सुमारे १९८६ साली भारत सरकारने भारतीय भाषांसाठी संगणक कळफलक प्रमाणीत केला. त्याचे नाव इनस्क्रिप्ट. पुढे १९८८ आणि १९९२ साली त्यात सुधारणा केल्या. त्या काळी युनिकोड वगैरे नव्हते. पुढे युनिकोड आले त्यातही भारतीय भाषांसाठी सुधारणा झाल्या. परंतु तो पर्यंत भारतीय भाषांसाठी लिखाण करण्यासाठी अनेकांनी अनेक अप्रमाणित पद्धती विकसित केल्या होत्या जसे गमभन, बोलनागरी इत्यादी. अशीच आणखी एक सोय म्हणजे गुगल इनपुट टूल्स. AI आणि तत्सम तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाषांसाठी बनवलेली प्रणाली, जी अर्थातच प्रमाणित नाही
दुर्दैवाने आजही भारतीय भाषांमध्ये टंकणे कठीण पडते कारण प्रमाणीकरणाचा आणि त्याच्या प्रसाराचा अभाव. तसेच भारतात मिळणाऱ्या संगणकांचे कळफलक हे अमेरिकन असतात व भारतीय इनस्क्रिप्ट अक्षरे त्यावर नसल्याने प्रसारही होत नाही.
सुदैवाने युनिकोड मुळे जगातील सर्व भाषांना संगणकावर स्वतःची एक प्रमाणित लिखाण पद्धती तयार झाली आहे ,आज सगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स युनिकोड सपोर्ट करतात तसेच त्या त्या भाषांमध्ये लिहिण्याची सोयही देतात. परंतु भारतीय भाषांमध्ये तरी हे लिहिणे अजून तितकेसे रुळले नाही.
आपल्याला मराठी वर्णमाला येत असेल तर हे टंकणे शिकणे फार सोपे आहे. रोज अर्धा तास या हिशेबाने ४-६ दिवसात बऱ्यापैकी जमू शकते. अर्थात टंकणे गुगल इनपुट टूल्स इतक्या वेगाने होत नाही परंतु या (गुगल इनपुट टूल्स) पद्धतीत काही स्पेसिफिक शब्द लिहिणे जरा कठीण जाते वेळी इनस्क्रिप्ट माहिती असणे फायद्याचे ठरते. रच्याकने गुगल इनपुट टूल्स पण इनस्क्रिप्ट ला सपोर्ट करते.
तर आज ह्या पद्धतीने काही कठीण शब्द कसे लिहायचे हे बघू. खरे तर मी माझ्या सोयीसाठी ह्या नोट्स तयार केल्या होत्या कारण मला ही माहिती कुठेच मिळाली नाही, खास करून मराठीतले विविध र चे प्रकार इत्यादी. इतरांनाही याचा फायदा होईल असे वाटल्याने इथे देत आहे. अजूनही कोणता शब्द तुम्हाला लिहिता येत नाही असे वाटत असेल तर प्रतिसादात विचारू शकता, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.
मराठी वर्णमाला
अ (D) आ (E) इ (F) ई (R) उ (G) ऊ (T) ए (S) ऐ (W)
ओ (A) औ (Q) अं (Dx) अः (D_) अॅ (D@) अॉ (|)
क (k) ख (K) ग (i) घ (I) ङ (U)
च (;) छ (:) ज (p) झ (P) ञ (})
ट (') ठ (") ड ([) ढ ({) ण (C)
त (l) थ (L) द (o) ध (O) न (v)
प (h) फ (H) ब (y) भ (Y) म (c)
य(/) र (j) ल (n) व (b) श (M)
ष ( < ) स (m) ह (u) ळ (N) क्ष (Shift + 7) ज्ञ (Shift + 5)
त्र (Shift + 6) क्ष (Shift + 7) श्र (Shift + 8) ऋ (+)
् (d) ा (e) ि (f) ी (r) ु (g) ू (t) े (s) ै (w)
ो (a) ौ (q) ं (x अनुस्वार) ः (_) ॅ (@) ँ (X) ॉ (\) ृ (=) ॄ (Left Ctrl + shift + u + 0944)
(0950 is a unicode character for ॐ , you can replace 0950 with any other code to type other unicode characters. List of all Devnagari unicode characters https://unicode.org/charts/PDF/U0900.pdf)
ॐ (Left Ctrl + shift + u + 0950)
ऽ (Left Ctrl + shift + u + 093d)
₹ (Left Ctrl + shift + u + 20b9)
कीबोर्ड लेआऊट
इनस्क्रिप्ट देवनागरी कळफलक असा दिसतो. हा देवनागरी वर्णमालेप्रमाणे organise केला आहे.
काही कठीण शब्द कसे लिहिता येतील याची उदाहरणे
कृष्ण (k=
पर्वत (hjdbl)
वृत्त (b=ldl)
हऱ्या (uJd/e)
नाऱ्या (vJd/e)
झिंदाबाद (Pfxoeyeo)
ऑफीस (|Hrm)
अॅपल (D@hn)
अत्युकृष्ठ (Dld/gk=<d")
त्राही (Shift + 6eur)
त्र्यंब्यक (Shift + 6d/xyd/k)
प्रत्येक (hdjld/sk)
ऋषी (+
स्वताः (mdble_)
हृदयात (u=o/el)
महाराष्ट्र (cueje<d'dj)
राष्ट्रीय (je<d'djr/)
प्रश्न (hdjMdv)
बँक (yXk)
अँड्रॉईड (DX[dj\R[)
कॅमेरा (k@csje)
भक्ती (Ykdlr)
धक्का (Okdke)
लॅपटॉप (n@h'\h)
ज्ञानेश्वर (Shift + 5evsMdbj)
एक्स्ट्रॉ (Skdmd'dj\)
द्रौपदी (odjqhor)
ऱ्हस्व (Jdumdb)
काँप्युटर (keXhd/g'j)
माझं (cePx)
चम्पा (;cdhe)
ब्रम्ह (ydjcdu)
क्षणीक (Shift + 7Crk)
इंट्रेस्टींग (Fx'djsmd'rxi)
वाङमय (beUc/)
विठ्ठल (bf"d"n)
विठ्ठल (bf"d 'Left Ctrl + Shift + u + 200c' "n)
हूर्र्र् (utjd 'LeftCtrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c' jd 'Left Ctrl + Shift + u + 200c') मुद्दाम हलन्त पाहिजे असेल तर ही पद्धत वापरु शकता
प्रतिक्रिया
17 Sep 2024 - 6:50 pm | टीपीके
वरील लेखात जी उदाहरणे दिली आहेत त्यात काही टंकन चुका आहेत. आता तर मी त्या सुधारू शकत नाही. तरीही खालील लिंक मधे तुम्हाला योग्य उदाहरणे मिळतील.
संपादकांना विनंती की जमल्यास त्यांनी ही लिंक मुख्य लेखात डकवावी ही विनंती.
धन्यवाद
https://docs.google.com/spreadsheets/d/1viSgEzwkAqtdHaiy5EuNVuIt-BXzcqUx...
17 Sep 2024 - 7:13 pm | टीपीके
बाय द वे, आणखी एक गोष्ट लिहायची राहिली. पुण्यात अप्पा बळवंत चौकात विनस मधे मला फक्त ५० रुपयात इनस्क्रिप्टची कीबोर्ड स्टिकर्स मिळाली. कोणाला पाहिजे असतील तर तिथून विकत घेऊ शकता.