चालू घडामोडी - डिसेंबर २०२५

अभ्या..'s picture
अभ्या.. in काथ्याकूट
1 Dec 2025 - 4:50 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मिपावरच्या चालू घडामोडींचा परामर्ष घेता घेता "अ" च्या बाराखडीतले सदस्यनामे घेणारे आयडी सोडून बाकी सगळे आयडी सगळ्ळ्ळे समजून घेतील अशा अपेक्षेने चालू घडामोडींचा हा (माझा) पहिला धागा काढत आहे. चालू घडामोडींच्या धागानिर्मात्यांच्या लिस्टीत "अ" वर्गीय धागालेखक तसेही मायनॉरिटीत असल्याने म्हणले चला उपेक्षितांचा पण आवाज उठवुया. बाकी इतर ऑथेंटिक, हुशार, प्रगाढ हुशार, शिकलेले, हुकलेले, "ब" पासून पार "य" "झ" पर्यंतच्या एकबार, दुबार, मल्टीबार आयडींना चर्चेसाठी आमंत्रण.
नेमका विषय पण "अ" पासून सुरु झालेला मिळाला.
"अ"नगर पंचायत निवडणुक स्थगित झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साखर पट्ट्यातील ह्या गावात व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचे आणी लोकशाहीचे भीभत्स रुप पाहण्यात आले. माध्यमात उठवलेल्या आवाजामुळे उर्वरित महाराष्ट्राला निदान ह्या प्रकरणाची थोडीफार तरी कल्पना आली. पक्षाचा, युत्यांचा विचार न करता मोठमोठ्या दिलेल्या आवाहनामुळे आणी राजकीय स्वार्थासाठी सर्वच स्तरांवर राबवल्या गेलेल्या शासकीय यंत्रणांमुळे महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे ह्या विधानाचा पुन्हा एकदा विचार करावासा वाटतो.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

1 Dec 2025 - 5:14 pm | अमरेंद्र बाहुबली

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Dec 2025 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूकांचा घोळ आणि कायद्यावर मागील महिण्याच्या धाग्यात दळन टाकलं होतं. आज नगरपालिकेच्या अनेक घोळांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय नागपूर खंडापीठाच्या निर्णयानंतर आज उच्चन्यायालय मुंबई संभाजीनगर खंडपीठामधेही स्थगित निवडणूकां आणि नियमित सुरु असलेल्या निवडणूकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावे अशा सुचना निवडणूक आयोगास दिल्या. आता ते सुचना काढतील वगैरे.

''निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चुकीचे आहे. कोणीही न्यायालयात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलण्यात येईल, असे आजपर्यंत कधीच झाले नाही,'' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. लोकांनी काही म्हणायच्या अगोदर आपण बोंबा मारुन मोकळे. धन्यवाद.

चालू द्या.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Dec 2025 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणविसांनी निवडणूक आयोगाला “घरचा आहेर” दिला म्हणायचं!

कंजूस's picture

3 Dec 2025 - 5:51 am | कंजूस

हो. आंबट चिंचेचा गोळा व्यवस्थित भेटवस्तूच्या खोक्यात बांधून दिला. पण ते पडले सरकारी अंमलबजावणी खाते. ते पार्सल कुणीच घेत नाही.

कंजूस's picture

3 Dec 2025 - 5:52 am | कंजूस

सगळेच ढगात वावरत आहेत. निकालानंतर कळेलच कोण किती तोंडावर पडलाय.

अमरेंद्र बाहुबली's picture

3 Dec 2025 - 3:31 pm | अमरेंद्र बाहुबली

“गुजराती” कंपनीचे इव्हीम, घरगडी असल्यासारखा चुना आयोग असल्यावर काय बिशाद आहे इतर कोणाची जिंकायची?

विजुभाऊ's picture

3 Dec 2025 - 4:15 pm | विजुभाऊ

“गुजराती” कंपनीचे
या शब्दाचे प्रयोजन समजले नाही

टर्मीनेटर's picture

3 Dec 2025 - 4:36 pm | टर्मीनेटर

उचलली जीभ... लावली टाळ्याला...
अशी प्रवृत्ती असेल तर काही 'प्रयोजन' असलेच पाहिजे असे काही नसते हो विजुभाऊ... 😀

सुबोध खरे's picture

4 Dec 2025 - 10:52 am | सुबोध खरे

उचलली जीभ... लावली टाळ्याला...

आला कळफलक हातास

बडवला विचार न करता

हि त्याला समकक्ष म्हण आहे

धर्मराजमुटके's picture

3 Dec 2025 - 5:06 pm | धर्मराजमुटके

अबांच्या किबोर्डवरील 'व्ही' ही कळ मधून मधून बंद होते बहुतेक. 'व' अक्षर टाईप होत नाही बहुतेक :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2025 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्कोसे आया मेरा दोस्त. मास्कोको सलाम करो. रशिया हा भारताचा काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला खास आणि धोरणात्मक भागिदार असून, जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांमधले संबंध सातत्यानं दृढ होत आहेत. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

इंदिरा गांधींनी मास्कोशी दोस्ती करून अमेरिकेचं महत्त्व कमी करून टाकलं होतं.
पुतीनच्या जेवणात फाफडा जलेबी कढी असणारच.
खाने में क्या है? https://youtu.be/mog3Wc_-NAU?si=zEilmEU1euFS9AD4

अमरेंद्र बाहुबली's picture

6 Dec 2025 - 11:18 am | अमरेंद्र बाहुबली

तपोवनातील जमीन हडपायचा डाव नाशिककर उधळून लावतील अस दिसतय! गुड वर्क नाशिककर!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2025 - 8:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची इंडिया टुडे समुहाच्या दोन महिला पत्रकारांनी घेतलेली मुलाखत पाहिली आणि आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे निघालेले पाहताना अजिबात आश्चर्य वाटले नाही.

पत्रकारांनी एक प्रश्न असा विचारला की, 'भारतीय पंतप्रधानांनी रशियासोबत नाते घट्ट करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आहेत, भारत रशिया नाते सर्वाधिक मजबूत करण्यासाठी कोणत्या पंतप्रधानांचे योगदान अधिक आहे?'

हा प्रश्न सरळ सरळ चाटूगिरीचा होता. पुतीन जितके धूर्त कपटी दूरदर्शी आहेत तितकेच चलाख आहेत, त्यांनी ही बला फुटबॉलसारखी उडवून लावली! ते उत्तरले की, 'हा प्रश्न असभ्य आहे!'

चला लागा कामाला.

-दिलीप बिरुटे

फारच चाटुगिरी झाली. पण इंडिया टुडे त्या पत्रकारांना ठेवणार नाहीत.

आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे निघालेले पाहताना अजिबात आश्चर्य वाटले नाही.

आपल्या पत्रकारितेचे धिंडवडे १९९४ सालीच क्रांतिवीर चित्रपटातून निघालेले आहेत!
पुतिन ह्यांनी कदाचीत हा चित्रपट पाहिला असावा किंवा गेला बाजार त्यातला नाना पाटेकरचा "और एक बात जानती हो? तुम्हारे अखबार पर सुबह बच्चे हगते है।" हा संवाद तरी ऐकला असावा 😀

जोक्स अपार्ट, मुलाखत देण्याआधी इंडिया टुडे समुहाचा पुर्वेतिहास पुतिन ह्यांनी माहिती करुन घेतला असावा, त्यामुळे कशाप्रकारचे उत्तर समोरच्याला अपेक्षीत आहे ह्याचा व्यवस्थित अंदाज येण्याएवढे 'धूर्त, दूरदर्शी आणि चलाख' ते नक्कीच असल्याने त्यांनी ही बला फुटबॉलसारखी उडवून लावली असावी 😂

कंजूस's picture

8 Dec 2025 - 8:43 pm | कंजूस

यावरून आठवलं.....
ओबामांनी त्यांच्या promised land पुस्तकात भारतातील तसेच विविध देशांतील राजकीय नेत्यांवर टिप्पण्या लिहिल्या आहेत. त्यापैकी
"राहुल - वर्गात वारंवार हात वर करून लक्ष वेधून घेऊ पाहणारा विद्यार्थी."

इंडिगो मुळे निर्माण झालेला प्रश्न पुन्हा कधीच येणार नाही असे काही होऊ शकेल का?
सरकारने विमान प्रवासाचे दर निश्चित करणे पूर्ण सोडून द्यावे दराबाबतीत पूर्ण्पणे लाझीज फेअर तत्व अवलंबावे.
भारताला विमान कंपन्यांची दफनभूमी ठरवणारानी एके काळी दमणीया एअरवेज, मोदी लुफ्त , सहारा एअरवेज आणि तत्सम यांची कर्तबगारी काय होती ते पहावे आणि त्याना परवाने कोणी दिले तेही समजून घ्यावे
ज्या ज्या कम्पन्यानी बजेट सर्वीसेस दिल्या त्यांचे बारा वाजलेले आहेत.

फक्त बजेट सर्विस देणे वेगळं आणि बिझनेस आइडियाज वेगळ्या.
https://youtu.be/9BRc9dz13Lk?si=KOYjgLZg6mJPDzFl
हे अगोदर कुणाला सुचलं नाही.
मल्ल्याने एक प्रश्न विचारला की सरकार जर इंडिया , इंडियन एरलाइन्सला मोठी फंड इंजेक्शनं मारते तर किंगफिशरला का नाही?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2025 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'वंदे मातरम' राष्ट्रीय गीताला १५० वर्ष झाले त्या अनुषंगाने अधिवेशनादरम्यान लोकसभेत सोमवारी या विषयावर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चर्चेस प्रारंभ करुन मूळ गीतातील कडव्यांच्या निमित्ताने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका केली. आता महाराष्ट्रातही विधीमंडळाच्या पुढील अधिवेशनात वंदे मातरम वर चर्चा होणार आहे.

प.जवाहरलाल नेहरु यांच्यावरही एकदा स्वतंत्र विषय घेऊन लोकसभा अधिवेशनात चर्चा करुन टाकावी म्हणजे तो एकदाचा विषय संपून देशातील प्रश्नावरही चर्चा करता येईल, असे म्हणायला हरकत नाही. :)

-दिलीप बिरुटे

रशियात जुन्या नेत्यांचे पुतळे पाडून टाकण्यात आले होते त्याची आठवण झाली.
मुसलमान सत्तेने देवगिरी जिंकल्यावर यादव राजाचे मस्तक गटारमुख म्हणून बसवले होते.
नवीन सत्ताधीश जुन्याची आठवण राहू नये याची काळजी घेतो. देशात अठ्ठावीस टक्के मुसलमान एकजुटीने आहेत. त्यांना न आवडणाऱ्या, नको असलेल्या गोष्टी टाळल्या तर काम सोपे होईल नाही का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Dec 2025 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आग्या१९९०'s picture

9 Dec 2025 - 10:18 pm | आग्या१९९०

काल प्रियांका गांधीने संसदेत जोरदार भाषण करून जागतिक रडूबाईला जेरीस आणले. वरताण म्हणजे नेहरूंविरोधी काय गरळ ओकायची ती ओकायला संसदेत खास एक दिवस ठेवण्याचा सल्लाही दिला.
आज राहुल गांधीने वंदे मातरम् वरून सत्ताधाऱ्यांना गप्प बसवले. कुठून वंदे मातरम् ची चर्चा घेतली असे जागतिक रडूबाईला झाले असेल.
राहुल गांधी दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत. जागतिक रडूबाई सुद्धा त्याला आता पप्पू म्हणत नाही. ह्याउलट जागतिक रडूबाई विश्वगुरू, अजैविक असा प्रवास करत पुन्हा जागतिक रडूबाई पदावर विराजमान झाली.
राहुल गांधीने सरकारच्या GST ला गब्बर टॅक्स संबोधले होते. सरकारने GST टॅक्स कमी करून राहुल गांधीसमोर झुकले.
विमान वाहतूक सेवेतील मक्तेदारीच्या धोक्याची भविष्यवाणी राहुल गांधीने वर्षभरापूर्वी केली होती. सरकारने विमान कंपनीपुढे लोटांगण घालून आपली परिपक्वता दाखवून दिली.
राहुल गांधीच्या द्रष्टेपणाची यादी बरीच मोठी होईल. तूर्तास
" वंदे मातरम् ".

नेहरूंचा मुद्दा आता उगाचच उगाळला जात आहे. सरकारने काही दुसरी चर्चा काढावी. बरोबर.

छान बोलली प्रियंका गांधी.व्हिडिओसाठी धन्यवाद.

रात्रीचे चांदणे's picture

10 Dec 2025 - 9:27 am | रात्रीचे चांदणे

प्रियांका गांधी यांनी चांगल भाषण केलं. बाकी मुद्दे पटो ना पटो दोन मुद्दे मात्र पटले. एक म्हणजे बंगाल निवडणूक आहे म्हणूनच लोकसभेत चर्चा ठेवली गेली आणि दुसरा म्हणजे नेहरू वरील टिकेचा. आणखी किती दिवस नेहरू वर टीका करत राहणार.

कांदा लिंबू's picture

10 Dec 2025 - 9:37 am | कांदा लिंबू

न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन

हे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जी.आर. स्वामीनाथन आहेत.

त्यांनी मदुराईतील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील प्राचीन दगडी दीपस्तंभ असलेल्या दीपथून येथे कार्तिक पौर्णिमेला हिंदूंना दीपोत्सव करण्याची परवानगी दिली.
(त्यांचा हा आदेश मद्रास उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठानेही कायम ठेवला होता). मागच्या महिन्यात, दिंडीगुल जिल्ह्यातील एन. पंजमपट्टी गावात, कालीयम्मन मंदिराच्या कुंभबिषेकम दरम्यान सरकारी मालकीच्या सार्वजनिक जागेवर हिंदूंनी अन्नदान करण्यास ख्रिश्चनांनी आक्षेप घेतला आणि विरोध केला. या सार्वजनिक जागेचा वापर पारंपारिकपणे त्यांच्या ईस्टर कार्यक्रमांसाठी केला जातो असं त्यांनी दावा केला. त्यानंतर, मद्रास उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि त्यांनी असा निर्णय दिला की सार्वजनिक जागेवर एका समुदायाची मक्तेदारी असू शकत नाही. ती सर्व समुदायांना किंवा कोणत्याही समुदायाला वापरण्यासाठी उपलब्ध नसावी.

आता, द्रमुक आणि विरोधी पक्षाचे खासदार, न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांनी धर्मनिरपेक्षतेविरुद्ध निर्णय दिला आहे असे म्हणत त्यांच्यावर महाभियोगाची मागणी करत आहेत!

मोदी सत्तेत येऊन बारा वर्षे होत आहेत!

संदर्भ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2025 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गेल्या सहा महिन्यात पुणे, नंदुरबार, जळगाव नाशिक, अहिल्यानगरसह अनेक भागात बिबट्याने धुमाकुळ घालून ३७ जणांचा बळी घेतला. या बिबट्यांना मानवी वसाहतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बिबट्यांच्या अधिवास असलेल्या क्षेत्रात एक कोटी रुपये किमतीच्या शेळ्या-मेंढ्या सोडा असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिका-यांना दिले.

गोबरयुगात अशा पालथ्या निर्णयांचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. देशभरात दीडलाखापेक्षा अधिक राखीव हेक्टर वनक्षेत्रे विकासाच्या नावाखाली उजाड़ करणे चालू आहे, उद्योगपतींना विकासासाठी जंगलांच्या जागाही विकासासाठी देणे सुरु आहे, जंगले कमी होत चालली हे वन्यप्राणी शहरात येण्याचे मुख्य कारण आहे. शेळी,मेंढी हे पाळीव प्राणी आहेत, ते जंगलात राहूच शकत नाही. सर्व शेळ्या-मेंढ्या सायंकाळी गावातच परत येतील. आणि त्यांच्या पाठोपाठ बिबटे पुन्हा गावात येतील.

चोरीचं प्रमाण कमी व्हावे म्हणून चोरांना घबाड नेऊन देण्याने चोरी थांबणार नसते. कशाचा कशाशी संबध नसणारी भ्रष्टाचाराशी ही नवी 'शेळी बिबट्या' योजना किती दिवस तग धरते ते येत्या काळात कळेल. पालथ्या निर्णयास शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

स्वधर्म's picture

10 Dec 2025 - 2:58 pm | स्वधर्म

काल बाबा आढाव गेले. एक चळवळीतला पुरोगामी कार्यकर्ता गेला. खरे तर असे निरलस स्वच्छ काम करणारे कार्यकर्ते होणं आता अवघड आहे, त्यामुळे एका युगाचा अंत झाला असे म्हणावेसे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2025 - 11:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

10 Dec 2025 - 8:50 pm | आग्या१९९०

संसदेत गृहमंत्री शिवी देतो आणि ते विरोधी पक्षाने लक्षात आणून दिले तरी लोकसभा अध्यक्ष गप्प बसले. सर्वात कहर म्हणजे गृहमंत्री लोकसभा अध्यक्षांना ती शिवी रेकॉर्डमधून काढण्याचा हुकूम सोडतात आणि तात्काळ लोकसभा अध्यक्ष हुकूमाची अंमलबजावणीही करतात. हेच लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्षाच्या खासदारांना " मला आदेश देण्याचा तुम्हाला काही हक्क नाही " असे संतापून सांगत असतात. हे पद निष्पक्ष असते ना?
राहुल गांधीनी अमित शहाला चर्चेसाठी पत्रकार परिषदेचे खुले आव्हान दिले आहे. असे ऐकलाय की ' एक अकेला सब पर भारी ' हे आव्हान स्वीकारणार आहे.
" वंदे मातरम् "

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Dec 2025 - 12:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'साला' हाच शब्द विरोधीपक्षाच्या नेत्यांनी कोणी वापरला असता तर, काय हंगामा झाला असता ?
देशाचे गृहमंत्री यांचं स्वतःवरचं नियंत्रण गेलेले दिसलं त्या चर्चेत. अर्थात, राहुल गांधी यांनी दिलेलं
पत्रकार परिषदेचं खुलं आव्हान ते स्विकारणार नाहीत.

-दिलीप बिरुटे

आग्या१९९०'s picture

11 Dec 2025 - 6:59 pm | आग्या१९९०

राहुल गांधीचे कुठलेच खुले आव्हान ते स्वीकारणार नाहीत. राहुल डरपोक नाही ह्याची त्यांना खात्री आहे. मुख्य म्हणजे राहुल गांधी संसदेत अद्वातद्वा बोलताना कधीच आढळले नाही.
राहुल गांधीने आता इंग्रजीतच बोलायचे ठरवले आहे असे वाटतं. सत्ताधारी पक्षाच्या आयटी सेलची आता पंचाईत झाली आहे.
वंदे मातरम्

कपिलमुनी's picture

11 Dec 2025 - 7:39 pm | कपिलमुनी

विधानसभा , लोकसभा अध्यक्ष , राज्यपाल , राश्ट्रपती अशी सरकारने नेमलेली माणसे पक्षविरोधी बोलायचा दम दाखवतील , निष्पक्ष काम करतील असा त्यांना वाटले..

त्यात निवडणून आयोग अध्य्क्ष निवडीतून न्यायाधीशांना वगळतात, आणि उरली सुरली लाज कोळून पितात

कांदा लिंबू's picture

11 Dec 2025 - 8:10 pm | कांदा लिंबू

पूर्वी चित्रलेखा नावाचा एक मराठी साप्ताहिक होतं. ‌त्यात शेवटच्या पानावर वेलची या सदरात काही खुशखशीत किस्से यायचे. नुकत्याच संसदेत साला या शिवीदर्शक शब्दाच्या झालेल्या तथाकथित वापरावरून त्यातला एक किस्सा आठवला. ‌

"मनमोहन सिंग पंतप्रधान असताना (म्हणजे खरंतर सोनिया गांधी यांची सत्ता असताना) ते परदेशी दौऱ्यावर आपल्या सोबत पत्रकारांचा चमू घेऊन जायचे.‌ एका युरोपियन देशाच्या अश्याच एका दौऱ्यावर असताना पत्रकारांना हॉटेलात साला कॉंग्रेसी (Sala Congressi) असा शब्दप्रयोग लिहिलेला फलक दिसला!

हा शब्दप्रयोग भारतात वाचनात वा ऐकण्यात आला असता तर फार काही विशेष वाटलं नसतं पण युरोपातल्या त्या देशामध्ये असा शब्दप्रयोग दिसणे हे चर्चेचा विषय ठरलं. सगळ्याच पत्रकारांना त्या देशाची स्थानिक भाषा येण्याचा काही प्रश्नच नव्हता.

अर्थात तो देश इटली होता आणि Sala Congressi म्हणजे इटालियन भाषेत सभागृह (Conference Hall)!"

साला कॉंग्रेसी

गामा पैलवान's picture

11 Dec 2025 - 8:44 pm | गामा पैलवान

हाहाहा, मस्त किस्सा आहे कॉंग्रेसच्या सासुरवाडीचा ! बाणही अगदी अचूक दिशेने दाखवलाय !! जामातो दशमो ग्रह: उगीच म्हणंत नाहीत !!! ;-)
-गा.पै.

ट्रंप ने पाकिस्तानला त्यांची एफ१६ विमाने दुरुस्त करता यावीत यासाठी पॅकेज जाहीर केले आहे

उद्या, १९ डिसेंबर २०२५ रोजी, जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (DOJ) फाइल्सच्या मोठ्या भागाची रिलीज होण्याची शक्यता आहे.

यामुळे काही दिवसांपासुन हिंदुस्थानातील काही राजकारणी चेकाळले आहेत, त्यांना वाटते आहे किंवा त्यांना तशी वातावरण निर्मीती करायची आहे की मोदींचे नाव या यादीत आहे/ असावे आणि त्यामुळे हिदुस्थानातील राजकारणात नविन वादळ येईल. विरोधक आणि मोदींच्या पक्षातील काही विरोधक आता उध्याच्या आशेवर डोळे लावुन बसलेले आहेत.

डॉ॰ सुब्रह्मण्यम् स्वामी अधुन मधुन काही तरी फुसकुल्या सोडत असतात आणि त्यातल्याच एका फुसकुली मध्ये गुजरातच्या मानसी सोनी या स्त्री बद्धल त्यांनी सांगितले होते. ती सध्या म्हणे अमेरिकेतच आश्रीत आहेत म्हणे! जालावर बाईं बद्धल शोधल्यास तुम्हाला सविस्थर माहिती मिळेलच.

जास्त नाहे, पुढील २४ तासात कळेलच की जगात उलथा- पालथ होईल की नाही आणि हिंदुस्थानात कोणते वादळ येईल का तेही समजेल.

खालची माहिती एआयच्या कृपने दिली आहे:-

नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "Epstein Files Transparency Act" नावाचा कायदा सही केला. या कायद्यानुसार DOJ ला एपस्टीन आणि घिस्लेन मॅक्सवेल यांच्या सेक्स ट्रॅफिकिंग प्रकरणातील सर्व अनक्लासिफाईड डॉक्युमेंट्स, कम्युनिकेशन्स, इन्व्हेस्टिगेटिव्ह मटेरियल्स (उदा. फ्लाइट लॉग्स, ईमेल्स, रेकॉर्ड्स) ३० दिवसांत सार्वजनिक करावे लागतात. हा डेडलाइन उद्या संपत आहे.
काय रिलीज होऊ शकते?
इन्व्हेस्टिगेशनचे डॉक्युमेंट्स, ग्रँड ज्यूरी ट्रान्स्क्रिप्ट्स (अलीकडे कोर्टाने अनसील करण्यास परवानगी दिली).
काही फोटोज, ईमेल्स आणि रेकॉर्ड्स.
पीडितांच्या प्रायव्हसीसाठी आणि ऑनगोइंग इन्व्हेस्टिगेशन्ससाठी काही भाग रेडॅक्ट (काळा करून) किंवा रोखला जाऊ शकतो.
अलीकडचे अपडेट्स:
हाउस ओव्हरसाइट कमिटीने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एपस्टीन इस्टेटमधून हजारो पेजेस आणि फोटोज रिलीज केले (त्यात ट्रम्प, क्लिंटन, गेट्स इत्यादींच्या जुन्या फोटोंचा समावेश).
DOJ ची मुख्य रिलीज वेगळी आहे आणि उद्या अपेक्षित आहे.
लोकांच्या चर्चेत काय? सोशल मीडियावर (X वर) खूप उत्सुकता आहे, काही लोक "क्लायंट लिस्ट" येणार असं म्हणतात, पण अधिकृतपणे अशी एकच "लिस्ट" नाही – फक्त असोसिएटेड नावे आणि डॉक्युमेंट्स असतील. पूर्ण अनरेडॅक्टेड रिलीज होईल की नाही याबाबत शंका आहे, कारण कायद्यात अपवाद आहेत.
जर उद्या रिलीज झाली तर मुख्य बातम्या येतील, पण पूर्णपणे नवे बॉम्बशेल खुलासे होण्याची शक्यता कमी आहे – बरेच काही यापूर्वीच कोर्टात अनसील झाले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

आग्या१९९०'s picture

18 Dec 2025 - 2:44 pm | आग्या१९९०

एपस्टीन फाईलमध्ये फक्त जैविक प्राण्यांची नावे आहेत. अजैविक दगडाला काही भिती नाही, दगडाची मनसोक्त शेंदूर फासून पूजा करा.

मदनबाण's picture

18 Dec 2025 - 2:47 pm | मदनबाण

@आग्या

हा.हाहा... :) प्रतिसाद लईच आवडला ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2025 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हहपुवा झाली. च्यायला हे वाचलंच नव्हतं. मस्त.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

18 Dec 2025 - 2:28 pm | कपिलमुनी

भारतात विधिनिषेधशून्य राजकारणी असल्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.

मदनबाण's picture

18 Dec 2025 - 2:40 pm | मदनबाण

भारतात विधिनिषेधशून्य राजकारणी असल्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.
सगळ्या जगात असेच राजकारणी असतात, हिंदुस्थान काही अपवाद नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Dec 2025 - 3:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोब्बर बोललास मदनबाणा. केनेडी काय, ईटालीचे ते बर्लस्कोनी किवा ते क्लिंटन.. विधीनिषेधशून्य...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Dec 2025 - 2:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पॉपकॉर्न घरी बनवायचा निर्णय घेतला आहे. आमचे प्रूथ्वीराज(बाबा) चव्हाण म्हणत आहेत की १९ तारखेनंतर मराठी पंतप्रधान होउ शकतो. त्यात कुमार केतकरांची ह्या विषयावर मुलाखत पाहिली आणि ह्यानी बाहेर धावत जावुन किलोभर फरसाण आणि जिलब्यांची ऑर्डर दिली आहे. अजून काही तास शिल्लक आहेत.
एका मोठया कढईत पॉपकॉर्न बनवले आहे.
उद्या सकाळपासुनच पॉपकॉर्न्,फरसाण आणि जिलबीचा आस्वाद घेत टी.व्ही. पाहणार आहोत.

टर्मीनेटर's picture

18 Dec 2025 - 3:14 pm | टर्मीनेटर

आमचे प्रूथ्वीराज(बाबा) चव्हाण म्हणत आहेत की १९ तारखेनंतर मराठी पंतप्रधान होउ शकतो.

नाव नका घेऊ हो त्या कर्मदळिद्री 'प्रूथ्वीराज चव्हाणाचे' माई... जेन झी म्हणत आहे हा भxx आम्हाला जिथे भेटेल तिथे त्याला कुदवून कुदवून मारू म्हणुन... चुकीचे आहे हे, उद्या ते म्हणतील आम्ही राहुल गांधीला दगडानी ठेचून मारू वगैरे... पण हे आपल्या अहिंसक संस्कृतीला साजेसे नाही... काय म्हणता?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Dec 2025 - 11:16 am | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. प्रुथ्विराज बाबांचा कुमार केतकर/संजय राउत होत आहे अशी भीती आम्हाला वाटते.अमेरिकेत एप्स्टीन फाईल्समधील फोटो प्रसिद्ध होत आहेत.
बील गेट्स्/वूडी अ‍ॅलन्/क्लिंटन्/लिओनार्डो कॅप्रियो ह्यांचेही फोटो आहेत. एवढेच काय पण अमेरिकेतील डाव्यांचे' हिरो मानले गेलेले नोम चॉम्स्की ह्यांनीही एप्स्टिन ह्याची भेट घेतली आहे. ह्या मंडळींवर कारवाई झाली पाहिजे असे कुणी म्हणत नाही. ट्रम्पचे तर अनेक फोटो आहेत. पण त्यांचा राजीनामा कुणी मागत नाही आहे. अशावेळी मोदींच्या विश्वासातील कुणी तिकडे गेला असेल म्हणुन मोदी राजीनामा देतील अशी मांडणी काँग्रेसवाले करत आहेत. २०१२ साली हरदीप सिंग पुरी एपस्टिनला भेटल्याचे वृत्त आहे. पण तेव्हा सत्तेवर काँग्रेस होती आणी पुरी तेव्हा राजदूत होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2025 - 10:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगभरात चर्चेच्या विषय असलेल्या अमेरिकेतील लैंगिक शोषणप्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्या मालमत्तामधून जप्त केलेली ६८ छायाचित्रे 'हाउस ओव्हर साइट कमिटी'तील डेमोक्रॅटच्या सदस्यांनी गुरुवारी रात्री जारी केली. 'एपस्टिन याच्या २०१९ मध्ये कारागृहात झालेल्या मृत्यूच्या आधी ९५ हजार छायाचित्रे जप्त करण्यात आली होती. त्यातील ही छायाचित्रे आहेत,' असे 'हाउस ओव्हरसाइट कमिटी'ने म्हटले आहे.

प्रभावशाली व्यक्ती असल्या तरी, विशेष काही आढळलेले नाही असे वाटते. अजून कोणकोणती छायाचित्रे येतील आणि काय काय असतील त्याचे तपशीलवार कुतूहल आहे.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

20 Dec 2025 - 2:58 pm | मदनबाण

ऑपरेशन सिंदूर जेव्हा अगदी तीव्र स्थितीत होते त्यावेळी मोदींनी अचानक जातिगत जनगणना हा विषय उपस्थितीत करुन लोकांचे लक्ष मोठ्या शिताफीने दुसरीकडे वळवले.
मला जितके आठवते त्यानुसार पदमुक्त जनरल जीडी बक्षी व अनेक पदमुक्त अधिकार्‍यांना हे आवडले नव्हते. त्यावेळी मी जे सॅटॅलाईट फोटो पाहिले होते त्यानुसार आणि जो डेटा जालावर प्रोसेस करता आला त्या नुसार पाकिस्तानी नौदलाची काही जाहजे ही तांत्रिक दुरुस्तीसाठी गोदीत होती आणि त्यांचा त्यावेळी पाकिस्तानच्या बाजुने वापर शक्य नव्हता यात Type-054A frigate आणि Type-21 frigate होत्या.या सगळ्या प्रकाराने त्यांच्या नौदलाचे मनोधैर्य पुर्णत: खचलेले होते.
माझ्या व्यक्तीगत मता नुसार त्यांच्या नौकांची गोदीतच कब्र खोदण्याची नामी संधी असताना आपण ही दुर्लभ संधी गमावली.
असो...
सध्याची बांग्लादेश, पाकिस्तान परिस्थीती पाहता तसेच चीन ची हालचाल पाहता आपण सिलिगुरी कॉरिडॉर (चिकन नेक) च्या भोवती संरक्षण प्रचंड बळकट केले आहे.
ज्यात ७५ लढाऊ विमाने, S-400 सिस्टीम्स आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली गेलेली आहेत. तसेच नवीन छावण्या उभारल्या, कारण चीनशी वाढता तणाव आणि बांगलादेशमधील बदलांमुळे पूर्वोत्तरशी जोडणारा हा २२ किमीचा हा भाग अतिमहत्त्वाचा आहे.
तीन नवीन लष्करी स्टेशन उभारली गेली जी वेगवान तैनाती आणि उन्नत निरीक्षणासाठी आहेत.चीन ने चुंबी व्हॅली पासुन साधारण ८०- १०० किलोमीटरवर सैन्य उपस्थिती वाढवली आहे. [ चुंबी व्हॅली (Chumbi Valley) पासून सिलिगुरी कॉरिडॉर (चिकन नेक) साधारण १०० ते १३० किलोमीटर अंतरावर आहे } तेथे ५०,००० हून अधिक चिनी सैनिक तैनात आहेत, ज्यात पल्टन आणि आर्टिलरी युनिट्सचा समावेश आहे, ज्यामुळे सिलिगुरी कॉरिडॉरजवळील तणाव वाढला आहे.चुंबी व्हॅलीत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) ने पूर्व लडाख आणि भूतान सीमेजवळ ब्रिगेड-स्तरीय फॉर्मेशन्स वाढवल्या आहेत.

जाता जाता : मध्यंतरी सध्याचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांनी देशातील जनतेला युद्धजन्य परिस्थीसाठी देशातील जनतेने तयार रहावे अश्या प्रकारचे विधान केले होते. भारतीय लष्कराची तयारी,अभ्यास, त्यांच्याकडुन सात्यत्याने शेल्स पासुन सुसाईड ड्रोन व विवध लष्करी सामुग्री / हत्यारे यांच्या ऑरडर्स दिल्या गेलेल्या आहेत / दिल्या जात आहेत. तसेच विवध ठिकाणी दिले गेलेले NOTAM आणि मिसाइल्स टेस्ट पाहता ऑपरेशन सिंदूर २.० हे होऊनच राहील याची मला खात्री पटलेली आहे. आता फक्त हे कधी घडेल याची वाट पहायची!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Neon Ride | Officer On Duty |

शाम भागवत's picture

22 Dec 2025 - 3:56 pm | शाम भागवत

भाजप खेडोपाडी पोहोचायला लागलीय. एकूण जागांच्या ४८%जागा मिळाल्या आहेत. मागच्या वेळेस २४% जागा मिळाल्या होत्या. म्हणजे भाजप दुप्पट वाढलीय. भाजप खूपच सशक्त झालाय. मुमं फडणवीस सुध्दा सहकारी पक्षांना सांभाळून आपली ताकद वाढवताहेत. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. धुरंदर राजकारणी असल्याचं जाणवतंय.

अजूनही भाजप विरोधक फक्त आरोप करत राहण्यातच धन्यता मानताहेत. लोकसंग्रहासाठी काही करताना दिसत नाहीयेत.
अजून मतदान टक्केवारी कळलेली नसल्याने नक्की सांगता येत नसलं तरी हिदूत्वाला मत वाढत असल्याचा कल अबाधीत राहिल्याचं जाणवतंय.
त्यामुळे १६ जानेवारीला शरद पवार गट, उबाठा व आता मनसे यांची पाळेमुळे खणली जाणार असं वाटायला लागलंय.

मदनबाण's picture

22 Dec 2025 - 6:19 pm | मदनबाण

मोदी सत्तेत आल्या नंतर त्यांनी जातियवादी राजकारण सातत्याने कसे केले जाईल याची काळजी घेतली.
त्यांनी SC/ST Act अधिक कठोर केला. याचा वाईट परिणाम असा झाला की हिंदू समाजातील जातीय दरी वाढलीच पण याच बरोबर या कायद्याचा चुकीचा वापर करुन हिंदू एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी लागले, केस करु लागले.

खालची माहिती एआयच्या मदतीने दिली आहे:

अनुसूचित जाती-जमाती (SC-ST) कायद्यांतर्गत खोट्या प्रकरणांची आकडेवारी:

पोलीस तपास निष्कर्ष (२०२२): अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवलेल्या एकूण प्रकरणांपैकी अंदाजे १४.७% ते १५% प्रकरणे पोलिसांनी तपासाअंती "खोटी तक्रार" किंवा "पुराव्यांचा अभाव" असल्याचे सांगत 'फायनल रिपोर्ट' देऊन बंद केली आहेत.
ऐतिहासिक कल: २०१६ मध्ये NCRB च्या नोंदीनुसार, तपासासाठी पाठवण्यात आलेल्या प्रकरणांपैकी सुमारे ९.४९% (५,३४७ प्रकरणे) प्रकरणे खोटी असल्याचे आढळले होते.
बलात्कार प्रकरणांशी संबंधित आकडेवारी (२०१९): अनुसूचित जातीच्या पीडितांनी दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणांपैकी अंदाजे ६.७% प्रकरणे पोलिसांनी 'खोटी' म्हणून बंद केली होती. (तुलनात्मकदृष्ट्या, भारतातील सर्व बलात्कार प्रकरणांच्या तपासात साधारणपणे ८% प्रकरणे खोटी आढळतात).

राज्यानुसार तफावत:
काही राज्यांमध्ये सक्तीच्या एफआयआर (FIR) नोंदणीच्या धोरणामुळे खोट्या प्रकरणांची टक्केवारी जास्त दिसते:

राजस्थान: २०२० मध्ये राजस्थान पोलिसांनी नोंदवले की, अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांपैकी जवळपास ४०% प्रकरणे बनावट किंवा खोटी आढळली होती.
तमिळनाडू: २०२० ते २०२५ दरम्यान नऊ जिल्ह्यांमध्ये सुमारे १६% प्रकरणे "तथ्यांची चूक" (Mistake of Fact) असल्याचे सांगून बंद करण्यात आली.
मध्य प्रदेश: काही कायदेशीर संघटनांनी असा दावा केला आहे की या कायद्यातील निर्दोष मुक्ततेचे प्रमाण ७५% पर्यंत आहे.
========================================================================================
एआय ने दिलेली माहिती वरती संपली.

मोदींनी अल्पसंख्यक समाज ज्यात मुस्लिम समाज देखील येतो, त्यांच्यातील मुलींसाठी शादी शगुन योजना राबवली पण हिंदू मुलीसांठी मात्र ही योजना लागु केली नाही!
[ जगातली दुसरी मोठी मुस्लिम जनसंख्या आपल्या देशात राहते आहे, तरी ते अल्पसंखक ] बरं जिथे हिंदू समाज अल्पसंख्यक झाले आहेत ते देशातील भाग कोणते? का झाले ? असे प्रश्न हिंदू जनतेला पडत नसावेत!

मोदी मनोभावे गेले ११ वर्ष नियमाने ते एका जिहाद्याच्या मजारीवर चादर चढवतात. ज्याची ही मजार आहे तो म्हणजे चिश्ती. त्याने भारतात सुलतान मुहम्मद घोरीच्या बाजूने हिंदू राजा पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध जिहाद लढण्यासाठी आला होता. पृथ्वीराजाला पकडण्याचे श्रेय चिश्तींनी स्वतःला दिले असून त्यांनी लिहिले आहे की, "आम्ही पिथौराला (पृथ्वीराज) पकडून इस्लामच्या सैन्याच्या स्वाधीन केले आहे."
आता इंग्रजी नवे वर्ष येईल तेव्हा मोदींना चादर चढवण्याचे कर्त्यव्य पार पडण्याची कमाल घाई होईल! मागच्या वर्षी देखील झाली होती, खरं वाटतं नसेल तर जालावर शोधा. मोदी आणि हिंदुत्व वगरै असं विचार करायचा नसतो कारण मोदी करत आहेत म्हणजे योग्यच असणार ना! मोदींची खेळी, डाव, चाणक्य निती अशी लेबल द्यायची की हिंदूत्वाचे लॉलीपॉप चघळण्यात लोक व्यस्त होतात.

मोदींनी स्वतः जीएसटीचे दर वाढवले होते, ते अनेक वर्ष तसेच ठेवून नंतर बाजार बसल्यावर कमी केले वर मखलाशी काय तर आम्ही जीएसटी चे दर कमी केले ! थोडक्यात आधी लुटत होतो पण आता त्या लुटीत आम्ही कपात केली आहे.

सध्या भाजपा खाजगी क्षेत्रात आरक्षण आणण्याचा विचार करत आहे, तश्या बातम्या / व्हिडियो माझ्या पाहण्यात आले होते. तसेही आपल्या देशात गुणवत्त्तेला प्राधान्य देण्याची गरज आहे ही भावना / विचार मेलेला दिसतो, कारण तसे नसते तर हिंदूंनी विरोध केला असता. खुल्या वर्गाची तशीही तिरडी उठवलेली आहे, त्याला स्मशानात पोहचवण्याचे काम खाजगी क्षेत्रात आरक्षण देऊन केले जाईल.

जाता जाता: विश्वगुरु नावाचे दुसरे लॉलीपॉप लोकांना देऊन ठेवले आहे, बसा चघळत. देशातुन किती लोक परदेशी स्थलांतरीत झाले आहेत आणि होत आहेत. ते असे का करत आहेत? त्याचे कारण पहायचे नाही व त्यावर बोलायचे देखील नाही, कारण विश्वगुरु चे लॉलीपॉप चघळण्यात वेळ कस्सा मस्त्त्त जातोय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rana Kumbha (Audio) : Varanasi |Mahesh Babu |Priyanka Chopra |Prithviraj |SS Rajamouli |MM Keeravaani

विजुभाऊ's picture

22 Dec 2025 - 6:06 pm | विजुभाऊ

बांगला देशात जे काही चालले आहे त्याकडे संपूर्ण जग दुर्लक्ष्य करत आहे.
पण ही आग ममताबाईंच्या कृपेने आपल्या बुडाखाली कधीही येवू शकेल.
आज जगावर जर का एखादे संकट येणार असेल तर ते या हिरव्या विचारांनी पछाडलेल्या भुतावळीचे आहे हे नक्की.
अण्वस्त्रापेक्षाही हे भयंकर आहे