लोकसभेच्या २०२४ निवडणूकीची धामधूम एकदाची थांबली. निवडणूकपूर्व कल चाचण्या फोल ठरल्या. आता लोकसभेचा निकाल पाहता, कोणत्या एका पक्षाला भारतीय जनतेने बहुमत नाकारले आहे असे दिसते आणि आघाड्यांच्या सरकारांकडे पुनरागमन आणि विरोधी पक्षाला बळ या निवडणूकीने दिले असे आता सर्व संमिश्र निकाल पाहता म्हणायला हरकत नाही.
छायाचित्र जालावरुन साभार
|
लोकसभेच्या निवडणूक निकालाच्या दिवशी सुरवातीच्या निकालपूर्व अंदाजात 'वाराणसी मे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पिछे चल रहे' या बातमीचा तर, कमाल धक्का बसला होता.पंतप्रधान कसे बसे दीड लाखाच्या मतांनी ते विजयी झाले. दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं जनतेचं अभिनंदन करावी अशी गोष्ट वाटली, ज्यात फैजाबाद अयोध्येतील जनतेने आणि राम भक्तांनी 'देव भक्ती वेगळी आणि राजकारण वेगळं' हे दाखवून दिलं आणि अयोध्येत भाजपचा पराभव केला. प्रत्यक्ष रामालाही रामावरून केले जाणारे राजकारण आवडलं नसावं. चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारला अच्छे दिन आलेत त्यांचंही अभिनंदन. लोकसभेत लोकांनी एक वेगळाच निकाल दिला. सर्वाधिक जागा मिळून भाजपा सत्तेत नाही. इतर पक्षाच्या आधाराने सत्ता येत आहे तर, इंडियाने जी देशभर आघाडी घेतली त्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीपेक्षा कमी असूनही त्यांचा उत्साह नक्कीच वाढला आहे, लोकशाहीत जनतेला ग्रहित धरायचं नसतं, हे अत्यंत सुखद आहे.
विविध राज्यातील बहुमतांतील सत्ता उलथवणे, इडी,सीबीआय, आयकर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून धाडी टाकून विरोधकांचा आवाज दाबणे, नेत्यांना तुरुंगात टाकणे. पक्ष फोडणे, पक्ष चोरणा-यांना मदत करणे, भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणे त्याला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र देणे, अशा असंख्य गोष्टी सरकार करीत होते आणि जनता सगळं गप्प राहुन बघत होती. लोकांनी मतदानाच्या माध्यमातून बदल करुन एक प्रतिक्रिया दिली आहे. एक पक्ष आणि एक मालक असावे अशा प्रकारचे सद्य सरकारचे वागणे होते. सर्व 'फोकस' ध्यानधारणेच्या वेळेस जसा होता तसा पक्षीय 'फोकस' 'सरकारी फोकस' सर्व आपल्यावर असावा दुसरा त्यात नसावा अगदी क्यामे-यातही दुसरा कोणी नसावा इतकी मतलबी वृत्ती लोक पाहत होते, आता आघाडी सरकार असल्याने 'हम करे सो कायदा' याला मर्यादा येणार आहेत, मनमानी पद्धतीने वागता येणार नाही.
भारत देशाचे पंतप्रधान म्हणून जे बोलण्याचे, जवाबदारीचे, प्रतिष्ठेचे पदाचे कायम ठेवले पाहिजे. असे ते भान मा. पंतप्रधान यांनी गमावलेले निवडणूकीत दिसले, जे की दुर्दैवी वाटत होते. भारतीय प्रसारमाध्यामधून स्क्रीप्टेड मुलाखती आणि प्रचारादरम्यान केलेली विधाने ही तर, देशाच्या पंतप्रधानांकडून निव्वळ थट्टा होती. गाय, गोबर, हिंदू-मुस्लिम, मंगळसूत्र, अल्पसंख्याक, मासे, मटण, मुजरा आणि सर्वात म्हणजे म.गांधी यांच्यावरील तर विधान अतिशय दु:खदायक असे होते. महाराष्ट्रात सतरा ठिकाणी पंतप्रधानांच्या सभा झाल्या त्यात केवळ तीन ठिकाणी विजय मिळवता आला, यावरून प.मोदींची लोकप्रियता कमी होत चालली आहे असे म्हणायचे की निवडणूक व्यक्तीची निवडणूक नसते तर ती लोकांच्या प्रश्नांची निवडणूक असते असे म्हणता येते. गत, सरकारच्या 'अब की बार चारसो पार' च्या गल्लीबोळातला घोषणांनी जी काय रया जायची ती गेलीच आहे. आता तोही एक एक स्टॅटर्जीचा भाग म्हणायचा तरी, बंगालमधेही अशीच रणनीती अवलंबवली होती, तेव्हा अधिक विजयासाठी अशा प्रसिद्धीची घोषणा आवश्यक असली तरी 'अब की बार चारसो पारचा' आवाज आता म्यूट झाला आहे.
सामान्य जनतेला वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सुरक्षितता हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. कोणताही पक्ष असो वा सरकारे, जगण्या-मरण्याचे प्रश्न कायम सुटत राहिले पाहिजे असे जनतेला वाटत असते. आपण जेव्हा अशा प्रश्नांकडून भावनिक प्रश्नांकडे लोकांना घेऊन जाऊ पाहतो, तेव्हा काही काळ लोक भावनिक होतातही, पण हीच जनता आपली जेव्हा फसवणूक होते आहे, असे वाटते तेव्हा मतदानाच्या माध्यमातून बदल करते हा धडा या निवडणूकीने दिला.
शेतक-यांचे आंदोलन, चौकाचौकात खिळे ठोकून शेतक-यांची केलेली मोर्चाबंदी, केलेला गोळीबार, मणीपुरामध्ये चाललेली जाळपोळ, महिलेची काढलेली नग्न धिंड, करोना काळात अचानक निर्णय घेऊन हजारो-लाखो जनतेच्या मृत्युपंथास घेऊन जाणारे अचंबीत करणारे निर्णय. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषणाचे आरोप, त्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना फरफटत घेऊन जाणे, राजकारणाचा स्वार्थ हेतू ठेवून डोळ्यावर झापडे बांधून घेणे, हे मुख्य माध्यमांतून येत नसले तरी जनतेने पर्यायी माध्यमांचा वापर करून सरकार विरोधी रोष कायम ठेवला, टीका करीत राहिले. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकार मात्र दुर्लक्ष करीत राहिले.
दहा वर्षात ज्या काही योजना सरकारने आणल्या त्या निश्चितच स्पृहणीय असतील त्या जनतेसमोर अधिक सक्षमपणे ताब्यात असलेल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत घेऊन जाता आले असते. तीनशे सत्तर कलम, देशभरातील रस्ते, शेतक-यांसाठीच्या विविध योजना, महिलांसाठीच्या योजना आणि अनेक गोष्टी आहेत पण त्याचा वापर निवडणूकीत करून घेता आला पाहिजे. अग्निवीर सारख्या फसव्या योजना, नवे शैक्षणिक धोरण, जनतेचे आरोग्य, तरुणांच्या नोकर भरतीची बंद झालेली दारे उघडणे अजूनही सरकारला शक्य आहे.
गत निवडणुकीत एकमेकांना शिव्या घालणारे, अजिबातच भरवसा नसणारे पक्षांना घेऊन आता नवे सरकार स्थापन होणार आहे, असे दिसते. मुल्यहीन राजकारण, अजिबातच विश्वास नसणारे राजकर्ते, राजकारणातील नैतिकता, क्षणाचा भरवसा नसणारी मतलबी स्वार्थी माणसं सर्वच पक्षात आहेत तेव्हा अशावेळी हे सरकार नवे आव्हानांना सामोरे जात चालवावे लागणार आहे. बहुमताच्या सत्तेसाठी अजून काही पक्ष फोडाफोडी होते का ते येत्या काळात जनतेसमोर येईलच.
धार्मिक झुली घेऊन मतदारांना भुलवता येईल पण जगण्या-मरण्याच्या प्रश्नांकडे डोळे झाक केली तर, जनता मतदानाच्या माध्यमातून सर्व निकाल लावते हा विविध राज्यांमधील संमिश्र निकाल पाहता म्हणावे वाटते. अठराव्या लोकसभेने भारतीय जनतेने विविध पक्षांना हा दिलेला धडा आहे, येत्या काळात येणारे सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे अधिक डोळसपणाने बघेल त्यासाठी नव्या आघाडी सरकारला शुभेच्छा आणि विरोधी पक्ष जो अधिक दमदार पद्धतीने 'इंडियाच्या' निमित्ताने अधिक मजबूत होत आहे, जनतेच्या प्रश्नासाठी सरकारवर दबाव ठेवतील, उत्तम निर्णय घ्यायला भाग पाडतील. निवडणूकीत जनतेने दिलेल्या धड्यांचा आदर करतील, निर्णय कायम स्मरणात ठेवतील. अठरावी निवडणूक यशस्वी पार पाडल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन. निवडणुकांमधील होणारे घटते मतदान हा चिंतेचा विषय असला तरी, जागरुकपणे मतदानात सहभागी होणा-या जनतेचंही अभिनंदन. लोकशाही जिंदाबाद.
प्रतिक्रिया
6 Jun 2024 - 12:56 pm | आंद्रे वडापाव
बहुतेक, तुमच्या या चांगल्या लेखाला प्रतिसाद येणार नाहीत .
किंवा आलेच तर , उपरोधाने ओतप्रोत असे येतील .. (हे माझे वैयक्तिक मत. )...
जनता डायरेक्त्त पंतप्रधान निवडू शकत नाही , तो चॉईस कधीच नव्हता आणि नाही.
आणि एक पंतप्रधान सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, हे लोकांच्या लक्षात , अजून मोठ्या प्रमाणात यायला हवं , हि अपेक्षा व्यक्त करतो.
6 Jun 2024 - 1:11 pm | अहिरावण
या निमित्ताने प्राडॉ लिहिते झाले, बोळा मोकळा झाला ! सर्वप्रथम प्राडॉचे अभिनंदन.
ब-याच काळानंतर प्राडॉच्या लेखणीमधूण आक्रस्ताळी, एकांगी लेखनाऐवजी बराचसा समतोल लेख आला. अभिनंदन.
बीजेपी प्रमाणे प्राडॉ जमिनीवर आले. अभिनंदन
कॉग्रेसप्रमाणे प्राडॉंना आपली क्षमता, कुवत कळाली. अभिनंदन
शरदपवारांप्रमाणे प्राडॉ वय झाले तरी आब राखून आहेत. अभिनंदन
अजुन कौतुक केले तर प्राडॉ हवेत जातील आणि परत एकांगी प्रतिसाद पाडतील म्हणून अभिनंदन आटोपते घेतो.
अजुन काय !!
6 Jun 2024 - 4:26 pm | अथांग आकाश
चुकिच्या हातांत देशाची सत्ता जाण्यापासुन भारतियांना वाचवणार्या बिहारी आणि तेलुगु जनतेचे मनापासुन अभिनंदन!!
6 Jun 2024 - 1:15 pm | वामन देशमुख
कधी? कुठे?
पुरावे?
अधीक माहितीसाठी संदर्भः
https://www.misalpav.com/comment/1164322#comment-1164322
---
या शितावरुन उरलेल्या भाताची परीक्षा!
---
काही आयडी क्रेडिबल असतात
काही आयडी क्रेडिबल नसतात.
6 Jun 2024 - 1:28 pm | अहिरावण
संपादित. व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन
7 Jun 2024 - 2:24 pm | प्रसाद गोडबोले
अनाकलनीय
अहिरावण ह्यांचा आय.डी. उडवण्यात आलेला आहे.
हे अनाकलनीय आहे.
प्रा.डॉ ह्यांनी माझ्या संपुर्णपणे अराजकीय अशा प्रवासवर्णावर येऊन "माझे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही" अशा अर्थाची संपुर्णपणे वैयक्तिक टिप्पणी केलेली होती. तेव्हा त्यांचा आय.डी का उडवण्यात आला नाही ? त्यांचा केवळ प्रतिसाद संपादित करण्यात आला, तो देखील मी निदर्शनास आणुन दिल्यावर ! कारवाई आधी माझ्या प्रतिसादावर झाली.
शिवाय मी कोणत्याही प्रकारे त्या लेखनात त्यांच्या संबंधी अवाक्षर काढले नव्हते. अर्थात त्यांचा प्रतिसाद केवळ स्कोअर सेटलिंग करण्याचा प्रयत्न होता हे निर्विवाद सत्य आहे!!
अहिरावण ह्यांना एक न्याय आणो प्रा.डॉ. ह्यांना दुसरा न्याय हे काही योग्य नाही.
हे असे एकांगी संपादन न्यायाला धरुन नाही.
आता हा प्रतिसाद संपादित होतो की प्रा.डॉ ह्यांचा आय.डी उडवला जातो ह्यावरुन शितावरुन भाताची परीक्षा होईल.
सुयोग्य आणि न्याय्य कारवाईची वाट पहात आहे
-
प्रसाद गोडबोले.
7 Jun 2024 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण मिपावर कोणत्या तरी एका लेखनात नेमकं कोणता तेही आठवत नाही. आपण कुठे काश्मीर की हिमाचल प्रदेश की कोणत्या तरी शिबिरात कोणत्या तरी ध्यानधारनेसाठी असं काही आठवत नाही. आपलं लेखन व्यक्तीगत अनुभव आणि कोणत्या श्लोकांचे अर्थ सांगत होता की असे काही होते. लेखनातून जाणवणा-या चंचलतेमुळे 'मन श्रांत होणे असे आवश्यक होते' असे काही तरी लिहिले होते. 'मानसिक स्वास्थ्य वगैरे' असे काही लिहिले नव्हते. उगाच 'ध ' चा 'मा' करु नका. 'श्रांत' म्हणजे दमलेल्या, थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो. निसर्ग माणसात उत्साह भरतो. अशा अर्थाने ते लिहिले होते.
बाकी, चालू द्या.
-दिलीप बिरुटे
7 Jun 2024 - 6:54 pm | प्रसाद गोडबोले
कोणाला गंडवताय सर ?
आम्ही काही तुमचे विद्यार्थी नाही की दुधखुळेही नाही.
हा तुमचा प्रतिसाद होता :
ह्यातील गर्भितार्थ आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुम्हाला ?
"थकलेल्या, शिणलेल्या, कष्टी माणसास निसर्गातला अनुभव आनंदायी ठरतो, निसर्ग माणसात उत्साह भरतो " असा टोन अजिबात नाहीये ह्या प्रतिसादात. तसे असते तर तुम्ही लेखातील इतर गोष्टींविषयी दुर्लक्ष केले नसते. शिवाय काळजी घ्या जपा वाहवत जाऊ नका असले शब्द वापरले नसते.
आणि खरेच तुमचा टोन तसा असता , तर व्यवस्थापनाला देखील तुमचा खरा काळजीचा आपुलकीचा टोन जाणवला असता आणि त्यांनी तो प्रतिसाद संपादित केलाच नसता. त्यांनी, व्यवस्थापकांनी प्रतिसाद संपादित केला हाच पुरावा आहे की त्यांनाही जाणवले ती वैयक्तिक टिका आहे ते!
इथे अहिरावण ह्यांनीही काहीही वैयक्तिक टीका केलेली नव्हती , उलट त्यांनी प्राध्यापक लोकं सरकार विषयी असंतोष पसरावा म्हणुन काय काय आंदोलने करु शकतात ह्याची यादी दिलेली होती. केवळ तेवढ्या वरुन त्यांचा आय.डी संपादित झालाय. तुमचा मात्र वैयक्तिक टीका करणारा प्रतिसाद देखील विशेष निदर्शनास आणुन दिल्याशिवाय संपादित होत नाही. ही वस्तुस्थिती आहे .
मी काही मराठी भाषेत पी.एच.डी केलेली नाही की प्राध्यापकी केलेली नाही पण इथे मला एक चपखल म्हण आठवत आहे - आपला तो बाब्या अन दुसर्याचे ते कार्टे !
18 Jun 2024 - 4:50 pm | चौकस२१२
माझीही आयडी उडवली होती बहुतेक गेले काही दिवस, यात कोणाचं "हात " आहे कोण जाणे
6 Jun 2024 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेखनावरील आपल्या प्रतिक्रिया मोलाच्या आहेत. दुवा निवांत बघा.
आभार.
-दिलीप बिरुटे
7 Jun 2024 - 3:10 pm | वामन देशमुख
दुवा वाचला. आपली भूमिका पटली.
---
सदर अ-संपादकीय लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ राजकीय परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो निवडणुका ते राज्यकारभार अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या आशयघन अशा संस्थळावर, एखाद्या बल्लवाचार्याने उत्तमोत्तम पक्वान्ने रांधावीत व अत्यंत सुशोभित अश्या ताट-पाटावर ती पक्वान्ने भुकेलेल्यास भक्षण करण्यासाठी मांडावीत असा आल्हाददायक दुग्ध-शर्करा-अनुभव हे लिखाण वाचून साक्षेपी वाचकास आल्याशिवाय राहणार नाही.
ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच मिपावरील आजकालच्या आशयहीन लिखाणरुपी धाग्यांच्या सोसाट्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, राजकारण-समाजकारण यांचे बौद्धिक तरीही आकलनसुलभ असे विवेचन आणि नर्मविनोदी तरीही निर्भिड शैलीत मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव लिखाणाचे वाचन-मनन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल.
- वामन देशमुख
7 Jun 2024 - 4:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहाहा ! वा वा ! काय ते कौतुक. लै उच्च आणि लै भारी. :)
आभार.
-दिलीप बिरुटे
6 Jun 2024 - 5:15 pm | गवि
उत्तम समतोल लेख लिहीला आहेत प्रा डॉ सर.
आता विविध विषयांवर लेखणी फुलू दे परत. २०२९ पर्यंत.
प्रस्थापित व्यवस्थेत असलेली छिद्रे दाखवणे हे एक अत्यावश्यक कार्य आहे. ते तुम्ही नेहमी करत आला आहात. त्याबद्दल धन्यवाद.
पण त्या नादात तुमचे ललित लेखन, इतर अभ्यासपूर्ण साहित्य, परीक्षणे अशा अनेक गोष्टी पडद्याआड जाऊ नयेत अशी विनंती. लिहीत रहा.
6 Jun 2024 - 5:28 pm | स्वधर्म
मला एकूणच भारतीय जनता देवाधर्माच्या गुंगीतून भानावर येऊन जमिनीवरच्या वास्तव प्रश्नांचा विचार अजूनही करू शकते याचा मनापासून आनंद झाला. एकदा का एखाद्याला देवानेच मला पाठवले आहे असे वाटू लागते, तेंव्हा स्वत:चा कोणताही निर्णय बरोबरच वाटू लागतो. घटना, लोकशाही मूल्ये वगैरेची पत्रास बाळगायचे कारण उरत नाही, ते आता होणार नाही असे वाटते. कालांतराने लोकांचीही विचारशक्ती संपुष्टात येते. उदा. प्रेषितांनी निर्माण केलेल्या धर्मात धर्मचिकित्सा होऊ शकत नाही. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो; आता भारतीयांना बायॉलॉजिकल पंतप्रधान मिळेल अशी आशा वाढली.
16 Jun 2024 - 9:23 am | उग्रसेन
ॲडॉल्फ हिटलर सत्तेत आला, त्याला फार वर्षं नाहीएत झालेली. ती काही पुराणकथा नाही. ताजा इतिहास आहे. १९३३मध्ये हिटलर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला. अर्थात, त्यापूर्वी म्हणजे १९२१मध्येच तो नाझी पार्टीचा नेता झाला होता. १९२४मध्ये नाझी पार्टी त्याच्या पूर्ण ताब्यात आलेली होती. (हे तेच वर्ष, जेव्हा महात्मा गांधी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.)
जर्मनीवर मांड ठोकल्यानंतर हिटलरने सगळ्यात पहिल्यांदा काय केले असेल, तर आपण 'प्रेषित' आहोत, हे सांगायला त्याने सुरूवात केली. तेव्हा शाळांमध्ये मुलांना हे शिकवले जात असे की, हिटलर जन्मलाच नाही. देवाने त्याला विशिष्ट कामासाठी पृथ्वीवर पाठवले आहे. त्याने त्यासाठी जर्मनीची निवड केली आहे आणि जर्मनीने त्याची निवड केली आहे. हिटलर हा काही सामान्य माणूस नाही. रादर, हिटलर हा 'माणूस'च नाही. तो देव आहे. प्रेषित आहे. इथे एका कामासाठी आलेला आहे. हे काम संपले की तो जाणार आहे. त्याला ना मानवी शरीर आहे, ना मानवी मोह-माया. त्याला ना संसार आहे, ना कसला लोभ!
हे सगळे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिटलरकडे माध्यमे होती. माध्यम तंत्रज्ञान तेव्हा फार प्रभावी होते, असे नव्हे. मात्र, लोकांच्या मनावर राज्य गाजवल्याशिवाय खरी सत्ता पादाक्रांत करता येत नाही, हे हिटलरला माहीत होते. डॉ. जोसेफ गोबेल्स याच्यासारखा सल्लागार त्याच्यासोबत होताच. हिटलरची भाषणे चमत्कारिक असत. त्यावेळी विन्स्टन चर्चिलसारखे बुद्धिमान नेते विचारी भाषणे करत. मात्र, असे नेते भाषण वाचून दाखवत. हिटलरने भाषण नावाची गोष्टच बदलून टाकली. त्याचे भाषण हा 'रंगमंचीय परफॉर्मन्स' असे. तो लोकांना खिळवून ठेवत असे. त्यांना आपल्यासोबत घेत असे. लोक ठेका धरून त्याच्यासोबत नाचत असत.
"जर्मनी आपल्या पाठीशी आहे.
आपल्यासमोर फक्त जर्मनी आहे.
आपल्या आत जर्मनी आहे.
जर्मनी... जर्मनी... जर्मनी!"
"Germany is behind us! Germany is in front of us! Germany is within us!"
अशा एकापाठोपाठ एक चमकदार घोषणांची मालिका असे या भाषणात. हिटलरने जर्मन माणसात भयंकर राष्ट्रवाद तयार केला. त्यानंतर, हिटलरला पाठिंबा म्हणजे देशभक्ती आणि हिटलरला विरोध म्हणजे देशद्रोह इथपर्यंत हा प्रवास गेला. हिटलर देशापेक्षा मोठा झाला!
हिटलरच्या एका शब्दावर लोक मरायला तयार होत. मारायला तयार होत. लाखो लोक मारले गेले, तरी हिटलरच्या भक्तांना काही फरक पडत नसे. त्यांना ते देवाचे काम वाटत असे. हिटलर ज्या आवेशात बोलत असे, ते बहुसंख्य लोकांना पटत असे. पुराणकथांमध्ये युद्धात लोक कितीही मारले गेले, जे मारले गेले ते लोक आपले जीवलग असले तरी खुद्द प्रेषितच त्याचे समर्थन करतो. कणखर, बलसागर राज्य उभे करायचे असेल तर माणसे मारावी लागतात. हिटलरने हे पटवून दिले. शत्रू कोण, हे त्याने सांगितले. ते लोकांना पटले, कारण हिटलर हा माणूस नव्हता. तो प्रेषित होता.
सगळ्यात भयंकर हे असते. मर्त्य माणसांना पराभूत करता येते. मात्र, एखादा माणूस प्रेषित झाला की, तो फक्त नेता नसतो. त्याचा 'कल्ट' तयार होतो. भक्तसंप्रदाय तयार होतो. पंथ तयार होतो. असा नेता मग संसदेच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना नव्हे, तर संतांना पाचारण करतो. आणि, मंदिराच्या उद्घाटनाला मात्र स्वतःच असतो. थेट 'मेसेंजर ऑफ गॉड'. तो थेट देवाचा निरोप्या असतो. 'बायॉलॉजिकल' नसतो. अशक्य ते शक्य करणारा असतो. अपराजित असतो. अमर्त्य असतो! मर्त्य माणसासाठी त्याचा पराभव निव्वळ अशक्य असतो. एखाद्या माणसाला 'लार्जर दॅन लाइफ' करत, पुढे हे शेवटचे टोक असते. प्रेषित होत त्याचे थेट देवाशीच नाते जोडले जाते.
मात्र, हा सगळा प्रचार फोल ठरतो.
देवाच्या दारातच तो पराभूत होतो.
मुळात, तो पराभूत होऊ शकतो!
हे घडणे किती महत्त्वाचे, याचा अनेकांना आज अंदाज येणार नाही. पण, 'म'च्या या मारामारीत एका महाप्रलयापासून 'महाभारत' वाचला आहे! अशा 'कल्ट'पासून देश वाचला आहे.
आपोआप नाही अर्थात. लोकांनी ते केले आहे.
आपला भारतीय माणूस आहेच बाकी भारी!
- संजय आवटे
16 Jun 2024 - 5:30 pm | नठ्यारा
भारत किती मोठय ते आवटे यांना बहुधा माहीत नाही. चालले आपले हिटलरच्या मागोमाग ! बाकी, हिटलरला पैसे पुरवणारे कोण होते त्याची काही खबरबात काढणं आवटेच्या कक्षेबाहेरील सायास आहे.
-नाठाळ नठ्या
17 Jun 2024 - 5:17 pm | स्वधर्म
तुंम्ही काढलेल्या खुसपटांचा (भारत किती मोठा आहे किंवा हिटलरला पैसे इ.) मूळ मुद्याशी कसलाही संबंध नाही आणि आवटे यांच्या पोष्टमध्ये जे म्हटले आहे ते असिध्द होत नाही, एवढेच म्हणतो.
17 Jun 2024 - 7:09 pm | नठ्यारा
हिटलरचा तरी मोदींशी काय संबंध आहे?
-ना.न.
6 Jun 2024 - 7:18 pm | कॉमी
छान लेख.
6 Jun 2024 - 8:02 pm | नठ्यारा
प्राडॉ,
तुमचं हे विधान अजिबात म्हणजे आज्जिब्बात पटलं नाही.
हे वाक्य तत्त्व म्हणून ठीक आहे. पण ते चालू परिस्थितीत लागू पडंत नाही. कारण की भाजपचा मतटक्का तितकाच आहे. केवळ भाजपच नाही तर इतरांचाही साधारणत: २०१९ च्या आसपासच आहे. कृपया विकीवरून काढलेली माहिती पहा :
2024 election
BJP (36.56%)
INC (21.96%)
SP (4.58%)
AITC (4.37%)
YSRCP (2.06%)
BSP (2.04%)
TDP (1.98%)
DMK (1.82%)
CPI(M) (1.76%)
RJD (1.57%)
NCP (1.48%)
Other (21.3%)
2019 election
BJP (37.7%)
INC (19.67%)
AITC (4.1%)
BSP (3.66%)
SP (2.55%)
YSRCP (2.53%)
DMK (2.26%)
SS (2.10%)
TDP (2.04%)
CPI(M) (1.77%)
Other (21.62%)
2014
BJP (31%)
INC (19.31%)
AITC (3.84%)
BSP (4.14%)
SP (3.37%)
YSRCP (2.53%)
DMK (1.74%)
AIDMK (3.27%)
SS (1.85%)
TDP (2.55%)
CPI(M) (3.25%)
NCP (1.56%)
( खरंतर मी सारणी लिहायला हवी. पण तितका वेळ नाही. वाचकांनी कृपया क्षमा करावी. )
तर सांगायचा मुद्दा असा की तुम्ही लिहिलेले मुद्दे कितीही रास्त असले तरी भाजप च्या मतदारांना म्हणजे हिंदूंना कितपत लागू पडतात याची शंकाच आहे. भाजपच्या विरोधकांनी ( विशेषत: मुस्लिमांनी ) आपसांतली मतफूट टाळल्यामुळे भाजपचा विजय मर्यादित झाला आहे. शिवाय संघाचंही या वेसणीत योगदान आहे. संघ निवडणुकीत हव्या तितक्या ताकदीने उतरला नाही, असं माझं मत आहे. संघातल्या काही उच्चपदस्थांना मोदी आवडंत नाहीत.
तुम्ही सांगितलेले मुद्दे भाजपने अमलांत आणले असते तर हिंदू मतदार दूर जाऊन भाजपचा पराभव निश्चित होता. हे माझं वैयक्तिक मत आहे.
-नाठाळ नठ्या
7 Jun 2024 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या विचारांचं मतांचं स्वागत आहे. लेख लिहून झालं आणि असंख्य मुद्दे राहुन गेले. दोनहजार चौदाच्या भाजपा जाहीरनाम्यात महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा हे अनुक्रमे चार मुद्दे अग्रक्रमावर होते. विकासाचे मुद्दे निवडणूकीत होते. जनता या पूर्वीच्या सरकारच्या धोरणांना कंटाळलेली होती आणि या नव्या भूलीचा जनतेवर प्रभाव पडला. ”बस हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार’ लोकांचा चमत्कारावर विश्वास. दोन हजार एकोनावीसला जाहिरनाम्यात मुद्दे भरकटले. आतंकवाद, सैनिक कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे गावगप्पा. दोन हजार चौवीसची निवडणूक ’मोदी की गॅरंटी” वर लढल्या गेली. कशाची गॅरंटी तर, गरीब परिवाराची सेवा, मध्यम परिवाराचा विश्वास, महिला सक्षमीकरण, युवकांना संधी वगैरेची गॅरंटी. पण निवडणूक प्रचारात निव्वळ ’हिंदू’ भोवती फ़िरली. जाहीरनाम्यात हिंदुंना आवडणारे कोणतेही मुद्दे नव्हते, ते केवळ भाषणबाजीचे विषय होते असे वाटते.
विकासाकडून सुरु झालेला प्रचार हिंदू भोवती फिरला. पण म्हणुन सरसकट हिंदुंना भाजपाची विचारसरणी आवडते असे समजण्याचे काही कारण नाही, कारण की विचारसणी मानणारी जी काही हिंदू मतं पडायची ती भाजपाला मिळालीच असतील. पण हिंदू आणि इतर अशांना या हिंदुत्व सोडून जी जीवन-मरणाचे प्रश्न आणि इतर मुद्यांकडे जायचं असेल तर भाजपाकडे त्यांना रोखण्यासाठी आता काही मुद्दे आहेत असे मला व्यक्तीगत वाटत नाही. काँग्रेस आणि आघाडीतील इतर पक्षांना याचा लाभ झाला. मुस्लीमांच्या मतदारांबद्दल आपण लिहिलंय, त्यात ती एकगठ्ठा राहीली नाहीत असे वाटते, उदा. उत्तरप्रदेशात मायावतींनी आपले जे उमेदवार दिले त्या उमेदवारांनी मुस्लीम मतं घेतली आहेत. आज उत्तरप्रदेशातली आकडेवारी पाहात होतो. एकूण सोळा मतदार संघात बसपामुळे भाजपा उमेदवार विजयी झालेले दिसतात. बसपामुळे तो विजय सुकर झाला. ते अधिकचे सोळा उमेदवार भाजपेतर निवडून आले असते तर ? क्रिकेट आणि राजकारणात जर तरला तसाही काही अर्थ नसतो.
आता चंद्रबाबू नायडू आणि नितेशकुमारांच्या सत्तेतील सहभागाच्या आघाडीचे परिणाम सुरु झाले आहेत. अर्थात, काँग्रेस पक्षातील आणि इतर पक्षातील खासदारांना भाजपा आपल्या शैलीने गळाला लावेल तेव्हा लावेल पण आता जदयु आणि तेलगु देसमच्या इशा-यावर हिंदुत्वच्या मुद्याला तिलांजली देवून आता त्यांच्या इशा-यावर ”सत्तेसाठी नाचते मी परवा कुणाची ” म्हणून मुजरे घालावे लागणार आहेत. दोघांनीही पाठींबा देतांना अटी घालायला सुरुवात केली आहे. लोकसभेचं अध्यक्षपद, मंत्रीपदं आणि अग्निपथ योजना मागे घ्या. समान नागरी कायद्यावर पुर्विचार करा. इकडे महाराष्ट्रातही विविध शासकीय कार्यालयात किती भरती बाकी आहे त्याची माहिती मागवली जात आहे. आघाड्यांचे सरकार, विरोधी पक्ष ताकदीने उभा राहील तेव्हा येत्या काळात एनडीएचं सरकार कसं चालेल ते पाहणे रोचक ठरणार आहे. चुभुदेघे
-दिलीप बिरुटे
7 Jun 2024 - 12:16 am | प्रसाद गोडबोले
ख्या ख्या ख्या .
सर , फक्त एकदा कन्फर्म करुन सांगता का की निवडणुक नक्की कोण जिंकलं आहे ? कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? आणि कोणत्या पक्षाचा पंतप्रधान होणार आहे ?
त्यांचे वर देखले अभिनंदन करुन , त्यानुसार लागलीच सांगुन टाका पुढील ५ वर्षात काय काय आंदोलनं करणार आहात !
=))))
बाकी ह्यावेळी ए.व्ही.एम च्या नावाने कोणी रडत नाहीये ही एक समाधानाची बाब आहे नाही का ?
8 Jun 2024 - 6:59 pm | प्रसाद गोडबोले
कितीही नि:पक्षपाती असल्याचा आव आणुन लेखन पाडले, तरी तुमच्या शब्दांच्या निवडी वरुन तुमचे अंतःस्थ हेतु आणि पुर्वग्रह दिसुन येतातच.
सारांश :
१. भाजपने ५४३ पैकी २४० जागा जि़ंकल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष आहे ज्याने ९९ जा जिंकल्या आहेत ज्या की भाजपाच्या अर्ध्या पेक्षाही कमी आहेत.
२. भाजप विरुध्द केलेल्या इंडि अलायन्सने ज्यात तब्बल ४० पक्ष होते, त्या सर्वांनी मिळुन २३६ जागा जिंकल्या आहेत. अर्थात सर्वजण एकत्र येऊन देखील केवळ एकट्या भाजपच्या २४०च्या तोडीस तोड देऊ शकत नाहीत.
३. एन.डी. ए. कडे सरकार बनवण्यासाठी पुरेसे बहुमत अर्थात २७२+ जागा आहेत, आणि श्री. मोदींच्याच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यात येईल असे तुर्तास तरी दिसत आहे. श्री. राहुल गांधी ह्यांच्या नेतृत्वातील सरकार बनण्याची तुर्तास तरी चिन्हे दिसत नाहीत.
वरील तीन विधाने फॅक्च्युअली करेक्ट आहेत.
आता काही विधाने अनुमानात्मक :
४. भाजपाचा पराभव झाला असे म्हणण्याला काहीही तार्किक आधार नाही, भाजप जर सरकार बनवु शकले नसते तर भाजपा चा पराभव झाला असे म्हणाता येईल.
५. भाजप च्या सीट्स कमी का झाल्या ह्यावर ज्यांना एरंडाचे गुर्हाळ चालवायचे आहे ते त्यांनी सुखनैव चालवावे. सध्या तरी भाजप श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या नेतृत्वात सरकार बनवेल असे दिसत आहे. ही मोदींची तिसरी टर्म असेल जे की पंडीत नेहरु ह्यांच्या विक्रमाची बरोबरी आहे. अर्थात ही टर्म जर श्री. मोदी ह्यांनी पुर्ण केली तर आपण नेहरु आणि मोदी ह्यांच्या कारकिर्दीचा तुलनात्मच लेखा जोखा मांडू शकतो. बाकी आज नितीशकुमार आणि चंद्राबाबु नायडू त्यांच्या अनुक्रमे १६ आणि १२ सीट्स सह काँग्रेस प्रणीत इंडी अलायन्स मध्ये गेले तरीही त्यांच्या टोटल सीट्स २३६ + १६ + १२ = २६४ होतात जे की सरकार बनवण्यास पुरेसे नाही. इंडि अलायन्स ला काहीतरी मोठ्ठा चमत्कार करावा लागेल सरकार बनवण्यासाठी.
६. तस्मात , तुर्तास तरी असे दिसुन येते की पुढील काही वर्षे देशात भाजप चे सरकार राहिल आणि त्यानिमित्ताने आंदोलने अन मोर्चा स्पॉन्सर होत राहतील . एकुणच पुढील काही वर्षे अफलातुन इन्टर्टेनमेंट चालु रहाणार हे निश्चित !
७. आता २०२९ पर्यंत आपण मजा पाहु. सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा !
8 Jun 2024 - 7:25 pm | पॅट्रीक जेड
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु करा ! सहा महिन्यानंतरचा पराभव आताच नेत्याना दिसू लागलाय. मला मोकळं करा म्हणताहेत ते. :)
7 Jun 2024 - 12:29 pm | कंजूस
समीक्षा चांगली केली आहे.
मोदींचे वारू त्यांच्या मीटरप्रमाणे जोरात दौडत होते. ज्या काही गोष्टी खटकत होत्या त्या कोणते भाजपवाले मोदींना सांगत असतील? आता परिणामांतून त्यांनी धडा घेतलाच असेल, आणखी कुणी सांगायला नको.
7 Jun 2024 - 3:46 pm | टर्मीनेटर
संतुलन राखण्याचा प्रयत्न करत केलेले 'शुगर कोटेड' स्लेजिंग आवडले 😂
मिपासहित कुठल्याही समाजमाध्यमांवर चालणाऱ्या निरर्थक राजकीय (काथ्याकुटीय) चर्चांमध्ये रस नसला तरी अशा विश्लेषणात्मक लेखावर "एक प्रतिसाद तो बनता हैं बॉस", त्यामुळे माझेही चार शब्द...
ह्या निवडणुकीचे निकाल खरंच आवडले. अतिआत्मविश्वासातून दिली गेलेली 'अबकी बार चारसों पार' सारखी घोषणा फोल ठरवत सुजाण भारतीय मतदारांनी कल्पनेच्या उंच उंच भराऱ्या घेणारे भाजपचे विमान जमिनीवर आणताना २००४ च्या "इंडिया शायनिंग" मोहिमेची उडवली होती तशी धूळधाण २०२४ मध्ये उडवली नसली तरी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान होता येईल इतपत कौल देऊन जनतेचे अनेक अत्यावश्यक प्रश्न प्रलंबित/दुर्लक्षित राहिल्याची जाणीव करून दिली हे फार बरे झाले!
"काही लोक असे असतात ज्यांना पाहिल्यावर उगाचच कानफटात ठेऊन द्यावीशी वाटते" असे काहीसे पुलं म्हणतात, त्याप्रमाणेच फोटोत, टीव्हीवर दिसले तरी शेणात बुडवलेल्या चपलेने थोबाड फोडून काढावे असे वाटणारे संजय राऊत, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे वगैरे वगैरे, सकाळी सकाळी (फोटोत, टीव्हीवर) ज्यांचे दर्शन घडल्यास नाश्ता/जेवण करण्याची इच्छा सुद्धा मरून जाईल असे एक जुने जाणते, राहुल गांधींसारखे बालिश/बिनडोक आणि उद्धव ठाकरेंसारखे आत्मघातकी नेते, आणि अनेक गणंग लोकांनी (३७ कि काहीतरी पक्षांनी) एकत्र येऊन अस्तित्वात आणलेल्या दिशाहीन इंडी आघाडीच्या हाती सत्तेची सूत्रे जाण्यापेक्षा (पूर्ण होतील कि नाही ह्याची खात्री वाटत नसली तरी दुसरा कुठला पर्यायच उपलब्ध नसल्याने) असंख्य भारतीयांनी ज्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवल्या त्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेलया स्पष्ट बहुमताचे सरकार येत आहे ह्याचे (स्वतः मतदान केले नसले तरी) समाधान वाटले.
"गरीब, महिला, युवा और किसान" ह्या चार 'सामाजिक जातींच्या' विकासासाठी काम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आपल्या २०२४ च्या निवडणूक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदींनी वारंवार सांगायला सुरुवात केल्यावर २०१४ आणि २०१९ ह्या दोन्ही टर्म्स मध्ये सरकारकडून असलेल्या आपल्या अपेक्षा तिसऱ्या टर्ममध्ये तरी पूर्ण होतील ह्या आशेने डोळे लावून बसलेला, वरील चार 'सामाजिक जातींमध्ये' न मोडणारा एक मोठा मतदारवर्ग मोदी/भाजपवर नाराज झाल्याने पहिल्या फेरीपासूनच मतदानापासून अलिप्त राहिला.
जसा तात्कालीन परिस्थिती पाहून मतदान करणारा,"काठावरचे मतदार" म्हणवला जाणारा एक मतदारवर्ग आहे तसाच संख्येने कमी असला तरी कुठल्याही राजकीय पक्षाशी, विचारसरणीशी आणि नेत्याशी बांधिलकी नसणारा आणि पक्ष, चिन्ह वगैरे न पाहता उमेदवाराचे चारित्र्य आणि कार्यक्षमता पाहून मत देणाराही एक मतदारवर्ग आहे. मी ह्या वर्गात मोडत असल्याने "मोदींच्या नावावर काय दगड उभा केला तरी निवडून येईल/येतो" अशा फाजील आत्मविश्वासाने भाजपने आणि मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या अन्य पक्षांनीही निष्क्रिय/अकार्यक्षम/गुन्हेगारी पार्शवभूमीचे उमेदवार दिल्याने माझ्यापुरता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला (अशा परिस्थितीत 'NOTA' हा पर्याय उपलब्ध असला तरी त्याचे भारतातले नियम इतके भंपक आहेत कि 'मतदान यंत्रावरचे एक अत्यंत निरुपयोगी बटण' अशीच त्याची व्याख्या होऊ शकते).
अर्थात माझ्यासारखे इतरही अनेक मतदार मतदानापासून अलिप्त राहिले असतील ज्याचा थोडाफार का होईना पण एकूण मतदानाची टक्केवारी कमी होण्यात वाटा असू शकतो.
सेलिब्रेटींकडून मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी "मतदान श्रेष्ठ दान", "मतदान करणे हा तुमचा सर्वात मोठा अधिकार/हक्क आहे" वगैरे सारख्या घोषणा देत जाहिराती करणाऱ्या निवडणूक आयोगाने "चांगले उमेदवार देणे हि तुमची सर्वात महत्वाची जवाबदारी आहे" वगैरे सारखे ज्ञानामृत पाजणाऱ्या जाहिरातींचे कॅम्पेन राजकीय पक्षांसाठीही चालवावे!
गेल्या दहा वर्षातली सरकारविषयीची जी काही थोडीफार असेल ती 'अँटी-इन्कम्बन्सी' आणि वरील दोन कारणांमुळे काही राज्यांत मोदी/भाजपला मिळू शकणाऱ्या संभाव्य मतांची संख्या थोड्या प्रमाणात तरी नक्कीच घटली असावी. आधीच्या दोन टर्म्समध्ये राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे नव्याने निर्माण झालेल्या "लाभार्थी व्होटबँकेने" हक्काच्या/संभाव्य मतांमध्ये झालेली हि घट बऱ्यापैकी भरून काढल्याने मोदी/भाजपला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत २०१९ पेक्षा नाममात्र घट झालेली दिसत असली तरी तब्बल ६३ जागा कमी झाल्या.
उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये जाती-पातीच्या राजकारणाचा मोठा फटका बसल्याचे अनेक विश्लेषक म्हणत आहेतंच पण काल मूळच्या उत्तरप्रदेशातल्या पण गेल्या कित्येक दशकांपासून मुंबईत व्यापार करणाऱ्या एका भाजपचा पारंपरिक मतदार असणाऱ्या सवर्ण वर्गातील व्यापाऱ्याकडून रोचक माहिती मिळाली.
२०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीनही निवडणुकांत भाजपकडून तिकीट वाटपात सवर्णांवर अन्याय झाल्याच्या रागातून त्या पक्षाशी संबंधित असलेल्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी (चाणाक्ष वाचकांनी त्या संघटनेचे नाव ओळखले असेलंच 😀) त्याच्या मतदारसंघातील एकूण एक सवर्णांच्या घरी अनेकवेळा भेटी देऊन ह्यावेळी उत्तरप्रदेशात अन्य कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा सर्वात जास्त सवर्णांना तिकिटे देणाऱ्या 'समाजवादी पक्षाला' ह्यावेळी मत देण्यासाठी अक्षरशः हात जोडून - पाया पडून विनंती केली होती. हाच प्रकार तिथल्या अन्य मतदारसंघातही घडला असावा असे तिथले निवडणूक निकाल पाहून वाटतंय!
अर्थात त्याच संघटनेने भाजपला धडा शिकवण्यासाठी केलेला असाच प्रकार २०१० साली झालेल्या आमच्या 'कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या' निवडणुकांच्यावेळी प्रत्यक्ष पहिला होता, ज्याच्या परिणामी त्यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 'महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे पहिल्याच फटक्यात तब्बल २६ नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेला बऱ्यापैकी पण भाजपला मात्र चांगलाच फटका बसला होता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही बऱ्यापैकी जागा निवडून आल्या होत्या.
महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि नाशिकमध्ये फायदा होऊ शकेल अशा विचारातून राज ठाकरेंना मोठ्या प्रेमाने मांडीवर घेण्यात आल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात बसल्याचेही काही मुंबई आणि युपीच्या मित्रांकडून समजले आहे. त्यांची परप्रांतीयांविषयीची अविचारी भूमिका आणि हिंसक आंदोलन अजून 'ते' लोक विसरले नाहीयेत.
असो, ९ तारखेला शपथविधी होऊन नेहरूंनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणाऱ्या श्री. नरेंद्र मोदींचे त्रिवार अभिनंदन!!!
तसेच शतक हुकले असले तरी परिश्रमपूर्वक गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँगेसच्या जागा जवळपास दुप्पट करणाऱ्या राहुल गांधींचे अभिनंदन आणि शुभेच्छा! आपल्या पक्षाच्या ५ वरून ३७ अशा सात पटींपेक्षा अधिक जागा वाढवण्यासाठी कष्ट घेतलेल्या अखिलेश यादव ह्यांचेही कौतुक आणि अभिनंदन. आपल्या जागा निम्म्या करून महाराष्ट्रात पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा दुप्पट आणि काँग्रेसच्या जागा तब्बल १३ पट वाढवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे तर विशेष अभिनंदन!
ईव्हीएमचे अभिनंदन करणारा एक लेखच मिपावर आला असल्याने त्याचे अभिनंदन करण्याची पुनरावृत्ती टाळतो. आणि एकाबाजूला भावनिक उन्माद आणि दुसऱ्या बाजूला मातम, रडारड करण्याची संधी नाकारून मिपावर गेले काही महिने असलेले दूषित/गढूळ वातावरण लवकरात लवकर निवळण्यास हातभार लावणाऱ्या २०२४ च्या निवडणूक निकालांचे पुन्हा एकदा स्वागत करून माझे चार(?) शब्द संपवतो!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
8 Jun 2024 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सेंट्रल हॉलमधे नेतेपदी आणि अर्थात पंतप्रधानासाठी निवड करण्यात आली. गेल्या दोन पंचवार्षिकचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बहुमताचा उत्साह आणि आता एनडीएचा उत्साहातला फरक जाणवणारा होता. बहात्तर मिनिटांच्या भाषणात एकोनावीस वेळा 'एनडीएचा' उल्लेख करावा लागला. आघाडी सरकारांना सहकारी पक्षांची जी हाजी हाजी करावी करावी लागते, त्याची सुरुवात अधिकृतपण उद्यापासून सुरु होईल. ''मोदी की गॅरंटी आणि काँग्रेसच्या 'हाथ बदलेगा हालात'' लोकसभेतील निवडणूकांचा प्रवास पंतप्रधानांच्या निवडीपर्यंत येऊन ठेपला.
संपूर्ण देशात सर्वाधीक सभा घेण्याचा मान अनुक्रमे तेजस्वी यादव, नरेंद्र मीदी प्रियंका गांधी, अमित शहा, राहुल गांधी यांनी आपापल्या मतदार संघात सभा गाजवल्या. निवडणूकांचा प्रचार संपला, निकालही लागलेत. नव्या रणनिती, नवे राजकारण त्याची धावपळ पुन्हा सुरु होईल. सर्वच पक्ष नेत्यांनी आपापला थकवा घातला असेल. ध्यानधारणा करुन प.नरेंद्र मोदी नव्या उत्साहाने उद्या तिस-यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पराभवाची नैतिक जवाबादरी घेऊन 'मला मोकळे करा' वर ठाम आहेत. महाराष्ट्रातले येत्या विधानसभेचं राजकारण कसं असेल त्याची सुरुवात आता झाली आहे.
देशातील जनतेने भाजपास दोन वेळा बहुमत दिलं. देशासाठी काय केलं आणि काय केलं नाही त्याचा लेखाजोगा लोकसभेच्या निवडणू निकालांच्या माध्यमातून जनतेसमोर आहे. भारत जोडो अभियान, न्याय यात्रा यांनी राहुल गांधी यांच्या काँग्रेस आणि आघाडीलाही चांगलंच बळ दिलं. सत्तेची सिमारेषा दिसेल इतक्या अंतरावर उभे केले. एकहाती सत्ता देऊनही काहीच जर होत नसेल तर, जनतेने पुन्हा आघाड्यांच्या सरकारांकडे ही धुरा दिली पाहिजे असे जनतेला वाटले म्हणायला हरकत नाही. देशातील अजूनही खुप प्रश्न मोठे प्रलंबीत आहेत. संसदेतील कामकाज व्यवस्थित चालले पाहिजे. असे आणि इतर गोष्टीत बदल दिसणे आवश्यक आहे.
भारत देश सर्वांचा आहे, भारतातल्या विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती, भाषा वेगवेगळ्या असल्या तरी आपण सर्व गुण्यागोविंदाने राहतात, दर्व भारतवासी एक आहेत, राजकारणातील वैरभाव, द्वेषाचे राजकारण सोडून एकात्मतेची भावना उभी करणे गरजेची आहे. नवे सरकार भारतातील जनतेला जपेल,त्यांच्या विकासासाठी, जीवन-मरणांच्या प्रश्नासाठी अधिक सक्षमपणे काम करेल, जगभरात आदर्श असलेल्या लोकशाहीची काळजी घेईल, प्रसारमाध्यमे अधिक निष्पक्षपाती, निर्भीड, अधिक स्वतंत्र होतील अशी शुभेच्छा नव्या सरकारास देतो आणि थांबतो.
मिपाकर आंद्रे वडापाव, अथांग आकाश, वामन देशमुख, जेष्ठ मिपाकर गवि, स्वधर्म, कॉमी,नठ्यारा, कंजुसकाका, टर्मीनेटर, आपल्या प्रोत्साहनाबद्दल आभार, सर्व मिपाकर वाचक यांचेही आभार. चालक-मालक यांनी अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार. चुभुदेघे.
-दिलीप बिरुटे
8 Jun 2024 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली
हया निवडणुकीतले काही ठळक मुद्दे जे भाजपच्या मूळावर उठले
- इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करणे.
- मोदींचे अत्यंत अप्रभावी भाषणे.
-१० वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदीनी लोकाना भीती घालायचा प्रयत्न केला. जसे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घरी २ म्हशी असतील तर एक ओढून नेईल.
- राहुल गांधीशी डिबेट करायला मोदीनी नकार दिला. ह्याचा सरळ प्रभाव राहुल ह्यांची प्रतिमा सुधारण्यात झाला.
-राम मंदिराचे घाईत उद्घाटन, शंकराचार्याचा विरोध.
- उद्घाटन प्रसंगात एककल्ली पणा, फक्त मोदी आणि मोदीच जे लोकांना रूचले नाही. उद्घाटन प्रसंग हा हिंदूंचा सोहळा न राहता तो भाजपचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे अनेक हिंदू प्रभावित झाले. खासकरून युपीत. राममंदिर हा हिंदूंसाठी खूपच संवेदनशील मुद्दा होता.
- “जो राम को लाये है” हा प्रचार ही लोकाना आवडला नाही. आपल्या देवापेक्षा कुणी व्यक्ती श्रेष्ठ असू शकत नाही असे हिंदू लोक
उघड बोलत होते.
-महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे नडले. २०१९ लाच २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मोदीना महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या नसत्या, सहज २० जागा जिंकल्या असत्या नी त्याच सभा इतर राज्यात घेतल्या असत्या तर २० जागा आणखी जिंकल्या असत्या. एकट्या उद्धव ठाकरेंमुळे ३० ते ४० जागा भाजपच्या कमी झाल्या.
- शरद पवारांना नाव न घेता भटकती आत्मा संबोधने महाराष्ट्रातील लोकाना रूचले नाही.
- मतदार संघात भाजप खासदारांनी ५ वर्षात आपला चेहरा दाखवला नव्हता. मागच्या वेळी दीड ते दोन लाख लिड ने जिंकलो. हया वेळीही जिंकूच त्यामुळे अनेक खासदारांनी मतदारसंघात फिरणे टाळले.
- इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापले राज्य सांभाळले. उगाच बाहेर फिरले नाही. जसे ममता बंगालात, अखिलेश युपीत नी ठाकरे/पवार महाराष्ट्रातच थांबले.
-मागच्या १० वर्षात काय कामे केली हे मोदीनी सांगितलेच नाही तसेच पुढे काय करणार हे देखील सांगितले नाही.
- भाजपचा कोअर मतदार अजित ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे नाराज होता, त्याने मतदान केंद्रात जाणे टाळले किंवा भाजपला धडा शिकवायला सरळ विरोधात मतदान केले.
- शिवसेना फोडणे अनेकांना आवडणे नाही.
- ईडी सीबीआय चा गैरवापर, भ्रष्टाना पक्षात घेऊन पावन करून घेणे इतके उघडपणे सुरू होते की ह्याचा आपल्या मतदारांवर प्रभाव होत असेल ह्याचा भाजपने आजीबातच विचार केला नाही.
-स्थानीक प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश. त्यांची दखल सुधा घेण्यात आली नाही. दिंडोरी की कुठल्यातरी सभेत एका शेतकऱ्याने मोदीना कांदा प्रश्नावर बोला अस सांगितल्यावर मोदीनी त्याला “जय श्रीराम “ असे उत्तर दिले. त्यामुळे त्याभागात संतापाची लाट उसळली होती.
-कांद्याबाबत भेदभाव- गुजरात मधील कांद्याला एक्सपोर्टची परमिशन पण महाराष्ट्रातील कांद्याला नाही असे शेतकरी बोलून संताप व्यक्त करत होते.
- मुसलमानांना विरुद्ध उगाच वक्तव्ये केली. ह्याचा परिणाम मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानात झाले, मुसलमानातील मोदीविरोधी प्रचंड लाट ओळखून mim ने आपले उमेदवार उतरवले नाही. नाहीतर भाजपा सोबत त्यांचाही धुव्वा उडाला असता.
- जरंगे प्रकरण नीट हाताळले नाही. जरांगे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे sit चौकशी लावण्यात आली. ह्यामुळे मराठा समाज प्रभावित झाला.
- भाजपच्या संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे (भाजपनेते उघड बोलत होते) तसेच मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे/ समर्थन करने ह्यामुळे दलित मतदार प्रभावित झाला.
-मोदींची थकलेली देहबोली तसेच मुद्दे सोडून भरकटलेली भाषणे.
8 Jun 2024 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली
आणखी काही मुद्दे.
- ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे भाजपेयीना खोडून काढता आले नाही. ध्रुव राठीचे व्हिडीओ अतिशय प्रभावशाली होते. ध्रुव राठीला न्यूज़ चॅनल्स ही उत्तरे देऊ शकले नाहीत. राठी चे व्हिडिओ बर्याच राज्यात मोठमोठे फ्लेक्स लाऊन दाखवले जात होते. ध्रुव राठीला प्रभावित होऊन त्याचे सबस्क्रायबर्स २ कोटी झाले. त्याचे व्हिडीओ ३० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.
- संजय राउत यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता त्यांच्यावर वयक्तिक टीका करणे, ह्यावरून भाजप नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्याना उत्तर न देता त्यापासून पळ काढतात असा मॅसेज सामान्य लोकांत गेला.
- भाजपच्या काही नेत्यांची शिवराळ भाषा.
- शिवसेना आणी राष्ट्रवादी फोडून ठाकरे नी पवारांचे चिन्ह नी पक्ष इतराना बहाल केल्याचा महाराष्ट्रात राग होता.
- महाराष्ट्रात ठाकरे नी पवारांच्या तोडीस तोड नेता भाजपकडे नसणे.
- राज्यात प्रियंका गांधी ह्यांच्या झालेल्या प्रचंड सभा. (नंदूरबार आणी नांदेड जागा ह्याच सभेने फिरवल्या.)
- उद्धव ठाकरे ह्यांची आक्रमक भाषणे तसेच सभांना जमलेली प्रचंड गर्दी. तसेच लढाऊ बाणा. सोप्या जागा मित्रपक्षांना देऊन ठाकरेंनी अटीतटीच्या जागा स्वतः कडे घेतल्या.
- पवार नी ठाकरेंसोबत असलेली प्रचंड सहानुभूती
- १०० टक्के मोदींवर विसंबून असणे. भाजप नेत्यांनी आपली राज्यातील कामे दाखवलीच नाहीत.
- चिन पाक निवडणुकीत आणणे. लोकाना ते रुचलेच नाही.
सत्ताबदल झाला नाही हे म्हणणे खोटे आहे. “मोदी” सरकार जाऊन “NDA” चे सरकार आले आहे.
मागच्या दहा वर्षातील नी इंदिरा/राजीव कालखंड पहिला तर एक गोष्ट लक्षात येते. एकहाती सत्ता देऊन देशाचा काहीही फायदा होत नाही. फक्त राज्यकर्त्यांचा अहंकार वाढतो नी येणकेनप्रकारे विरोधकांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळे भारत देशासाठी “गठबंधन” करून आलेले सरकारच बेस्ट. त्यामुळे सत्ता राबवणाऱ्यांवर अंकुश राहतो. एक एकहाती सत्ता नेमकी कशासाठी हवी असते हे कळले नाही. जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?
8 Jun 2024 - 5:24 pm | वामन देशमुख
जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?
दुर्दैवाने या बाबतीत अबांशी सहमत आहे.
संघ-भाजप-मोदी यांना जे काही करायचे होते ते करण्यासाठी सलग एक दशकाची प्रचंड बहुमतातील सत्ता पुरेशी नव्हती का?
३०० पार असताना फारसे काही करू शकले नाहीत ते २०० पार आल्यावर काय करणार आहेत? काही नाही.
9 Jun 2024 - 3:21 pm | टीपीके
बकवास
(बोलायला भरपूर आहे पण हा माझ्या नोकरीचा भाग नाही, त्या मुळे वेळेअभावी इतकाच प्रतिसाद. आणि ज्यांना पवार, उबाठा, राऊत, राठी, रागा हे प्रात: स्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग नसतो, त्या मुळे सध्या इतकेच)
9 Jun 2024 - 3:44 pm | पॅट्रीक जेड
ज्याना मोदी, शहा, फडणवीस, योगी, ब्रिजभूषण, सेंगर, प्रज्वल रेवाना असे लोक प्रातस्मरणीय वाटतात त्यांच्याशी चर्चा करून उपयोग असतो??
9 Jun 2024 - 8:33 pm | टीपीके
अहो अ बा, नाही हि लोकही नाही आहेत, पण हे नाहीत म्हणून तुमचे पवार इत्यादी आदरणीय होत नाहीत. जाऊ दे, ही भांडणं करणं तुमच्या नोकरीचा भाग असेल, मी नाही इतका वेळ घालवू शकत पण तुम्ही लिहिलेले बकवास वाटले आणि त्याची पोच द्यावीशी वाटली म्हणून दिली. उगाच तुम्हाला वाटायला नको की तुमच्या थापा सगळ्यांना पटल्या
9 Jun 2024 - 8:37 pm | पॅट्रीक जेड
फक्त द्वेषातून बकवास लिहिलय अस दिसतंय. सत्य स्वीकारायची तयारी नसली की असा द्वेष बाहेर पडतो. असो.
8 Jun 2024 - 7:58 pm | सुबोध खरे
हाय ला
मिपा पण विषामृत खेळतं काय?
भुजबळांचा आय डी परत जिवंत झाला की
संपादित.
11 Jun 2024 - 5:38 pm | वेडा बेडूक
या ड्यू आय्डी सोबत!
11 Jun 2024 - 6:00 pm | सुरिया
गापै कितीदा खेळले की विषामृत? तेंव्हा नाही आली शंका?
.
आता नाठाळ होऊन आले तरी बाहुबलीच दिसतात का फक्त?
11 Jun 2024 - 6:28 pm | पॅट्रीक जेड
डॉक्टरांच म्हणजे कसं बघा आमच्या मूक्तविहारी काकांसारखं आहे.
बलात्कारी भाजप किंवा मित्र पक्षातील असेल तर चुप बसायचे नी विरोधी पक्षातील असेल तर मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे.
रच्याकने मुविकाका, निकाल लागल्या पासून गायबलेत. :)
सगळी मेहनत वाया गेली. :)
11 Jun 2024 - 8:33 pm | सुबोध खरे
मीपावर धागे काढून दिवसरात्र चालवायचे.
भुजबळ बुवा
मी मिपा वर "चालवण्यासाठी" धागे काढत नाही.
त्याची मला गरजही वाटत नाही.
किंवा
कुणी मला चांगलं म्हणावं म्हणून मी काही करावं असं मला कधीही वाटलं नाही.
बाकी तुमचं असंबद्ध आत्मकुंथन चालू द्या
11 Jun 2024 - 9:15 pm | पॅट्रीक जेड
तुमच्या बद्दल नाहीये ते. मूव्ही काकांबद्दल आहे.
11 Jun 2024 - 8:15 pm | सुबोध खरे
@ सुरिया
भुजबळ बुवा
दुसऱ्यांच्या डू आय डी बद्दल ठणाणा करत होते
गा पै यांनी तसे कधी केल्याचे स्मरत नाही
अन्यथा माझ्यासारखे मूळ नावानिशी लोक कमीच आहेत.
8 Jun 2024 - 2:48 pm | नठ्यारा
प्राडॉ,
काहीच न होणे यांत न झालेले बॉम्बस्फोट धरायचे का ? ;-)
विनोदाचा भाग सोडून द्या. पण हा जो काही विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही.
काही दशकांपूर्वी हिंदू ग्रोथ रेट नावाची एक अपमानजनक अर्थशास्त्रीय संज्ञा प्रचलित होती. मोदींनी तिला सन्मान प्राप्त करवून दिला. आज भारताची अर्थव्यवस्था दिमाखात भरारी घेते आहे. याच धर्तीवर उद्या हिंदू व्होट रेट या संज्ञेसही सन्मान प्राप्त होईल.
-नाठाळ नठ्या
8 Jun 2024 - 3:20 pm | पॅट्रीक जेड
विरोधकांचा विजयबिजय आहे तो मुस्लीम मतांवर मिळालेला आहे. भाजपचा मतटक्का फारसा घसरलेला नाही. नठ्याजी, फक्त मुस्लिम मतदान पुरेसं नाही जिंकायला अनेक हिंदूंची आणी मरातजी लोकांची मते मिळाली आहेत शिवसेना काँग्रेस नी राष्ट्रवादीला.
8 Jun 2024 - 8:24 pm | सुबोध खरे
तुम्ही कुणाचा डू आय डी
9 Jun 2024 - 12:48 pm | पॅट्रीक जेड
‘मोदी ओरिजनल ब्रँड’, शिवसेना भवनासमोर बॅनर्स भाजपने लावले.
25 सभा रोड शो, सरकारी यंत्रणांचा वापर करूनही 9 जागा तितक्याच ज्या उद्धव ठाकरे यांनी पक्ष ,चिन्ह आणि सर्व गमावूनही मिळवल्या ...
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/bjp-banner-in-front-of-shi...
अजूनही केंद्रस्थानी उद्धव ठाकरेच आहेत
9 Jun 2024 - 3:45 pm | पॅट्रीक जेड
आता सध्या भाजपने फडणविसाना बाजूला करणेच हितकारक आहे नाहीतर विधानसभेला उरलीसुरलीही जाईल. लोकणी मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून मत दिले होते तरी ९ खासदारच जिंकले. विधानसभेवेळी अजून वाईट परिस्थिती असेल.
10 Jun 2024 - 10:00 am | सुबोध खरे
हायला
भुजबळ डू आय डी घेऊन परत अवतरले की
आधी होता वाघ्या
मग झाला पाघ्या
त्याचा येळकोट राहीना
मूळ स्वभाव जाईना!!
कोणत्याही धाग्यावर पूर्वग्रह दूषित आणि असंबद्ध प्रतिसाद आता परत येणार
हे राम
10 Jun 2024 - 2:01 pm | पॅट्रीक जेड
शिंदेना राज्यमंत्रिपद आणी दादाना मंत्रिपदही नाही. कसकाय सहन करताहेत हे लोक?? की काहीही पर्याय नसल्याने आपल्याला सोडून जाणार नाहीत हा आत्मविश्वास असावा भाजपला?? तिकडे मांझी एका खासदारावर कॅबिनेट मिळवतोय नी ७ खासदार असून राज्यमंत्रिपद. भाजप हया दोघांनाही युतीतून बाहेर काढण्याच्या मार्गावर असावा का?
10 Jun 2024 - 7:17 pm | नठ्यारा
मला वाटतं की शिंदेंनी लिंबूटिंबू उमेदवार उभे केल्याची शिक्षा मिळालेली दिसतेय. जर चांगले निकाल आणले असते तर जास्त मंत्रीपदं मिळाली असती.
-नाठाळ नठ्या
10 Jun 2024 - 8:30 pm | पॅट्रीक जेड
शिंदेंचा स्ट्राईक रेट ३ नंबरचा आहे.
१) राष्ट्रवादी- शरद पवार८/१०
२) काँग्रेस १३/१७
३)शिवसेना- शिंदे गट ७/१५
४)शिवसेना- ठाकरे गट ९/२१
५) भाजप- ९/?
६)राष्ट्रवादी- अजित पवार गट १/?
भाजपा पेक्षाही चांगला स्ट्राईक रेट आहे शिंदे गटाचा.