही एक सहिष्णु जीवनपद्धती आहे.
व्यक्तीच्या हिंदुत्वाचे (किंवा हिंदू व्यक्तीचे) दोन निकष आहेत -
१. इतरांच्या जीवनपद्धतींबाबत ती व्यक्ती पूर्णपणे सहिष्णु आहे.
२. त्या व्यक्तीच्या सहिष्णु जीवनपद्धतीबाबत जे असहिष्णु आहेत त्यांच्याशी ती व्यक्ती पूर्णपणे असहिष्णु आहे.
31 Aug 2009 - 8:18 pm | नितिन थत्ते
गोलमाल व्याख्या
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
31 Aug 2009 - 10:01 pm | मिसळभोक्ता
सुंदर व्याख्या विसुनाना !!!
गर्व से कहो, हम हिंदू है !
-- मिसळभोक्ता
1 Sep 2009 - 12:42 am | राघव
जर धर्माबद्दल जाणून घ्यायची मनापासून ईच्छा असेल तर -
धर्माची व्याख्या संतांनी करावी अन आपण ती मानावी. तो अधिकार त्यांचाच. ते पटत नसेल तर आपण स्वत: त्यांनी सांगितलेल्या मतांचा अभ्यास करावा अन पडताळा घेऊन बघावा. यात दुसरे कोणते मत येणे गरजेचे नाही.
धर्म म्हणजे केवळ जीवनपद्धती नाही. धर्म हा माणसाला त्याचे अंतीम ध्येय सांगतो. चांगले जगावे ही जीवनपद्धती. चांगले का जगावे हे सांगतो तो धर्म.
धर्मप्रणित अंतीम ध्येय साध्य करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. त्यातल्या कोणत्याही एका मार्गाचा अंगिकार करून त्यावर चालण्याचे काम करणार्या लोकांचा समूह म्हणजे संप्रदाय.
हिंदू हा धर्म आहे असेच मी मानतो. पुर्वीचा जो वैदिक धर्म तोच हिंदू धर्म. यशोधरा सांगतात त्याप्रमाणे भौगोलिक कारणास्तव पुढे वैदिकधर्मालाच हिंदू धर्म असे संबोधण्यात येऊ लागले. वर सांगितल्याप्रमाणे जीवनपद्धती यात अंतर्भूत आहे. हिंदूत्व म्हणजे हिंदू धर्माची तत्वं. आता ही धर्मतत्व कोणती हा प्रश्न आपसुकच उत्पन्न होईल. त्यासाठी हे वाचावे -
यम, नियम
हिंदू धर्माची तत्वं तुम्हाला संकलित अशी सापडणार नाहीत किंवा ती परिपूर्ण असणार नाहीत. कारण श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे "जतो मत, ततो पथ - जसे ज्याचे मत तसा त्याचा मार्ग" हेच हिंदू धर्माचे मूल तत्वज्ञान आहे. त्यामुळे कोणताही धर्म असो, तत्वज्ञान असो ते अंतिमत: हिंदू धर्माच्या दृष्टीने सत्यच आहे. त्यामुळे सर्व समावेशक असे हे रूप आपणांस बघावयास मिळते.
(कच्चे मडके असलेला) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
1 Sep 2009 - 1:15 pm | पक्या
आत्तापर्यतचा बेश्ट प्रतिसाद, राघव जी.
पूर्ण प्रतिसाद पटला.
1 Sep 2009 - 2:52 pm | ऋषिकेश
माझ्यामते "जो स्वतःला हिंदु समजतो तो हिंदु" इतकी व्याख्या पुरेशी व्हावी नाहि का?
ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून ४४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया आपले एक श्रोते 'धोंडो भिकाजी जोशीं' यांच्या स्मरणातले भाषण "आसिंधसिंधुपासून एकच गर्जना... एकच ध्यास ...एकच भास.. हा हिंद हिंदूंचा आहे....सारे हिंदू बांधव एक आहेत"
1 Sep 2009 - 3:13 pm | यशोधरा
एक विचार मांडावासा वाटला, सगळ्यांची मतं जाणून घ्यायलाही आवडेल. रिलीजन ही पाश्चात्यांकडून आलेली कल्पना डोक्यात पार्श्वभूमीवर ठेवूनच अश्या संकल्पनांबाबत विचार केला जातो आणि हिंदू हाच आमचा धर्म ही प्रतिक्रिया निर्माण होते..... पाश्चात्य influence येण्याच्या आधी इथं त्याऐवजी वापरल्या जाणार्या संज्ञा काय होत्या, कश्या वापरल्या जात असत वगैरेंमध्ये जाण्याची तयारी असते का...
मिपाकरांची मतं जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.
1 Sep 2009 - 8:22 pm | श्रावण मोडक
'देर आये, दुरूस्त आये' म्हटलं पाहिजे. आधी ही कल्पनाच स्पष्ट होणे गरजेचे आहे. उपासनेसंदर्भात एक ग्रंथ, एक ईश्वर वगैरे गोष्टी ध्यानी घेतल्या तर आज ज्याला भारत म्हणतात त्या, किंवा आज ज्याला भारतीय उपखंड म्हणतात त्या, भूप्रदेशात रिलीजन म्हणता येईल असे जे धर्म आहेत ते फक्त अब्राहमी धर्म आहेत. अब्राहमेतर उपासनापद्धती अनेक आहेत (सगळ्या, वैदिकपासून ते अमूर्तता मानणाऱ्या आता अल्पसंख्य असणाऱ्याही) आणि त्या उपासनापद्धती रिलीजन या शब्दाच्या व्याख्येत बसणार नाहीत. या उपासनापद्धती इतक्या भिन्न आणि संख्येनं मोठ्या आहेत की त्यांच्यातील साम्यस्थळं धरून काही मांडणी करण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ लसावि आहे. तो लसाविच असतो आणि म्हणून त्या मांडणीच्या बाहेर राहिलेलं बरंच काही असतं. हिंदू या शब्दाचे उपयोजनच मुळी भू-संदर्भात समूहवाचक झालं आहे हे वास्तव असेल तर त्या शब्दाचा धर्म या संकल्पनेशी संबंध नाही. तो संबंध नंतर हिंदू हा शब्द अप्रोप्रिएट होताना जोडला गेला आहे.
पाश्चात्य प्रभावाआधीच्या, किंबहुना त्याही आधीच्या काळात काय आणि कसं असावं याचा अंदाज या विषयाच्या अभ्यासकांनी अनेक ठिकाणी मांडून ठेवला आहे. प्राचीन भारतातील भौतीकवाद, प्राचीन भारतातील गणसमाज व्यवस्था, प्राचीन भारतात वर्ग होते की नव्हते वगैरे प्रश्नांच्या अनुषंगाने झालेल्या या अभ्यासामध्ये या मुद्यांची पुरेशी चर्चा आहे. 'लोकायत' हे त्याचे एक उदाहरण. हिंदू या शब्दाची व्युत्पत्ती नीट पाहिली तर त्या व्युत्पत्तीच्या काळाच्या आधी आणि पुढे काय होते, आहे याची कल्पना येतेच. धारण करतो तो धर्म एवढा भाग सोडला तर आत्ताच्या संदर्भातील धर्म ही कल्पनाच मुळात येथे एलियन ठरू शकते.
'लोकायत' म्हटलं की लगेचच ते झिडकारून टाकलं जाईल याची कल्पना आहे. पण अभ्यास करावयाचा असल्यास ते टाळून पुढं जाता येत नाही हे मात्र नक्की.
1 Sep 2009 - 6:08 pm | समंजस
धर्म हा प्रकार एवढा किचकट असेल असे वाटले नव्हते या आधी :S
बाकी हजारो वर्षांचं वय, अनुभव असलेल्या धर्माला कसे काही वाक्यात गुंडाळावे :? (व्याख्या देण्या करीता हो). कोणाला जमलं तर फारच छान :) पर्यावरणाला तेवढीच मदत होईल....