वा! उत्तम!
http://www.misalpav.com/node/8765 ("विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा") भन्नाटच दिसतय!
एकाहुन एक असले "विषय" दिसताहेत निबंधासाठी.
आणि त्यातही "विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक"
हा भलताच भारी प्रकार दिसतोय.
च्यायला पण आता आप्ल्या सारख्या गरिबाला हे सगळच (तूर्तास अविवाहित आणि "कुमार" असल्यानं)नवीन आहे.
जरा धीर गंभीर भाषेत मोठ्ठा निम्बंध्/प्रबंध लिहुन आपणही माराविकी फुशारकी .
पण आपल्याला कळलय ते बरोबर आहे का? काही प्रश्न पडताहेत तिच्यायला. आणि उत्तरही अर्धवट दिसताहेत.
आपलेच प्रश्न आणि आपलीच उत्तरं
१. प्रश्न १:- शीर्षकात "शरीरसंबंधांचा " असं लिहिलय. पण
कुणाचे कुणाशी संबंध? म्हणजे समजा माझं लग्न ठरलय. आणि लग्न होण्यापुर्चीच मी माझ्या (होणार्या ) बायकोशी संबंध ठेवले तर कुणाला काय प्रॉब्लेम आहे(तिला आणि मला सोडुन)?इथं ते अपेक्षित आहे का?
की माझं जिच्याशी लग्नं ठरलय तिच्या आणखी कुणाशी तरी असलेल्या संबंधाबाबत बोलोताहात?
उत्तर :- मनोबा, गाढवा, कुणाच्या विवाहापुर्वीचा अनुभव रे? हे काय सॉफ्ट्वेअर टेस्टिंग वाटलं काय रे येड**? फायनल प्रॉडक्शन ला डीप्लॉय करण्यापुर्वी तु काय इतरांकडुन टेस्टिंग करुन घेणारेस जोडिदाराचं? अकलेचं दिवाळं निघालयं का तुझ्या.
प्रश्न २:- :- नाही तर ते तसं नसेल बुवा... जोडिदाराचं नाही...पण मी माझ्याच "ह्याचं " टेस्टिंग केलं तर बिघडलं कुठं?
उत्तर - मला सांग एखादी "चविष्ट" गोष्ट तुला कराय्ला/खायला आवडते का तिचं वर्णन करायला आवडतं ते भाडखाउ?
अबे आज म्हणतोस "टेस्टिंग" झालेलं बरं......
उद्या म्हणशील "लोड टेस्टिंग" सुद्ध व्हायला हवं. मग काय "विवाह पुर्व सामुदायिक प्रणयक्रियेचे फायदे" ह्यावर भाषण देशील काय बे आँ?
अरे गाढवाच्या बु*, मला सांग विवाहापुर्वी तुझ्या जोडी दाराचं ह्ये प्र्याक्टिकल कुठं झालं असेल तर त्यातुन तुझा काय फायदा बे?
साल्या हे सांग आधी के "विवाह पुर्व" संबंध विवाहानंतरही कायम राहिले तर "विवाह बाह्य" ठरणार नाहित का? अकलेच्या आंद्या, ते तुला कसे काय "सफल वैवाहिक जीवनाकडे" नेतील बे? आँ?
तु काय अभिमानानं पुस्तक प्रकाशित करशील काय "माझ्या बायकोचे विवाहपुर्व समृद्ध अनुभव जीवन" ह्या विषयावर?
"तसलं" काही आधी असणं वेगळं आणि त्याल अभिमानानं मिरवणं वेगळं.
प्रश्न ३:-
"विवाह पुर्व "म्हणजे विवाहापुर्वी एखाद्या वेगळ्याच व्यक्तिशी (तेव्हढ्यापुरते )असलेले संबंध की विवाहा पुर्वीपासुन असलेले(आणि विवाहानंतरही कायम राहिलेले ) संबंध?
उत्तर: - अरे गाढवा आज कित्येक तुझ्या सारख्या संभोग निरक्षरांना विवाहोत्तर ही धड संबंध ठेवायची अक्कल नाही. खरी समस्या ती आहे.तिकडं बघ.
विवाहपुर्व संबंध चालु राहिले तर हे तथाकथित "अनुभव" जीवनांदात भर घाल्ताहेत असं म्हणशील का?
प्रश्न ४:-
समजा एखाद्या सलिमचं हे तिसरं लग्न होतय, तर त्याची आधीची दोन लग्नं म्हणजे ह्या केस मधे विवाहापुर्व संबंधच झाले की!
उत्तर :- ही "केस स्टडी " समजुन ह्यावरच एक अख्खा निबंध होउ शकतो ना...
एकाच व्यक्तीचे अनेक विवाह हे "विवाहपुर्व संबंधां"चं उत्कृष्ट उदाहरण नाही का?
विचार काय करतोस, घे पेन आणि कर सुरुवात जोरदार....
प्रश्न ५:-
बरं विवाह पुर्व संबंध म्हणताय, पण विवाहापुर्वीचे कुठले संबंध? भिन्नलिंगी की सम्ल्लिंगी?
उत्तर :-
मला एक सांग "विवाह पुर्व समलिंगी संबंधांचा " भिन्नलिंगी विवाहात काय घंटा उपयोग होणार?
म्हणजे गृहितक हेच दिसतय की विवाहापुर्ची चे स्त्री चे पुरुषाशी (किंवा पुरुषाचे स्त्रीशी) संबंध!!
बाप्याचे बाप्याशी किंवा बयेचे बयेशी संबंध इथं मोजलेलेच दिसत नाहियेत.
अरेच्चा! हो की!
आणि हो...
प्रश्न :-६
समजा माझ्या मित्रांच्या "प्रगत" देशात(की संयुक्त "राज्यात") हे लग्न होतय...
समजा जॅक चा बाप आहे जॉन तो करतोय लग्न लिंडा शी....आणि जॅकची बाहेर अनंत लफ्डी आहेत..
तर जॅकच्या "होणार्या आईला"(!!!!),लिंडाला आपल्या विवाहापुर्वी आपल्या मुलाने बाहेर ठेवलेले संबंध चालतील का
असा हा विषय आहे? (जॉन आणि लिंडा ह्यांच्या विवाहापुर्वी त्यांच्या मुलाचे इतरत्र असलेले संबंध! )
प्रश्न :-७
कित्येकदा "पॉर्न फ्यांटसी" म्हणुन पाहिलेल्या मूव्हीमंध्ये होणार्या व्याह्यांमधेच एखादी रात्र "मजा ' मारली जाते.
म्हणजे जॅक आणि लिझा ह्यांचं लग्न ठरलय, तर नेमकं त्यानिमित्तनं परिचित झालेले जॅकचे वडील (जॉन)आणि लिझाची आई(लिंडा) ह्यांच "प्रकरण" जे सुरु होतं ते म्हणजे जॅक्-लिझा च्या "विवाहापुर्वीचे संबंध" म्हणजे विवाहपुर्व संबंधच झाले की!
म्हणजे प्रगत राज्यातल्या व्याह्यांमध्ये होउ शकतं म्हणा असं.
काय हे?
ही गृहितकं नेहमी अशीच असतील काय?
स्पष्ट विषय मला कधी मिळणारच नाही काय?
पब्लिकला हा विषय हवाय काय?
नक्की हवय तरी काय?
वरील पैकी एखादी भलतीच "केस" घेउन लिहिलं तर चालेल काय?
लिहिलं तर बक्षिसाची अपेक्षा धरता येइल काय?
नसेल तर लिहिण्यात काय मतलब आहे काय?
आपलाच,
संभ्रमित्,भ्रमिष्ट्,बक्षिसाभिलाषी,
कुठल्याही गोष्टीचा नको तसा नको तितका विचार करणारा
मनोबा
प्रतिक्रिया
3 Aug 2009 - 8:47 pm | विकास
"मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं" असे बहीणाबाईंनी का म्हणले असेल ते आत्ता समजले! :-)
बाकी अजून लिहीण्यासारखे बरेच विषय या स्पर्धेत आहेत त्यावर लिहू शकता :-)
>>समजा माझ्या मित्रांच्या "प्रगत" देशात(की संयुक्त "राज्यात") हे लग्न होतय...<<
या संदर्भात कायम सांगितले जाणारे एक उदाहरणार्थ वाक्यः My children and your children are fighting with our children".
3 Aug 2009 - 8:51 pm | छोटा डॉन
"मन" उधाण विचारांचे .... हा प्रयोग आवडला.
काही काही प्रश्न खरोखरच ठ्ठ्या ऽऽऽ करुन हसवणारे होते ...
असो, बाकीच्या विषयांचा असाच "उहापोह" करावा अशी मनरावांना नम्र विनंती.
------
छोटा डॉन
3 Aug 2009 - 10:42 pm | वेदश्री
मना,
गृहितके धरणारा तू आहेस त्यामुळे ते तुझ्यावर अवलंबून आहे. नाही का?
अर्धवट प्रश्नांमधून स्पष्ट होणार नाही विषय. नीट विचार केलास तर उलगडा आपोआपच होईल.
ते पब्लिक बघून घेईल ना. त्याची चिंता करण्यात तू का तुझा अमूल्य वेळ वाया घालवतोयस?
निबंधस्पर्धेचा विषय वाचून मनात निर्माण होणार्या साधकबाधक विचारांचा/प्रश्नांचा परामर्श घेऊन स्वतःचे मत सुस्पष्टपणे मांडणारा निबंध.. बस्स!
तुला जर ते योग्य वाटत असेल तर कोण अडवतंय तुला? लिही की बिनधास्त!
बक्षिसाच्या अपेक्षेने लिहायचे की स्वतःचे मत कळवण्याचे माध्यम म्हणून वापरायचे, हा सर्वस्वी निर्णय तुझा असणार आहे. स्पर्धेचा निर्णय हा केवळ निबंधाच्या परिपूर्णतेवर अवलंबून असेल असे वाटते, त्यामुळे बक्षिसाची अपेक्षा धरायला हरकत नसावी बहुदा.
अमुकतमुक विषयावरच निबंध लिहिला तर बक्षिस मिळेल असे काही नमूद केलेले मलातरी दिसले नाही पण तुला जर इतकी अनिश्चिती वाटत असेल बक्षिस मिळण्याबद्दल आणि ते मिळण्यानेच जर सहभागी होण्याला मतलब येत असेल तर मग छोट्या बक्षिसाच्या स्पर्धेत कशाला लिहितोस? प्रमोदकाकांनी सांगितलेल्या निबंधस्पर्धेतप्रयत्न कर. घसघशीत बक्षिस मिळेल.. शिवाय त्यातले विषयही ('विषय' नव्हे!) सुस्पष्ट आहेत!
विनोद, मौजमजा म्हणून जरी वरचे लेखन तू केले असलेस तरी तू उत्तम निबंध लिहू शकतोस याची कल्पना असल्याने निबंधलेखनाचे कौशल्य अधिक योग्य जागी वापरावेस असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. चु.भु.दे.घे.
निबंधलेखनासाठी शुभेच्छा.
3 Aug 2009 - 11:12 pm | टारझन
हा विषय पोरी-बाळींना घेऊन वाचण्याच्या लायकीचा आहे का ? आम्ही बर्याच वेळेला (दुसर्यांच्या) पोरीबाळींना घेऊन वाचायला येतो मिसळपाव वर !!
आणि ह्या असल्या धाग्यांमुळे ओशाळायला होतं !! काय आहे हें ?
तुम्ही याल का हो मन साहेब ? पोरीबाळींबरोबर वाचायला ? येणार असाल तर प्रश्नच मिटला ..
असो .. पोरीबाळींसह अवघडल्यासारखा विषय काढल्याने त्याच्या होणार्या परिणामांचा इथे 'उहापोह' व्हावा !
- टन
3 Aug 2009 - 11:49 pm | इनोबा म्हणे
हा विषय पोरी-बाळींना घेऊन वाचण्याच्या लायकीचा आहे का ? आम्ही बर्याच वेळेला (दुसर्यांच्या) पोरीबाळींना घेऊन वाचायला येतो मिसळपाव वर !!
पोरी-बाळी बरोबर असताना तुम्ही कळफळक बडवत असता होय? त्याच्यापेक्षा इम्रान हाश्मीच्या क्लासला जा ना!
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
4 Aug 2009 - 1:10 am | टारझन
लेका इन्या ... इम्रान हाश्मी पिक्चरचे पुर्ण दोन तास एकाच पोझ मधे असतो का रे ?
आणि हावरटाला खावे कसे ह्याचा क्लास ? =)) भलताच विनोदी झालाय हो विनोबा !!
- टार्या हावरट
10 Aug 2009 - 9:17 pm | मन
विकास , डॉन्या, वेदश्री, इनोबा, टार्या....
मनापासुन धन्यवाद.
टार्या/इनोबा,
मनोबा तसाही शामळु छाप असल्यानं (इतरांच्या)पोरीबाळिंबरोबर यायचा प्रश्न मला काही सतावत नाही.
डॉन्या,
इतर विषयांचा प्रयत्न करुन पाहिला. पण भट्टि काही जमेना राव.
क्षमस्व.
वेदश्री दी,
सर्व वाचकांपैकी आपणच एक आहात ज्यांनी प्रश्नांची पुरेशी उत्तरं दिलीत. तुम्हाला पेश्शल धन्यु.
विनोद, मौजमजा म्हणून जरी वरचे लेखन तू केले असलेस तरी तू उत्तम निबंध लिहू शकतोस याची कल्पना असल्याने निबंधलेखनाचे कौशल्य अधिक योग्य जागी वापरावेस असे आग्रहाने सुचवावेसे वाटते. चु.भु.दे.घे.
कसचं कसचं.....उगी आपलं खरडात अस्तो झालं.
पण प्रयत्न जरुर करीन.
सर्व वाचकांचे पुनश्च आभार.
आपलाच,
थोडासा चावट
मनोबा