बाजाराचा कल :१७ मार्चचा आठवडा
====================
मंडळी,
मी स्वत:ला चिमटे काढून कंटाळलो!
मागील पोस्टमध्ये केलेले "युयुत्सुनेट मात्र पुढच्या आठवड्यात नकारात्मक अनिश्चितता दाखवते आहे." हे भाकीत परत एकदा खरे ठरले आहे! हे कसे ते समजाऊन घ्यायचे असेल तर निफ्टीचा साप्ताहिक कालचौकटीवरील आलेख पाहणे योग्य ठरेल.
आकृती १ - पुढील आलेखात निळ्या बाणाने दाखवलेली मेणबत्ती काल संपलेल्या आठवड्याची आहे. ही मेणबत्ती काय दाखवते? मार्केट निश्चित्पणे वर पण गेले नाही आणि फार खाली पण गेले नाही, म्हणजे अनिश्चित राहिले. मात्र लाल रंगांची मेणबत्ती तयार झाल्याने भाकीतामधल्या "नकारात्मक" या शब्दावर शिक्कामोर्तब झाले.
आकृती दोन - निफ्टीचा मध्यमकालीन अंदाज. वर जायची शक्यता ७२% आहे तर खाली जायची शक्यता २७% आहे.
आकृती तिन - सोने वर/खाली जायची शक्यता ३६.६/६३.३८% अशी आहे.
आकृती ४ - युयुत्सुनेटचा पुढील आठवड्याचा अंदाज
"रे फंडानो परत फिरा रे मार्केटकडे आमुच्या" अशा ट्रेडर्सनी मारलेल्या आर्त हाका कदाचित फळणार असे दिसते... तेव्हा आपापल्या घरातली ताम्हणे, पळी-पंचपात्री घासून पुसून आरती करण्यासाठी तयार ठेवायला हरकत नाही.
जाता जाता - डीपसिकने उडवलेली धूळ खाली बसते न बसते तोच चीनने "माणूस" (याची पूर्ण सार्वजनिक म्ह० ओपनसोर्स आवृत्ती पण आहे असे कळते )नावाचा एलेलेमचा बाप बाजारात आणून खळबळ उडवलेली असल्याचे वृत्त वाचले. चीनी "माणूस" ची सेवा मिळविण्यासाठी त्यांच्याकडून आमंत्रण यावे लागते. खरे खोटे माहित नाही पण हे आमंत्रण लोक काही हजार डॉलर मोजून विकत घेत आहेत असे कळले.
मागील आठवड्याचे भाकीत इथे पहा -https://www.misalpav.com/node/52784
टीप- बाजारातील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटवर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
प्रतिक्रिया
14 Mar 2025 - 4:15 pm | आंद्रे वडापाव
लॉस हार्वेस्टिंग चालु आहे,
हे आर्थिक वर्ष पुर्ण होत नाही...
तो पर्यंत मार्केटला असेच टाइट पट्टीत ठेवण्यात येईल....
हे आर्थिक वर्ष पुर्ण होइपर्यंत मार्केट असेच बोअरिंग असेल...
15 Mar 2025 - 7:54 pm | युयुत्सु
15 Mar 2025 - 7:54 pm | युयुत्सु
https://hindi.moneycontrol.com/news/markets/stocks-market-fall-is-over-n...
16 Mar 2025 - 7:10 pm | आंद्रे वडापाव
ये फॉल तो सिर्फ एक झांकी थे...
पिक्चर अभिंभीं बाकी हैं.
16 Mar 2025 - 10:17 pm | वामन देशमुख
सहमत आहे आणि तसेच कॉल्स विकले आहेत.
17 Mar 2025 - 8:49 am | युयुत्सु
सर्व जागतिक बाजार तेजीचे सूर आळवत आहे. सोने आणी डॉलर इन्डेक्स पण उतरत आहे
17 Mar 2025 - 9:13 am | आंद्रे वडापाव
17 Mar 2025 - 10:29 am | युयुत्सु
चार्ट मोठा करून बघता येत नसल्याने जरा खुलासा केलात तर कळायला मदत होईल.
17 Mar 2025 - 11:26 am | आंद्रे वडापाव
पुढील ५ वर्षे मार्केट , (२०५०० ते २५५००) या रेंज मध्येच आट्या पाट्या खो खो खेळेल ...
(आय अँम कंकरिंग विथ शंकर शर्मा )
According to Sharma, the benchmark Nifty 50 index is set to offer zero returns from the September 2024 highs over the next four to five years.