लोकतंत्र वाचविण्यासाठी "SIRची" आवश्यकता

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
6 Aug 2025 - 7:01 am
गाभा: 

मतदाता यादीचे विशेष गहन पुनरीक्षण करणे म्हणजे SIR. नुकतेच बिहार राज्यात निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया राबवून मतदार यादीतील नावांची सत्यता तपासली. निवडणूक आयोगाने मृत, स्थलांतरित किंवा एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत मतदारांची नावे मतदाता यादीतून हटवली.

बिहार मध्ये राबविलेल्या SIR प्रक्रियेचे परिणाम :

मुख्य निष्कर्ष (जुलै 2025 पर्यंत):

7.23 कोटी मतदारांपैकी 99.86% मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.
64 लक्ष मतदारांची नावे हटवली जाण्याची शक्यता आहे त्यात:
22 लक्ष मृत मतदार
35 लक्ष स्थलांतरित किंवा ज्यांचे पत्ते मिळाले नाहीत
7 लक्ष मतदार एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत.
1 लक्ष मतदारांचा कुठेही पत्ताच नव्हता.
राजकीय पक्ष निवडणूक आयोगासमोर 1 सेप्टेंबर पर्यन्त आपत्ति आणि दावे दाखल करू शकतात.

बिहारच्या सीमांचल भाग किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहार येथे आधारकार्डांची संख्या तिथल्या जनसंख्येपेक्षा सव्वापट जास्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटते, "सर" प्रक्रियेचा मुख्य उद्देश्य त्यांच्या मतदारांना मतदाता यादीतून वगळणे आहे. त्यांचे म्हणणे आहे निवडणूक आयोगाने पूर्वीच्या मतदाता यादीनुसार मतदान घ्यावे. ते "सर" विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. दुसरीकडे सत्तापक्षाचे म्हणणे आहे, विरोधी पक्ष बांग्लादेशी मतदाता, डुप्लीकेट मतदाता, मृत मतदाता इत्यादींचा उपयोग नकली मतदानासाठी करतो.

बांगलादेशी लोक भारतात रोजगारसाठी येतात. व्होट बँक साठी अनेक राजनेता त्यांना राशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदाता कार्ड बनविण्यास मदत करतात. लाखो बांग्लादेशी, मुंबई असो की एनसीआर, भारतीय नागरिक बनून मतदान करत असतील, तर त्यात कुणालाही आश्चर्य वाटले नाही पाहिजे. नुकतेच गुरुग्राम मध्ये बांग्लादेशी नागरिकांचा शोध सुरू झाला आणि हजारों घरात काम करणारे नौकर-चाकर अदृश्य झाले, अश्या बातम्या मीडियावर आल्या आहे. बिहारपेक्षा जास्त वाईट परिस्थिति दोन्ही महानगरांमध्ये आहे. या शिवाय मृत मतदार आणि डुप्लीकेट मतदारांचा वापर ही सर्वच राजकीय पक्ष करतात.

SIR पूर्ण झाल्यावर बिहार राज्यात 5 टक्के पेक्षा जास्त मतदाता, मतदाता यादीतून वगळले जातील. यात शंकाच नाही. ही संख्या फार मोठी आहे. आपल्या देशात अर्धा टक्केच्या फरकाने निवडणूक जिंकली जाते. ज्या राज्यात बोगस मतदाता ज्या पक्षाला मते देतील तो पक्ष भारी बहुमताने जिंकू शकतो. देशात लोकतंत्र वाचवायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला संपूर्ण देशात निवडणूकी पूर्वी SIR राबविण्याचे आदेश दिले पाहिजे. बिहार सारखे मतदाता सूचीचे गहन पुनरीक्षण संपूर्ण देशात केले पाहिजे. मला तरी असे वाटते.

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

6 Aug 2025 - 7:45 am | युयुत्सु

मला एक कळत नाही. मुळात सतराशे साठ कार्डे हवीतच कशाला? केवायसी चा उद्देश कितीही चांगला असला तरी केवायसी हा एक छ्ळवाद बनला आहे - तत्त्वतः एकदा केवायसी अपडेट केलं की सगळीकडे अपडेट झालं पाहि़जे, पण योजकः तत्र दूर्लभः...

आधारकार्ड असल्यावर पॅन आणि मतदार ओळखपत्राची मला तरी गरज वाटत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

6 Aug 2025 - 8:17 am | प्रसाद गोडबोले

करेक्ट !

आधारकार्ड , पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड आणि पासपोर्ट आण अन्य ही सर्वच ओळखपत्रे आधाराला लिंक करून एकच इंडेक्सिंग करणे आणि ते सर्वत्र ग्राह्य धरणे हा एक जिकिरीचं पण कायमस्वरूपी उपाय ठरू शकेल .

पण करणार कोण !!

सर्वोच्च न्यायालयाने आधार हे अत्यावश्यक नाही सांगून अवसानघातकीपणा केल्यामुळे ही सर्व कटकट झाली आहे.

एकीकडे घटनेतच लिहिलेले आहे कि व्यक्ती स्वातंत्र्य असला तरी त्यावर वाजवी नियंत्रण ( reasonable restriction) असलेच पाहिजे. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात विचित्र निवाडे मिळतात त्यातील हा एक निवाडा आहे. श्री सोली सोराबजी यांनी तामिळनाडू संप खटल्यातील निर्णयाबद्दल लिहिताना हे लिहिले होते कि

the idea that the Supreme Court is "supreme but not infallible" is a cornerstone of a healthy legal system, promoting accountability, critical thinking, and the ongoing pursuit of justice.

एकदाच आधार हाच सर्व गोष्टींसाठी पुरावा ग्राह्य धरला तर इतकी वेगवेगळी कार्डे ठेवण्याची आवश्यकता नाही. तुमच्या हाताचे ठसे सहजासहजी बदलणे अशक्य आहे.

भ्रष्टाचार किंवा अफरातफर करणारे अल्प प्रमाणात याचा गैरवापर करणारच. पण मतदार पत्र, PAN, पारपत्र यात अफरातफर होत नाही असे नाहीच.

डिजियात्रा मध्ये एकदा नोंद केली कि विमानतळावरील सुरक्षाप्रणालीतून सुद्धा फार सहज जात येतं.

हे सर्वोच्च न्यायालयाला दाखवून त्या निर्णयाचा फेरविचार करायला याचिका टाकली पाहिजे.

विवेकपटाईत's picture

6 Aug 2025 - 3:56 pm | विवेकपटाईत

मलाही वाटते.जन्म झाल्यावर एकच कार्ड जन्मलेल्या बाळाला दिले पाहिजे.त्याचाच उपयोग सर्व कार्यांसाठी केला पाहिजे. पहिल्या २० वर्ष,दर पाच वर्षांनी चेहऱ्याची फोटो हाताचे ठसे इत्यादी घेतले पाहिजे. नंतर दर दहा वर्षांनी.

गामा पैलवान's picture

8 Aug 2025 - 11:02 am | गामा पैलवान

युयुत्सु,

माझ्या मते आधार हे एक रहिवासपत्र ( = रेसिडंट कार्ड ) आहे. अनेक विदेशी लोकं भारतात कामासाठी वा उपचारांसाठी रहिवासी आहेत. त्यामुळे सर्व आधारधारक मतदार नाहीत. म्हणूनंच आधार व मतदारपत्र वेगवेगळे असले पाहिजेत. आणि भारतीय नागरिकांच्या बाबतीत ही दोन पत्रे संलग्न व्हायला हवीत. अर्थात, याबाबत चूकभूल देणेघेणे.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

8 Aug 2025 - 12:48 pm | युयुत्सु

श्री० -गा.पै.

तुमचा मुद्दा तत्त्वतः बरोबर आहे. पण मतदार-पत्र वेगळे काय सांगते - तर तुम्ही मत देण्यास पात्र आहात की नाहीत. हे आधारकार्डावरून गरज पडेल तेव्हा निश्चित करणे मला फार अवघड वाटत नाही. आधारमध्ये व्यक्तीची जैविक ओळख नोंदवलेली असते, त्यामुळे ते श्रेष्ठ ठरते.

याविषयी तक्रार करणाऱ्या तेजस्वी यादव यांचेकडे दोन (EPIC) कार्डे सापडली. ज्या नंबरचे नाव नवीन यादीत नाही ते वेगळेच आहे.अगोदरच्या निवडणुकीत मतदान केलेले कार्ड वेगळे आहे. ते नाव आहे यादीत.

चंद्रसूर्यकुमार's picture

6 Aug 2025 - 10:15 am | चंद्रसूर्यकुमार

लेखातील एकूण एक मुद्द्यांशी अगदी बेशर्त सहमती.

ज्या क्षणी रागा, आणि समस्त जमात-ए-पुरोगामी उर्फ डापु गँग या मुद्द्यावर आकांडतांडव करायला लागली तेव्हाच ओळखले की जे काही चालू आहे ते देशाच्या हिताचे आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 Aug 2025 - 1:18 pm | हणमंतअण्णा शंकर...

आधी संपूर्ण भारतभर लागू असेल असे अड्रेस स्टँडर्ड तयार करणे ज्याचा समाजावर आणि एकूण सरकारी कामात प्रचंड मूलगामी बदल होऊ शकतो.
पत्ता हा नागरिकांच्या अत्यंत मुलभूत अ‍ॅट्रिब्युट्स पैकी एक आहे. परंतु भारतात हा प्रकार इत्का प्रचंड विस्कळित आहे की त्याचा भारताला वार्षिक १२ बिलियन डॉलर्सचा फटका बसतो असे काहि रिसर्च सांगतात. मी कित्येकांना हे सांगून पटत नाही आणि बर्‍याच जणांना त्यातल्या खाचाखोचाच समजत नाही.

एखाद्या माणसाचा रहिवासी दाखला हा माझ्या मते भारतात्ले सग्ळ्यात निरूपयोगी डॉक्युमेंट असावे.

प्रत्येक एजन्सी स्वतःचे नवीन अड्रेस स्टँडर्ड तयार करत आहे. माझ्या गावात्ल्या घरावर नगरपालिकेने क्यू आर कोड लावलेत. पण साला पत्ता लिहायला गेलो तर हसायची पाळी येते. इत्का मूर्खपणा जगातल्या कोणत्याही प्रगत देशात नाही. अगदी बांगलादेशसुद्धा यात पुढे आहे.

पत्ता प्रमाणीकरण केले की महसूल खात्यात आमूलाग्र बदल होऊ शकतात. समजा जर आपण युरोपियन पद्दत वापरली (जी खूप सुट्सुटीत आणि मस्त आहे)

रस्ता, घर नंबर, पिन कोड.

केवळ या तीनच गोष्ति वापरून देशातले प्रत्येक घर, व्यवसाय, प्लॉट आणि शेत लोकेट करता आले पाहिजे. देशातील, राज्यातील किंवा स्थानिक स्वाराज्य संस्था या सगळ्या पातळ्यावर आणि प्रत्येक सरकारी, निमसरकारी आणि खाजगी संस्थेत प्रत्येक ठिकाणी जिथे पत्ता लागणार आहे तिथे एकच एक पत्ता असेल. जे काही घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबीले आणि जे जे पत्त्यानुसार आहे ते ते सर्व. जस्ट इमॅजिन किती सीमलेस व्यवहार होतील.

शिवाय आता जी सगळीकडे रिबन डेवलपमेंट होते. तिने काही दिवसांनी अक्षरशः वाट लागते.

बर्‍याच ठिकाणी झोनिंगचे सगळे नियम धाब्यावर बसवून घरे, दुकाने बांधली जातात. एखादा नवा प्लॉट रस्त्याशिवाय तयारच झाला नाही पाहिजे म्हणजे आधी सिस्टिम मधे पत्ता तयार होतो आणि मग तो वास्तवात येतो.

शिवाय रहिवासी रेजिस्ट्रेशन आणि डी रेजिस्ट्रेशन किति सुकर होईल त्याची केवळ कल्पनाच सुखावह आहे.

मी पुण्याहून बेंगलोरला गेलो की मला नवीन पत्ता घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत जाऊन रजिस्टर करावे लागेल. ते झाले की माझे जुने रेजिस्ट्रेशन आपोआप रद्द व्ह्यायला पाहिजे. त्यानंतर माझ्या यु. आय. डी ला तो पत्ता संलग्न झाला पाहिजे. त्या रहिवासी दाखल्यावर माझी सगळी कामे व्हायला पाहिजेत. मला तिथल्या तिथे नवीन आधारकार्ड नवीन पत्त्यासहित मिळायला पाहिजे. नाही मिळाले तरी किमान ते लिंक तरी झाले पाहिजे आणि मला रहिवासी दाखला तरी मिळाला पाहिजे ज्यावर माझा आधार नंबर असेल.

(आधार कार्ड हे व्यक्तिची ओळख आहे आणि व्यक्ती आपले नाव गाव बदलू शकते पण जन्मतारीख, जन्मगाव आणि इतर बायोमेट्रिक बदलू शकत नाही, त्यामुळे ज्या गोष्ती बदलता येतात (म्हणजे पत्ता) ते डॉक्यूमेंट्स (म्हणजे रहिवासी दाखला) हे नवीन लागले पाहिजेत किंवा फक्त सहा महिन्यांसाठीच वॅलिड असायला हवेत.

त्यामुळे सगळ्या कारभारात मूलगामी बदल करायचा असेल तर पत्ता प्रमाणीकरण करणे हे प्रचंड गरजेचे आहे.

सुबोध खरे's picture

8 Aug 2025 - 7:08 pm | सुबोध खरे

हे सर्व अधिकृत घरांच्या बाबतीत शक्य आहे.

अर्धी मुंबई झोपडपट्टीत राहते.त्यात ६५ लाख लोक रहातात.

त्यात घर क्रमांक नाहीतच पत्ता सुद्धा शिवसेना शाखेच्या मागे, मिनार मशिदीच्या डावीकडे असे आहेत.

या सर्व लोकांच्या रहिवासाचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाहीत.

माणूस काल आला, आज एखाद्याच्या झोपडीत राहतो. उद्या दुसरीकडे जागा मिळाली कि तिकडे राहतो

एका खोलीत १० माणसे राहतात ते आपला रोजगार शोधतील कि सरकारी कार्यालयात खेटे घालतील?

मुळात राहत असलेली झोपडीच अनधिकृत असेल तर सरकारी अधिकारी नोंद काय करणार ?

साधं आपण आपला रहिवास बदलला तर आपल्या वाहनाचा पत्ता बदलावा लागतो.

कायद्याप्रमाणे आपले वाहन दुसऱ्या राज्यात नेले तर १४ दिवसात आपल्याला आपल्या वाहनाचा पत्ता बदलणे आवश्यक आहे.

मी विशाखापटण येथे एका वर्षात चार घरे बदलली होती त्यापैकी २४० दिवस मी समुद्रावर गस्त घालत फिरत होतो.

कुठे आर टी ओ मध्ये जाऊन वाहनाचा क्रमांक बदलून घेणार. त्यानंतर गोव्याला बदली झाली.

याउलट हाताचे ठसे आणि चेहऱ्याच्या रेषा माणूस कुठेही गेला तरी बदलत नाहीत. यामुळेच आधार हा एखाद्या माणसाच्या अस्तित्वाचा उत्तम पुरावा आहे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 Aug 2025 - 11:46 pm | हणमंतअण्णा शंकर...

सगळे पत्ते अधिकृत करणे हेच तर या प्रमाणीकरणाचे काम आहे.

झोपडपट्टी जरी असली तर घरांची नोंद कुठे ना कुठे झालेली असते. व्यक्ती कुठे का राहत असेना त्याचा एक पत्ता रेजिस्टर झालेलाच असतो. मग तो अनधिकृत ठरत नाही. प्रत्येकाला काही ना काही करून रहिवासी दाखला काढता येतो.

जर झोपडपट्टी वासियांना आधारकार्डे, रेशनकार्डे आणि इतर कार्डे मिळत आहेत आणि त्यांना मात्र एखाद्या संपूर्ण संगणकीकृत कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन करता येत नाही हे पटत नाही.

शिवाय जिथे रस्ताच नाही असा स्लम अस्तित्वाच नसावा. बाकी बहुतेक ठिकाणी रस्त्यांची नोंद असतेच. महसूली खात्यांचे सर्वे नंबर असतातच. त्यामुळे हे असे करणे अशक्य तर बिलकूल नाही.

अशा मल्टीप्ल सिस्टम्स मेंटेन करणे म्हणजे मूर्ख पणा आहे.

ज्यांनी या सिस्टमचे नीट इंप्लिमेंटेशन अनुभवले आहे त्यानाच याची खरी किंमत कळते.

तुम्ही एका वर्षात दहा घरे जरी बदलली तरी रजिस्ट्रेशन करिता तुम्ही सेकंडरी रजिस्ट्रेशन्स करू शकता. मात्र एका ठराविक काळानंतर म्हणजे ३ महिने जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले नाही तर त्याचा तोटा अंतिमत: तुम्हालाच होणार आहे. जर रजिस्ट्रेशनसाठी आधारचा, बायोमेट्रिकचा योग्य वापर केला तर ते झपाट्याने होऊ शकते.

ड्राइविंग लायसन्स ही काय पत्ता वेरफाय करण्याची गोष्ट आहे का? वीज बिल देखील मागतात.

काही विषय राज्यसूचीतून काढून टाकले पाहिजेत. एक देश एक लायसन्स प्लेट. कशाला पाहिजेत वाहनांचे लोकल पासिंग आणि ते आर टी ओ वगैरे भानगडी? आपल्याला ते परवडणार नाही. खरेतर हा आपल्या मूलभूत हक्कावर गदा आहे.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 Aug 2025 - 11:54 pm | हणमंतअण्णा शंकर...

तुम्ही माणसाच्या अस्तित्वाची ओळख आणि त्याचे जंगम attributes यांच्यात गल्लात करत आहात.

आधार मस्ट म्हणजे मस्ट गोष्ट आहे. पण ती तुमची ओळख आहे. त्यात तुमचे नाव आणि गाव दोन्ही बदलू शकते. नाव हे त्यातल्या त्यात कमी लोकांचे बदलते. मात्र तुमच्या हाताचे ठसे, जन्मगाव, जन्मवेळ आणि तुमचे बायोमेट्रिक बदलू शकत नाही. त्यामुळे आधारकार्डावर नाव (हे आयुष्यात माणूस कमी वेळा बदलतो आणि काहि लोकांचे अजिबात बदलत नाही) आणि तुमचा इम्युटेबल डेटा इतकेच असावे. तुमचा सगळा म्युटेबल डेटा हा त्या त्या स्पेसिफिक सिस्टम मधे पाहिजे. पत्ता वगैरे इत्यादी. आणि हा म्युटेबल डेटा आधारला लिंक पाहिजे.

आधार नको असे कुणीही म्हणत नाही. माणसाची ओळख आधार. मात्र जंगम गोष्टींसाठी आधार लिंक्ड ते ते स्पेसिफिक डॉक्युमेंट.

मतदान करायला जाताना (आधार + रहिवासी दाखला) इतके पुरेसे पाहिजे. नुसत्या आधारवर मतदान करू देणे शक्य नाही कारण लोक घरे बदलतात पण आधारकार्डावर पत्ता बदलत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

12 Aug 2025 - 12:06 am | कानडाऊ योगेशु

आजच हेल्थ इन्सुरन्स च्या प्रिमियम च्या नूतनीकरणासाठी कॉल आला तेव्हा असे कळले कि त्यात उल्लेखिलेला पत्ता हा के.वाय.सी वेरिफाईड असावा. जेव्हा हा इन्सुरन्स घेतला होता तेव्हा अशी काही अट नव्हती. आता प्रकार असा झालाय कि नोकरीनिमित्त बेंगलोरला होतो तेव्हा आधारवर पत्ता बेंगलोरचा आहे. कोविड नंतर व वर्क फ्रॉम होम ह्या पर्यायामुळे बेंगलोरमध्ये न राहता भोपाळ मध्ये वास्त्व्यास आहे. कोविड मध्ये आजारी पडल्यानंतर पुण्यात असल्याने तेव्हा हेल्थ इन्शुरन्स घेतला होता त्यामुळे पत्ता तिथला दिला होता.आता जिथे मी राहतो आहे तिथले अ‍ॅड्रेस प्रूफ माझ्याकडे नाही आणि जिथले अ‍ॅड्रेस प्रूफ आहे तिथे मी राह्त नाही असे त्रांगडे होऊन बसले आहे.