एकदा हॉटेलात जेवायला गेल्यावर सहज वरती नजर गेली...टेबलाच्या वर काचेवरती पेंटिग केलेले छान झुंबर होते.. अगदी वेगळं नि झक्कास दिसत होतं.. सोबतची मैत्रिण म्हणाली.. काचेचे तुकडे एकमेकांना जोडून जोड दिलेला भाग सोनेरी वा काळ्या रंगाने रंगवतात.... खूप नाजूक नि बर्यापैकी महाग प्रकरण असतं ते... नंतर विसरूनही गेले मी ते... त्यानंतर एकदा दिव्यांच्या दुकानात गेले असताना पुन्हा तसंच एक झुंबर दिसलं... आता मात्र जवळून पाहता आलं.. यावेळी ते जरा जास्तच क्लिक झालं.. घरी गेल्या गेल्या जालावर शोध घेतला.. नि अशी चित्रे शोधली... तर तिथे गंमतच होती... एकच बाऊल.. त्यावर रंगकाम केलं होतं.. त्याला वरती कड्या लावून टांगलं.. की झाला कुंडीवजा शोपीस... वरून कडी लावली... तर झालं झुंबर.. नि जर हे दोन्ही पर्याय नाही आवडले.. तर खालून एक उभा दांडा लावायचा... की झाला नाईट्लँप!!!! आपल्याला आयडिया जाम आवडली... पण खरेदी करण्यापेक्षा स्वतः बनवलं तर???? (लफडं जर नीट पार पडलं तर) स्वनिर्मितीचा आनंद वेगळाच.... म्हटलं प्रयत्न तर करून पाहू.. गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली.. नाही वाजली.. तर काय करायचं ते तेव्हाचं तेव्हा पाहू...
नुसतं ठरवून काय होतं..??? सामानाच्या जुळवाजुळवीला लागले... यापूर्वी या क्षेत्रात ढवळाढवळ केली नव्हती... त्यामुळे End product कसे होईल याबद्दल जरा साशंकच होते.. सगळ्यात आधी आणले रंग.. ते काय fevicol चं पाकीट मिळतं, तेच आणले होते.. मग काचेचा बाउल.. एक बर्यापैकी आकाराचा.. खूप लहान नाही खूप मोठा नाही.. पहिलाच प्रयत्न होता. म्हणून उगाच जास्त महागही नाही.. झालं.. जो काही कच्चा माल बाहेरून हवा होता.. ते साहित्य मिळालं होतं.. पण डिझाईन काही किल्या नक्की होईना.. खूप बाळबोध ही नको होतं.. नि जास्त क्लिष्ट हि नको होतं.. (आखूडशिगीं.. बहुदुधी.. बहुगुणी..सगळंच हवं होतं..) शेवटी यातली आपल्याला अक्कल नाही हे माहित असलेलीच गोष्ट आणखी एकदा मान्य केली नि गुगलोबाला शरण गेले.. बरिचशी चित्रे डाउनलोड केली.. त्यातलं एक नक्कीपण केलं..
आता???? सगळीकडे आधीच बोंबाबोंब केल्याने लोकांनी विचारायला पण सुरुवात केली होती.. कुठवर आलंय काम म्हणून.. होता होता एका सायंकाळी मनाचा हिय्या करून बसले..
पायरी १. बाउल नीट लख्ख पुसून घेतला.. :)
पायरी २. fevicol च्या रंगाचं पाकीट उघडलं.. :D
पायरी ३. त्यात छोट्या ट्युबामधून बरेचसे रंग होते.. नि एक काळ्या रंगाची ट्यूब हि होती.. त्या काळ्या रंगाने रूपरेखा आखून घ्यायची..
यात अडचण अशी होती.. कि हा काळा रंग पटकन सुकतो.. त्यामुळे दुरुस्त्या करण्याची भानगड नाही.. [ म्हणजे वाट लागली].. रूपरेखा आखून बाउल रात्रभर सुकायला ठवून दिला.. चुकून चांगला व्हायचा.. नि माझा हात लागून आईच्या भाषेत "धडाचा विध्वंस" व्हायचा..
पायरी ४. दिवस (खरं तर रात्र ) दुसरा.. आता त्या रूपरेखेत रंग भरायचे होते.. पाणी किंवा तत्सम काही मिसळायचं नाही त्यात.. ती ट्यूब फक्त तिरकी धरायची.. नि रंग भरत जायचे.. इथे दुसराच लोच्या होता.. एकतर रंग पातळ होता.. बाउल चा आकार असा.. की तो सारखा ओघळत होता. त्यामुळे एका ठिकाणी साचलेला गर्द रंग तर दुसर्या ठिकाणी अति पातळ रंग.. नि त्यात भर म्हणजे.. रंग सारखा बुडबुडे धरत होता.. ते फोडणे हे आणखी काम होऊन बसले होते.. त्यात रंगाच्या पाकिटात रंग विविध रंगसंगतीचे नव्हते.. त्यामुळे रंगांची जास्त निवड करायलाही वाव नव्ह्ता.. त्यामुळे जे हातात होतं.. त्यातच जो काही घालायचा.. तो गोंधळ घालायचा होता..
त्या दिवशीच्या अखेरची स्थिती अशी होती..
मग तुकड्या तुकड्यांनी हळूहळू एका बाजूचा रंग सुकेल तसा फिरवून फिरवून.... कुठे चुकून हात लागू नये याची काळजी घेऊन.. साधारण दोन रात्रीत रंगकाम पूर्ण झालं..
पायरी ५. मस्तपैकी निरनिराळ्या कोनातून बाउलचे फोटो काढले.. सगळ्याना दाखवले.. ज्यांनी मनातला भाव लक्षात घेउन तारीफ केली ते बिचारे सुटले.. ज्याना हे नाही कळाले.. त्याना पकडून पकडून त्यांना कित्ती छान.. कित्ती सुरेख असे जबरदस्तीने म्हणायला लावले.. :D
पण ती माझी दुष्ट मैत्रीण.. जिच्यासोबत मला ही आयडीया सुचली होती.. तिने मात्र कौतुक दूरच.. पणतळाचं वर्तुळ नीट आलं नाही म्हणून नाक मुरडलं.... (मेलं कौतुकच नाही ते कशाचं) :(
तसंही बनवायला गेले मारूती नि झाला गणपती त्यातला प्रकार झालाय.. पुरावा दिला आहेच त्याचा.. पण अस्मादिक सध्यातरी स्वतःवर बेहद्द खूष आहेत.. अशीच कधीतरी सणक येईल नि या बाऊलचं रूपांतर कुंडी.. झुंबर किंवा आणि कशात होईल!!! त्या दिवसाची आता मी वाट पाहातेय!!!!! :D
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 9:30 pm | अनामिक
...पण अस्मादिक सध्यातरी स्वतःवर बेहद्द खूष आहेत...
असायलाच हवे. तुमच्या प्रयत्नांचं नक्कीच कौतूक आहे. बाऊलही छान दिसतोय.
खालच्या तळावर का नाही डिझाईन केलं पण?
-अनामिक
1 Jun 2009 - 9:37 pm | मस्त कलंदर
सध्यातरी तो तिपाईवरती विराजमान झालाय.. त्यात सुगंधी कचरा(potpourri) भरून ठेवलाय.. हेही छान दिसतंय...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jun 2009 - 9:40 pm | धनंजय
मनात काही विचार खूप लोकांच्या येतो, पण तुमच्यासारखे कार्य करणारे थोडेच असतात.
पेंटिंग करून टिफनी-स्टाईल सारखा दिसणारा बाऊल छान दिसतो आहे.
2 Jun 2009 - 4:28 am | चतुरंग
सुरेखच झालाय बाऊल!
असे किती विचार माझ्या वाटेला गेलेत पण मी त्यांच्या वाटेला चुकूनही गेलो नाहीये! ;) त्यामुळे प्रत्यक्ष कृती ही अभिनंदनीयच!
त्या दिवशीच्या अखेरची स्थिती अशी होती..
हे वाक्य म्हणजे पाच दिवसाच्या कसोटी सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसानंतर अशी स्थिती होती...सारखं झालंय! तुम्ही कसोटी जिंकलेली आहे! :)
चतुरंग
2 Jun 2009 - 7:25 am | Nile
+१.
मस्त जमलंय. (आम्ही ही ना-कर्तेच ;) )
सुगंधी कचरा आवडला, आम्हाला पण बिकांच्या मागे रांगेत लावा. :)
1 Jun 2009 - 9:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच... सुंदर, आवडला बाऊल!
एखाद्या ताटलीवर प्रयोग करून पहावा का असा विचार येत आहे आता ही मस्त चित्रं पाहून!
1 Jun 2009 - 10:12 pm | मस्त कलंदर
खूप सोप्पं आहे.. करून पहा.. जर माझ्यासारख्या दगडाला जमलं तर जगात कुणालाही जमेल.. नि एकदा बनलं.. कि निदान आपलं आपल्याला तर छानच दिसतं.. बाकी काही हक्काची मंडळी असतातच.. त्यांच्याकडून कसं चांगले झालंय ते पुन्हा पुन्हा वदवून घ्यायचं.. मग मूठभर मांस चढतं.. नि आधी आपल्याला वाटलं त्यापेक्षा कित्ती छान हा साक्षात्कार पुन्हा नव्याने होतो.. हैच काय तेच्यात????
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
1 Jun 2009 - 10:56 pm | बिपिन कार्यकर्ते
वा!!! खूपच छान आहे हो रंगकाम.
अदितीला आणि कलंदरतैंना विनंति: खूप कठीण आहे हा प्रकार. तर अदितीने एक प्लेट आणि कलंदरतैंनी एखादी बाऊल छानपैकी रंगवून मला गिफ्टावी.
बिपिन कार्यकर्ते
5 Jun 2009 - 4:27 pm | रम्या
जर माझ्यासारख्या दगडाला जमलं तर जगात कुणालाही जमेल
हे वाक्य मी असं वाचलं..
जर माझ्यासारख्या दगडाला जमलं तर जगात दुसर्या कुठल्याही दगडाला जमेल
:D
आम्ही येथे पडीक असतो!
1 Jun 2009 - 9:49 pm | यशोधरा
मस्त झालय रंगकाम! सह्हीच :)
1 Jun 2009 - 10:25 pm | प्राजु
झकास दिसतो आहे बाऊल..
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 Jun 2009 - 10:44 pm | रेवती
मलाही आवडलं रंगकाम!
असं काही रंगकाम, भरतकाम करायला मला आवडतं पण फार वेळ पेशन्स टिकत नाही!
आपण दोन तीन दिवसात म्हणजे चांगलच काम केलय.
माझा मुलगा बाळ होता तेंव्हा हौसेनं त्याच्या इटुकल्या पायांसाठी लोकरीचे दोन मोजे विणले होते.
कारण विणकामाचा तो टाका फारच सोपा व दोन तासात तान्ह्या मुलांचे मोजे होतात.
बास्स! त्यानंतर मी काही कलेच्या वाटेला गेले नाही.
एक प्रश्न पडलाय.
पुढे जाऊन बाऊलचं रूपांतर करायचं म्हणजे त्याला वायरसाठी भोकं पाडायला लागणार.
ते कसं करायच?
रेवती
1 Jun 2009 - 11:15 pm | मस्त कलंदर
मला असं वाटतं.. की ते फरशी बसवणारे लोक जसं ती फुटू नये म्हणून पाण्याची धार सोडून फरशी कापतात ना.. तसं काहीतरी करावं लागेल.. अथवा... फ्रेम बनवणारे लोक्/हार्डवेअर वाले हिरकणी वापरून काच कापतात तसे काहीतरी करावं लागेल.. दुसरा पर्याय जास्त सोपा नि चांगला आहे..
बाकी एवढा सगळा द्रविडीप्राणायम (हा शब्द कुठून आला असेल बरे??) करायचा नसेल तर:
१. पसरट्/तसराळेवजा काचेचे भांडे असेल तर त्यात पोहणार्या मेण्बत्त्या/फुलं ठेवता येतील..
२. फळांची परडी म्हणून पण छान वाटेल
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
21 May 2015 - 3:45 pm | gogglya
च्या दुकानात काचेला ५ /८ मिलीमीटर चे सुबक छीद्र करुन मिळते. नुकतीच घराची पाटी काचेची करुन घेतली तेन्व्हा करुन मिळाली.
1 Jun 2009 - 10:56 pm | भाग्यश्री
वॉव अमेझिंग! हे नक्की करणार मी..
www.bhagyashree.co.cc
1 Jun 2009 - 11:30 pm | टिउ
भारी जमलाय प्रयत्न...
2 Jun 2009 - 12:50 am | अनिता
सु॑दर आहे ग्लास पे॑टी॑ग.....
मी पण केला होता एकदा प्रयत्न...काचा॑चा खच पडला होता घरात...
2 Jun 2009 - 2:13 am | पिवळा डांबिस
बाऊलवरचं रंगकाम आवडलं!
पोर्प्यूरीला "सुगंधी कचरा" हा शब्दप्रयोगही आवडला!!!:)
2 Jun 2009 - 7:19 am | सहज
हेच म्हणतो.
पुढील रिकामपणाचा उद्योग काय बरे असेल? :-)
2 Jun 2009 - 10:32 am | पिवळा डांबिस
आय बेग युवर पार्डन.....
पण मला तो रंगवलेला बाऊल खरोखरच आवडलाय...
मला तो रिकामपणचा उद्योग वाटला नाही...
2 Jun 2009 - 10:35 am | सहज
मान्य आहे. मलाही खरोखर आवडलाय. :-)
रिकामपणचा उद्योग हे शिर्षकातील शब्द घेतलेत, कौतुक आहेच. पुढचा भाग काय असेल याची उत्सुकता.
कृपया गैरसमज नको.
2 Jun 2009 - 11:14 am | पिवळा डांबिस
मला वाटलं माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद दिलात त्यामुळे मी हे रिकामपणचे उद्योग समजतोय असं तुम्हाला वाटलं की काय!
आणि मला खरंच तो बाऊल आवडला होता...
ओके!
नो गैरसमज!
:)
2 Jun 2009 - 12:52 pm | मस्त कलंदर
यापुढचा रिकामपणाचा उद्योग याहून छान आहे.. थोडे फोटो काढणं बाकी आहे...
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
2 Jun 2009 - 4:15 am | चित्रा
बाऊल सुंदर आहे. रंगही छान.
प्रयोग आवडला.
2 Jun 2009 - 4:19 am | विंजिनेर
हे म्हणजे गोट्याच्या वसंत व्याख्यानमालेतल्या चिन्यासारखं "बघलं.. केलं ... आलं" झालं!
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
3 Jun 2009 - 12:09 am | टिउ
चिनी की जपानी?
दोन्ही सारखेच म्हणा!
2 Jun 2009 - 10:35 am | शार्दुल
आवडल रंगकाम मस्तच!!!!!!!!!!
नेहा
2 Jun 2009 - 11:12 am | नंदन
छान जमलंय बाऊल. टप्प्याटप्प्याने ते कसं बनत गेलं हे वाचायलाही छान वाटलं. पूर्वी मायबोली दिवाळी अंकात वाचलेला हा लेख आठवला.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Jun 2009 - 11:17 am | जागु
मस्तच पेंटीग.
2 Jun 2009 - 11:27 am | विसोबा खेचर
सुरेख..!
तात्या.
2 Jun 2009 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार
कित्ती छान कित्ती सुरेख !
असेच म्हणायचे ना ? ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
2 Jun 2009 - 1:12 pm | मस्त कलंदर
हुशार दिसतोस... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
2 Jun 2009 - 12:47 pm | स्वाती दिनेश
रंगकाम आणि त्यावरचा लेख दोन्ही आवडले.
स्वाती
2 Jun 2009 - 12:56 pm | दिपक
सुंदर दिसत आहे. उत्तम कलाकुसर :)
2 Jun 2009 - 11:22 pm | क्रान्ति
मस्त दिसतेय कलाकुसर. रंगसंगतीही खूप खास. लेख या सगळ्यावर कळस!
=D> =D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
3 Jun 2009 - 1:56 am | संदीप चित्रे
कागद रंगवायचा म्हटलं तरी प्रिझमसारखे पांढर्या रंगातून शेवटी सातही रंग बाहेर पडतात... आणि तुम्ही तर चक्क काचेचा बाऊल रंगवलंय... !
छान दिसतंय रंगकाम .
3 Jun 2009 - 9:17 pm | लिखाळ
सुंदर कलाकुसर आणि छान लेख :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
4 Jun 2009 - 1:25 am | राघव
सुंदर कलाकुसर आणि छान लेख
असेच म्हणतो.
तुमच्या पेशन्सला मनापासून दाद! पु.रि.उ.म.शु.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
23 Sep 2009 - 7:50 pm | विमुक्त
रंगकाम मस्त झालय ... करत रहा...
20 May 2015 - 4:02 am | एस
मस्त.
ग्लासपेंटिंग फक्त एकदाच एका नातेवाईकांच्या फॉल्स सीलिंगसाठी करून दिलं होतं. ह्या रंगांमध्ये जास्त शेडिंगला वाव जरी नसला तरी ओघळण्याच्या गुणधर्माचा वापर करून आणि थरावर थर ही पद्धत वापरून बरेच चांगले शेड ट्रांझिशन दाखवता येते.
20 May 2015 - 8:34 am | मस्त कलंदर
फोटो असतील तर दे ना. इंटरेस्टिंग प्रकरण वाटतंय.
20 May 2015 - 11:36 am | एस
दुर्दैवाने नाहीयेत. बरीच वर्षे झालीत. त्यांच्याकडे कधी गेलो तर तुमच्यासाठी ग्लास सीलिंगचा फोटो काढून आणेन.
20 May 2015 - 9:32 am | अत्रुप्त आत्मा
ये भी क्लाशिक है|
20 May 2015 - 11:31 am | बबन ताम्बे
सलाम तुमच्या चिकाटीला !
20 May 2015 - 12:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच ओ तै!! आमच्या बायकोला या सगळ्या प्रकारांची फार आवड आहे. मुलीला शिकवण्याच्या नावाखाली असं काहीतरी चालू असत तिच. सध्या पेपर क्विलींग नावाचा प्रकार करतेय. जमल्यास चित्र डकविन.
20 May 2015 - 2:41 pm | सूड
हे अस्मादिकांनी केलेलं ग्लास पेंटिंगः
20 May 2015 - 7:36 pm | टवाळ कार्टा
भारी
20 May 2015 - 3:36 pm | चौकटराजा
गणपतीचे चित्र मस्त जमलेय. हा धागा वर आणणार्याचा मी आभारी आहे. जुलै च्या दरम्यान मी माझ्या नव्या घरात रहायला जात आहे तिथे प्रवेशताच एक सहा भागाचे प्यानल करून त्यात सहा ऋतू अशी थीम घेउन असे ग्लास पेटिंग करण्याचा मानस आहे. सुड्राव अशी काच कुठून विकत घेतली राव ? पुण्यात कोठे ?
20 May 2015 - 3:43 pm | सूड
दोन्ही चित्रं बदलापूरात असताना केलीयेत, तिथे ग्लास फ्रेम्स करणारा घरापाशीच होता. त्याच्याकडनं काच घेतली आणि फ्रेम पण त्यानेच करुन दिलंय. पुण्यात मला करायचं आहे, पण काच कुठे मिळेल या माहितीअभावी सगळं अडलंय.
20 May 2015 - 7:05 pm | अजया
काचेच्या दुकानात काच मिळते किंवा स्लाईडिंग विन्डोचं काम करणार्या दुकानात चौकशी करा.सूडने केलंय त्यात फ्रेमिंग करताना फाॅईल घालतात.तिचा आधी अंदाज घेऊन पण ग्लास पेंटिंग करता येतं.म्हणजे दागिने किंवा गणपतीच्या हातातला मोदक इ न रंगवता रिकामे सोडुन चमकत्या पांढर्या रंगात दाखवता येतं.
20 May 2015 - 8:40 pm | सूड
ते खरं हो, पण इथे अमक्या गोष्टीसाठी नाना पेठेत जा, तमक्या गोष्टीसाठी अप्पा बळवंत चौकात जा, ढमक्या गोष्टीसाठी एफ्सी रोडला जा अशा सतराशे साठ भानगडी असतात. तिकडे म्हणजे कोपर्यावरनं भाजी विकत आणावी तशी काच विकत घेऊन आलो होतो.
आता एक शन्वार खर्ची घालावाच लागेल.
21 May 2015 - 4:06 pm | टवाळ कार्टा
पुण्यात अजून नीट रुळला नाहीस वाट्टे...पुण्यात राहून पुण्यालाच नावे ठेवतोस? का वर लिहिलेली ठिकाणे खरा पुणेकर पुण्यात पकडतच नै?
21 May 2015 - 4:32 pm | सूड
भारी प्रश्न रे तुला टक्या!! आता येशील ना कट्ट्याला तेव्हा तुलाच नेतो काच आणायला थांब.