स्वर्ग

सृष्टीलावण्या's picture
सृष्टीलावण्या in जे न देखे रवी...
4 Mar 2008 - 8:45 pm

कालच सकाळी मराठीच्या तासाला
पहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मला
दोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या
आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या"

मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,
'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'

संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला,
डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला,

एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,
हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,
'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'

एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढली
अन् त्या गुंडाची कानफडं रंगली..

तिने धावत येऊन माझा हात धरला,
'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'

पण क्षणातच या सुखाला झालो मी पारखा
कारण ती म्हणाली,

"कसा रे धावून आलास,पाठच्या भावासारखा..."

- कवि - अनामिक...

प्रतिक्रिया

धनंजय's picture

4 Mar 2008 - 9:45 pm | धनंजय

अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,

कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.

प्राजु's picture

4 Mar 2008 - 9:49 pm | प्राजु

कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.
-सहमत.

बाकी शेवट मात्र अगदी मजेदार..
- (सर्वव्यापी)प्राजु

वरदा's picture

4 Mar 2008 - 9:59 pm | वरदा

अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,

कल्पक आणि भावुक. विनोदी नसलेल्या भावपूर्ण कवितेतही सुंदर वाटावी.


१००% सहमत्...कविता छान विषय नेहेमीचा असुनही मस्त वाटलं वाचुन....

सुधीर कांदळकर's picture

4 Mar 2008 - 10:13 pm | सुधीर कांदळकर

एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,
हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,

या ओळी आवडल्या. प्रेमात पडल्यावर सावली पण सुंदर वाटते. हातातील गुलाबाची पाने थरथरतात आणि हृदयाचे दरवाजे धडधडतात. वाहवा. अप्रतिम कल्पना.

आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई.

आणि नंतर अनपेक्षित विनोदी वळण. विनोदी कविता एवढी सुंदर क्वचितच असते. येथे मला परसाईंच्या एका हिंदी कविता आठवली. ते प्रियेच्या सौंदर्याची अभिजात शब्दात तारीफ करतात. सात आठ ओळीनंतर म्हणतात, लेकिन तेरी यादों के मच्छर मुझे सोने नहीं देते.

असो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 7:26 am | सृष्टीलावण्या

@आपल्या नावातील लावण्य कवितेत उतरले सृलाताई.

पण ही कविता माझी नाही किंबहुना ह्या जगात कोणतीच कविता माझी नाही. कारण कविता करण्यासाठी जी प्रतिभा लागते ती माझ्याकडे नाही.

मी नेहेमी विचार करते की केशवसुमारांसारखे कविता कौशल्य माझ्याकडे असते तर मिपावर कवितांचा रतीबच घातला. (केशवसुमार हेच नाव किती छान आहे आणि विनम्रता दर्शकसुद्धा, आपल्या बरेच काही येत असूनसुद्धा जास्त काही येत नाही ही जाणीव ठेवणारे विरळा कारण भाषेचा सागर इतका मोठा आहे की त्यातून आपण फार तर २-३ थेंब घेऊ शकतो).

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 8:52 am | विसोबा खेचर

कविता छान आहे...

तात्या.

फटू's picture

5 Mar 2008 - 9:19 am | फटू

कविता कुणाचीही असो पण खूपच छान आहे... अस्मादिकास कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली.

आमच्यावेळीही प्रत्येक नवीन प्रयत्नात काहीतरी असाच फालतुपणा व्हायचा.... पण आम्ही हार न मानता पुन्हा नव्या उमेदीने दुसरं प्रकरण चालू करण्याच्या मागे लागायचो...

दिवाळीत तुझ्या घरी मी आलो पाहुणा
रूप तुझे पाहुनिया केल्या तुजला खुणा
तू ही हासूनी पाहशी झाला मनी आनंद
प्रेमाचा गे तुझिया लागे मजला छंद
मुक्तपणे बोलशी, हासशी पाहून माझ्याकडे
त्या हास्याने होई धक धक हृदयी माझ्या गडे
रुजत होते अजुनी माझ्या मनी प्रेमाचे बीज
तो एके सकाळी ओवाळूनी दिलास धक्का मज
तेव्हाचे ते शब्द तुझे उठले मजला खाया
"भाऊबीज आज असे" वदलीस "भाऊराया"
-अविनाश ओगले

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 11:41 pm | सृष्टीलावण्या

आठवतो का तो दिवस,
तो होता दसरा,
आठवतो मला तुझा चेहरा
गोड आणि हसरा,

सीमा ओलांडली आपण
आणि सोनं ही लुटलं,
आता मात्र म्हणतेस
कोण आणि कुठलं.....!

संकलक - अनुराधा धुपकर

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

कोलबेर's picture

6 Mar 2008 - 3:16 am | कोलबेर

वर दिलेली आणि ही कविता दोन्ही आवडल्या!