माझीपण फोटोग्राफी - राम-सीतेच्या स्वयंवराचे ठीकाण भद्राचलम, A.P.

सातारकर's picture
सातारकर in कलादालन
7 Jul 2009 - 5:16 pm

आंध्र प्रदेशमधे हैद्राबादपासून साधारण ३२५ कि.मी वरती खम्मम जिल्ह्यामधे हे ठीकाण आहे. इथे राम - सीतेचे स्वंयवर झाले अशी आख्यायीका आहे. तिथल्या भटजींनी तर सांगितले की आजही तिथे स्वंयवर पद्धतीने विवाह होतात म्हणून. पण ते प्रत्यक्ष पाहायची संधी काही मिळाली नाही.

असो, गोदावरी किनार्‍यावरच हे मंदीर बरच जुनं आहे.

गोदावरी नदीच पात्र जवळ जवळ १ कि.मी रुंद आहे. तिथे अतिशय शांत वाटत. सकाळी देवळात जाण्यापुर्वी स्नानास जाणारे भक्तगण सोडले तर नदीवर अजिबात वर्दळ नसते.

हा भाग नक्षलवाद्यांचा आहे. ह्या भागापासून फक्त ३६ कि. मी वरती छत्तीसगढची हद्द सुरू होते आणि घनदाट जंगल देखील त्यामुळे आपल्याला वाट्टेल तस फिरता येत नाही.

जाता जाता: इथे एक कायदा लागू आहे, नाव किंवा कलम माहीत नाही, पण त्या कायद्याच्या आधारे, त्या तालूक्याच्या बाहेरचा कोणीही तिथे स्थावर मालमत्ता विकत घेउ शकत नाही.

कॅमेरा: SONY DSC-W35

कलास्थिरचित्र

प्रतिक्रिया

सोनम's picture

7 Jul 2009 - 5:31 pm | सोनम

फोटू छान आहे. पण ह्या फोटोबरोबर थोडीशी माहिती द्यायला हवी होती. :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

क्रान्ति's picture

7 Jul 2009 - 7:41 pm | क्रान्ति

आवडले. समुद्राचे फोटो तर खूपच खास!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

प्राजु's picture

7 Jul 2009 - 8:16 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

7 Jul 2009 - 10:27 pm | मदनबाण

फोटो आवडले.

(जय श्रीराम)
मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

सुचेल तसं's picture

8 Jul 2009 - 9:04 am | सुचेल तसं

फोटो आवडले

अवलिया's picture

7 Jul 2009 - 10:52 pm | अवलिया

छान आहेत फोटो :)

--अवलिया

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणा-यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाहीत ? आणि समलैंगिकांचे उदात्तीकरण पण केले नाही? अरेरे ! स्वतःला आधुनिक कसे म्हणवते तुम्हाला !!

पाषाणभेद's picture

8 Jul 2009 - 4:28 am | पाषाणभेद

मस्त फोटो.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

दशानन's picture

8 Jul 2009 - 11:52 pm | दशानन

सुरेख !

मस्त व सुंदर फोटो !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

विशाल कुलकर्णी's picture

9 Jul 2009 - 12:06 pm | विशाल कुलकर्णी

नदीचे फोटो खुप आवडले. पण १ किमी एवढे विस्तृत पात्र? Is it?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

सातारकर's picture

9 Jul 2009 - 2:17 pm | सातारकर

पात्र एक किलोमीटर रुंद आहे. ते पूर्ण भरतं फक्त पावसाळ्यातच. इतरवेळेला वाळवंटच असत. खरतर वरती दिलेल्या माहीतीतच मी अरुंद - अवखळ नद्या बघायची सवय असलेल्या मराठी माणसाला आश्चर्य वाटते असे लिहिणार होतो पण त्याने उगाच ते माहीती सोडून भरकटल असत अस वाटल्यान लिहिल नाही.

हे पात्र पहायच्या आधी मी भर पावसाळ्यात औदूंबरला दुथडी भरून वाहणार क्रूष्णेच (हे नीट कस लिहायच?) पात्र पाहील होत, जे माझ्यासाठी सर्वात मोठ होत. पण हे गोदावरीच विस्त्रूत पात्र बघितल्यावर विस्त्रूत या शब्दाची व्याख्याच बदलली.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

मन's picture

9 Jul 2009 - 2:07 pm | मन

भद्राचलम हे राम -सीतेच्या स्वयंवराचं ठिकाण नव्हे.
सीता "जनक" कन्या आहे. तिच्या जन्माचं आणि तिचं जिथं लग्नं लागलं ते दोन्ही आजच्या उत्तर भारतात आहे.(बहुदा बिहार मध्येच आहे.)
राम आणि सीता हे वनवासात असताना "दंडकारण्यात" गेले होते.
हा प्रदेश म्हणजे आजचा महाराष्ट्र व तिथुन पुढचा बराचसा दक्षिण भारत होय. त्यांच्या वनवासातील सुरुवातीचा भाग म्हणजे नाशिक जवळचं त्र्यंबकेश्वर(जिथं पंचवटी आजही दाखवली जाते, ज्यात राम - सीता व लक्ष्मण ह्यांचं वास्तव्य होतं असं मानतात.)
त्यांच्या वनवासातला पुढचा भाग ते गोदावरी नदीच्या काठाकाठानं गेले असावेत. जसं पैठण जवळ "कायगाव टोक" हे ठिकाण दाखवतात रामाचे पदस्पर्श झाले म्हणुन तसच.
त्याच मार्गानं पुढं गेलं कि येतं ते आंध्र प्रदेश, आणी त्यातील हे भद्राचलम.
ह्या ठिकाणी रावणानं सीतेचं हरण केलं होतं असं तिथले स्थानिक आजही मानतात.

तस्मात् हे त्यांच्या स्वयंवराचं ठिकाण नसावं असं वाटतय.
अवांतर १:- तिथुन जवळ्च आंध्र्-कर्नाटक सीमेजवळ कर्नाटकात आजही एक जंगलाचा भाग दाखवतात, सुग्रीवाअची "किश्किंधा" नगरी म्हणुन. सीता हरणानंतर, जवळच असलेल्या ह्या भागात रामानं जाणं नक्कीच शक्य आहे.
अवांतर २:- "कायगाव टोक" ह्याच्या नाटोक "टोक" शब्द आला तो असा-- मारिच राक्षस मायावी हरणाचं रूप घेउन पळत होता, तेव्हा ष्री रामानं त्याच्यावर बाण सोडला, बाणानं त्याचं शीर उडुन अतिदूर जाउन पडलं. ते शीर्/टोक पडलं ती जागा म्हणजेच हे कायगाव "टोक".

आपलाच,
मनोबा
(ऋषिकेश खोपटिकर)

वाटाड्या...'s picture

9 Jul 2009 - 9:40 pm | वाटाड्या...

तरीच म्हटल की श्री रामप्रभु सीतामाईना भेटायला ह्या गुलट्यांच्या प्रदेशात कशाला गेले असतील...