कारलं माझ्या आवडीचं!

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
5 Jul 2024 - 11:17 am

जगातील सगळं सुख एकीकडे आणि परफेक्ट कारल्याची भाजी करण्याचं सुख एकीकडे!! 😋

किंचित कडू -गोट-आंबट-ठसकेदार-चमचमीत!
जीभेच्या रसना तृप्त करणारी!
शरीरालाही गुणकारी!

कृती-
१.कारल्याच्या गोल चकत्या प्रमाणे फोडी करा.एका कारल्याच्या पाच फोडी होतील.देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकायचा.
२.त्या फोडीतील बिया काढून टाकाव्यात.कारल्याच्या फोडी आता पोकळ असतील.
३.त्या फोडींना हळद,मीठ,लिंबाचा रस(२-३ लिंबाचा)लावून वीस मिनिटे तशाच ठेवाव्या.
४.नंतर उकळी आलेल्या पाण्यात त्या मध्यम शिजवाव्या.
५.मसाला-एक मोठी वाटी दाण्याचा कूट,अर्धी वाटी तिळाचा कूट,दोन चमचे तिखट,एक चमचा कोणताही आवडीचा मसाला,अर्धी वाटी चिरलेला गूळ,चिरलेली कोथिंबीर,मीठ ,किंचित लिंबू पिळावे.हा कोरडा मसाला तेलात एकत्र करावा.
६.कारल्याच्या फोडींत तो भरावा किंवा फोडी या मसाल्यात घोळून घ्याव्यात.
७.तेलात मोहरी जिर्याची तडतडीत फोडणी करावी.त्यात भरलेल्या कारल्याच्या फोडी चांगल्या परताव्यात.अर्धा फुलपात्र पाणी टाकून मंद आचेवर भाजी वाफवून घ्यावी.
A
कडू कारलं साखरेत घोळले,तुपात तळले तरी ते कडू ते कडू,असं म्हणत उगाच त्याला चिडवू नये 😛

अशी भाजी करून कारल्याविषयक सकारात्मकता पसरवा ;)
तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?😊

प्रतिक्रिया

कांदा लिंबू's picture

5 Jul 2024 - 11:23 am | कांदा लिंबू

कारलं माझ्या आवडीचं!

माझ्यापण आवडीचं.

पाकृ व सांगण्याची पद्धत आवडली.

तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?

माझी आई कारल्याची भाजी अगदी चविष्ट करते. चिंच, गूळ, शेंगादाण्याची पूड, शेंगादाण्याचं तेल, काळं तिखट, मीठ, तिखट वगैरे घटक असतात. कधी सचित्र पाकृ टाकेन.

बरोबर शेंगदाणे तेलाचा स्वतःचा एक इसेन्स असतो.

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2024 - 12:14 pm | कर्नलतपस्वी

कार्ले धुऊन,पुसून घ्यावे.
गोल चकत्या काढाव्या.
बिया काढून टाकाव्यात
हळद लिंबू मिठ चोळून थोडावेळ बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करायला ठेवा
कांदा गोल कापून त्याच्या रिंग मोकळ्या करा
गरम तेलात शेंगदाणे खरपूस लालसर तळून घ्या.
कांद्याच्या चकत्या पण लालसर तळून घ्या
आता कारल्याच्या चकत्या तेलात टाका
चवीनुसार लाल तिखट मीठ घाला
कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर ठेवा

कुरकुरीत दाणे,कार्ले आणी मऊसर कांद्याच्या रिंगा ,मस्त लागतात, कडवटपणा नाममात्र, चकणा म्हणून सुद्धा चांगली डिश आहे.

तेल माफकच वापरावे.

कार्ले पंचामृतातही चांगले लागते.

भाजीचा फोटो छान आलाय.

हो कार्ल्याच्या चकत्या मस्त चवीच्या असतात.

तुम्ही कारल्याची भाजी कशी करता?

१)
-गरम तेलात लसूण चटणी परतायची,
-कच्च्या हिरव्या टोमॅटोच्या चकत्या आणि कार्ल्याच्या चकत्या (१:१) एकत्र पर्यायांच्या. ( सरळ कार्ल्याच्या चकत्या करायच्या, काहीही सोपस्कार न करता.)


कार्ल्याच्या चकत्या तिखट मीठ बेसन तांदुळाचं पीठ लावून तेल टाकून तव्यावर कुरकुरीत भाजायच्या.

दोन्ही प्रकारात कडूपणा लागत नाही.

___________
पाकृ आवडली. पाहुण्यांसाठी का?

सरळ कार्ल्याच्या चकत्या करायच्या, काहीही सोपस्कार न करता.

वाह!सराईतपणा दिसत आहे 🙂

कारल्याची परतून सुकी भाजी आणि सोबत आमटी भात हा बेत म्हणजे काही वादच नसतो.

भरली कारली पण बरी. पण त्यात पुन्हा कोरडी आणि ग्रेव्हीसदृश असे दोन प्रकार असतात. दोरीने बांधण्याची पद्धत दिसते. ओली भाजी निरुपयोगी. कारण त्यात कारल्याची साल मऊ होऊन त्याच्या texture ची मजा आणि तो विशिष्ट वास निघून जातो.

भाजी चांगली झालेली दिसते, साग्रसंगीत. पण फोटो जरा दुरून आणि पूर्ण ताटाच्या सोबत काढला तर बरे होईल.

ओली भाजी निरुपयोगी. कारण त्यात कारल्याची साल मऊ होऊन त्याच्या texture ची मजा आणि तो विशिष्ट वास निघून जातो.

बरोबर,मला अजून कार्ल्याची कोरडी भाजी नीट येत नाही.

पण या धाग्यातली ही भाजी ओली या सदरात मोडत नाही.

ओली म्हणजे जवळपास उकडलेली साल आणि आत मसाला + आसपास ग्रेव्ही सारखे असे असते.

Bhakti's picture

5 Jul 2024 - 4:28 pm | Bhakti

मग ठीक आहे.

लहानपणी मी जवळपास सर्वच भाज्या आवडीने खात असे. जे बनवलेले असेल ते. पण कारले हा एकमेव अपवाद होता. बाकी काहीही चालते पण कारले लोक कसे खात असतील? अशी त्या वेळेला भूमिका होती. मग एकदा पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा नव्याने खाल्ली. अरे, खाणे शक्य आहे बरं का. आणि हा कडूपणा औषधाच्या गोळी सारखा नसून त्याला एक ताजेपणाचा गंध आहे असे वाटले. मग टेस्ट डेव्हलप झाली आणि मोठेपणी सर्वाधिक आवडीच्या भाज्यांपैकी झाली.

फणस ही आणखी एक. मेथीची गोळा भाजी ..

अंबाडी देखील.

अंबाडीची थोडी घट्टसर भाजी, भरपूर लसूण आणि लाल मिरचीच्या फोडणीवर, आणि वरून घ्यायला पुन्हा लसणाची फोडणी.. सोबत बाजरी भाकरी गरम गरम, कांदा.

पु लंनी म्हटले आहे की अंबाडीची भाजी भाकरी खाताना यमदूत जरी आला तरी तो आपला "खाणाऱ्या"वरचा हात "खाण्या"वर नेईल..

असो आवरतो अवांतर..

गवि's picture

5 Jul 2024 - 4:39 pm | गवि

ता क

इथे कारल्याची भाजीही अजिबात न आवडणारे काही सदस्य (सुमारे एक) आहेत.

काय सांगता कौन है वो?
;)

खरच ,अंबाडीची डाळ घातलेली भाजी माझा जीव की प्राण 😍
पु.ल.काही खोटं नाही बोलले!!

Bhakti's picture

5 Jul 2024 - 5:53 pm | Bhakti

परत भक्तीघाई ;)
अंबाडी बरोबर चुका मस्ट, नाहीतर नाही😀

पण फोटो जरा दुरून आणि पूर्ण ताटाच्या सोबत काढला तर बरे होईल.
उशीर झाला होता खुप भूक लागली होती नेहमीप्रमाणे भक्तीघाईत फोटो घेतला 🤣
डबघाईनुसार भक्तीघाई शब्द उमजून घ्यावा🤣

कारल्याची भाजी अजिबात आवडत नसल्याने आपला पास.
बाकी फोटो अधिक चांगला हवा होता,

:-D

मिळाले का उत्तर भक्तीताई?

गरूड पुराणात कार्ल्याची भाजी आवडत नसेल तर खूप मोठी शिक्षा आहे हो प्रचेतस 😄

कर्नलतपस्वी's picture

5 Jul 2024 - 9:27 pm | कर्नलतपस्वी

कार्लीच उगवतात.

कारले खाण्याच्या शिक्षेपेक्षा गरुडपुराणातल्या शिक्षेला सामोरे जाणे सोपे :)

कार्ले आवडत नाही तर कार्ले लेण्यांना प्रवेश मिळत नाही....असं पुराणात सांगितले आहे ;)

प्रचेतस's picture

7 Jul 2024 - 6:47 am | प्रचेतस

कारले महापुराणात का?
बाकी ते हॉट चिप्समध्ये मिळणारे कारल्याचे चिप्स मात्र आवडतात.

हॉट चिप्समध्ये मिळणारे कारल्याचे चिप्स मात्र आवडतात.

मग ठीक आहे, कार्ले चीप्स खात खात मिळेल तुम्हाला कार्ले लेण्यांना प्रवेश 😀

कंजूस's picture

6 Jul 2024 - 3:46 pm | कंजूस

प्राध्यापक का?

प्रसाद गोडबोले's picture

7 Jul 2024 - 9:12 am | प्रसाद गोडबोले

कारल्याची भाजी अजिबात आवडत नसल्याने आपला पास.

+1

म्हणूनच वल्ली सर आणि आमची मैत्री आहे.

कारले , शेपू , आंबडी , आंबट चुका... हर हर... ह्या भाज्या खाणे म्हणजे अघोरी तपस्यापेक्षा कमी नाही .
त्यापेक्षा मी उपवास करणे पसंत करेन.

आणि आईने त्यात चाकवत आणि पोरांनी पालक-पनीर हे आवडत असल्याने इतके वेळा करून अक्षरशः वीट आणला आहे. ह्या दोन भाज्या अजून त्या लिस्ट मध्ये add करा.
=))))

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

6 Jul 2024 - 6:07 am | हणमंतअण्णा शंकर...

मलाही प्रचंड आवडते.

कारल्यांच्या चकत्या करायची आमची आळशी पद्धत म्हणजे : चकत्या करुन त्या पार्चमेंट वर पसरून हलके तेल लावून घेतो सगळ्यांना आणि ओव्हन मध्ये भाजून घेतो.

त्याचबरोबर शेंगदाणे,काजू,बदाम,खोबरे काप भाजून तिखट मीठ लिंबू मिक्स करून चिवडा (चकणा ;)) बनवायचा.

नगरी's picture

6 Jul 2024 - 11:10 pm | नगरी

काजू बदाम राहीलेच!

नगरी's picture

6 Jul 2024 - 11:13 pm | नगरी

चकणा जरूर करणार,तसा काही वाईट वाटत नाही

नगरी's picture

6 Jul 2024 - 11:19 pm | नगरी

बाकी त्या दुर्दैवी कारल्याची एवढी वाट कोणी लावली नसेल

उलट बोलला,कार्ले न खाणारे दुर्दैवी,कार्ल्याला काही फरक पडत नाही!

कारले आवडत नसले तरी आमच्याकडे आई किसलेले सुके खोबरे, तीळ आणि कारल्याच्या फोडी परतून जी सुकी भाजी करते तेवढीच फक्त आवडीने खातो! कारल्याची ओली भाजी मात्र मला अजिबात खाववत नाही 😀

बिपीन सुरेश सांगळे's picture

9 Jul 2024 - 7:33 am | बिपीन सुरेश सांगळे

छान पाककृती आणि भन्नाट प्रतिसाद !