नीट-नेट परीक्षा घोटाळा

उग्रसेन's picture
उग्रसेन in काथ्याकूट
24 Jun 2024 - 9:03 am
गाभा: 

वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित अनियमितता आणि यूजीसी नेट परीक्षेतील गैरव्यवहाराचे मोठे मुद्दे देशभर गाजत आहेत. '' जेंव्हा ते परीक्षा पे चर्चा करायचे, सारा देश गप्प असायचा, आता सारा देश परीक्षा पे चर्चा करतोय तेंव्हा ते गप्प आहेत' अशी परिस्थिती आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

सीबीआयने 'नीट' मधील गैरप्रकारांचा तपास हाती घेतला असून, या प्रकरणात फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले.

बिहारमध्ये १७ विद्यार्थ्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, बिहारच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने (ईओयू) आणखी पाच जणांना अटक केली असून, बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. तसेच, गुजरातने तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.

पात्रता चाचणी परीक्षा आणि परीक्षा पद्धती यावरील विश्वास परीक्षा पद्धतीने आणि सरकारने घालवला आहे, सरकार म्हणून सरकारचं मौन दुःखदायक आहे.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Jun 2024 - 9:50 am | प्रचेतस

सरकार म्हणून सरकारचं मौन दुःखदायक आहे.

सरकारने कारवाई सुरु केल्याचे तर तुमच्याच लेखातून दिसत आह.

>>>सीबीआयने 'नीट' मधील गैरप्रकारांचा तपास हाती घेतला असून, या प्रकरणात फिर्याद नोंदवून घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस स्थानकांमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, असेही सीबीआयकडून सांगण्यात आले.
>>>बिहारमध्ये १७ विद्यार्थ्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. तसेच, बिहारच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने (ईओयू) आणखी पाच जणांना अटक केली असून, बिहारमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या १८ झाली आहे. तसेच, गुजरातने तपास सीबीआयकडे सुपूर्द केला आहे.

उग्रसेन's picture

24 Jun 2024 - 10:48 am | उग्रसेन

देशभरातील विद्यार्थी व पालक एनटीएच्या विरोधात निदर्शने केली. दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठासार‘या मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील एनएसयूआय, एआयएसए, एसएफआय आणि अभाविपसार‘या विद्यार्थी संघटनांनीही या विरोधात आवाज उठवला. पालक विद्यार्थी कोड़तात गेले.मंत्री धर्मेन्द्र यांच्या समोर निदर्शने केली, तव्हां कुठं सरकारला जाग आली. नाय तर, सरकार डोल्यावर झापड़ लावून बसलं होतं.

पॅट्रीक जेड's picture

24 Jun 2024 - 8:04 pm | पॅट्रीक जेड

तव्हां कुठं सरकारला जाग आली. नाय तर, सरकार डोल्यावर झापड़ लावून बसलं होतं. त्या साठी सुशिक्षित लोक सत्तेवर लागतात. सत्तेतील लोकांचा नी परीक्षेचा कधी संबंधच आला नाही. डिग्ऱ्या मिळवल्या नी त्या लपवण्यासाठी कोर्टात जातात. आणखी काय अपेक्षित आहे?

पालक विद्यार्थी कोड़तात गेले? म्हणजे कुठे गेले?

नचिकेत जवखेडकर's picture

26 Jun 2024 - 1:12 pm | नचिकेत जवखेडकर

कोर्टात म्हणायचंय बहुतेक त्यांना

धर्मराजमुटके's picture

26 Jun 2024 - 2:59 pm | धर्मराजमुटके

होय तेच म्हणायचयं. जुन्या कोकणस्थ लेखकांची पुस्तके वाचली असती भक्तीताईंनी तर त्यांना त्याचा अर्थ पटकन समजला असता. कोकणी माणसाचा एक पाय बाहेर आणि एक पाय कोर्टात असतो असे म्हणतात.

उग्रसेन's picture

24 Jun 2024 - 10:48 am | उग्रसेन

देशभरातील विद्यार्थी व पालक एनटीएच्या विरोधात निदर्शने केली. दिल्ली विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठासार‘या मोठ्या शैक्षणिक संस्थांमधील एनएसयूआय, एआयएसए, एसएफआय आणि अभाविपसार‘या विद्यार्थी संघटनांनीही या विरोधात आवाज उठवला. पालक विद्यार्थी कोड़तात गेले.मंत्री धर्मेन्द्र यांच्या समोर निदर्शने केली, तव्हां कुठं सरकारला जाग आली. नाय तर, सरकार डोल्यावर झापड़ लावून बसलं होतं.

सर टोबी's picture

24 Jun 2024 - 11:07 am | सर टोबी

कौतुक आहेच. राफेल घोटाळा, उज्वला योजना, पीएम आवास योजना, हर घर शुद्ध जल योजनांचा रिअलिटी चेक, रस्ते बांधण्याचा दुपटीने वाढलेला खर्च, पुलवामा हल्ल्याचे गूढ, बालाकोट हल्ल्याचं यश, भारत चीन सीमेवरील परिस्थिती, निवडणूक रोखे ही सर्व पापं उघडकीस येतील तो सुदीन.

चौकस२१२'s picture

24 Jun 2024 - 2:45 pm | चौकस२१२

पुलवामा हल्ल्याचे गूढ,
काय नक्की म्हणणे आहे ?
सरळ करा आरोप असेल पुरावा तर

सर टोबी's picture

24 Jun 2024 - 4:08 pm | सर टोबी

प्रत्यक्षात जितका वाईट अर्थ काढता येईल तेवढा काढायचा.

कांदा लिंबू's picture

24 Jun 2024 - 11:21 am | कांदा लिंबू

राफेल घोटाळा

केंव्हा? कुठे? पुरावे?

बाकीच्या मुद्द्यांचं नंतर बघू.

CBI!? पिंजऱ्यातला पोपट. तो पेरू खाऊन मिठू मिठू बोलणार. पुरावा कुणी शोधायचा? उग्रसेन, सर टोबी ह्यांनी?

चौथा कोनाडा's picture

24 Jun 2024 - 5:11 pm | चौथा कोनाडा

लेखाचा मथळा लै आवडला.

नीट-नेट परीक्षा घोटाळा .. का न विचारता का घालुन पुढं म्हणतो :
नीट-नेट-का परीक्षा घोटाळा

शानबा५१२'s picture

24 Jun 2024 - 9:01 pm | शानबा५१२

पण ह्या सर्वात ज्यांनी खुप मेहनत करुन आभ्यास केलेला त्यांना कसे वाटत असेल?

सरळ आयुर्वेदाला प्रोत्साहन द्या. त्या परीक्षेत होईल असे?

प्रवेश परीक्षेतील (नीट) कथित अनियमितता

भ्रष्टाचार करणारे कोणत्याही परीक्षेत करू शकतात. ज्यांच्याकडे राखायला दिलं आहे तेच खाऊ लागले तर काय करणार?

पॅट्रीक जेड's picture

26 Jun 2024 - 5:16 pm | पॅट्रीक जेड

ह्या साथी शिक्षित लोक सत्तेत हवेत. परीक्षेचे महत्त्व त्यांना माहित असते.

सुबोध खरे's picture

12 Jul 2024 - 10:51 pm | सुबोध खरे

८०% खासदार पदवीधर असून त्यातील २५% द्विपदवीधर असून ४ % खासदार पी एच डी आहेत .

यात ४% खासदार डॉक्टर आहेत आणि ४% खासदार कायद्याचे पदवीधर आहेत

कीबोर्ड हातात आला कि तो बडवण्यापूर्वी थोडी फार माहिती तरी करून घ्यावी.

१९९६ पासून किमान ७५% खासदार हे पदवी धर आहेत

सुबोध खरे's picture

12 Jul 2024 - 10:57 pm | सुबोध खरे

कोणताही धागा असला तरी त्यात मोदी सरकारवर गरळ ओकून कोणत्याही धाग्याचा चुथडा करण्याच्या काही लोकांच्या वृत्तीमुळे मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते आहे.

मिपा च्या मालकांना याबद्दल काही करायचे नसले तर ही स्थिती फार लवकर येईल असे उद्वेगाने म्हणावे लागते आहे.

मुक्त विहारि's picture

12 Jul 2024 - 11:17 pm | मुक्त विहारि

सहमत आहे...

कोणताही धागा असला तरी त्यात मोदी सरकारवर गरळ ओकून कोणत्याही धाग्याचा चुथडा करण्याच्या काही लोकांच्या वृत्तीमुळे मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते आहे.

पूर्णपणे सहमत. पूर्वीचे मिपा आता राहिले नाही, पूर्वीचे अनेकानेक उत्तमोत्तम लेखक, प्रतिसादक मिपावरून अंतर्धान पावलेले आहेत, जे उरले आहेत त्यांंचा मिपावर काही चांगले लिहायचा उत्साह झपाट्याने ओसरतो आहे, या सगळ्याला हे गरळओकू प्रतिसादक जबाबदार आहेत.
मिपामालकांनी यावर आवश्यक उपाय तातडीने करावेत.

Bhakti's picture

13 Jul 2024 - 6:11 am | Bhakti

सहमत!
बरेच गोष्टींना दुर्लक्ष केल्याने जरा इतर वाचता येतय इथे पण समोरच्याची जाणीव कितपत ठेवावी जर समोरचा त्याच वर्तुळात फिरत असेल.मी तर म्हणते सरकार हा शब्दच बैन करा काही वर्षे मिपावर, झालं सगळं झालं निवडणूक,निकाल वगैरे आता काय पाच वर्षांनीच सरकार शब्द allow करा.लई बोरं होतं.खफवर तर जावच नाही आता..

कुणी काही सरकारचे शष्प वाकडे करू शकत नाही . मग ते कुणाचेही सरकार असो.

लेखक तर कमी झालेच आहेत पण प्रतिसादक पण मोजकेच दिसतात.

बाकी मिपा वेगाने काळ्या विवराकडे झेप घेत आहे असे मला सुद्धा वाटते.

@डाॅ खरे,चित्रगुप्त आणी मुवी यांच्या बरोबर सहमत.

मिसळपाव आपल्या नष्टचर्याकडे वेगाने वाटचाल करत आहे असे अत्यंत खेदाने म्हणावे लागते आहे.

सहमत आहे!

दुर्दैवाने खरे आहे, पण टाळी एका हाताने वाजत नाही. ह्या ऱ्हासाला मुवि सारखे प्रतिसादकार पण तेवढेच जवाबदार आहेत

मुक्त विहारि's picture

13 Jul 2024 - 1:20 pm | मुक्त विहारि

माझे कुठले प्रतिसाद, तुम्हाला झोंबले? हे पण सांगितलेत तर उत्तम...

खरं तर मी, वैयक्तिक पातळीवर उतरत नाही, पण तुम्ही माझे नाव घेतलेत, म्हणुन लिहीले.