भारतातील विधानसभा निवडणूका २०२४

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
2 Jun 2024 - 3:27 pm
गाभा: 

सध्या भारतीय प्रजासत्ताकाच्या १८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे वारे वाहत आहेत. कालच्या एक्झिट पोल निकालांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. "मोदींची 'अब की बार चार सौ पार' घोषणा सार्थ ठरली" असा आनंद रालोआ गट व्यक्त करणार की "मोदींची ती घोषणा व्यर्थ ठरली" असा आनंद इंडी गट व्यक्त करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल.

लोकसभेच्या निवडणुकांशिवाय काही राज्यांत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही होत आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी विधानसभेच्या रिक्त जागांवरदेखील निवडणुका होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे. विषयानुरुप, अभिनिवेशरहित, न-अप्रस्तुत प्रतिसादांसाठी आधीच धन्यवाद.

अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभांचे मतमोजणी होऊन तेथील निकाल आजच जाहीर होत आहेत.

सिक्कीममध्ये रालोआचा घटक पक्ष सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा एकदा ९७% जागा मिळवून सत्ता प्राप्तीकडे वाटचाल करत आहे. प्रेमसिंग तमांग हे पुन्हा एकदा मुखमंत्री होतील.

अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजपने तीन-चतुर्थांशाहुन अधिक जागा (६०/४६) मिळविल्या आहेत. (गुजरातेतील सुरतला भाजपचे लोकसभा उमेदवार मुकेश दलाल हे आधीच बिनविरोध निवडून आले आहेत त्याप्रमाणे) अरुणाचलात भाजपचे चक्क दहा विधानसभा उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधानसभा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा तिथे थोडा इतिहास आहे. मुखमंत्री पेम खांडू हे बहुधा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.

आंध्र प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत; मतमोजणी मंगळवारी होईल. तेथील वैएस्सार काँग्रेसचे मुख्यमंत्री अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांना बहुधा खुर्ची सोडावी लागेल. रालोआ घटक पक्ष चंद्राबाबू नायडूंचा तेलगू देशम, भाजप, आणि पावन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागच्या २५-३० वर्षांत जेंव्हा जेंव्हा बाबूंनी भाजपाची साथ सोडली, सत्ता गमावली आणि जेंव्हा जेंव्हा भाजपशी युती केली, सत्ता मिळवली हा इतिहास आहे!

याशिवाय अनेक राज्यांत विधानसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक झाल्या आहेत. यात हिमाचल प्रदेश ६, गुजरात ५, उत्तर प्रदेश ४, पश्चिम बंगाल २, बिहार, तेलंगणा, हरयाणा, झारखंड, कर्नाटक, त्रिपुरा, राजस्थान प्रत्येकी १ यांचा समावेश आहे.

तेलंगणातील सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट विधानसभा उपनिवडणूक १३ मे रोजी पार पडली. तेथील आधीच्या आमदार लस्या नंदिता या वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी अपघातात मरण पावल्या होत्या. नंदितांच्या भगिनी निवेदिता या भारत राष्ट्र समितीच्या उमेदवार आहेत. त्या बहुधा सहज निवडून येतील.

या सर्वांची मतमोजणी - निकाल मंगळवारी जाहीर होईल.

---

पृच्छा: अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेम खांडू, आसामचे मुखमंत्री हिमंत कुमार बिस्वा, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड या तिघांमध्ये काय साम्य आहेत?

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

5 Jun 2024 - 2:34 pm | अहिरावण

>>>अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेम खांडू, आसामचे मुखमंत्री हिमंत कुमार बिस्वा, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड या तिघांमध्ये काय साम्य आहेत?

तिघेही होमो सेपीयन म्हणजेच मानव आहेत असे जाणकार म्हणतात.