वडोदरा, पावगढ-चंपानेर-५ -लकुलीश मंदिर

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in भटकंती
15 Nov 2024 - 7:49 pm

पावागढ
पावागड।

वडोदरा, पावगढ-चंपानेर-१
वडोदरा, पावगढ-चंपानेर-२
वडोदरा, पावगढ-चंपानेर-3
वडोदरा, पावगढ-चंपानेर-४

अनुभवांती- पावागढ-चंपानेर बघण्यासाठी कमीत कमी तीन दिवस आणी जास्तीत जास्त सात दिवस तरी हवेत. एक दिवसाची भटकंती म्हणजे फक्त भोज्याला स्पर्श करून येण्या सारखेच म्हणावे लागेल.पावागढ,लकुलीश मंदिर आणी चंपानेरची प्रकाश चित्रे खुप जास्त असल्याने लेख दोन भागात विभागून डकवतोय.

पौराणिक,ऐतिहासिक,आध्यात्मिक संदर्भ आणी पाऊलखुणा असलेले चंपानेर-पावागढ एक अलौकिक,अद्भुत प्रेक्षणीय स्थळ आहे. गुजराथ मधील बहुचर्चित गोध्रा(पंचमहाला) जिल्ह्य़ातील हलोल तालुक्यातील गाव.

वैवस्वत मन्वंतरातली राजा दक्ष प्रजापती पुत्री सती, रामायण कालातील महर्षी विश्वामित्र, चौथ्या शतकातील मैतृका,दहाव्या शतकातील वनराज चावडा,पंधराव्या शतकातील सुलतान मेहमूदशहा बेगडा तेआजतागायत एवढा मोठा कालखंड. बघण्या साठी अनेक प्रेक्षणीय वास्तू, कालिकामातेचे मंदिर,सुंदर जैन मंदिरे,मशीदी,हेलीकल वाव,कबूतरखाना,टोंब, धान्याचे कोठारे, किच्छी चौहान राजपुतांचे भग्न राजवाडे,अनेक तलाव,पाणी वितरण व्यवस्था इत्यादींचे अवशेष पुरातत्व विभागाचे उत्खनन आजही चालू आहे.लिहीण्यासारखे सुद्धा बरेच काही,परंतू माझी लेखन क्षमता तोकडी,त्यामुळे जसे सुचले तसे लिहीले.एकंदरीत रखरखाव व्यवस्थित ठेवला तर अजुनही अनेक वर्षे ही पुरातत्व धरोहर येणार्‍या पिढ्यांना बघता येतील.
l2
-२
धान्याचे कोठारे, व पुरातत्व विभागाचे उत्खनन
-
पावागढ म्हणजे किल्ला,डोंगर,चढाई, खंडहर, भग्नावशेष आसा काही पूर्वग्रह. ऐतिहासिक, पुरातत्व स्थळांमध्ये स्वारस्य नसलेले सदस्य, कालच्या अनपेक्षित,ध्यानी मनी नसताना, नानी मोटी पनौती व कारवान (कायावरोहण) या अप्रसिद्ध,प्रेक्षणीय स्थळांच्या भेटीनंतर पावगढ-चंपानेर जाण्यासाठी एकमताने तयार झाले.अर्धा डोंगर गाडीने चढता येतो,पुढे उडन खटोला आहे व थोड्याच पायर्‍या चढाव्या लागतील अशी माहीती अमरिशभाईने दिली आणी सर्वजण आश्वस्त झाले.

दररोज प्रमाणे नाष्टा करून आम्हीं खाली आलो. कुबेरदास हजर होतेच.पावागढ ५५ कि. मी. अंतरावर, चार लेन चा गुळगुळीत रोड,गाडी ८०-९० कि. मी वेगाने धावत एक तास काही मिनीटात चंपानेर गावाच्या वेशी पाशी आली. भग्न वेस आणी ढासळलेले बुरूज, चिरेबंदी तटाच्या भिंती गत वैभवाच्या खुण, सहाशे वर्षानंतर सुद्धा दिमाखात उभ्या होत्या.भाईने गाडी बस थांब्यासमोर थांबवली.
-
g4
-३
रस्त्यालगत स्थानिक जीप गाड्या डोंगरावर नेण्यासाठी उभ्या होत्या. या गाड्या डोंगराच्या मध्यभागा पर्यंत ने आण करतात.सुंदर,प्रशस्त डांबरी पण घाट रस्ता,
mp1

निसर्ग सौंदर्य मनमुराद व अतिशय लोभस तसाच रौद्र पण आहे.तेथून पुढे उडन खटोला,माफक शुल्क घेऊन मंदिर पायथ्याशी भाविकांची ने आण करतात.
mp3
--५
mp5
-६
mp6

मुख्य कलिकामाता मंदिर व इतर प्रेक्षणीय स्थळे डोंगरमाथ्यावर आहेत.तीनशे पायर्‍या चढून जावे लागते.पायर्‍या मुळे चढण सुकर होते. कालिका माता मंदिराकडे जाण्यासाठी प्रशस्त सिमेंटच्या पायर्‍यावजा रस्ता आहे. रस्त्याच्या लगत दोन्ही बाजुला विवीध प्रकारची दुकाने, खाण्या पिण्याची उपाहारगृहे आहेत. आम्हीं प्रथम चंपानेर बघावे असा विचार केला. तो निर्णय चुकला असे नंतर वाटले.या भागात भगवान लकुलिश वर लिहीले आहे.

भूगोल

पावागढ डोंगर ज्वालामुखीच्या उद्रेकाची परिणीती आहे. एक एकटाच उंच डोंगर व सभोवताली विस्तीर्ण पठार. इतर डोंगर रांगा थोड्या दुर,सुकले,जोरवन आणी विश्वामित्री नद्यांचे उगमस्थान इथेच आहे.

इतिहास

पावक गढ (Fire hill),पवनगढ (Wind hill) अशी पावागढची नावे जुन्या अभिलेखात सापडतात. कवी चंद बरदाईने आपल्या पृथ्वीराज रासो या नाटकात पावागढावर बाराव्या शतकात राम गौर तुवार राजा राज्य करत असल्याचे नमूद केले आहे.

पावागढ डोंगरात/भागात सापडलेली दगडी अवजारे, हॅण्ड ॲक्सेस,चाॅपर्स,क्लिव्हर्स इ. अश्मयुगीन असल्याची षुष्टी पुरातन विभागाने केली आहे.काही मैतृका नाणी (इ.स.४७० - ७७६) जोरवन नदीपात्रात सापडली आहेत यावरून मैतृका (Maitraka) राजे राज्य करत होते हे सुनिश्चित होते.

२८०० फुट उंचीच्या पावागढ पर्वतावर टप्प्या टप्प्याने पाच समतल पठारे आहेत. जणू त्या पाच पायर्‍याच. या पठारावर गतकाळातील इतीहासाच्या पाऊलखुणा पसरलेल्या आहेत. उंचीनुसार,सर्वात उंच कालिकामाता, मौलीया, भद्रकाली, माची आणी अटक अशी पठारांची तत्कालीन नावे आहेत. सर्वात उंच पठारावर कालिका मातेचे भव्य, अतिसुंदर मंदिर आहे. मौलिया पठारावर 10"-11" शतकाच्या आसपास छावडा राजांनी बाधलेले लकुलीश मंदिर या भागातील सर्वात जुनी पुरातत्व वास्तू आहे. इंद्र,ब्रह्मा,विष्णू,गजेंद्रमोक्ष,दक्षिणामूर्ती व अंबिका यांसह इतर अनेक देवतांच्या उत्कृष्ट प्रतिमांनी सुशोभित केलेले मंदिर आता भग्न आवस्थेत आहे.हजाराहून अधिक वर्षे उन, पाऊस,थंडी वारा सोसत आजही काही दगडी शिल्प मुळ स्वरूपात आपला गत,वैभव काळ सांगत उभी आहेत.
-
l5
-८
l6
-९
मौलिया पठारावर चासिया तलाव आणी अतिसुंदर मंदिर
-
वर नमूद केल्याप्रमाणे जीप मधे बसून रोप वे पर्यंत गेलो.इथे जरी विस्तीर्ण पठार असले तरी थोडे चढावे लागते.रोप वे चे सहा लोकांचे छोटे केबीन सतत केबलने वर खाली प्रवाशांची वहातूक करते.प्रवासात पुरातत्व विभागाची माणसे खाली उत्खनन करताना दिसतात.
-
l1
-११
अतिसुंदर लकुलीश मंदिर

लकुलीश हा शिवाचा एक अवतार समजला जातो. इसवीसनांच्या प्रथम शतकांत किंवा त्यापूर्वी लकुलीश नांवाच्या आचार्याने पश्चिमी भारताच्या कायावरोहण तीर्थाचे ठिकाणी पाशुपतमताची स्थापना केली होती." हे मत हळुहळू इतकें मान्य झाले की लकुलीश हा शिवाचेंच प्रतिक झाला. लकुलिश या शब्दाचा अर्थ लाठी धारण केलेल परमेश्वर असा होतो. खरेतर लकुलीश एक सुधारणावादी शैवपंथीय संत होते, ज्यांना शिवाच्या अठ्ठावीस रुपात स्थान मिळाले.

लकुलीश यांचा जन्म गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील कारवान गावात ऋषी अत्री यांच्या गोत्रातील एका ब्राम्हण कुटुंबात झाला. अर्थात लकुलीशांच्या अनुयायापैकी काही व्यक्तींच्या मते त्यांची एक वेगळीच कथा आहे. भगवान शिवांनी एकदा भगवान विष्णुंना वासुदेव स्वरुपात पृथ्वीवर प्रगट झाल्यावर त्याचवेळी अवतार घेण्याचे वचन दिले होते. जेव्हा विष्णूनी वासुदेव रुपात जन्म घेतला तेव्हा भगवान शिव एका मृत ब्राम्हणाच्या शरीरात प्रवेश करुन पृथ्वीवर प्रगटले.हाच तो लकुलीश अवतार मानला जातो.लकुलीश हे सतत भ्रमण करणारे भिक्षु झाले. त्यांनीच शैव पंथातून पुढे पाशुपत संप्रदायाची स्थापना केली.तसेच पाशुपत संप्रदायीनी अध्यात्मिक जीवन कसे जगावे यासाठी सुत्र लिहीले. पुढे याच संप्रदायातील इतर गुरुंनी त्यात भर घातली.अर्थात लकुलिश हेच पाशुपत संप्रदायाचे संस्थापक होते का ? तसेच त्यांनीच त्यांनीच पाशुपत सुत्र लिहीली का ? याबद्दल काही तज्ञांना शंका आहे. त्यांच्या मतानुसार पाशुपत संप्रदाय आधीच अस्तित्वात होता किंवा कमी प्रमाणात प्रसार झालेला होता.त्यांच्या मते पाशुपत आणि इतर शैव संप्रदायाची पुनर्बांधणी आणि संस्थापना, सुधारणा करण्याचे श्रेय लकुलिश यांचे आहे. तसेच या तज्ञांच्या मते पाशुपत सुत्र खुप आधीच लिहीले गेले होते, पण लकुलिश यांनी त्यांना सर्वसामान्यांना समजेल अश्या सोप्या पध्दतीने भाषांतरीत केले. एकतर पाशुपत सुत्रांची रचना एकंदरीत प्राचीन वाटते आणि त्यात ती सुत्रे कोणी रचले याचा उल्लेख नाही असा या तज्ञांचा दावा आहे. त्यामुळे या सुत्रांची रचना लकुलिश यांनी केलेली नाही असा दावा केला जातो.

पाशुपत संप्रदाय हा सहा मुख्य सिध्दांतापासून बनला आहे. यामध्ये कारण, कार्य, कला, विधि, योग आणि दुखांत हि सुत्र आहेत. लकुलिश यांनी आर्यांच्या आधीच्या काळातील सिंधु संस्कृतीतील कर्मठ परंपरांचे पुनर्संस्थापन केले. तसेच हठयोग आणि तांत्रिक परंपराचे पुननिर्माण केले. तसेच लकुलिश यानी वैदीक, जैन आणि बौध्द धर्माचा हिंसक मार्गाने विरोध केला.

पाशुपत संप्रदाय पाळत असलेली तपस्वी प्रथा :-

पाशुपत संप्रदायी ज्या उग्र प्रथा पाळतात, त्यात दिवसातून तीन वेळा राखेने स्नान करणे, ध्यान करणे आणि ओम मंत्राचा जप करणे, भगवान शिवाची स्तुती आणि आराधना करताना जोरात हसणे, जीभ हासडणे आणि बैलासारखे डुरक्या देणे याचा समावेश होतो.
भगवान शिव यांना समर्पित झालेली व्यक्ती मग ती कोणत्याही जातीची असु देत पाशुपत संप्रदायी होउ शकते. या लोकांचा पोषाख काळया रंगाचा असतो. तसेच शिवाचे दर्शन घेण्याची आणि पुजेची पध्दत विशिष्ट प्रकारची असते. याच पध्दतीने केल्या जाणर्या काही अस्पष्ट सिध्दांतामुळे आणि काही रहस्यमय प्रथा, तसेच विकृत आणि विभिन्न परंपरा यातून कापालिक आणि काळामुख या दोन तांत्रिक पंथाना जन्म दिला गेला.

मागील लेखात लकुलिश भगवान यांचे जन्म स्थान कायावरोहण, आताचे कारवान बद्दल सविस्तर माहीती दिली आहे. श्री दुर्गविहारी, जुन्या,जाणत्या,जेष्ठ मिपा सदस्यांनी लेखाची दखल घेत वरील महत्वपूर्ण माहिती आपल्या प्रतीसादातून दिली.

मौलिया पठारावर,चासिया(Chasia) तलावा काठी लकुलिश मंदिर आहे.गर्भगृह, अंतराळ, मंडप आणि आडवे घटक म्हणून प्रवेशद्वार आहे. पण सुपरस्ट्रक्चर्सचे फक्त काही भागच शिल्लक राहिले आहेत. या सुरेख मंदिराचे शिल्लक राहिलेले संरचनात्मक अवशेष म्हणजे त्याचा पाया. मंदिर उत्तम शिल्पे आणि अर्धवट अधिरचनांनी चित्रित केलेले आहे.दैवी प्राण्यांच्या सुंदर आकृती असलेले स्तंभ, ब्रह्मा, विष्णू, कल्याणसुंदर मूर्ती, दक्षिणामूर्ती,गजेंद्र मोक्ष,इंद्र,बसलेली अंबिका,सुरसुंदर इत्यादी शिल्पे उल्लेखनीय आहेत. मंडपाच्या आठ सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांमध्ये किचक (भार वाहक) आहेत जे अर्धगोलाकार छताच्या अष्टकोनी चौकटीला आधार देतात. मंडपाच्या प्रवेशद्वारावर लकुलीशाची प्रतिमा आहे. मंदिरा समोर भग्न आवस्थेतील नंदिची मुर्ती आहे, डोके मुर्तीभंजकानी तोडले असावे. मंदिराच्या आवारात काही सुस्थितीत काही भग्न अवशेष असलेली अनेक शिल्पे रचून ठेवलेली आहेत.

जैन मंदिरे

लकुलिश मंदिरा समोरच एक जैन मंदिर आहे.
गुजराथ मधे जैन धर्मियांचे बाहुल्य असल्याने जैन मंदिरे ठिक ठिकाणी बघावयास मिळतात. गिरीनार,शत्रुघ्न,पावागढ डोंगरावर मुख्य जैन मंदिरांचे समुह आहेत.

पावागढ मधे दिगांबर जैन पंडितांची मंदिरे आहेत.पार्श्वनाथ मंदिर दुधीया तलावा समोर आहे.मंदिर सुस्थितीत आहे.बंद असल्याने आतमधून बघता आले नाही.रिशभनाथ मंदिर आणी इतर जैन मंदिरे वेळे अभावी बघू शकलो नाही.
-
l6
-१२
पार्श्वनाथ मंदिर
-
खालील शिल्पांचे सटिक वर्णन प्रचेतसच करू जाणे. माझ्यासारख्या येरागबाळ्याचे काम नव्हे.
प्रकाश चित्रे.
-
l7
-१३
पट्टीवर लकुलीश शिल्प
-
l8
-१४
l9
-१५
l9
-१६
विशेश सुचना- काही प्रकश चित्रे उपलोड करता येत नहीत,पुन्हा प्रयत्न करतो.
----
k1
-१७
k2
-१८
k4
-१९
k5
-२०
k6
-२१
k7
-२२
k8
-२३
k8
-२४
j1
-२५
j2
-२६
j4
-२७
j5
-२८
j6
-२९
j8
-३०
h1
-३२
h2
-३३
h2
-३४
g1
-३५
g2
-३६
g4
३७
चित्र सीमा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2024 - 8:12 pm | कर्नलतपस्वी

मी प्रकाशचित्रे डकवण्यासाठी इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे. एकच रट लावलीय "पुन्हा प्रयत्न करा", देX भौ कडून काही शिकलाय का?....(हलकेच घ्या)

असो, जवळपास तीस चित्र डकवायची आहेत. मंदिरातील शिल्पे आहेत. नंतर प्रयत्न करून बघतो नाहीतर निर्वाणीचा पांडुरंग "साहित्य संपादकांना ",शरण जाईन.

कर्नलतपस्वी's picture

15 Nov 2024 - 9:00 pm | कर्नलतपस्वी

हुश्श, जमलं एकदाचं.

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2024 - 5:56 am | कर्नलतपस्वी

कृपया विस्तीर्ण टिप्पणी करा.

लेख आटोपशीर छान झाला आहे.
नवीन जागा कळली. सात दिवस पाहिजेत म्हणजे बरंच काही पाहायला असावं.

फोटो दुरुस्ती प्रयत्न . Image width="100%" टाकल्यावर...
l7
-१३
पट्टीवर लकुलीश शिल्प
-
l8
-१४

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2024 - 10:35 am | कर्नलतपस्वी

चंपानेर वर अंतिम लेख तयार आहे. एखाद दिवसात टाकणार आहे.

सुचना बद्दल धन्यवाद. करून बघतो.

टर्मीनेटर's picture

16 Nov 2024 - 12:39 pm | टर्मीनेटर

हा भागही आवडला!

मी प्रकाशचित्रे डकवण्यासाठी इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे.

वाचकांनाही त्रास देत आहे 😀 हाय स्पीड कनेक्शनवरही लेखातल्या इमेजेस लोड होइपर्यंतचा काळ माझ्या संयमाची कसोटी पहाणारा ठरला!
गुगल फोटोज वरुन चित्रे देण्याचे तंत्र आत्मसात करुन घ्या कर्नल साहेब....

कंजूस's picture

16 Nov 2024 - 3:09 pm | कंजूस

....इमगौर(imgur) हे ॲप वापरतो पण आता ते त्रास देत आहे.......

चूक Imgur ची नाही. ज्या साईजचा फोटो imgurवर टाकला तोच शेअर होतो. चार, पाच एमबीचा असेल तर तोच येतो आणि लेखात तीन एमबीएचे तीस फोटो टाकले तर लेख नव्वद एमबीचा होईल. लोड होणार नाही.
गूगलफोटोने तीन वर्षांपूर्वी हे बदलले. फुलसाईज फोटो शेअर होत नाही शंभर ते तीनशे केबींचा होतो.
गूगल ड्राईवचे फोटो मात्र फुल साईजचे शेअर होतात. शिवाय ते स्टोरेजमध्ये मोजले जातात.

या कारणास्तव मी फोटो स्लाईडशो यूट्यूबवर टाकून शेअर करतो. दोन चार फोटो लेखामध्ये फुल साईचे टाकतो.

कर्नलतपस्वी's picture

16 Nov 2024 - 9:58 pm | कर्नलतपस्वी

मुळ छायाचित्रे साठ ते ऐंशी टक्के काॅम्प्रेस करून टाकली आहेत. साधारण एक ते दिड एम बी एवढीच साईझ आहे प्रत्येक चित्राची.

दुर्गविहारी's picture

16 Nov 2024 - 1:06 pm | दुर्गविहारी

हा ही भाग आवडला. मि.पा.वर फोटो चढवणे एकंदरीत त्रासदायक आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत !