सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in मिपा कलादालन
13 Jun 2024 - 7:59 am

तीनचार दिवसांपूर्वी एका नवीनच गोष्टीचा शोध लागला, आणि मग त्या उद्योगाला लागलो. त्यातून जन्मलेल्या काही रमलप्रतिमा इथे देतो आहे.

.
चित्र १.

.
चित्र २.

.
चित्र ३.

.
चित्र ४.

.
चित्र ५.

.
चित्र ६.

.
चित्र ७.

.
चित्र ८.

.
चित्र ९.

.
चित्र १०

.
चित्र ११.

.
चित्र १२.

.
चित्र १३.

.
चित्र १४.

.
चित्र १५.

.
चित्र १६.

.
चित्र १७.

.
चित्र १८.

.
चित्र १९.

.
चित्र २०

.
चित्र २१.

.
चित्र २२.

.
चित्र २३.

.
चित्र २४.

.
चित्र २५.

.
चित्र २६

.
चित्र २७.

.
चित्र २८.

कसा वाटला आमचा हा नवा उद्योग ? आवडला असेल तर आणखी वेगवेगळी चित्रे वेळोवेळी देत राहीन.

प्रतिक्रिया

सततोद्योगी चित्रगुप्त हो,
या चित्रमालेत रमायला झाले...
आता मिपाकरांनी या चित्रकथीवर आधारित कथाकारी करावी. झकास चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक मसाला आहे.
चि क्र ९, १९ आणि २३ मधील ललना कथेचा कॅनव्हास जागतिक स्तरावरून अवकाशात नेतात.
चि क्र ३,१२,२४ मधे सिंदबाद जहाजातून सागर सफर करताना २५ मधील बेटावर पोचला आहे असे भासवतो.
कल्पना आणि सत्य याची सुरेख गल्लत भावी पिढीला कशी गोंधळात टाकेल याची चाहूल लेखकाने खुबीने दाखवली आहे.
मस्त सादरीकरण.

निनाद's picture

13 Jun 2024 - 9:18 am | निनाद

एक चित्र काढाल?

श्रावस्तीचे सुहेलदेव या हिंदू राजाने केलेला सैयद सालार मसूद गाझीचा पराभव संपूर्ण - पराभवाचा निर्णायक क्षण आणि सैयद सालारचे उडवले जाणारे मुंडके. यात वीर राजा सुहेलदेव आणि प्रतापी सैन्य त्यांना आवेश दिसावा.

करता येईल?

निनाद's picture

13 Jun 2024 - 9:28 am | निनाद

२. या घटनेमुळे महमूद ग़ज़नवी ला बसलेला धक्का आणि पराभवामुळे त्याच्या महालात उडालेला हल्ल-कल्लोळ, रडारड, घाबरलेले सरदार आणि लपलेले सैनिक, यावर ही एक चित्र बनू शकेल.

३.
सिवा आ गया!
या आवाजामुळे *डासला बसलेला औरंगजेब घाबरला आणि धडपडला आणि या तारांबळीत त्याचा पायच मोडला. त्यावेळी केवळ मराठे आ गये अफवेने मोगल छावणीत उडालेली दाणादाण. याचे क्षणाचेही चित्र हवे आहे.

ही फजिती नेमकी दिसायला हवी आणि त्यासाठी चित्रकाराची दृष्टी हवी असे वाटते!

अगदी आत्ताच हा उद्योग शिकायला सुरूवात केलेली असल्याने त्यातल्या शक्यता - मर्यादा याविषयी नक्की माहीत नाही, तरी प्रयत्न करून बघेन. मुख्य म्हणजे कृबु ला इंग्रजीतच आदेश द्यावे लागत असल्याने नेमके शब्द वापरले गेले पाहिजेत, आणि त्यासाठी उत्तम, साहित्यिक भाषेत लिहीता आले पाहिजे.
सध्या फुकट क्रुबु वापरतो आहे, त्यात आणि पैसे भरून असलेल्यात काही फरक आहे का वगैरे काहीच ठाऊक नाही.
आणखी प्रयोगातून जसजसे कळत जाईल, त्याप्रमाणे करता येईल.
मिपाकरांनी विविध विषय अवश्य सुचवावेत. अनेक आभार.

नठ्यारा's picture

13 Jun 2024 - 6:51 pm | नठ्यारा

माझं अनुमोदन आहे.
-ना.न.

चित्रगुप्त's picture

13 Jun 2024 - 10:51 pm | चित्रगुप्त

.

.
16th century Mogul army defeated and running away from battle field along with horses, swords, horrified faces of men, very detailed picture depicting a vast scene, clouded sky, sunset, 3d render, illustration, cinematic, dark fantasy

चित्रगुप्त's picture

13 Jun 2024 - 10:46 pm | चित्रगुप्त

जेवढे जास्त तपशील देता येतील ते इंग्रजीत लिहून करून बघा. गूगलने लॉगिन करता येईल.

प्रसाद गोडबोले's picture

13 Jun 2024 - 10:36 am | प्रसाद गोडबोले

वाह , मस्तच !

कोणते सॉफ्टवेयर वापरलेत ? ओपन सोर्स आहे का ? आम्हीही काही प्रयोग करुन पाहतो ;)

Ideogram ची मोफतवाली सोय वापरतो आहे. बघा करून. रोचक आहे.

ए आय चित्राची निर्मिती होण्यात प्रॉम्प्ट सर्वात महत्वाचा. एका चित्रकाराच्या अफाट सृजनशील आणि कल्पनाशक्तीने काठोकाठ भरलेल्या मनातून आलेले प्रॉम्प्ट हे आमच्या सारख्या सामान्य वापरकर्त्यांपेक्षा खूप सखोल असणार. ते वाचणे हा अधिक पूरक अनुभव ठरला असता, जर चित्रे AI वापरून काढली आहेत हे गृहीतक खरे असेल तर. तेव्हा तेही चित्रासोबत जोडल्यास पूर्णत्व येईल.

मला जसे सुचत गेले आणि जमले तसतशी ही चित्रे बनवली. प्रत्येक प्रॉम्टला चार चित्रे येतात, त्यातल्या त्यात जी बरी वाटली ती निवडून इथे दिली आहेत.
एकदा नीट माहिती झाली की पैसे भरून घ्यायचा विचार आहे. कोणते सॉ.वे. सर्वात चांगले आहे, हे ठाऊक असल्यास कळवावे. सध्या आयडियोग्राम वापरतो आहे.

खुप सुंदर!पहिले चित्र जास्त आवडलं.कारण बैकराऊंडवर ती किंचित ब्राईट आणि उठून दिसतेय.

चौथा कोनाडा's picture

13 Jun 2024 - 12:22 pm | चौथा कोनाडा

अद्भुत .. केवळ अद्भुत !

❤️❤️❤️

मिपा क्रांतीकारी तंत्रज्ञानाच्या नव्या टप्प्यावर ! मिपा विशेषांका नंतर चित्रगुप्त साहेबांनी चितारली अद्भुत कृबु रंगचित्रे ! सर्व मिपाकरांची चित्रगुप्त यांची आश्वासक कलाकारी अंत्यत भावल्याच्या प्रतिक्रिया !

हॅट्स ऑफ चिगु सर ! जय हो मिपा !

कंजूस's picture

13 Jun 2024 - 1:16 pm | कंजूस

आवडली चित्रं.

नठ्यारा's picture

13 Jun 2024 - 6:49 pm | नठ्यारा

चित्रगुप्त,

तुमचा प्रयोग आवडला. मला काय दिसलं ते लिहितो.

. त्याचं असंय की पहिल्या चित्रातल्या बालिकेचा चेहरा तिच्या शरीराच्या मानाने जरा मोठा वाटतोय. शरीर इतकं लहान आहे की ती बालिका वाटतेय.

तर दहाव्या चित्रातल्या तरुणीचा चेहरा अतिशय लहान आहे. चिमुकलाच म्हणा ना. उर्वरित अंगास आजीबात शोभून दिसंत नाही. याउलट विसाव्या चित्रातल्या योद्ध्या एकदम प्रमाणबद्ध आहेत. त्यांची अंगं किंचित मोठी वाटताहेत, पण ते प्रशिक्षणामुळे असावं.

शेवटी चोविसाव्या चित्रात नृत्याची लय सुरेख जमलीये. पण बायकांच्या माना अतिशय पातळ आहेत. मात्र त्यांचे खांदे खूप छान रंगवलेत.

हे सगळं जसं दिसलं तसंच लिहिलं आहे. मी चित्रकलेतला तत्ज्ञ नाही. फार काय रसिकही नाही. या निरीक्षणांना काही अर्थ आहे का नाही ते ही माहीत नाही. अगदी गा.गु.च.का. म्हंटलंत तरीही चालेल.

-नाठाळ नठ्या

प्रत्येक चित्राचे चार पर्याय मिळतात, त्या प्रत्येकात काही ना काही उणीव दिसते. त्यापैकी एक चित्र आपण गोड मानून घ्यायचे. फोटोशॉपमधे काही उणीवा दूर करता येतील पण सध्यातरी मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. आपण नुसते काही वर्णन लिहायचे आणि त्यावर चित्र बनून येते, हेच अद्भुत वाटते आहे.
-- सध्या हे साधन मानवाकृतींपेक्षा निसर्गचित्रांसाठी जास्त उपयुक्त आहेसे दिसते. प्राथमिक चित्रे कृबु कडून बनवून घेऊन नंतर त्यात हवे ते बदल करत स्वतः हाताने चित्र रंगवावीत या हेतुने मी हा उद्योग करतो आहे.

नठ्यारा's picture

14 Jun 2024 - 1:01 am | नठ्यारा

प्रक्रिया वर्णन करून सांगितल्याबद्दल आभार.
-ना.न.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2024 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एआयच्या माध्यमांच्या वापर करुन काढलेली चित्रे आवडली. महाराष्ट्र टाइम्सने छापील वृत्तपत्रात एआयच्या माध्यमातून चित्रे काढायला सुरुवात केली आहे. एक पावसाची गोष्टही काल परवा वाचायला मिळाली. एआयचा वापर चांगला केला तर, उत्तम चित्रे काढता येतील.
आपली सर्वच चित्रे आवडली. उत्तमच आली आहेत.

आपण जाणकार चित्रकार आहात. आपला धागा म्हणुन अधिक उत्सुकता. चित्रांमधील 'न्युड फॉर्म' ची चित्र कशी येतील त्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशा चित्रांमधील 'आर्ट' 'रेषा' 'आकार' चित्रकारा-च्या दृष्टीने जे गवसतं तशी काही चित्र एआयच्या माध्यमातून आणि तुमच्या नजरेतून आली तर नक्की टाका.

-दिलीप बिरुटे
(रसिक)

.
झूम करून बघितले तर उजवीकडील स्त्रीचा चेहरा अगदी कसातरीच आहेसे दिसते.

A stunning 3D render illustration of three graceful nymphs, or 'Graces,' dancing around a massive oak tree in a dense forest. The morning sunrise casts a warm, golden glow on the scene, highlighting the nymphs' slender, toned figures and the rich details of the verdant foliage. The backdrop features a mesmerizing view of cascading waterfalls in the distance, with their sparkling waters adding a touch of magic to the atmosphere. This cinematic image captures an ethereal moment of beauty and serenity in the heart of nature., cinematic, 3d render, illustration

माझ्या अल्प अनुभवाप्रमाणे मानवाकृतींची चित्रे कृबु मधे अजूनतरी खूप चांगली येत नाहीत. तरी प्रयत्न करत राहिले की कळेल नेमके कसे करायचे ते. काही कल्पना सुचवा चित्रांसाठी. अनेक आभार.

कर्नलतपस्वी's picture

13 Jun 2024 - 10:02 pm | कर्नलतपस्वी

कुंचले,पेन्सिल, खडू यांच्याबरोबर कधीच नाते जुळले नाही. माझी चित्रकला म्हणजे...

गुरूजींनी सांगितले दहा
मुलांनी लिहीले आठ
गुरूजींनी सांगीतले सहा
आणी गुरुजींचे डोके पहा.

आयडिओग्राम वापरून बघतो.

नवीन माहीती बद्दल धन्यवाद.

पाषाणभेद's picture

15 Jun 2024 - 11:14 am | पाषाणभेद

चित्रगुप्तजी, मी देखील आताच कृबुवर चित्रे काढून पाहिली. वेगळीच मजा आहे. आपला प्रयोगही छान आहे.

Ideogram वरुन सरळ copy image address करुन तुमची चित्रे इथे टाकता येतील.