|| उत्कीर्ण विनायक ||

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
12 Sep 2024 - 6:04 pm

"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल.
तो : उत्कीर्ण !
"काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!"
तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती"

कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण
Praf001a

अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता. घरी जाऊन शब्दकोश पाहिला तर आणखी भारी अर्थ सापडला " खोदकाम केल्या नंतर सापडलेला अमूल्य खजिना !

मित्रांनो आज मी आगळ्या वेगळ्या उत्कीर्णची अर्थात खजिन्याची माहिती सांगणार आहे !

**************************************************************************
कट टू १९९०

लहानपणी प्रफुल्लला चित्रकलेची खूप आवड होती ... पण काही कारणामुळे चित्रकलेतील शिक्षण घेण्याच्या संधीला मुकावे लागले. मग औपचारिक पदवी आणि मग नोकरी असे दिवस सुरू झाले... डोक्यात असलेली चित्रकला स्वस्थ बसू देईना ! चित्रकार लोकांकडे आकर्षित झाला.. त्यांच्या संगतीत रमून स्वतः ही चित्र रेखाटू लागला. चित्रकले बरोबरच हस्तकलेमध्ये सुद्धा विविध प्रयोग करून बघणं सुरू झालं. फार इच्छा होती की दगडात मूर्ती करता यावी.. त्यानुसार दगड कोरणे सुरु झालं/ दगडावर कोरीव काम करता करता असं जाणवलं की याच्यापेक्षा एखाद्या सॉफ्ट मिडीयम असेल तर त्याच्यावर कसं काम होतं ? ...

दगडी पाटीवर कोरून पाहताना प्रफुल्ल:
Praf001

... आणि यातूनच दगडाच्या पाटीवर म्हणजेच स्लेटवर कोरून बघितलं. सुई, दाभण, खिळे, स्क्रू ड्रायव्हर, वेगवेगळे टोकदार हत्यारे यांच्या साह्याने रेषाकाम, नक्षीकाम, पॅचवर्क करून बघितलं.
स्लेट कार्व्हिंग करताना
Praf002

प्रयत्न झकास उतरायला लागले. स्लेट वर कोरलेल्या रेषांवर रंग भरून पण पाहिले ....

आविष्कार : स्लेट कार्व्हिंग करताना
Praf0031

पण ते काही फारसं रुचलं नाही कारण त्यामुळे मूळ दगडी पाटीवर केलेल्या कोरीव काम कामाचं सौंदर्य उणावू लागलं. मग पाठीवरचं नितळ कोरीवकाम तसंच ठेवलं ... आणि रसिकांची भरपूर दाद मिळू लागली !

स्लेट कार्व्हिंग करताना
Praf004

आणि याच दरम्यान दीड दोन वर्ष नोकरीनिमित्त नगरला राहणं झालं. तिथेच शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा स्टुडिओ आहे हे कळालं आणि मग फेऱ्या सुरू झाल्या त्यांच्या स्टुडिओच्या... त्यांच्याशी घट्ट मैत्री झाली.

सुप्रसिद्ध शिल्पकार व चित्रकार श्री. प्रमोद कांबळे यांच्या नगर मधील कप-मगच्या संग्रहालयात चर्चा करताना ...
Praf005

श्री गणेश : सुंदर स्लेट कार्व्हिंग
Praf006

शिल्पकार मा प्रमोद कांबळे यांच्या चमूसह .. भव्य शिल्पकला प्रात्यक्षिक सुरु होण्यापूर्वी प्रफुल्ल भिष्णूरकर
Praf006

त्यांचं काम बघता बघता बरच काही शिकलं गेलं. एकदा त्यांनी प्रफुल्लच्या आणि दगडी पाटीवर कोरलेल्या कलाकृती पाहिल्या.... आणि या आगळ्यावेगळ्या सुंदर कलाकृती पाहून ते अत्यंत आनंदित झाले. त्यांनी प्रफुल्लला या पाट्यांचं या कलाकृतींचा प्रदर्शन भरवण्याचा आग्रह केला आणि यातूनच पहिलं प्रदर्शन पुण्यात भरवलं ते साल होतं १९९७.

अभिनेते लेखक दिग्दर्शक मा. किरण यज्ञोपवित, प्रफुल्ल भिष्णूरकर आणि शिल्पकार मा. प्रमोद कांबळे “दगडफुल” प्रदर्शनावेळी
Praf007

पाटीवर कोरायचं म्हणजे जिकिरीचं काम ! कारण प्रत्येक पाटीचं मटेरियल एकसारखं असेल नाही असं नाही. त्यामुळे प्रत्येक पाटी कोरताना सुरुवातीला त्या मटेरियलचा सॉफ्टनेस चाचपणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यानंतरच मग काम सुरू होतं आणि इथेच चूक झाली तर कलाकृती फसते. बारीक कोरीव काम करताना मनाच्या एकाग्रतेची कसोटी लागते.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मा. चित्रगुप्त यांना कलाकृतीचे बारकावे सांगताना प्रफुल्ल भिष्णूरकर
Praf008

एक वैशिष्ट्यपूर्ण स्लेट कार्व्हिंग दाखवताना प्रफुल्ल भिष्णूरकर
praf009

आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीसह प्रफुल्ल भिष्णूरकर
Praf010

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अर्थात ७५ वर्षे पुर्ण झाली म्हणून म्हणून एक मोठं आव्हान घेतलं ! भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाले म्हणून ७५ क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिकांचे पोर्ट्रेटचं स्लेट कार्व्हिंग करायचं. झटून कामाला लागला आणि संकल्प पुर्ण केला !
कला रसिकांची अर्थातच दाद मिळाली !

सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते आणि व्याख्याते श्री शरद पोंक्षे यांनी दिलेली दाद कोरून ठेवण्यासारखी !

प्राधिकरण येथे श्री. शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान प्रफुल्ल अनेक स्वातंत्र्यसैनिकांची क्रांतिकारकांची स्लेट कार्व्हिंग करत होता. स्वातंत्रयवीर सावरकरांचे स्लेट कार्व्हिंग पुर्ण झाले होतं. ते त्यांना दाखवावं म्हणून तिथं गेला. पण व्यग्र स्केड्युलमुळे ते खूप घाईत होते. तिथले काही उपस्थित रसिक स्वातंत्रयवीर सावरकरांचे स्लेट कार्व्हिंग उत्सुकतेने पाहत होते काहीजण उत्साहात फोटो हि काढत होते ! मा श्री शरद पोंक्षे यांनी प्रफुल्लला दुरूनच पाहिलं.. काहीतरी वेगळं आहे जाणवून खुणेने जवळ बोलवले. प्रफुल्ल बिचकतच त्यांच्या जवळ गेला. थोडं लांबूनच लांबूनच त्यांना स्लेट कार्व्हिंग दाखवलं ! त्यांना थोडे आश्चर्य वाटले. हसले. पाठीवर शाब्बासकी दिली. ते निघाले.

सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते आणि व्याख्याते श्री शरद पोंक्षे, पपु शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती करवीर पीठ, ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण श्री रतन जी टाटा, पपु स्वामी स्वरूपानंद फुलगाव आश्रम इ. दिग्गज असामी कलाकृतींचे कौतुक करताना.
Praf011

त्यांनी खुणेनेच प्रफुल्लला त्यांच्या बरोबर येण्यास सांगिलते. प्रफुल्ल आणि आणखी काही जण त्यांच्या बरोबर चालत निघाले. त्यांना फोटो काढणाऱ्यांचा कंटाळा आला होता. ते गर्दी टाळत होते. "आम्ही मागील बाजूने ------ मंदिरापर्यंत आलो. तिथे काहीवेळ गाडीची वाट बघत थांबलो. तोपर्यंत त्यांनी पाटीवरील चित्राबाबत बरीच माहिती विचारली. मला माहित असलेले मी सर्व सांगितले. तदनंतर त्यांच्या राष्ट्राय स्वाहा या त्यांच्या युटयूब चॅनेलच्या अंदमान भाग- २ मध्ये स्वातंत्रयवीर सावरकरांच्या स्लेट कार्व्हिंगचं दर्शन घडल... आणि मी धन्य झालो.माझे चित्र एका योग्य व्यक्तिकडे सुपूर्त केल्याचे समाधान लाभले व ती स्लेट कार्व्हिंगची कलाकृती अजरामर झाली." हे सांगताना प्रफुल्लचा चेहऱ्यावर अजूनही रोमांच उभे राहतात !

वेगवेगळी आव्हानं आणि वेगवेगळे विषय घेऊन स्लेट कार्व्हिंग होत राहिलं आणि कलारसिकांबरोबरच दिग्गज कलाकारांची दाद मिळवत राहिलं.

कोणत्याही नवीन कलाकृतींची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतो या उक्तीनुसार सुरुवातीला प्रफुल्ल श्री गणेशाची स्लेट कार्व्हिंग करतो आणि प्रत्येक वेळी हा गणेश वेगवेगळ्या आकारांचा, वेगवेगळी अभिव्यक्ती असणारा, वेगवेगळे भाव प्रकट करणारा असा असतो. काही दिवसांनी गणेशाची अनेक स्लेट कार्व्हिंग झाली त्यातून संकल्पना आली पुढे आली की फक्त गणेश कलाकृतींचेच प्रदर्शन करायचे !

हे आमंत्रण सुद्धा पाटीवर कोरलेलं : उत्कीर्ण विनायक
Praf012

चित्र-शिल्पकार प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी दगडी पाटीवर कोरलेल्या गणेश प्रतिमांच्या ६ व्या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक १० सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक श्री. गो. बं. देगलूरकर सर यांच्या शुभहस्ते व जेष्ठ चित्रकार श्री. मिलिंद फडके सर यांच्या उपस्थितीत झाला आहे.

मुर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक श्री. गो. बं. देगलूरकर सर कलाकृतीचा आस्वाद घेताना
Prfa013

कलाकृतींमधलं वैविध्य नोंद घेण्यासारखे आहे !

काही कलाकृती ब्लॅक अँड व्हाईट लेन्स मधून
Praf014

Praf015

Prafa016

.. आणि अश्या हटके गणेश कलाकृतींचं हे आहे ६ वं सहावं प्रदर्शन आहे " उत्कीर्ण विनायक "
Praf017

Praf017

Praf018

"संवादू कौतुके" या कार्यक्रमात एफ एम रेडिओवर सुप्रसिद्ध निवेदक आणि लेखक श्रीकांत चौगुले यांनी प्रफुल्ल भिष्णूरकर याची घेतलेली मुलाखत नुकतीच प्रसारित करण्यात आली ही विशेष बाब आहे !

उत्कीर्ण विनायक आणि कलाकाराचा हसरा आनंदी चेहरा
Praf019

(वरील चार प्रचिश्रेय : चित्रकार श्री शरद तरडे, स्टुडिओ कॅलिडो)

दोस्त माझा मस्त : प्रफुल्ल भिष्णूरकर आणि चौथा कोनाडा
Praf020

उत्कीर्ण विनायक : प्रदर्शनातल्या कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.
Praf021

प्रदर्शनातली प्रत्येक कलाकृती पाहात राहावी अशीच आहे !

|| उत्कीर्ण विनायक ||
प्रदर्शन - दिनांक १० सप्टेंबर २०२४ (मंगळवार) ते १५ सप्टेंबर २०२४ (रविवार)
वेळ: सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत
स्थळ - पी. एन्. गाडगीळ अँन्ड सन्सचे कलादालन हॅप्पी कॉलनी, कोथरूड, पुणे.

तर मित्रांनो .. येताय ना उत्कीर्ण मधून हाती लागलेला अमूल्य खजिना पाहायला ?

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

12 Sep 2024 - 11:11 pm | विजुभाऊ

व्वा एका नवीन माध्यमाचा आणि कलाकाराची ओळख झाली

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2024 - 11:36 am | चौथा कोनाडा

मनःपुर्वक धन्यवाद, विजुभाऊ.

चित्रगुप्त's picture

13 Sep 2024 - 2:27 am | चित्रगुप्त

@ चौथा कोनाडा: लेख अतिशय आवडला. खूप रंजक आणि माहितीपूर्ण आहे.
तुमच्याबरोबर श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या उत्कीर्ण कलाकृती बघायला मिळाल्या होत्या. आता त्यांचे दर्जेदार प्रदर्शन होत आहे, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही दोघेही खूपच हरहुन्नरी, मनमिळाऊ, कलाप्रेमी आणि सततोद्योगी आहात, याची प्रचिती तुमच्या भेटीतून आलेली होती. अनेक शुभेच्छा.

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2024 - 11:41 am | चौथा कोनाडा

मनःपुर्वक धन्यवाद, चित्रगुप्त.
हो, तो दिवस आनंदाचा होता.. खुप छान योग आले. त्याच्या सहवासात बरयाच कलाकारांच्या भेटीचे योग आले..
पाहूया पुन्हा योग कसे येतात ते !

सौंदाळा's picture

13 Sep 2024 - 3:18 pm | सौंदाळा

मस्तच,
उत्कीर्ण शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि आवडला.
तुमच्या चिंचवड कट्ट्याच्या धाग्यात पण प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात लिहिले होते. आता मात्र त्यांची विस्तारपूर्वक ओळख, त्यांच्या कलाकृतींची माहिती आणि त्यांना मिळालेले मान्यवरांचे आशिर्वाद, कौतुक बघून खूपच छान वाटले.
प्रफुल्ल भिष्णूरकर यांचे प्रदर्शानासाठी अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा

चौथा कोनाडा's picture

15 Sep 2024 - 11:45 am | चौथा कोनाडा

हो, उत्कीर्ण शब्द भारी आहे ... मी ही "उत्कीर्ण" च्या प्रेमात पडलोय !
तुमचे अभिनंदन प्रफुल्ल भिष्णूरकर ला कळवतो !
मनःपुर्वक धन्यवाद, सौंदाळा.

लेख खूप आवडला. चांगली माहिती.
मागे एका कट्ट्याची माहिती तुम्ही दिलेली.. त्यात सुद्धा यांचा उल्लेख होता.
प्रदर्शन बघण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. शुभेच्छा!

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 2:27 pm | कर्नलतपस्वी

दिवाबत्ती जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती.

एक कडक सलाम, महानुभाव चित्रकारांना.

धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2024 - 9:58 pm | चौथा कोनाडा

आभार कर्नल साहेब !
तुमचा हा एक कडक सलाम पोहोचवतो या महानुभाव चित्रकारांना.
थॅन्क्यू !

कर्नलतपस्वी's picture

14 Sep 2024 - 2:28 pm | कर्नलतपस्वी

मोबाईल बेइज्जती करता है.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2024 - 9:57 pm | चौथा कोनाडा

नो प्रॉब्लेम कर्नल साहेब !
एवढं टायपो तर चालतंच की !

(या पेक्षा भयानक आणि अति-अशुद्ध मराठी वाचायला मिळतं आजकाल !
आणि माफी बिफी मागायची तर पद्धतच नसते !
आपण (म्हणजे तुम्ही सुद्धा) पडलो अचूक शुद्ध मराठी लिहिण्याच्या बाण्याचे .. आपल्यासाठी तर फार निराशाजनक परिस्थिती आहे)

प्रचेतस's picture

16 Sep 2024 - 6:17 am | प्रचेतस

एका अवलिया कलाकाराची व त्याच्या कलेची उत्तम ओळख.
खूप छान लिहिलंय.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2024 - 9:59 pm | चौथा कोनाडा

मनःपुर्वक धन्यवाद, प्रचेतस.
लेखनाच्या कौतुकाबद्द्ल पेशल थॅन्क्स !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2024 - 9:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह ! मोठ्या कलाकाराची ओळक आवडली. चित्रं तर सुप्पर डुप्पर.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

19 Sep 2024 - 8:24 pm | चौथा कोनाडा

वाह ! मोठ्या कलाकाराची ओळक आवडली. चित्रं तर सुप्पर डुप्पर.

तुमचं कौतुक पोहोचवत आहे.
मनःपुर्वक धन्यवाद, प्रा.डॉ. साहेब !

नि३सोलपुरकर's picture

18 Sep 2024 - 1:15 pm | नि३सोलपुरकर

कडक सलाम _/\_ व मनःपुर्वक धन्यवाद .

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2024 - 10:01 pm | चौथा कोनाडा

मनःपुर्वक आभार नि३सोलपुरकर.
तुमचा ही कडक सलाम _/\_ पाठवतो प्रफुल्ल कडे !

श्वेता२४'s picture

18 Sep 2024 - 4:19 pm | श्वेता२४

माझ्यासाठी चित्रकला हा अतिशय वेगळा असा विषय आहे. यातले फारसे काही कळत नसले तरी समजून घ्यायला आवडते. कुठेही चित्र प्रदर्शन असले तरीही आवर्जून जाते व समजून घेण्याचा प्रयत्न करते. लेख अतिशय आवडला. बरीच वेगळी माहिती समजली.

चौथा कोनाडा's picture

18 Sep 2024 - 10:02 pm | चौथा कोनाडा

व्वा छान अभिप्राय ! आपल्या कला-आस्वादक वृत्तीचे कौतुक आहे !
लेख आवडला या साठी मनापासून आभार !