आजच्या सकाळमध्ये मेधा पाटकरांच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेची बातमी का नाही?
लवासा कॉर्पोरेशनमध्ये पवारांचे हितसंबंध गुंतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या वाचकांना ही माहिती देण्याची जबाबदारी आपल्यावर नाही असा सकाळचे माननीय मुख्य संपादक यांचा समज आहे का?
अलिकडे सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.
७५ वर्षांची परंपरा सांगण्याचा अधिकार अशा वृत्तपत्रास आहे काय?
ही वाचकांची प्रतारणा नाही का ?
मग सामना, प्रहार ही वृत्तपत्रे परवडली. आम्ही ठाकरे आणि राणेंची मुखपत्रे आहोत हे ते बिनधास्तपणे मान्य तरी करतात.
सकाळच्या माननीय मुख्य संपादकांनीही आपलं वृत्तपत्र पवारांच्या ताटाखालचं मांजर असल्याचं जाहीर करुन टाकावंच!
मिपावर सकाळचे अनेक शिलेदार असल्याचे कळते, त्यांच्यापैकी कुणी याचे स्पष्टीकरण देईल काय?
सकाळचे सध्याचे मुख्य संपादक (?) ही शोषितांचा कैवार वगैरे घेणारे असल्याचे सर्वज्ञात आहे,
मग आता लवासामध्ये होरपळणार्या आदिवासींचे अश्रू पुसायची त्यांना भीती वाटते आहे का ?
पवारांच्या ताटाखालचे मांजर
गाभा:
प्रतिक्रिया
8 Jul 2009 - 10:43 am | चिरोटा
हे खरे आहे. वर्षापुर्वी त्या प्रोजेक्टला बांधकाम साहित्य पुरवणार्या एका छोट्या कंत्राटदाराने मला हे सांगितले होते.सकाळच्या मॅनेजमेंटवर प्रताप पवार(शरद पवार ह्यांचे बंधू) आहेत ना? मग ते अडचणीची बातमी का छापतील?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
8 Jul 2009 - 10:44 am | पाषाणभेद
हाईट सकाळची.
मागच्या आठवड्यात छापील सकाळच्या तिसर्या पानावर "लाल्या पुन्हा शाकाहारी झाला" ही बातमी (?) होती. ति पण २ कॉलमी आणि ७ ईंची.
ति**यचा तो भुसनळ्या. त्याची काय बातमी द्यायची. तिही सकाळमध्ये ?
उद्या त्याच्या गाईला भूळकांडी रोग झाला तर ती पण बातमी होईल कारे तुमच्या लेखी ?
आम्हाला बातमीचा काही चॉईस आहे की नाही?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
जुना 'ब्लॅक अँन्ड व्हाईट' सकाळप्रेमी आणि - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
8 Jul 2009 - 11:01 am | नाना बेरके
सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.
हे अगदी खरं आहे.
लोकसेवेची (सामाजिक ) जाणिव ठेवून निर्भिड वर्तमानपत्र निर्माण करणार्या कै. नानासाहेब परुळेकरांच्या स्वप्नांना हल्लीच्या व्यवस्थापनाने तडा दिलाय.
8 Jul 2009 - 11:01 am | नाना बेरके
सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.
हे अगदी खरं आहे.
लोकसेवेची (सामाजिक ) जाणिव ठेवून निर्भिड वर्तमानपत्र निर्माण करणार्या कै. नानासाहेब परुळेकरांच्या स्वप्नांना हल्लीच्या व्यवस्थापनाने तडा दिलाय.
8 Jul 2009 - 11:01 am | विंजिनेर
एखाद्या सांस्कृतिक/धार्मिक किंवा राजकारणी गटाला पाठिंबा देऊन त्या गटाला धार्जिण्या अशाच बातम्या देणे हे व्यावसायिक पत्रकारितेत नवीन नाही (वृत्त आणि दृक्-श्राव्य माध्यमे).
पाश्चिमात्य देशात बर्याचदा अशी बाजू उघडपणे घेतली जाते (उदा फॉक्स न्युज रिपब्लिकन पक्षाला झुकते माप देऊन बातम्या देण्यात प्रसिद्ध आहे, सीएनएन/वॉशिंग्टन पोस्ट डाव्या/मवाळ डेमॉक्रॅटिक गटाच्या बाजूने आहेत.) आणि अशी बाजू घेऊन पत्रकारिता केल्याबद्दल अनेक वेळा निष्पक्ष पत्रकारितेचे पुरस्कर्ते ह्या माध्यमांवर झोड उठवितात/उपहास करतात.
भारतात इतक्या राजेरोस पद्धतीने हे सर्व होत नसले तरी सकाळ पवारधार्जिणा आहे हे उघड गुपित आहे.
अर्थात पक्षपाती पत्रकारिता(असंतुलित नव्हे!) चांगली की वाईट हे व्यक्तिसापेक्ष आहे .पण ही परंपरा(!) टोकाच्या भांडवलशाही वृत्तीमुळे आली आहे ही वस्तुस्थिती नाकाराता येत नाही. नाण्याची दुसरी बाजू अशी की लोकशाही मुळे विरोधी गटाला निदान आवाज तरी उठविता येतो :)
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
8 Jul 2009 - 11:07 am | धमाल मुलगा
बाकी वर्तमानपत्राच्या ह्या गोष्टींबद्दल बोलायचं तर दूरच ठेवा.
त्या अनंतांनी आपल्या क्लिंटनचा लेख दै.सकाळने तिसर्याच्याच नावावर छापल्याची बातमी इथे देऊन किती दिवस झाले? तरीही 'सकाळ'च्या एकाही संबंधीताला खुलासा करण्याचे कष्टही घ्यावेसे वाटलेले नाहीत अजुन. काय फालतुपणा आहे हा?
देवा, त्या परुळेकरांचा आत्मा स्वर्गात तडफडत असेल ही अवस्था पाहून. त्यांना शांती दे रे बाबा!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
8 Jul 2009 - 12:53 pm | श्रावण मोडक
बातमी आहे, निदान माझ्या इथल्या आवृत्तीत (बिबवेवाडी, पुणे... :) ) तरी आहे. "वरसगाव धरणक्षेत्रातील गावे वाचवण्याचे आवाहन" असे शीर्षक आहे. पृष्ठ ४ वर तळाशी. अजित पवार यांचा संबंध असल्याचा उल्लेखही बातमीत आहे.
8 Jul 2009 - 1:01 pm | धमाल मुलगा
तसे असल्यास माझे काही शब्द मागे! आणि सखेद माफी देखील.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
8 Jul 2009 - 12:39 pm | mamuvinod
सकाळ पवारधार्जिणा आहे हे जगजाहिर आहे व लावासा प्रकल्पामध्ये त्याचे व त्याचे जावय मा. सुळेसाहेब हेदेखिल भागीदार आहेत.
शिवाय निम्मा मुळशी तालुका दोन्हि काका पुतण्यानी विकत घेतला आहे.
8 Jul 2009 - 12:41 pm | mamuvinod
सकाळ पवारधार्जिणा आहे हे जगजाहिर आहे व लावासा प्रकल्पामध्ये त्याचे व त्याचे जावय मा. सुळेसाहेब हेदेखिल भागीदार आहेत.
शिवाय निम्मा मुळशी तालुका दोन्हि काका पुतण्यानी विकत घेतला आहे.
8 Jul 2009 - 1:27 pm | कपिल काळे
दै. सकाळ चे नाव आता बदलून दै. रटाळ असे करायला हवे.
कचरा जिरवा सारख्या जनजागृती मोहिमा ते हाती घेतात, पण मतदार-जागृती मोहिम चालवत नाहीत. कारण सकाळ चा वाचकवर्ग खरोखरच मतदानाला बाहेर पडला तर काय अशी भीती "दादांना" किंवा "साहेबांना" वाटत असावी.
दिपक मानकरचा अनेकवचनी आदरार्थी उल्लेख करणारे सकाळ हे एकमेव वॄत्तपत्र आहे.
फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीत आयुर्वेदावर भर असतो. पण त्यातील मॉडेल्स मात्र फिरंगी का हे एक न सुटलेले कोडे.वैद्यराज जे सल्ले देतात , त्यातील वातविकार असणारया स्त्री पेशंटला दिलेला "**भागी अमुक तमुक तेलाने सिद्ध केलेला कापसाचा पिचू धारण करावा" हा सल्ला तर भारीच.
8 Jul 2009 - 1:42 pm | धमाल मुलगा
हिट्ट!!!
काय फोडलाय शेठ :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
10 Jul 2009 - 6:38 am | पाषाणभेद
कपिल साहेब, आपले निरीक्षण अतिशय सुक्ष्म आहे. मलाही असाच प्रश्न पडला होता. सगळे चित्र फिरंगी का? का ते ईंटरनेटवर फुकट मिळते म्हणून? आणि ते मैत्रीण तर आख्खे एक पान खाते. तेही केसरीच्या जाहीरातीने बरबटलेल्या कॉलमने नटते. त्यात ईतर जाहीरातीही असतात.
फॅमिली डॉक्टर ह्या पुरवणीत आता नसा स्टाँग करण्याच्या जाहिरातीही येत आहेत. मी तर म्हणतो, साळसुदपणा ठेवून केवळ एका वर्गाला टारगेट ठेवण्याचा प्रयत्न सोडून द्यावा. पेपर समाजातील सगळे वर्ग वाचतील व खप पण वाढेल व त्यांची कमाई पण होईल.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
8 Jul 2009 - 5:05 pm | पात्र
A 13 hectare (=32.12 acres) plot allotted to Lavasa Corporation, owned by Sadanand Sule, Sharad Pawar's son-in-law at the time. He handed over his stake in 2006
स्त्रोत
http://en.wikipedia.org/wiki/Sharad_Pawar#The_criminal-politician_nexus
9 Jul 2009 - 12:12 am | सुहास
अलिकडे सकाळमध्ये अशा पवारांना जड जाणार्या बातम्यांची वारंवार मुस्कटदाबी होत आहे.
अलिकडे? अहो, गेली १५ वर्षे हेच चालू आहे.. अर्थात "पवारांना जड" बातम्या पण असतात.. पण त्या आतल्या पानांवर अगदी थोडक्यात (मोडक साहेबांनी सांगितल्या प्रमाणे..)
अवांतरः त्यांचा ई-पेपर मात्र राज ठाकरेंबद्द्ल काहीही बातमी असो, फ्रंट पेजला छापतो, तेही फोटोसकट..!
अतिअवांतरः आजकाल राजकारणविरहीत पत्रकारिता फक्त "संध्यानंद" मध्येच चालते की काय..? :?
16 Jul 2009 - 2:05 pm | टिम्बु
हे वाचा.....http://www.indiaenvironmentportal.org.in/node/263780
आम्ही आपुले लिम्बु - टिम्बु......
16 Jul 2009 - 5:19 pm | हरकाम्या
अरे अ-मोल तु एवढा कसा रे बुद्दु ,लेका एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाही.
" सकाळ " ला ताटाखालचे मांजर कसा म्हणतोस ,अरे भाउ अख्खा
"सकाळच "त्यांचा आहे.
बाकी कसाही असो मी मात्र सकाळचा वाचक आहे. पुण्यात दैनिकांचे एवढे "ऊदंड " पीक आले तरीही "सकाळ "आहे त्या स्थानावर आहे.
यावरुन गड्या काय समजायचे ते समज.
बाकी किरकोळ गोष्टींसाठि सकाळला नावे ठेवु नकोस.
16 Jul 2009 - 7:00 pm | चिरोटा
सकाळ पुर्वीपासुनच राजकारणी लोकांवर टिका करण्याचे टाळतो.स्वातंत्र्यसैनिकांची मनोगते,xyz महाराजांची प्रवचने असल्या गुळगुळीत बातम्यांचा जास्त भरणा असतो.महाराष्ट्र टाईम्स पण पुर्वी तसाच होता.पण सध्या अगदीच सुमार बातम्या असतात.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न