गाभा:
नमस्कार. फार फार वर्षांपूर्वी जी. ए. कुलकर्णींनी लिहीलेलं "बखर बिम्मची" हे पुस्तक माझ्याकडे होतं. एकदा कुणीतरी सहज म्हणून वाचायला नेलं ते परत आणून दिलंच नाही. अतिशय अप्रतिम आणि मनःस्पर्शी पुस्तक आहे. आणि दुर्दैवाने सध्या कोणत्याही विक्रेत्याकडे ते उपलब्ध नाही. कोणाकडे ते आहे का? मी छायांकित करून घ्यायला तयार आहे. अथवा मला pratham.phadnis@gmail.com वर आपली माहिती पुरवल्यास मी संपर्क करेन.
प्रतिक्रिया
18 Jul 2009 - 11:50 am | पांथस्थ
मध्यंतरी जी.एं. च्या पुस्तंकांच्या नवीन आवृत्ती निघाल्या होत्या. त्यावेळी 'बखर बिम्मची' हेही बघितल्यासारखे वाटते. पुण्यात अप्पा बळवंत मधे 'पाटिल एंटरप्राइझ' मधे चौकशी करुन बघा.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
18 Jul 2009 - 12:22 pm | दत्ता काळे
माझ्याकडे आहे. मी तुम्हाला देईन. माझे ऑफिस नवी पेठ, पुणे येथे आहे. तुम्ही कसे येऊ शकाल ते कळवा, त्याप्रमाणे मी माझा संपूर्ण पत्ता देईन.
18 Jul 2009 - 12:43 pm | नानबा
सर्व प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
18 Jul 2009 - 12:48 pm | तर्री
प्रथम,
मलाही हे पुस्तक वाचायाला आवडेल सवडीने मी आपणास लिहेन.
आक्षेप नसावा.