मिपा कला संग्रहालय - २.निसर्गचित्रण

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in मिपा कलादालन
11 Jul 2024 - 11:03 am

नमस्कार !

ह्या लेखमालिकेतील हा तिसरा धागा - निसर्ग चित्रण .
प्रत्येक देशात, वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या निसर्गचित्रणाच्या शैली विकसीत झाल्या. ह्या धाग्यावर आपण आपल्याला आवडलेल्या निसर्ग चित्रांचा संग्रह करुयात.

चला तर मग !

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

11 Jul 2024 - 11:29 am | प्रसाद गोडबोले

चित्राचे नाव - १. स्टारी नाईट
चित्रकाराचे नाव (कालखंड) : व्हिन्सेंट वॅन गोह
चित्रशैली : पोस्ट इम्प्रेशनिस्ट ( ह्याचा नक्की अर्थ काय मला माहीत नाही, ज्यांनी ह्यावर सविस्तर अभ्यास केला आहे त्यांनी जरुर ह्यावर लिहावे ही विनंती.)
इंटरनेटवरील लिंक : https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Van_Gogh_-_Sta...

सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht

इथे अनेक चित्रे आहेत : https://commons.wikimedia.org/wiki/Vincent_van_Gogh

चित्र
s

टिप्पण्णी : व्हिन्सेंट वॅन गोह ह्याला एक लोकोत्तर चित्रकार मानले जाते. ह्याचे जीवन एका टिपिकल कलाकार माणासाचे जीवन कसे असेल असे आपल्याला वाटते तसे आहे. त्याने काढलेल्या प्रत्येक चित्रात त्याची शैली प्रकर्षाने जाणवुन येते. त्याची अजुन दोन चित्रे मला फार आवडतात - Wheat Field with Cypresses , Almond blossom.
मी वर त्याचा मोठ्ठ्या चित्र गॅलरीची लिंक दिलेली आहेच. मिपाकरांनी जरुर त्याचा आस्वाद घ्यावा , त्यांनाही आवडल्यास आपण ती चित्रे येथे उद्धृत करु शकता !

अवांतर स्वगत : माझे कलाक्षेत्रातील शिक्षण शुन्य आहे. मी तसा संख्याशास्त्र , गणित , अर्थशास्त्र , फायनान्स अश्या अर्थात कलेच्या नजरेतुन पाहिल्यास रुक्ष वाटणार्‍या विषयांचा विद्यार्थी होते, आहे. आणी मग असाच अभ्यास करता करता एके दिवशी लक्षात आले की जगातील सगळ्यात पहिले ग्रेट बँकर्स - इटली मधील मेदीची फॅमिली - त्यांन्नी मायकल अँजेलोला फुल्ल स्पॉन्सरशिप दिलेली होती त्याच्या कलेचा आविष्कार करण्याकरिता. तिथे पहिल्यांदा जाणीव झाली की अर्थशास्त्र तुम्हाला कसं जगायचं हा प्रश्न सोडवायला मदत करेल पण का जगायचं ? माणासाचं जीवन आणि प्राण्यांच्या जीवनात फरक तो काय ? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कलेतुनच मिळेल.

नंतर वाचनात कळाले की व्हिन्सेंट वॅन गोह ह्याचे एक पोर्ट्रेट चित्र तब्बल ८७ मिलियन डॉलर ला विकले गेले ! सो फायनान्स च्या दृष्टीने पाहिल्यास अभिजात चित्रे कला ही एकप्रकारची आर्थिक गुंतवणुक आहे की ज्याचे व्हॅल्युएशन करणे कर्मकठीण काम आहे ! मायकल अँजेलो च्या डेव्हिड ची किंमत काय ठरवणार ! सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स !

व्हॉला . Now it makes a lot more sense to learn to appreciate the Art !

सरकार काय ठरवणार किंमत कलेची? सो अभिजात कला असा सटल अ‍ॅसेट क्लास आहे ज्याच्यावर सरकार ला टॅक्स लावता येणार नाहीये . ना इनकम टॅक्स , ना बिजनेस टॅक्स , ना वेल्थ टॅक्स !

सरकार कलेची किंमत नाही ठरवत पण जर ती "कलावस्तू" खरेदी आणि विक्री करण्याचा धंदा कोणी केला तर त्या उलाढालीवर विविध कर बसतात ( कोणतेही सरकार ते सोडत नाही, आणि का सोडावे जर व्यक्ती लाढाल करीत असेल तर कलाकृती असो व धान्य सगळे सारखेच )
साधा इनकॉलम टॅक्स / कॅपिटल गेन टॅक्स / इत्यादी ...देशाप्रमाणे वेगळे ( अर्हताःत पूर्ण टॅक्स मुक्त देश असले तर गोष्ट वेगळी )

चित्रगुप्त's picture

18 Jul 2024 - 4:38 am | चित्रगुप्त

.
-- रमलचित्राचा एक प्रयोग.

अनन्त्_यात्री's picture

18 Jul 2024 - 8:17 pm | अनन्त्_यात्री

काढता येईल का?

चौकस२१२'s picture

19 Jul 2024 - 5:51 am | चौकस२१२

आज पहिल्यन्दाज या नवीन तंत्राचा उपयोग करून निर्माण केलेले हे चित्र आवडले , (बाकी वेळेला चांदोबा चे रूपांतर बघून कंटाळा आला होता/ नावीन्य राहिले नवहते )

प्रसाद गोडबोले's picture

11 Jul 2024 - 11:43 am | प्रसाद गोडबोले

चित्रकाराचे नाव : Katsushika Hokusai
चित्रशैली : Woodblock printing in Japan
इंटरनेटवरील लिंक : https://en.wikipedia.org/wiki/File:Tsunami_by_hokusai_19th_century.jpg

सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक: https://commons.wikimedia.org/wiki/De_sterrennacht

चित्र
t

टिपण्णी : ह्या चित्राला "जगातील सर्वात जास्त वेळा पुनर्निर्मित केलेले चित्र " असे म्हणतात. ह्या चित्राने अनेक जगप्रसिध्द चित्रकार जसे वॅन गोह, मोनेट ह्यांना प्रेरणा दिली !

सेशेल्स या अद्भुत जादुई बेटांची सेल्फ ड्राईव्ह सफर करताना अवचित माझी कार अनपेक्षितपणे एका जंगलात लपलेल्या प्रशस्त बंगल्यासमोर आली. तिथे एक कलाकार राहतो असे तिथल्या पाटीवरून वाटलं. मग आत गेलो तर सर्वत्र रिकामे आणि शांत. निर्जन.

तरीही नेटाने आत घुसून शोधल्यावर एका खोलीचे दार उघडे दिसले. त्यात बसून जेरार्ड नावाचा चित्रकार पेंटिंग करत होता. पूर्ण चित्त एकाग्र.

सेशेल्स आणि एकूण विषुववृत्ताच्या लगत असलेल्या बेटांवर आढळणारी सर्वात ठळक गोष्ट म्हणजे दाट जंगले, पाम प्रकारची झाडे, आणि रंगांची प्रचंड विविधता. जणू निसर्ग आपल्या pallet मधले सर्वच्या सर्व रंग आणि छटा वापरण्याचा हट्ट धरून रंगकाम करतो तिथे.

तर पहिल्या दर्शनात ती चित्रे अतिशय रंगीबेरंगी आहेत इतकेच वाटू शकेल. पण बारकाईने बघितले तर ही शैली त्या प्रदेशासाठी बेहद्द फिट होते. मला खूपच आवडली. बारीक बारीक विभागांत एकेक रंग भरत बसणे ही त्याची चिकाटी मी तिथे प्रत्यक्ष बघितली. त्याने उत्साहाने काही अन्य चित्रे दाखवली. एक गॅलरी पण बनवली होती तिथेच. रंगांच्या पसाऱ्यात हरवलेला, त्या अतिशय सुंदर बेटावर एकटा राहणारा तो मनुष्य पाहून काहीतरी विलक्षण वाटले.

माझ्या सेशल्स संबंधित धाग्यावर मी याबद्दल त्याच्या फोटोंसह लिहिले होते.

त्याची वेबसाईट सापडली.

http://www.gerarddevoud.com/

हा मी तिथे गेलो असताना घेतलेला फोटो. बाकी त्याच्या वेब साईट वरून इमेज एम्बेड होत नाहीयेत

B

किल्लेदार's picture

19 Jul 2024 - 12:14 am | किल्लेदार

Pacoyao नावाचा एक चायनीज चित्रकार आहे. शैली कुठली माहित नाही पण चित्र फारच सुरेख आहेत. इंस्टाग्राम वर बघता येतील.

Pacoyao

चित्रकाराचे नाव- अमांडा हर्जमन (कॅनबेरा)
काळ-अर्वाचिन
अमांडाची इतर चित्रे-https://cargocollective.com/amandaherzman
शैली-वनस्पति आणि लोकसाहित्यकार कलाकार.वनस्पती आणि बुरशी, त्यांची पौराणिक कथा, कल्पनारम्य, इतिहास आणि लोककथा यांच्या विलक्षण जगाचा शोध घेतो.
याच्या चित्रांची ओळख कृष्णाच्या गोष्टीतल्या पारिजातक हरण कथेसाठी चित्र शोधतांना झाली.वनस्पतीशास्त्र शिकतांना हर्बेनिअम (झाडांची वाळवून चौकोनी कागदावर प्रेस करत चिकटवून केलेली साठवण) हा एक महत्त्वाचा भाग असतो.त्यात अनेक जणांकडे त्या झाडांची स्केच,चित्रे तयार करण्याची कला असते.अमांडा वनस्पती,बुरशी,औषधी वनस्पती यांची चित्रे बनवतोच पण त्याविषयी पौराणिक/लोकसाहित्यातील कथाही फुलां-पानांसह मांडतो.त्याने यासाठी पारिजात -सूर्यकथाही सुंदर रंगवली आहे.पारिजातक आवडत असल्याने या चित्राने मला मोहिनी घातली नाही तर विशेषच :) कथा पौराणिक धाग्यावर बाकी रात्री उमलणारी फुले आणि आकाशीय(सूर्य/चंद्र निगडीत फुले)फुले इथे देते.

*आकाशीय फुले
अ

*रात्री उमलणारी फुले
आ