"स्वयेश्री प्रोफेसर पाहती" स्वरचित विडंबन गीत

प्रा सुरेश खेडकर's picture
प्रा सुरेश खेडकर in जे न देखे रवी...
28 Feb 2008 - 1:14 am

परीक्षा सुरू होत आहेत,त्यासाठी संबंधितांना शुभेच्छा.कविवर्य गदिमांची क्षमा मागून एक स्वरचित विडंबन गीत सादर करित आहे.(टीप:ह्यातील कॉलेज माझे व युनिव्हरसिटी माझी नसून तुमची ही नाही.)स्वयेश्री प्रोफेसर पाहती,परीक्षेत मुले कॉपी करिती.सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचेसमीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचेअनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.कांही भित्रे त्या वर्गातील,कैसे वाटती आज सुशील प्रश्न तयांचे कैसे सुटतील,ग्लास पाण्याचे ते ढोसती.विचार विनिमय नीट करोनि,बहूमताने सर्व ठरवूनिचाकू दिसता कुणा खिशातुनि,उत्तरे प्रोफेसर सांगती.मुलीहि कांही मागे नसती,नोटस ओढणीआड आणतीसम हक्काची तालिम करिती,धन्य हो आमुची युनिव्हरसिटी.(१९८३ साली प्रकाशित माझ्या " एप्रिल फुले" ह्या माझ्या विडंबन काव्य संग्रहात तसेच त्याच शिर्षकाच्या स्वतंत्र कार्यक्रमात समाविष्ट असलेले गीत )प्रा.सुरेश खेडकर (M.Tech. DBM. LL.B.),नागपूर.

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Feb 2008 - 1:23 am | llपुण्याचे पेशवेll

छान वाटले विडंबन.
पुण्याचे पेशवे

सुनील's picture

28 Feb 2008 - 1:24 am | सुनील

उत्तम कल्पना पण कुठे कुठे वृत्तात मार खाते असे वाटते.
 
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा सुरेश खेडकर's picture

28 Feb 2008 - 1:30 am | प्रा सुरेश खेडकर

धन्यवाद.

चतुरंग's picture

28 Feb 2008 - 1:33 am | चतुरंग

मि.पा.वर आपले नाव पहिल्यांदाच बघत आहे. आपले स्वागत.
कल्पना छान आहे. वृत्त आणि मात्रांचा तोल आणखी सफाईदार साधता आला तर विडंबन फारच मनोरंजक होऊ शकते.
(मोकळ्या-ढाकळ्या प्रतिसादाबद्दल राग नसावा:)
चतुरंग

धनंजय's picture

28 Feb 2008 - 2:11 am | धनंजय

वृत्त आणि मात्रांचा तोल आणखी सफाईदार साधता आला तर विडंबन फारच मनोरंजक होऊ शकते.असेच(मोकळ्या-ढाकळ्या प्रतिसादाबद्दल राग नसावा:)असेच

प्राजु's picture

28 Feb 2008 - 9:11 am | प्राजु

प्रथम आपले मिपा वर मनापासून स्वागत.
विडंबन आवडले ..चतुरंग यांच्याशी सहमत आहे. आता विडंबन कारांमध्ये स्पर्धा वाढली असे म्हणावे लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2008 - 3:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर,विडंबनातला आशय  पोहचला. आमच्याकडे मार्च पासून परिक्षा आहे, कॉप्या करणार्‍या विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही  इथे टाकू :)कॉप्या करु देणार्‍या प्राध्यापकांचे काय करायचे !!!
अवांतर :- सर,आपणास भेटून आनंद झाला. कोणता विषय शिकवता  ? आणि कोणत्या वर्गाला ?

सुधीर कांदळकर's picture

28 Feb 2008 - 10:59 pm | सुधीर कांदळकर

आठवण करून दिलीत. धन्यवाद.
सुस्वागतम आणि पुढील कविते/लेखनासाठी शुभेच्छा.

प्रा सुरेश खेडकर's picture

28 Feb 2008 - 11:49 pm | प्रा सुरेश खेडकर

धन्यवाद सर्वाना.
बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.

स्वयेश्री प्रोफेश्वर पाहती,परीक्षेत कॉपी मुले करिती.सुमार सगळे ते डोक्याचे,परंतू पुतळे धैर्यधराचेसमीप गठ्ठे गाईड वह्यांचे,आज ते पहिल्यांदा वाचती.सावध मुद्रा लक्ष बकांचे,अर्थ लाविती ते प्रश्नांचेअनर्थ करूनि ते अर्थाचे,पुस्तके भरभर धुंडाळती.कांही भित्रे त्या वर्गातील,सुशीलचि कैसे आज वाटतीलप्रश्न तयांचे कैसे सुटतील , सुरया पाण्याच्या ढोसती.विचार विनिमय नीट करोनि,बहूमताने सर्व ठरवूनिचाकू दिसता कुणा खिशातुनि,उत्तरे प्रोफेसर सांगती.मुलीहि कांही मागे नसती,चिठीचपाटी पदरी नेतीसम हक्काची तालिम करिती,धन्य हो आमुची युनिव्हरसिटी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Feb 2008 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरूटे सर , मी नागपूर च्या एका खाजगी इजिनियरिग कॉलेजात स. प्राध्यापक आहे.( मी इलेक्ट्रीकल चे अनेक विषय शिकवितो.) याआधी मी दोन पॉलिटेक्निक मध्ये प्राचार्य पदि काम केले आहे.
क्या बात है  !!! 
 

विसोबा खेचर's picture

29 Feb 2008 - 7:34 am | विसोबा खेचर

खेडकरशेठ, छान प्रयत्न आहे. अजूनही लिवा..
तात्या.