प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय.
सप्रेम नमस्कार वि.वि.
मंडळी,
येत्या जुलै महिन्याच्या ८ तारखेस (आषाढ शु.६, शके १९२९) तुमचा मित्र "धमाल मुलगा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत पत्रिकेचे स्कॅन केलेले चित्र इथे चढवत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
आपलाच,
धमाल उर्फ कैवल्य.
विवाहस्थळ : आनंद मंगल कार्यालय, नेहरु स्टेडियम समोर्,सारसबागेपाशी, पुणे.
मुहुर्तः ८-जुलै-२००८, वेळः स. ११वा. ३१ मि.
प्रतिक्रिया
6 Jul 2009 - 8:45 pm | तर्री
नमस्कार , ध.मु.
विवाह बध्द होणार म्हणून हार्दिक अभिनंदन!!!
अहेर काय देणार हया प्रश्नाने पुणेरी ऊत्तर देणार नाहिस असे मानून ,एक प्रश्न ,
--बेत ( मेन्यु) काय ?
परत एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.
7 Jul 2009 - 11:18 am | सुधीर कांदळकर
प्रेमसागरांत डुंबलेलें, सुखाचें आणि समृद्धीचें जावो
सुधीर कांदळकर.
7 Jul 2009 - 12:05 pm | विशाल कुलकर्णी
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !
अवांतरः चलो, शहीदोंकी लिस्टमें एक और नाम शामील हो गया ! ;-)
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
7 Jul 2009 - 9:02 pm | अनंत छंदी
कैवल्य
आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा!
नांदा सौख्यभरे!!
7 Jul 2009 - 9:08 pm | अनंत छंदी
कैवल्य
आपणा उभयतांना हार्दिक शुभेच्छा!
नांदा सौख्यभरे!!
21 Aug 2009 - 12:55 pm | बाकरवडी
माझ्यातर्फे पण शुभेच्छा ! :)
:B :B :B बाकरवडी :B :B :B