Intraday treading

वेलांटी's picture
वेलांटी in काथ्याकूट
6 Nov 2024 - 10:53 am
गाभा: 

Sweegy चे ipo आले आहेत. Sub 0.0 prim 3.8
घ्यावा की नको ? शेअर मार्केट नविन शिकणार्या लोकांसाठी उपयुक्त माहिती ,intraday treading बद्दल माहिती आणि टिप्स कुठे मिळतील? You tube वर भरमसाठ व्हिडीओ आहेत पण नेमकी अचूक माहिती कमी वेळात कशी मिळवता येईल? मिसळपाव वर कुठे याबद्दल बेसिक माहिती आहे का?

प्रतिक्रिया

कंजूस's picture

6 Nov 2024 - 11:57 am | कंजूस

मला एवढं कळत नाही पण.....

बरेच जण power of stocks .....subhashish पाहतात.

इंट्राडे ट्रेडिंग नका करू... ९०% लोकांना नुकसान होते असं सेबी म्हणते. सध्या निफ्टी जवळपास १० टक्के खाली आलाय... दीर्घकाळासाठी चांगल्या शेअर्स मध्ये पैसे गुंतवून शांतपणे आयुष्य व्यतीत करा.. कशाला उगाच रोजचे टेन्शन

युयुत्सु's picture

6 Nov 2024 - 5:37 pm | युयुत्सु

इंट्रा-डे ची खुमखुमी असणार्‍यांसाठी...

या विषयावर मला लिहायचे होतेच.

मला पण इंट्रा-डे चे अनेक वर्षे आकर्षण होते. मी स्वत: असंख्य इंट्रा-डे स्ट्रॅटेजी (७०-८०% सक्सेस रेट) तयार केल्या. पण प्रत्येक स्ट्रॅटेजी्ला हरवणारी एक वेळ अशी येते की आपण कमावलेले सर्व गमवून बसतो.

अलिकडेच मला ए०आय० च्या मदतीने एक इंट्रा-डे चे वास्तववादी सिम्युलेशन तयार केले. ते तयार केल्यावर असे लक्षात आले की निष्ठेने रोज उत्तम स्ट्रॅटेजी वापरून जर वर्षभर ट्रेडिंग केले तर जे आपण कमावतो, तेव्ह्ढेच पैसे साध्या बाय-ॲण्ड-होल्ड स्ट्रॅटेजीने सहज कमावता येता. इंट्रा-डे ने फुकट डोक्याची कल्हई होते...

सदर सिम्युलेशन "आर" मध्ये लिहीले आहे. ज्यांना पायथन येते त्यांनी ते रूपांतरित करून घ्यावे. हे कोड मुक्तपणे इंट्रा-डे चे वेड कमी करण्यासाठी वापरावे.

--------------------------------------------------------
# Define the parameters
capital <- 10000
loss_percentage <- 0.01
success_rate <- 0.65
number_of_trades <- 20 #no trades permonth
simulation_runs <- 12 #months in a year

# Function to simulate a single trade
simulate_trade <- function(success_rate, profit_percentage, loss_percentage) {
if (runif(1) <= success_rate) {
return(profit_percentage)
} else {
return(-loss_percentage)
}
}

# Initialize a vector to store total profits
total_profits <- numeric(simulation_runs)

# Run the simulation multiple times
for (k in 1:simulation_runs) {
total_capital <- capital

# Simulate the trades
for (i in 1:number_of_trades) {
profit_percentage <- sample(seq(0.000, 0.01, 0.001), 1)
trade_result <- simulate_trade(success_rate, profit_percentage, loss_percentage)
total_capital <- total_capital * (1 + trade_result)
}

# Calculate the total profit
total_profit <- total_capital - capital

# Store the total profit
total_profits[k] <- total_profit

# Print the result
cat("Total profit after", number_of_trades, "trades:", total_profit, "\n")
}

# Print all total profits. Multiplied by 5 for the 5x margin
print(total_profits*5)

barplot(total_profits,main = paste("Total profit: ",sum(total_profits*5)))

अलिकडेच मला ए०आय० च्या मदतीने एक इंट्रा-डे चे वास्तववादी सिम्युलेशन तयार केले. ते तयार केल्यावर असे लक्षात आले की निष्ठेने रोज उत्तम स्ट्रॅटेजी वापरून जर वर्षभर ट्रेडिंग केले तर जे आपण कमावतो, तेव्ह्ढेच पैसे साध्या बाय-ॲण्ड-होल्ड स्ट्रॅटेजीने सहज कमावता येता.

हायला

अल्गोरिदम वापरून आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने दरमहा १० % कमावता येतात म्हणून माझ्याशी वाद घालणारे तुम्हीच ना?

यावर तुम्हा आव्हान दिल्यावर माझी अक्कल काढण्यापर्यंत गेला होतात.

आता हि उपरती कशी काय बुवा झाली?

मी गेली १७ वर्षे बाय अँड होल्ड म्हणजेच गुंतवणूकदार investor (no trading) या नियमाने गुंतवणूक करत आलो आहे.

गेल्या वर्षातील चढ्या बाजारामुळे माझा परतावा १५ ते १६ % दर वर्षी ( महिन्याला नव्हे) वर गेला आहे ( अगोदर तो १३-१४ % होता).

मी यात समाधानी आहे.

आग्या१९९०'s picture

7 Nov 2024 - 1:16 pm | आग्या१९९०

अल्गोरिदम वापरून आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने दरमहा १० % कमावता येतात म्हणून माझ्याशी वाद घालणारे तुम्हीच ना?

त्यांना इंट्रा डे आणि स्विंग ट्रेडिंग म्हणायचे असेल. आणि स्विंग ट्रेडिंग करून महिन्याला १०% म्हणजेच वर्षाला १२०% परतावा मिळवणे अशक्य नाही. फक्त वेळ आणि अभ्यास असावा.

वामन देशमुख's picture

7 Nov 2024 - 1:58 pm | वामन देशमुख

स्विंग ट्रेडिंग करून महिन्याला १०% म्हणजेच वर्षाला १२०% परतावा मिळवणे अशक्य नाही. फक्त वेळ आणि अभ्यास असावा.

१२०% सहमत!

सुबोध खरे's picture

7 Nov 2024 - 6:53 pm | सुबोध खरे

bmr बेसिक मे राडा

महिना १२ टक्के म्हणजे १२० टक्के वर्षाला हे प्राथमिक शाळेतील गणित आहे.

चक्रवाढ व्याजाने हे जवळ जवळ २१४ टक्के होतात.

आणि १००० रुपये गुंतवणूक दरमहा १० % व्याजाने पाच वर्षात रुपये ३ लाख ४ हजार होतात.

हा हिशेब कोणत्याही गणन तालिकेत करून पहा उदा.

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

असे दर महा १० % वर्षानुवर्षे मिळवणे अशक्य आहे एवढेच माझे म्हणणे आहे.

मी काही गणितज्ञ किंवा मार्केट मधील महारथी नाही.

परंतु गणितातील मूलभूत गृहीतके माझी पक्की आहेत.

म्हणूनच मी श्री युयुत्सु याना आव्हान दिले मी तुम्हाला १००० रुपये देतो

तुम्ही मला पाच वर्षांनी ३ लाखा पैकी दोन लाख द्या आणि ५० % आपल्या ज्ञानाची किंमत म्हणून ठेवून घ्या.

यावर त्यांनी माझी अक्कल काढली पण आव्हानांपासून पळ काढला.

आजही माझे त्यांना हेच आव्हान आहे. दोन लाख मला द्या एक लाख चार हजार तुम्ही ठेवा.

होतंय का कबुल?

आग्या१९९०'s picture

7 Nov 2024 - 7:37 pm | आग्या१९९०

bmr बेसिक मे राडा

महिना १२ टक्के म्हणजे १२० टक्के वर्षाला हे प्राथमिक शाळेतील गणित आहे.

नाही समजले.
महिना १२% म्हणजे वर्षाला १४४% होतात.

हल्ली काही ब्रोकर Algo फ्री देतात ते वापरून किंवा पेड algo घेऊन ३-४ ट्रेडिंग डे मध्ये २-५ % परतावा सहज मिळवता येतो. महिन्याला १०% पेक्षा अधिक मिळवू शकतो (अर्थात वेळ द्यावा लागतो ,पूर्णवेळ जॉब म्हणा हवं तर ) . कठीण अजिबात नाही. नफा न गुंतवता फक्त ठराविक रक्कम कायम गुंतवत ठेवायचे.

सुबोध खरे's picture

7 Nov 2024 - 7:50 pm | सुबोध खरे

https://www.thecalculatorsite.com/finance/calculators/compoundinterestca...

वरील दुवा टिचकी मारून पहा

महिना १२ टक्के म्हणजे वर्षाला १२० %

१२ % टायपो आहे १० % धरावे

युयुत्सु's picture

7 Nov 2024 - 3:10 pm | युयुत्सु

डॉ० खरे

तुम्हाला वामन देशमुख आणि आग्या१९९० यांनी उत्तर दिले आहे. अजुनही तुमचा खोडसाळपणा अजिबात गेलेला नाही.

<आता हि उपरती कशी काय बुवा झाली?>

याला उपरती म्हणत नाहीत. याला मार्केटचा सखोल अभ्यास म्हणतात. मार्केटचा मगदूर (मार्केट वेदर) सतत बदलत असते. त्यानुसार परताव्याचा दर पण बदलतो. मी जे नंबर क्रंचिंग करतो ते तुम्हाला कधीच जमणार नाही. कारण तुम्हाला शुद्ध मराठी वाचता येत नाही. जाऊ दे. काही लोकांचे शेपूट वाकडे ते वाकडे...

सुबोध खरे's picture

7 Nov 2024 - 6:57 pm | सुबोध खरे

मी जे नंबर क्रंचिंग करतो ते तुम्हाला कधीच जमणार नाही.

असा माझा कधीच दावा नव्हता आणि नाही सुद्धा.

शुद्ध मराठी वाचता येत नाही.

हे मान्य करणे जरा कठीणच आहे.

तरीसुद्धा इतर मिपाकरांनी माझ्यासाठी अधिक सोप्या मराठीत लिहून माझे गैरसमज दूर करावे अशी माझी विनंती आहे.

काही लोकांचे शेपूट वाकडे ते वाकडे...

हे मात्र १०० % सत्य आहे

बाकी चिडचिड ना करता मी काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या

पण मी तुम्हाला परत तेच आव्हान देतो आहे. ( वरच्या प्रतीसादात पहा)

आहे का हिम्मत स्वीकारायची?

सुबोध खरे's picture

7 Nov 2024 - 7:00 pm | सुबोध खरे

असे दहा दहा हजार देणारे १० मिपाकर पण मी तुम्हाला आणून देतो.

प्रत्येकी वीस लाख रुपये पाच वर्षांनी याना तुम्ही द्यायचे आणि एक कोटी चार लाख तुम्ही ठेवा

डॉक्टर साहेब अहो असे काय करता. अशी स्कीम कोणी ऑफर करेल देखील. पण ..

सब्जेक्ट टू मार्केट रिस्कस्, रीड द ऑफर डॉक्युमेंट्स केअरफुली.. असे सेकंदाला एकशेवीस शब्द या स्पीडने वाचलेले ऐकले नाहीत वाटते.

;-)

तेवढे मान्य करण्याची तयारी तर असावी कि !

मी म्हणतो तीच पूर्व आणि मी म्हणतो तोच सूर्य

याला काय म्हणायचं?

सुबोध खरे's picture

8 Nov 2024 - 11:43 am | सुबोध खरे

याच दुव्यातील माझा प्रतिसाद इथे परत डकवतो आहे

बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त राहून त्यातील तेजी आणि महामंदीची तीन आवर्तने( cycles) पाहून मी स्वतः या निष्कर्षाला आलो आहे कि

फ्युचर्स अँड ऑप्शन्स मध्ये सातत्याने नफा मिळवणे हि गोष्ट ९९% लोकांना अशक्य आहे.

जसे कॉलेजात असणारा एखादा फाटका मुलगा एखाद्या फटाकड्या पोरीला पटवून जातो हे पाहून अनेक बऱ्या/ चान्गल्या मुलांचा जळफळाट होतो

तशीच स्थिती चढत्या बाजारात नफा मिळवणाऱ्या एखाद्याकडे पाहून खिशात चार पैसे बाळगणाऱ्या माणसांची होते.

यामुळे ते इर्षेने या फ्युचर्स अँड ऑप्शन्स प्रकारात हात घालतात. चढत्या बाजारात सुरुवातीला त्यांना चांगला नफा होतो सुद्धा.

पण त्यामुळे आपल्याला हा बाजार "समजला" आहे या गैरसमजात ते इर्षेने खेळु लागतात आणि भारी नुकसान घेऊन बाहेर पडतात.

दर पाच वर्षांनी हाच प्रकार परत परत होताना मी पाहतो आहे.

मला बादल सिनेमा, माहीम ची एक आठवण येते. तेथे अतिशय मोक्याच्या ठिकाणी एक सीट रिकामी होती.

त्यामुळे आपली सीट सोडून कुणी तेथे येऊन बसला आणि मागे रेलला कि सीट उलटी होत असे आणि तो माणूस मागे पडत असे.

मग तो उठून गेला कि काही वेळाने परत दुसरा माणूस.

सिनेमा ऐवजी हाच प्रकार पाहून आमचे हसून हसून पोट दुखू लागले होते.

First law of thermodynamics सारखा First law of economics आहे तो म्हणजे

money can neither be created nor destroyed, only it changes pockets.

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 12:19 pm | युयुत्सु

money can neither be created nor destroyed, only it changes pockets.

नॉनस्टॉप अडाणीपणाचा अस्सल नमूना!
पैसा निर्माण झाल्याशिवाय खिसे बदलत नाही.

अर्थशास्त्राचे अगाध ज्ञान असलं की असे विचार सुचतात! पैशाची (वित्ताची) निर्मिती कशी होते हे समजून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ पहावा -

https://www.youtube.com/watch?v=PHe0bXAIuk0&t=1s

हे विडिओ डाऊनलोड केले आहेत. अभ्यास चालू केला आहे.

लहानपणी कुणीतरी सांगितले होते की भूमीतून अन्नधान्य तयार होऊन पैसे बनतात. नंतर कळलं की भूमीतील धातू आणि तेल हेसुद्धा पैसे निर्माण करतात. ज्यांच्याकडे यांची मालकी आहे त्यांच्या खिशात प्रथम पैसे जातात आणि नंतर खिसे बदलतात.
आता डोक्यातूनही पैसे निर्माण होतात. ( Intellectual property म्हणतात.) ज्यांच्याकडे काहीच नाही ते हातांनी काम करून दुसऱ्यांच्या खिशातले पैसे आपल्या खिशात भरतात.
खिसे भरण्याची गती हे परिमाणसुद्धा विचारात घ्यावे लागते. या गतीवर सरकार दंड लावते याला कर (tax) म्हणतात. असे नानी पालखीवाला या वकिलाच्या भाषणात ऐकल्याचे आठवते.

असो.

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 12:25 pm | युयुत्सु

पैशाची निर्मिती कशी होते?

https://www.youtube.com/watch?v=mzoX7zEZ6h4

आग्या१९९०'s picture

8 Nov 2024 - 1:24 pm | आग्या१९९०

बरोबर ह्याच दिवशी २०१६ साली १००० नष्ट झाले आणि २००० निर्माण झाले.

वामन देशमुख's picture

8 Nov 2024 - 12:45 pm | वामन देशमुख

money can neither be created nor destroyed, only it changes pockets.

आर्थिक व्यवहारांतून पैसा "खिसे बदलतो" हा केवळ व्यवहाराचा एक भाग आहे; तथापि पैसा निर्माण होणे आणि नष्ट होणे हे अगदी स्वाभाविक आहे.

---

माझ्याकडील ५०० रुपयांची नोट जर मी फाडून टाकली तर "पैसा नष्ट झाला" की नाही?**

माझ्याकडील ५०० रुपयांचे मी १२ किलो वांगे विकत घेतले आणि विकून त्याचे एकूण ८०० रुपये केले तर "पैसा निर्माण झाला" की नाही?

---

** हे अगदीच cheap उदाहरण आहे याची जाणीव आहे, पण मूळ विधान काही फार वेगळे आहे का?

---

आजचा गृहपाठ : मागच्या शंभर वर्षांत (किंवा इतर कोणत्याही कालखंडात) भारतात असलेली संपत्ती तेवढीच राहिली की वाढली?

पैसा निर्माण (क्रिएट) होत नाही. मूल्य (value) क्रिएट होत असते. ज्या उलाढालीत मूल्य निर्माण होत नाही तो प्रकार गोलमाल समजून त्यात गुंतवणूक टाळणे उत्तम. किमान त्यातून सलग आणि दीर्घकाळ नेट फायदा होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे.

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 3:52 pm | युयुत्सु

खोट्या नोटा छापल्या जातात तेव्हा "पैसा" निर्माण होतो की "मूल्य" निर्माण होते?

गवि's picture

8 Nov 2024 - 3:59 pm | गवि

दोन्ही नाही.

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 4:04 pm | युयुत्सु

साहेब, तुम्ही गल्लत करताय.

जोपर्यंत खोट्या नोटा "सापडत" नाहीत तो पर्यंत त्या "ख-याच" असतात!

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 4:00 pm | युयुत्सु

पैसा आणि मूल्य यातील फरक ( ए० आय० च्या सौजन्याने)

पैसा आणि मूल्य या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. दोघांचे अर्थ आणि कार्य एकसारखे नसून, अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्व आणि उद्दिष्ट वेगळे आहे. खालीलप्रमाणे त्यांचा फरक समजून घेऊया:

१. परिभाषा
पैसा: पैसा हा व्यवहार करण्यासाठी वापरला जाणारा माध्यम, लेखाजोखा मोजण्यासाठी एकक, आणि मूल्य साठवून ठेवण्याचे साधन आहे. याचा उपयोग लोक व्यवहार सुलभ करण्यासाठी करतात, जसे की रुपये, डॉलर, नाणी.
मूल्य: मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे उपयोग, गरज किंवा आकर्षण. मूल्य व्यक्तिनुसार बदलू शकते. उदाहरणार्थ, वाळवंटात पाण्याच्या बाटलीचे मूल्य जास्त असू शकते, कारण तिथे पाण्याची कमतरता आहे.

२. उद्देश
पैसा: पैसे हे एक साधन आहे जे लोकांना सहज व्यवहार करण्यास मदत करते. पैशाशिवाय व्यवहार अवघड होईल आणि एकमेकांची गरज पूर्ण करणे कठीण होईल (जसे की विनिमय पद्धत वापरणे).
मूल्य: मूल्य हे त्या वस्तू किंवा सेवेमुळे निर्माण झालेले लाभ, उपयुक्तता किंवा आनंद आहे. मूल्यच ती वस्तू किंवा सेवा हवीशी का वाटते हे स्पष्ट करते.

३. संबंध
पैसा हे मूल्याचे प्रतीक आहे, परंतु त्याच्याकडे स्वतःचे अंतर्निहित मूल्य नसते. पैसे कागद, नाणी किंवा डिजिटल स्वरूपात असू शकतात, परंतु त्यांची खरी किंमत केवळ लोक त्याला देतात म्हणून आहे.
मूल्य हे पैशाशिवायही असू शकते. उदाहरणार्थ, अन्नाचे मूल्य त्याच्या उपयुक्ततेमुळे आहे, किंमत किती आहे हे त्यात महत्त्वाचे नाही.

४. निर्मिती
पैसा सरकार किंवा केंद्रीय बँक तयार करू शकते. त्यांनी नोटा छापल्या किंवा नाणी तयार केली तर पैसा वाढू शकतो.
मूल्य उत्पादन, नवकल्पना, आणि उपयुक्तता यामुळे तयार होते. उदाहरणार्थ, शेतकरी पिके पिकवतो तेव्हा ते पिक लोकांसाठी मूल्य निर्माण करतात.

५. विनिमय आणि दृष्टिकोन
पैशाची किंमत ठरलेली आणि निश्चित असते. जर तुमच्याकडे १०० रुपये असतील तर त्याचे १०० रुपयेच मूल्य राहते.
परंतु मूल्य हे व्यक्तिनुसार वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, नवीन मोबाइल फोनची किंमत एका तंत्रज्ञान प्रेमीसाठी महत्त्वाची असेल, पण दुसऱ्यासाठी त्याचे मूल्य कमी असू शकते.

सारांश
पैसा हा मूल्य विनिमय करण्यासाठीचा साधन आहे, पण तो स्वतः मूल्य नसतो. मूल्य हे उपयुक्तता, आनंद किंवा गरजेतून येते, तर पैसा हे फक्त त्याचे आदान-प्रदान करण्याचे प्रतीक आहे.

गवि's picture

8 Nov 2024 - 4:25 pm | गवि

हो

म्हणजे या अर्थाने बरोबर आहे. नोटा (एकूण तितक्या छापील किंमती इतके मूल्यवर्धन कुठेतरी झाल्याशिवायच) छापून वितरणात आणल्या तर मूल्य देवाण घेवाण करण्याचे माध्यम या गोष्टीची युनिट्स वाढली हे म्हणणे योग्य आहे. त्यात खुद्द पैसा या गोष्टीचे एक मूलभूत मूल्य असते ते कमी होत जाते. पैसे (सिम्बॉल) वाढले पण त्यांच्या देवाण घेवाणीतून आता कमी मूल्य इकडून तिकडे वाहते. तर पैसा म्हणजे असे चिन्ह रुपात म्हणाल्यास, हो. तो छापून वाढतो.

सुबोध खरे's picture

8 Nov 2024 - 6:47 pm | सुबोध खरे

गवि साहेब,

त्यांच्या शेपटावर पाय पडला आहे

त्यामुळे मी जे काहि लिहीन त्यावर मोठे मोठे शब्दबंबाळ प्रतिसाद देऊन ते माझे बोलणे खोडून काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणारच आणि करत राहणार.

परंतु मी दिलेले आव्हान ते स्वीकारणार नाहीतच याची मला १००० % खात्री आहे.

कारण फक्त आपणच शहाणे असे काही लोकांचे गृहीतक असते.

त्यांच्या कडे दुर्लक्ष करा

बाकी मोठे मोठे शब्द न लिहिता मी एवढेच म्हणेन कि मुळात पैसा हे केवळ शेतीत किंवा खाणीत निर्माण होतो आणि बाकी सर्व त्याचे मूल्य वर्धन (VALUE ADDITION) असते. शेती किंवा खाण हा व्यवहार आतबट्ट्याचा होत असेल तर तेथे सुद्धा पैसा निर्माण होत नाही.

जर वर्षभर शेती करून पोटापुरते धान्य मिळत नसेल तर त्या शेतीत घातलेले मानवी मूल्य हे तेथून पैसे निर्माण करण्यास असमर्थ असते. यामुळेच अनेक देश मानवी श्रम अपरंपार असूनही गरीब आहेत. कोलारची खाण बंद का केली? तेथून होणाऱ्या सोन्याच्या उत्पन्ना पेक्षा त्यावर होणार खर्च जास्त होत होता.

आपण १० ग्राम सोन्याचं घड्याळ विकत घेतले आणि त्याची किंमत दीड लाख रुपये असेल. जर त्यावर हातोडी मारली तर त्याचे मूल्य ७८०००/- त्यातील सोन्याचे आहे एवढेच राहील.

याउलट आपण दीड लाखाचा आय फोन घेतला आणि त्यावर हातोडी मारली तर त्याचे मूल्य शून्य होईल. म्हणजे काय त्यात असलेले प्लास्टिक तांबे लिथियम इ ची मूलभूत किंमत फार कमी असते आणि त्याची मूल्यवर्धित किंमत जास्त असते.

झिम्बाबवे येथे चलनफुगवटा इतका वाढला कि त्याच्या एक कोटी डॉलर्स च्या नोटेची किंमत नगण्य झाली होती.

आंद्रे वडापाव's picture

8 Nov 2024 - 5:44 pm | आंद्रे वडापाव

अलिकडेच मला ए०आय० च्या मदतीने एक इंट्रा-डे चे वास्तववादी सिम्युलेशन तयार केले. ते तयार केल्यावर असे लक्षात आले की निष्ठेने रोज उत्तम स्ट्रॅटेजी वापरून जर वर्षभर ट्रेडिंग केले तर जे आपण कमावतो, तेव्ह्ढेच पैसे साध्या बाय-ॲण्ड-होल्ड स्ट्रॅटेजीने सहज कमावता येता. इंट्रा-डे ने फुकट डोक्याची कल्हई होते...

युयुत्सु .. अतिशय सेम निरीक्षण माझेही आहे..

म्हणून पोर्टफोलिओचा काही भाग इंडेक्स इ टी एफ (जास्त व्हॉल्युम आणि कमी एक्स्पेंस रेशो ) कडे मी वळवला आहे.

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 5:47 pm | युयुत्सु

धन्यवाद!

शानबा५१२'s picture

7 Nov 2024 - 7:51 am | शानबा५१२

Trading आहे ते Treading नाही. थोड्क्यात संगतो, स्टॉक मार्केट मध्ये काही गब्बर श्रीमंत झालेत, काही होत्यात. काही पुर्ण डुबलेत, काही डुबतायत.

मला स्तॉक मार्केट मध्ये खुप ईन्ट्रेस्ट अहे. अ‍ॅव्हरेजिंग चे महत्व कळले तेव्हा कॅपीटल नव्हते म्हणुन आत लांब आहे...पेपर ट्रेडींग रोज करतो...हे माझे झाले.

अपणास मदत म्हणुन :

युट्युब : टेकनिकल अ‍ॅनालायसिस इन हींदी - MACD and RSI - मास्टर बना ह्या दोनचे.

ईंट्रा डे ट्रेडींग साठी बेस्ट : ऑप्शन बायिंग, निफ्टी ५० मध्ये.

ब्रोकर : शून्य डॉट कॉम. ' जवळ जवळ सर्व फ्री...

श्री गणेशा म्हणून २०० रुपये टाकुन KBC global चे ५० शेअर्स घ्या ईंट्रा डे ट्रेडींग साठी आणि विका त्याच दीवशी झाली सुरुवात.

हे सर्व सुरु करायला व अनुभव घ्यायला ५ दीवस खुप आहेत.

धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक.

गवि's picture

7 Nov 2024 - 4:57 pm | गवि

Trading आहे ते Treading नाही.

गाठीला असलेल्या पैशांना पायदळी तुडवणे या अर्थाने कदाचित तेच स्पेलिंग योग्य असेल. ;-)

अनन्त्_यात्री's picture

7 Nov 2024 - 5:39 pm | अनन्त्_यात्री

angels fear to tread. :)

शानबा५१२'s picture

9 Nov 2024 - 1:25 pm | शानबा५१२

शप्पथ खुप हसलो, जोक भारी सुचला! :-))

आग्या१९९०'s picture

7 Nov 2024 - 9:26 am | आग्या१९९०

ईंट्रा डे ट्रेडींग साठी बेस्ट : ऑप्शन बायिंग, निफ्टी ५० मध्ये.

खतरनाक सल्ला!

टर्मीनेटर's picture

7 Nov 2024 - 10:50 pm | टर्मीनेटर

खतरनाक सल्ला!

असू द्यात हो... पुढे
हे सर्व सुरु करायला व अनुभव घ्यायला ५ दीवस खुप आहेत.
हा दिलेला सल्ला मला आवडला आहे!
All the best 👍

टर्मीनेटर's picture

8 Nov 2024 - 2:24 am | टर्मीनेटर

हा दिलेला सल्ला मला आवडला आहे!
ह्यापुढे चार पाच स्मायली टाकायला विसरलो होतो त्यासाठी क्षमस्व 😀 😀 😀 😀 😀

वामन देशमुख's picture

7 Nov 2024 - 11:28 am | वामन देशमुख

अनेक असंगत प्रश्नांचा समुच्चय असलेला हा धागा व त्या प्रश्नांची जमेल तशी उत्तरे देण्याचा हा प्रयत्न -

Sweegy चे ipo आले आहेत. Sub 0.0 prim 3.8
घ्यावा की नको ?

Swiggy चे समभाग दर नंतर वधारणार आहेत असे वाटत असेल तर घ्या.

शेअर मार्केट नविन शिकणार्या लोकांसाठी उपयुक्त माहिती ,intraday treading बद्दल माहिती आणि टिप्स कुठे मिळतील?

आंतरजालावर.

You tube वर भरमसाठ व्हिडीओ आहेत पण नेमकी अचूक माहिती कमी वेळात कशी मिळवता येईल?

थोडंसं R&D करून

मिसळपाव वर कुठे याबद्दल बेसिक माहिती आहे का?

भरपूर आहे.

---

intraday trading

पुरेसा अनुभव नसेल तर या भानगडीत पडू नका; नफा तर सोडाच, भांडवल गमावून बसाल. अर्थात हे विधान कोणत्याही trading ला लागू आहे.

---

झिरोदा-वर्सीटी सारख्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण करा. Tradingचा पुरेसा अभ्यास करा, सुरुवातीला तुमच्या एकूण भांडवलाचा अगदी थोडासा भाग (उदा. ५%) गुंतवून ट्रेडिंग करा. इक्विटीमध्ये स्विंग, पोजिशनल ट्रेडिंग करा, आधीच इंट्राडेच्या नादी लागू नका. पहिले सहा महिने "Return on Capital" मिळणार नाही पण "Return of Capital" मिळायला हवे हे उद्दिष्ट ठेवा. पुरेसा आत्मविश्वास आल्यावर मग अधिक गांभीर्याने काम करा. टिप्स, सल्ले, प्रीमियम सेवा वगैरेंच्या नादाला लागू नका; स्वतःचे डावपेच स्वतः निश्चित करा. दुसऱ्या वर्षानंतर, वार्षिक ३०% हून अधिक परतावा मिळत आहे असे दिसले तर पुढे सुरु ठेवा नाहीतर सोडून द्या.

---

वैधानिक इशारा: कोणत्याही गुंतवणुकीसाठी या प्रतिसादावर अजिबात विसंबून राहू नये; लेखक जबाबदार नाही.

बाजाराच्या मागच्या चढतिच्या वेळेसच एक किस्सा मी मुद्दाम येथे लिहितो आहे. ( हा किस्सा मी मागे पण लिहिला होता)

माझा ब्रोकर शेजारच्याच विंग मध्ये आहे तेंव्हा दवाखान्यात रुग्ण नसेल तर मी कधी तरी त्याच्याकडे जाऊन बसतो आणि बाजाराची हालहवाल विचारतो.
रुग्ण आला कि माझी स्वागत सहायिका मला कॉल करते कि मी लगेच येतो.

चढत्या बाजारात अनेक लोक तेथे येऊन जोरदार चर्चा करत होते ( यात हवशे नवशे गवशे यात रिकामटेकडे आणि निवृत्त लोक आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तरुण जास्त करून असतात.) मी आपलं शांत बसून ऐकत होतो.

एवढ्यात मला निरोप आला म्हणून मी उठलो तर तेथे बसलेले एक निवृत्त आयकर अधिकारी (बरेच पैसे बाळगून असलेले) मला म्हणाले डॉक्टर आता तर बाजार गरम होतोय आता कुठे चाललात. मी त्यांना म्हणालो साहेब येणार रुग्ण मला नक्की पैसे देऊन जाणार आहे. बाजार काय चढेल किंवा पडेल. तेथे नुकसान पण होऊ शकते माझ्या व्यवसायाचे तसे नाही.

त्यातून मी बारावी नंतर साडेपाच वर्षे एम बी बी एस आणि नंतर तीन वर्षे एम डी च्या पदवी साठी अभ्यास केला आहे यानंतर गेली तीस वर्षे मी त्याच विषयात अनुभव घेतला आहे. बाजाराबद्दल माझा असा किती अभ्यास आहे आणि किती अनुभव आहे? अर्थात या वाक्याने तेथे टाचणी पडेल इतकी शांतता पसरली.

त्यावर मी त्याना एक पंच तंत्रातील गोष्ट सांगितली.

एकदा एका लांडग्याने एक गाढव पकडले. त्याला तो खाणार तर गाढव त्याला म्हणाले अरे माझ्या मागच्या पायात एक काटा रुतला आहे, तो तू अगोदर काढ म्हणजे नंतर तुला खाण्यात त्रास होणार नाही.

लांडगा मागच्या पायात कुठे काटा मोडला आहे ते पाहायला गेला तर गाढवाने त्याला जोरदार लाथ मारली . त्यामुळे लांडग्याचे सर्व दात पडले.

लांडगा स्वतःला म्हणाला बरी मला अद्दल घडली. मला बापाने खाटकाचा धंदा शिकवला होता हा वैद्यकाचा धंदा करायची मला काय गरज होती?

असेच आहे. लोक आपला मूळ धंदा सोडून बाजारात सट्टा लावतात आणि तोंडघशी पडतात.

गुंतवणूक आणि सट्टा यातील फरक सामान्य माणसाने समजून घेणे आवश्यक आहे.

अन्यथा दरमहा १०% परताव्याचे आमिष दाखवून सट्टा खेळणाऱ्या दलालांच्या घोळत अडकल्यास मुदलात खोट येण्याची शक्यता अपरंपार आहे.

वामन देशमुख's picture

7 Nov 2024 - 8:29 pm | वामन देशमुख

बाजाराबद्दल माझा असा किती अभ्यास आहे आणि किती अनुभव आहे?

मुद्दलाची गोष्ट!

आर्थिक सल्ल्याबरोबरच हा धागा मनोरंजकही होत आहे. दिवाळी अंकातील विनोदी लेखाची उणिव भरून निघाली. मिपाकिशोर.

टर्मीनेटर's picture

7 Nov 2024 - 10:09 pm | टर्मीनेटर

आर्थिक सल्ला म्हणुन तुम्ही ह्या धाग्या आणि प्रतिसादांकडे बघत असाल तर तो सर्वव्यापी ईश्वर आपले रक्षण करो 😀

चंद्रसूर्यकुमार's picture

7 Nov 2024 - 9:57 pm | चंद्रसूर्यकुमार

धाग्याचे शीर्षक इंट्राडे ट्रेडिंग (स्पेलिंग चुकले असेल पण ते असो) आणि पहिलेच वाक्य "Sweegy चे ipo आले आहेत". इंट्राडेमध्ये ट्रेड करायचे असेल तर मग त्यात आय.पी.ओ कुठून आला?

टर्मीनेटर's picture

7 Nov 2024 - 10:15 pm | टर्मीनेटर

आय.पी.ओ?
😀
Exactly ह्याच कारणासाठी अत्यंत विसंगत मुद्दे घेऊन काढलेल्या ह्या धाग्यावर प्रतिसादायला यावे की नाही हा विचार करत होतो....

अंजीराचे रोपटे म्हणून आणले......

त्याचा वटवृक्ष होऊन त्याला लाल टेटरे ( लाल फळं) येत आहेत. पक्षी येऊन ती खाणार. पाने बकरीसाठी नेली जाणार, पांथस्थ सावलीत विसावणार , काही महिला सूत गुंडाळणार. अंजिरापेक्षा वडच बरा नाही का?

Bhakti's picture

8 Nov 2024 - 12:43 pm | Bhakti

हा हा!

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 9:47 am | युयुत्सु

मंडळी,

मी पोझिशनल ट्रेडींग करत असे आणि त्यात बर्‍यापैकी कमावले. यावर्षीपासून निर्मलाकाकूनी एस०टी०सी०जी० वाढवल्यामुळे पोझिशनलमध्ये गंमत वाटत नाही. पण थोडे अजूनही करतो. सध्या माझा जास्त भर मुमेंटम ट्रेडींग वर आहे.

पोझिशनल करताना एक भान ठेवावे लागते. ते म्हणजे एखाद्या काळात मार्केट किती कालावधीत किती परतावा देत आहे, याचे अचूक ज्ञान असणे.

यासाठी मी एक तंत्र "आर" मध्ये विकसित केले आहे. दर आठवड्याला निफ्टी ५०० मधील शेअर्सनी वेगवेगळ्या कालावधीत किती रिटर्न दिले याचे ड्रिस्टरीब्युशन तपासणे. सरासरी महिन्याचा परतावा जेव्हा ८% किंवा अधिक असतो तेव्हा मार्केट्मध्ये पोझिशनल साठी उतरावे.

आज मितीला मार्केट्ची परताव्याची स्थिती- https://rpubs.com/yuyutsu/1242737

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2024 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाव वर कुठे याबद्दल बेसिक माहिती आहे का?

मिपावर अच्चयावत जगाचं आणि अज्ञात सृष्टीचं ज्ञान मिळतं.
ट्रेडिंग वगैरे शुल्लक विषय आहेत मिपासाठी. ;)

आपण भले आणी आपलं सीप भलं.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

8 Nov 2024 - 12:43 pm | Bhakti

ट्रेडिंग वगैरे शुल्लक विषय आहेत मिपासाठी. ;)

आपण भले आणी आपलं सीप भलं.

पण कंकाकांनी मनोरंजक धागा असं सांगितल्याने दृष्टिक्षेप टाकालया आले आहे.

सुबोध खरे's picture

8 Nov 2024 - 11:52 am | सुबोध खरे

markets regulator Sebi showed that the futures and options (F&O) trading was a loss-making proposition for investors.The report revealed that 89% investors lost money through these activities, and only 11% made profits.

If you study the Sebi report in detail, you will find that about half of those who make money earn trivial profits of a few thousand rupees in a year. They would have earned more even with a bank fixed deposit.

The craziest part of this story is that no one in the industry mentions one simple fact: unlike equity, which is backed by the open-ended growth of the economy, F&O is a zero-sum game. Whenever someone earns a profit, it comes out of another trader’s pocket.

So, if all the losses are someone else’s profits, who is pocketing all the money that the ordinary investors are losing? Take a guess

It’s clear that the brokers, exchanges, and those lending stocks profit from this activity,

As a reader of this publication, you are almost certainly an individual investor who is interested in making money from investments.
However, you should understand that this activity is not designed for you to make money. Instead, it's designed, managed and run to take your money away.

All the talk about derivatives being beneficial for one reason or another is just propaganda.

Avoiding this potentially harmful activity might be the best choice for individuals, as it seldom brings any benefits. The facts speak for themselves: with a vast majority of individual traders reaping minimal, if any, benefits from F&O trading, one must ask if it is worth the gamble.

Wisdom lies in taking a step back, analysing the facts, and making informed decisions, in order to safeguard your financial future. As the saying goes, ‘It’s not about how much money you make, but how much you keep.’

Read more at:
https://economictimes.indiatimes.com/wealth/invest/individual-investors-...

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 4:19 pm | युयुत्सु

हा हा हा हा हा

ते या पेक्षा भयानक घोळ घालतात. जे लिहीले नसेल ते वाचतात. आणी ज्यात पळवाटा भरपूर काढता येतील अशी $%^^&# सारखी आह्वाने देत राहतात.

आग्या१९९०'s picture

8 Nov 2024 - 5:13 pm | आग्या१९९०

३० वर्षापूर्वी माझी पहिली शेअर खरेदी ' bad delivery ' ने झाली. तेव्हा physical share certificate मिळायचे. ब्रोकरणे वर्षभर खटपट करून मला ते मिळवून दिले, तोपर्यंत तो शेअर १०० % वाढला होता . विकून नफा झाला आणि मग चटक लागली. Bad delivery ते algo सगळे अनुभव घेतले. मी सामान्य बुध्दीचा असूनही शेअर मार्केटचे कुठलेही क्लास केले नाही फक्त नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आणि कधीच कुणाचे अनुकरण केले नाही. आज जगातील कुठल्याही म्युच्युअल फंडापेक्षा कैकपट जास्त रिटर्न मिळवतो. सातत्य आणि वेळ दोन्ही महत्त्वाचे. ज्यांना हे दोन्ही जमत नाही ते कायम अधिक परताव्यापासून वंचित राहतात.

सुबोध खरे's picture

8 Nov 2024 - 7:31 pm | सुबोध खरे

तुम्ही आव्हान स्वीकारत आहात का?

उगाच लांब लांब प्रतिसाद देण्यात काय हशील आहे?

आग्या१९९०'s picture

8 Nov 2024 - 7:54 pm | आग्या१९९०

काहीही!
उद्या एखाद्याने अल्पशा भांडवलावर एखादा व्यवसाय सुरू करून आपले श्रम ,कुशलता आणि कल्पकता वापरून व्यवसाय वृध्दी केली , परंतु तुम्हाला ते पटले नाही म्हणून त्यालाही तुम्ही असेच आव्हान देणार का? आणि त्याने ते का स्वीकारावे?

सुबोध खरे's picture

8 Nov 2024 - 8:04 pm | सुबोध खरे

अर्रर्रर्र

ते आव्हान तुम्हाला नाही हो

ते आव्हान सर्वज्ञ माणसासाठी आहे

वामन देशमुख's picture

10 Dec 2024 - 10:53 am | वामन देशमुख

Juxtaposition 3 लिहावं की आधीच्या भागांवर काही प्रतिक्रिया येईपर्यंत थांबावं असा विचार करतोय... थांबतोच.

त्याशिवाय -

Juxtaposition
Juxtaposition 2
Juxtaposition 3
Juxtaposition pro
Juxtaposition ultra
Juxtaposition pro max

असंही करण्यापुरता माल-मसाला काढता येईल.

आंद्रे वडापाव's picture

8 Nov 2024 - 4:52 pm | आंद्रे वडापाव

युयुत्सु यांचा एक लेख वाचला , आणि त्याचा आशय कळून , मी काही पैसे कमावले शेअर मध्ये ...

मिन आणि स्टॅंडर्ड डेव्हिएशन अश्या संकल्पना त्यात मध्यवर्ती होत्या ..

धन्यवाद युयुत्सु ...

मी त्या संकल्पनेत माझी भर अजून टाकली

- कंपनी फंडामेंटली सशक्त हवी ( कर्जे नको, विक्री वाढत जाणारी, मार्जिन जवळपास स्थिर , १ रुपया का होईना पण नफ्यात हवी )
- एका कंपनीत पोर्टफोलिओच्या ३-४ टक्क्यापेक्षा जास्ती गुंतवणूक नको
- एकाच सेक्टर मध्ये पोर्टफोलिओच्या जास्तीत जास्त २५% गुंतवणूक
- एकाच कंपनीत एकदम गुंतवणूक नको तर ५ टप्प्यात गुंतवणूक
-खरेदी दर तुमचा ठरलाय तर तुम्हाला त्याचा विक्री दर सुद्धा ठरवायला हवा, त्या दरावर विक्री सुद्धा केली गेली पाहिजे (एंट्री माहिती पाहिजे तशीच एक्झिट सुद्धा माहिती पाहिजे )

ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )
ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )
कर्ज काढून पोझिशन घेणं म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )

आंद्रे वडापाव's picture

8 Nov 2024 - 4:53 pm | आंद्रे वडापाव

ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )


डे

ट्रेडिंग म्हणजे मूर्खांचा बाजार (माझे वैयक्तिक मत )

युयुत्सु's picture

8 Nov 2024 - 4:56 pm | युयुत्सु

@आंद्रे वडापाव

धन्यवाद!

तुमच्या यादीत एक भर आणखी एक भर टाका - स्मार्ट मनीची कृपादृष्टी त्या स्टॉकवर हवी. ती कशी बघायची याची तंत्रे आहेत पण इथे ते लिहीणे आवाक्याबाहेर आहे

स्मार्ट मनीची कृपादृष्टी त्या स्टॉकवर हवी

हेच ते कौशल्य! कसोटीचा दगड .

आंद्रे वडापाव's picture

8 Nov 2024 - 5:49 pm | आंद्रे वडापाव

कोणी डे-ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, मार्जिन ट्रेडिंग बद्दल मला विचारलं तर मी म्हणतो

"बुलाती हैं मगर जानेका नहीं !"

a

आंद्रे वडापाव's picture

8 Nov 2024 - 5:51 pm | आंद्रे वडापाव

dt

वामन देशमुख's picture

9 Nov 2024 - 12:49 am | वामन देशमुख

जाणकार मिपाखरांनी commodity trading वर धागा काढावा ही विनंती.

अमर विश्वास's picture

14 Nov 2024 - 1:13 pm | अमर विश्वास

मूळ धागा आवडला ... IPO मध्येही ट्रेडिंग करता येते अशी ज्ञानात नवीन भर पडली ..

त्यानंतर प्रतिसाद वाचून तर एकदमच ज्ञानवृद्धी झाली :)

नेहमीचे उत्साही कार्यकर्ते इथेही जोरदार बॅटिंग करत आहेत ,,,, खरे तर आपल्याला ऑस्ट्रेलियात गरज आहे बॅटमॅन्सची

बाकी .. trading is business ... not investment इतके बोलून रजा घेतो ... चालुद्या

मुक्त विहारि's picture

10 Dec 2024 - 10:34 am | मुक्त विहारि

वाचत आहे...