उगाच रात्रीचा …दिवस ..वगैरे, करून…

निखिलचं शाईपेन's picture
निखिलचं शाईपेन in जनातलं, मनातलं
24 May 2009 - 11:17 pm

खच्च बावळटपणा खरं तर. म्हणजे वाईट झोप आलीये पण उग्गीच स्क्रीन समोर, रोजचंच झालंय च्यायला. मध्ये तरूण ला विचारले की २० एम एल ब्रॅंडी चढेल का ? तर म्हणाला की “चढेल, if you act!” म्हणुन आज १००+ एम. एल. घेतोय बाकी घसा दुखत होता म्हणून सुरु केलेली, ग्लासात पाण्यापेक्षा ब्रॅंडी जास्त अस्सेपर्यंत पोचलोय. मला खरच चढत नसावी, किंवा ऍज दे से … आय ऍम अ टॅंक… टॅंक.
लिहायला बसलोय खरं पण काही डोक्यात नाहीये, लेखाचे नाव काय द्यावे त्यापासून ..काय लिहू ..कशाबद्दल कोणाबद्दल लिहू.. चिडचिड…नुसती.. पण….. खाज, काहीतरी खरडून(च) झोपणार आहे…ह्म्म्म्म्म्म…..कामाबद्द्ल लिहावे तर खूप दिवसांत कॉंक्रीट अस्से काही केले नाहीये. नुसता बसून येतो ऑफिस मधून. म्हंजे काम अगदीच नाहीसं नाही, देवाने डोकं अस्सं भन्नाट दिलंय की, लवकरं आटपतो. लोकांना उगीच ..”कित्ती डिप ऍप्रोच देतोय..” कसलं काय..हाईप ..कधी मधी आवडते आपल्याला पण म्हणा ..लोकांबद्दल लिहावे तर, नको, संदर्भ द्यावे लागतील..नाही दिले तर ..काही जणांना वाचून लागतील...नकोच ते.
आई घरात नसताना कसं कुठे चुरमूरे ..खा कुठे टोमॅटो मीठ लावून खा कि अगदीच ..कच्चे दाणे चावत बस..तस्सं चाल्लंय आज माझं हावरटपणा खरं तरं मला झोपावसं वाटत नाही इतकं सोडून लिहायला काहीही कारण नाहीये .. शिवाय नेट आहे, दारू आहे आणि विनॅंप कानात गाणी ओततोय..
मेथॉडिकल वे ट्राय करूयात ..म्हणजे ते कसं दोघं भेटले की, आज हवामान भारी आहे..झाडं कित्ती हिरवी, तस्सं काही आईस ब्रेकींग जमतयं का सुरूवात करायला…

आज पाऊस पडला ..
नाही आईस ब्रेकींग नाही खरंच ! खरंच आज पाऊस पडला..
मला पाऊस आवडतो..
आपल्या बुटात पाणी भरले तरी .. छत्री नसलेल्या पोरींची पळापळ बघायला भारी वाटते..
मला पोरीही फार आवडतात…
अब्बे …
निबंध व्हायचा ना..अशाने ..

..मेथॉडीकल म्हणे
दारू पिऊन
कस्सं होणारं … भें..डी

हे नको..
बरं …मग?
वैताग ..

पिच्च्र्र बघुयात का ?
नको ..
फोन? कोनाला ? झोपली असेल ..शिवाय..आता काय..उरलयं.

च्यायला ..
काहीच कसं लिहित नाहिये मी..
कॉपिरायटर असतो तर वाईट लागली असती.

रेटुयात पावसावरंच,

पण खरंच पाऊस लयं वेड पडला..
इतका की मशीन वाली कॉफीपण ग्रॅंड वाटली.
पावसावर किती जणांनी काय काय लिहिलयं,
त्यामुळे आपण नको हात घालायला..
आय पॉड मध्ये “सरीवर सर” असायला हवे होते, बस मध्ये बसल्या बसल्या वाटून गेले.
आता टाकतो ..पुढच्या पावसांसाठी.
बाकी.
सिमेंटच्या रस्त्यांचे .. एक मला आवडत नाही, पाऊस पडल्यावर ते नवे होत नाहीत.
मला लोकांचेही एक कळत नाही पॅंट ओली असेल पावसाळ्यात तर तेव्हडा “बेनिफिट ऑफ डाऊट” का देत नाहित? फुकट हसणे.
पण बस आणी पाऊस हे कॉंबीनेशन जबरा.
तिसरीत ..कि चौथीत ..धो धो पावसात कुठ्ल्याश्या शनिवारी मी चुकिच्याच बसने कुठे तरी भरकटून फिरून शेवटी घरी पोचलो तर.. आईची पुजा झाली होती, डोकं पुसून मग आईने ..रव्याचा लाडू दिला होता. भन्नाट.
खेरीज पावसात मी गांडुळं पाळायचो.
बास पावसावर .. लिहिणार नव्हतो ना ? बास ..
सरीवर सर टाकलंय.. आय पॉड वर .. आता पाऊस पुराण बास.

घरी यायला दिड तास लागला.
काय ते मर्फिज लॉ ते ..आहेत ना त्यात आपली एक ऍडिशन..
आपल्याला लागली अस्सेल, कि ट्रॅफिक जाम होतो.
किंवा याचीच एक करोलरी ..म्हणा ..
ऑफिस मधून करून निघाला नसाल कि हमखास रस्त्याच्या कडेला “शंका”निरसन करणारं पब्लिक तुम्हाला पाठमोरं वाकूल्या दाखवतं

बस मधलं सकाळी सुवासिक असलेलं पब्लिक, ब-यापैकी आंबलेलं असतं. मग कोणी झोपतात. कुणाच्या लग्नापूर्वीच्या गप्पा फोनवर.मी आपला गाणी ऐकत त्या सगळ्या गोतावळ्याला ओबसर्व करत बसतो. भन्नाट आहे पब्लिक, एकेकाच्या त-हा. आजकाल रिसेशन वर गप्पा मारनारे त्यात अधिक, बरीच माहिती मिळते. मात्र अशा गप्पा मारल्यामूळेच ..जगात काही काम न होता रिसेशन आले असेल असा आपला माझा एक अंदाज.
परवा गंमत झाली, वर ठेवलेली बॅग एकाच्या डोक्यात पडली,
तर काय रीऍक्षन अस्सेल?
सगळ्यांनी आपापल्या डोक्यावर बघून घेतले.

बरं ठिकायं, तरं यायला दिड तास लागला.
कोण गर्दी..
आता पूर्वीचे पुणे यावर लिहायला ऍंगल निर्माण झाला,

वा
मेथॉडीकल वर्क्स!

पण नको.
एव्हडंच..की
गाड्या वाढल्या की रस्ते हि वाढवतात.
रस्ते वाढले म्हणून मग गाड्या आणिक वाढतात..
अपेक्षांचं..आपल्या पळण्याचं हि असंच आहे का ?
दमणूक थांबवायला हवी

पाऊस, ट्रॅफिक, बस आणि काय?

आरे हो सकाळी बस साठी पळताना,

"हॅलो"
"हा, आओ ..सर्पंच हायंत का?"
"काय ?"
"सरपंचांना द्या ना राव"
"रॉंग नंबर.."
"आरं तिच्यायला ..."

माझी ऑफिसची बस चुकण्याची अनेक कारणे आहेत ..
हायवेवर दुरवर बस दिसली की स्टॉपकडे वेड्यासारखं पळताना आलेले अस्से फूक्कट फोन, इमर्जंसी मधला ऑपरेटर असल्यासारखा ते उचलणारा मी, कधी कॉलनीच्या कूत्र्याला हात लावताना झालेला टाईमपास, गेट मध्ये ठाण मांडून बसलेली गाय या सगळ्यातून ….अगदी फोटो फिनिश मध्ये का होईना मी ब-याचदा बस पकडतो. ड्रायव्हर आणि ओळखिच्या पब्लिकच्या डोळ्यात माझ्याविषयी चे कौतूक लपत नाही. यातले बरेचसे मी बस पकडेन की नाही यावर बेट लावत असावेत अशी मला दाट शंका आहे.

आरे आज काय माणसांविषयी लिहिणारचं नाही का?
बस काय, पाऊस काय …

बरं चला माणसांविषयी थोडं,
नको.. म्हणजे ..राग नाही पण,शिवाय फार छान लोक आहेत .. आजुबाजुला…
शिवाय कुणी काय ..अस्सं सबस्टॅंशियल छळलंही नाहिये ..
खेरीज सगळ्यांविषयी ..कुठं आपण लिहितो..किंवा विचार तरी..
Usually, एका वेळेस, किंवा, at any given point in time, आपण एकाचाच ..विचार करू शकतो, करतो.
बघा आठवून..
एनी वेज…
परत मेथॉडीकल,
जाउदेत …नकोच.

नाव राहलयं द्यायचं,
दिलं.

पण झोपता झोपता… आणिक थोडं …
माणसांविषयी…
नोप्स..
एका माणसाविषयी ..
एका वेळेस ..एकच,

TO YOU.

तू
हसरे मोठे डोळे ..
लगबग ..
केस बांधणे..
पर्सची कोंबाकॊंब..
मी …
समोर..उभा..
आजूबाजूला काय?
आठवत नाही ….

मी…
सांगणार आहे तूला काही
तू....
डोळ्यात पाणी ..
तूला हसवायला मग..
जोक्स..
गोष्टी
जिवाचा आटापिटा…
शेवटी….
हसलीस ..
हुश्श ..
छान..
गोड
चाबूक ..दिसतेस …
मी…
ही
खुश..
काय सांगणार होतो..
आठवतेय.
पण.
बघू..
नंतर कधी

मग,
नंतर कधीतरी ..
की
शेवटी?
तू….
ऑकवर्ड..
अनोळखी...बघणे..
ठरवून..
मी…
काय सांगणार होतो..तेव्हा.
आठवतेय?
हो.
पण
आता
हाऊ डज़ इट मॅटर?
बाय.

-निखिल.

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

24 May 2009 - 11:30 pm | मदनबाण

वा
मेथॉडीकल वर्क्स!

व्वा...मनातील भावनांचे उत्तम लेखन... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

निखिलचं शाईपेन's picture

1 Jun 2009 - 11:05 pm | निखिलचं शाईपेन

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

-निखिल

टारझन's picture

25 May 2009 - 12:24 am | टारझन

के व ळ अ प्र ति म !! फ्लॉलेस ... आणि माय प्रतिक्रिया इज णॉट मेथॉडिकल वर्क्स बरं का रे ;)

लिव्हत जा लेका आधनं मधनं ... मजा येते ... उगाच १००-२०० वर्षांणंतर ह्या जगाचं काय होणार ? असल्या महान गोष्टींवर विचार करण्यापेक्षा असं विसावत जाणारं वाचलं की २ घटका सुखात जातात

- टार्‍याची बॅकपेन

अवलिया's picture

25 May 2009 - 6:21 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

विनायक प्रभू's picture

25 May 2009 - 9:14 am | विनायक प्रभू

जमलेय

अभिरत भिरभि-या's picture

25 May 2009 - 9:23 am | अभिरत भिरभि-या

सक्काळी सकाळी च्याचा कप हातात धरून काहीतरी भन्नाट वाचले ..
मजा आली राव .. आणि पब्लिक म्हणत तस जरा तुमच (जादूई) शाईपेन वापरा की सारख सारख
अभिरत

भाग्यश्री's picture

26 May 2009 - 11:09 am | भाग्यश्री

सहमत..
जबर्‍या लिहीलंय.. आजकाल दुर्मिळच असं काही लेखन सापडणं!!

www.bhagyashree.co.cc

लवंगी's picture

25 May 2009 - 9:26 am | लवंगी

मला ताप येणार असला कि असच डोक भिरभिरत.. जरा क्रोसीन घ्या, बर वाटेल.. ;)

सहज's picture

25 May 2009 - 9:42 am | सहज

अजुन येउ दे!

सँडी's picture

25 May 2009 - 8:34 pm | सँडी

हेच म्हणतो!

मराठमोळा's picture

25 May 2009 - 9:46 am | मराठमोळा

खुप सुंदर...
मनाची चलबिचल आणी सतत चालणारे विचार खुप सुंदर पद्धतीने उतरवलेत..
आवडले.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

वेताळ's picture

25 May 2009 - 9:49 am | वेताळ

सरीवर सरी खरच आइपॉड मध्ये टाकायला पाहिजे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

ऍडीजोशी's picture

25 May 2009 - 12:39 pm | ऍडीजोशी (not verified)

काहीच कसं लिहित नाहिये मी..
कॉपिरायटर असतो तर वाईट लागली असती.

खरंय भावा. सालं इथे लिहायला बसलं की पटापट उतरतं ऑफीसचं काम आलं की पटापट उतरते :SS

धमाल मुलगा's picture

25 May 2009 - 2:59 pm | धमाल मुलगा

कसलं भारी लिहिलंयस...एकदम कै च्या कै झालंय राव. :)
अस्सेच चुकार विचार डोक्यात धिंगाणा घालत असतात लेकाचे. एकाचा दुसर्‍याला पायपोस नाही.
सही उतरवलंय लेका.
हे जादुचं शाईपेन वापरत जा की जरा रेग्युलरली :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

ऋषिकेश's picture

25 May 2009 - 3:36 pm | ऋषिकेश

एकदम झक्कास!
भावनांचा झक्कास आलेख

पाण्यात जास्वंदीचा परागकण कसा कुठेहि भटकतो याचं एक (वि)चित्र काढायचं आणि त्यातून काहितरी वेगळंच प्रमेय/थियरी सिद्ध व्हायची (असा काहितरी प्रयोग होता) त्याची अचानक आठवण झाली

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

स्वानन्द's picture

25 May 2009 - 8:05 pm | स्वानन्द

काही झेपलं नाही. समजण्यासाठी दारू पिणं बंधनकारक तर नाही ना?

अनामिक's picture

25 May 2009 - 11:41 pm | अनामिक

भन्नाट जमलंय सगळ... असेच लिहीत रहा.

-अनामिक

माया's picture

26 May 2009 - 11:11 am | माया

सुंदर लिहिले आहे.

प्राजु's picture

1 Jun 2009 - 11:30 pm | प्राजु

हम्म! मेथॉडीकल...:)
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुहास..'s picture

10 Feb 2014 - 7:57 am | सुहास..

!!!!!!!!!!!!!!

जेपी's picture

12 Feb 2015 - 8:45 pm | जेपी

बंदा कम लिखता है ,
पर अच्छा लिखता है