आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.
(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी
वरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत हे सर्व कळत्या जाणत्या सुज्ञ लोकांना व्यवस्थित लक्षात येईल !
बस्स, आता प्रश्न इतकाच आहे की - तुमची निष्ठा कोठे ?
प्रतिक्रिया
25 Jun 2024 - 11:18 pm | प्रसाद गोडबोले
जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी.
__/\__
26 Jun 2024 - 6:03 am | चौकस२१२
जय फ्लॅस्टिन याचा काह्ही संबंध नाही शपथ घेताना , ओवेसी सारखया हुशार माणसाला हि दुर्बुद्धी कुठून झाली कोण जाणे
हे सर्व जागतिक टूलकित चा भाग
मी नुकतेच एका ऑस्टल्यातील मुस्लिम आमदाराने पक्षयाच्या विरुद्ध भूमिका घेतली आणि संसदेत फ्लॅस्टिन च्या बाजूने मतदान केले या संबंधी मिपावर लिहिले होते
26 Jun 2024 - 8:40 am | मुक्त विहारि
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, हिंदू राष्ट्रातील किल्यांचे दरवाजे नेहमीच आतून उघडल्या गेले आहेत.
26 Jun 2024 - 9:35 am | धर्मराजमुटके
वरील चारीही शपथा वाचल्या.
माझी निरिक्षणे खालील प्रमाणे.
१. ओवेसी -पुर्णपणे चुकीच्या पद्धतीने घेतलेली शपथ. पहिले जातीला महत्व, नंतर राज्याला त्यानंतर परक्या देशाच्या नावे शपथ. सगळ्यात कडी म्हणजे जो धर्म मुस्लीमांसाठी प्रथम क्रमांकावर असतो त्याच्या नावाचा जयजयकार सगळ्यात शेवटी. बहोत बडी गलती.
२. राहूल गांधी - जय हिंद १००% बरोबर. जय संविधान शब्द उच्चारणे म्हणजे द्विरुक्ती. मुळात संविधानामुळेच तुम्ही शपथ घेत आहात मात्र घोषणा चुकीची वाटत नाही.
३. छत्रपालसिंग गंगवार - "जय हिंदुराष्ट्र" चुकीचे. अजून भारत हिंदुराष्ट्र घोषीत झालेले नाही. (ते होणार पण नाही). "जय भारत" बरोबर कारण संविधानात बरेच ठिकाणी भारत शब्द वापरलेला आहे.
४. निलेश लंके : "जय हिंद. जय महाराष्ट्र" पर्यंत बरोबर. रामकृष्ण हरी शेवटी उच्चारणे चुकीचे.
रामकृष्ण हरी शेवटी म्हणजे ते देशापेक्षा कमी महत्वाचे. आपला धर्म घरापर्यंत मर्यादित असावा अशी पुरोगामी विचारसरणी असणार्या पक्षाच्या नेत्यांनी देवाच्या नावे सभागृहात जयजयकार करावा हे मनाला पटत नाही. (तसा तो कोणीच करु नये. सभागृहात देवांच्या नावाचा जयजयकार करण्याचे काही काम नाही. तिथे ऑफीस गाईड्लाईनप्रमाणे काम करावे. धर्माचा, देवाचा जयजयकार करायला इतर ठिकाणे आहेतच. हे सगळ्या पक्षांना लागू होते.)
मात्र घोषणा देताना माणूस पोलीटीकली करेक्ट असण्यापेक्षा भावनेला जास्त महत्त्व देतो. शेवटी माणूस म्हटल्यावर थोड्याफार चुका होणारच त्यामुळे त्यांना उदार मनाने माफ करावे. मात्र ओवेसींना व्यवस्थित समजावून सांगीतले पाहीजे. त्यांच्या पुर्ण क्रमच चुकला आहे.
26 Jun 2024 - 11:04 am | कांदा लिंबू
जय हिंद. जय महाराष्ट्र. राम कृष्ण हरी
26 Jun 2024 - 11:41 am | गवि
संसदीय शपथ घेताना कोणत्याही इतर देशाचा जयजयकार कशाला? भले तो कोणताही देश का असेना. अधिकृत हिंदुराष्ट्र किंवा अन्य कोणत्या धर्माचे, निधर्मी असे कोणतेही राष्ट्र यांचा उल्लेख या विशिष्ट प्रसंगी केला जाणे हे आश्चर्यच आहे.
भारतातील अंतर्गत काही भाग किंवा श्रद्धास्थाने यांचा उल्लेख एकवेळ समजून घेता येईल (आदर्श नव्हेच तेही). पण इतर कोणते राष्ट्र ? आणि त्या घोषणेत आपल्या देशाचा "जय" मात्र नाही? योग्य वाटत नाही.
26 Jun 2024 - 4:24 pm | चौकस२१२
हा रोग काही नवीन नाही ,,,, महान राष्ट्रपित्याने ने नाही का त्या दूरचच्या खिलाफत चळ वळीला पाठिंबा दिला होता
26 Jun 2024 - 5:43 pm | प्रचेतस
खिलाफतीला पाठिंबा देणे चुकीचेच होते पण यात लोकमान्य टिळक, सरदार पटेल हेदेखील सहभागी होते हे सोयीस्कररित्या विसरले जाते.
26 Jun 2024 - 6:01 pm | पॅट्रीक जेड
+१
लखनौ करार हा मुस्लिम लांगूलचालनाचा पहिला प्रयत्न होता.
26 Jun 2024 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले
वल्लीसर,
लखनौ करार १९१६ मध्ये झालेला ना ! अहो १०० पेक्षा जास्त उलटुन गेली त्याला. भूतकाळ सोडुन द्या. आजचं बोला - तुम्ही कोणत्या बाजुला उभे राहणार ?
जय आर्यावर्त , जय चिंचवड !
26 Jun 2024 - 8:27 pm | प्रचेतस
आमची आपली पिंपरी चिंचवडची अस्मिता.
26 Jun 2024 - 8:29 pm | पॅट्रीक जेड
कुठे राहते? :)
26 Jun 2024 - 3:09 pm | चौथा कोनाडा
जय हिंद. जय भारत, जय महाराष्ट्र,
26 Jun 2024 - 3:39 pm | पॅट्रीक जेड
मी यादकदाचित खासदार झालो तर तामिळमध्ये शपथ घेईन.
26 Jun 2024 - 4:22 pm | चौकस२१२
पॅट्रीक जेड प्रश्न कोणत्या भाषेत शपथ घेणार या बद्दल नाहीये तर काय शपथेनंतर बोलले त्या बद्दल आहे
26 Jun 2024 - 4:23 pm | पॅट्रीक जेड
लंकेनी इंग्रजीत शपथ घेऊन कृतीतून उत्तर दिलं.
26 Jun 2024 - 6:16 pm | Bhakti
काय पण कौतुक केले आहे... esta..blist.. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मराठीला दुय्यम आणि नगरचा विचका?
26 Jun 2024 - 4:38 pm | चौकस२१२
भाजप समर्थक असूनही आज मी खालील गुण देत आहे
राहूल गांधी काँग्रेस = ८/१० ( १ कमी कारण संविधान वैगरे यात आणायची स्टंटबाजी जरुरी नवहती , १ कमी कारण जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा )
निलेश लंके राष्ठ्रवादी = ६/१० ( १ कमी जय हिंद बोलले ( हिंद = हिंदू नको रे बाबा ... त्यापेक्षा जय भारत म्हणने जास्त योग्य - हा आप ण तर घाबरतो बुवा अल्पसंख्याकांच्या भावनांना , एकवेळ पाकिस्तानी नागरिक भारताला हिंदुस्थान म्हणेल पण आपण नाही बुवा , ४ कमी कारण हिंदू धर्मातील देवतांचा उल्लेख , अरे बारामतीचं राष्ट्रवादी चे ना तुम्ही , हिंदू धर्माच काय संबंध तुमचा , काका रागावतील )
छत्रपालसिंग गंगवार भाजप = ५/१० , ५ घालवले कारण हिंदू राष्टाची जरुरी नाही , समान नागरी कायदा जास्त महत्वाचा, ( हिंदूंना मान आणि संरक्षण देणारा भारत व्हावा म्हणत असाल तर बरोबर )
ओवेसी = मीम ०.३/१० , कारण सगळंच चुकला आणि त्या भीम आणि मीम याची सांगड तर अजिबात घालू नका .. ०.३ एवढ्याच साठी कि तुम्ही निवडून आलात
27 Jun 2024 - 4:32 pm | स्वधर्म
>> वरपक्षी हे सर्व लोकं वेगवेगळ्या विचारधारांचे नेतृत्व करतात असं दिसत असलं तरीही मुळात इथे दोनच विचारधारा आहेत
फक्त दोनच म्हणत असाल तर कोणत्या दोन म्हणायच्या?
27 Jun 2024 - 6:24 pm | किसन शिंदे
उजवी आणि डावी !! ;)
27 Jun 2024 - 6:35 pm | प्रसाद गोडबोले
अरे चक्क किसनदेव मिपावर !
दोन दिवसांपूर्वी गणामास्तर सुध्धा कमेंट टाकून गेलाय एक...
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?
27 Jun 2024 - 8:21 pm | कांदा लिंबू
27 Jun 2024 - 11:52 pm | पॅट्रीक जेड
मिपावर मनमोकळे, एकांगी संपादन विरहित, खेळकर अन् मजेशीर मस्तीखोर वातावरण परत येणार की काय !?
टॉक्सिक अंधभक्त, विश्वगुरूप्रेमी, परम्यात्म्याचा स्वयंघोषित अवतार मानणारे, नकली डिग्रिवाला समर्थक, तडीपार समर्थक, पेट्रोल २०० झाले तरी त्या मत देऊ म्हणणारे, ढोंगी हिंदुत्ववादी, मनुवादी, विकास विरोधक, लोक हे होऊ देणार नाहीत.28 Jun 2024 - 10:35 am | प्रसाद गोडबोले
चोराच्या उलट्या बोंबा =))))
पॅ.जे, तुमचा किंव्वा तुमच्या अगणित डुप्लिकेट आयडींचा मिपावर जन्म व्हायचा कैक वर्ष आधी पासुन इथे मस्त ग्रुप्स होते. मी , वप्या , गणामास्तर , वल्ली , गावडे सर, किसनदेव, अन्या दातृ, किड, पन्नास , बॅटमॅन आणि अजुन कित्येक जण असा एक मोठ्ठा ग्रुप होता जे आम्ही इथे मजेशीर गप्पा मारायचो लेखन करायचो.
अनेकदा मिपा कट्टे व्हायचे . त्यात लोकं चक्क फॅमिली सोबत यायचे, मिक्स व्हायचे . मिपाकरांचा मोठ्ठ्या समुहासह घारापुरी ला केलेला कट्टा आजही माझ्या स्मरणात आहे !
ह्यातील बहुसंख्य , रादर मी वगळता सर्वच लोकं मध्यम अर्थात लेफ्ट सेंटर विचारसरणीचे होते , आजही आहेत. पण आमच्या कधी टोकाचे वादविवाद झाले नाहीत.
हे मिपावर वातावरण गढुळ करायची सुरुवात २०१४ नंतर , मोदी निवडुन आल्यानंतर तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांनी सुरु केली आहे. घाऊक भाजप द्वेष , हिंदु द्वेष , ब्राह्मण द्वेष करत करत पुढे हे गट क्रमांक २ चे लोकं ३७० ला विरोध , राम मंदिरला विरोध , सर्जिकल स्ट्राईक वर शंका घेणे , राष्ट्रचिन्हावर संदेह घेणे , एवढेच काच तर भारत ह्या शब्दावर आक्षेप घेणे असे करत करत भारत द्वेषापर्यंत जाऊन पोहचलात. !
तुम्ही आणि तुमचे १७६० डुप्लिकेट आयडी. त्यातुन तुम्हाला प्रोफेसरांसारख्या आर्मचेअर अॅक्टिव्हिस्टांचा सपोर्ट. आणि जगात सर्वत्र जे होते तेच इथेही सुरु झाले की उजव्या विचारसरणीचे सेन्सॉरिंग. एकांगी संपादन.
आणि मग मिपावरील बहुतांश मध्यममार्गी मंडळी वाचनमात्र मोड मध्ये गेली. कुठं चिखलात दगंड फेकत बसा अन वरुन प्रतिसाद अन कष्टानं केलेल लेखन संपादित करुन घेत बसा. सोडा. आमचं आपलं आम्ही व्हॉत्सॅप्प वरुन संपर्कात राहु.
तुम्ही फक्त एक करा - गट क्र. १ च्या लेखनावर प्रतिसाद देणे बंद करा , राजकीय गरळ ओकणे बंद करा , आम्हीही तुमच्या लेखनावर अवाक्षर उच्चारणार नाही, प्रतिसादांवर प्रत्युत्तर देणार नाही. आपोआप काही दिवसात हे तुम्ही गढुळ केलेलं वातावरण नितळ होईल अन पुर्वीसारखं खेळीमेळीचे वातावरण येईल !
असो. पण तुम्हाला हे जमेल असं दिसत नाही. किमान २०२९च्या निवडणुकांपर्यंत तरी शक्यता नाही. पण प्रयत्न तरी करुन पहा. ह्या इथुनच सुरुवात करा, आता ह्या इथे तुम्ही काय प्रत्युत्तर देता त्यावरुनच अंदाज येऊन जाईल आपल्याला .
:)
28 Jun 2024 - 11:33 am | कांदा लिंबू
शतश: सहमत.
28 Jun 2024 - 3:47 pm | पॅट्रीक जेड
म्हणजे २०१४ साली गोडबोले साहेब अंधभक्त झाले नी मीपाचे वातावरण गडूल झाले.
मिपावर मोदीविरोधी पोस्ट टाकली की काही अंधभक्त खवळतात. त्यावरून एक गानं आठवलं.
“गडुलाच पाणी कशाला ढवळील……” खो खो.
28 Jun 2024 - 8:58 pm | प्रसाद गोडबोले
२
:) :)
29 Jun 2024 - 5:28 pm | योगेश लक्ष्मण बोरोले
सहमत.
29 Jun 2024 - 6:10 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी....
3 Jul 2024 - 9:23 am | कॉमी
द्वेष वैगेरे तुमच्या तोंडात?
एका बाजूला थेट हिटलर सारखे बोलायचे. मग तसेच कोणी तुमच्या जातीवर बोलले कि एकदम गुळमुळीत SJW होऊन द्वेष्याच्या गप्पा मारायच्या.
3 Jul 2024 - 12:50 pm | नठ्यारा
कॉमी,
हिटलर प्रमाणे प्रसाद गोडबोले देखील झायोनिस्टांचे एजंट आहेत, असं तुम्हांस सूचित करायचं आहे का? ;-)
-नाठाळ नठ्या
3 Jul 2024 - 2:31 pm | प्रसाद गोडबोले
थेट हिटलरसारखे =))))
एक तरी उदाहरण द्या मी कोठेही हिंसेला प्रोत्साहन दिल्याचे किंवा कोणत्याही समूहाचा वंशाचे उच्छेद करण्याचे बोलल्या चे !
उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला .
चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच.
मी मिलेनियाल आहे , ब्राह्मणांची घरे १९४८ मध्ये जाळली होती तुमच्या विचारसरणीच्या लोकांनी. तेव्हा मी काय , आमच्या पिताश्रींचा देखील जन्म झालं नव्हतं. तेव्हा पासून तुम्ही लोक द्वेषाचे पीक घेताय. किंबहुना त्या आधीही सुरूवात झाली होती. आजही ३ मिनिटात महाराष्ट्रातील ब्राह्मण संपवून टाकू असे म्हणणारे लोक तुमच्याच बाजूला उभे आहेत.
आणि ह्याचे मूल तत्त्वज्ञान कोणाकडून आलेले आहे हे काय आम्हाला ठाउक नाही का ! महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केले आहे ! कोणाला गंडवता आहात !
आणि आम्हाला कधीही सोशल जस्टिस वॉरियर्स होण्यात रस नव्हता , आजही नाही. १९४८ सालि वाडा जाळला गेल्यानंतर आजोबा शहराकडे निघून आले , तेव्हाच आमचा संबंध संपला जस्टिस अन् फस्तिस सोबतचा.
बाकी भारत माता की जय, वंदे मातरम्, जय श्रीराम हे नुसतं म्हणलं की कोणाचं रक्त खवळते हे सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे द्वेषाचा अखंड झरा कोठून वाहतोय हे सगळ्यांना ठाऊक आहे .
=))))
3 Jul 2024 - 2:44 pm | प्रसाद गोडबोले
आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आमची त्यालाही हरकत नाही. चालू द्या तुमची द्वेषाची शेती.
फक्त एक प्रयोग करा - कशाला आमच्या १ नंबरी लेखनावर येऊन प्रतिसाद देता, स्वतचं वेळ वाया घालवता ?
फक्त तुम्ही, तुमचे जे काही १७६० दुप्लिकेत आय.डी. आहेत त्यांनी, किंवा तुमचे आधारस्तंभ आर्मचेर अक्तिव्हिस्त लोकांनी आमच्या लेखनावर प्रतिसाद द्यायचे बंद केले, तर आपोआप २०१४ पूर्वी होते तसे खेळीमेळीचे वातावरण मिपावर परत येईल.
प्रयत्न तर करून पहा. बघा जमतंय का !
जय भारत.
जय श्रीराम.
3 Jul 2024 - 10:13 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...