नेति नेति

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
20 Aug 2009 - 2:29 pm
गाभा: 

नेति नेति हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का?

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

20 Aug 2009 - 2:41 pm | JAGOMOHANPYARE

तपशील माहीत नाही.. पण साधारणपणे प्रसन्ग असा आहे, दोन व्यक्ती देवाबाबत चर्चा करत आहेत.. एकजण कुतुहलाने विचारतो, देव कसा आहे? दुसरा गप्पच रहातो... मग पहिला परत विचारतो.. देव दगडासारखा आहे का ? दुसरा म्हणतो- नेति ( म्हणजे नाही). परत पहिला विचारतो.. तो पाण्यासारखा आहे का ? पुन्हा उत्तर नेति. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाला नेति नेति उत्तर मिळते.. तो या सगळ्यापैकी कशा एकासारखा नाही, तरीही तो सर्वत्र आहे. असा भावार्थ.. ही चर्चा बहुतेक रुग्वेदात असावी..

मन's picture

20 Aug 2009 - 2:55 pm | मन

आणि गहन गंभीर आषयाला हात(आणि बोटे ) घातल्याबद्दल अभिनंदन.

मराठी मधी पुल्ल्लिंगाचं स्त्रीलिंग होताना "आ " निघुन "ई/इ" येतं.
चालणारा गाडा- चालणारी गाडी
भदाडा - भदाडी
ढोला -ढोली
फाटका फाटकी
(गुजरातीत "वेडा" म्हणजे "गांडा" असं ऐकुन आहे! )
तस्सच "नेता "चं स्त्री लिंग " नेति".

राज्यातल्या लोकांना खड्ड्यात "नेति" अशी एक नेति भारताच्या एका मोट्ठ्या राज्यात आहे अशी माझी माहिती आहे!

किंवा एखाद्याला धाडकन उडावुन गाडी झाली चालती .
ह्यातल्या क्रियापदासारखं
"लोकांना बुडवुन नेति झाली नेती."
असा काही अर्थ असेल तर पहा बुवा.

किंवा चुकुन कुणीतरी दोन वेगळे शब्द चिटकुन छपले असावेत.
"ने"आणि "ती"!!
आता प्रश्न असा आहे की "ति" ला "ने " म्हणताय तर कुठं न्यायचं हे ते लिहिणार्‍यालाच विचारा!
आणि नक्की कशासाठी न्यायचं ते ही विचारा.
म्हणजे "ति" गाडी असेल तर सर्व्हिसिंग ला न्या.
"ति" शाळा असेल तर शिक्षण सम्राटाच्य दावणीला न्या.
"ति" जर "ती" असेल तर नेउ नका ,लापुन काढा.
आय मीन, "ति" जर भाजी असेल तर कापुन काढा.
काढा म्हणजे "काढणे"/"उपटणे" हे क्रियापद आहे. त्या अर्थानं घ्या .
नाहितर "काढा कसा कापावा" असा धागा काढाल , म्हणुन ही सूचना.

कदाचित "तिने मला हाणलं तुफ्फान." अशी व्यथा एखाद्या भयग्रस्त नवर्‍याच्या तोंडुन बाहेर पडात असताना नेमकी "ति" आली आणि
"तिने मला हाणलं तुफ्फान." ह्या वाक्यातला पहिलाच शब्द(तोही उलट म्हणजे "नेति" असा) उच्चरुन नवर्‍याची बोलती बंद झाली असेल!
आणि तेव्हढं ऐकुन कुणाला प्रश्न पडला असेल.

नेति नेति हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का?

सॉरि ...कान्ट हेल्प बॉस.

आपलाच,
मनोबा

योगी९००'s picture

20 Aug 2009 - 4:34 pm | योगी९००

मस्तच..

खादाडमाऊ

पाषाणभेद's picture

21 Aug 2009 - 4:57 am | पाषाणभेद

छान प्रतिक्रीया.

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2009 - 8:25 pm | प्रकाश घाटपांडे

आम्हाला नीती नीती हे तत्त्वज्ञान अधिक अवघड वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अविनाशकुलकर्णी's picture

20 Aug 2009 - 4:54 pm | अविनाशकुलकर्णी

मन..हेहेहेहेहेहेहीह्हेहेहेहेह..लय भारी

विसुनाना's picture

20 Aug 2009 - 5:26 pm | विसुनाना

वाचा : जनक - याज्ञवल्क्य -गार्गी संवाद.
हिंदीतली ही कथा -
http://hariomgroup.net/hariombooks/satsang/Hindi/NariTuNarayani.htm#_Toc...

आणि हे मूळ बृहदारण्यक उपनिषद-
http://wikisource.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A4%BE...

अवांतर - पुढे गार्गीने याज्ञवल्क्यांशी विवाह केला. मैत्रेयी ही विदुषि त्याअगोदरच याज्ञवल्क्यांची प्रथम पत्नी होती.

काळा डॉन's picture

21 Aug 2009 - 6:14 am | काळा डॉन

आयला, असले फडतूस धागे संपादकांना चालतात..तर माझा धागा का लगेच उडावला??

मीही आता इलू इलू हे तत्व्ज्ञान काय आहे? कोणी समजावुन सांगु शकेल का? असा एक ओळीचा धागा काढणार आहे.