सूर्य आणी कावळे.

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in मिपा कलादालन
31 Jul 2025 - 8:40 pm

महादेववाडीतील सूर्योदय

ही चित्रफीत घरातूनच काढली आहे.

उगवता आणी मावळता सुर्य बघणे एक अद्भुत अनुभव मिपाखरांनी घेतला असेल यात संदेह नाही.कन्याकुमारी, गणपतीपुळे, हिमालय व अगरतला येथून हा अद्भुत अनुभव मी घेतला आहे. काचंनसंध्येला हाच अद्भुत अनुभव जर घरातून दिसत असेल तर काय बोलावे.दुधात साखर आणी साय, दुग्धशर्करा पेक्षा मोठा योग. सकाळी बाल्कनीत बसून सकाळचा चहा आणी संध्याकाळी पाॅपकाॅर्न सोबत गेली बारा वर्षांपासून हा अद्भुत अनुभव घेत आहे. घरासमोरील ढगाई माता टेकडीवर सूर्योदय होतो तर पश्चिमेस अनंदवन राखीव जंगलात सुर्यास्त

सकाळ संध्याकाळ कावळे मोठ्या संख्येने पूर्वेकडे व सुर्यास्तापुर्वी पश्र्चिमेकडे धाव घेताना दररोज दिसतात.असे का?,अभ्यासून बघता कळाले की कावळ्यांना रात्रीचे अंधारात दिसत नाही.

माऊलींनी ही गोष्ट ज्ञानेश्वरीमधे नमूद केली आहे..

पै चंद्रोदया आरौतें।
जयांचे डोळे फुटती असते।
ते काऊळे केवीं चंद्रातें।
वोळखती ॥

अ.४,ज्ञानसंन्यासयोग,ओवी २४

In summary, while crows can see in low light, they are not nocturnal and rely on daylight to navigate and forage.Their vision is not adapted for complete darkness, and they tend to roost when it gets dark.

अद्भुत.

मिपाखरांसाठी मुद्दाम काढलेली चित्रफीत वर ढकलली आहे.

प्रतिक्रिया

विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्|
आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:||

चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् |
सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: ||

पण आमचं वाचन फक्त " बगळ्यांची माळ उडे निळ्या अंबरात..." यापुढे नाही.

प्रचेतस's picture

1 Aug 2025 - 1:55 pm | प्रचेतस

विटपान्तरलच्छायायां निस्सृतं रश्मिरञ्जनम्|
आविर्भवति भास्वानिव मणिगर्भे रुचिरद्युति:||

पानांच्या छायेतून जसा सूर्यकिरणांचा लालसर रंग निसटतो तसा तसा तो जणू एखाद्या रत्नरुपी गर्भातून तेजोमय होत आहे.

चित्रविथ्यां न दृश्यं तं साक्षात् काव्यविभूषणम् |
सेवते यो 'तपस्वी' स तु काव्यर्षिभिः सम: ||

केवळ चित्ररुपातच नव्हे तर तर काव्यरुपातही शोभणारे असे दृश्य साकारतो असा तपस्वी काव्यऋषींसमान आहे.

मला देवांची भाषा येणाऱ्या माणसाचे कौतुक वाटते. मला येत नाही याची खंत वाटते. पण गुगल दुभाषाने अर्थ उलगडून सांगीतला. हा या चित्रफितीचा सन्मानच आहे.
जसं दिसलं
तसं टिपलं
इदंम् न मम ....

सूर्योदय बघताना अनेक कवी आणी कवीता आठवतात. ग ह पाटील, नारायण सुर्वे,सुधीर मोघे,वसंत बापट, दारव्हेकर आणी इतरही बरेच....

पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहीलेली कट्यार रसिकांच्या हृदयात खोलवर रूतली आहे. त्यातलेच एक नाट्य संगीत "तेजोनिधी लोहगोल",बुवा,पं वसंतराव, पं भार्गवराम अचरेकर यांनी गायले आहे.

वसंत बापट यांनी लिहीलेली उंबरठा सिनेमातली सुर्यस्तुती सुद्धा अप्रतिम आहे.

गगन सदन

तेजोनिधि लोहगोल

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मला येत नाही याची खंत वाटते.
संस्कृत शिकणे इतके अवघड नाहीये कर्नलसाहेब. १० वी पर्यंत पाया बर्‍यापैकी तयार झालेला असतो. शालेय अभ्यासक्रमातले संस्कृत नवनीत पुस्तक आणणे आणि https://learnsanskrit.cc/ वर थोडा अभ्यास केला तर संस्कृत शिकणे सहज शक्य आहे. निदान शब्दार्थ समजणे तर काहीच अवघड नाही. वाक्यरचना करता येणे मात्र थोडे कठीण आहे मात्र त्याची गरज फारशी पडत नाही.

दहावी अकरावीपर्यंत मीही शिकलो संस्कृत. अगदी हवं तेच लिहून बक्कळ गुणही मिळाले....
पण एकाच गोष्टीला विशेषणयुक्त अनेक शब्द रचून कवी लोकांनी संस्कृतची वाट लावली आहे हे लक्षात आलं. एक हजार नावे विष्णूची एक उदाहरण. प्रमाणिकरण अजिबात नाही. दिवाकर म्हणजे सूर्य. त्याला पुन्हा बरीच नावे. म्हणजे कोडी सोडवणेच. झाडे किंवा वनस्पतींचंही हेच. शतपर्णी म्हणजे कोणती वनस्पती? त्रिदल म्हणजे बेलच कशावरून.

कर्नलतपस्वी's picture

1 Aug 2025 - 5:38 pm | कर्नलतपस्वी

आमच्या सोसायटीत बरीच झाडे आहेत.

चौथा कोनाडा's picture

1 Aug 2025 - 6:01 pm | चौथा कोनाडा

चला, या निमित्ताने "मिपा संस्कृत अध्यासन" निर्माण होईल अशी आशा करायला हरकत नाही ! :-)

चौथा कोनाडा's picture

1 Aug 2025 - 6:15 pm | चौथा कोनाडा

अप्रतिमच ! सुर्योदय पाहताना डोळ्यांचे पारणे फिटले.
या चॅनेल वरील पक्षांचे सर्वच व्हिडीओ सुंदर आहेत ....
चॅनेलला सबस्क्राईब केले आहे.
धन्यवाद कर्नल साहेब !

कर्नलतपस्वी's picture

6 Aug 2025 - 9:32 pm | कर्नलतपस्वी

चॅनेलला सबस्क्राईब केले आहे.

धन्यवाद. माझ्याकडे एकशे साठ पक्षांची प्रकाशचित्रे व माहीती आहे. या पुढील चित्रफिती दर्शकांना आवडतील याची खबरदारी जरूर घेईन. तुम्हांला निराश होऊ देणार नाही.

कुमार१'s picture

18 Aug 2025 - 7:21 am | कुमार१

अप्रतिमच ! आवडले.