भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in काथ्याकूट
10 May 2025 - 7:32 pm
गाभा: 

भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
• अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती.

आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत

पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल
पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल

प्रतिक्रिया

स्वरुपसुमित's picture

10 May 2025 - 7:33 pm | स्वरुपसुमित

सुत्र
https://www.newsdrum.in/national/what-went-behind-the-peace-deal-between...

मिपा संपादक पैकी कोणी हे मुळ लेखात टंकु शकेल?

कॉपीराइट मजकूर आहे तो. पण मराठीत मिळू शकतो. साईटवर दिसल्यावर >> ब्राउझर सेटिंग्ज>> translate> Marathi करून.

............

तर आता शांता परत. भारतीय कारवाईचा दणका परिणामकारक आणि अभिमानास्पद.

स्वरुपसुमित's picture

10 May 2025 - 8:33 pm | स्वरुपसुमित

पुर्ण मजकुर नाही
फक्त मुळ दुवा टंकावा

सौन्दर्य's picture

11 May 2025 - 10:42 am | सौन्दर्य

दहशत्वाद्यानी २६ निरपराध हिंदू बांधवांची हत्या केली. पाकिस्तानला १.१ बिलियनची मदत मिळाली . भारताला काय मिळाले ?

स्वधर्म's picture

11 May 2025 - 8:26 pm | स्वधर्म

आहेत हे. शिवाय राफेल विमान नक्की पडलं की नाही याचाही खुलासा व्हावा असे वाटते.

रात्रीचे चांदणे's picture

11 May 2025 - 8:32 pm | रात्रीचे चांदणे

एखाद पडलं असावं कदाचित.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2025 - 6:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झी-न्यूजवाले भारतात परत आल्याशिवाय युद्धबंदी होत नाही. ;)

च्यायला, आपण पाकड्यांच्या अतिरेकी तळावर हल्ले केले आणि पाकिस्तानचे ड्रोन हवेतल्या हवेत नष्ट केले त्या दिवशी या झी-न्युजवाल्याने रात्रभर डोळ्याला डोळा लागू दिला नाही. क्रिकेट समालोचनाच्या पुढे उत्कंठावर्धक युद्धाचं वर्णन. महिला अँकरचा तर सायरनच्या आवाज आणि तिचा आवाज एक होऊन तिचा घसा बसलेला पाहिला. नौदलाने विक्रांतच्या मदतीने कराची बंदर उद्ध्वस्त केलं. तिकडून बलुचीस्तानकडून बलूचने हल्ला करुन कंबरडे मोडले. इकडे भूदलाने आणि वायूदलाने त्यांची पाकड्यांची त्रिधातिरपीट उडवून लाहोर, इस्लामाबाद आज रात्रीचआपण काबीज करतो की काय असे वाटले. सकाळी काय स्थिती राहील याचा अंदाजच करता येईना.

आपलं मिडिया कधी सुधारेल ते देव जाणे.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

20 May 2025 - 12:21 pm | चौथा कोनाडा

महिला अँकरचा तर सायरनच्या आवाज आणि तिचा आवाज एक होऊन तिचा घसा बसलेला पाहिला.

म्हणजे पुढंमागं अँकरच्या कोर्स मध्ये सायरनचा आवाज परिणामकारक काढायचा प्रकार / कला सिलॅबस मध्ये समाविष्ट करणार तर !

रात्रीचे चांदणे's picture

11 May 2025 - 8:37 pm | रात्रीचे चांदणे

सुरवातीपासूनच आपला मीडिया फारच बेजबाबदार वागला. चकमकी चालू झाल्या वर तर त्यात आणखीनच भर पडली. ८ तरखेच्या रात्री तर कहरच केला. ह्या मूर्खपणा वर कारवाई व्हायला पाहिजे.

भारताने पाकला चान्ग्ला धडा शिकवावा... बलुचिस्तान स्वतन्त्र करावे व कायम आपला होल्ड त्यावर ठेवावा पाकचे ७१ सारखे परत तुकडे करावेत pok परत मिळवावाच.. आपले आहे आपलयाकडेच राहिल. बलोच लोक आपले मराठेच आहेत आपलया मराठयान्चे वन्शज.. पानिपतचया युद्धातील.

सौन्दर्य's picture

12 May 2025 - 9:11 am | सौन्दर्य

सर्व आघाड्यांवर आपण जिकंत होतो, हे जर खरे असेल तर, आपण शस्त्रसंधी केलीच का ?

गेल्या कित्येक दशकांचा इतिहास हेच सांगतो की पाकिस्तानचे दहशवादी हल्ले थांबतच नाहीत. त्यांनी भारतात येऊन आपले नागरिक मारावेत , आपण त्यांच्या दोनचार ठिकाणांवर हल्ला करायचा व म्हणायचे आम्ही त्यांचे कंबरडे मोडले आत ते परत आगळीक करणार नाहीत, परंतु कसचे काय ! त्यांच्या आगळिका थांबताच नाहीत व थांबणार ही नाहीत.

ही सुवर्णसंधी दवडायला नको होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2025 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारत-पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही इथे लिहिलं होतं की इतकं होऊ शकतं.

पण हे खरं आहे, एक संधी नक्की होती की आपलं पाकव्यापत काश्मीर मिळवायला हवं होतं. बलुचलाही बळ द्यायला हवं होतं. अर्थात, ते आज न उद्या होईल यात शंका नाही. भारताच्या हल्ल्यांचा धसका घेऊन शस्त्रसंधीसाठी पाकने अमेरिकेला विनवले असेल पण आज अमेरिकेला विनाकारण संधी मिळाली की दोनही देशातील नेतृत्व कणखर आहे वगैरे. आणि विनाकारण पाकिस्तानची हिम्मतही वाढली आहे, असे वाटले. आपण पाकिस्तानचं प्रचंड नुकसानही केलं असेल पण काहीतरी वेगळं घडेल ही जी आपण आस लावून बसलो तसं झालं नाही. एक जबर हल्ला ज्यामुळे पाक मोडायला पाहिजे होतं. आता काश्मीर मुद्यावर मध्यस्ती करु वगैरे बोलायची संधी अमेरिकेस मिळाली. अर्थात आपण काश्मिर प्रश्नी त्रयस्थ भूमिका कायम नाकारली आहे.

भारतीय सैन्याने नागरीवस्त्यांवर हल्ला न करता अतिरेकी तळांचा जो खात्मा केला त्याचा एक भारतीय म्हणून खुप आनंद झाला आणि अभिमानही वाटला. आता अशी पुन्हा हिम्मत केली तर, त्याची जबर किंमत पाकला मोजावी लागेल हा धडाही ऑपरशेन सिंदुरच्या माध्यमातून सध्या तरी भारतीय सैन्याने दिला आहे, पण पाक शांत बसणार नाही, त्यांच्या नापाक हरकती काही दिवस थांबतील आणि पुन्हा हळुहळु सुरु होतील असे वाटते.

-दिलीप बिरुटे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 May 2025 - 9:51 am | माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने जी कारवाई केली त्याबद्दल एक भारतिय म्हणून आनंद झाला पण पाकिस्तानच्या भूमिकेत तसूभरही फरक पडलेला नाही/पडणार नाही असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसते.
Responding to a question about who first requested for the ceasefire, the DG ISPR said: “Put it on record that Pakistan never requested for a ceasefire.
Indian military officers, meanwhile, said that the objectives of ‘Operation Sindoor’ were achieved, with ‘high-value terrorists’ being eliminated, but dodged a question whether they had lost a bunch of warplanes in the operation.

"https://www.dawn.com/news/1910381/deterrence-re-established-say-armed-fo...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2025 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण संरक्षण आणि शस्त्रसज्जतेत मजबूत आहोत राजीव नारायणन यांना ऐकत होतो. आपण मजबूत आहोत पण मग...

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2025 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प,मोदी यांचा देशाला संदेश ठीक आठ वाजता.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

12 May 2025 - 8:06 pm | कपिलमुनी

देशभर में बीजेपी तिरंगा यात्रा निकालने जा रही है। 13 मई से 23 मई तक बीजेपी तिरंगा यात्रा निकालेगी। इस तिरंगा यात्रा उद्देश्य ऑपरेशन सिंदूर की उपलब्धियों को लोगों तक पहुंचाना है। तरुण चुघ, संबित पात्रा, विनोद तावड़े और अन्य वरिष्ठ नेता अभियान के लिए समन्वय करेंगे। साथ ही बीजेपी नेता और मंत्री यात्राओं का नेतृत्व करेंगे।

सौन्दर्य's picture

12 May 2025 - 11:40 pm | सौन्दर्य

संपूर्ण देशातील जनता युद्धाच्या बातम्या ऐकत, वाचीत होती. सत्राशे पन्नास सोशल प्लॅटफॉर्म्सवर माहिती मिळत होती, असं असताना ही यात्रा कशासाठी ? जनतेपर्यंत सत्य बातमी पोहोचविण्यासाठी की लक्ष दुसरीकडेच भरकटवण्यासाठी व राजकीय पोळी भाजण्यासाठी ?

दुसरीच शक्यता जास्त दिसतेय.

देशाला एका साध्या प्रश्नाचे उत्तर हवंय. आपण जर वरचढ होतो तर शस्त्रसंधी करायची गरजच काय ? बरं केली तर केली , भारताच्या पदरात काय पडलं ?

तिकडे पाकिस्तान आम्हीच जिंकलोय असा घोष करतेय.

रात्रीचे चांदणे's picture

12 May 2025 - 8:27 pm | रात्रीचे चांदणे

अमेरिकेची मध्यस्थी आपण मान्य केली नाही. आणि POK ताब्यात घेणे प्रॅक्टकल वाटतं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2025 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी असा दावा केला की त्यांनी आठवड्याच्या शेवटी दोन्ही देशांसोबतचा व्यापार थांबवण्याची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानवर युद्धबंदी स्वीकारण्यासाठी दबाव आणला. ( बातमी )

-दिलीप बिरुटे

मूकवाचक's picture

13 May 2025 - 11:18 am | मूकवाचक

माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल, तर जो बायडेन यांच्याविरूद्ध निवडणूक लढवल्यानंतर शेवटचा निकाल हाती येण्याआधीच ट्रंप यांनी निवडणूक जिंकल्याचे जाहिर केले होते. योग्य निवड केल्याबद्दल अमेरिकन जनतेचे आभार देखील मानले होते. त्यामुळे ट्रंप यांचा पराभव पचवणे त्यांच्या समर्थकांना अवघड गेले होते. ते सातत्याने उतावीळपणे घोषणा करत असल्याची/ धोरणे जाहीर करत असल्याची बरीच उदाहरणे आहेत.

आग्या१९९०'s picture

12 May 2025 - 9:47 pm | आग्या१९९०

https://youtu.be/R09jQmt-6GI?feature=shared
किती निर्लज्ज माणूस आहे हा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2025 - 2:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल दुपारी भारताचे पंतप्रधान देशाला आठवाजता संबोधीत करणारच्या बातमीने पोटात गोळा आला. आठ वाजेच्या आठवणी भयंकर आहेत. नोटबंदी, जीएसटी, करोनाच्य काळातल्या टाळ्या, थाळ्या, दिवाबत्ती जांभळ्या रंगातील थाळी वाजवणारी ती महिला. अजूनही सर्व डोळ्यासमोर येतं. भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गोळ्या-औषधे, किराणा सामान भरून घ्यावे की काय असा विचार मनात येऊन गेला.

तर, आठवाजता आदरणीय माननिय भारत देशाचे पंतप्रधानांच्या संबोधनाला सुरुवात झाली. 'प्रिय देशवासियो, नमस्कार. मग देश, सामर्थ्य हे सर्वांनी पाहिलं. सर्वप्रथम पराक्रमी सेना, सशस्त्र दल, गुप्तचर संस्था , वैज्ञानिक, वीर सैनिक सर्वांना ऑपरेशन सिंदुरच्या पराक्रमास भारतीयांच्या वतीने सॅल्यूट केले. आपल्या सैनिकांनी अफाट शौर्य दाखवले. हे शौर्य, धाडस, प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला, समर्पीत करतो. एकता ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे. आतंकवाद्यांनी जे केलं त्याला एक धडा भारतीय सैनिकांनी दिला. आम्ही ऑपरेशन सिंदूर तुर्तास स्थगीत केले असून पाकने कुरापती केल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. शस्त्रसंधीची विनंती पाकिस्तानने केली आणि ती विनंती आम्ही मान्य केली. दहशतवादीस आणि आणि त्यांना पाठबळ देणारे सरकार दोन्ही सारखेच आहेत. सध्याचा काळ युद्धाचा नाही तसाच तो दहशतवाद्यांचाही नाही. पाकिस्तानने आता पुन्हा असे काही धाडस केले तर, आम्ही कोणत्याही मोहीमेसाठी सज्ज आहोत असा संदेश दिला. आपण सडेतोड हल्ले केले वगैरे.

आज बुद्ध पोर्णिमा भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे. पण शांतीचा मार्गदेखील शक्तीतूनच जातो हे त्यांनी स्पष्ट केले. मानवतेला शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला शांततेत जगता यावे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी भारत शक्तीशाली असणे आवश्यक आहे, गरज पडल्यास या शक्तीचा वापर करणे गरजेचे आहे.

एकूण भाषण संबोधन त्वेषपूर्ण करण्याचा, आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न उत्तम होता. पण लक्षात आलं अनपेक्षित शस्त्रसंधीमुळे बॅकफुटवर गेलेल्या भारतीयांचे मनोबल वाढवणे आवश्यक होते पण संधी होती ती घालवली यात शंका नाही असे वाटते

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

13 May 2025 - 6:40 pm | सुबोध खरे

हायला

मोदी भक्तांपेक्षा मोदी रुग्णच त्यांची भाषणं जास्त सविस्तर पणे पाहत आणि चर्चित असतात.

बहुधा रोज मोदींचं स्मरण केल्याशिवाय त्यांना जेवण पचत नसावं

नोटाबंदी मुळे उमटलेले वळ इतके खोल आहेत की त्यांचा विषय निघाला की दुखायला लागतात. मग करोना / टाळ्या वगेरे वगेरे . . .
बाकी करोना च्या काळात २ वर्षे सलग घरी बसुन पगार घेतला तेव्हा बाकी काही आठवत नव्हते ...

असो .. कही रोगांवर अजुन औषध सापडलेले नाही ...

सौन्दर्य's picture

13 May 2025 - 10:43 pm | सौन्दर्य

शस्त्रसंधी परकीय दबावामुळे करावी लागली की पाकिस्तानने विनंती केली व आपण ती मान्य केली?

ज्यावेळी युद्धातील एक देश शस्त्रसंधीसाठी विनंती करतो त्यावेळी दुसरा देश काही अटी लादतो. जर आपण जिंकत होतो तर आपण ह्या शास्त्रसंधीच्या वेळेस कोणत्या अटी लादल्या? "पुन्हा असे घडले तर प्रत्युत्तर देऊ" ही काही अट होऊ शकत नाही, तसे करणे अध्याहृतच आहे.

जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती .

रात्रीचे चांदणे's picture

13 May 2025 - 11:24 pm | रात्रीचे चांदणे

मी काही जाणकार नाही पण
भारताने सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट केली होती — आमची कारवाई ही अतिरेक्यांविरोधात measured,targeted आणि परिस्थिती न चिघळवणारी (non-escalatory) असेल.
७ मेच्या रात्री भारताने अतिरेकी तळांवर कारवाई करत त्यांना यशस्वीपणे उध्वस्त केलं. याला उत्तर म्हणून पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. भारताने याला उत्तर दिलं ते — लाहोरजवळील त्यांच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर हल्ला करून.

८ मेच्या रात्री पुन्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला झाला. मात्र भारताने संयम राखत, प्रतिहल्ला न करता केवळ त्यांच्या ड्रोनना निष्प्रभ केलं.

पण नऊ मेच्या रात्री पाकिस्तानने आणखी एक पाऊल पुढे टाकत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. यावेळी भारताने ठाम पवित्रा घेत, त्यांच्या ८ ते ९ एअर बेसच नुकसान केले.
कदाचित याच क्षणी पाकिस्तानला त्यांच्या मर्यादा लक्षात आल्या असाव्यात. त्यामुळे त्यांनी तातडीने अमेरिका व इतर जागतिक शक्तींना मध्यस्थीसाठी साकडे घातले.

भारताचं मूळ उद्दिष्ट अतिरेकी तळ नष्ट करणं हेच होतं — त्यामुळे पाकिस्तानकडून एकमेकांविरोधातील हल्ले थांबवण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्याला नकार देण्याचं कारणच नव्हतं.

दरम्यान, रेडिएशन लीक संदर्भातील चर्चा सध्या माध्यमांमध्ये होत आहे. त्यामागे तथ्य किती आहे हे अद्याप स्पष्ट नाही — याचा खरा खुलासा येणारा काळच करेल.
खरं कारण अजून दुसरंही असू शकत.

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2025 - 8:25 pm | कानडाऊ योगेशु

माननीय पंतप्रधानांचे भाषण मिलिटरीमधल्या एका जबाबदार अधिकार्यांकडुन करवता आले नसते का? जिथे तिथे स्वतःच पुढे यायची काय गरज होती असे वाटुन गेले.

रात्रीचे चांदणे's picture

14 May 2025 - 8:31 pm | रात्रीचे चांदणे

भाषण देण हे मिलिटरी च काम नाही. पाक मध्ये हे होत.एवढ्या मोठ्या संघर्षानंतर पंतप्रधानांचे भाषण देणे योग्यच होते.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 May 2025 - 11:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"शस्त्रसंधी परकीय दबावामुळे करावी लागली की पाकिस्तानने विनंती केली व आपण ती मान्य केली?"

अजुन पर्यंत तब्बल चारवेळा डोनाल्ड ट्रम्प ह्यांनी "शस्त्रसंधी माझ्यामुळे/माझ्या सरकारने केली" असे सांगितले आहे. काल सौदी अरेबियातही त्यांनी ह्याचा पुनुरुच्चार केला. पंतप्रधान ट्रम्प ह्यांना मित्र मानत असले तरी ट्रम्प्-अमेरिका भारत-पाकिस्तानला एकाच तराजुत तोलतात असे त्यांच्या विधानावरुन दिसते.
"त्या दोघांना मी व्यापार करूया,युद्ध नको असे सांगितले आहे' / '
"United States President Donald Trump on Tuesday, May 13, said that maybe India and Pakistan can have a "nice dinner together" while stating that his administration brokered the "historic ceasefire" between the two countries through trade."
नाईस डिनर? हे विधान तर भारताची खिल्ली उडवणारे आहे. जगाला भारत ईतके वर्षे सांगतोय की पाकिस्तान दहशतवादी निर्यात करणारा देश आहे. ट्रम्प ह्यांना ते ठाउकही आहे पण भारताच्या भावनांना अजिबात न जुमानता ट्रम्प हे विधान करतात.
"दोन्ही देशांचे प्रमुख प्रबळ आहेत" हे दुसरे विधान. २६ भारतियांची हत्या झाली त्याबद्दल पाकिस्तानला अमेरिका ऐकवेल अशी अपेक्षा होती. पण तेही नाही.थोडक्यात सरकारचे समर्थक अमेरिकेला जेवढे जवळचे मानतात तेवढी अमेरिका/ट्रम्प मानत नाही.
८ मे रोजी जे.डी.व्हान्स म्हणतात-भारत-पाकिस्तान समस्येत अमेरिकेला मधे पडायचे कारण नाही. " fighting between the two nuclear powers “fundamentally none of our business”.
दोन दिवसांनी ट्रम्प 'आमच्यामुळे शस्त्रसंधी झाली" असे सांगतात.

https://www.cnbctv18.com/world/us-president-donald-trump-india-pakistan-...

सौन्दर्य's picture

15 May 2025 - 3:19 am | सौन्दर्य

२६ भारतियांची हत्या झाली हे विधान अपूर्ण आहे. माझ्या मते २६ निरपराध हिंदूंची हत्या झाली आहे.

आत्तापर्यंत जे काही व जितके काही हल्ले झाले ते सर्व भारतीय नागरिकांवर झाले, त्यात हिंदू , मुस्लिम , शीख, पारशी, ख्रिश्चन सर्व आले. हा पहिलाच असा हल्ला झाला जो फक्त हिंदूंवर झाला व आपण हवा तसा प्रतिहल्ला केला नाही. हे फारच लांच्छनास्पद आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2025 - 8:34 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मारले गेलेल्यात एक मुस्लिमही होता. धर्म मुद्दामून विचारला गेला जेणेकरुन भारतातील हिंदू चिडुन मुस्लिमांवर हल्ले करतील आणि 'भारतात मुस्लिमांना कसे वागवले जाते' ह्याचे पुन्हा जगभर भांडवल करता येइल हा उद्देश होता.
हिंदुनाच मारायचे होते तर एखाद्या मंदिराच्या आसपास हल्ला करता आला असता. ज्या देशात ८०% हिंदु आहेत, अशावेळी जे कश्मीर फिरायला येणार, त्यातही ८०% च्या आसपास हिंदु असणार हे साहजिक आहे.
एकडे मूळ मुद्दा हा आहे की अमेरिकेला भारताच्या मैत्रीची काडीचीही किंमत नाही. "भारत पाकिस्तानने एकत्र जेवायला बसावे" " मी त्यांना म्हणलय- आपण व्यापार वाढवुया" असली विधाने म्हण्जे जखमेवर मीठ चोळणारी आहेत. ह्याची प्रतिक्रिया भारतात काय येइल ह्याचा अंदाज करता न करता येण्याजोगे ट्रम्प मूर्ख नाहीत. भारत-पाकिस्तानला ते एकाच तराजूत तोलतात. आणि भारताची त्यावर प्रतिकिया यायला हवी तेवढी येत नाही.
तुर्कस्तान्,अझरबेजान ह्या देशांनी पाकिस्ताची बाजु घेतली म्हणून त्या दोन्ही देशांच्या विरोधात भक्त्/समर्थक आघाडी उघडतात पण ट्रम्प अपमानास्पद बडबडले तरी 'पास' म्हणतात. ह्यापुढे अमेरिकेच्या/जगाच्या ईतिहासात अमेरिकेने मध्यस्थी करून/दम देउन 'ऑपरेशन सिंदूर थांबवले' अशी नोंद होणार आहे. कारण जेतेच ईतिहास लिहितात.

रात्रीचे चांदणे's picture

15 May 2025 - 9:01 am | रात्रीचे चांदणे

मारले गेलेल्यात एक मुस्लिमही होता
२८ पैकी एक मुस्लिम म्हणजे फारच मोठी गोष्ट की. बरं तुम्हला नक्की माहिती आहे का तो एकतरी कसा मेला असेल. म्हणजे चुकून मध्ये आला असेल का आपल्या गिर्हाईकला वाचवायला मध्ये पडला आणि मेला?

पाकिस्तान ही म्हणतंय की भारताने जो पहिला स्ट्राइक केला त्यात एक आठ वर्षाचा लहान मुलगा मेला. मग ह्याच न्यायाने भारताने लहान मुलांवर हल्ला केला असं समजणार का? पाकिस्तान तर म्हणतच आहे आणि तुम्ही पण भाजपाला विरोध करण्यासाठी म्हणाल याची खात्री आहे.

बरं त्यांना फक्त हिंदूंनाच मारायचे नव्हते तर नाव का विचारली? धर्म का विचारला? कलमे का म्हणायला लावले? एका असामी हिंदू प्राध्यापकाने कलमा म्हटला तर त्याला का सोडून देण्यात आला?
अतिरेक्यांना हिंदूंनाच मारायचं असतं फक्त ह्यावेळी त्यांच्याकडे वेळ होता म्हणून त्यांनी धर्म विचारलं.

मोदी विरोधकांना मोदींना विरोध करता करता नक्की कुठे थांबायचे आहे समजत नाही. Op सिंदूर मध्येही मोदींना अडचणीत टाकणारे कितीतरी प्रश्न आहेत. जसे की राफेल बाबत लपवाछपवी का? अतिरेकी भारतात कसे आले त्यांना हत्यार कोणी दिली अजून का सापडत नाहीत? पण हे विचारायचं सोडून अतिरेकी कसे धर्मनिरपेक्ष होते हे सिद्ध करून काय होणार आहे?
माईसाहेब, मोदींविरुद्ध तुम्हाला अजून एक मुद्दा देतो मोदींच्या भाषणात त्यांनी एकदाही पाक प्रधानमंत्री शरीफ चा उल्लेख केला नाही म्हणजे मोदी शरीफ ला घाबरले म्हणू शकता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2025 - 10:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"अतिरेकी कसे धर्मनिरपेक्ष होते हे सिद्ध करून काय होणार आहे?"
असे कोण म्हणतय? ते कट्टर मुस्लिमही असतील. पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता. मूळ मुद्दा आपण ज्या अमेरिकेला मित्र मानतो त्याचे काय करायचे. ?ट्रम्प-अमेरिका भारत अमेरिकेला एकाच तराजून तोलतात हा आहे.
अमेरिकेबाबत जयशंकर गप्प का? अमेरिकेला मित्र म्हणणे, नमस्ते ट्रम्प, ट्रम्प सत्तेवर आल्याने अनेकांना दु:ख झाले पण आम्ही त्यात नाही. आम्हाला आनंद झाला आहे" असे जयशंकर म्हणाले होते. ह्याच्या बदल्यात भारताला काय मिळतय? ट्रम्प शहाबाझ शरीफ ह्यांनाही 'ग्रेट लीडर' म्हणतात."युद्ध मी थांबवले" असे ट्रम्प चारवेळा म्हणतात.
म्हणजे ऑपरेशन सिंदूर अमेरिकेने थांववले आणि भारताने ते मान्य केले? पाकिस्तानचे आपण निश्चित नुकसान केले पण शेवटी पाकिस्तान अमेरिकेच्या मदतीने वरचढ ठरला असे म्हणावे लागते.

वामन देशमुख's picture

15 May 2025 - 11:11 am | वामन देशमुख

ते (अतिरेकी) कट्टर मुस्लिमही असतील. पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.

त्या अतिरेक्यांच्या मुस्लिम असण्याबद्धल ठामपणा नाही पण त्यांच्या उद्देशाबद्धल भलताच ठामपणा आहे!

अतिरेक्यांचा उद्देश जमेल तितके काफिर लोक भूतलावरुन नष्ट करणे होता आणि त्यांनी तो साध्य केला. यात मध्येच दंगली कुठून आल्या?

सुक्या's picture

15 May 2025 - 11:50 am | सुक्या

पण त्यांचा उद्देश भारतात दंगली घडवणेच हा होता.
ज्जे बात !! मोदी उगाच ऑपरेशन सिंदुर करत बसले. बरं त्या घटने नंतर भारतात दंगली झाल्या नाहीत याचा तुम्हाला बराच खेद झाला असेल नाही?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 May 2025 - 12:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दन्गली घडाव्यात म्हणून सरकार समर्थकच प्रयत्न करत होते. "मुस्लिम दुकानदारांकडुन माल विकत घेउ नका" असे उघडपणे समर्थक बोलत होते.
२६ हिंदु ऐवजी १५ हिंदु आणि ११ मुस्लिम असते तर मोदींनी ऑपरेशन सिंदूर केले नसते का?

सुबोध खरे's picture

15 May 2025 - 10:28 am | सुबोध खरे

रशिया, चीन आणि भारतावर वचक ठेवण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची गरज आहे. त्यामुळे त्यांनी एवढे दहशतवादी हल्ले केले तरी अमेरिका त्याकडे काना डोळा करते.

पाकिस्तान ने अण्वस्त्रे मिळवली, अमेरिकेने काय केले?

एवढेच कशाला ओसामा बिन लादेनला इतकी वर्षे त्यांनी आश्रय दिला त्याबद्दल अमेरिकेने काय केले?

तेंव्हा अमेरिका तुमच्यासाठी काहीतरी करेल हि अपेक्षाच चूक आहे.

अमेरिकेइतका स्वार्थी आणि पाताळयंत्री देश जगात दुसरा नसेल. जगभरात एकही प्रांत असा नसेल जिथे अमेरिकेने काड्या केलेल्या नाहीत.

युरोपीय देश (फ्रान्स सोडून) अमेरिकेचे मांडलिक आहेत. ब्रिटन तर अमेरिकेचे ५१ राज्य असल्यासारखे आहे.

हे देश आपली बाजू घेतील किंवा आपल्याला संकटात मदत करतील हि अपेक्षाच चूक आहे.

आपण केवळ त्यांच्याशी व्यापारी संबंध ठेवून आहोत. दोघांना फायदा होईल असे.

बस

रात्रीचे चांदणे's picture

15 May 2025 - 11:07 am | रात्रीचे चांदणे

आपल्या foreigh पॉलिसी चे अपयश नाही मानता येणार का? सध्याच्या foreigh पॉलिसीवर मीपवार कोणीतरी निपक्ष लिहायला पाहिजे.मीडिया सध्या उदो उदो करण्यात मग्न आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2025 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला. सुरक्षेयंत्रणात चूक झाली आणि गुप्तचरसंस्थांच्या अपयशात त्यात २६ निरपराध पर्यटक भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. आपण त्या नंतर अतिरेकी तळांवर हल्ले केले त्यात सर्व भारतीयांना अभिमान वाटावा अशी कार्यवाही नक्कीच होती. पण त्या नंतर पाकड्यांनी ड्रोन टाकले ते आपण निष्क्रीय केले त्याचा आनंद आहे, पण त्या बदल्यात तेव्हाच पाकिस्तानला मुहतोड करारा जवाब द्यायलाच पाहिजे होता कारण त्यांनी सीमेवर गोळीबार करुन सेल बाँम्ब टाकून आपल्या पुन्हा पंधरा सोळा भारतीयांना जीवाला मुकावे लागले. त्यात माध्यमांवर दिसणा-या दोन जुळ्या लहान मुलीची छायाचित्रे पाहुन अजून वाईट वाटलं दु;ख झालं आणि आपण त्याचा जो कडक बदला घ्यायला पाहिजे होता तो न घेता आपण शस्त्रबंधी करतो हे तितकेच दु:खद आहे. आणि नव्या सरकारकडून काही ज्या अपेक्षा होत्या त्या फोल ठरवणा-या आहेत.

भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि एकता अखंडतेबाबत आपण कोणाच्या तरी सांगण्यावरुन आणि व्यापाराच्या कारणांमुळे शस्त्रसंधी करतो, हा जो दावा आहे, ते अपमानास्पद वाटते. ऑपरेशन सिंदूर आपण सुरु केलं आणि थांबवण्याची घोषणा अमेरिका करते, असे कळते याचा संताप येतो. माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत. आपण भले ही तात्पूरती स्थगीती म्हणत असलो तरी, पाकिस्तानला नागडं करायची एक मोठी संधी आपण गमावली असे वाटते.

आपण म्हणता ते खरं आहे. सरकार कायम अमेरिकेपुढे लोटांगन घालते ते आपल्याला आपला मित्र मानत नाही. पाकिस्तानला हल्ल्याबाबत त्यांनी सुनवायला पाहिजे होतं. काही मदत बंद करायला पाहिजे होती. आंतरराष्ट्रीय दडपण टाकायल पाहिजे होतं पण ते दिसत नाही. आपण जगभर विदेशात अनेक देशांशी संपर्क दौरे केले. पण या लहानशा युद्धात आपल्या बाजूने कोणते आणि किती देश उभे राहिले तेही या निमित्ताने दिसले. आपली आंतरराष्ट्रीय पॉलीसी, आपला व्यापार आपली प्रतिमा अजून उघडी पडली असे वाटले. आपल्या दबदब्यापेक्षा गीरे भी तो टांग उपर अशी प्रतिमा पाकिस्तानची झाली आहे.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

15 May 2025 - 9:10 am | रात्रीचे चांदणे

आपण जगभर विदेशात अनेक देशांशी संपर्क दौरे केले. पण या लहानशा युद्धात आपल्या बाजूने कोणते आणि किती देश उभे राहिले तेही या निमित्ताने दिसले.
हे जाणवले ह्या वेळी, असं वाटल की जगात आपण एकटेच आहोत. पाक च्या बाजूने चीन, अझरबैझान आणि तुर्की उभे राहिले. नक्की हे कशामुळं झालं असावं? ट्रम्प च सोडून द्या, पण युरोपीय देशांनी आपल्या बाजूने स्टेटमेंट दिल्याचे वाचले नाही. उक्रेन युद्धात आपण रशियाची बाजू घेतल्यामुळे झालं असेल कदाचित.

सुबोध खरे's picture

15 May 2025 - 10:21 am | सुबोध खरे

माझ्यामुळेच शस्त्रसंधी झाली, असे अमेरिकेचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत

काश्मीर प्रश्न १००० वर्षे जून आहे म्हणून ट्रम्प साहेब म्हणत आहेत.

कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय?

"भुजबळ" लोक सर्वत्र असतातच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 May 2025 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुठे त्यांच्याकडे लक्ष देताय?

कोणी किती आत्ममग्न आणि आपल्याच आनंदात असले पाहिजे हा ज्याचा त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण अचानक आपल्याला शस्त्रबंदी करावी लागली आणि त्याचं श्रेय अमेरिकेस जातंय हे सद्य विद्यमान सरकार आणि नेतृत्व सोडून सर्व जग म्हणतय. अशावेळी आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. आपण कोणासमोर झुकणार नाही झुकत नाही. आपली डॅशींग प्रतिमा होती ती घरातल्या घरात. तीचं बाहेर पितळ उघडं पडलं. भारताचा अमेरिकेशी असणारा व्यापार सुमारे एक हजार ९०० कोटी डॉलर्स इतका आहे (माहिती सौजन्य गुगल) अशा वेळी स्वाभाविकच त्याचा परिणाम दबाव दिसणारच आहे. आता आपल्या पाठीशी राहणा-शी संबंध उभे करणे, व्यापार वाढवणे, नवे मित्र बनवणे हे नवे आव्हाने असतील.

काल बिहार मधील भाषणात पंतप्रधान म्हणाले की ''दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या साथीदारांचा आणि त्यांच्या कट रचणाऱ्यांचा पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठलाग करतील. भारताने आधीच काही सुरुवातीची पावले उचलली आहेत, जसे की पाकिस्तानी लोकांचे व्हिसा रद्द करणे आणि त्यांना परत येण्यास सांगणे'' वगैरे आता हे सर्व निरुपयोगी वाटायला लागलं आहे.

काल पीफोर युट्यूब वाहिन्यांवरील बंदी सरकारने मागे घेतली. आता फक्त, भारताने भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचे जे पाऊल उचलले होते ज्यात १९६० मध्ये अंतिम आणि स्वाक्षरी झालेल्या दोन्ही देशांमधील पाणीवाटपासाठी सिंधू पाणी कराराला स्थगिती दिलेली होती. आंतरराष्ट्रीय दडपणाखाली ही स्थगिती उठवतो की काय इतकंच पाहणं बाकी आहे. आणि उठवली तर तो जगप्रसिद्ध असलेल्या खयालीपुलावाचा 'माष्टरष्ट्रोक' ठरु नये एवढीच देवाधिशाला प्रार्थना.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

15 May 2025 - 7:57 pm | सुबोध खरे

काल बिहार मधील भाषणात पंतप्रधान म्हणाले

मी म्हटलं ना मोदी रुग्णच त्यांची भाषणं जास्त सविस्तरपणे पाहत असतात.

अशावेळी आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर आहे, त्याचाही विचार केला पाहिजे.

हायला

बिरुटे सर

तुम्ही राजकारणावर दुसरी पी एच डी घ्यायला सुरवात केली का?

ट्रम्प एक बडबडतो आणि तम्ही डायरेक्ट आंतरराष्ट्रीय धोरणाचं जे फेल्युअर म्हणून विशेष टिप्पणी सुद्धा करायला लागलात.

पुलं ना चपराशी अणुयुद्ध टाळण्याचा उपाय सांगतो जो अमेरिकेच्या अध्यक्षाच्या मताशी जुळत असतो त्याची आठवण झाली.

सौन्दर्य's picture

16 May 2025 - 3:33 am | सौन्दर्य

माझ्या मनात एक प्रश्न आहे. चला, ट्रम्पचे वक्त्यव्य एकवेळ बाजूला ठेऊ. पण आपण BRICKS, quad, G-20 चे खंदे पुरस्कर्ते असून सुद्धा, एकही देश आपल्याबाजूने का नाही उभा राहिला ? इस्राएल व फ्रान्सचा अपवाद वगळता. आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये का घालू शकलो नाही, त्यांचे बिलियन डॉलरचे बेल आउट पॅकेज का लांबवू (प्रलंबित ?) शकलो नाही.

कुठेतरी काहीतरी चुकते आहे असे हे सगळे बघून वाटायला लागते .

सुबोध खरे's picture

16 May 2025 - 9:50 am | सुबोध खरे

आपण पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये का घालू शकलो नाही, त्यांचे बिलियन डॉलरचे बेल आउट पॅकेज का लांबवू (प्रलंबित ?) शकलो नाही.

अमेरिका किंवा युरोपीय देश जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पैसे पुरवतात त्याना रशियावर आणि चीनवर वर्चस्व ठेवण्यासाठी पाकिस्तान प्यादं म्हणून वापरता येतं.

तेंव्हा ते भारतासारख्या देशाचं का ऐकतील?

आपण आज मोठे होत असलो तरी इतके मोठे झालेलो नाही की आपल्याला नाराज ठेवणे जगाला परवडणार नाही.

फ्रान्स सुद्धा आपल्या बाजूने उभा राहिला कारण आपण अमेरिकेला फाटा मारून त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि इतर उत्पादने विकत घेत आहोत म्हणून. ते सुद्धा रोख पैसे मोजून. हा शुद्ध व्यवहार आहे.

केवळ इस्रायल हा एक देश आपल्या बाजूने कायम उभा राहत आला आहे. याचे एकमेव कारण हे दोन्ही देश दहशवादामुळे पोळले गेलेले देश आहेत, त्यांचा शत्रू समान आहे आणि जगाच्या इतिहासात भारत हा एकमेव देश असा आहे कि जेथे ज्यू लोकांचा छळ झालेला नाही.

आणि याबद्दल इस्रायल भारताबद्दल कृतज्ञ आहे.

सौन्दर्य's picture

16 May 2025 - 6:28 pm | सौन्दर्य

शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद खरे साहेब.

रात्रीचे चांदणे's picture

16 May 2025 - 6:59 pm | रात्रीचे चांदणे

तेंव्हा ते भारतासारख्या देशाचं का ऐकतील?
युरोप आणि अमेरिकेत दहशतवादी हल्ले झाले तरच त्यांच्या लक्षात येईल. तो पर्यंत भारताच्या मदतीला दुसरा देश येईल वाटत नाही. पाकच्या मदतीला मात्र चीन, turkey असेल. शत्रूचा शत्रू म्हणून चीन पाक ला मदत करतोय तर धर्मा मुळे turkey.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2025 - 6:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर, वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत's picture

20 May 2025 - 9:33 am | विवेकपटाईत

भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते. युद्धासाठी कारण ही नव्हते. भारताने फक्त पाकिस्तान येथील आतंकी मुख्यालये नष्ट केली. त्यात मसूद आजहरच्या परिवारा समेत अनेक प्रमुख आतंकी मेले. किती मेले याचे प्रमाण पाक मीडिया ने दिले त्यामुळे हा प्रश्न यावेळी कोणी विचारणार नाही. आपले मिशन पूर्ण झाले. या शिवाय अज्ञात दर महिन्यात किमान एक तरी आतंकी मारतात, ते सत्र सुरूच राहणार. पाकिस्तान ने द्रोण आणि मिसाईल हल्ला केला नसता तर पुढे युद्ध झालेच नसते. पण आपण पाक हल्ल्याचा लाभ घेऊन आपण त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केली. या शिवाय त्यांची विमान तळांवर उभी 30-50 विमाने किंवा जास्तीही नष्ट झाली असेल. आपल्या तिन्ही सैन्याने बॉर्डर क्रॉस केली नाही. त्यामुळे विमान इत्यादि पडण्याचा प्रश्नच येत नाही. युद्ध विराम हा प्रश्न भारतासाठी कधीच नव्हता. बाकी कुणाला ही माहीत नाही आपले वेगवेगळ्या ठिकान्यांचे मिसाईल हल्ले कोणत्या सैन्याने केले.
एकदा बलुचिस्तान वेगळा झाला की सिंधु देश ही वेगळा होईल, पख्तून भाग अफगाणिस्तान घेईल. उरलेला पंजाब फक्त पाकिस्तान मध्ये उरेल. पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही.

सुबोध खरे's picture

14 May 2025 - 11:07 am | सुबोध खरे

ऑपरेशन सिंदूर चा मूळ हेतू काय?

१) एकतर पाकिस्तानला धडा शिकवणे . तो बऱ्यापैकी सध्या झाला असे म्हणता येईल.

२) दुसरी गोष्ट पाकिस्तान ने दहशतवाद हा भारताचा सूड घेण्यासाठी शोधलेला स्वस्त पर्याय होता. आता पर्यंत पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवून आपल्याला त्रास देत असे. पण ऑपरेशन सिंदूर मुळे हा पर्याय आता इतका महागडा झाला आहे कि पाकिस्तानला दुसरा एखादा स्वस्त उपाय शोधणे आवश्यक आहे. एक हि मारा लेकिन इतना सॉलिड मारा कि जीवनभर याद रहेगा अशी स्थिती आहे.

पाकिस्तान आपल्याकडे असलेली दहशतवाद्यांची फौज मोडीत काढेल हि शक्यता नगण्य आहे कारण इतके जिहादी तरुण त्यानी निर्माण केले आहेत त्यांना कुठे तरी कामाला लावणे आवश्यक आहे. हा भस्मासुर दुसरीकडे वळवला नाही तर त्यांनाच जाळून भस्म करणार यात शंका नाही. पण आता भारतात असे दहशतवादी घुसवण्याअगोदर त्यांना नक्कीच विचार करावा लागेल. भारताने स्पष्ट सांगितले आहे कि दहशतवादी हल्ला म्हणजे भारताशी युद्ध समजले जाईल.
आणि आता त्यांची हवाई संरक्षण प्रणाली इतकी खिळखिळी झाली आहे कि चीनकडे भीक मागून ती मुळापासून सुधारावी लागणार आहे. तोवर भारताला त्यांच्यावर हल्ला करणे अतिशय सोपे आहे. आणि नवीन संरक्षण प्रणाली इतकी महाग आहे कि काही लाख कोटी रुपये लागतील जे पाकिस्तानला उभे करणे अशक्य आहे. पाकिस्तान ला त्यांची बटीक होण्याशिवाय पर्याय नाही. साधी S ४०० हि प्रणाली भारताने रशिया कडून ३५ हजार कोटी रुपयात २०१६ मध्ये विकत घेतली होती. यात आकाश आकाशतीर, त्यांचे रडार इ घेऊन उभे करण्यात काही लाख कोटी रुपये लागतील.

३) पाकिस्तानने आम्ही अणुबॉम्ब टाकू अशी धमकी देणे चालवले होते . भारताने त्यांची अणवस्त्रवाहक प्रणाली सध्यातरी पार खिळखिळी केलेली आहे त्यामुळे पुढची एक दोन वर्षे तरी पाकिस्तान काही अणुबॉम्ब टाकु शकेल हि शक्यता नगण्य आहे.

अर्थात असीम मुनीर सारखे त्यांचे नेते जिहादी मनोवृत्तीचे आहेत .

आम्ही साफ बेचिराख झालो तरी बेहत्तर भारताला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे काही वर्षांनी हि कटकट परत उपटणार आहेच

परंतु सध्या तरी त्यांना धडा शिकवलेला आहे.

१. ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट साध्य केले हे मोदींच्या संरक्षण धोरणाचे यश आहे.

तथापि,

२. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे.

स्वधर्म's picture

15 May 2025 - 3:29 pm | स्वधर्म

>> १. ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट साध्य केले हे मोदींच्या संरक्षण धोरणाचे यश आहे.
ज्या अतिरेक्यांनी त्या निरपराध हिंदूंना मारले, त्यांना पकडून किंवा मारून टाकल्याचा पुरावा मिळाला असता तर बदला घेतला असे म्हणणे योग्य वाटले असते. सध्या तरी तसा काही पुरावा मिळालेला नाही. आपण पाकच्या काही ठिकाणांवर हल्ला केला आहे आणि त्यांनी काही राफेल विमाने पाडल्याचा दावा केला आहे. त्यात कुणाचे किती नुकसान झाले त्यावरून कोणाला जास्त यश मिळाले याबाबत नेमके वस्तुनिष्ठ सत्य शोधणे अवघड आहे, कारण प्रत्येकजण आपल्याला सोईचे तेवढेच सांगत आहे, किंवा कबूल करत आहे. माई तेच म्हणत आहेत असे वाटते.

एक नागरिक म्हणून आपल्याला यशच मिळाले असे माणणे मनुष्यस्वभावाला धरून होईल परंतु सत्य मात्र कधी कळेल असे वाटत नाही.

>> २. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे.

सहमत आहे.

रात्रीचे चांदणे's picture

15 May 2025 - 3:52 pm | रात्रीचे चांदणे

ऑपरेशन सिंदूरने ने भारताने पाकिस्तानला निसंशय धडा शिकवला आहे.
९ अतिरेक्यांचे तळ आणि नऊ दहा एअर बेस उध्वस्त करून भारताने नक्कीच काही प्रमाणात तरी बदला घेतला आहे. ह्या दरम्यान राफेल पाडले असेल तर तो एक लढाईचाच भाग आहे. शत्रू वर हल्ला ही करायचा आणि आपले काहीच नुकसान होऊ द्यायचे नाही हे फक्त बॉलीवूड मध्येच शक्य आहे नाहीतर इस्राईल पॅलेस्टन सारख्या लढाईत.

ज्या अतिरेक्यांनी निरपराध हिंदूंना मारले त्यांना मारून किंवा शक्य झालं तर जिवंत पकडले तर मात्र बदला पूर्ण झाला म्हणू शकतो. त्यातही ते आतमध्ये कसे आले, हत्यार कोणी दिली कांय त्रुटी राहिल्या ह्याचा अभ्यास झाला पाहिजे.

सुबोध खरे's picture

15 May 2025 - 7:51 pm | सुबोध खरे

ज्या अतिरेक्यांनी निरपराध हिंदूंना मारले त्यांना मारून किंवा शक्य झालं तर जिवंत पकडले तर मात्र बदला पूर्ण झाला म्हणू शकतो

हे अतिरेकी म्हणजे प्यादी होती.

त्यांना फिरवणारे वझीर मारले गेले आणी ते वझीर जिथे राहत होते ते किल्ले जमीनदोस्त केले हे कुणी लक्षातच घेत नाहीये.

हवाई तलावर हल्ला झाला आणि रनवे वर बॉम्ब टाकले या अतिशय गौण गोष्टी आहेत. रनवे दोन तीन दिवसात दुरुस्त होतात.

तुमच्या खिडकीची काच कुणीतरी फोडली ती काच दुरुस्त होते पण काच फाडणारा तुमच्या समोर उघड माथ्याने फिरतो आहे आणि परत कधीही काच फोडून घरात घुसेल हि धमकी देत असेल तर तुमची स्थिती काय होईल?

त्यात अब्जावधी रुपयांची हवाई रडार नष्ट केली हि उपलब्धी मोठी आहे.

काही F १६ विमाने हँगर मध्येच नष्ट झालेलीआहेत याबरोबर त्यांची ड्रोन मेन्टेनन्स सुविधा नष्ट झाली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसलेला आहे कारण सध्या असलेली त्यांची हवाई संरक्षण प्रणाली भारताने सहज भेदलेली आहे.

चीनची S ३०० ची नक्कल असलेली प्रणाली HQ ९ हि निरुपयोगी ठरली आहे म्हणजेच पाकिस्तानला ती संपूर्ण बदलणे आवश्यक झालेलं आहे.

यासाठी त्यांना अब्जावधी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न जास्त मोठा आहे. आणि चीनच्या प्रणालीवर विश्वास तर नाही पण चीन शिवाय दुसरं कोणी च कर्ज देणार नाही आणि चीन कर्ज देईल ते फक्त त्यांची रडार प्रणाली विकत घेण्यासाठी.

हे म्हणजे जावई आंबे विक्री करतो आणि त्याचे आंबे रद्दड आहेत पण सासरा दुसरीकडून आंबे घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे.

पाकिस्तानने स्वतःचे दूर पल्ल्याचे रडार निर्माण केले ते पण कुचकामी ठरले आहे त्याबद्दल कुठेच वाच्यता होत नाहीये.

AM ३५०५ गुगलून पहा

https://www.firstpost.com/world/pakistan-unveils-am3505-radar-to-monitor...

एवढा खोल विचार कोण कशाला करतो ?

सगळे डावे मोदी कसे फेल गेले हेच सांगण्यात गर्क आहेत. आणि मोदी पाकिस्तानी लष्कराची स्थिती पाहून गालातल्या गालात हसताहेत.

मग शस्त्रसंधीचे श्रेय तात्यांनी घेऊ दे कि चीनला. आपल्याला जे हवं होतं ते मिळवलं. हे भारतीय जनतेला समजावण्यात अपयश आलं हि एक दुर्दैवाची बाब आहे.

बाकी इतर कोणताही देश तुम्ही जिंकलात हे जाणून घेण्यात मुळीच रस घेत नाही.

अमेरिका आपली लॉकहीड मार्टिन कंपनीची F १६ आणि AN/TPS-77 रडार कुचकामी ठरली हे कोणत्या तोंडाने सांगणार आहे?

त्यांचा बाजार उठेल ना

AN/TPS-77 गुगलून पहा

आपण तीन रडार निकामी केली आहेत यांची एकाची किंमत $828 million (६५०० कोटी भारतीय रुपये) इतकी आहे. म्हणजेच केवळ हि तीन रडार विकत घेण्यासाठी त्यांना आय एम एफ कडे तीन वेळा भीक मागावी लागेल

आणि चीनची JF १७ विमाने, चेंगदू J १० आणि PL १५ क्षेपणास्त्रे किती कुचकामी ठरली हे कशाला आपले तोंड उघडून सांगणार आहे?

आपले लोक सुद्धा बाहेरचे लोक जे सांगतील त्यावरच विश्वास ठेवतात.

बाकी कुणी ही ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले याबद्दल बोलत नाहीये. कारण त्याबद्दल कोणताही वाद नाहीये. मूळ हेतू तर तोच होता.

असंच असतं.

मोदी द्वेषाची कावीळ झाली कि काहीच स्पष्ट आणि शुभ्र दिसत नाही.

तुंम्ही माझ्या प्रतिसादातले वाक्य उचलून लिहिल्यामुळे...

तुम्ही जे सर्व लिहिले आहे, ते
१. काय झाले असते तर तुंम्हाला आवडले असते ते आहे
की
२. प्रत्यक्षात काय घडले ते आहे?

तुमची सगळी माहिती मला टाईप १ ची वाटते आहे. कारण त्यात अत्यंत ढोबळ विसंगती आहेत. केवळ एक उदाहरणः
>> एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न जास्त मोठा आहे. आणि चीनच्या प्रणालीवर विश्वास तर नाही पण चीन शिवाय दुसरं कोणी च कर्ज देणार नाही...
आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज ऐन हल्ल्यांच्या धामधुमीत मंजूर केल्याचे संपूर्णपणे विसरणे किंवा मुद्दामहून अनुल्लेख करणे भानावर असलेल्यास अशक्य आहे. इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे. दुसर्‍यांचा पाकला विरोध करण्यासाठी प्रभाव टाकणे तर सोडा, आपणही साधा विरोध नोंदवू शकत नाही. हे कसले धडा शिकवणे आहे?

खरे तर याआधी मोदींच्या अगदी जवळचे अर्थसल्लागार असलेले सुब्रमणियम यांनी केलेला एक घोटाळा बाहेर आल्यानंतर वरील कर्ज मंजूरीच्या तीन दिवस आधी त्यांना आंतरराष्ट्रीय नाणे निधीत असलेली नियुक्ती रद्द करून परत बोलावले आहे. तिथेच आपल्या सरकारची पुरेशी शोभा झाली आहे. https://youtu.be/XcmdrtjRE0E?si=H0I7E8JT2gTadioh

बाकी तुंम्ही इतके काय काय लिहिले आहे त्याचा त्रयस्थ विश्वासार्ह स्त्रोत दिल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही. खालील एक व्हिडिओ मला एका भाजप समर्थकाने पाठवला होता. https://youtu.be/08Xcnxpx_wQ?si=qx0KCOebsyisPPp0 निवृत्त मेजर जनरल नारायणन यांचा. ते एखाद्या गल्लीत राडा झाल्यावर सर्किट लोक जसे भाईची यशोगाथा गातात तशी आपली यशोगाथा गात आहेत. अर्थात त्यांनी केलेले अण्वस्त्रांना धोका पोहोचवल्यामुळे पाक हादरला वगैरे दावे ताबडतोब संबंधीत विभागाने ( जयस्वाल यांनी ) खोडून काढले आहेत. https://youtu.be/oZCP5Z-RxP4?t=683 तसेच इकॉनॉमिक टाईम्सनेही ते दावे खोडले आहेतः https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/epice...

माझे मत असे होते व आहे:
>> कुणाचे किती नुकसान झाले त्यावरून कोणाला जास्त यश मिळाले याबाबत नेमके वस्तुनिष्ठ सत्य शोधणे अवघड आहे, कारण प्रत्येकजण आपल्याला सोईचे तेवढेच सांगत आहे, किंवा कबूल करत आहे.

बाकी तुंम्हाला मोदी गालातल्या गालात हसत असल्याचे दिसते जे आंम्हाला दिसत नाही तेंव्हा आपण आपल्या जगात मजेत असा.

इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे.
माझ्या माहीतीप्रमाणे आय एम एफ मधे मतदान प्रक्रियेत नकार नोंदवण्याची सोय नाही. खरे तर आय एम एफ मधे अमेरिका , चीन, फ्रान्स ह्या देशांची एकाधीकारशाही आहे. त्यातही मतदान प्रक्रियेत कोटा सिस्टीम आहे. एकट्या अमेरिकेला १६% व चीन ला ६% कोटा दिलेला आहे. भारत व ईतर देश २% वगेरे कोट्यात येतात. नकार नोंदवण्याची सोय नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग न घेणे किंवा मित्रदेशांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यापासुन पराव्रुत्त करणे ईतकेच आपण करु शकतो. त्यातही अमेरिका व चीन ह्या देशांना वेटो पावर आहे. त्यामुळे कुणी कीतीही आदळाअपट केली तरी हे दोन देश करतील तेच होते.

स्वधर्म's picture

15 May 2025 - 11:26 pm | स्वधर्म

तुमची माहिती बरोबर आहे विरोधी मत टाकता येत नाही.
पण फक्त मत देणे किंवा ते न देणे एवढीच भूमिका भारताच्या हातात होती? अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना त्यांना आपल्या बाजूला करून घेता आले नसते? किमान हे प्रकरण संघर्ष मिटेपर्यंत पुढे ढकलण्याएवढा तरी वट जगातल्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थसत्तेला पाहिजे का नाही? नसेल तर ती दोस्ती, ती जगात वाढलेली किंमत काय कामाची?

सुक्या's picture

16 May 2025 - 4:04 am | सुक्या

अमेरीकेची दोस्ती ही मॄगजळासारखी आहे. दुरुन दिसते पण प्रत्यक्षात ती त्यांच्या सोयीची असते. अमेरीका हा आजवर कुणाचाही मित्र म्हणुन वागला नाही. फक्त जिथे फायदा आहे तिथे तो मित्र. काम झाले की तू कोण नी मी कोण? जगात ईतरत्र काहीतरी उचापती करुन राजकीय प्रश्न करुन तो भाग अस्थीर करुन शस्त्र विकणे / आपल्याला वरचढ होइल अशा देशांना काहीतरी कुरापत करुन त्यांची डोकेदुखी वाढवुन ठेवणे असल्या कुरापती ते करत असतात. चीन व अमेरिकेची विचार सरणी एकच आहे. त्यामुळे शहाण्याने ह्या दोन्ही देशांवर जास्त अवलंबुन राहु नये हेच खरे.

आशियायी देशांमधे चीन वर तसेच भारतावर वरचढ होण्यासाठी पाकीस्थान हा एक प्यादा आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त ना चीन करतोय ना अमेरिका. त्यातही भारताची आजवर असलेली "बनाना रिपब्लिक" ही छबी अजुनही तशीच आहे. भारतीय नेते आजही अगदी कडक, आर या पार निर्णय घेत नाहीत. आता तुर्किये चे बघा, आम्हाला कीतीही नुकसान झाले तरी चालेल पण आम्ही पाकीस्थान ची साथ देउ असे ते म्हणत आहेत. म्हणजे तुम्ही आमच्यावर कितीही बहिष्कार टाका आम्हाला शष्प फरक पडत नाही. ही बाब भारतीय नेते अजुनही करत नाही. याला बहुअंशी भारतीय जनता जबाब्दार आहे. म्हणजे समजा एखाद्या नेत्याने असा निर्णय घेतला तर त्याचे समर्थन १० लोक करतील पण ९० लोक त्याला विरोध करतात. त्यावर जर त्यानिर्णयामुळे अंगावर शेकले तर त्या नेत्याची उचल्बांगडी झाली म्हणुन समजा. त्यामुळे आपले नेते असले धाडसी निर्णय घ्यायला घाबरतात. त्यामुळेच जरी ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलो तरी जगात अजुनही वट नाही.

सुबोध खरे's picture

16 May 2025 - 9:34 am | सुबोध खरे

अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना

हा एक मूलभूत गैरसमज आहे.

अमेरिका कुणाचाही मित्र नाही.

मुळात रशिया आणि चीन वर वर्चस्व ठेवण्यासाठी पाकिस्तानला ते "प्यादं" म्हणून वापरतात. तेंव्हा पाकिस्तानची बाजू घेऊन ते भारताला मदत करतील हि अपेक्षा करणे हेच बालबुद्धीचे (NAIVE) लक्षण आहे.

सुदैवाने भारताच्या लष्करी आणि राजकीय धोरण कर्त्यांना ( कोणत्याही पक्षाचे असोत ) अमेरिकेवर भरवसा ठेवता येणार नाही हे माहिती आहे. त्यामुळेच कोणतीही शस्त्रास्त्रे घेताना अमेरिकेला आपण खड्यासारखे बाजूला ठेवलेले आहे.

जी शस्त्रास्त्रे अमेरिका भारताला स्वतःच्या फायद्यासाठी देऊ करते तेवढीच आपण घेतलेली आहेत.

उदा P ८ I पोसायडॉन हे पाणबुडी विरोधी विमान चीनवर लक्ष्य ठेवण्यासाठी अमेरिकेने आपल्याला देऊ केले.

"माय फ्रेंड" म्हणताना श्री मोदी यांनी ट्रम्प याना सुद्धा व्यवस्थित फाटा मारलेला आहे हे आपण लक्षात घेत नाही. यात S ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली असो कि रशिया कडून तेल घेणे असो किंवा आताची ताजी बातमी म्हणजे विक्रांत आणि विक्रमादित्य या विमानवाहू नौकांसाठी अमेरिकी F १८ HORNET सोडून फ्रान्स ची RAFALE M विकत घेणे.

आपले अमेरिकेशी संबंध केवळ व्यवहार आणि व्यापारापुरते आहेत. श्री मोदी यांनी पुतीन यांची मैत्री अजिबात तोडलेली नाही हे अमेरिकेस पसंत नाही.

राजकारणी तुम्ही समजत तितके भोळे किंवा निरागस नसतात( नसायला पाहिजेत).

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष फार तर चार वर्षे असेल, त्याच्या वर भरोसा ठेवून पुढच्या चाळीस वर्षाचे भविष्य अंधारात ठेवता येत नाही.

सुबोध खरे's picture

16 May 2025 - 9:39 am | सुबोध खरे

आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज ऐन हल्ल्यांच्या धामधुमीत मंजूर केल्याचे संपूर्णपणे विसरणे किंवा मुद्दामहून अनुल्लेख करणे भानावर असलेल्यास अशक्य आहे.

Pakistan receives 2nd IMF payout that India had objected to

This payment is part of the second instalment of a $7 billion IMF loan deal that began in September 2024 and will run for 37 months.
With this latest inflow, the total funds given to Pakistan so far under the EFF have reached $2.1 billion.

https://www.indiatoday.in/business/story/pakistan-receives-2nd-imf-payou...

याचा युद्धाशी काहीही संबंध नाही

स्वधर्म's picture

16 May 2025 - 4:27 pm | स्वधर्म

>> याचा युद्धाशी काहीही संबंध नाही

- आहे ना? म्हणून तर भारताने आक्षेप घेतला होता. तुंम्ही दिलेल्या लिंकमधेच ही दुसरी लिंक आहे: https://www.indiatoday.in/india/story/india-international-monetary-fund-...
"Debt, terror and reputational Risk
India’s most serious concern was that IMF funds could be misused to sustain state-sponsored cross-border terrorism. Citing a UN report on military-run businesses in Pakistan and the IMF’s own Evaluation Report, India warned that continued bailouts pose a moral hazard and reputational risk for international donors."

- मोदींनी जगातील जास्तीत जास्त देशांना भेटी देण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या करदात्यांचे हजारो कोटी रूपये खर्च केले आहेत. त्याचा काय उपयोग?
- मोदी व भाजप समर्थक सतत मोदी व भारताचे वजन आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे वाढले आहे, मनमोहन सिंग यांच्या काळात ते किती कमी होते इ. वल्गना करत असतात. जर हे वाढलेले वजन/ शब्दाला किंमत स्पष्टपणे दहशतवादाला पाठिंबा देणार्‍या व आपल्याला त्रास देणार्‍या देशाला मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय कर्जाला निदान काही काळ प्रलंबीत सुध्दा करू शकत नसेल, तर नक्की याचा उपयोग काय? आर वी ओन्ली द टेकर्स? मताला काहीही किंमत नसलेले?

त्यामुळे वर वामन देशमुख म्हणतात ते अगदी पटण्यासारखे आहे: २. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे.
हे दुर्दैवाने खरे आहे. खरे म्हणजे पाकची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा छोटी असून, आजे जग पाकला भारताच्या बरोबरीचा देश मानू लागले आहेत. भारताच्या विरोधाला न जुमानता पाकने हवे ते मिळवले असा संदेश गेला आहे. तुमच्यासारखे मोदी समर्थक श्रेय देण्याच्या बाबतीत मोदींशिवाय दुसरे नांव घेत नाही, पण काही जबाबदारी घेण्याची वेळ आली की ती त्यांच्यावर जराही पडू देत नाही. पण आता विश्वगुरुंची कितीही आरती केली तरी देशासाठी हे एक अपयशच आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

16 May 2025 - 10:33 am | चंद्रसूर्यकुमार

Kissinger

स्वधर्म's picture

16 May 2025 - 4:40 pm | स्वधर्म

>> अमेरीका हा आजवर कुणाचाही मित्र म्हणुन वागला नाही.
बरोबर मोदी कितीही मित्र म्हणत असले तरी ट्रंप त्यांना शपथविधीला बोलावत नाही. तसेच आपल्या नागरिकांना हातकड्या घालून अत्यंत अपमानास्पद रितीने पाठवतो त्यावर आपले महानेते चिडीचूप! नेपाळच्या नागरिकांनासुध्दा त्यांनी हातकड्या न घालता पाठवले. खरोखरच असे नेतृत्व देशासाठी .... आहे.

>> त्यामुळे आपले नेते असले धाडसी निर्णय घ्यायला घाबरतात.
न घाबरल्याचीही उदाहरणे आहेत. पण वस्तुनिष्ठपणे पाहिली तर दिसतात.

आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये हा लेख दोन्ही बाजुंचा लेखाजोखा अतिशय संयमित आणि संतुलित पद्धतीने मांडत आहे.

https://www.brookings.edu/articles/lessons-for-the-next-india-pakistan-war/

भारताच्या दृष्टिकोनातून कोणीही पाकिस्तानचा पहेलगाम हल्य्यात सहभाग होता कि नाही हा प्रश्न सुद्धा विचारत नाहीत आणि सर्वजण पाकिस्तानचा सहभाग आहेच, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, हे धरूनच चालत आहेत हा एक महत्वाचा बदल आहे.

युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी.....
१. डोनाल्ड ने सामाजिक माध्यमावर शस्त्रसंधी चे पोस्ट टाकून त्यांचा अवखळपणा दाखवला असे माझे स्पष्ट मत आहे , यापूर्वीच्या युद्धात सुद्धा कारगिल ला कोणी मध्यस्थी केलेली हे जरा स्मरणात ठेवा. टॅरिफ युद्धातील चीन विरुद्धच्या कोलांट्या उड्या वरून आधीच हसे करून घेतले आहे अश्या माणसाच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा.
२. १९७१ च्या युद्धानंतर सुद्धा भुत्तोंचे व्हिडीओ पहा, असा कांगावखोरपणा त्या देशात ठासून भरलेला आहे त्यामुळे त्यांचे विडिओ पाहून आपली मते ठरवणे थोडे धाडसी ठरेल. आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे. ७१ साली सुद्धा काश्मिरातील भूभाग आपण परत केला कारण ते आपले लक्ष्य नव्हते. ते आता किती भारी पडतंय त्याचा विचार करा.
३. अमेरिका आणि पाक यांचे संबंध भारतापेक्षा जुने आहेत सध्याचा सिपेक चा मुद्दा सोडला तर दरवेळी पाकला आपल्या कह्यात ठेवले आहे. आताची ट्रम्पची प्रतिक्रिया आल्यावर चीनची तात्काळ प्रतिक्रिया का आली याचा विचार करा
४. escalation ladder ची एक पायरी आपण वर चढलोय म्हणूनच आत्ता फक्त चर्चा हि पाकव्याप्त काश्मीरवर असे सरकार म्हणताय
५. सरकार कमळाचे असो वा हाताचे, आपले स्वकीयांचे हित जाणणे महत्त्वाचे आहे.
६. परराष्ट्र संबंधात कोणीकोणाचा मित्र वा शत्रू नसतो , हे वाक्य सध्याच्या राजकारणात सुद्धा लागू आहे त्यामुळे या युध्दविरामासंदर्भातील चर्चा पक्षभेद विसरून करणे गरजेचे आहे.
७. पाक हा अमेरिकेकडॆ जाऊन रडला नि युद्धविराम झाला पण त्या दोन दिवसात किती अनेकांची भीतीने त्रेधा तिरपीत उडालेली हे जरा आठवा , माझ्या ओळखीतले ब्लू कॉलर लोकसुद्धा दुबईत जाऊन युद्ध बचाव करण्याचे स्वप्न बाळगून होते , त्यामुळे ऑल आऊट वॉर हे बोलण्यास चांगले वाटले तरी जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा भान येते ( जी यावेळेस ब्लॅकआउट ने अनेकांस जाणवली )
८. जो स्वतःच इहलोकी लवकर पोहचणार आहे त्याचा गळा दाबून खुनाचा आरोप घेऊन तुरुंगात जावे कि त्याच्या प्राणवायू नलिकेस हलका छेद करून नामनिराळे व्हावे हे ज्याने त्याने ठरवावे.

आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे.
+१

एकुणातच (बहुतेक) भारतीय लोकांची (यात हुच्च मध्यमवर्गिय जास्त येतात) देशसेवा / देशप्रेम सोयिप्रमाणे बदलते. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा माझ्या घरात नाही हीच त्यांची विचारसरणी असते. बघा मालदीव ने कीतीही ईंडीया हटाओ केला तरी तिथे जाउन सुट्टी एंजोय करणारच. काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 May 2025 - 11:09 am | माईसाहेब कुरसूंदीकर

काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.
यथा राजा(माजी आणि आजी..सगळेच आले) तथा प्रजा.९० च्या दशकापासुन कश्मीरवर पाकिस्तान पुरस्कृत हल्ले होत आहेत. पण तरीही दोन्ही देशांचे राजदूत ब्रुसेल्स्/लंडनमध्ये हास्तांदोलन करताना दिसायचे. एके ठिकाणी एकमेकांवर गोळीबार करायचा आणी वाघा बॉर्डरवर 'लेफ्ट-राईट' करत दोन्ही बाजुला गर्दी जमवायची. नुसती ढोंगबाजी.
"कश्मिर प्रश्न चर्चेनेच सुटेल" हे वाक्य राजकीय नेतेच करत होते. 'त्याग' करणारा मध्यमवर्ग केव्हाच 'वर' गेला आहे. सध्याचा मध्यम वर्ग वस्ताद आहे. तो राजकीय नेत्यांचे अनुकरण करतो.

विवेकपटाईत's picture

20 May 2025 - 9:42 am | विवेकपटाईत

भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते. युद्धासाठी कारण ही नव्हते. भारताने फक्त पाकिस्तान येथील आतंकी मुख्यालये नष्ट केली. त्यात मसूद आजहरच्या परिवारा समेत अनेक प्रमुख आतंकी मेले. किती मेले याचे प्रमाण पाक मीडिया ने दिले त्यामुळे हा प्रश्न यावेळी कोणी विचारणार नाही. आपले मिशन पूर्ण झाले. या शिवाय अज्ञात दर महिन्यात किमान एक तरी आतंकी मारतात, ते सत्र सुरूच राहणार. पाकिस्तान ने द्रोण आणि मिसाईल हल्ला केला नसता तर पुढे युद्ध झालेच नसते. पण आपण पाक हल्ल्याचा लाभ घेऊन आपण त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केली. या शिवाय त्यांची विमान तळांवर उभी 30-50 विमाने किंवा जास्तीही नष्ट झाली असेल. आपल्या तिन्ही सैन्याने बॉर्डर क्रॉस केली नाही. त्यामुळे आपले विमान इत्यादि पडण्याचा प्रश्नच येत नाही. युद्ध विराम हा प्रश्न भारतासाठी कधीच नव्हता. कुणाला ही माहीत नाही आपले वेगवेगळ्या ठिकान्यांचे मिसाईल हल्ले जमिनीवरून, समुद्रातून किंवा विमानाने भारतीय सीमेत राहून केले.
एकदा बलुचिस्तान वेगळा झाला की सिंधु देश ही वेगळा होईल, पख्तून भाग अफगाणिस्तान घेईल. उरलेला पंजाब फक्त पाकिस्तान मध्ये उरेल. पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही. बाकी मोदी विरोधात लोक मानसिक विकृत झाले आहेत भारताचे नुकसान झाले पाहिजे होते असे त्यांना वाटते. सैन्यावर आणि सैन्य प्रवक्ता, प्रेस कोन्फ्रेंस वर त्यांच्या विश्वास ही नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 May 2025 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते.

अच्छा.

युद्धासाठी कारण ही नव्हते.

अच्छा.

पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही.

=)) अरे देवा. आपोआप सोडतील वाटतं तो भुभाग.

-दिलीप बिरुटे

सौन्दर्य's picture

23 May 2025 - 11:28 pm | सौन्दर्य

भारतातील दहशतवादास पाकिस्तानी सेनाच कारणीभूत आहे, सेनाच त्यांना ट्रेनिंग, पैसे, संरक्षण पुरवते असे जर आपण म्हणतो तर फक्त दहशतवादी तळांवर हल्ले करून , ते नष्ट करून, दहा - बारा दहशतवादी मारून आपण आपले ध्येय साध्य कसं केलं हे कळले नाही.

ज्यावेळी आपण आपल्या आसपासाचे डास मारतो त्यावेळी, साचलेलं पाणी, कचरा, गटारं वगैरेत औषध फवारून डासांच्या मूळ पैदाईशी जागांना देखील नष्ट करतो.

त्यामुळे आपल्याकडे युद्धाचे सयुक्तिक कारण होतेच .

रात्रीचे चांदणे's picture

24 May 2025 - 10:30 am | रात्रीचे चांदणे

पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच पण त्याबरोबर रडारही उडीवले. आणि शेवटच्या दिवशी एअर बेसेस वर मिसाईल टाकले. म्हणजेच पाकिस्तानी एअर फोर्स वरचं हल्ला केला होता. पण तरीही ही कारवाई पाकिस्तानच्या ड्रोन हल्लाच्या उत्तर म्हणूनच केलेली दिसतेय.
मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की हिथुन पुढचे दहशतवादी हल्ल्यांकडे युद्धाची कृती म्हणूनच बघितले जाईल.

ह्या वेळी पाकडे घाबरले पण पाकिस्तानी सेने वरचा हल्ला म्हणजे जवळ जवळ युद्धच. म्हणजे त्या दृष्टीनेच आपल्याला तयारी करावी लागेल. प्रत्येक वेळी प्रत्येक मिसाईल इंटरसेप्ट केलेच जाईल याची शाश्वती नसेल. सैनिक शाहिद होतील, सामान्य नागरिकांचाही जीव जाईल.

युद्धात काहीतरी उद्धीष्ट असावं लागतंय. ह्यावेळी दहशतवादी तळ उद्वस्थ करणे हे आपले उद्धीष्ट होते.आणी ते साध्यही झाले. पण युद्ध चालूच करायचं तर उद्धीष्ट कांय असेल आपलं.मला तरी वाटत नाही की POK ताब्यात घेण्याचा आपला विचार आहे किंवा ते व्यावहारिकाही आहे. त्यात POK ताब्यात घेणं म्हणजे CPEC ला धोका, म्हणजे चीनच्या गुंतवणूकीला धोका. उदा समजा चीन ने नुसत्या त्यांच्या फौजा सीमेवर जमवल्या तर आपल्यालाही त्यांना match करावे लागेल.

पाकड्यांसाठी काश्मीर हे फक्त सांगायचं कारण आहे खरं तर त्यांना हिंदू शेजार नकोच आहे.

भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या विविध धार्मिक तोंडावळ्याच्या दहशतवादी संघटना, तालिबान या पाकिस्तान सरकार, सैनादल आणि आयएसआय यांनीच खतपाणी घालून वाढवल्यात हे सर्वांनाच माहीत आहे. मग फांद्यांवर घाव घालत बसण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे थोरल्या बाजीरावाचे धोरण आपण अवलंबत आहोत काय?

सुबोध खरे's picture

24 May 2025 - 7:28 pm | सुबोध खरे

आपल्या पैकी किती लोकांचो मुंबई वर किंवा दिल्लीवर अणू बॉम्ब टाकला जाईल हि शक्यता स्वीकारण्याची तयारी आहे?

युद्धखोरी सोपी असते. मुळा वर घाव घालायचा म्हणजे काय? सर्वनकष युद्ध करून पाकिस्तानची सर्वचं सर्व लष्करी ठाणी उध्वस्त करायची? असे केल्यास पाकिस्तान नक्कीच तुमच्या वर अण्वस्त्र हल्ला करेल. पाकिस्तान संपूर्ण बेचिराख होईल पण तुमची तीन चार शहरे नष्ट होऊन दोन चार कोटी लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. हि तयारी आहे का?

आज लोकांना दोन महिने अर्धाच पगार मिळेल म्हणून सांगितले तर बाप मेल्यासारखे सुतकी चेहरे होतील. मग एवढे सर्वंकष युद्ध तयारी किती लोकांची असेल.

आपण पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.

मुळात याचा अर्थ असा आहे कि पाकिस्तान उघडा पडला आहे आणि आता भारताने लगेच प्रतिहल्ला केला तर त्याविरुद्ध त्यांच्याकडे सक्षम अशी हवाई संरक्षण प्रणालीच अस्तित्वात नाही. हि प्रणाली आणि नष्ट झालेली विमाने परत उभी करण्यासाठी पाकिस्तानला तीन ते चार सकल उत्पन्न ( जीडीपी) खर्च करावे लागणार आहे. म्हणजेच पुढच्या चार वर्षाचे सकल उत्पन्न यात खर्च होणार आहे. या खर्चासाठी पैसे/ कर्ज कोण पुरवणार? अर्थात चीन. पण त्याबदल्यात पाकिस्तानला चीनचीच हत्यारे विकत घ्यावी लागणार.

मुळात आपण आपल्या अचूक क्षेपणास्त्रे प्रणाली ने चिनी शस्त्रास्त्रे कुचकामी ठरवली आहेत.

त्यामुळे हि शस्त्रे विकत घेतल्यावर पाकिस्तानी लष्करशहा कायमच भीतीखाली राहणार कि परत भारताने हल्ला केला तर हि शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाहीत.
हा मानसिक आघात प्रत्यक्ष विध्वंसापेक्षा जास्त भीतीदायक असेल.

एवढे असले तरी पाकिस्तान यातून फार काही सुधारेल हि आशा नाहीच.

शांती मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पुढच्या युद्धाची तयारी हाच आहे. तेंव्हा आपल्याला पाकिस्तान भविष्यात काय करेल हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तजवीज करावी लागेल.

इथे केवळ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला सांगितले कि आपले डावे लोक कलेवर घाला म्हणून आई मेल्यासारखे रडायला लागतात.

तुर्की आणि अझरबैजान वर संपूर्ण बहिष्कार टाका म्हटले तर ५० % लोकच तयार होतात.

बाकी १५ ऑगस्ट / २६ जानेवारीला गाडीवर झेंडा फडकावला कि आपली देशभक्ती सिद्ध होतेच.

युद्धाबाबत आपण व्यक्त केलेल्या मतांशी सहमत.

>> नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.

दावे तर दोन्ही बाजूंनी केले जातात पण दोन्ही देशातील नागरिकांना त्यांचे सरकार सांगेल त्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते. अशा परिस्थितीत वरील माहिती पडताळून पाहण्याबाबत त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा मिळू शकेल का?

रात्रीचे चांदणे's picture

28 May 2025 - 5:30 pm | रात्रीचे चांदणे

भरतीय सेनेच्या पत्रकार परिषदेत वेळोवेळी त्यांणी satelite फोटो दाखवलेलेच आहेत. पण त्यावर विश्वास नसेल तर
पाकिस्तानच्या वायुदलाच्या तळांचे before-and-after फोटो newyork times आणि washington post ने फोटो पब्लिश केले आहेत. ते बघू शकता.
HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत.
ब्रह्मोस क्षेपणास्त्रानेच हल्ला चढवला ह्याचे मात्र पुरावे कुणाकडे नसतील. म्हणजे भारतीय सेनाआणि पाकिस्तानी सेना सोडून सोडून.

आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहेतः https://www.nytimes.com/interactive/2025/05/14/world/asia/india-pakistan...

त्यापैकी दोन ठिकाणे भोलारी आणि नूर खान एअर बेस असून तिथे दोन इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे. मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे. But satellite imagery indicates that while the attacks were widespread, the damage was far more contained than claimed पाकचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले असे म्हटले आहे. त्यामुळे पाकला हादरा तर नक्कीच बसला असणार.
परंतु हा ११ वायुदलाच्या तळावर *जबर* हल्ला आहे किंवा नाही ते तज्ञच सांगू शकतील.
तसेच आपण म्हणता तसे 'HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत.' त्यामुळे 'पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.' या दाव्याला त्रयस्थ स्त्रोताकडून आधार अपेक्षित आहे.

रात्रीचे चांदणे's picture

29 May 2025 - 7:52 am | रात्रीचे चांदणे

मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे
New york times ने कदाचित आज तक सारखे चॅनेल्स बघितले असतील. ती त्यांची चूक आहे. भारतीय सेनेची ११ में ला झालेली प्रेस ब्रिफींग परत बघा. त्यांनी कुठेही म्हंटलेल नाही की पाकी एअर बेसेस उध्वस्थ केलेत म्हणून. हल्ला केलेला आहे एवढंच सांगितलेले आहे.
त्याच प्रेस मध्ये रडार साईट्स चे before -and -after satelite फोटोही दाखवले आहेत.पण त्यावर विश्वास नसेल तर ते सोडून द्या.

तर washington post मध्ये त्यांणी स्पष्ट लिहिलाय की भारताने पाकिस्तानी एअर बेसेस च्या तीन हँगर्स वरती हल्ला केला. त्या वेळी किती विमाने तिथं असतील हे पाकीच सांगू शकतील.
बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे.
आपत्कालीन परिस्तिथी मध्ये रन वे वरती मिसाईल टाकणे आणि तो रन वे वापरता न येण्यासारखा करणे हे गंभीर कसं नसेल?

रात्रीचे चांदणे's picture

29 May 2025 - 9:25 am | रात्रीचे चांदणे

उरी आणि बालाकोटच्या वेळी भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाया पाकिस्तानने मान्यच केल्या नव्हत्या. उरीच्या वेळी "कुत्री मारली" आणि बालाकोटमध्ये "कावळे आणि झाडं मारली" असा उपहास केला गेला. आपल्याकडूनच काही विरोधकांनीही "साबूत दिखावो" अशी मागणी केली होती. कदाचित त्या वेळी आपल्याला पुरावे गोळा करण्याची संधी नव्हती किंवा लोकं पुरावे मागतील ही कल्पना नसल्यामुळे फोटो, विडिओ काढले नसतील किंवा असलेच तरीही काही करणामुळे जाहीर केले नसतील.

पण यावेळी चित्र वेगळं होतं. एक तर पाकिस्तानने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या हल्ला झाल्याचं मान्य केलं.

७ मेच्या रात्री भारताने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर त्याचं चित्रीकरण ड्रोन किंवा तत्सम माध्यमांद्वारे मुद्दामहून केलं. काही दिवसांतच त्याचे सॅटेलाईट प्रतिमा आणि before-after फोटोही सार्वजनिक केले गेले. यावेळी कारवाई इतकी मोठी आणि अचूक होती की पाकिस्तानकडून नकाराची शक्यताच उरली नाही.

तर १० मेच्या हल्ल्यांचे बिफोर एन आफ्टर सॅटॅलाइट इमेजेसही दाखवल्या.
मग आत्ता हे एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आलं पाहिजेची मागणी चालू केली. त्रयस्थ संस्थेने दाखवलं तर हा हल्ला जबरीच आहे हे एखाद्या expert कडूनच आलं पाहिजे आणि समजा उद्या एखाद्या भारतीय expert ने सांगितलंच तर तो त्रयस्थ असला पाहिजे ही मागणी होईल.

रामचंद्र's picture

25 May 2025 - 11:19 am | रामचंद्र

कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व टंचाईने नागरिक हवालदिल झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तपत्रांत गेली चारपाच वर्षं येत होत्या. करोनाकाळात सरकारजवळ पुरेसा निधी नसल्याने जनतेनेच आपली स्वतःची काळजी घ्यावी, जमावबंदी वगैरे प्रकार लागू केले तर आमची आधीच कमकुवत अर्थव्यवस्था मोडूनच पडेल असं तिथल्या सरकारने जाहीर केलं होतं. बलुचिस्तान आणि अन्य दोन प्रांतातल्या सरकार वा सेनाविरोधी हल्ल्यांच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळतात. बलुचिस्तानात तर १९४८ पासूनच दडपशाही सुरू आहे. सिंध तर मधल्या काळात हातातून गेल्यातच जमा होता. जगातून येणारा बहुतेक सर्व निधी पाक सैन्य बांडगुळासारखा खाऊन बसते हे जनतेलाही समजते. आता तर भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकची हवाईदल ताकद बऱ्यापैकी ठेचली गेली आहे. इतकं होऊनही जनता सरकार/सेनादलांविरुद्ध उठाव करत नाही याचं नवल वाटतं.

रात्रीचे चांदणे's picture

25 May 2025 - 3:43 pm | रात्रीचे चांदणे

पाकिस्तानी लोकांच्या मते ही लढाई ते जिंकलेले आहेत. पाकिस्तानी फौजने त्यांना भरता पासून वाचवलेले आहे. त्यांनी आपली तीन/चार/पाच / सहा विमाने पाडली आहेत. एक S-400 उध्वस्थ केल आहे, ब्रह्मस्त्र चा स्टोरेज डेपो उडीवला आहे. उधमपूर आणि इतर दोन, तीन हवाई अड्डे बेचीरख केलेलं आहेत.
आणखी एक महत्वाचा दावा म्हणजे त्यांनी आपले एक ब्रिग्रेड headquarter सुद्धा बेचीरख केलेलं आहे. Chatgpt नुसार एका ब्रिग्रेड headquarter मध्ये कमीत कमी ३००० सैनिक असतात.
त्यामुळे उठाव करण्याचा प्रश्नच नाही.त्यात आपण भारतीय म्हणजे हिंदू. हिंदूंना मारणाऱ्या सेने विरुद्ध उठाव शक्यच नाही. एक वेळ उपाशी राहतील पण काफीरांना मारणाऱ्याना समर्थन करतील.
पाकिस्तान चे जुने दावे
कसाब सुरवातीला भारतीय होता तर कारगिल मध्ये मुजाहीद्दीनच होते. पण नंतर पाकी सैनिक होते हे मुशर्रफ ने मान्य केलेलं.

रामचंद्र's picture

25 May 2025 - 4:49 pm | रामचंद्र

खरं आहे पण किमान पाकिस्तानातलेच बलुची नागरिक तरी याच्याशी सहमत नसावेत.