गाभा:
"नाते कुठवर सांभाळायचे"
प्रेरणा- https://www.misalpav.com/comment/1197629#comment-1197629
हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय -
जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.
प्रतिक्रिया
25 Aug 2025 - 10:27 am | युयुत्सु
या विषयाच्या अनुषंगाने तमाम सनातनी आणि मनुवाद्यांची झोप उडवेल असा विषय-
https://youtu.be/hLHiykDktEs?si=ZN7gOOHBb3NEQ0ub
या बाईनी एक मह्त्त्वाचा मुद्दा अगोदरच उपस्थित केला आहे. समाज हे प्राथमिक सत्य आहे (प्रायमरी ट्रुथ) की व्यक्ती हे प्राथमिक सत्य आहे? व्यक्ती हे प्राथमिक सत्य आहे हे वास्तव परंपरा आणि संस्कृतीवाद्यांना पचवता येत नाही आणि सगळा संघर्ष/कटुता निर्माण होते.