नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार पुण्यात स्वाईन फ्लु ने दहावा बळी घेतला असून संपुर्ण देशात एकंदर १७ जण ह्या रोगाला बळी पडले आहेत
व अनेक जण उपचार घेत आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या १७ पैंकि १३ बळी हे महाराष्ट्रात व त्यातकरून १० पुणे, २ मुंबई व १ नाशिक अशी परिस्थिती आहे.
हे सर्व पाहता काहि गोष्टींचा तर्क नीट लागत नाही व बरेच प्रश्न पडत आहेत.
१. देशभरात अशी साथ असताना किंबहुना पुण्या आधीच हा रोग हैद्राबाद/बंगलोर अशा ठिकाणी पोहोचला होता तरी देखील जास्त बळी हे पुण्यातच कसे काय
पडत आहेत?
ससून रुग्णालय खरोखरच नीट काळजी घेते आहे कि नाहि?
२. पुण्यातील प्रशासनाने एकंदरीतच हे प्रकरण नीटसे वा पुरेशा गांभीर्याने हाताळलेले नाहि?
३. मिडीयावर व जालावर इतरत्र ह्या विषयी रोज माहिती दिली जात असून देखील त्याने लोकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण होत आहेत.
टेमिफ्लु घ्यावी कि नाहि, चेह-यावर नक्की कुठला मास्क लावावा, तो नक्की किती तासाने बदलावा, तो कुठे उपलब्ध असू शकेल, सर्वसामान्यांना तो सहज मिळावा
म्हणून सरकारने काय व्यवस्था केली आहे हे असे असंख्य प्रश्न पडत आहेत.
४.काल काही वृत्तवाहिन्यांवर आयुर्वेदिक उपाय दाखवले जात होते ते कितपत योग्य आहेत? आरोग्य मंत्रालयाची त्याबाबत भुमिका काय आहे?
५. दहिहंडी ऊत्सव रद्द होण्याच्या बातम्या ऐकण्यात असल्या तरी टिव्ही वर ब-याच राजकीय पुढा-यांच्या दहिहंडी कार्यक्रमाच्या जाहीराती सर्रास दिसत आहेत.
६. शाळा बंद करण्याच्या निर्णयाबद्दल देखील कुठलिहि स्प्ष्ट भुमिका सरकार घेताना दिसत नाही. उलट "राखीचे स्वयंवर" असल्या सारखे ह्या विषयावर लोकांचे
एसएमएस मागविण्याचा फाजीलपणा मुंबईतील आयुक्त करत आहेत.
७.मुळात सरकारने ह्या प्रकाराचे गांभीर्य ओळखून सर्व व्रूत्तपत्रात सविस्तर माहीती द्यायला हवी होती.अजूनही तो प्रकार झालेला दिसत नाही.
सेल,डिस्काउंट वगैरेचे अमिष दाखवून गर्दी करणे टाळावे अशा सुचना असताना देखील आजच्या टाईम्स ऑफ ईंडियाच्या संपुर्ण पहिल्या पानावर एका मॉलची
भव्य सेलची मोठी जाहिरात आहे. ह्यावर कोणाचे बंधन दिसत नाही.
८.चंद्रकांत दळवींच्या नुसार पुण्यात अजूनही आणिबाणी सदृष परिस्थिती नाही आहे? नक्की किती लोक बळि पडल्यावर सरकार पुण्यात आणिबाणी लागू करणार आहे?
हे सर्व पाहता आता असा प्रश्न पडू लागला आहे की भारत सरकार/महाराष्ट्र सरकार/मुंबई-पुणे स्थानिक प्रशासन व राजकीय पक्ष ह्याबाबत पुरेसे गंभीर आहेत कि नाहित?
प्रतिक्रिया
12 Aug 2009 - 5:35 pm | पर्नल नेने मराठे
कठीण आहे सगळेच....
चुचु
12 Aug 2009 - 5:37 pm | लिखाळ
ह्म्म्म .. खरे आहे.
कडक आणि खंबीर उपाय योजायला हावे आहेत.
पण आपल्या राज्यकर्त्यांना त्वरित, खंबीर पावले उचलणे, नियोजनबद्ध कार्यवाही करणे जमत नाही हे वेळोवेळी आपल्या लक्षात आले आहे. कुठल्या तरी त्रीसदस्यीय समितीने निर्णय घ्यावा आणि तो अनुकूल निघाला तर त्याचे श्रेय आम्ही घ्यावे अशी वृत्ती आहे. नुसतेच राजकारण पण बहुशृतता नाही अशी राजकारणातल्या अनेकांची स्थिती असावी आणि म्हणूनच कोणी कुठलाच निर्णय आपल्या जबाबदारीवर योग्य तर्हेने घेत नसावा.
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक-असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
12 Aug 2009 - 5:44 pm | मदनबाण
आता मास्कचा सुद्धा काळा बाजार सुरु झालाय !!!!
उध्या जर या रोगाचा प्रभाव वाढला तर मास्क मिळणे मुश्किल होणार !!!
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
12 Aug 2009 - 6:26 pm | विकास
उध्या जर या रोगाचा प्रभाव वाढला तर ...
...तर तो काळ्या बाजारात घेतलेल्या मास्क मुळे वाढेल. काळजी न करता, निष्काळजी न रहाता, काळजी घ्या - स्वच्छ धुतलेले १-२ रुमाल तोंडावर बांधा. सकाळ संध्याकाळी सतत बदला. रुमाल धुवून नवीन/नव्याने वापरणे हे मास्कपेक्षा जास्त सोपे ठरेल आणि विषाणू प्रतिबंधक म्हणून ही.
बाकी एक उत्सुकता म्हणून प्रश्न, कोणी माहीती दिली तर बरे होईलः तुमच्या पैकी कोणी मास्क वापरत असतील तर त्याबद्दल त्या मास्कवर नक्की काय माहीती छापून अथवा बरोबर दिली होती ते कळेल का?
संदर्भः http://loksatta.com/
13 Aug 2009 - 9:39 am | विशाल कुलकर्णी
हो ना, ११४ रुपयाच्या मास्कसाठी ३५० पासुन ६०० पर्यंत काहीही किंमत आकारली जातेय. पुन्हा, जर मी चुकत नसेल तर या मास्कची वॅलिडिटी फक्त २४ तासाचीच आहे. २४ तासासाठी ६०० रुपये?
कठिण आहे !
सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!
12 Aug 2009 - 6:40 pm | विकास
या संदर्भात काही अंशी लोकसत्तेचा हा अग्रलेख चांगला आहे.
काही अंशी म्हणायचे कारण इतकेच की, उगाच, "...या संबंधात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत काही हिंदुत्ववाद्यांनी, आमच्या धर्माच्या सणांवर र्निबध लादता काय, असे फूत्कार सोडल्याचे बोलले जात आहे..." , असे विधान ज्यात, "बोलले जात आहे" असे म्हणत कुठलाही पुरावा नसताना लोकांच्या मनात श्लेष तयार करायचा आणि नंतर "पुण्याच्या अखिल मंडई मंडळाने तसेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुंबईत आपल्या दहीहंडीला आवरते घेतले आहे. हे निर्णय निश्चितच जनतेच्या हिताचे आहेत." असेही म्हणायचे, असला सवंग राजकीय एकांगीपणा आणला नसता तर अग्रलेख नक्कीच चांगला झाला असता.
तरी देखील, बाकी ह्या अग्रलेखात मांडलेले काही मुद्दे योग्य वाटले. "सरकार काय करते वा काय करत नाही, यापेक्षा आपण काय करतो, ते प्रत्येकाने पाहणे आवश्यक आहे. " या त्यातील वाक्याशी सहमत आहे. मात्र एकदा का हे अरीष्ठ टळले की मग माहीती अधिकार, विविध विचारमंच, येणार्या निवडणूका यांचा जाहीर वापर करत सरकारने काय केले आत्ता, २६ नोव्हेंबरला, त्यानंतर वगैरे हे प्रश्न सोडता कामा नयेत. कारण यातील प्रत्येक प्रश्न हा मोठा होण्याचे कारण, "तहान लागल्यावर विहीर खणायला घेणे" हे आहे...
वर आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, "काळजी करू नका, निष्काळजी राहू नका, पण काळजी मात्र अवश्य घ्या" असे म्हणावेसे वाटते.
12 Aug 2009 - 6:48 pm | चिरोटा
पुणे हे गेल्या काही वर्षात गलिछ्छ शहर बनले आहे असे अग्रलेखात म्हंटले आहे.काही वर्षापुर्वी सुरत त्यात आघाडीवर होते. नियोजनशुन्य वाढ, बेफाम लोकसंख्या,प्रदुषण ही कारणे आहेत. इतर शहरांतही थोड्याफार फरकाने तीच अवस्था आहे. दक्षिणेतली शहरे त्यातल्या त्यात परवडली असे म्हणायची वेळ आली.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
12 Aug 2009 - 7:34 pm | श्रावण मोडक
खरं तर, स्वाईन फ्ल्यू याविषयीच्या कोणत्याही धाग्यावर काहीही लिहिणार नव्हतो (कारण काही कळतच नाही). पण येथे एक विधान असे दिसले की लिहावे लागले.
पुण्यात स्वाईन फ्लु ने दहावा बळी घेतला असून संपुर्ण देशात एकंदर १७ जण ह्या रोगाला बळी पडले आहेत व अनेक जण उपचार घेत आहेत.
पुण्यात स्वाईन फ्ल्यूने दहावा बळी घेतला? माझ्या माहितीप्रमाणे एकाही प्रकरणात निर्विवादपणे हा मृत्यू स्वाईन फ्ल्यूचाच आहे हे सांगण्यात आलेले नाही. तीच गोष्ट संपूर्ण देशातील बळींबाबत. वास्तव, माझ्या माहितीप्रमाणे, असे आहे की, जे मृत्यू पावले आहेत त्यांच्यात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे होती. इतरही लक्षणे होती. मृत्यूचे निर्णायकी कारण काय याविषयी सरकारने काही स्पष्ट केले आहे का? काही नाही. स्वाईन फ्ल्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला की माध्यमांमध्ये "स्वाईन फ्ल्यूचा (आणखी) एक बळी" असे ओरड़ायचे, दिवसभर तीच बातमी जणू ती घटना आत्ताच घडली असल्यासारखे ब्रेकिंग न्यूज या नावाखाली दाखवत रहायचे, त्यावर माध्यमांना काही खडसावण्याऐवजी सुमार दर्जाचे अधिकारी-नेते काही तरी खूप करीत असल्यासारखे शांतपणे काही बडबड करतात आणि त्या आधारे आपण काही निष्कर्ष काढायचे.
एवीतेवी फ्ल्यूची लक्षणं असली की स्वाईन फ्ल्यू मानून उपचार करण्याची एक रीत आता सुरू झाली आहे. एनआयव्हीने त्यासाठी यापुढे रक्ताच्या तपासण्याही करणार नाही म्हणण्यापर्यंतची वेळ आपण आणली.
प्रसार माध्यमांचा भंपकपणा, बेजबाबदारपणा, प्रशासनाचा मूर्खपणा आणि गोंधळ, राजकीय नेतृत्त्वाचा कल्पकताशून्यपणा आणि या साऱ्यांवर नको इतका विसंबा असलेली जनता. यातून काय व्हायचे आहे? हजाराच्या आसपास स्वाईन फ्ल्यूचे संशयित रुग्ण उपचार करून परत जातात हेही पुण्यातच घडल्याचे आजच्या बातम्यांवरून दिसते. त्यांच्यापैकी किती जणांबाबत निर्णायकी स्वाईन फ्ल्यूचे निदान होते?
याच काळात मास्कचा काळाबाजार झाला. आता निलगिरी तेलही मिळेनासे झाले आहे म्हणे. निलगिरी तेलाचा एक संदेश एनआयव्ही - मुंबई या नावे आला. त्याचा खुलासा हवेत विरतो न विरतो तोच एक संदेश एनआयव्ही - पुणे याच नावे आला. काय कारवाई केली? शून्य.
इथेच दुसऱ्या एका धाग्यावर धनंजय यांनी स्वाईन फ्ल्यू संदर्भात दिलेली माहिती वाचली किंवा, आकडेवारीच्या अनुषंगाने, नकाशाचा एक धागा आहे त्यातील आकडेवारीविषयीचे मुद्दे पाहिले आणि त्यावर अगदी वृत्तपत्री बातम्यांच्या आधारेही थोडा उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात.
काळजी घ्यावी, घेतलीच पाहिजे. पण ती कोणत्या स्तरावर? काळजी करावी लागावी अशी 'काळजी घेतली जात असेल' तर त्याला काय म्हणायचे?
आत्ताच एका पत्रकाराशी बोलणं झालं. "स्वाईन फ्ल्यू हा माध्यमांनी केलेला भंपकपणा आहे, असे माझे मत आहे. तुझे मत काय?" असे विचारले. एका क्षणात उत्तर आलं, "शंभर टक्के मान्य." पुढे चर्चा झाली आणि जी कारणमीमांसा समोर आली ती सुमारपणाच्या कळसाची वाटेल. पण त्याच पत्रकाराने हेही सांगितले की, तो कळस नाहीये, ही सुरवात आहे. कारण ही तर माध्यमे. ज्यांनी जबाबदारीने काही करावयाचे ते त्याहीपलीकडे सुमारपणे कसे वागतात याचा पाढा त्याने वाचला.
जे मृत्यू पावले त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून, त्यांच्या मृत्यूविषयी तितक्याच गांभीर्याने विचार करून हे लिहिले आहे. त्यामुळे या लेखनाचा मृत्यू या संबंधात पंचनामा अकारण नको. ज्या मृत्यूचे कारण स्वाईन फ्ल्यू हेच निर्णायकी असेल तेथे अनास्था, बेजबाबदारी वगैरे जे अवगुण असतील त्यांचा पूर्ण पंचनामा आणि दंड झाला पाहिजे. पण जे मानवी क्षमतांच्याही बाहेर असेल तेथे माफही होत जातेच हेही ध्यानी असले पाहिजे. यापलीकडे स्वाईन फ्ल्यू नसताना झालेली घबराट, त्यातून आलेली अनाठायी प्रतिक्रिया वगैरेंचा फैसलाही झाला पाहिजे.
12 Aug 2009 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे
हे सिद्ध करणेच अवघड. अनाठायी भीती ही प्रथम भीती असते अशावेळी प्रशासनाने कुठलीही भुमिका घेतली तरी ती टिकेस पात्र ठरते. सर्व संशयित रुग्ण लोकांच्या रक्ताच्या विशिष्ट चाचण्या होणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य आहे का? तो पर्यंत मानसिक समाधानासाठी काही गोष्टी.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
12 Aug 2009 - 10:28 pm | मदनबाण
आता निलगिरी तेलही मिळेनासे झाले आहे म्हणे. निलगिरी तेलाचा एक संदेश एनआयव्ही - मुंबई या नावे आला. त्याचा खुलासा हवेत विरतो न विरतो तोच एक संदेश एनआयव्ही - पुणे याच नावे आला. काय कारवाई केली? शून्य.
आत्ताच काही औषधांच्या दुकानावर निलगिरी तेल्,ओलेसान या औषधांची चौकशी केली असता स्टॉक नाही असेच उत्तर मिळाले !!!अनेक जण निलगिरीच्या तेलाची चौकशी करतानाही अढळले !!!
म्हणजे एसएमएस प्रकरणानंतर आता याचाही काळाबाजार अटळ आहे असे दिसते.सरकार औषधांची/ मास्कचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई का करत नाही ?
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
12 Aug 2009 - 10:43 pm | श्रावण मोडक
दालचिनी आणि मिरे मिळाले नाहीत संध्याकाळी, असं एका मित्रानं कळवलं.
12 Aug 2009 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोडक साहेब, प्रसारमाध्यमांचा भंपकपणा आता तसा आपल्या अंगवळणी पडायला लागला आहे, त्यामुळे त्याचे विशेष काही वाटत नाही. त्यावर बोलण्यासारखे काही नाही. पण, प्रसारमाध्यमांच्या सततच्या बातम्यांमुळे शासकीयस्तरावर काही तरी हालचाल झाली असे माझे मत आहे. नाही तर निगरगट्ट प्रशासन गंभीर होते, असे मला वाटत नाही. 'पूर आल्यावर थोडेफार नुकसान होतेच त्यात घाबरण्यासारखे काय आहे' किंवा ' स्वाइन फ्लू' इतर आजारांसारखा आहे त्यात जनतेने भीती बाळगू नये' अशी विधानं राजकीय चामडीतून उमटत होती. त्यानंतर सतत बातम्यांचा पाठपुराव्यामुळे त्याच्यातले गांभीर्य शासनस्तरावर आणि सामान्यजनातही समजवण्यात प्रसारमाध्यमांची भुमिका मला महत्वाची वाटली.
-दिलीप बिरुटे
14 Aug 2009 - 6:43 pm | अन्वय
डॉ. बरुटे म्हणणे तुमचे म्हणणे अगदी रास्त आहे. प्रसारमाध्यमांच्या आणि त्यात प्रसिद्ध झालेल्या टीकेमुळे प्रशासन थोडेतरी हलले आहे. अन्यथा या रोगाचा आणखी उद्रेक झाला असता, असे म्हणता येईल. एक गोष्ट खरी की माध्यमांतील स्वाइन फ्लूच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली; पण या घबराटीचा फायदाही झालाच आहे. प्रदुषणामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांचा जराही विचार न करता, कोणतीही काळजी न घेता बिनधास्तपणे घराबाहेर पडणारा प्रत्येक जण किमान स्वाइन फ्लूच्या भीतीने तोंडाला मास्क किंवा हेल्मेट घालून तरी बाहेर पडू लागला आहे.
स्वाइन फ्लू तितकासा घातक नाही, हे जरावेळ मान्य केले तरी त्यामुळे लोक शिस्तीत वागू लागले आहेत, हेही मान्यच करावे लागेल.
इथे विशेष बाब अशी नोंदवावीशी वाटते ती अशी की गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस चालणारा धिंगाणा काही प्रमाणात तरी आटोक्यात येणार आहे. काळ्याकुट्ट भिंतीतून हृदयाचा ठोका चुकविणारा तो आवाजही आता कमी प्रमाणात घुमेल. हे वृत्तपत्रांचेच यश म्हणावे लागेल.
12 Aug 2009 - 8:23 pm | प्रसन्न केसकर
ही सर्व व्यवस्थेतील त्रुटीच दर्शवते. प्रथमतः मीडीयामधे जे लोक लिहितात ते आरोग्य विषयक बाबींवर अधिकारवाणीने मते देण्यास योग्य आहेत का? माझे मत आहे काही सन्मान्य अपवाद वगळता बहुतांशी नाही. मग ते काय लिहिणार तर कुणीतरी जे छापवुन आणु इच्छिते ते. बहुधा हे कुणीतरी वैद्यक व्यावसायीक, फार्मा क्षेत्रातले किंवा सरकारी आधिकारी, राजकारणी असतात. या सर्व लोकांच्या मतात थोडाफार पुर्वग्रह असु शकतो अन तसे झाले तर अर्थातच त्यामुळे मीडीयाचे प्रयत्न सफळ होणार नाहीत.
दुसरे म्हणजे धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला असतात तर बहुतेकदा सरकारी अधिकारी किंवा राजकारण्यांना. त्यांची आरोग्य क्षेत्रातली माहिती किती असते याचा अंदाज कुणीही सहज बांधु शकेल. अश्या प्रसंगी तज्ञांचा सल्ला ते घेउ शकतात पण घेतात का अन घेतलाच तर किती पाळतात हा ही प्रश्नच आहे.
या साथीची सुरुवातीपासुन हाताळणी कशी झाली? पुण्यातील रिदा शेख या विद्यार्थिनीच्या मृत्युपर्यंत परिस्थिती आटोक्यात होती असे दिसते. पण ज्या दिवशी तिचा मृत्यु झाला त्याच दिवशी तो कुणाच्या निष्काळजीपणे झाला याची छाननी सुरु झाली. तिच्या घरच्यांनी केलेले आरोप खरे असतील तरी त्याची योग्य ती छाननी व्हायला हवी होती ती न करता ती सरकारी दवाखान्यात असती तर असे झाले असे सुचित करण्यात आले, लोकांना स्वाईन फ्लुची लक्षणे असतील तर तपासणी करायला सांगीतले गेले. अन मग नायडु हॉस्पीटलवर घाबरलेल्या लोकांची रीघ लागली. यामुळे यंत्रणेवर किती ताण पडेल, तासनतास तेथे तपासणीसाठी वाट पहाणार्यांमधे विषाणु पसरेल का याचा विचार कुठे होत होता असे वाटत नाही.
शाळा बंद करण्याबाबतही असेच दिसते. ज्या शाळेत स्वाईन फ्लु चे रुग्ण आढळले त्या बंद केल्या पण हे रुग्ण अनेक ठिकाणी मिसळत होते अन तिथुनही रोग पसरु शकेल याचा विचार होत होता असे वाटत नाही.
अन हा रोग जोवर पुण्यात प्रामुख्याने आढळुन आला, तोवर पुण्यातुन तो अन्य ठिकाणी पसरणार नाही यासाठी लोकांच्या बाहेर जाण्यावर निर्बंध आणता आले असते पण तसे झालेले नाही. एकुणच सर्व यंत्रणा कोलमडली असे सकृतदर्शनी वाटते.
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
13 Aug 2009 - 2:46 am | llपुण्याचे पेशवेll
स्वाईन फ्लू आणि प्रसार माध्यमांची भूमिका हा चर्चेचा विषय नक्कीच होऊ शकतो पण लोकसत्तेतल्या अग्रलेखात असलेले "अमेरिकेत ‘स्वाइन फ्लू’चे ४३६ बळी पडले, पण तिथे एकही शाळा बंद करण्यात आली नव्हती." हे वाक्य पूर्णपणे आधारहीन आणि बेजबाबदार वाटले. न्यू यॉर्क परीसरातील १६ शाळा बंद ठेवण्याबद्दलची बातमी इथे वाचता येईल.
बाकी अग्रलेख ठीक वाटला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
13 Aug 2009 - 2:57 am | विकास
बॉस्टनची प्रसिद्ध (म्हणजे अमेरिकेतल्या अमेरिकेत प्रेस्टीजियस पब्लीक स्कूल) बॉस्टन लॅटीन स्कूल पण बंद ठेवण्यात आले होते.
आज ऑफिसमधील एका सहकारी स्त्री शी बोलत होतो. तीचे दोन भाचे या शाळेत जातात त्यांना स्वाईन फ्लू झाला होता. (माझ्या ओळखीचा पण एक मुलगा आहे, पण त्याला काही झाले नाही). त्या दोघांनीही विश्रांती घेतली, भरपूर पाणी प्यायले, ज्यूस घेतला, अंगदुखण्यावरून तसेच साध्या तापावरून नेहमीची औषधे घेतली आणि बरे झाले...
13 Aug 2009 - 6:16 pm | हरकाम्या
पेशवे तुम्हीतर " राघोबा " पेक्षा ग्रेट निघालात.
13 Aug 2009 - 10:04 am | ऋषिकेश
माझे मत वरील मतांच्यापेक्षा काहिसे विपरीत आहे. दरवेळी मीही मिडीयाने मांडलेल्या बाजाराला नावे ठेवत असतो.. मात्र यावेळी किंबहूना सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर मिडीयाने जो हैदोस घातला आहे त्याने मी काहिसा दरवेळ इतका रागावलो नाहि.
मिडीया, पत्रकारीता हा लेकशाहिच्या चार खांबांपैकी एक. अर्थात त्यांनी आक्रस्ताळ्या पद्धतीने बातम्या देऊ नयेत हे खरे.. मात्र अश्या लोकोपयोगी कामात काहि प्रमाणात रंजित बातम्यादिल्याशिवाय सरकार काम करते असे दिसत नाही.
आता देखील मिडियाने बोंबाबोंब करण्याआधी मुंबईत केवळ १ स्वाईन फ्लू नियंत्रण केंद्र होते आता १७-१८ केंद्रे आहेत. अर्थात ह्या वार्तांकनामुळे अवाजवी भीती पसरते हे खरे असले तरी कदाचित त्यामुळे शाळा कॉलेजांबरोबर कंपन्या बंद कराव्या लागल्या तर सरकारवर कॉर्पोरेट दबाव येऊन या सगळ्या गोंधळातून सार्वजनिक आरोग्यासंबंधी भारताचे काहि ठोस धोरण तयार होईल अशी आशा वाटते.
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ०३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "भय इथले संपत नाही..."
13 Aug 2009 - 11:42 am | चिरोटा
वर म्हंटल्याप्रमाणे 'रोज थोडे लोक कुठल्या ना कुठल्या रोगाने मरणारच' अशी भावना पुढार्यांमध्ये होती. सुरुवातीला स्वाइन फ्लुची इतर फ्लुं बरोबर तुलना करण्यात आली व हा फ्लु अगदी नॉर्मल आहे असे सांगण्यात आले. मिडियाने ताणून धरल्यावरच काम चालु झाले.
विधायक कामे होणार असतील तर रंजीत बातम्या दिल्या तरी लोकांची हरकत नसावी.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
13 Aug 2009 - 11:49 am | मिसळभोक्ता
प्यानिकमुळे तीन-चार महिन्यांआधी अमेरिकेतील काही शाळा आठवड्या-दोन आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या.
आता मात्र ह्या तृतीयावतारी ज्वराचा अभ्यास केल्यावर सरकारने शाळा सहसा बंद करू नयेत असे रेकमेंडेशन दिले आहे. समजा आजारी शिक्षकांमुळे शाळा चालवणेच कठीण झाले तर बंद कराव्या असे सांगितले आहे. पण ते अमेरिकेसाठी. प्रत्येकाने आपापले धोरण ठरवावे.
-- मिसळभोक्ता
13 Aug 2009 - 12:23 pm | सहज
शाळेत दरवाज्यात आल्या आल्या मुलांना ताप आहे का बघीतले जाते जर ३७.९ सें अथवा जास्त ताप दिसला थर्मामिटरमधे तर त्या विद्यार्थ्याला घरी पाठवले जाते. (सर्दी शिंका असे दिसले तरी.)
लवकर थर्मामिटर घ्या, काळ्या बाजारात किंमत वाढेल.
13 Aug 2009 - 11:59 am | निखिलराव
पुण्यात PMT बंद केल्या.
13 Aug 2009 - 12:06 pm | मिसळभोक्ता
पुण्यात स्वाईन फ्लूची लागण होण्याचे कारणे म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीत भारत-भेटीला जाणारे अनिवासी पुणेरी आहेत की नाही, ह्याविषयी संशोधन व्हावे.
(उदा. नागपुरला आढळलेले तीनही स्वाईन फ्लूचे रुग्ण हे अनिवासी नागपुरी आहेत. तिघेही पुण्याहून नागपूरला सुटीमुळे गेले होते.)
-- मिसळभोक्ता
13 Aug 2009 - 12:27 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मला वाटते की जर हा आजार सामुहीक पसरत असेल तर ज्याला हलकासाही आजार असेल तर तो माणुस पटकन ह्या रोगाच्या तावडीत सापडेल्.आणी सरकारी दवाखान्यातच त्यावरचे उपाय होत असतील तर तिथल्या अस्वच्छ्तेनेच त्या रोग्याची प्रतिकारशक्ती आजुन कमी होइल्.त्यामुळे तो रोगी उलट घरीच राहीला तर त्याचा जीव तरी वाचेल्.अर्थात त्याला योग्य ते वैद्यकीय उपाय घरीच मिळ्ण्यासाठी सरकारने जे उपचाराचे के^द्रीकरण केलेय ते था^बवावे.
13 Aug 2009 - 1:50 pm | काजुकतली
पुण्यात PMT बंद केल्या.
होक्का?? मला कधी चालत होत्या तेच माहीत नाही. जेव्हा जेव्हा पुण्यात आलेय (तसे दर महिन्यात येते), तेव्हा तेव्हा तासभर वाट पाहात उभे राहुन शेवटी रिक्शा करावी लागलीय.. :)
13 Aug 2009 - 8:22 pm | प्रदीप
ह्या विषयावरील इतर एक दोन धाग्यावर, सार्स , बर्ड फ्ल्यू व स्वाईन फ्ल्यू ह्या सर्व रोगराईंचा जबरदस्त फटका बसलेल्या एका देशाचा नागरिक म्हणून, मला जी काही माहिती आहे, ती मी लिहीलेली आहे. तेव्हा ह्या धाग्यावर अजून काही लिहीणार नव्हतो. पण एका प्रतिसादामुळे हे लिहीणे भाग पडत आहे.
मोडकांनी माध्यमांची उठवळपणे माहिती देण्याकडे, ज्याला ते सुमारपणा असे संबोधतात, लक्ष वेधले आहे. कळकळीने लिहील्या त्यांच्या प्रतिसादात त्यांनी अगदी मूलभूत मुद्दा उपस्थित केला आहे, तो हा की नक्की चाचण्या होऊन स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे शाबित झालेल्या, व त्यापासूनच मृत्यू झालेल्या केसेस भारतात किती आहेत? ह्याबद्दल उठवळ माध्यमांचे दुर्लक्ष होते आहे, ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. प्रश्न असा आहे, की काही जबाबदार पत्रकारांनी ही माहिती सरकारकडून मिळवून आपापल्या माध्यमाद्वारे जनतेपुढे मांडायचा प्रयत्न केला आहे का? येथे हे कबूल केले पाहिजे की सरकारच्या संस्थळावर ह्याविषयी जी माहिती आहे, ती एकदम जुनाट तरी आहे (आतापर्यंत एकाच परदेशातून आलेल्या व्यक्तिस स्वाईन फ्ल्यू झाला, हे शाबित झाले आहे) किंवा ती अजून दिली गेलेली नाहीच! उदा. ह्या दुव्यावरील पानांची अजून बांधाबांध चालू आहे म्हणे! तेव्हा सरकारी कारभार 'आमच्या लाईनीने चालू द्या...' असा खास बाबूगिरी करत चाललेला आहे, हे उघड आहे. तरीही पत्रकारांना बातम्या मिळवण्याचे व तिची शहानिशा करून घेण्याचे मार्ग असतात. तेव्हा त्याबाबतीत काय केले जात आहे?
'स्वाईन फ्ल्यू म्हणजे माध्यमांनी निर्माण केलेला भंपकपणा आहे' हे खरे तर अगदी अपुर्या माहितीवर आधारित अनुमान आहे. एकतर आता अनेक देशातील जनतेस ह्या फ्ल्यूची लागण होत आहे. सहज गूगलून जरी पाहिले तरी काही आकडे हाती आले ते असे: देश(लागण झालेल्यांची संख्या) : यू. एस. ए. ( ६,५०६); ऑस्ट्रेलिया (२८,९८७); सिंगापूर (१,२१७); हाँगकाँग (६,४१७), यू. के. (गेल्या आठवड्यातच ११,०००+).... हे सर्व आकडे तेथील सरकारांच्या संस्थळांवरून उर्धृत केलेले आहेत.
एका बाजूस अगदी पॅनिक झालेली जनता व दुसर्या बाजूस 'छे, हा सगळा भंपकपणा आहे' अशी टोकाची भूमिका घेणारे सुशिक्षित जन, ह्यांचा सुवर्णमध्य गाठणे जरूर आहे. जबाबदार पत्रकारांनी हे काम करावे.
13 Aug 2009 - 10:38 pm | नितिन थत्ते
>>'छे, हा सगळा भंपकपणा आहे' अशी टोकाची भूमिका
जेव्हा आपण आकडेवारी देऊन एखादी गोष्ट दाखवून देत असतो तेव्हा त्याची समांतर आकडेवारी काय हेही पहायला पाहिजे.
भंपकपणा आहे हे काहीजणांचे म्हणणे साथ आहे की नाही याविषयी नसून त्या रोगाची मारकता याविषयी आहे. प्लेग झाला (काखेत गाठ आली) म्हणजे माणूस लवकरच आणि नक्की मरणार अशाच प्रकारे प्रसारमाध्यमे स्वाईन फ्लूविषयी बोलत आहेत. स्वाईन फ्लू तसा भयानक नाही असे काही समंजस मंडळी सांगू पहात आहेत.
स्वाईनफ्लूची लागण झालेल्यांची जी आकडेवारी आहे तशीच आकडेवारी साध्या फ्लूची काढली तर कदाचित त्याहीपेक्षा प्रचंड असू शकेल. प्रत्येक माणसाला (भारतातल्या) जवळजवळ दरवर्षी एकदा केव्हातरी फ्लू किंवा कोणत्यातरी प्रकारचा विषाणूजन्य ताप येतोच हे लक्षात घेतले तर हा आकडा फार मोठा असण्याची खूप शक्यता आहे. मलेरिया सारक्या रोगांची लागणही अशाच मोठ्या प्रमाणात असेल.
(एका टेस्टचा खर्च ५०००+ आणि टॅमिफ्लू आणि रेलेंझा या बंदी घातलेल्या औषधांच्या वापरास परवानगी वगैरे गोष्टी चिंतनीय. संगणकाचे व्हायरस बहुतेकवेळा अॅण्टीवायरस बनवणार्या कंपन्याच प्रसृत करतात ही वदंतादेखील चिंतनीय)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
13 Aug 2009 - 10:48 pm | अभिज्ञ
थत्ते साहेब,
पहिली गोष्ट
"तुम्ही डॉक्टर आहात का?"
व
तुम्ही मागच्या एका धाग्यात
हा एक किरकोळ स्वरूपाचा आजार आहे असे विधान केले होते.
तुमच्या कडे ह्या आजाराविषयी रामबाण औषध आहे?
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
15 Aug 2009 - 1:36 pm | नितिन थत्ते
>>"तुम्ही डॉक्टर आहात का?"
मी डॉक्टर नाही. पण त्याचा इथला संबंध कळला नाही कारण मिपावरील कोणत्याच डॉक्टर व्यक्तीने हा भयंकर आजार आहे असे विधान केलेले नाही.
>>तुम्ही मागच्या एका धाग्यात हा एक किरकोळ स्वरूपाचा आजार आहे असे विधान केले होते. तुमच्या कडे ह्या आजाराविषयी रामबाण औषध आहे?
होय माझे अजूनही (माझ्या या प्रतिसादातही) असेच म्हणणे आहे.
कोणत्याही विषाणूजन्य आजारावर रामबाण 'औषध' आज उपलब्ध नाही. लक्षणे कमी करणारी आणि त्यापासून आराम देणारी औषधे असतात. विषाणूजन्य रोगाचा प्रतिकार शरीरालाच करावा लागतो.
अनेक रोगांवरील लसी उपलब्ध असतात पण त्या उपलब्ध आहेत म्हणून प्रत्येकजण प्रत्येक रोगाची लस घेत नाही. साध्या फ्लूवरही लस उपलब्ध आहे पण ती कुणी सहसा घेत नाही.
पूर्वी देवीची लस दिली जात आज पोलिओची दिली जाते कारण त्या रोगाचे परिणाम तुलनात्मक दृष्ट्या भयंकर (फार मोठ्या प्रमाणात शारिरिक अपंगत्व , व्यंग किंवा मृत्यू) असत.
स्वाईन फ्लूची लागण होणे म्हणजे मृत्यू अटळ असे चित्र आज लोकांच्या मनात माध्यमांनी उभे केले आहे. त्यावर आक्षेप आहे.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
15 Aug 2009 - 9:43 am | प्रदीप
ह्यासारख्या इतर काही विषाणूजन्य रोगांच्या साथी दरवर्षी भारतात येत असतात हे खरे आहे, पण मारकता ह्या परिमाणाव्यतिरिक्त अजून एक परिमाण येथे विचारत घ्यावा, व तो 'विंडो ऑफ ऑप्पॉर्चुनिटी'चा. लागण झाल्यावर सात दिवसांनी लक्षणे दिसू लागणार आणी मग त्वरा केली नाही, तर एक दोन दिवसांतच फुफुसांपर्यंत विषाणूंनी हातपाय पसरले असणार. साध्या फ्ल्यूमध्ये ही भीती नाही, तसेच मलेरियामध्ये निदान होऊन इलाज सुरू होईपर्यंत अवधी मिळतो. येथे तसे नाही. दुसरे असे की (माझ्या स्वल्प माहितीनुसार) साध्या फ्ल्यूमुळे फुफुस्साला काही इजा पोहोचत नाही. स्वाईन फ्ल्यूमधे फुफुस्सात बाधा होऊन जरी रोगी बरा झाला, तरी त्याचा दीर्घकालीन परिणाम राहिल का, हे माहिती नाही.
ह्या इतर साथी भारतात जास्त प्रमाणात दरवर्षी येत असल्या तरी त्या तश्याच कमीजास्त प्रमाणात इतर ठिकाणीही येतात. उदा. मी रहातो त्या शहरात जमिनीच्या दर स्क्वेयर फूटमधे रहाणार्या माणसांचे प्रमाण (बहुधा जगात सर्वात) अधिक आहे. तसेच समुद्रसपाटीस असल्याने अत्यंत दमट हवा, छोटी घरे (ज्यांना matchbox homes म्हटले जाते!) सगळे विषाणूंचे पोषण व वाढ करण्यास लागणारे फॅक्टर्स आहेतच. तेव्हा दरवर्षी येथेही उन्हाळ्यात फ्ल्यूच्या साथी असतात. तरीही ह्या साथीसाठी वेगळे निर्बंध लावण्यात आले. ते मीडियाच्या खुळचट प्रचारामुळे नव्हेत तर रोगराई शीघ्रतेने काबूत यावी म्हणून. सांगायचा मुद्दा, हा झाला तो 'हाईप' फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता, इतरस्त्रही तो तसा होता, व नुसता भंपकपणा हे त्याचे कारण नव्हते.
जाता जाता, १९६८ सालीही एक फ्ल्यूची जबरदस्त साथ जगभर पसरली होती म्हणे. मी तरी मुंबईत तेव्हा तिच्याविषयी काहीही ऐकले व अनुभवले नाही. म्हणजे तेव्हा आपणापर्यंत ती आली नाही. २००३ साली आलेला 'सार्स' आताच्या स्वाईन फ्ल्यूपेक्षा अधिक दाहक व मारक होता. आमच्या शहरात त्याने धुमाकूळ घातला. तेव्हा भारतात त्यामुळे काही झाले नाही. ह्यावेळी मात्र ह्या नव्या साथीतून भारत सुटला नाही. हे असे का झाले ह्याविषयी संशोधन होत असावे अशी आशा करतो.
14 Aug 2009 - 8:37 pm | प्रकाश घाटपांडे
डॉ अनंत फडके यांनी जनाअरोग्य अभियान मार्फत काढलेले एक पत्रक इथे पहाता येईल
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Aug 2009 - 1:39 pm | नितिन थत्ते
घाटपांडेकाका, दुवा बघता येत नाहिये.
नितिन थत्ते
15 Aug 2009 - 1:55 pm | तिमा
हा स्वाईन फ्ल्युचा प्रकार अतिशय बालिशपणे हाताळला जातोय असे वाटते. त्या अनुषंगाने अजुन सुशिक्षित माणसे सुध्दा किती अंधश्रध्द आहेत याचेही नमुने बघायला मिळाले आहेत.
सरकार तर अत्यंत नाकर्तेपणे वागत आहे. त्यांनी २६/११ च्या बाबतीत असाच नाकर्तेपणा दाखवला होता. अरेरे, एवढ्या मोठ्या देशाला एकही चांगली व्यवस्थापकीय जाण असलेला नेता मिळू नये ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|