गाभा:
Thyroid cancer आणि radioactive iodine treatment वर कोणी guidance करु शकेल का? जर कोणाशी प्रत्यक्श बोलता आले तर जास्त फयदा होइल....
actually operation आणि radioactive iodine treatment करुन एक वर्ष झालय.... आता परत radioactive iodine treatment द्यावि लागेल अस doctor च मत आहे....
किती वेळा radioactive iodine treatment द्यावी लागते?.... किंव्वा काहि पर्यायी उपाय?....
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 5:14 pm | चतुरंग
पुन्हा उद्भवू शकतात.
इथे थायरॉईडवर काम करणार्या भारतातल्या डॉक्टर्सची यादी आहे. पुण्यातले दोन डॉक्टर्स दिले आहेत.
मुंबईचे टाटा कॅन्सर रुग्णालय हे तर प्रसिद्ध आहेच.
ह्या लिंकवर अमेरिकेतल्या नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची माहिती आहे.
जे कोणी रुग्ण आहेत ते लवकर आणी संपूर्ण बरे व्हावेत ही सदिच्छा!
चतुरंग
14 Jul 2009 - 10:19 pm | लवंगी
जे कोणी रुग्ण आहेत ते लवकर आणी संपूर्ण बरे व्हावेत ही सदिच्छा!
15 Jul 2009 - 4:39 am | बहुगुणी
थोडी आधिक माहिती देऊ शकाल तर पहा (हवं तर व्य नि करा):
१. कॅन्सरची स्टेज काय आहे? (I, II, III, की IV)
२. कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे? (ही माहिती pathology report मध्ये सापडेल; papillary, follicular, medullary, की anaplastic)
३. सर्जरी एक वर्षापूर्वी झाली, ती total thyroidectomy ची होती का?
४. आताची रेडिओथेरपी करायला सांगितलं त्या आधी शरीरात इतरत्र कुठे (उदा. फुफुसात) metastasis (कॅन्सरचा प्रसार) झाल्याचं निदान झालं होतं का? की local recurrence आहे?
५. रुग्णाचं वय काय आहे? स्त्री/पुरूष?
15 Jul 2009 - 4:53 am | Nile
No offense to anyone, पण याप्रकारे मार्गदर्शन घेणे हे अत्यंत धोकादायक आहे.
प्रत्येक रुग्णाची परिस्थीती ही थोडीफार का होईना वेगळी असु शकते. पुर्ण background आणि सखोल अभ्यास असल्याशिवाय योग्य सल्ला देणे सोपे/ शक्य नाही तसेच तो सल्ला घेणे ही धोकादायक. (Unless you know very well about how and what to take from it)
तज्ञ डॉक्टरला पुर्ण तपशीलासह भेटणे हेच मला सर्वात जास्त योग्य वाटते.
असो, hope the patient gets well soon. :)
15 Jul 2009 - 7:47 am | ज्ञानेश...
तज्ञ डॉक्टरला पुर्ण तपशीलासह भेटणे हेच मला सर्वात जास्त योग्य वाटते.
असो, hope the patient gets well soon.
असेच म्हणतो.
"Great Power Comes With Great Responssibilities"
16 Jul 2009 - 9:02 pm | धनंजय
वरील दोघांशी मी सहमत आहे.
रुग्णाला आराम मिळो हीच इच्छा.
त्याबरोबर हेसुद्धा : जो कोणी तज्ञ भेटेल त्याने रुग्ण आणि रुग्णाच्या आप्तांना समजेल अशा प्रकारे पूर्ण माहिती द्यावी. पर्याय सांगावेत - कारण गंभीर रोगांच्या उपचारासाठी एकच मार्ग असा नसतो. अनेक फायदे-तोटे असतात. आणि उपचारापैकी पर्याय ठरवण्यात रुग्ण आणि आप्तांचा खराखरचा सहभाग करून घ्यावा. असा तज्ञ भेटो ही सदिच्छा.
15 Jul 2009 - 7:57 am | अमेयहसमनीस
माझा ईमेलः
ameyadoc@gmail.com / ameyadoc@rediffmail.com
15 Jul 2009 - 8:02 am | विसोबा खेचर
तज्ञ डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून सल्ला/उपचार घ्यावे. इथे कोणत्याही स्वरुपात (खुले प्रकटन, खरडवही, खरडफळा, व्यक्तिगत निरोप अथवा पोष्टहापिस,) सुचवल्या गेलेल्या कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याची/उपचारांची आणि त्या अनुषांगाने होणार्या परिणामांची कोणतीही नैतिक/कायदेशीर जबाबदारी मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ स्विकारत नाही, हे मिसळपाव डॉट कॉम ह्या संकेतस्थळाचा मालक या नात्याने इथे स्पष्ट करू इच्छितो.
असो,
रुग्णाईताच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा, अशी मनापासून प्रार्थना..
-- तात्या अभ्यंकर.
15 Jul 2009 - 10:20 am | विमुक्त
पुण्यातल्या अतीशय उत्तम doctor कडे च treatment चालु आहे.... आणि patient ची health पण बरि आहे....
जर कोणाला प्रत्यक्श अनुभव असेल तर (म्हणजे नात्यात वगेरे कोणी....)... तर बोलाय्चे होते.... कारण अश्या कोणाशी बोलणं झालच नाही....
बाकि .....treatment हि doctor च्याच सल्ल्याने करणार आहोत.... पण इतरांच्या अनुभवातुन सुद्धा मदत होते.... निदान मानसीक पातळिवर तरि आधार मिळतो....
तुम्हा सर्वांच्या प्रतीक्रियां बद्दल आभरि आहे....
16 Jul 2009 - 5:09 am | आकाश
Based on my personal experience, I regret to say that a very reputed doctor in Pune (from a reputed, ideological school in Pune) has succumbed to malpractice and rips you off, especially if he knows that you are an NRI and recommends expensive treatment. Even if you are working with a good doctor, please get a second opinion from another competent doctor.
17 Jul 2009 - 8:12 am | डॉ.प्रसाद दाढे
आकाशानंदांचा आंग्ल प्रतिसाद योग्य आहे. पुण्यातील एका नामांकित व तत्व, नीतीमत्ता, संस्कार, सामाजिक भान वगैरे गोष्टींची खांद्याला शबनम लावून तावातावाने चर्चा करणार्या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर्स अक्षरशः व्यापारी वृत्तीने लुटमार करीत आहेत. कॅन्सर उपचारात तर खूपच फसवणूक चालते. सेकंड ओपिनियन जरूर घ्या. माझे मत मी खालील धाग्यावर व्यक्त केले आहे.
http://www.misalpav.com/node/7514
वैयक्तिक मदतः मी स्वतः टाटा मेमोरियल रूग्णालयात काम केले असल्याने अनेक कॅन्सर तज्ञ उत्तम परिचयात आहेत, गरज पडल्यास व्य नि करावा.
17 Jul 2009 - 2:45 pm | विमुक्त
तुमचा email id मिळेल का?