मिपा कला संग्रहालय - ३ .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in मिपा कलादालन
14 Jul 2024 - 11:54 am

नमस्कार मिपाकर हो !
मिपा कलादालन ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा सुरु करत आहे : .जगभरातील ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंचे चित्रण.
ह्या धाग्यावर ऐतिहासिक व्यक्ती , किंवा प्रसंग ह्यांची चित्रे द्यावीत.
प्रतिसादात हे टेम्प्लेट वापरल्यास सर्वांनाच सोयीचे होईल .

प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव

प्रतिसाद :
चित्राचे नाव
चित्रकाराचे नाव :
इंटरनेटवरील लिंक
पर्यायी लिंक:
सर्व चित्रांची लिंक :
चित्र :

टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Jul 2024 - 12:10 pm | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव :पेशवा दरबार
चित्रकाराचे नाव : थॉमस डॅनियल
इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/Thomas_Daniell
चित्र :
1

टिप्पण्णी : हे माझ्या आवडत्या चित्रांपैकी एक. ह्या चित्रावरुन पेशवा काळात असलेल्या शनिवार वाड्याची भव्यता आणि समृध्दी दिसुन येते. पेशव्यांच्या बैठकी मागे श्री गणेशाची भव्य मुर्ती (की चित्र? ) होते असे ऐकुन आहे, मात्र ह्या चित्रात श्री विष्णुंची चतुर्भुज रुपातील मुर्तीही दिसत आहे !

Bhakti's picture

15 Jul 2024 - 11:58 am | Bhakti

पशुपति
सिंधू संस्कृती मोहोर एक शिल्प
A
माहिती नाही हे या धाग्यात बसते की नाही पण एक ऐतिहासिक चित्रण/शिल्प/मोहोर काय योग्य वाटेल त्यात हे बसवावे.
कधी कधी ना एखाद्या प्रश्नावर अनेकदा तिथंच घुटमळते, उत्तर का मिळत नाही हे सतावते.तेव्हा मी हे शिल्प आठवते.म्हटलं तर याचं उत्तर मिळालं हा प्राण्यांनी वेढलेला त्यांचा देव पशुपती आहे.तर काहींचं म्हणणं ही दुर्गा देवी,तर काही हा योगी शिव,तीन मुख?चार मुख?
अशी ना ना प्रश्न याभोवती जमा होतात.उत्तर जे तुम्हाला समाधान देईल ते!