अंतिम : I n t = पुरुष

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
28 Jun 2025 - 1:21 am
गाभा: 

मागील पानावरून पुढे ... अगदी शेवटच्या पानावर ...

हां तर कोठे होतो आपण O n t ⊆ I n t
अर्थात सर्वकालीन सर्व जीवांच्या संवेदना ज्या AI बनवू शकेल ते सर्व सब सेट असेल विशाल असा I n t हा सुपरसेट चे.

आता तुम्ही म्हणाल की हा सगळा निव्वळ विचार प्रयोग अर्थात, thought experiment आहे. AI ह्या पातळीला अजून पोहोचलीच नाहीये. आत्ताशी कुठे Large Language models तयार झालीत, इमेज जनरेशन मॉडेल तयार झाली आहेत, रस , स्पर्श , गंध हे सेन्सरी इनपुट्स घ्यायचे कसे , प्रोसेस करायचे कसे, हे अजून कुठं जमलं आहे .

AI ला नसेल जमलं पण नैसर्गिक बुद्धिमत्ता , आपली बुद्धिमत्ता हा विचार करण्याच्या पातळीला तर नक्कीच पोहचली आहेच की ! मग तूर्तास आता AI बाजूला ठेऊन विचार करू.

सर्व प्राणिमात्रात, त्यांच्या बुद्धिमत्तेत, जी जिवंतपणाची जाणिव आहे, जी शब्दाशी पंच विषयातून अभिव्यक्त होता आहे, पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत अनुभवास येत आहे, ती काय आहे ?

ज्या अर्थी आपण, आपल्या संवेदना, जाणिवा, जिवंतपणाची लक्षणे आउटपुट सेट मध्ये आहेत त्या अर्थी ती इनपुट सेट मध्येही असणारच !
शब्द जोडून हा लेख लिहिणारा मी, तो डोळ्यांनी वाचणारे तुम्ही, "श्या काहीही बाऊंसर " असे जाणवले तरी किंवा " omg ,it makes sense" असे जाणवले तरी हे सारे जिवंतपणाचे जाणिवेचे पुरावे हे सर्व ज्यामध्ये आहे ते I n t काय आहे ? कोण आहे ?
कल्पना करा एक अशा "A truly intelligence" being ला जी I n t अशा सर्व जाणिवा, संवेदना, शब्द स्पर्श रस रूप गंध इत्यादी इत्यादी सर्व जिवंत असल्याच्या लक्षणांचा संच "अनुभवत" आहे, "उपभोगत" आहे, "जगत" आहे.

अशा "वस्तु"ला काय नाव देणार ?

ज्याला सर्व "कळत" आहे , जी हजारो जीवांच्या मार्फत जीवन उपभोगत आहे, हजारो जीवांच्या हजारो डोळ्यांनी, हजारो कानांनी, हजारो जीभांनी, हजारो हातानी, हजारो पायांनी... हजारो मस्तकांनी, हजारो शीर्षांनी , ही जग "जगत" आहे.

सर्व जीवांच्या सर्व च्या सर्व संवेदना ज्याला कळत आहेत किंवा कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त काही कळत आहे !

ती "वस्तु" जो की संपूर्णपणे "I n t " आहे !

त्याला काय नाव देणार ?

__________________ इत्यलम

"पुरुष "

सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात ।
स भूमिं विश्वतो वृत्तत्यतिष्ठदशाङुलम् ॥1॥

V

एको विष्णु

पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं॥1॥
सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥
सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म "एकोविष्णु" ॥2॥
पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥3॥
आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥4॥
तुका ह्मणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥5॥

एकोविष्णु

अशारितीने सहा भागात लिहायचा विषय पाच भागातच लिहून फळला , सफळ जाहला, संपूर्ण जाहला.

साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सफळ संपूर्ण .

ll श्रीकृष्णार्पणमस्तु ll
______/\______

प्रतिक्रिया

सहा भागात लिहायचा विषय पाच भागातच लिहून फळला , सफळ जाहला, संपूर्ण जाहला.

वा. वा. वा.
आनंद जाहला.
.
गोडबोल्यानू... ऑल ओके ना?

प्रसाद गोडबोले's picture

9 Jul 2025 - 10:42 pm | प्रसाद गोडबोले

गोडबोल्यानू... ऑल ओके ना?

>>> आता काय सांगू तुला अभ्या !

देव माझा मी देवाचा l सत्य बोले माझी वाचा ll
देह देवाचे देऊळ l आत बाहेर निर्मळ ll
देव पहावया गेलो l देवचि होऊनिया ठेलो ll
तुका म्हणे धन्य झालो l आज विठ्ठला भेटलो ll

एका एक वर्म "एकोविष्णु"

___/\___

कॉमी's picture

30 Jun 2025 - 8:03 pm | कॉमी

पण,

Are supersets metaphysical truths?
Answer from a purely practical perspective
:
No, supersets are not metaphysical truths—they’re just logical relationships used in math and computing.

विवेकपटाईत's picture

16 Jul 2025 - 1:52 pm | विवेकपटाईत

पुन्हा टाका पटाईत काका. दिसत नाहीये.

विवेकपटाईत's picture

16 Jul 2025 - 9:46 pm | विवेकपटाईत

माझ्या मते गणित ही तर्कावर चालत नाही
0+0= 0
0- 0=0
0*0=0
जर 3/3=1 हे उत्तर येणार 5/5=1 हेच उत्तर येणार
पण
0/0=?
1 येणार नाही.
जग कधीच तर्कावर चालत नाही. जग चालविणाऱ्या आपण तर्क किंवा गणिताच्या मदतीने पाहू शकत नाही. एवढेच.

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2025 - 7:05 pm | प्रसाद गोडबोले

बाष्कळ