साला आपल्याला कोण संस्कृत शिकवायला तैय्यार नाय. आजपत्तुर जे तज्ञ भेटले ते सौताला लै शाणे समजणारे. त्यांचं-आपलं काय जमेना! ते फक्त संस्कृतची ट्यँव ट्यँव करतात पण साध्यासोप्या रितीनं शिकवा म्हटलं तर एक जण तैय्यार नाय!
पण साला आपल्याला पण शिकायची लै हौस. मग लास्टमदी आपण आंतरजालावर काही संस्थ़ळं शोधली आणि आपली आपण काही वाक्य तैय्यार केली. मिपावरील धनंजयादि संस्कृत तज्ञांनी ती तपासावी अन् काय बरोबर, काय चूक ते सांगावं... हां, सुरवातीला सर्व काय चुकेल, पण फिकर नाय! नाकातोंडात पाणी गेल्याबिगर पोहता येत नाय अन् ढोपरं फुटल्याबिगर सायकल शिकता येत नाय यावर आपला भरौसा हाय! :)
आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो की लागलो. मंग माघार नाय! तात्या अभ्यंकर म्हनतात आपल्याला!
भास्करचा भास्करबुवा होईन तेव्हाच तुम्हाला तोंड दाखवीन असं आमचे भास्करबुवा एकदा सौताला लै शाणा समजणार्या एकाला बोल्ले होते. त्याच चालीवर आपण पण बोलतो -
"तात्याचा 'तात्याशास्त्री' होईन तेव्हाच दम खाईन!" :)
आपण मदत घेत असलेली संस्थळं -
http://www.sanskritdeepika.org/
http://spokensanskrit.de/
इतरही काही संस्थळे असल्यास कळवा -
आधी वरजिनल मराठी वाक्य अन् मग आपण केलेलं भाषांतर -
१) तात्या संस्कृत शिकतो.
"तात्या गीर्वाण भाषा पठति"
२) तात्याने आंबा खाल्ला.
"तात्या आम्रफल अखादत्"
की,
"तात्या आम्रफलं अखादत्" ? (तसे असल्यास 'ल'वर अनुस्वार का द्यायचा?)
३) तात्या आळशी आहे.
"तात्या कार्यहीन:"
४) तात्या लिहीत आहे.
"तात्या लेखन वर्तते"
५) तात्या मरेल.
"तात्या मृतश्यति"
ओक्के..
अरे चूक का बरोबर ते कुणीतरी सांगा रे. चुकल तर काय चुकलं ते पण सांगा...
आपला,
(विद्यार्थी) तात्या.
सूचना - येथे फक्त विषयाला अनुसरूनच चर्चा होईल. अवांतर प्रतिसाद त्वरीत उडवले जातील. त्याकरता खरडवह्या वापराव्या.
प्रतिक्रिया
11 Aug 2009 - 7:24 pm | सूहास (not verified)
"करौती स्वमुखैनैव बहुधान्यस खंडणम"
"नमहा पतन शिलाय मुसलाय खलायच "
सू हा स...
11 Aug 2009 - 6:22 pm | सुनील
प्रत्येक वाक्यात लोच्या आहे.
तात्या हा आकारान्त पुल्लिंगी शब्द प्रत्येक वाक्यात आहे. आता त्याला कुठले विभक्ती प्रत्यय लावायचे? कारण संस्कृतात आकारान्त पुल्लिंगी शब्दच नाही!!
कदाचित तात्या ह्या शब्दापुढे महाभाग हा शब्द जोडून त्याचे विभक्ती प्रत्यय लावता येतील. कृपया जाणकारांनी खुलासा करावा.
(असंस्कृत) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Aug 2009 - 6:29 pm | अवलिया
तात्यामहोदयः किंवा तात्याशेटः चालु शकेल
--अवलिया
11 Aug 2009 - 8:17 pm | धनंजय
पण तसे कमी असल्यामुळे अगदी सुरुवातीला शिकवत नाहीत.
"तात्या"चे प्रथमा एकवचन "तात्या:" असे होते.
12 Aug 2009 - 3:59 am | घाटावरचे भट
'तात्या' ऐवजी 'तात्याशर्मा' कसे वाटते? संस्कृतात ब्राह्मणाच्या नावापुढे 'शर्मा' लावण्याची पद्धत आहे (सौजन्य - चातुर्वर्ण्य शिश्टीम)... लहानपणी मुंज होताना भटजी सारखे शर्मा-शर्मा करत होते तेव्हा मी म्हणालो होतो की आमचं आडनाव शर्मा नाहीये. तेव्हा ही महिती मिळाली.
11 Aug 2009 - 6:31 pm | अवलिया
तात्या
पुढचा भाग कधी ? एकुण किती भाग आहेत ?
(हे संस्कृतमधे विचारले असते पण अवांतर प्रतिसाद म्हणुन तुच उडवुन लावायचास, म्हणुन मायमराठीतच विचारले ;) )
--अवलिया
11 Aug 2009 - 6:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तत् तुभ्यम् रोचते ?
कतिवारं उक्तवान् एतद् मह्यं न रोचते इति?
-दिलीप बिरुटे
(संस्कृत विषयावरुन सतत मारामारी करणारा)
11 Aug 2009 - 6:34 pm | विंजिनेर
ह्मम्म्म..
आता हे खरोखरीचे संस्कृत प्रश्न आहेत की ते प्रश्न सोडविणार्या माझ्या सारख्या ('तथाकथित' !) संस्कृत अभ्यासकांची हलकेच चिमटे काढून उगाच थोडी थट्टा करण्याचा सापळा?
असो. प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे
(ताक फुंकून पिणारा) विंजिनेर
11 Aug 2009 - 7:02 pm | विसोबा खेचर
आता हे खरोखरीचे संस्कृत प्रश्न आहेत की ते
खरोखरीचे आहेत हो! थट्टा नाही..
तात्या.
--
आजच्या दिवसात तुम्ही मराठी विकिपिडियावर थोडे तरी लेखन वा संपादन केले आहे काय?
नाही?? मग मराठी भाषा तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही!
11 Aug 2009 - 8:16 pm | विंजिनेर
आमचे दोन पैसे :
बरोबर. फक्त तात्या हे तात्यृचे प्रथमा एक वचन आहे का ते सांगा ;) (सवितृ प्रमाणे- सविता सवितौ सविता: - प्रथमा)
अचुक उत्तर (की मुद्रण?) आम्रफलम् असे आहे. कारण आम्रफल हे कर्म आहे.
म्हणून त्याचे द्वितिया एक वचन आम्रफलम् होते.
तात्या कार्यहीनः अस्ती|
क्रियापद इज मिसिंग!
लेखनम् - उ. क्र २ पहा.
??
11 Aug 2009 - 8:26 pm | विकास
"तात्या कार्यहीन:"
तात्या कार्यहीनः अस्ती|
क्रियापद इज मिसिंग!
क्रियापद मिसिंग नाही आहे, ते लिहीत न बसण्याचा आळशीपणा केलेला दिसतोय. त्यामुळे ते वाक्य हे सकर्मक आहे :-)
आणि अर्थात वाक्य#५ ला काही अर्थ नाही. वास्तवीक संपादन केले पाहीजे ;)
11 Aug 2009 - 8:45 pm | मस्त कलंदर
) तात्या लिहीत आहे.
"तात्या लेखन वर्तते" याचे माझ्या मते "तात्या लेखनम् करोति" हे जास्त बरोबर आहे..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
11 Aug 2009 - 10:36 pm | chipatakhdumdum
५) तात्या मरेल.
"तात्या मृतश्यति
बालक, अस्य वचनम अस्ति, अन्यथा धमकी: ?
11 Aug 2009 - 7:41 pm | बाकरवडी
सुरवात
देवः देवौ देवा: प्रथमा
देवम् देवौ देवान् द्वितीया
..........
..........
येथून करा !! शुभेच्छा !!
संस्कृत पण्डित- बाकरवडी (ई कारान्त 'नदी' प्रमाणे चालणारा) !
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
11 Aug 2009 - 7:57 pm | लवंगी
पण तो पर्यंत ते शेवटचे वाक्य काढुन टाका पाहू..
11 Aug 2009 - 8:21 pm | धनंजय
सामान्यतः अशुभ वाटणारी उदाहरणे टाळावी, अशी प्रथा आहे.
"मरणे" वगैरे शब्दांचे व्याकरण शिकताना "डाकू मरेल" वगैरे उदाहरणे घेऊन शिकवतात.
11 Aug 2009 - 10:48 pm | अवलिया
>>सामान्यतः अशुभ वाटणारी उदाहरणे टाळावी, अशी प्रथा आहे.
+१सहमत आहे..
--अवलिया
11 Aug 2009 - 8:36 pm | प्रकाश घाटपांडे
संस्कृतची गोडी लागण्यासाठी स्तोत्र ही फार महत्वाची भुमिका बजावतात. त्यातील गेयता ही गोडी निर्माण करते. आपल्याला झटपट स्त्रोत्र रचना हवी असेल तर ती आपल्याला इथे शिकता येईल :-H
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
11 Aug 2009 - 9:04 pm | विजुभाऊ
तात्या तुम्ही संस्कृत ! ( कपाळावर हात मारणारी स्मायली)
कोणतीही भाषा शिकायची असेल तर त्या भाषीक स्त्रीशी लग्न करावे असे एक थोर रीचर्ड एफ बर्टन म्हणून गेला आहे.
त्याला चाळीसपेक्षा जास्त भाषा येत होत्या.
चला संस्कृत शिव्या शिकुयात.
अथ जिज्ञासा......
अहं अपशब्दं वचामी.
"भगिनीभोग्या" इयम शब्दः संस्कृतस्य प्रथमम अपशब्द: आसीत.
एतद भाषयोर्मध्ये बहुधानी विवीधानी अपशब्दा: आसीत.
एश: गीर्वाण भाषा स्वर्गादपि गरियसी.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
12 Aug 2009 - 7:12 am | धनंजय
"तात्या: गीर्वाणभाषां पठति"
तात्या: - तात्या (बद्दल "प्रथमेत" बोलताना)
तात्याम् - तात्याला
तात्या - तात्याने
तात्यै - तात्यासाठी
तात्या: - तात्यापासून
तात्या: - तात्याचे (होय - दोन्ही रूपे सारखीच)
तात्ये - तात्यामध्ये, तात्यावर
"गीर्वाणभाषेला शिकतो"। म्हणून "गीर्वाणभाषां" पठति ।
"तात्या: आम्रफलं अखादत्"
"तात्या आंब्याला खाल्ला" असे कुठल्यातरी बोलीभाषेतले रूप आठवावे. कोण काम करते (सामन्यपणे प्रथमा), आणि कोणाला करते (समान्यपणे द्वितीया) हे संस्कृतात सांगावेच लागते.
तात्या - असली कठिण उदाहरणे सुरुवातीच्या वाक्यात घ्यायला कोणी सांगितली? आता म्हणाल - "तात्याने" मध्ये दिसतो तो "ने" संस्कृतात कुठे दिसतो. वर मी "तात्याने"="तात्या" असे म्हटले आहे, आणि इथे मात्र मारे "तात्या:" अशी प्रथमाच वापरली आहे.
तात्या आम्रफलं खादितम् । असे प्रमाण मराठीतले "तात्याने आंबा खाल्ला." म्हणू शकता, खरे. पण एकीकडच्या बोली मराठीतले रूप "तात्या आंब्याला खाल्ला" हे संस्कृतात भाषांतर करायला सोपे.
"तात्या: कार्यहीन:"
(याचा अर्थ "तात्या बेकार आहे", किंवा "काम-नसलेला आहे" असे आहे. "आळशी म्हणायचे तर - "तात्या: आलसी" असे म्हटल्यास अर्थ नीट येतो.)
"तात्या: लिखति"
असे म्हणणे सोपे, असे मला वाटते.
प्रत्येकः प्राणी मरिष्यति ।
11 Aug 2009 - 9:29 pm | क्रान्ति
चांगली चर्चा आहे.
मला महिषासुरमर्दिनी स्तोत्राचा [अयी गिरिनंदिनी] मराठी अर्थ कुठे मिळू शकेल का?
इथे तो इंग्रजीत मिळाला, तोही पूर्ण नाही.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
11 Aug 2009 - 9:54 pm | प्राजु
चला.. या निमित्ताने ८वी ते १०वी शिकलेले संस्कृत ब्रश अप होईल.
मस्त उपक्रम आहे.
जियो तात्या!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Aug 2009 - 6:27 am | सुनील
वर धनंजय यांनी आकारान्त पुल्लिंगी शब्द्दाची एकवचनाची रुपे दिलेली आहेत. परंतु अश्या शब्दांची काही उदाहरणे (विशेषनामे वगळता) सांगता येतील का? तसेच अकारान्त स्त्रीलिंगी शब्दांचीही उदाहरणे आणि ते शब्द कसे चालवावे याबाबत माहिती मिळाल्यास उत्तम.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Aug 2009 - 7:14 am | धनंजय
संस्कृतात अकारांत स्त्रीलिंगी रूपे नाहीत. अशा शब्दाला "आ" किंवा "ई" अंत्य प्रत्यय लागतो.
- - -
विशेषनामे वगळता काही यौगिक शब्द "विश्वपा", "शङ्खध्मा" वगैरे, आकारांत पुंल्लिंगी आहेत.
विश्वं पाति (विश्वाचे रक्षण करतो) विश्वपा
शङ्खं ध्माति (शंख फुंकतो) शङ्खध्मा
म्हणून धातू नसलेला "हाहा" (गंधर्वाचे नाव) हे विशेषनामही शिकवायची पद्धत आहे.
असो वरील मी दिलेली "तात्या"ची रूपे चुकलेली होती आता संपादन करून सुधारली आहेत. "हाहा" गंधर्वाची रूपे पुस्तकात बघून योग्य रूपे देतो आहे.
तात्या: तात्यौ तात्या:
तात्याम् तात्यौ तात्यान्
तात्या तात्याभ्याम् तात्याभि:
तात्यै तात्याभ्याम् तात्याभ्यः
तात्या: तात्याभ्याम् तात्याभ्यः
तात्या: तात्यौ: तात्याम्
तात्ये तात्यौ तात्यासु
(हे तात्या: तात्यौ तात्या:)
- - -
विश्वपा: विश्वपौ विश्वपा:
विश्वपाम् विश्वपौ विश्वपः
विश्वपा विश्वपाभ्याम् विश्वपाभि:
विश्वपे विश्वपाभ्याम् विश्वपाभ्यः
विश्वपः विश्वपाभ्याम् विश्वपाभ्यः
विश्वपः विश्वपो: विश्वपाम्
विश्वपि विश्वपो: विश्वपासु
(हे विश्वपा: विश्वपौ विश्वपा:)
(वरील दोन प्रकारात घोटाळा होऊन माझ्या वरील प्रतिसादातल्या आधीच्या चुका झाल्या होत्या, हे लक्षात येईलच. आता सुधारल्या आहेत).
12 Aug 2009 - 9:59 am | सुनील
धन्यवाद.
परंतु ही रुपे फारशी प्रचलीत नसावीत. कारण, पूर्वी आकाशवाणीवर सकाळी सातच्या सुमारास संस्कृत बातम्या लागत. कदाचित अद्यापही लागत असतील, कल्पना नाही. शाळेत संस्कृत शिकत असल्यामुळे मी त्या आवर्जून ऐकत असे. त्यात, आकारान्त पुल्लींगी अथवा अकारान्त स्त्रीलिंगी विशेषनामांना अनुक्रमे महोदय्/महाशय्/महाभाग किंवा विदुषि हे शब्द जोडून रुपे बनवली जात, असे आठवते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Aug 2009 - 10:12 am | विंजिनेर
आकाशवाणीवर अजूनही संस्कृतात बातम्या लागतात. त्यांच्या संकेतस्थळावरून ताज्या संस्कृत बातम्यांचे टंकित स्वरूप (ट्रान्स्क्रिप्ट) उतरवून घेता येते. जिज्ञासूंना त्याचा संस्कृत स्वाध्यायासाठी उपयोग व्हावा :)
जाता जाता: आकाशवाणी वाले सध्या "महोदय" इ. संबोधने वापरत नाहीत असे दिसते :) (नाव आकारान्त असो वा नसो/ पुल्लिंगी असो वा स्त्रीलिंगी)
12 Aug 2009 - 12:44 pm | ब्रिटिश टिंग्या
इयम् आकाशवाणीम्
संप्रयति वार्ता: शुयन्ताम्
प्रवाचक: बलदेवानंद सागर:
12 Aug 2009 - 2:01 pm | बाकरवडी
वा वा !!!
सकाळी उठल्यानंतर हेच शब्द कानी यायचे.
अंदाजे ७ वाजताच्या बातम्या असाव्यात्,पुणे आकाशवाणी केंद्रावर !
अजूनही 'बलदेवानंद सागर' बातम्या देतात का हो ?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
12 Aug 2009 - 9:48 pm | धनंजय
खरे तर संस्कृत भाषाच हल्ली फारशी प्रचलित नाही. त्यामुळे तिच्यातले काय अंश प्रचलित आहे, आणि काय प्रचलित नाही, हे सांगणे कठिणच आहे.
मराठीत ज्या प्रकारचे बारकावे सहजच वापरायची सवय आपल्याला आहे, तसे बारकावे संस्कृतात होते, पण ते कुठलेच प्रचलित नाहीत.
आकाशवाणीवर संस्कृतची एक वैशिष्ट्यपूर्ण बोली वापरली जाते. ती सकाळी सकाळी ऐकून प्रसन्न वाटते. परंतु संस्कृताच्या त्या बोलीत अर्थाचे बारकावे नाहीत. (म्हणजे मराठीत असतात तसे, किंवा अधिक प्रचलित होती तेव्हा संस्कृतात होते तसे बारकावे नाहीत.) शाळेत साधारण हीच बोली शिकवली जाते. या बाळबोध आणि अर्थाचे कंगोरे नसलेल्या शालेय संस्कृतात अनेक गरजेची रूपे प्रचलित नाहीत, हे खरेच आहे. त्या अर्थाने "आकारांत पुंल्लिंगी शब्दांची रूपे प्रचलित नाहीत" हे वाक्य पूर्णपणे पटण्यासारखे आहे. पण या बोलीत "सामान्यभूतकाळ" ही अत्यंत आवश्यक रूपेही प्रचलित नाहीत.
उदाहरण :
"तुला आताच तर मी पैसे दिले."
याचे शाळा/रेडियो-"प्रचलित" भाषांतर असे आहे :
इदानीम् एव तुभ्यम् धनम् अयच्छम् ।
परंतु "अयच्छम्"चा अर्थ "काल-किंवा-त्यापूर्वी दिले" असा होतो. जर "आताच दिले" तर "काल-किंवा-पूर्वी-दिले" म्हणायचे म्हणजे काय? विपर्यास किंवा "अयच्छम्" शब्दाचा नेमका अर्थ बळेच खोडून टाकणे. पण शाळेत हेच शिकवले जाते. संस्कृत प्रचलित भाषा होती तेव्हा बहुधा असे काही ठीक असते.
इदानीम् एव ते अदाम् धनम् ।
"अदाम्" म्हणजे "दिले"
पण हा नेमकेपणा शाळेत शिकवलेल्या संस्कृतात प्रचलित नाही, असे जर तुम्ही म्हटले, तर ते योग्यच आहे.
"महाशय" अर्थ सांगायचा असेल "अमुक-महाशयः" वगैरे वापरण्यास काहीच हरकत नाही. पण वापरावे, तर सार्थच वापरावे. विभक्तिरूपे येत नाहीत म्हणून उगाच जोडल्यास भाषेला निरर्थक शब्दांची सूज येते.
समजा "धनंजय" आणि "दगडू" असे तुमचे दोन समसमान मित्र आहेत. "धनंजय" बद्दल बोलताना "धनंजयेन कृतम्" असे जर बोलायचे, तर मग तितकाच आप्त मित्र "दगडू" याच्याविषयी बोलताना "दगडूमहाशयेन कृतम्" म्हणणे ठीक नाही.
13 Aug 2009 - 6:16 am | सुनील
सहज सुंदर विवेचन.
एक शंका - संस्कृतात अगणित सुभाषिते आहेत, वाक्प्रचारही आहेत, सप्तमीची दोन रुपे एकापाठोपाठ म्हटल्यास त्याचा अर्थ "प्रत्येक" असा होतो, अशा भाषिक गमतीदेखिल आहेत. पण नाहीत त्या म्हणी!
म्हणूनच संस्कृत कधीकाळी तरी बोली होती का, अशी शंका येते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Aug 2009 - 11:55 pm | धनंजय
"म्हणी नाहीत" हे समजले नाही.
मराठीतल्या काही म्हणी म्हणजे यमके, वृत्त असलेल्या छोट्याछोट्या द्विपदी असतात.
काखेत कळसा
गावभर वळसा
.
असेल माझा हरी
तर देईल खाटल्यावरी
.
आता यांना सुभाषिते म्हणायचे की म्हणी. बहुधा दोन्ही. तसेच संस्कृत सुभाषितांबद्दल म्हणता येईल.
अर्थात संस्कृतात पद्य नसलेल्या म्हणीसुद्धा आहेत. आता पटकन आठवते -
गण्डस्योपरि पिटकः ।
"गळवावरती पुटकुळी"
(आधीच दुखर्या परिस्थितीमध्ये आणखी एक बारीक त्रास उद्भवला की ही म्हण वापरलेली मी वाचली आहे. - शाकुंतल)
पतंजलीच्या लेखनकालापर्यंत संस्कृत एक प्रचलित भाषा होती. "अमुकतमुक प्रयोग लोकांत ऐकायला मिळतो, पण व्याकरणाच्या नियमात तसे दिसत नाही. त्यामुळे व्याकरणाचा नियम सुधारला पाहिजे." अशा प्रकारची भाष्ये पतंजली करतो. म्हणजे "जे लोक बोलतात" ते "पुस्तकापेक्षाही प्रमाण" - म्हणजे लोक सहजगत्या = प्रचलनात संस्कृत बोलत होते.
शिवाय पतंजली सांगतो की "मडके हवे म्हणून मनुष्य कुंभाराकडे जातो. मात्र शब्द बोलण्यासाठी तो व्याकरणकाराकडे जात नाही - योग्य तेच बोलतो." (तरीसुद्धा व्याकरण शिकायचा काही फायदा आहे, ते मग पतंजली समजावून सांगतो, ते वेगळे.) मुद्दामून शब्द न शिकता आपोआप बोलणारे लोक = प्रचलित भाषा.
12 Aug 2009 - 12:29 pm | JAGOMOHANPYARE
राजा हा शब्द देखील आकारान्त पुल्लिन्गी आहे.. राजन शब्द चालवताना देखील कुठे तरी तो येतो बहुतेक... पण हा स्वतन्त्र शब्द ही आहे..
12 Aug 2009 - 7:24 am | सहज
बर तेवढे वाक्य क्रमांक ५ बदला.
म्हणजे तात्या मरेल हा भाग तुम्हाला आवडत असेल तर ठेवा पण अजुन भर घाला त्या वाक्यात जसे
संस्कृत विषयस्य अतिअभ्यासकारणे तात्याशेटः खपस्तुभ्यः |
नुकतस्य ताज्य बातम्यनुसारे-
उपरस्य बातमी श्रवणमसी तदनंतरम, अथ बातमीदार कळवस्यम दादरनगरे, विल्मींग्टननगरे तथा डडाणूकरगल्ले हर्षोल्लासेन अजुन तीन मृतस्यम.
अपडेटम समाप्तम
12 Aug 2009 - 11:00 am | विनायक प्रभू
यद् रोचयेत तत् ग्राह्यम्
यद् न रोचयेत तत् त्याज्यं
संस्कृत प्रचुर विप्र
12 Aug 2009 - 12:20 pm | JAGOMOHANPYARE
आजचा गृहपाठ : खालील वाक्ये स.न्स्कृत मध्ये लिहा :
१. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे.
२. येथे फक्त विषयाला अनुसरूनच चर्चा होईल. अवांतर प्रतिसाद त्वरीत उडवले जातील. त्याकरता खरडवह्या वापराव्या.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं |
मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
( मुखप्रक्षालनात मधला त पाय मोडका आहे. दुर्जनाला याचा अर्थ सान्गू नये न्हायतर सान्गणार्याचा पाय तो मोडेल ! )
12 Aug 2009 - 2:12 pm | JAGOMOHANPYARE
१. सुस्थितं गृहं मृतप्रायस्य संगणकस्य दर्शकचिन्हं अस्ति |
दुसरं वाक्य मला तरी जमणार नाही...
12 Aug 2009 - 9:20 pm | विकास
एखादी भाषा तुम्हाला बोलता येते हे कधी सिद्ध होते? तर तुम्ही त्या भाषेत भांडलात तर! बोला, तुमच्यापैकी कोण कोण संस्कृतमधे भांडू शकेल? :-)
13 Aug 2009 - 6:18 am | सुनील
अहो, सु-संकृत मंडळी कधी भांडतात का? ;)
(असंस्कृत) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Aug 2009 - 10:55 pm | मिसळभोक्ता
"तात्याचा 'तात्याशास्त्री' होईन तेव्हाच दम खाईन!"
सक्काळी सक्काळी कुणाची भिकबाळी पाहिलीस रे तात्या ?
-- मिसळभोक्ता