महाभयंकर सत्य

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
1 Jul 2009 - 5:38 pm
गाभा: 

सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

1 Jul 2009 - 5:42 pm | अवलिया

बर मग?

--अवलिया

mamuvinod's picture

1 Jul 2009 - 6:18 pm | mamuvinod

नेहमीप्रमाणे नाउमेद करणारा प्रतिसाद आपला

अवलिया's picture

1 Jul 2009 - 6:27 pm | अवलिया

चालायचेच

--अवलिया

कुंदन's picture

1 Jul 2009 - 6:13 pm | कुंदन

>>हा या दोन ओळींच्या कौलाचा हेतू
कौल कुठे द्यायचा?

त्यातल तथ्य मात्र जरा वेगळ आहे अस मला वाटत..
पहिल्यापासुन पराधीन,राहिलेला "मानवाचा पुत्र" ह्यावर ही पर्याय शोधेल असे वाटते...

<<<कौल कुठे द्यायचा?>>>
माधवरा॑वाच्या माडीसाठी...

सुहास

पाषाणभेद's picture

1 Jul 2009 - 6:53 pm | पाषाणभेद

माफ करा. योग्य ती दुरस्ती वर केली आहे.

"येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!"

मिपा वरील "लेखन करा" या शिफारसीमध्ये वर लिहील्याप्रमाणे मला चर्चा करावी हा हेतू होता.

तसेच गेल्या काही दिवसांत १ /२ ओळीच्या धाग्यावर टिका होत आहे हे वाचुन "या दोन ओळींच्या उल्लेख केला गेला.

(अवांतर: पुर्वी काही त्यांच्या लेखकांना त्यांच्या काही लेखात जातीवाचक संज्ञा वापरल्याने त्रास होत असल्याने त्यांनी त्या जागी *** घातले. आताशा तर पुस्तकांत जातीवाचक काही येत नाही. (मला जात / जमात यावर टिका करायची नाही. हे एक उदाहरण समजा.) तसेच कदाचीत मिपावर १/२ ओळींच्या कौलाबाबतीत होईल असे वाटते. पण त्यामुळे आपण चांगल्या माहितीला मुकू शकू.)

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

बोका's picture

1 Jul 2009 - 8:15 pm | बोका

उपक्रम आणि मनोगतवर डिसेंबर मध्ये हा लेख मिलिंद जोशींनी लिहिला होता.

http://mr.upakram.org/node/1567

http://www.manogat.com/node/15518

विनायक प्रभू's picture

1 Jul 2009 - 8:19 pm | विनायक प्रभू

काहीही काळजी करु नका. सगळे मोप आहे. फुक्कटचा ड्रामा आहे.
आतापर्यंत पर्यायी व्यवस्था तयार पण असेल.
पण फक्त तीचा एकदम अवलंब केला तर होणारे परिणाम सुद्धा त्रासदायक आहेत.
तुम्ही राजीनामा द्यायच्या आधीच तुम्हाला बघायला मिळतील.

रामपुरी's picture

2 Jul 2009 - 12:35 am | रामपुरी

पर्यायी व्यवस्था तयार असेल पण बाजारात आणण्याचा मुहुर्त अजून निघाला नाही (ज्यायोगे त्यातून जास्तीत जास्त पैसा मिळवता येइल).

पाषाणभेद's picture

2 Jul 2009 - 1:07 pm | पाषाणभेद

राजीनामा द्यायच्या आधीच काय ते होवुन जावू द्या.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हरकाम्या's picture

2 Jul 2009 - 9:21 pm | हरकाम्या

आपण भारतीय लोकांनी काळजी वगैरे करण्याची काहिहि गरज नाही.
आपण अजुनही. तेल, काँप्युटर,वाहने, टी.वी. याशिवाय जगतो
आहोतच की.शिवाय आपल्या साधुसंतांनी सांगितले आहेच की.
"ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान "
त्यामुळे दगडफोडे भाउ तुम्ही उगाच टेन्शन वगैरे काही घेउ नका.

लिखाळ's picture

2 Jul 2009 - 9:29 pm | लिखाळ

तेल संपले तरी त्या आधीच नवा ऊर्जा स्रोत सापडलेला असेल असे वाटते. नव्या ऊर्जा स्रोताबद्दल मोठ्या प्रमाणात संशोधन चालूच आहे. एखादा अतीस्वस्त उपाय एव्हाना सापडला सुद्धा असेल पण तेलकंपन्या तो शोध अजून काही काळ दाबून ठेवत असतील अशीही शक्यता मला वाटते.

मानवाची हाव त्याच्या बुद्धीला नेहमीच तरतरित ठेवते आहे पण विवेकाला झाकोळते आहे.

कुसुमाग्रजांची एक कविता आठवली.

अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !

--लिखाळ.