अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट: लग्नातले उखाणे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
13 Jul 2024 - 11:26 am

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील?

आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका.

लेक लाडकी मोठ्या घरची
होणार सुन मी अंबाणीची

मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला
अनंतरावांसारखा जोडीदार भेटला

लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड
अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड

स्वप्नातला राजकूमार पाहीला होता
सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.

उखाणेमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

मला खासे, खर्चे (वर्ग १), खर्चे (वर्ग २) किंवा खर्चे (वर्ग ३) * यापैकी कोणतीही पत्रिका न आल्याने दुखावला गेलो असून त्यामुळे मौन असेन.

बाकी, झाले का एकदाचे संपन्न?

आता पुढील सोहळा काही बाकी आहे का? पोस्ट वेडिंग संमेलन वगैरे?

*तळटीप:

खासे: सोन्याच्या वर्खाची पत्रिका, बसायला पाट, ताटाला पाट, चांदीची ताटे, श्रीखंड पुरी, मसालेभात, उदबत्ती घरे सोन्याची

खर्चे (वर्ग १): जाड कार्ड रंगीत पत्रिका, बसायला पाट, जमिनीवर ताट, पितळी ताटे, साखर भात, मागून साधा भात कढी, उदबत्ती घरे पितळेची

खर्चे (वर्ग २): पातळ कार्ड दुरंगी पत्रिका, बसायला जाजम, केळीचे पान, जिलबी, मठ्ठा, वरण भात तूप, उदबत्ती घरे बटाट्याची

खर्चे (वर्ग ३): तोंडी निमंत्रण, बसायला जाजम, जमिनीवर पत्रावळ, गोड बुंदी, ताक, वरण भात वनस्पती तूप, उदबत्ती नाही.

ढोबळ श्रेय अव्हेर: चिंवि जोशी. (किंवा जोग)

अनंत राधिकाला द्या शुभ आशीर्वाद
करा तुमचा जिओ रिचार्ज हाच उपहार!!
- मुकेश अं बानी.

हे राम. काय हो हे?? काही यमक बिमक लय बिय दुरून तरी?

समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता
बेंबट्यारावांचे नाव घेते माझा नंबर पहिला?

इथे ओशाळल्या सौ. धोंडो भिकाजी.

अहो,धोंडोजी यमक काय फक्त लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी नसतय,
जरा उखाणा 'घेऊन'तर बगा,कानास गोडच लयीतच लागील..
नाही पटलं तर राहूं द्या ! सगळेच हुशार नसतात की ओ!

गवि's picture

13 Jul 2024 - 2:25 pm | गवि

अहो,धोंडोजी

माझाच गणपुले???

अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?!

बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.

अहो तो विनोद होता. कसं करावं आता? तुम्ही पुलं वाचत नाही वाटते?!

नाय वाचत,आमचे हेच देशपांडे हायेती,तवा देशपांड्यांना देशपांड्यांचा लई अभिमान,गावी देशपांड्यांकडं कपाट भरभरू पु.लं.ची बुकं पण गावी आम्हाला स्वैपाकघरातून फुरसत मिळाली असती तर वाचली अस्ती..

बाकी हुशार असो नसो, आनंदात आणि स्वतःबद्दल समाधानी असणे महत्वाचे.

हेच बेस्ट :)
पण रच्याकने पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.

टर्मीनेटर's picture

16 Jul 2024 - 1:27 pm | टर्मीनेटर

माझाच गणपुले???

😀 😀 😀

पु.लं.ची ओडिओ, व्हिडिओ पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न करत आहे.

पु.लं. नक्की वाचा, ऐका, बघाच... एकदा का तुम्हाला त्यांच्या वाक्या वाक्यातलाच काय तर शब्दा शब्दातला विनोद आणि त्याचा दर्जा समजायला लागला की तुम्हीपण आमच्यासारख्या पु.लं.च्या 'डाय हार्ड' फॅनक्लबमध्ये कधी सहभागी व्हाल ते तुम्हालाही समजणार नाही 😀

स्वगत : आता गविंनी 'गणपुलेंचा' विषय काढलाच आहे म्हंटल्यावर आता'मद्राशी राम', 'पंजाबी मारुती', 'बंगाली सीता' वगैरेंची उजळणी करण्यासाठी आज हे ऐकणे ओघाने आलेच 😂

Bhakti's picture

16 Jul 2024 - 1:43 pm | Bhakti

होय होय !
😀
रावसाहेब ऐकले बेळगावी भाषेचा लहेजा वापरून काय कमाल कथाकथन करतात पुलं :)

नंतर बिगर इयत्ता शाळा ते मैट्रिक प्रवास दामले मास्तरांच्या गोष्टी खुपचं धमाल ;)

आताच्या लहान मुलाला विचारलं तर म्हणाला कीजे का कशात आहे, म्हणजे आताचे मुलं किलोवर घेतात काय..?

जवळच्या देशपांडेचं नाही तर साक्षात 'पुलं देशपांड्यांचं' तरी ऐकते म्हणून आमचे हे देशपांडे जरातरी सुखावले ;)

जोन सेना,किम कार्देशन आणल्या सुबक बाहूल्या
सोन्या- हिर्याच्या कपड्यांत नीताबाई सजल्या धजल्या
-मु केश अं बानी
आता बर्र हाई काय गविशेठ?का अजून आमी नापास..

आता हे कसं बरोबर जमलं? शाब्बास.

- प्राध्यापक परखडकर *

*तळटीप: एक डाव धोबीपछाड चित्रपटातील काल्पनिक पात्र. धोंडो भिकाजी जोशींसारखेच.

अनन्त्_यात्री's picture

13 Jul 2024 - 4:16 pm | अनन्त्_यात्री

अनन्ताची सहयात्री मर्चंटांची लेक

घाऊकमंदी प्रीवेडिंग लगीन फकस्त एक?

धर्मराजमुटके's picture

13 Jul 2024 - 5:29 pm | धर्मराजमुटके

आमचाही एक प्रयत्न !
सोन्याच्या ताटात चांदीचे चमचे
घास भरवते अनंत्या, थोबाड कर इकडे !

सोन्याची सायकल , तिला भरतो हवा |
मी चाललो परगावा, राधिकाला जीव लावा.

कर्नलतपस्वी's picture

13 Jul 2024 - 8:03 pm | कर्नलतपस्वी

पाऊसपाण्याचे दिवस वारा वाहे भरारा
अंबानीच्या महालात निताबाय चा दरारा

हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो
राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो

प्रचेतस's picture

13 Jul 2024 - 8:57 pm | प्रचेतस

हिरे माणकाच्या राशीवर हिडेनबर्ग जळतो
राधीकाच्या मागे अनंता हळूहळू पळतो

हे कहर आहे =))
थेट दृश्यच डोळयांसमोर आले ना, काय हे कर्नलसाहेब =))

गवि's picture

13 Jul 2024 - 9:40 pm | गवि

+१

कर्नल साहेबांना साष्टांग दंडवत. आणि काय बोलावे? __/\__

पार पोचलेली वल्ली आहे. ;-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jul 2024 - 3:20 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अंबानींचा सोहळा पाहुन दुखले अनेकांच्या पोटात
शहारूख म्हणाला- थोडे श्रीखंड वाढा माझ्या ताटात

अथांग आकाश's picture

14 Jul 2024 - 4:39 pm | अथांग आकाश

खर्च झाला मुकेशच्या खिशातून पैशाचे वाहिले पाट
भिकारडे लालबावटे म्हणतात कशाला एवढा थाटमाट

लग्न लागले पंगती बसल्या आले भात वरण
अनंतरावांचे सासरे बांधतात वाळवंटात धरण

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Jul 2024 - 6:48 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विवाहाला हजर होते सगळे हॉलिवूड बॉलिवूड
अंबानींचा थाट पाहुन जळले माझे संपादकीय बूड
गिरीश कुबेर
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-dhanaji...

आंद्रे वडापाव's picture

16 Jul 2024 - 7:57 am | आंद्रे वडापाव

"सिताच्या" पतीच्या नावाचा, देशभर गवगवा..
परी.. "नीताच्या" पतीचेच आहे इधर राज...
अनंत माझ्या चरणांशी.. लक्ष्मी कुबेरा.. काही लागल्यास..
माझ्याकडे माग...

आंद्रे वडापाव's picture

16 Jul 2024 - 2:17 pm | आंद्रे वडापाव

बाय द वे ..पु ल देशपांडे .. हे कट्टर समाजवादी होते .. म्हणजे "देशपांडे' असण्याचा माज दाखवण्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य समाजाचे निरीक्षण (विनोदी पद्धतीने ) लिहले ... त्यामुळे फ्यान असाल तर समाजवाद्यांना शिव्या देण्याआधी .. एकदा २ सेकंड थांबून बघा ..