स्वतःचे घर की भाड्याचे घर?

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in काथ्याकूट
16 Aug 2025 - 12:28 pm
गाभा: 

- पर्याय 1: घर खरेदी
घर किंमत: ₹1 कोटी
डाउन पेमेंट: ₹50 लाख
कर्ज: ₹50 लाख, 20 वर्षे, 8.5% ROI
EMI: ~₹43,400/महिना
एकूण व्याज: ~₹54 लाख
एकूण भरणा: ₹1.04 कोटी (50L + EMI व्याज)
अतिरिक्त खर्च:
प्रॉपर्टी टॅक्स: 20 वर्षांत ~₹14.4 लाख
सोसायटी मेंटेनन्स: 20 वर्षांत ~₹7.2 लाख
एकूण अतिरिक्त: ~₹21.6 लाख
- म्हणजे 20 वर्षांत एकूण खर्च = ₹1.04 कोटी + ₹21.6 लाख ≈ ₹1.26 कोटी
20 वर्षांनी घराची किंमत (6% वाढ धरली तर) = ~₹3.21 कोटी

पर्याय 2: भाड्याने राहणे + गुंतवणूक
प्रारंभिक गुंतवणूक: ₹50 लाख
SIP: ₹40k/महिना + 10% वार्षिक टॉप-अप, 20 वर्षे
CAGR: 12%
परिणाम:
एकरकमी ₹50L → ~₹4.83 कोटी
SIP → ~₹5.2 कोटी
एकूण गुंतवणूक मूल्य: ~₹10.03 कोटी
भाडे खर्च:
सुरुवातीला ₹25k/महिना, दरवर्षी 10% वाढ
20 वर्षांत एकूण भाडे = ~₹1.9 कोटी
20 वर्षांनंतर निव्वळ संपत्ती = ₹10.03 – ₹1.9 = ~₹8.13 कोटी

-अंतिम तुलना
घटक घर खरेदी भाडे + MF
एकूण खर्च (20 वर्षांत) ₹1.26 कोटी ₹1.9 कोटी
20 वर्षांनी मालमत्ता ~₹3.21 कोटी ~₹8.13 कोटी
तरलता (Liquidity) कमी खूप जास्त
स्थैर्य जास्त (स्वतःचं घर) कमी (भाडे वाढतं, स्थिरता कमी)
जोखीम प्रॉपर्टी मार्केट इक्विटी मार्केट

निष्कर्ष
फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.

प्रतिक्रिया

केंव्हाही भाड्याच्या घरात
- (स्वतःच घर असलेला ) गणेशा

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Aug 2025 - 1:26 pm | अमरेंद्र बाहुबली

का? थोडे सविस्तर लिहा.

गणेशा's picture

16 Aug 2025 - 2:15 pm | गणेशा

सविस्तर, ठोकताळे गुगल, youtube ला पडलेले असतात, त्यात पुन्हा तेच लिहिण्यात असा काय फायदा?
तुम्ही तर आकडे लिहिलेले आहेच.

तरी एक सांगतो..

विकत घेतलेल्या घराचे emi आणि व्याज फेडण्या साठी ऐन तारुण्यातील महत्वाची वर्षे दोघांना हि कायम जास्तवेळ घरा बाहेर रहावे लागत असेल तर अश्या पेक्षा गुंतवणूक करून भाड्याने राहून पैसे जमवलेले काय वाईट...

आणि आयुष्याच्या चाळीसीत कळते राहण्यासाठी छोटी सुंदर शांत जागा असली आणि emi नसले तर काहीच जास्त लागत नाही..

अश्या वेळेस एखाद्या ला वाटले उगाच मागचे २० वर्षे जास्त धावा धाव केली, इतके तर मला नकोच आहे..:)

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Aug 2025 - 2:41 pm | अमरेंद्र बाहुबली

आवडले!

अबा, पर्याय एक मध्ये सर्वात शेवटी वीस वर्षात केलेल्या एकुण खर्चामध्ये सुरुवातीचे 50 लाखाचे डाऊन पेमेंट धरायचे राहून गेलेय. ते धरले तर पर्याय एक जास्तीचाच केविलवाणा वाटतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Aug 2025 - 11:12 am | अमरेंद्र बाहुबली

हो. पण प्रश्न असा आहे की लोक तरीही पर्याय २ च्या वाटेला जातातच का?

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Aug 2025 - 11:12 am | अमरेंद्र बाहुबली

दुरूस्ती- पर्याय १ असे वाचावे.I

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 9:47 am | सुबोध खरे

तरुण असताना एखादी बाई "ठेवावी" किंवा रोज रोज वेगवेगळ्या चान्गल्या गणिका पाहून मौजमजा करावी आणि पन्नाशीला आल्यावर एखाद्या पैसे असलेल्या विधवेबरोबर लग्न करावे.

लग्न करून रोज रोजची किटकिट आणि वारेमाप पैसाची उधळपट्टी थांबेल,

आयुष्यभर भरपूर पैसे वाचतील आणि बँक बॅलन्स चांगला लठ्ठ असेल आणि मौजमजा करता येईल

काय म्हणताय?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 10:03 am | अमरेंद्र बाहुबली

लग्न हा पैशांचा व्यवहार नसतो डॉ. साहेब! आणी बुको करायला कुणी कोटींचे कर्ज काढत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 10:05 am | अमरेंद्र बाहुबली

बायको*

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 11:17 am | सुबोध खरे

काय सांगताय?

तुमचा उत्पन्न शून्य असेल तर कोण मुलगी लग्न करणार आहे?

"सर्व काही" व्यवस्थित पाहूनच लग्न होतात ना? कफल्लक माणसाशी प्रेम आहे म्हणून लग्न केल्यावर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असेल तर लग्न टिकेल का?

आणि त्यातून

लग्न मोडायचं झालं तर आयुष्यभर द्यावी लागेल अशी पोटगी बोडक्यावर बसते.

तो पैशाचा व्यवहार नाही म्हणताय?

एवढी कटकट करण्यापेक्षा एखादी झकास बाई ठेवावी किंवा रोज रोज वेगळी गणिका.

पॆसा फेको और मजा करो.

आज डोकं दुखतंय, उद्या पाळी चालू आहे, परवा साडीच पाहिजे, एरवा शॉपिंगला जायचंय एक ना दोन हजार लफडी

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 11:27 am | अमरेंद्र बाहुबली

डॉ. साहेब सध्या तुम्ही आजारी आहात का? सगळ्याच ठिकाणी तुमचे लॉजिक गंडते आहे, काहीच्या काही उदाहरणे फेकत आहात! असो. आराम करा असे म्हणेन!

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 11:42 am | सुबोध खरे

हायला

तुमच्या सारखेच प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतोय तर ते झेपत नाहीत

कोरडं तर्कशास्त्र दाखवलं तर आजारी आहात का विचारताय?

लग्न हा भावनिक प्रश्न आहे तसाच स्वतःचं घर हा भावनिक प्रश्न नसतो का?

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 11:45 am | अमरेंद्र बाहुबली

लग्न हा भावनिक प्रश्न आहे तसाच स्वतःचं घर हा भावनिक प्रश्न नसतो का?
कसाकाय भावनिक प्रश्न? माझ्या ओळखीचे अनेक लोक आणी कलिग्ज भाड्याच्या घरात गेल्या १५ वर्षापासून राहताहेत! काहीना नोकरी संपल्यावर पुन्हा गावी जायचे आहे तर काहीनी सांगितले की ते उशिरा घेणार आहेत! त्यांच्या दृष्टीने तरी हा भावनिक प्रश्न नाही.

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 12:11 pm | सुबोध खरे

मी लग्नानंतर पहिली ११ वर्षे सरकारी घरात राहत होतो. यांनतर पुढची १३ वर्षे स्वतःच्या घरात राहत होतो.

यानंतर परत ८ वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो आणि आता गेली २ वर्षे परत स्वतःच्या घरात राहतो आहे.

या मुळे या दोन्हीत जमीन अस्मानाचा फरक आहे. याची तुलना मी दिलेल्या उदाहरणास चपखल बसते हे मी भरपूर स्वानुभवाने सांगू शकतो.

कोरड्या माणसांना हा भावनिक प्रश्न नसेल हि.

बऱ्याच वेळेस नाईलाजाने किंवा परिस्थितीमुळे माणसं भाड्याच्या घरात राहतात. आयुष्यभर भाड्याच्या घरात राहणारी माणसं सुद्धा कधीतरी आपलं स्वतःचं घर होईल या आशेवर जगत असतात.

स्वतःच्या घराबद्दलची आपुलकी आणि त्यात मिळणारी मानसिक सुरक्षितता भाड्याच्या घरात कधीही येत नाही आणि हि गोष्ट स्त्रियांबाबत प्रकर्षाने सत्य आहे.

बाकी आपण लिहिला आहे तो कोरडा व्यवहार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 12:21 pm | अमरेंद्र बाहुबली

डॉ. साहेब स्वतचे घर घेऊच नये असे मी म्हणत नाही, मी स्वत आज पर्यंत रेंटच्या घरात राहिलो नाहीये नी भविष्यातही राहणार नाहीये. प्रश्न हा आहे की करिअरच्या सुरुवातीलाच लोनचा मोठा खर्च बोकांडी बसवून घ्यायचा, आणी मग २० वर्षे तो खर्च फेडत बसा, माझ्या गणितात तरी मी ५० लाखाचे डाऊन पेमेंट सांगितले आहे, २० टक्के करून केवढा हफ्ता बोकांडी बसतो ते पहा, आणी घरच्या किमती इतकेच लोन फेडा! ह्याउलट तश्याच घरात रेंटने राहून २० वर्षे गुंतवले तर तेच घर २० वर्षाने कैश मधे घेता येऊनही मोठी संपत्ती उरते हे गणित दाखवत आहे मी नाही सांगत.
आता स्वतचे घर हे आत्म समाधान वगैरे ठीकाय, पण त्याच एवढी मोठी किंमत? आणी मला तरी नाही वाटत लोक आत्म समाधान वगैरेसाठी स्वतची घरे घेतात, वाढती महागाई, fomo, कुणीतरी कालीगणे मित्राने घेतले म्हणून घे, मार्केटीन स्ट्रॅटेजीचे बळी एस अनेक करणे असतात!

कानडाऊ योगेशु's picture

18 Aug 2025 - 12:04 pm | कानडाऊ योगेशु

ह्यावरुन एक विनोद आठवला.
पान टपरीवर एक गुटखा/सिगारेट पिणार्या तरुणाला एक टंच तरुणी ग्यान देण्याच्या हेतुने विचारते कि तू किती सिगारेट्/गुटखा दिवसातुन खातोस.? तो अमुक अमुक नंबर सांगतो. ती गणित मांडते एका दिवसात अमुक अमुक सिगारेटी/गुटखा ,इतक्या पैशाने एका दिवसात इतका खर्च.आठवड्यात इतका,महिनयत इतका व वर्षात इतका. ह्या हिशेबाने तु तमुक तमुक वर्षात जर हे तुला व्यसन नसते तर समोर उभी असलेली ऑडी विकत घेऊ शकला असता. ह्यावर तो तरुण म्हणतो कि बाई तुम्ही सिगारेटी/गुटखा खाता का?
नाही.
मग तुमची ऑडी कुठी आहे.?

तरुणी निरुत्तर...
तरूण म्हणतो बये ही ऑडी माझीच आहे. चल तुला फेरी मारुन आणतो..!

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 12:26 pm | अमरेंद्र बाहुबली

हा जोक बनवणाऱ्याच्या थोबाडावर जोडा हाणला पाहिजे, ५ रुपयाची विमल नी १० रुपयाची सिगॅरेट ओढणारा ऑडी कशी घेईल? कोणते गणित मांडले आहे? असले जोक pj ह्या कॅटेगिरीतही येत नाहीत.

अभ्या..'s picture

18 Aug 2025 - 12:54 pm | अभ्या..

ह्या हिशेबाने तु तमुक तमुक वर्षात जर हे तुला व्यसन नसते तर समोर उभी असलेली ऑडी विकत घेऊ शकला असता.
टंच तरुणी हुशार पण आहे. ती थोडीच म्हणतेय की तेवढ्याच पैशात आवडी आली असती. ती म्हणतेय हे व्यसन नसते तर.....
आरोग्य चांगले असताना आवडी काय फेरारी, लॅम्बो, रोल्स रोयस घेऊ शकता. शक्यता भरपूर असतात.
कोणे एके काळी रवी शास्त्रीला भेटली असावी बहुधा ती टंच तरुणी.
.
जाताजाता: जुबानकेसरी सिंघम सरांनी कॉफी विथ करन च्या एका सीझनमध्ये आवडी जिंकली.

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 12:33 pm | सुबोध खरे

तुमच्या गणितात बऱ्याच मूलभूत चुका आहेत. साधी सरळ म्हणजे ६% व्याजाने घराची किंमत २० वर्षांनी ३. २१ कोटी नव्हे तर ४. कोटी होते.

अशा अनेक मुद्दाम ठेवलेल्या (आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी) चुका आहेत. त्यामुळे त्यात न पडत मी मूलभूत मुद्दा मांडला होता.

ज्यांना हवे त्यांनी त्यातील चुका काढाव्यात.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 1:23 pm | अमरेंद्र बाहुबली

ठीक आहे — पुन्हा गणना करून दाखवतो.

फॉर्म्युल: **FV = PV × (1 + r)^n**

* PV = ₹1,00,00,000 (1 कोटी)
* r = 6% = 0.06
* n = 20 वर्षे

(1 + 0.06)^20 ≈ **3.2071354722**

म्हणजे,
**FV ≈ 1,00,00,000 × 3.2071354722 = ₹32,071,354.72**

तर उत्तर: **≈ ₹3.20 कोटी (₹32,07,1355)** — अचूकता साठी ગણित: **₹32,071,354.72**.

धाग्याला असे प्रतिसाद येतील असे अजिब्बात वाटले नव्हते.. बाई काय, लग्न काय :-)

पत्येकाने आपला, आपल्या वेळेसचा, आपल्या चषम्यातून दिसणारं जग हेच बरोबर हा अट्टाहास खरे तर सोडला पाहिजे..

आज कालचे कित्येक तरुण, हे investing माहित नसताना नाहक, घर या मुद्द्याकडे भावनिक पणे पाहून, जीवन stress free जगता येत असते हे विसरले आहेत.

ज्यांच्या कडे पैसा आहे, तो काहीही करू शकतो.. कितीही घरं घेऊ शकतो.

लेखकाचा मुळ मुद्दा, emi मध्ये विनाकारण व्याज देण्या पेक्षा गुंतवणूक करून स्वतःचे पैसे वाढवून नंतर स्थिर आयुष्य जगावे काय असा आहे.. आणि आजकाल ची कित्येक तरुण मुले हे अंगीकारत आहेत याचे मला कौतुक आहे..

मला जर २०१० ला हे कळाले असते, तर मी आता त्याच emi च्या पैश्यातून कर्ज न घेता घर घेऊ शकलो असतो, आणि शिवाय माझ्याकडे पैसे हि शिल्लक राहिले असते.

वरती मुळ धाग्यात मांडलेले गणित अवघड वाटत असेल will simplify that in next rpl..

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

सदर गणित चैट जीपीटी ने केलेले आहे, आणी ३ वेळा चेक करूनही आजचे १ कोटीचे घर ६ टक्के cagr ने २० वर्षांनी ३.२१ कोटींचेच होते आहे.

ठीक आहे — पुन्हा गणना करून दाखवतो.

फॉर्म्युल: **FV = PV × (1 + r)^n**

* PV = ₹1,00,00,000 (1 कोटी)
* r = 6% = 0.06
* n = 20 वर्षे

(1 + 0.06)^20 ≈ **3.2071354722**

म्हणजे,
**FV ≈ 1,00,00,000 × 3.2071354722 = ₹32,071,354.72**

तर उत्तर: **≈ ₹3.20 कोटी (₹32,07,1355)** — अचूकता साठी ગણित: **₹32,071,354.72**.

गणेशा's picture

18 Aug 2025 - 1:23 pm | गणेशा

पर्याय १ : घर कर्जावर

....घर किंमत : ५० लाख
....बँक कर्ज : ४० लाख (१० लाख डाऊन पेमेंट)
....व्याज दर : ८%
....मुदत : २० वर्षं

EMI जवळपास : ३३,४५० ₹

म्हणजे २० वर्षात बँकेला एकूण ८० लाखांपेक्षा जास्त रक्कम भरली जाते (४० लाख मूळ + ~४० लाख व्याज).

पर्याय २ : आधी गुंतवणूक, नंतर घर

....दर महिन्याला तीच रक्कम (३३,४५० ₹) म्युच्युअल फंड/इक्विटी मध्ये SIP
....सरासरी परतावा : १२% (दीर्घकाळात भारतात शक्य आहे)

मुदत : २० वर्षं

....२० वर्षांनी तुमच्याकडे एकूण फंड जवळपास ३ कोटी रुपयांचा होतो.
....त्या पैशातून छानस घर एकदम खरेदी करता येईल, आणि तरीही तुमच्याकडे काही कोटी/लाख त्यावेळेसच्या घराच्या किंमती प्रमाणे शिल्लक राहतील.

- निष्कर्ष

EMI = बँकेला व्याज

SIP = आपल्यालाच संपत्ती

म्हणजेच “घर” हे आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतं, पण कर्जाच्या जाळ्यात अडकून नाही तर गुंतवणुकीतून स्वातंत्र्य मिळवून घेणं जास्त योग्य.

- गणेशा...

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 1:24 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजेच “घर” हे आयुष्याचं उद्दिष्ट असू शकतं, पण कर्जाच्या जाळ्यात अडकून नाही तर गुंतवणुकीतून स्वातंत्र्य मिळवून घेणं जास्त योग्य.
हेच हेच! गणेशा साहेब! मला हेच समजून घ्यायचे आहे. खूप खूप आभार.

आता माबोवर एक धक्का धागा सुद्धा आलाय.

स्वतःचे घर घेऊन पैसे बुडीत खाती जमा झालेल्याचा. मागच्या महिन्यात एक कोकणातील घर( २०१९ मधले, अठ्ठावीस लाखाला घेतलेले) त्या मालकिणीला घर विकायचे आहे. आता २०२५ मध्येही तो बिल्डर याच किमतीला तसलं घर तिथेच देत आहे. तर त्याचा ताळमेळ आणि गणित सांगणारा विडिओ यूट्यूबवर आहे. पाहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 4:09 pm | अमरेंद्र बाहुबली

हो वाचला! त्या युट्यूब व्हीडिओची लिंक द्या!

विअर्ड विक्स's picture

18 Aug 2025 - 5:04 pm | विअर्ड विक्स

हा चावून चावून चोथा झालेला विषय आहे. याआधीसुद्धा दोन तीन धागे येऊन गेले.

घर आणि गाडी म्हणायला गेले तर स्टेटस सिम्बॉल अन दुसऱ्या बाजूने illiquid assets. मन नि बुद्धीची लढाई .

तर्क नी भावना यातील द्वंद् व . स्त्रीहट्ट नि बालहट्ट यातील कैची

तर्कसंगत हे भाडयाने राहणे हेच आहे.

सुबोध खरे's picture

18 Aug 2025 - 7:00 pm | सुबोध खरे

ज्या घरात तुम्ही राहता आहात ते घर हि गुंतवणूक नसून अत्यावश्यक असणारी बाब आहे.

आयुष्य भर भाड्याच्या घरात राहणे किती लोकांना पटेल हा एक वेगळा मुद्दा आहे.

मी वर लिहिल्याप्रमाणे १९ वर्ष भाड्याच्या घरात काढली आहेत. ११ वर्षे नौदलात असताना आणि नंतर ८ वर्षे स्वतःचे १ बेडरूम चे घर २५ हजार रुपये भाड्याने देऊन ३ बेडरूमचे घर ५०,००० भाड्याने घेऊन राहिलो होतो.

आमचे घर पुनर्रविकासाला जाणार जाणार म्हणू त्यासाठी न थांबता मी दर वर्षी ३ लाख रुपये अतिरिक्त असे ८ वर्षे (२४ लाख रुपये) टाकून दोन्ही मुलांसाठी स्वतंत्र खोली मिळावी यासाठी तीन बेडरूमचे घर भाड्याने घेतले होते. दोन वर्षांपूर्वी माझे स्वतःचे घर ( तीन बेडरूमचे) झाले. तोवर मुलीचे लग्न होऊन गेले होते. आता या खर्च झालेल्या २४ लाखाचा हिशेब करायचा कि तरुण मुलाला ८ वर्षे आणि मुलीला सात वर्षे (लग्न होईपर्यंत) स्वतंत्र खोली मिळाली याचा आनंद मानायचा ?
आयुष्यात पैशाचे महत्व किती हे ज्याने त्याने ठरवायचे आहे

हि १९ वर्षे भाड्याच्या घरात राहत असताना. आलेले वेगवेगळे अनुभव यांनी माझे असे ठाम मत बनलेले आहे कि स्वतःचे घर हे स्वतःचे असते. भाड्याच्या घरात आपल्या आवडीचा रंग देता येत नाही आवडीचे फर्निचर करता येत नाही कि त्या सोसायटीत तुम्हाला सर्व लोक उपऱ्यासारखेच वागवतात. ज्यांना १२ तास ऑफिस मध्ये काढायचे आहेत आणि परत आल्यावर कुणाशीही संबंध ठेवायचे नाहीत त्यांना भाड्याचे घर उत्तम आहे.

भाड्याच्या घरात राहत असताना पहिल्या घराच्या मालकाला दुबईतील नोकरी गेल्यामुळे परत यावे लागले तेंव्हा दोन महिन्यात घर सोडून दुसरीकडे घर बघावे लागले.
दुसऱ्या घरात आम्ही दोघे डॉकटर होतो आणि कोव्हीड मध्ये रुग्णसेवा करत होतो म्हणून सोसायटीच्या लोकांनी आम्हाला बाहेर काढायची धमकी दिली होती.

विशाखापट्टणम येथे भाड्याच्या घरात राहत असताना मी अंदमानला तैनात आणि घरात पत्नी आणि दोन लहान मुले असताना वादळ झाले आणि मुले आजारी अशी स्थिती असताना आजूबाजूचे कोणीही मदतीसाठी येऊ शकले नव्हते. ( त्यानच्याकडून त्या परिस्थितीत तशी अपेक्षा करणे हे बरोबर नाही हे मान्य करूनही) https://www.misalpav.com/node/34163

उरापोटावर कर्ज घेऊन घर घेऊ नये हे मान्य. पण तुमचा पगार वाढत जातो आणि इ एम आय मात्र तोच राहतो.

माझे स्वतःचे उदाहरण-- मी नौदलातून बाहेर पडताना पगार होता ४५००० रुपये आणि घराचा हप्ता १५ हजार होता. तेव्हा घर कर्जावर व्याजात ३० % कपात मिळत असे.म्हणजे प्रत्यक्ष खिशातून १० हजारच जात असत.
सहा महिन्यानी माझा पगार ७५ हजार झाला. तेंव्हा पगाराच्या १/३ असलेला हप्ता १/५ झाला. काही वर्षांनी उत्पन्न दीड लाख झाले तेंव्हा हप्ता १५ हजारच राहिला.

म्हणून म्हटलंय कि वरील उदाहरणात बरेच मूलभूत दुवे कच्चे आहेत.

भाड्याचे घर हे नक्कीच स्वस्त पडेल पण आपल्या मानसिक शांततेची किंमत किती होईल हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे आहे.

कोव्हीड मध्ये भाड्याच्या घराबाहेर काढले असते तर आपले स्वतःचे घर आहे हा एक प्रचंड मानसिक आधार होता. मान्य आहे कि हि अत्यंत अपवादात्मक परिस्थिती होती.

आज मागे वळून पाहताना माझ्या असे लक्षात येते कि जेवढी म्हणून भाड्याची घरे मी पाहतो आहे तेथे असलेल्या सुविधा तुमच्या घरात असणाऱ्या सुविधांच्या मानणारे त्रोटक आणि अपुऱ्याच असतात. कारण घर भाड्यानेच द्यायचे आहे तेंव्हा अधिक भांडवली खर्च का करा? असा सर्वसामान्य घरमालकांचा विचार असतो त्यातून घराचे भाडे हे साधारण मूळ किमतीच्या २-३ % च्या वर कधीच जात नाही यामुळे घर अतिशय उत्तम तर्हेने रंगवलेले आणि उच्च दर्जाचे फर्निचर असलेले मी कुणाच्याही घरात आजतागायत पाहिलेले नाही. याउलट माझ्या स्वतःच्या दोन्ही घरांमध्ये माझ्या आवडीचे उच्च दर्जाचे फर्निचर आणि मुलांच्या खोलीत एशियन पेंट्स कडून केलेले टेक्सचर पेंटिंग होते. महिना ५० हजार रुपये भाडे घेणारा घरमालक काही १ लाख रुपये घर रंगवण्यात घालत नाही.

येथे वाद घालणारे बहुसंख्य एक तर स्वतःच्या घरात राहतात किंवा भाड्याच्या.

दोन्ही घरात बरेच दिवस राहून प्रत्यक्ष अनुभव घेतलेले फार थोडे असतील

जसे वय वाढते तसे पैशाची किंमत कमी होते आणि तुम्ही जगलेल्या आयुष्याची किंमत वाढत जाते.

शेवटचा कळीचा मुद्दा --आयुष्यभर पोटाला चिमटा काढून पन्नाशी साठी ला स्वतःचे घर झाले तरी आपले तारुण्य हौस मौज न करता गेले याची खंत आयुष्यभर बाळगून मागची पिढी गेली अशी स्थिती आपली व्हावी का? हे ज्याने त्याने ठरवायचे आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Aug 2025 - 9:30 pm | अमरेंद्र बाहुबली

उत्तम, अनुभवी नी विचार करायला लावणारा प्रतिसाद! धन्यवाद डॉक्टर साहेब!

धागाकर्त्याने स्वतःची सध्याची परिस्थिती सांगितल्याशिवाय इथे चर्चा करणे कसे शक्य आहे ? उदाहरणार्थ,
१. महिना ४३,००० रुपये देणे सहजशक्य आहे का ? ही रक्कम पगाराच्या किती टक्के आहे ?
२. सध्या भाड्याच्या घरात रहात आहात किंवा कसे ? भाड्याचे असल्यास किती भाडे आहे आणि सोयी/गैरसोयी कोणत्या आहेत ? सध्याचे रहाते घर अचानक सोडावे लागू शकते का ? किवा कालांतराने तेच घर विकत घेता येईल का ? ते घर किती जुने आहे आणि सध्याची किंमत किती आहे ?
३. ५० लाख द्यायचे आहेत ते सहजपणे देण्यासारखे आहेत का ? त्याचे जे व्याज बुडेल, ते हिशेबात धरले आहे का?
४. जे घर घेणार, ते कसे आणि ते कितपत सोयीचे आहे ? पुढे दुसर्‍या शहरात वा परदेशात गेलात तर घराचे काय करायचे, याविषयी काय विचार आहे ... वगैरे.

मी १९९१ साली फरीदाबादला दोन मजली घर बांधले तेंव्हा प्लॉटसकट एकूण ८ लाख लागले होते. पैकी २ लाख कर्ज घेतले होते, ते १-२ वर्षातच फेडता आले होते. २०२२ साली घर विकून वीसपट पैसे मिळाले. मधली अनेक वर्षे वरचा मजला भाड्याने देत होतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 12:33 am | अमरेंद्र बाहुबली

सर्वप्रथम, हे उदाहरण माझे नाही. एक सहज डोक्यात आलेली कल्पना आहे.
५० लाख जाम करायला माझ्यासारख्या गरीब, होतकरू, कष्टाळू यंत्र अभियंत्याला बराच काळ आहे. :(

वेड घेऊन पेडगावला जाण्याचा धागा, मिपाकरांनी सतीचे वाण घेऊन दिलेले प्रतिसाद, शेवटी डोंगर पोखरून निघालेला उंदीर, आणि तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं.

धन्य आहात अबा. साष्टांग नमस्कार. गहिरे बिलंदर निघाले बुवा तुम्ही.

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 8:36 am | अमरेंद्र बाहुबली

तसे नाही चिगुकाका! मला घ्यायचे असेल तर बजेट थोडे छोटे असेल ६० ते ७०! बाकी अजून पुढील ५ वर्षे तरी मला स्वत: घर घेऊन त्यात राहायची गरज नाही. इन्वेस्टमेंट म्हणून घ्यावे का? त्याला रेंट वर देऊन काही निघतील असा विचार येतो कधी कधी! की mf इन्वेस्टमेंट बरी? असाही!

सुबोध खरे's picture

19 Aug 2025 - 10:07 am | सुबोध खरे

चित्रगुप्त साहेब

मी स्वत आज पर्यंत रेंटच्या घरात राहिलो नाहीये नी भविष्यातही राहणार नाहीये.

हा प्रतिसाद वाचला नाही का?

म्हणूनच मी लिहिलंय कि मुदलात बरीच खोट आहे.

भुजबळ अगोदर टंकलेखन करतात आणि मग विचार करतात

चालायचंच

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 10:09 am | अमरेंद्र बाहुबली

डॉ. साहेब मी हे देखील लिहिले आहे की इन्वेस्टमेंट म्हणून घ्यायचा विचार करतोय ते पण वाचा की!

सुबोध खरे's picture

19 Aug 2025 - 10:13 am | सुबोध खरे

निष्कर्ष

फक्त आकडेवारीनुसार: "भाडे + MF गुंतवणूक" हा पर्याय अजूनही प्रचंड फायदेशीर (८ कोटी विरुद्ध ३.२ कोटी).
पण: घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही.

तुम्ही अगोदरच निष्कर्ष काढून मोकळे झाला आहात कि

मग कशाला मिपाकरांना बसवताय बैलाच्या खाली दूध काढायला?

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Aug 2025 - 10:18 am | अमरेंद्र बाहुबली

तुम्ही अगोदरच निष्कर्ष काढून मोकळे झाला आहात कि
नाही. हे चॅट जीपीटीचे मत आहेत. पण चॅट जीपीटी काही माणूस नाही. शेवटी भाड्याच्या घरात नी स्वतच्या घरात राहणारे खरोखरीचे माणसे काय सांगतात हे महत्वाचे! त्यांचे अनुभव नी आर्थिक गणिते ह्याबद्दलचे मार्गदर्शन मलाच नाही तर अख्या मिपाजगताला मिळेल हा हेतू होता!

सुबोध खरे's picture

19 Aug 2025 - 7:07 pm | सुबोध खरे

मी स्वत आज पर्यंत रेंटच्या घरात राहिलो नाहीये नी भविष्यातही राहणार नाहीये.

हे आपणच लिहिता आणि वर ह्याबद्दलचे मार्गदर्शन मलाच नाही तर अख्या मिपाजगताला मिळेल हा शहाजोग पण कशासाठी?

तुम्ही तुमचं पहा कि!

मिपाकर आपलं पाहून घेतील!

मायबोली' वर याच धाग्याला एका दिवसात ११२ प्रतिसाद, इथे ३३ आणि शेवटी डोंगर पोखरून निघालेला उंदीर. मजा आहे.

कर्नलतपस्वी's picture

19 Aug 2025 - 6:11 am | कर्नलतपस्वी

आबा या महामानवाची आपल्याला ओळख असायला हवी. हे लोकांना कामाला लावतात व स्वता खुंटीवर बसून मजा बघता बसतात.

विअर्ड विक्स's picture

19 Aug 2025 - 12:23 pm | विअर्ड विक्स

आता मी यांची मानसिक स्थिती पूर्ती ओळखून चुकलो आहे. ह्यांची गोंधळली अवस्था आहे. म्हणून जरा अजून गोंधळ वाढवूया
१. नवरा नि बायको आजकाल दोघेही नोकरी करणारे असले तरी यापैकी कोणाचीही बदली होऊ शकते वा उभयतः कंपनी बदलू शकतात नाईलाजाने वा चांगल्या संधीसाठी अशावेळेस स्वतःचे घराजवळ नोकरी मिळणे हे सुख असते पण सर्वांना ते शक्य होत नाही . अपवाद ( आपण CA ,डॉक्टर वा तत्सम व्यायवसायिक असाल तर )
२. अजून एक उदाहरणच द्यायचे झाले तर बोरिवलीत राहते घर आहे नि कल्याण वा कळवा याठिकाणी नोकरी असेल तर स्वतःचे घर असून सुद्धा रोजचा ४ तास प्रवास फक्त स्वतःचे घर आहे म्हणून सगळेजण करतील का ?
३. स्वतःचे घर घेण्याचे टप्पे याआधी पण सांगितले आहेत , नवविवाहित - १ bhk , कुटुंब वाढले कि २ /३ bhk . अनेकजण स्वतःचे घर आहे म्हणून २ bhk घेण्याअगोदर १ bhk विकत नाही नी भाड्यावर देतात ते गुंतवणूक दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवहार आहे
४. प्रथम घर घेतांना अनुभव नसल्याने ,बजेट नसल्याने वा भावनिक होऊन घेतलेल्या घरामध्ये कायदेशीर व तांत्रिक अडचणी असू शकतात, उदा. ( OC /CC नसणं , conveyance लटकणे अशा अनेक भानगडी ज्या घर घेतल्यावरच कळतात आणि ते घर विकताना अडचणी येतात मग redevelopment ची वाट पाहण्याखेरीज गत्यंतर नसते
५. घर घ्यायचे असेल तर आपली अर्थार्जन हे १०-१५ किमीच्या परिघात असेल तर सर्वोत्तम . walk to home असेल तर स्वर्गच. आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या वयोपरत्वे बदलते त्याचा अंदाज घेऊन घराचा आकार ठरवणे . आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १ RK च्या साईज चे झालेत .
६. स्वतःचे घर असणे हि भावनिक गुंतवणुक आहे त्यामुळे वेळ आली तर बजेट खेचावे लागते .
७. घर भाड्याने देऊन मी गुंवणूकीसाठी घर घेतले असे तुम्हाला म्हणायचे असेल तर विषयच संपला

एकदम उत्तम प्रतिसाद दिला आहे.इथे सर्वांचा समज असा झाला होता की अबाला राहण्यासाठी स्वतः चे घर,एक कौटुंबिक सुरक्षितता म्हणून घर घ्यायचे की नाही हा प्रश्न आहे.पण त्याला गुंतवणूक म्हणून घर घ्यायचे असं दिसतंय.
पगारदारांनी गुंतवणूक म्हणून घर घ्यायचय म्हणजे..अबा लॉटरी लागलीय का एखादी ;)
गुंतवणूक म्हणून नोकरदारांनी घर घेऊ नये,अमोल साळे सरांचा लेख सगळ्यांनी वाचून या .https://www.facebook.com/100014017386097/posts/pfbid0tPQzExHY5M9jdFZ8c5P...

अमोल साळे सरांचा घर गुंतवणूक म्हणून नको व्हिडिओही सापडला.
https://youtu.be/rZ2glZ8fKDI?si=GdWcVt-eSbkjf1N9

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Aug 2025 - 2:46 pm | अमरेंद्र बाहुबली

दोन्ही लिंक बद्दल धन्यवाद ताई!

पण वरती हेच लिहिलेले आहे प्रतिसादा मध्ये तर पुन्हा ह्या link वर जाऊन तेच वाचायचे का? :)

अरे हो तेच लिहिलंय की :)
पण त्यात ते असंही सांगतात की घर घेऊ नका असे नाही पण गुंतवणूक म्हणून दुसरं घर घेऊन, मनी लिक्विडिटी वाया घालू नका.
अर्थात दुसरा मुद्दा येतो भावनांचा,तर तू बरोबर म्हटलं की चाळीसीत समजत emi घ्या नादात दोघांनी खुप धावपळ केली.पण यासाठी जोडीदाराचं एकमत खुप गरजेचे ,नाहीतर बायकोच्या हट्टापायी,लग्न जमवण्यासाठी मुलांना अनेकदा घर घ्यावच लागत ;)
मुलीही भावनिक होऊन,एक घर असताना दुसरं घर घेतात.
पण आता असा विचार करणाऱ्या स्मार्ट जोड्या दिसायला लागल्या आहेत.

सुबोध खरे's picture

20 Aug 2025 - 7:24 pm | सुबोध खरे

किती लोकांना भाड्याच्या घरात राहण्याचा अनुभव आहे?

अनुभव नसताना भाड्याचे घर छान आणि स्वस्त पडते हे बोलणे खूप सोपे आहे.

सर्व साधारणपणे भाड्याने दिलेले घर हे कधीच तुमच्या स्वतःच्या घराइतके उत्तम असत नाही हे मी गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे.

मी घराला साउंड प्रूफिंग करून घेतले आहे.

आमच्या सोसायटीच्या पुढे असणाऱ्या गावठाणातील कोणाचे लग्न, हळद, गणपती, गरबा बारसं या ना त्या कारणाने वर्षात दर महिना निदान चार पाच दिवस तरी लाऊड स्पीकरचा ठणाणा चालू असतो. अशावेळेस आपले घर भाड्याचे असेल तर आपल्याला ४ लाख रुपये देऊन साउंड प्रूफिंग करून घेता येईल का?

अशा शांत वातावरणात आपण उत्तम सिस्टीमवर संगीत ऐकण्याचा आनंद पैशात करता येत नाही.

घरच्या बाथरूम मध्ये असणाऱ्या किंवा फरशीच्या टाईल्स घराच्या आत लावलेली आपल्या आवडीची रंग संगती आपल्याला हवे तसे केलेले फर्निचर याची किंमत पैशात करणे अशक्य आहे. कृत्रिम छप्पर त्यात लावलेले मंद प्रकाश देणाऱ्या माळा दिवे इ यामुळे घराला येणार उठाव हा कोणत्याही भाड्याच्या घरात मला तरी दिसलेला नाही.
संध्याकाळी मंद प्रकाशात संगीत ऐकत कॉफी किंवा आईस्क्रीम चे सेवन करणे यासारखे स्वर्गसुख नाही.

( पिणेकर मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे माझे घर त्यांच्या ओल्या पार्टीसाठी अगदी आदर्श आहे) परंतु मी "त्यातला" नाही
माझ्या नव्या घरात या सर्व गोष्टी पाहून अनेक मित्रांना आपल्या घरातही असे करता येईल हि जाणीव झाली.

तारुण्यात काहीही चालून जाते. जसे आपले वय वाढत जाते तसे बँकेत असलेली रक्कम आपल्याला तेवढी महत्त्वाची वाटेनाशी होते.

बऱ्याच पन्नाशी नंतर च्या /वरिष्ठ नागरिकांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते कि आता बँकेत किती पैसे आहेत हा मुद्दा अत्यंत नगण्य वाटू लागतो आणि उरलेले आयुष्य शांततेत आणि समाधानात जगावे असे वाटत असते

त्यामुळे पन्नाशीला माझ्याकडे पाच कोटी आहेत कि १५ कोटी हा पंचविशीच्या आसपास आकर्षक वाटणारा विचार नगण्य होतो.

यामुळे जितके लवकर तुमचे स्वतःचे पहिले घर होईल तितके तुम्ही जास्त लवकर मानसिक दृष्ट्या स्थिर होता.

अर्थात यासाठी आपल्याला ना पेलणारी पगडी घातली तर ती डोईजडच होईल हा तारतम्य भाव असायला हवा.

बाकी स्थावर मालमत्तेच्या किमतीत होणाऱ्या वाढीचा सोनेरी काळ बऱ्यापैकी गेला असे वाटते.

मी स्वतः पनवेल ला ८ लाखात २००८ मध्ये घेतलेले घर ७ वर्षा नी ३२ लाखाला विकले. तसेच कासार वडवली घोडबंदर रोड येथे घेतलेले १५ लाखाचे घर ७ वर्षांनी ६८ लाखाला विकले. हेच पैसे टाकून आणि गृह कर्ज घेऊन मी सध्याचे घर विकत घेतले आहे जे मला पंच तारांकित घरासारखे वाटते.

त्याच बरोबर २०१५ मध्ये घेतलेले २० लाखाचे बदलापूर येथील घर शेवटी ९ वर्षांनी २०२४ मध्ये ३१ लाखाला विकले म्हणजे केवळ ५ % वृद्धीने. अर्थात हा व्यवहार आत बट्ट्याचा ठरतो. ( हे पैसे मी गृहकर्ज फेडण्यात वापरले)

थोडक्यात राहते घर हि गुंतवणूक नसून आवश्यक गोष्ट आहे असेच मी मानतो. जसे कितीही महाग झाले तरी स्त्रीला निदान एक मंगळसूत्र तरी सोन्याचं असावे असेच वाटते.

आणि गेल्या काही वर्षात ( निश्चलनीकरण कोव्हीड अशी काहीही कारणे असोत) स्थावर मालमत्तेतून मिळणार परतावा हा बाजारातून मिळणाऱ्या परताव्या पेक्षा बराच कमी झालेला आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी घर घेणे हे सध्यातरी फायद्याचे नाही असे माझे मत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

20 Aug 2025 - 8:01 pm | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद डॉक्टर साहेब!

गणेशा's picture

21 Aug 2025 - 8:01 am | गणेशा

डॉ. साहेब नमस्कार

मुद्दे पटतातयेत तुमचे..
प्रतिसादात लिहायला गेलो आहे.. पण खूप निमूळता प्रतिसाद बनतो आहे म्हणून वेगळा स्वतंत्र प्रतिसाद लिहितोय तुमच्या मुद्द्याला...
त्यास याचा प्रतिसाद समजावा

आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १ RK च्या साईज चे झालेत.
+१०००

नचिकेत जवखेडकर's picture

19 Aug 2025 - 6:58 pm | नचिकेत जवखेडकर

माझी एक बहीण पुण्यामध्ये भाड्याच्या घरात राहत होती. दर ११ महिन्यांनी जागा सोडावी लागायची. आता तरुण असताना दर ११ महिने, १ वर्षांनी जागा सोडून नवीन घर बसवा वगैरे उद्योग परवडतील अथवा झेपतील. लहान मुले असताना, थोडं वय झालं, की या गोष्टी खरंच झेपणार आहेत का याचा विचार केलेला बरा. हा ११ महिन्यांचा करार सगळीकडे असतो का माहित नाही पण हे मी प्रत्यक्ष बघितलेले आहे त्यामुळे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहायला मी तरी नक्कीच विचार करीन. किती कोटी मिळतील अथवा वाचतील हा मुद्दा नंतरचा. अर्थात हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. प्राधान्यक्रम प्रत्येकाचा वेगळा असू शकतो.

आजकाल १ bhk हे पूर्वीच्या १ RK च्या साईज चे झालेत.
+१०००

कपिलमुनी's picture

20 Aug 2025 - 7:43 pm | कपिलमुनी

आकडे फेकून अक्कल येत नाही ..
हे असे आकडे नेटवर्क मार्केटिंग वाले पण फेकतात..
उद्या सविस्तर लिहितो..

पाषाणभेद's picture

20 Aug 2025 - 7:51 pm | पाषाणभेद

घर घेणं आजकाल सोपे राहीलेले नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Aug 2025 - 11:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"घर खरेदी म्हणजे मानसिक सुरक्षितता, भाड्याचा त्रास नाही."
बरोब्बर. घर खरेदीमागचे हेच कारण असते."आपल्याला इकडुन कोणीच 'जा' म्हणून सांगू शकत नाही हे समाधान असते. स्वतःचे घर्,स्व्तःची गाडी असणे, ते ही एका वयात ह्यात समाधान असतेच. ७० व्या वर्षी एस.यु.व्ही.घेण्यात समाधान नसेल तसेच त्या वयात स्वतःचे घर घेण्यातही समाधान नसणार.

साहना's picture

21 Aug 2025 - 3:11 am | साहना

सगळंच गणित गंडलेलं आहे. असंख्य चुकीची गृहीतके आहे. कृपया लोकांना आर्थिक सल्ले नका देऊ. त्याशिवाय आपले आर्थिक निर्णय सुद्धा आपल्यापेक्षा चतुर लोकांना हाताला धरून घ्या

चार दिवसात सोळाशे टिकल्या,छप्सपन्रान प्रतिसाद.

री चारशे वाचक, चौदा प्रतिसाद.

स्वताचे पत्ते ओपन न करता मोघम लिखाण.

लेख लिहून स्वता पाॅपकाॅर्न घेऊन बसलेत.

घर घ्यायचेच नाही.

मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी.

लेखकाचे अभिनंदन.

कर्नलतपस्वी's picture

21 Aug 2025 - 5:52 am | कर्नलतपस्वी

चार दिवसात सोळाशे टिकल्या,छप्पन प्रतिसाद.

सरासरी चारशे वाचक, चौदा प्रतिसाद.

स्वताचे पत्ते ओपन न करता मोघम लिखाण.

घर घ्यायचेच नाही.

लेख लिहून स्वता पाॅपकाॅर्न घेऊन बसलेत.

मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी.

लेखकाचे अभिनंदन.

हा हा , बरोबर कर्नल काका!

मिपाकरांना कामाला लावण्यात लेखक यशस्वी.

लेखक कोपऱ्यात बसून पॉपकॉर्न खात आहेत ;)
लेखकाचा हा धागा आठवतोय का ?
मस्त जुळतं आमचं
https://www.misalpav.com/node/52802
सर्व मिपाकरांना टेन्शन आणलं होतं! सगळ्यांना समजावं लागेल.
मला तर वाटलं माझ्या भावाचं पाऊल वाकडं पडतं काय..
लेखकं सर्वात लहान म्हणून त्यांना सर्व माफ असतयं ,हा हा ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Aug 2025 - 1:01 pm | अमरेंद्र बाहुबली

लेखक कोपऱ्यात बसून पॉपकॉर्न खात आहेत ;) नाही ताई! वाचतो आहे, बहुमूल्य मार्गदर्शन मिळत आहे, घर घेऊ नये हा विचारही पक्का होतो आहे!
सर्व मिपाकरांना टेन्शन आणलं होतं! सगळ्यांना समजावं लागेल. :) ताई पण तुम्हा सर्वांच्या समजावण्याने काहीही फरक पडलेला नाही, गाडी सुसाट सुटलीय! :)

Bhakti's picture

21 Aug 2025 - 1:13 pm | Bhakti

हे राम!
जाऊ दे जास्त सांगत नाही.नाहीतर मी विषयांतर करणारी असा ठपका परत बसेल ;)
-I am not robot

सर्व मंडळी उन्नयनी (लिफ्ट) मधून पहिल्या मजल्यावरून ५० व्या मजल्यावर जात असताना आपण २ ऱ्या मजल्यावर अवफःक्षेपण (पाद मारून) करून ३र्या मजल्यावर उतरावे आणि इतर सर्वाना त्या घाणीत राहण्यास भाग पाडावे हे गणित असेल तर बरोबर आहे.

गणेशा's picture

21 Aug 2025 - 8:42 am | गणेशा

डॉ. साहेब नमस्कार!

तुमचे मुद्दे पटले आहेत..आणि तुमच्या प्रत्येक प्रतिसादाचा निष्कर्ष एकच असला तरी तो मनाला पटतो आहेच..
जश्या नाण्याला दोन बाजू असतात.. तसे या दोन्ही बाजूच्या काही फायदेशीर गोष्टी आहेत..
परंतु हे फायदे तोटे हे व्यक्ती सापेक्ष असल्याने प्रत्येकाच्या जगण्याच्या priority नुसार हेच अगदी बरोबर हे ठरवता येत नाही..
तुमचे मुद्दे हे प्रामाणिक आहेतच आणि तुमच्या स्वानुभवाचे आहेत, आणि त्यातील फायदे तोटे त्यामुळे तुम्ही येथे सांगू शकला आहात..
त्याला उत्तर general पणेदेता येईनात, आणि ते दिले तरी तुम्ही पुन्हा तुमचे अनुभव त्या पेक्षा बरोबर आहेत हे दर्शवीत असल्याने
त्याच्या मध्ये तितक्याच प्रामाणिक पणे आणि स्वानुभवाचे इतर मुद्दे लिहिले पाहिजेत, येथे तुमच्या मुद्द्याला खोडण्याचा नक्कीच प्रयत्न नाहीये, ते त्या जागेवर योग्यच आहेत

..
जसे तुम्ही म्हणाला, भाड्याच्या घरात राहण्याचा काय अनुभव आहे काय, तर हा मुद्दा प्रामाणिक पणे मी मान्य करतो, जरी १५ वर्षे एकटा मी भाड्याने राहिलो असलो तरी पूर्ण family बरोबर मी भाड्याच्या घरात कधी राहिलो नाही, त्यामुळे टी अड्जसमेंट मी अनुभवली नाही...

परंतु लग्नाच्या आधी माझे घर असावे आणि आई वडिलांच्या गावाकडील वास्तव्या मुळे ते जमिनीवरच असल्यावर किती त्यांना हि भारी होईल ह्याच मुद्द्याने मी या भावनिक म्हणा किंवा गरजेचे म्हणा मी लग्ना आधी २ वर्षे घर घेतले...(घर घेताना आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या निदान महत्वाच्या सोई बघूनच घर घेतले जाते हे गृहीत धरलेले आहे)

परंतु याची कसरत करताना तेंव्हाच्या पगारातुन जेंव्हा हप्ता जायला लागला तेंव्हा कळाले नुसते घर चार भितींचे नसते, तेथे रहायचे असल्याने गरजेनुसार आपण तेथे गोष्टी बदलतो.. विकत घेतो.. अगदीच तुम्ही म्हणाला तसा साउंड प्रूफ पण करतो..
त्यामुळे साहजिकच पूर्ण family members च्या म्हणण्या नुसार त्यात गोष्टी अधिक करण्यात आणखीन पैसा गेला...
(आणि नंतर लग्न. त्या नंतरच्या घरातील गोष्टी.. ह्या पण नंतर लागल्याच)

या सर्वा मध्ये खूप ओढातान होत राहिली कारण पगार जास्त वाढला नाही पण emi.. अधिकचे घरातील गोष्टी मुळे घेतलेल्या PL च्या load मुळे घर खर्चाला पैसे कमी पडू लागले...

(बायको कमावती असावी कि नसावी हे तर वयक्तिक मानू, आणि येथे ती नंतर home maker आहे असे समजा)

आणि या विवंचनेतून, मग पैसे नसल्याने गृह कलह (भांडणे असे नाही) पण बऱ्याच गोष्टीत तडजोडी कराव्या लागत होत्या..
आणि अश्यातच जॉब सोडावा लागला... नविन जॉब मिळे पर्यंत हप्ते भरता येईनात..
मग कळाले हे घर माझे आहे हे जे मी म्हणतो तो दिखावा आहे.. हे घर भाड्याचे नाहीये.. परंतु हे घर बँकेचे आहे, आणि असेच हप्ते नाही भरले तर ते ते घर आपल्या पासून हिरावून घेणार...

मग चालू झाली पैसे जुळवा जुळव.. इकडून तिकडून.. मग घे ह्याच्या कडून त्याच्या कडून...पार सावकाराच्या दारात जावे लागले...आणि जरासा चांगला जॉब मिळाला पण तो मुंबईत, त्यात लग्न झाले,
लग्ना नंतरचा काळ मस्त फिरत आनंदाने काढता यावा हे प्रत्येकाला वाटत असतेच.. पण याच वेळेस आर्थिक नियोजन बिघडल्याने, किराणा आणायला पण पैसे नसल्याने cr card मारावे लागली... त्या नंतर असे काही खर्च येत कि साठवले पैसे कि उडलेच पाहिजेत...मग बायको आणि फॅमिली पुण्यात घर आपल आहे त्यात.. आणि मी मुंबईत भाड्याच्या घरात रहावे लागले..पुन्हा हि तडजोड च होती..

नंतर ज्यांचे पैसे घेतलेले त्यांचे देणे आले, कि पगार आहे घे लोन देऊन टाक करत करत पुन्हा आर्थिक चंचण...पुनः cr card चे हप्ते.. पुन्हा हे सर्व करत करत दहा वर्षे लोटली...

आणि मग कळाले प्रत्येकाच्या अनुभवाने हे च कसे बरोबर असे दरवेळेस नसते...
माझे तर असे आहे हा अनुभव माझा मला आवडला नाही, त्यामुळे माझ्या सारख्या माणसांने या emi च्या आणि cr card च्या चक्रात अडकू नये असे वाटले..
त्यामुळे अनुभव हा बरोबर असतो तसा तो चुकीचा हि असतो आणि माझ्या बाबतीत तो चुकीचा ठरला..
मग या ऐवजी कसे आर्थिक नियोजन केले पाहिजे होते.. कसे केले पाहिजे होते हे मी येथे देत नाही.. मी माझ्या आर्थिक नियोजन का share मार्केट च्या धाग्यात दिले आहे.)

आता कदाचित मी यशस्वी म्हणता येणार नाही परंतु आर्थिक नियोजन योग्य करून जास्तचे पैसे कमवून पार vw मध्ये फिरत असून आणि कसे हि खर्च करत असलो तरी हे २०२० नंतरची आर्थिक नियोजना मुळे करता आले हे मी विसरत नाही.. आणि या मज्जेला अशी काळी किनार आहेच..

वरती लिहिलेले असे समजू नये कि मी खूप पिचलेला होतो.. कारण समाजात राहताना माणसाला स्वतःची इमेज संभाळावी लागते, नाहीतर समाज त्याच्या आर्थिक स्तिथी वरुन त्याची लायकी काढायला मोकळा असतो, ती इमेज हि मी जपलेली आहे.

मग ह्यात माझे निर्णय कसे चुकीचे हे शोधने सोप्पे असले तरी माझ्या सारखा एक जरी असेल तर त्याने या गरतेत येण्या अगोदर घर घेण्याची घाई न करता निदान १० वर्षे पैसे जमवावे, ते invest करावेत हा सल्ला द्यायला मला भाड्याच्याच घरात राहण्याची गरज आहे का? आणि हा सल्ला भाड्याच्या घरात राहत नसल्याने फुकाचा होतो काय?

- गणेशा...

सुबोध खरे's picture

21 Aug 2025 - 10:14 am | सुबोध खरे

मग ह्यात माझे निर्णय कसे चुकीचे हे शोधने सोप्पे असले तरी माझ्या सारखा एक जरी असेल तर त्याने या गरतेत येण्या अगोदर घर घेण्याची घाई न करता निदान १० वर्षे पैसे जमवावे, ते invest करावेत हा सल्ला द्यायला मला भाड्याच्याच घरात राहण्याची गरज आहे का? आणि हा सल्ला भाड्याच्या घरात राहत नसल्याने फुकाचा होतो काय?

कुणाचाही सल्ला बरोबर किंवा चूक असतो हे काळ सापेक्ष आहे.

त्यातून प्रत्येक अनुभव आपणच घेणे म्हणजे रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यातून आपणच जाणे हे असते.

पुढचा खड्ड्यात पडला तर आपणही त्या खड्ड्यात जाऊ नये एवढाच दुसऱ्याच्या अनुभवाचा फायदा असू शकतो.

आपण म्हणताय त्याचा उलट अनुभव मला आहे.

२००३ मध्ये जेंव्हा मी माझे पहिले घर विकत घेतले तेंव्हा मुलुंडला भाव एक चौरस फुटाला ३००० होता तेंव्हा मी ते घर १८ लाखाला घेतले (मुद्रांक शुल्क आणि इतर सर्व खर्च धरून). (लष्करात असल्यामुळे माझ्याकडे काळा पैसा नव्हताच सर्व व्यवहार हा चेकनेच झाला होता)

हेच घर पुढच्या १० वर्षात सव्वा कोटी रुपयाला माझ्या शेजाऱ्याने विकले.म्हणजेच दहा वर्षात हा भाव सरासरी १९ टक्क्याने वाढला होता.

त्यामुळे मी जर त्यावेळेस थांबलो असतो तर हे घर मला परत केंव्हा घेता आले असते हे सांगता येणार नाही.

एक त्तर माझ्याकडे १८ लाख नव्हते माझे ३ लाख आणि १५ लाखाचे कर्ज असा तो हिशेब होता. त्यातून त्याचा हप्ता १४३०० होता त्यापैकी मला ४३०० रुपये ( ३० %) करातुन वजावट मिळत होती

मी तेंव्हा हे तीन लाख बाजारात गुंतवले असते आणि दरमहा १० हजार ( माझा इ एम आय) एस आय पी केली असती तर याच्या निम्माने सुद्धा परतावा मिळाला नसता. आणि मी फार लांब काळपर्यंत घर घेण्यापासून वंचित राहिलो असतो.

संधीची किंमत हि अशी असू शकते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Aug 2025 - 11:54 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"२००३ मध्ये जेंव्हा मी माझे पहिले घर विकत घेतले "
२००२-२००३ ह्या काळात ज्यानी मोठ्या शहरांमध्ये घरे घेतली होती ते नशिबवान ठरले आहेत.. असे माझे निरिक्षण आहे. (अर्थात घर विकल्यावर , चांगली किंमत मिळाल्यावरच हे म्हणता येते). घर राहण्यासाठीच घ्यायचे असेल तर घराची भविष्यातील किंमत किती..हा प्रश्न पडु नये.
तसेच करोना आधी(२०१६-२०१८) ज्यानी फ्लॅट्स घेतले त्यांच्या घराची किंमतही बरीच वाढली आहे असे दिसले आहे.

त्यातून प्रत्येक अनुभव आपणच घेणे म्हणजे रस्त्यावरील प्रत्येक खड्ड्यातून आपणच जाणे हे असते.

तुमचा अनुभव आणि माझा अनुभव हा वेगळा आहे, म्हणजे आपला दोघांचा दृष्टिकोन हा व्यक्ती सापेक्ष आहे, आणि त्या नुसार आपण वागत किंवा बोलत आहोत, दोघे हि चूक नाहीच..

कुणाचाही सल्ला बरोबर किंवा चूक असतो हे काळ सापेक्ष आहे.

नाही...
वाक्य असे असावे लागेल

सल्ल्याचे मोजमाप हे योग्य अयोग्य ने नाही जर काळाने होत असेल तर
सल्ला हा सत्यच नाही, तो तर फक्त त्या वेळचा दृष्टीकोन असेल. आणि तो दृष्टीकोन हा व्यक्ती सापेक्ष असेल

म्हणून माझे फक्त एव्हडेच म्हणणे आहे, प्रत्येक गोष्टीला आपल्याच दृष्टिकोनातून नाही पाहता येणार.. नाही तर आपल्या ला इतरांचा दृष्टिकोन कायम चूक वाटत राहिल आणि त्यातून तुम्ही भाड्याच्या घरात राहिला नाही त्यामुळे आर्थिक सल्ला द्यायला काही लागत नाही हे म्हणणे पुढे येत राहिल.कारण प्रत्येकाच्या दृष्टीकोनाला परिस्थिती वेगळी आहे.

सारांश:
सल्ला हा दृष्टीकोन + परिस्थिती + काळ या नुसार ठरत असला तरी त्या वर निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतःवरच असते
आणि त्यावेळेस स्वतःचा दृष्टीकोन + परिस्थिती हि सल्ला देणाऱ्या पेक्षा वेगळी असू शकते.

- गणेशा...

सुबोध खरे's picture

21 Aug 2025 - 7:53 pm | सुबोध खरे

मी आपला सल्ला/ अनुभव चूक आहे असं कधीच म्हटलेलं नाही.

मी फक्त दुसरी बाजू दाखवली एवढाच.

प्रत्येकाने आपली परिस्थिती आणि आर्थिक स्थिती पाहूनच निर्णय घ्यायचा असतो.

गुंतवणूकीचा सल्ला --मग तो शेअर असो कि डेरिव्हेटीव्ह / म्युच्युअल फंड किंवा सोनं वा स्थावर मालमत्ता-- हा ज्याचा त्याने पारखूनच घ्यावा. दुसऱ्याच्या अनुभवाचा फार फायदा होईल असे नाही

कपिलमुनी's picture

21 Aug 2025 - 10:28 am | कपिलमुनी

घर सोय असावी कि लक्झरी ?
मि २०१४ ला रावेत येथे ४० लाखात घर घेतले ..२०२५ त्याची किंमत ७५-८० लाख आहे .. १० लाख डाउन पेमेंट ३० लाखाचा हप्ता धरला तर ते मि १० वर्षात फेडले..
त्याच वेळी मी पिंपळे सौदागर मध्ये घर घेतले असते तर तेव्हच ते ६५ लाखाला होते आता १ कोटीला आहे ..

आता हिशोब बघू व्याज मुद्दल धारून 45,62,400 फेडले ,, सुरुवातीचे १० लाख दाम दुप्पट झाले असे गृहीत धारू (२० लाख) -- असे ६५ लाख एकूण खर्च आला ..
---------------
२०१४ साली १५,००० भाडे होते आता २५-२७ हजार आहे. सो ५% वाढ होत आहे .
मि एव्ढ्या वर्शात ₹25.6 lakh भाडे दिले असते .

सध्या घराची किंमत आणि भाडे मिळून १ कोटी च्या आसपास आहे ... इंडेक्स फंड मध्ये १ कोटी ३० लाख वगैरे झाले असते ..

पण इथून पुढे पण माझे भाडे वाचणार .. आणि प्रोपर्ती किंमत वढणार आहे ,

रोज धाग्यावर एक तरी चक्कर होतेच. येउंद्या अजुन. माझ्यासारख्याला उपयोग होईल.

विअर्ड विक्स's picture

22 Aug 2025 - 10:51 am | विअर्ड विक्स

अनेक जण घर घेऊन नफा कमवला असे उदाहरणे देत आहेत , त्यासाठी पुढील मुद्दे महत्वाचे आहेत .

१. घराचे ठिकाण - जी नव उगवती क्षेत्रे आहेत तेथे तुम्हाला वाढीव भाव मिळेल पण हाच तर्क जे आधीच सुबत्ता असलेल्या ठिकाणाला वा उपनगराला लागू होईल असे नाही
२. मुळात राहण्यासाठी घेतलेले घर कोणी भविष्यात काय किंमत होईल या हिशेबाने घेत नाही तर आजू बाजू ला असणाऱ्या सोयी सुविधा , शाळा व आपले बजेट या हिशेबाने घेतात.
३. रेरा , नोटबंदी , कोविड आणि मनमोहन सरकारात अवाजवी वाढलेला फुगा यामुळे रिअल इस्टेट मध्ये असणारे परताव्याचे प्रमाण कमी झाले आहे. अपवाद अजूनसुद्धा काही परिसर शहरात असे आहेत ( ठाणे माजिवडा वा वाकड इ ) जेथे २-३ वर्षात उत्तम परतावा मिळतो म्हणजे फॉउंडेशन ते हॅन्डओवर पर्यंत उत्तम वाढ होते . परंतु अंडर construction घर घेणे हे मला पटत नाही कारण कितीही नामचीन बिल्डर असले तरी प्रोजेक्ट रखडला कि कोणी वाली नसतो . आजकाल fractional रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट पण चालू आहे पण माझा त्यात अनुभव नाही कारण जी इन्व्हेस्टमेंट मध्ये रिस्क आहे ( शेअर मार्केट सोडून कारण जे काही आहे ते माझ्या डोळ्यासमोर होते ) असे ठिकाणी गुंतवणूक मी टाळतोय . ( DSK डिबेंचर आणि P२P मध्ये हात पोळले आहेत )

सुबोध खरे's picture

22 Aug 2025 - 11:08 am | सुबोध खरे

बाडीस

गणेशा's picture

22 Aug 2025 - 3:00 pm | गणेशा

Best प्रतिसाद

कानडाऊ योगेशु's picture

22 Aug 2025 - 1:50 pm | कानडाऊ योगेशु

मी स्वतः कामानिमित्त बराच काळ भाड्याच्याच घरात राहत आलो आहे. कुटुंबासहीत. घरमालकाचे खरे रंग घर सोडताना कळतात. ह्यावर मागे एक धागा सुध्दा काढला होता.
उज्जैनमध्ये राहत असताना घरमालक खालच्या मजल्यावर व आमचे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते.त्याने हे घर आधी स्वतः च्या मुलांसाठी दुमजली असे बनवले होते.त्यामुळे टाईल्स वगैरे महागड्या लावल्या होत्या. तेव्हा सामान शिफ्ट करताना अगदी डोळ्यात तेल लावुन टाईल्स वर ओरखडे पडणार नाहीत ह्याच्या सूचना देत होता. तसेच कन्या कथ्थक करताना पायांचा जास्त आवाज आला तर खालुन विचारणा केली जायची. बाकिच्या बाबतीत तसा काही त्रास नव्हता पण स्वतःच्याच घरात (भाड्याने का असेना) चोरपावलांनी फिरावे लागे. भाड्याच्या घरात तुम्हाला नेहेमी दुय्यम नागरिक म्हणुनच राहावे लागते.

कपिलमुनी's picture

22 Aug 2025 - 3:55 pm | कपिलमुनी

१. दुय्यम नागरिक म्हणून सोसयटी मध्ये वागणूक
२. सतत घर बदलल्ले कि मुलांचे मित्र बदलतात , त्यांना अ‍ॅडजस्ट करायल खुप वेळ जातो . मित्र होत नाहीत ..
-- हा ड्रॉबॅक मोठा वाटतो.

अभ्या..'s picture

22 Aug 2025 - 4:17 pm | अभ्या..

भाड्याच्या घरात तुम्हाला नेहेमी दुय्यम नागरिक म्हणुनच राहावे लागते.
हे एका अंशी बरोबर आहेच. मला तर अशा खूप परिस्थितींचा अनुभव आहे. लहानपणी स्वतःचे मोट्ठे घर ते किशोरावास्थेत लहानसे भाड्याचे घर, त्यानंतर परत घरे आणि गांवे बदलत बदलत नातेवाईकांच्या घरातही राहणे, त्यानंतर स्वतःचे भाड्याचे घर, त्यात कित्येक बदल, अगदी स्वतःचे घर घ्यायचेच असे होऊनही परिस्थितीनुसार घेतलेली माघार, असा प्रवास झालेला आहे.
लग्नानंतर चार भाड्याचे घरे झाली पुण्यात. पहिल्या सोसायटीत वन बीएच्के मग तिथेच टू बीएच के, ते बदलून मग ज्या सोसायटीत भाड्याने राहायला आलो ती आवडली आणि तेथेच बिल्डरने प्रमोटर्स साठी राखून ठेवलेला फ्लॅट मिळवला. त्यामुळे एकाच सोसायटीत भाड्याने राहत असताना आणि तिथेच मालक झाल्यावर मेंबराकडून कशी वागणूक मिळते आणि आपल्याला काय फरक पडतो ह्याचा चांगलाच अनुभव आहे.
कोविडोत्तर खरेदी असली तरी चांगल्या एरियात चांगल्या लोकेशनला फ्लॅट असल्याने किंमतीत वाढ समाधानकारक आहे पण हेही घर सोडून आता परत भाड्याने राहावे लागतेय तेंव्हा अ‍ॅज अ घरमालक आणि भाडेकरु असे दोन्ही रोल एकाच वेळी पार पाडावे लागत आहेत. ज्या अपेक्षा आपण भाडेकरुकडून करतो त्याच पध्दतीने आपण स्वतः राहायचे (थोडे जास्तच जाचक नियम आणि वातावरण असताना) ही तारेवरची कसरत चालू आहे.

स्वधर्म's picture

22 Aug 2025 - 5:25 pm | स्वधर्म

भाड्याच्या घरात सर्वात मोठा तोटा हा की मालक कधीही तुंम्हाला घर सोडून जा असे सांगू शकतात आणि त्या एक महिन्यात दुसरे पसंतीचे वाजवी घर मिळेलच असे नाही. तो ११ वा महिना खूप बेक्कार जातो.

नविन धागा सुरु करु की इथेच लिहु तेव्हडे सांगा. थोड्क्यात म्हणजे वर जी काही चर्चा झाली आहे त्या सगळ्यांची मिळुन एक खिचडि आहे माझ्याकडे सद्ध्या.उद्या ह्या वेळेच्या आसपास लिहुन टाकायचा प्रयन्त करेन.

चिखलू's picture

26 Aug 2025 - 12:46 am | चिखलू

नविनच चर्चा सुरु करतो. जमल्यास आपले विचार मान्डावेत ही विनंती.

धर्मराजमुटके's picture

25 Aug 2025 - 9:25 am | धर्मराजमुटके

आपला देह हेच एक भाड्याचे घर आहे. मालकांनी बोलावल्यावर लगेच सोडून जावे लागते. नोटीस मिळत नाही. अचानक जावे लागते त्यापेक्षा इथे ११ महिन्याच्या करारावर भाड्याने राहिलेले चांगले. बाहुबली साहेब तुम्ही नक्की भाड्याच्या घरात रहा. तुमच्या निर्णयास माझे अनुमोदन आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2025 - 9:39 am | अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद!