अननसा ची पेस्ट्री

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
14 May 2009 - 12:31 pm

साहित्य :

१) स्पाँज केक साठी
१ कप मैदा
१ कप पिठी साखर
६ अंडी
१/२ छोटा च. बेकिंग पावडर
२) आइसिंग साठी
१ Pint व्हिपींग क्रीम किंवा तयार व्हिप्प्ड क्रिम वापरलं तरि चालतं.
१/२ कप साखर
टिन्ड अननस , बारिक कापलेले अननस.
सजावटी साठी : ब्लॅकबेरी , चेरी, अननस

कृति:
१) केक :
१) Egg whites आणि Egg yolks वेगळे करुन घ्या.
२)Egg yolks मध्ये १ वाटि पिठीसाखर घालुन नीट फेटून घ्या.
३) Egg whites पण वेगळे पांढरा फेस होईपर्यंत फेटून घ्या.
४) मैदा + बेकिंग पावडर चाळून घ्या.
५) ओव्हन ३५० फॅ. वर प्री हीट करायला ठेवा.
६) आता (२ + ३ + ४) सगळं हळूवार मिक्स करून घ्या.
७) एका ग्रीस्ड पसरट बेकिंग ट्रे मधे मिश्रण टाका.
८) ट्रे ला थोडं हलकं आपटून मिश्रण सारखं करून घ्या.
९) ३५० फॅ. वर २०-२५ मि. बेक करायला ठेवा.

केक कमीत कमी ४-५ तास आधी करुन ठेवावा नाहितर क्रिम वितळायला लागेल.

२) आइसिंग
व्हिपिंग क्रिम फेटून घ्यावे , त्यात साखर टाकुन अजुन फेटावे. अंदाजे १०-१२ मि.

१) केक हव्या त्या आकारात कापुन घ्यावा , (अंदाजे ४ X 2 इंच ).
२) केक वर (पाणी + साखर + अननस इसेंस = १ कप) हे पाणीशिंपडावे त्याने केक मऊ राहतो.
३) दोन केक च्या लेयर्स मधे फेटलेले क्रिम लावावे, थोडे बारिक कापलेले अननस टाकावे. आता फेटलेले क्रिम संपुर्ण केक वर सगळ्या बाजूं नी लावुन घ्यावे.
४) वरुन मना प्रमाणे सजवावे.

माहिती स्त्रोत : अंतरजाल.

थोडी मेहनत आहे पण "मेहनत का फल मीठा होता है " हे ही पेस्ट्री खाताना नक्की वाटतं. :)

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 May 2009 - 12:35 pm | यशोधरा

काय फोटू टाकलेत! मस्त! :)
कधी येऊ खायला?

विसोबा खेचर's picture

14 May 2009 - 12:35 pm | विसोबा खेचर

शब्द नाहीत...!

चित्र पा।हून खूप भरून आलं आणि नकळतपणे गालावरून आनंदाश्रू ओघळले!

यात जराही अतिशोयोक्ति नाही!

दिपाली, बस सौ साल जिती रहो. भला हो जाए तेरा और तेरे अपनोंका!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2009 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो जीवघेणे आहेत !

सहज's picture

14 May 2009 - 12:37 pm | सहज

हेच म्हणतो.

अवलिया's picture

14 May 2009 - 6:42 pm | अवलिया

हेच म्हणतो

--अवलिया

सँडी's picture

14 May 2009 - 6:50 pm | सँडी

=))
हेच म्हणतो.

-(पेस्ट्रीप्रेमी)संदीप.

धनंजय's picture

14 May 2009 - 10:07 pm | धनंजय

असेच म्हणतो.

कट्टी.

दशानन's picture

20 May 2009 - 12:06 pm | दशानन

असेच म्हणतो.

थोडेसं नवीन !

मस्त कलंदर's picture

14 May 2009 - 5:28 pm | मस्त कलंदर

खरंच जीवघेणे आहेत!!!

मस्त कलंदर..

हे जीवन सुंदर आहे..

जागु's picture

14 May 2009 - 12:36 pm | जागु

खावेसे वाटतात फोटो बघुन.

माधुरी दिक्षित's picture

14 May 2009 - 12:41 pm | माधुरी दिक्षित

का असे फोटो टाकुन जळवता लोकांना? :(
बाकी पेस्ट्री एकदम झकास दिसती आहे :)

विंजिनेर's picture

14 May 2009 - 12:43 pm | विंजिनेर

दोन-चार इकडे पाठवून द्या सढळ हाताने :)..
फोटो अफलातून...

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

स्वाती दिनेश's picture

14 May 2009 - 1:01 pm | स्वाती दिनेश

मस्त ग दिपाली, तों पा सु.
स्वाती
अवांतर- आमच्या घराजवळ ब्लॅकबेरींच्या जाळ्या आहेत भरपूर तिथली बेरी तोडून खायला काय मजा वाटते,:)

स्मिता श्रीपाद's picture

14 May 2009 - 12:53 pm | स्मिता श्रीपाद

फोटो पाहुन स्स्.स्स्.स्स. असं झालं...

जबरी फोटु आणि जबरी पाकृ..

(आजतरी माँजीनीझ मधुन पेस्ट्री आणुन खाणे भाग आहे :-) ...)

यशोधरा's picture

14 May 2009 - 2:25 pm | यशोधरा

कित्ती तो दुष्टपणा करावा! अजून एक फोटो टाकलान्! :)
ओ दिपालीताई, कट्टी :(

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार

ख ल्ला स !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

सायली पानसे's picture

14 May 2009 - 5:14 pm | सायली पानसे

मस्त फोटो आणी पाकृ....!
लवकर करुन पाहिन.

चतुरंग's picture

14 May 2009 - 6:46 pm | चतुरंग

केकावली आवडली! ;)
ब्लॅकबेरी कसली खतरनाक दिसते आहे! वॉ!!
(तळं साचायच्या आता धाग्यावरुन निघायला हवं! =P~ )

चतुरंग

टारझन's picture

15 May 2009 - 10:02 pm | टारझन

तुम्ही निघा !! आम्ही आमच्या तळ्यात पोहून राहिलोय ... तळ्याच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे ... पटकन कुठे "शेवगा" किंवा "बेसणा"ची पाककृती आहे का शोधतोय ... =))

असो ... आम्ही वारलो निवर्तलो .. मेलो ... खपलो .. अजुन काय आसंल त्ये !!

मदनबाण's picture

14 May 2009 - 7:25 pm | मदनबाण

व्वा...मस्तच. :) फोटो झकासच आहेत.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

माया's picture

14 May 2009 - 7:38 pm | माया

खुपच सुंदर...

गुळांबा's picture

14 May 2009 - 7:59 pm | गुळांबा

वाटते महाराजांसारखे वदावे, जर आमच्या मातोश्री इतक्या कुशल सुगरण असत्या तर आम्हालाही असेच सुंदर पदार्थ वारंवार खावयांस मिळाले असते ह्याविषयी किन्तु नाही.

प्राजु's picture

14 May 2009 - 8:08 pm | प्राजु

ये क्या कर दिया... दिपाली?? कत्ल ए आम कर दिया..!
हे पाप कुठे फेडशील गं..? ;)
इतका अफाट फोटो दिला आहेस... खल्लास!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नाटक्या's picture

14 May 2009 - 9:32 pm | नाटक्या

दिपाली,

आता तुझे नाव दिपाली 'पाववाली' बदलून दिपाली 'बेकरीवाला' ठेवायला हवं (धर्म बदलला). पुढच्या कट्ट्याच्यावेळी हे डेझर्ट म्हणून फिक्स...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

चित्रा's picture

15 May 2009 - 2:12 am | चित्रा

खूपच छान फोटो आणि पेस्ट्री! मऊसूत अशी दिसते आहे. आणि ब्लॅकबेरीची शोभाही छान.

बबलु's picture

15 May 2009 - 11:09 am | बबलु

दिपाली.,
आता पा.कृ. वर एक पुस्तकच लिहायचं मनावर घ्या.

....बबलु

दिपाली पाटिल's picture

15 May 2009 - 9:37 pm | दिपाली पाटिल

सगळ्यां ना... धन्यवाद

दिपाली :)

लवंगी's picture

16 May 2009 - 7:34 pm | लवंगी

नक्की करुन पाहिन.. तुझा ब्रेड आता माझ्या घरी दर विकांताला होतो.

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:56 pm | क्रान्ति

मस्त पाकृ आणि फोटो!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

काजुकतली's picture

20 May 2009 - 12:04 pm | काजुकतली

केकचे आडवे पण तुकडे करायचे?? की दोन केक एकावर एक ठेवायचे??

आणि १ कप पाणी शिंपडल्यावर केक एकदम पाणचट होणार नाही ना? नाहीतर सगळी मेहनत खरंच पाण्यात जाईल.

बाकी दिसतोय अतिशय सुरेख..खाण्याचा मोह होतोय...

साधना