दिवाळी अंक २०२४

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in काथ्याकूट
4 Oct 2024 - 4:10 pm
गाभा: 

दिवाळीला आता महिनाभरसुद्धा राहिला नाही. मिसळपाव दिवाळी अंक २०२४ ची घोषणा अद्याप झालीच नाही की होऊनही माझ्या नजरेतून सुटून गेली आहे?

प्रतिक्रिया

एकंदरीतच उदासीनतेमुळे यंदा दिवाळी अंक निघणार नाही असे दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2024 - 9:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाने दिवाळी अंकाची घोषणा केली पाहिजे. लेख कमी येतील तरी ठीक आहे. इतर माध्यमांचा जो परिणाम असतो तो सर्वत्रच होत आहे, पण म्हणून अंक काढू नये हे काही पटत नाही.

एक संपादकीय, एक कविता आणि एक लेख इतकं जरी आले तरी दिवाळी अंक होतो. यात मिपाचा काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही.

दिवाळी अंक घोषणा व्हावी यासाठी शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

5 Oct 2024 - 10:52 am | गवि

सकारात्मकता ठेवून मिपासदस्यांच्या लेखनरूप मदतीने अंक नक्की निघेल. निघणार.

चौथा कोनाडा's picture

5 Oct 2024 - 12:58 pm | चौथा कोनाडा

मला तर आधी हे दिवाळी अंक२०२५४ चं निवेदन / आवाहन वाटलं. असं अजून आलं नाही हे नक्कीच मिस करतोय.

सौंदाळा's picture

7 Oct 2024 - 11:10 am | सौंदाळा

राव साहेब दिवाळी अंकाची घोषणा झाली आहे. तुमचा लेख वाचायची वाट बघत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

7 Oct 2024 - 2:17 pm | प्रसाद गोडबोले

खरं तर किती तरी विषय आहेत लिहिण्यासारखे. अगदी राजकारण बाजूला ठेवलं तरी सुध्धा खंडीभर मुद्दे आहेत ज्यावर लेखन करता येईल.
सामाजिक विषय आहेत बदलापूर सारखे, त्यापाठोपाठ एन्काऊंटर ची नैतिकता आणि फ्रांटियार जस्टिस.

किंवा बाहेर काय चाललं आहे त्यावर लिहिता येईल , इस्रायलला "हे लोकं" कधीतरी शांतपणे जगू देणार का ? नेताण्याहू जर जय हिंद जय भारत म्हणत असेल तर तो आपला जवळचा की इथे उभे राहून जय फलस्तीन म्हणणारे ?
किंवा
अमेरिकेतील निवडणुका , फेड रेट कट आणि त्याचा भारतावर इथल्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम .

किंवा नुकतेच वाचनात आलेल्या पुस्तकांचे अल्पस्वलप सारांश , रसग्रहण.

किंवा अगदी व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटी ची रिस्क

किंवा अगदी व्हॉट्सअँप वर येणारे हलके फुलके विनोद वगैरे.

अगदी काही नाहीतर मिपावर मायक्रो ब्लॉगिंग सदृश काही लेख लिहावेत का ह्यावर लिहू शकू.

पण काहीही लिहिले तरी उडवले जाण्याचे रिस्क असेल तर कशाला उगाच कष्ट घा ?!

इतरांचे माहित नाही पण किमान मी तरी संपादकीय काटछाट प्रकाराला वैतागलो असल्याने काहीही वैचारिक वेगळे लिहायचे धाडस करत नाही.

मध्यंतरी मी एक लेख लिहिलेला तो कोणतेही कारण न दाखवता उडवण्यात आला , तेव्हा खूप वाईट वाटलेले. त्या लेखात लोकमान्य टिळकांनी मांडलेला एक विचार आला होता. नंतर नुकतेच प्रा.सदानंद मोरे सरांच्या एका युट्यूब व्हिडिओ मध्ये त्यांनीही तोच मुद्दा मांडलेला दिसले तेव्हा हायसे वाटले. आपल्यासारखा विचार करणारी माणसे मिपावर नसली तरी अन्यत्र आहेत हे पाहून दिलासा मिळाला .

पण मिपावर मुक्त विचारांची गळपेची होत असताना कसे लोक लिहिते होतील ??

असो च.

गवि's picture

7 Oct 2024 - 4:44 pm | गवि

तुम्ही लिहीत रहा.

नठ्यारा's picture

7 Oct 2024 - 11:50 pm | नठ्यारा

गेंड्याच्या कातडीचे बना. एव्हढंच सांगू शकतो.
-नाठाळ नठ्या