गणेश चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन करु नये असा समज आहे.
सदर चंद्रदर्शन हे चुकुन टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील छायाचित्रात झाले तर त्रास होतो का?
जाणकार यावर मार्गदर्शन करतील का?
गणेश चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन करु नये असा समज आहे.
माहित नाही बुवा.. पण कदाचित जे गणेश चतुर्थीला सुद्धा चंद्रदर्शन करेपर्यंत थांबतात त्यांना तोपर्यंत मोदक खायला मिळत नसावेत :( हे म्हंजे शिक्षाच की हो...
होय, बाप्पा उन्दरावरुन जात अस्ताना पड्ले, तेव्हा चन्द्र हस्ला म्हनुन बाप्पनि त्याला शाप दिला कि गणेश चतुर्थीला चन्द्र पाहिला तर बघणार्यावर चोरीचा आळ येइल.
मी काल सन्ध्याकाळी फिरायला बाहेर निघाले. ह्युमिडीटी अजिबात नव्हती. मस्त वातावरण होते. तेव्ध्यात आकाशात चन्द्राचि कोर ;;) सुरेख दिसली, आणी मग लक्शात आले कि :( चन्द्रदर्शन आज घेवु नये.
चुचु
... श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्याने त्याच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता असं वाचल्याचं आठवतंय. खरंखोटं देव जाणे.
@ सु हा स काही ही फरक पडला नाही...चंद्रावर म्हणतोय मी....... आम्हाला कळलं तुम्ही कोणत्या 'चंद्रा' बद्दल बोलताय ते... 'ती' अजून तशीच आहे काय???? वहिनींचा ई-मेल आयडी द्या बरं ! ;-)
पुढच्या वर्षी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी आठवण करा, चंद्रदर्शन करून पाहेन, आजूबाजूच्या लोकांनाही करायला लावेन आणि मग काय झालं तेही जरूर सांगेन. व्वा!!!झक्कास आदिती मॅडम.. अंधश्रध्दा दुर झाल्याच पाहीजेत.
पण हा काथ्या़कूट आपण आपल्याच चालीरीतीबाबत करणार.. आणि ते मुस्लीम मोहरमच्या दिवशी जीवघेणा प्रकार करतात ते आपण व्याकूळ होऊन पहाणार.. एक नक्की भाद्रपद शुध्द चतुर्थीस चंद्रदर्शन निषीध्द याला काहीतरी शास्त्रीय आधार असला पाहीजे..
मुसलमान लोकं मोहरमच्या दिवशी काय करतात हे मला माहीत नाही. गणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये हे मला हा काकू वाचूनच समजलं. मला करता येण्याजोगी एकच गोष्ट आहे ती म्हणजे करून पहाणं आणि मग निरीक्षण नोंदवणं. व्यवसायाचा दुष्परीणाम म्हणा हवंतर.
अंधश्रध्दा दुर झाल्याच पाहीजेत.
हे पहा, अंधश्रद्धा आणि श्रद्धा या गोष्टी माझ्या डोक्याच्या पलिकडच्या आहेत, त्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू?
जर काही होत असेल तरीही ते मला होईल आणि माझ्या प्रयोगासाठी तयार असणार्या लोकांना होईल ना, तुम्ही का एवढी काळजी करता आहात माझी आणि माझ्या मित्रमंडळाची? कोणालाही फसवून किंवा भीतीपोटी चंद्र नाही दाखवणार मी! म्हणूनच म्हटलं, "I will learn it the hard way!" दुसर्याच्या अनुभवातून प्रत्येकच वेळी का शहाणं व्हावं मी? शिवाय मी काही लोकांना सांगणार नाही आहे बाहेर जाऊन, किंवा पेपर, कंप्यूटर चंद्र पहाच म्हणून!
मी पूर्वी संध्याकाळी घरी चालत येत असे. तेव्हा शुक्ल पक्षात षष्ठीपर्यंत चंद्र दिसला नाही असे पावसाळा सोडून होत नसे. त्यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन हटकून ठरलेलेच. अजून काही चोरीचा आळ आलेला नाही.
चतुर्थीला चंद्राची पोझिशन देखील चालताना सहज दिसेल अशी असते.
गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन केल्याने डोंबलाचा ही फरक पडत नाही हे जरी मला माहित असले तरी मला माझ्या ऐकिवात असलेली परंपरा पाळायला आवडते आणि मी दर्शन घेणे टाळतो. चुकून दर्शन झाल्यास विशेष काहीही वाटून घेत नाही, चोरी करताच येऊ नये म्हणून हात-पाय बांधून घेऊन घरात बसून राहत नाही.
येथे टिचकी मारा काहीही होणार नाही. उलट तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्ही अंधारातून उजेडात याल.
आपला
स्वतःबरोबरच दुसर्याला सुधारायला लावणारा
सुधारणावादी
विकि
प्रतिक्रिया
24 Aug 2009 - 12:20 pm | ज्ञानेश...
गणेश चतुर्थी दिवशी चंद्रदर्शन करु नये असा समज आहे.
खरंच? मला नव्हते माहित.
टीव्ही वर/फोटोत किंवा प्रत्यक्ष चंद्र पाहिला तरी काय त्रास होणार आहे?
"Great Power Comes With Great Responsibilities"
24 Aug 2009 - 12:32 pm | विंजिनेर
माहित नाही बुवा.. पण कदाचित जे गणेश चतुर्थीला सुद्धा चंद्रदर्शन करेपर्यंत थांबतात त्यांना तोपर्यंत मोदक खायला मिळत नसावेत :( हे म्हंजे शिक्षाच की हो...
24 Aug 2009 - 12:47 pm | JAGOMOHANPYARE
गणेश चतुर्थीला चन्द्र पाहिला तर बघणार्यावर चोरीचा आळ येतो..... चन्द्राला गणेशाने कसला तरी शाप दिलेला आहे........
24 Aug 2009 - 1:07 pm | पर्नल नेने मराठे
होय, बाप्पा उन्दरावरुन जात अस्ताना पड्ले, तेव्हा चन्द्र हस्ला म्हनुन बाप्पनि त्याला शाप दिला कि गणेश चतुर्थीला चन्द्र पाहिला तर बघणार्यावर चोरीचा आळ येइल.
मी काल सन्ध्याकाळी फिरायला बाहेर निघाले. ह्युमिडीटी अजिबात नव्हती. मस्त वातावरण होते. तेव्ध्यात आकाशात चन्द्राचि कोर ;;) सुरेख दिसली, आणी मग लक्शात आले कि :( चन्द्रदर्शन आज घेवु नये.
चुचु
24 Aug 2009 - 1:42 pm | अभिज्ञ
माझी प्रतिक्रिया चोरल्याबद्दल पर्नल ताई तुमचा जाहिर निषेध.
अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
24 Aug 2009 - 1:49 pm | विंजिनेर
तुम्ही कशावरून फिरायला बाहेर पल्डा चुचुतै? उंदरावरून पडला असतात तर चंद्र तुम्हाला पाहून ढगाआड लपला असता कदाचित =))
(कार्तिकेय) विंजिनेर
24 Aug 2009 - 2:24 pm | पर्नल नेने मराठे
8|
चुचु
24 Aug 2009 - 1:26 pm | योगी९००
गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करू नये. आणि संकष्टीला मात्र चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास सोडू नये. कदाचित हा बाप्पाने चांदोबाला दिलेला उ:शाप असावा.
खादाडमाऊ
24 Aug 2009 - 2:32 pm | विजुभाऊ
गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करू नये
गणेश पुराणानुसार( मुद्गल पुराण) हे गणेशचतुर्थी नसून अनन्त चतुर्दशी असे आहे.
प्रश्न चुकला की उत्तरेही चुकतात.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
24 Aug 2009 - 3:30 pm | सूहास (not verified)
चद्रंदर्शन केले आहे ...काही ही फरक पडला नाही...चंद्रावर म्हणतोय मी....ती अजुन जशीच्या तशी आहे...
सू हा स...
24 Aug 2009 - 3:30 pm | सूहास (not verified)
चद्रंदर्शन केले आहे ...काही ही फरक पडला नाही...चंद्रावर म्हणतोय मी....ती अजुन जशीच्या तशी आहे...
सू हा स...
24 Aug 2009 - 5:46 pm | वि_जय
सदर चंद्रदर्शन हे चुकुन टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील छायाचित्रात झाले तर त्रास होतो का?
जाणकार यावर मार्गदर्शन करतील का?
नम्रताजींचा प्रश्न समजून घ्या.. आणी खरच एखाद्या जाणकराने उत्तर द्या.. उगाचच काथ्याकूट कशाला?
24 Aug 2009 - 5:57 pm | जे.पी.मॉर्गन
... श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्याने त्याच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता असं वाचल्याचं आठवतंय. खरंखोटं देव जाणे.
@ सु हा स काही ही फरक पडला नाही...चंद्रावर म्हणतोय मी....... आम्हाला कळलं तुम्ही कोणत्या 'चंद्रा' बद्दल बोलताय ते... 'ती' अजून तशीच आहे काय???? वहिनींचा ई-मेल आयडी द्या बरं ! ;-)
24 Aug 2009 - 8:16 pm | सूहास (not verified)
<<,वहिनींचा ई-मेल आयडी द्या बरं ! >>>
हा घ्या मेल आय.डी.
meg.ryan@cutie.com
सू हा स...
24 Aug 2009 - 8:48 pm | ब्रिटिश टिंग्या
>>श्रीकृष्णाने गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन घेतल्याने त्याच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता असं वाचल्याचं आठवतंय.
येस्स! करेक्ट! सत्यजित असं आळ घेणार्या मंत्र्याचं नांव होतं बहुदा!
असो, पण जेव्हा चोरीचा आळ दुर झाला तेव्हा श्रीकृष्णाला सत्यभामेसारखी बायको मिळाली.....
तेव्हा चोरीचा आळ जरी आला तरी नो टेन्शन :)
25 Aug 2009 - 9:50 am | विशाल कुलकर्णी
सत्यजित नव्हे सत्राजित ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Aug 2009 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार
सत्यभामा नाही रे टिंगी, जांबुवती. जांबुवंताची कन्या.
©º°¨¨°º© परा व्यास ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
24 Aug 2009 - 6:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या वर्षी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी आठवण करा, चंद्रदर्शन करून पाहेन, आजूबाजूच्या लोकांनाही करायला लावेन आणि मग काय झालं तेही जरूर सांगेन.
अदिती
24 Aug 2009 - 6:11 pm | वि_जय
पुढच्या वर्षी गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी आठवण करा, चंद्रदर्शन करून पाहेन, आजूबाजूच्या लोकांनाही करायला लावेन आणि मग काय झालं तेही जरूर सांगेन.
व्वा!!!झक्कास आदिती मॅडम.. अंधश्रध्दा दुर झाल्याच पाहीजेत.
पण हा काथ्या़कूट आपण आपल्याच चालीरीतीबाबत करणार.. आणि ते मुस्लीम मोहरमच्या दिवशी जीवघेणा प्रकार करतात ते आपण व्याकूळ होऊन पहाणार.. एक नक्की भाद्रपद शुध्द चतुर्थीस चंद्रदर्शन निषीध्द याला काहीतरी शास्त्रीय आधार असला पाहीजे..
24 Aug 2009 - 7:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मुसलमान लोकं मोहरमच्या दिवशी काय करतात हे मला माहीत नाही. गणेशचतुर्थीला चंद्र पाहू नये हे मला हा काकू वाचूनच समजलं. मला करता येण्याजोगी एकच गोष्ट आहे ती म्हणजे करून पहाणं आणि मग निरीक्षण नोंदवणं. व्यवसायाचा दुष्परीणाम म्हणा हवंतर.
हे पहा, अंधश्रद्धा आणि श्रद्धा या गोष्टी माझ्या डोक्याच्या पलिकडच्या आहेत, त्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू?
जर काही होत असेल तरीही ते मला होईल आणि माझ्या प्रयोगासाठी तयार असणार्या लोकांना होईल ना, तुम्ही का एवढी काळजी करता आहात माझी आणि माझ्या मित्रमंडळाची? कोणालाही फसवून किंवा भीतीपोटी चंद्र नाही दाखवणार मी! म्हणूनच म्हटलं, "I will learn it the hard way!" दुसर्याच्या अनुभवातून प्रत्येकच वेळी का शहाणं व्हावं मी? शिवाय मी काही लोकांना सांगणार नाही आहे बाहेर जाऊन, किंवा पेपर, कंप्यूटर चंद्र पहाच म्हणून!
समजा त्याच दिवशी Astronomy Picture of the Day मधे चंद्रच असेल तर तो मी सवयीने पहाणारच. मग काय करायचं हो?
अदिती
25 Aug 2009 - 12:19 pm | शैलेन्द्र
"एक नक्की भाद्रपद शुध्द चतुर्थीस चंद्रदर्शन निषीध्द याला काहीतरी शास्त्रीय आधार असला पाहीजे.."
शास्त्रीय म्हणजे नक्की कोणत्या शास्त्रातला? मुलभुत शास्त्रातील की मानव्य शास्त्रातील?
24 Aug 2009 - 9:06 pm | नितिन थत्ते
मी पूर्वी संध्याकाळी घरी चालत येत असे. तेव्हा शुक्ल पक्षात षष्ठीपर्यंत चंद्र दिसला नाही असे पावसाळा सोडून होत नसे. त्यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन हटकून ठरलेलेच. अजून काही चोरीचा आळ आलेला नाही.
चतुर्थीला चंद्राची पोझिशन देखील चालताना सहज दिसेल अशी असते.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
24 Aug 2009 - 10:45 pm | शाहरुख
गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन केल्याने डोंबलाचा ही फरक पडत नाही हे जरी मला माहित असले तरी मला माझ्या ऐकिवात असलेली परंपरा पाळायला आवडते आणि मी दर्शन घेणे टाळतो. चुकून दर्शन झाल्यास विशेष काहीही वाटून घेत नाही, चोरी करताच येऊ नये म्हणून हात-पाय बांधून घेऊन घरात बसून राहत नाही.
तर मी अंधश्रध्दाळू ठरतो काय ?
24 Aug 2009 - 11:57 pm | अवलिया
>>>तर मी अंधश्रध्दाळू ठरतो काय ?
अर्थातच ;)
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
25 Aug 2009 - 1:17 pm | Nile
उगाच ऐकलेल्या प्रथा पाळुन पुढच्या पीढ्यांकरता तुम्ही अंधश्रद्धा निर्माण कर आहात का?
चंद्र केव्हाही कसाही पाहीला तरीही काही होतं नाही, डोंबलाचा आलाय शास्त्रीय आधार, शुद्ध मुर्खपणा आहे.
तसा चतुर्थीला 'किसी चांद को देखके' मेरे दील की चोरी तो हो गयी पर अब इल्जाम किस पे आएगा क्या पता? ;)
(चांदण्यांचा चंद्र)
25 Aug 2009 - 12:13 am | विसोबा खेचर
येथील काही अवांतर प्रतिसाद काढून टाकले आहेत. सभासदांनी कृपया अवांतर प्रतिसाद देऊ नयेत.
एकमेकात अवांतर गप्पा मारण्याकरता पैसे खर्चून खरडवही, खरडफळा आणि व्य नि ची सोय केली आहे त्याचा वापर करावा...
तात्या.
25 Aug 2009 - 12:22 am | विकि
येथे टिचकी मारा काहीही होणार नाही. उलट तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्ही अंधारातून उजेडात याल.
आपला
स्वतःबरोबरच दुसर्याला सुधारायला लावणारा
सुधारणावादी
विकि
25 Aug 2009 - 10:29 am | नाना बेरके
काही होत नाही. खराखुरा चंद्र बघा, चोर्या करा काहीही होत नाही. फक्त पकडले जाणार नाही ह्याची काळजी घ्या.
पण टि.व्ही.वर / वर्तमानपत्रात चंद्र बघण्यामुळे त्रास होतो. हे मात्र निश्चीत. ह्याचा मला अनुभव आहे.