गाभा:
पुणे पुस्तक महोत्सव - २०२५
फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राऊंडवर १३ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत पुस्तक महोत्सव आहे. यंदाचं तिसरं वर्ष. चांगलं आहे.
वेड लावतील एवढी पुस्तकं ! ... अनेक स्टॉल्स . गर्दी .
ज्यांना शक्य आहे त्यांनी पहावं . इथे त्याबद्दल लिहावं . पुस्तकांबद्दल लिहावं .
जायला नको वाटतं पण एकदा गेलो की ...
प्रतिक्रिया
14 Dec 2025 - 2:49 pm | चौथा कोनाडा
मागच्या वर्षी गेलेलो .... खुपच मजा आलेली. सकाळच्या सत्रांत बालांसाठी "गोष्टी सांगणे" ला प्रेक्षकांत बसुन घेतले. सॉलिड झाला कार्यक्रम ... मस्त मजा आलेली. तीन चार आवडीची पुस्तके घेतली.
पुणे पुस्तक महोत्सव टाळणं माझ्या साठी अवघड आहे .....
या वर्षी जाणार आहेच, पुस्तकं अनुभवणं आणि बुधवारी १७ डिसें सायं ६ वाजता "राष्ट्र आराधन" हा शाहीर योगेश यांच्या राष्ट्र समर्पित गाण्यांच्या कार्यक्रमास.
या अल्बम मधील काही गीते सादर होतील.
14 Dec 2025 - 4:44 pm | रामचंद्र
पुणे बुक फेअरला मिपा कट्टा होणार आहे का?
15 Dec 2025 - 2:57 pm | प्रचेतस
काल संध्याकाळी जाऊन आलो. वेळेअभावी सर्व स्टॉल्स बघता आले नाहीत, गर्दी मात्र प्रचंड होती. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांची आनंदमठ कादंबरी फुकट वितरणासाठी होती. प्रसाद प्रकाशनाच्या स्टॉलवर स. आ. जोगळेकरांनी संपादित केलेल्या 'सिंहासन बत्तीशी' ची ऑथेंटिक प्रत मिळाली. परत एक दोनदा चक्कर होणारच आहे.
15 Dec 2025 - 7:18 pm | अनन्त अवधुत
काही पुस्तके घेतली. यंदा पण जाणार आहे. शनिवारी वा रविवारी जाईन.
16 Dec 2025 - 4:28 pm | प्रकाश घाटपांडे
पुस्तके घेण्याचा मोह होउ नये म्हणून हल्ली जातच नाही
16 Dec 2025 - 7:01 pm | सौंदाळा
सौरभ वागळे याची 'अल्फा' सिरिज वाचली आहे का कोणी?
अफलातून लिहितो. अगदी शेरलॉक होम्स, व्योमकेश बक्शी या तोडीच्या कथा आहेत.
प्रदर्शनात दिलिपराज प्रकशनात ही पुस्तके विक्रीला आहेत.
18 Dec 2025 - 9:22 pm | बिपीन सुरेश सांगळे
महोत्सवाला खूप चांगला प्रतिसाद आहे .
तिथे अनेक भाषांमधली पुस्तकं आहेत
पण खूप नवीन - मराठी अर्थात , उत्तम पुस्तक आली आहेत . सुदिन !
आतापयंत तीन वेळा गेलो , पण ते कामासाठी
त्यामुळे प्रदर्शन पहायचं राहिलं आहे . पुढचे तीन दिवस जायचा विचार आहे .
काल अनंत सामंत - एम टी आयवा मारू - यांना पहिल्यांदाच भेटण्याचा योग आला . मग चहा न गप्पा .
माझा आवडता ग्रेट लेखक ! संधी अचानक मिळाली .
मला ८ मुलाखती घेण्याची संधी यंदा मिळाली .
प्रा . अरविंद गुप्ता - विज्ञान खेळणी
आनंद घैसास - अनेक विज्ञान पुस्तकं
रवी आमले - पुस्तक - raw - गुप्तचर संघटना
नीलांबरी जोशी - पुस्तक - मनकल्लोळ - मनोविकारांची उत्तम माहिती
वंदना भागवत - पुस्तक - एज्युकेटेड - अमेरिकेच्या आपल्या कल्पनांना धक्का देणारा अनुवाद
राजीव तांबे - पुस्तक - पकोडी , विकोडी - पक्षी कोडी व रंजक शास्त्रीय माहिती
प्रा मंदार दातार - फुल उमललं विश्व बदललं - फुलाची रंजक शास्त्रीय माहिती
डॉ दीक्षित - विनासायास वेट लॉस व मधुमेह मुक्ती - दीक्षित डाएट- ट्रेंडिंग
ज्या क्रमाने मुलाखती होत्या -
प्रदर्शन जरूर पहा .
आभार
19 Dec 2025 - 12:04 am | रामचंद्र
मुलाखतींचे व्हिडिओ/लेखन आणि लेखकांच्या भेटीचा वृत्तांत उपलब्ध होणार का?
18 Dec 2025 - 9:28 pm | बिपीन सुरेश सांगळे
चौको
प्रचेतस
अनंत अवधूत
- मस्त !
रामचंद्र
पुणे बुक फेअरला मिपा कट्टा होणार आहे का?
कल्पना खूप छान आहे मला आवडेल -
घाटपांडे - प्रतिसाद आवडला . प्रॅक्टिकल प्रॉब्लेम
सौंदाळा - माहितीसाठी आभार
21 Dec 2025 - 11:19 pm | चौथा कोनाडा
बुधवार आणि गुरुवारी भेट दिली.. मुद्दाम दुपारची वेळ निवडली... पुस्तकांच्या खजिन्यात रमता आलं... दहा एक पुस्तके घेतली. समकालीन च्या आनंद अवधानी आणि लेखिका गौरी कानेटकर यांच्याशी गप्पा मारता आला.
प्रदर्शन पाहता पाहता क्लिप शूट ही टिपून हा शॉर्ट व्हिडीओ बनवला.
https://youtube.com/shorts/2KOTdJCSqZM?si=lP588n1jQUBrX6Cb
22 Dec 2025 - 4:52 pm | Bhakti
मागच्या वर्षी पुणे बुक फेस्टिवल खूप भव्य दिव्य आवडले होतं .माझी वाचनाची आवड पाहता सगळ्या मैत्रिणी आश्चर्याने "तू अजून पुणे बुक फेस्टिवलला गेली नाहीस का?"विचारत होत्या.अखेर शेवटच्या दिवशी फर्ग्युसनला पोहचलेच. सगळ्या स्टॉलची लिस्ट आदल्या दिवशी प्रिंट करून आणली होती पण मी ती घरीच विसरले त्यामुळे परत नव्याने प्रदर्शन आणि पुस्तक पाहायला सुरु केले.व्यंकटेश माडगूळकरांचे पुस्तक हाती घेतलं की ते आपण टाळूच शकत नाही-जंगलांतील दिवस .
निरंजन घाटे यांचेही एक पुस्तक मी दरवेळी मी घेतेच,मला अनेकदा तथ्यापर्यंत पोहचण्याला त्यांचे पुस्तक मदत करतात -खेळ आणि विज्ञान
साधनांच्या स्टॉलवर मला खूप गर्दी तीही दर्दी वाचकांची वाटली ,त्यांनी पुढच्यावेळी मोठा स्टॊल घ्यायला हवा. -मन्वंतर,पुढे जाण्यासाठी,बिजापूरची डायरी
भैरप्पांची पुस्तक आतापर्यंत स्टोरीटेलवर ऐकली पण हार्ड कॉपी पहिल्यांदा घेतली -सार्थ
विवेकानंदांची खूप दिवसांपासूनची राजयोग,कर्मयोग,प्रेमयोग,ज्ञानयोग ,भक्तियोग हि घ्यायची होती तिची घेतली.
सिग्मोईडची पूस्तक वाचायला सुरुवात करणार आहे.-Psychopathology of Everyday Life
आता माझ्या व इतर अनेकांच्या पुस्तकपरिचयाच्या लेखनाला कायम कौतुकरूपी प्रोत्साहन देणारे वाचनवेडा या फेसबुक आणि कायप्पाचे आधारस्तंभ विनम्र भाबळ प्रत्यक्षात मला ओळख देत समोर आले "कशा आहात?"नावाप्रमाणेच त्यांचे बोलणं खूप विनम्र आहे.
खूप दिवसांपासूनचे पाहिजे होते ते 'महामाया निळावंती ' प्रत्यक्ष लेखकाकडून 'सुमेध' यांच्यकडून स्वाक्षरीसह स्वीकारले.तसेच कॅन्सर फायटर 'ब्युटी ऑफ लाइफ' च्या लेखिका आशा नेगी मॅडम बरोबर पाच सहा मिनिटेच चर्चा करून प्रेरणादायी वाटले.
अजून खरी पुस्तकाची लयलूट ,आनंद लेकीनेही घेतला-सुधामूर्ति यांचे गोपीचे पुस्तक .कुल्फी ,चिकू पिकू च्या स्टॊलवर ती मनमुराद रमली . ikakey (एक कि)हा नवीनच उपक्रम म्हणजेच ऑडिओ बुकाचा मुलींसाठी शालेय ऑडिओ बुकाचा या ठिकाणी समजल्याने व तिला आवडल्याने सबस्क्रिब केला. सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेचे अनेक पुरात्तव वर्ग मो ऑनलाइन केले,त्याचे हरहुन्नरी आयोजक पैजा आणि सुदर्शन भेटल्याने पून्हा झालेल्या शैव,वैष्णव,लेणी वर्गांची उजळणी झाली . तरी महाराष्ट्र संशोधन संस्था,गीता वर्ग हे पाहायचे राहिले. चकटफू सुंदर बुकमार्कस आणि आंनदमठ मिळाल्याने मजा वाटली .
मनातील भावनांच्या लाटा उसळतात आणि शांत होतात पण जे पुस्तक तुम्ही वाचता त्याने तुमच्या मेंदूचे जाळे (synapse)निरोगी होतं राहत

हे कागदांचे पंख मनाला स्वच्छंदी तर करतातच...
***
आपल्या मेंदूंमध्ये, काही तासांमध्ये नवे सायनॅप्सेस तयार होतात. उदाहरणार्थ, हा एक परिच्छेद वाचल्यामुळेदेखील तुमच्या मेंदूच्या रचनेमध्ये थोडेफार बदल होतात, न्यूरॉन्सना नव्या जोडण्या करण्यासाठी किंवा जुन्या कड्या टाकून देण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधीपेक्षा किंचित वेगळे असता. जनुकीय पातळीवरही गोष्टी आश्चर्यकारकरीत्या लवचीक असतात. व्यक्तीचा डीएनए जरी आयुष्यभर सारखाच राहत असला, तरी तीच जनुकं जशी अभिव्यक्त झाली असती, त्यामध्ये एपिजेनेटिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे भरपूर बदल होऊ शकतो
-नेक्सस(युवाल हरारी)
माझ्या खरेदी केलेल्या पुस्तकांची ओळख
https://youtube.com/shorts/39pRvSY6fEg?si=A3cG-5EM4m4V_Ykj