मेथी के शर्ले

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
17 Oct 2024 - 4:45 pm

असंच स्क्रोल करतांना मेथी के शर्ले दिसले.
मेथीची भाजी उत्तर भारतात बटाटा बरोबर खातात हे माहिती होते.पण खास करून जे छोटे बटाटे असतात त्यांच्या बरोबर जालंधर मध्ये थंडीच्या दिवसात हा पदार्थ आवडीने खातात.

अ

साहित्य
एक जुडी निवडलेली मेथीची पान यात काड्या घ्यायच्या नाहीत.
तीन मोठे बटाटे
आलं, लसूण,मिरची ,जिरे पेस्ट
हिंग,धने पावडर,आवडीचा मसाला
एक वाटी डाळीचे पीठ

आ
कृती
१.मोठे बटाट्याच्या साल न काढता बारीकहून थोड्या मोठ्या फोडी करायच्या.
२.त्यात स्वच्छ केलेली मेथी व बाकीचे जिन्नस एकत्र करायचे.चवीनुसार मीठ टाकायचे.
३.या मेथी ,बटाट्याला पाणी सुटल्यावर एक वाटी डाळीचे पीठ टाकून मिक्स करायचे.
४.आता हे मिश्रण कापडावर छोट्या आकाराचे गोल वडे थापायचे.
५.चांगले खरपूस तळून घ्यायचे.
६.हिरवी पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर यायचे.

कालची थाळी ज्यात पंजाबी मेथी के शर्ले आणि राजस्थानी दाल बट्टी यांच बल्ले बल्ले भांगडा झाला :)
इ

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

17 Oct 2024 - 5:27 pm | कर्नलतपस्वी

बरोबर लस्सी असेल तर सोने पे सुहगा.
चार वर्ष जालंधर मधे ब्ल्यू स्टार मधे होतो. मोर कढी आणी चावल हा एक मस्त पदार्थ तीथेच खाल्ला.

धन्यवाद.

प्रचेतस's picture

17 Oct 2024 - 6:40 pm | प्रचेतस

व्वा....!
वेगळाच पदार्थ.

चांगला दिसतो आहे पदार्थ. थाळी आवडली.

मेथीचे बरेच पदार्थ आमच्याकडे होतात. भाजी, पचडी, भजी, पराठे. आवडीने खातो.

चिरलेला कांदा लिहायचा राहिला.चिरलेला कांदाही यात घालायचा आहे.
सर्वांना धन्यवाद _/\_

चौकस२१२'s picture

18 Oct 2024 - 8:22 am | चौकस२१२

भक्तीजी तुम्ही FOOD FATAFAT फोटोत जे दाखवले आहेत आणि तुम्ही केलेलं हे एकदम वेगळे दिसत आहेत
अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता )
आणि तुमच्या तयारीत मध्यम बटाट्यांचे तुकडे दिसतात
आणि ते फक्त ३ महिने मिळतात असे का म्हणतात ?

अंतर्जावरील फोटोत जे आहेत त्यात अक्खे छोटे ( मिनीइचर ) बटाटे आहेत का? ( विचारायचे कारण म्हणजे येथे असे अगदी पिल्लू बटाटे मिळतात ते आणून प्रोयोग केलला असता )
हो हो छोटे बटाटे वापरा.आणखीन एक सुचना,ते बटाटे दहा मिनिटे आधी उकडून घ्या.मी कच्चेच वापरले.
https://youtube.com/shorts/czKsHA-_moE?si=AbPdp7sFcGUTq0jM

मला तो फोटो नंतर सापडला.तोपर्यंत आधीच्या रेसिपीनुसार मी छोटे वडे थापले होते.

श्वेता२४'s picture

18 Oct 2024 - 10:09 am | श्वेता२४

नवीन पदार्थ कळाला

पदार्थ नवीन आहे. ताई तुम्ही रेसिपी जरा नीट वेळ घेऊन लिहून तपासून मग फायनल करावी अशी विनंती.

कांदा लिहायचा राहिला, बटाटे उकडून घ्यावेत हे नंतर कोणी विचारल्यावर सुचवले.. (म्हणजे बहुधा कच्चे बटाटे घातल्याने फारसे चांगले टेक्सचर झाले नसावे)..

आंतरजालीय वेगळा फोटो आगोदर आणि शेवटी प्रत्यक्ष बनलेला यात खूप फरक, मधल्या स्टेप्सचे फोटो नाहीत. बारीकहून थोड्या मोठ्या वगैरे असे अंदाज हे प्रथम ट्राय करणाऱ्याला गोंधळात पाडतात. तुमचे पुरवणी प्रतिसाद वाचण्याआधीच कोणी लेखावरून बनवले तर अर्धीकच्ची राहील पाककृती.

बघा विचार करून. बाकी नवीन पाककृती शोधून करण्याच्या उत्साहाचे कौतुक आहेच.