मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in काथ्याकूट
30 Apr 2024 - 5:03 pm
गाभा: 

गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते.

सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल.

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते.

पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही.

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

प्रतिक्रिया

भागो's picture

30 Apr 2024 - 5:14 pm | भागो
भागो's picture

30 Apr 2024 - 5:14 pm | भागो
Vichar Manus's picture

30 Apr 2024 - 6:21 pm | Vichar Manus
Vichar Manus's picture

30 Apr 2024 - 6:21 pm | Vichar Manus
अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2024 - 6:27 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2024 - 6:28 pm | अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली's picture

30 Apr 2024 - 6:28 pm | अमरेंद्र बाहुबली
माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Apr 2024 - 11:15 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Apr 2024 - 11:33 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Apr 2024 - 11:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
रात्रीचे चांदणे's picture

1 May 2024 - 8:36 am | रात्रीचे चांदणे
रात्रीचे चांदणे's picture

1 May 2024 - 9:19 am | रात्रीचे चांदणे

गेल्या ५ वर्षात भाजपाने एव्हढी फोडाफोडी केली आहे की बऱ्याच लोकांना राजकारण आणि राजकारणी लोकांचा तिटकारा आलेला आहे. हे पण एक कमी मतदान होण्याचं कारण आहे.ED, CBI आणि फोडाफोडी करून भजपाच सत्तेत येणार हे भरपूर भजपा समर्थकांचा म्हणणं आहे त्यामुळे मतदानासाठी उत्साह नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:26 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत. मत मागायला आलेल्या कार्यकर्त्याना लोक हाकलंक लावत आहेत.

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 5:49 pm | चौकस२१२

ED, CBI आणि फोडाफोडी करून भजपाच सत्तेत येणार

का लोकं काय मूर्ख आहेत का? आणि असतील तर मग भोगा .. इंदिरा अम्मा गेल्यानंतर राजीव बाबूंना ४००+शीटा दिलाय ना लोकांनी ते चालतं

रात्रीचे चांदणे's picture

1 May 2024 - 6:01 pm | रात्रीचे चांदणे

अस झालेलं नाही का?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:41 am | अमरेंद्र बाहुबली

जर्क जिंकणारा चोरच असेल नी सरकार बदलले तरी तो भाजप मध्ये जाऊन तोडीपानी करुन क्लिनचीट करवुंक घेतोय. भाजपप्रवेश झाला की भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आयोप लावले होते त्यांच्या फायली इड़ीला सापडत नाहीत किंवा पुरावे अचानक गायब होतात. ज्यांच्यावर मोदीनी आरोप लावेलेल असतात त्यांच्याच साठी मोदी मते मागत फिरतात. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर मोदी बोलतात नी चार दिवसाने त्याना मंत्रिमंडळात घेतात. कुणाचीही चाड नाही. शेफाली वैद्य वगैरेसारखे लोक बोलतात की भाजप ४०० पार साठी आम्हि भ्रष्टाचार खपवून घेऊ. निवडणूक आयोग खुलेआम भाजपसाठी काम करत. मग निवडणुका घेण्याचं नाटक तरी का केलं जातं??
लोक मूर्ख आहेत का मतदान करायला? मला तर वाटतं जे लोक मतदानाच्या सुटी वर मस्त चील मारायला शहराबाहेर जातात ते खरे हुशार. शहरात थांबून उन्हात मतदान करनारे नी स्वतःला लोकशाहीचा आधारस्तंभ समजणारे पारकोटिचे मूर्ख आहेत.

भागो's picture

1 May 2024 - 11:34 am | भागो

अमरेंद्र बाहुबली +१

अहिरावण's picture

1 May 2024 - 10:03 am | अहिरावण

तर हे आता नवे टुलकीट आहे.

इव्हीएम ला दोष देता येत नाही... लोकांमधे अनास्था आहे म्हणून मतदान झाले नाही म्हणून आम्ही हरलो नाहीतर बीजेपीची पुरी वाताहात केली असते.

- बिगुल दारुवाला

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 10:55 am | अमरेंद्र बाहुबली

कंट्रोल जेम्स वांड साहेब.

बाहुबली नामक सदस्य सगळिकडे बिनडोकासारखे आरोप करत असतांना संपादक मंडळ काय झोप काढत आहे का? उठा संपादकांनो जागे व्हा आणि सदर सदस्याला समज द्या.

अहिरावण's picture

1 May 2024 - 11:36 am | अहिरावण

आणि त्यांच्याकडे मीच जेम्स वांड नामक जुना आयडी असल्याचे पुरावे असतील तर माझा आयडी जाहीररित्या ब्लॉक करा... नसेल तर त्यांना जाहीर समज द्या. त्यांना ब्लॉक करु नका... मिपावरचे फुकट मनोरंजन बंद पडेल... =))

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

कंट्रोल वांड साहेब, तुमचा आयडी उणापुरा ११ महिन्यांचा. (नेमका त्याच वेळी जेम्स वांड नावाचा आयडी बॅन मारला गेला होता :) ) पण तुम्हाला मिपाचा १५ ते २० वर्षाचा इतिहास पाठ आहे. मी हे पकडल्यावर तुम्ही पुन्हा मीपाचा इतिहास उगाळला नाही.
ह्यावरून सिद्ध होते की तुम्ही डू आय डी आहात. आता कुणाचे हा प्रश्न निराळा. पण लेखन शैली वांड साहेबांशी हुबेहूब जुळते नाही? :)

अहिरावण's picture

1 May 2024 - 7:03 pm | अहिरावण

चालू द्या !! ४ जुनला बोलू... !! तोवर रडत रहा =))

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:24 pm | अमरेंद्र बाहुबली

त्याचा नी तुमचा डूआयडी कोण ह्याचा काय संबंध?

अहिरावण's picture

2 May 2024 - 9:31 am | अहिरावण

परमेश्वरा या बाळाला थोडी अक्कल दे रे !!

वर्किंग डेला मतदान ठेवून मग त्या दिवशी मतदानाची सुट्टी देण्याऐवजी अधिकाधिक जागी मतदान रविवारीच का ठेवत नाहीत? संबंधित कर्मचाऱ्यांना नंतर कंपेन्सेटरी ऑफ देता येईल.

मतदानाला रविवार जोडून सुट्टी येणे किंवा घेणे आणि बाहेर फिरायला जाणे हे यामुळे कमी होऊ शकेल. आणि असंख्य आस्थापनांना एक दिवस काम बंद ठेवायला लागल्याने होणारे नुकसान टळेल.

हा प्रश्न बाळबोध असू शकतो हे मान्यच. यावर विचारच झाला नसेल असेही नाही.

अहिरावण's picture

1 May 2024 - 11:33 am | अहिरावण

सरकारि आस्थापना आणि आयटी सोडल्यास शनीवार रविवार सुट्टी असते असे नाही. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यानुसार वेगबेगळ्या वारी उद्योग बंद असतात. इतरत्र सुद्धा तसेच असावे. नक्की कल्पना नाही.

लोकशाहीसाठी एक दिवस काम बंद ठेवल्याने फारसे नुकसान होत नाही. करोनामधे जितका काळ बंद ठेवावे लागले होते त्यापेक्षा बराच कमी काळ १९५२ पासून आजवर बंद राहिले असेल.

काम काम काम पैसा पैसा पैसा एवढंच जीवन नसते.

तांत्रिक दृष्ट्या योग्यच आहे हे तुम्ही म्हटलेले.

"शनिवार रविवार आयटी पांढरपेशे" हा मुद्दा ध्यानात घेऊनच शनिवार टाळून फक्त रविवारचा उल्लेख केला होता. अनेक आस्थापने 24*7 चालू असतात हे खरेच. पण तरीही इतर कोणत्या तरी दिवसापेक्षा रविवारी मतदान असल्यास खूप जास्त लोकांना आपसूक साप्ताहिक सुट्टी जुळून येईल हा मुद्दा अगदीच अप्रस्तुत आहे का? Reasonably common holiday is Sunday असे नाहीये का?

अहिरावण's picture

1 May 2024 - 7:07 pm | अहिरावण

>>>Reasonably common holiday is Sunday असे नाहीये का?

नाहीये.

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 10:39 am | कर्नलतपस्वी

आधीच काहीशी परिस्थिती विरोधकांची झालीये. म्हणे,"सात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा', कुणाचा कुणाला मेळ नाही. सगळेच म्हणतात," टेरीवर हाणा पण बाजीराव म्हणा". पंतप्रधान कोण विचारलं तर यांची आवस्था,"वेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव", आशी म्हणून गाणे म्हणावेसे वाटते "मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे".

विरोधकांची एव्हढी भंबेरी उडाली आहे तरी म्हणतात "भेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा".

इ व्ही एम ला पूर्णविराम लागल्यानंतर आता मतदार उदासीन हा नवीन जुमला चार जुन नंतर कामाला येईल.

एव्हढं वाटतं तर बाहेर काढा समर्थकांना आणी करायला लावा मतदान. आडवा चारशे पार लक्ष ठेवणाऱ्यांना.

मतदानाची सुट्टी घेणार,कोकण,कोडाई कॅनॉल उटी जाणार.....
वाह रे वाहा.

मी व माझे कुटुंब मतदान करणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 10:58 am | अमरेंद्र बाहुबली

भारतीयक लोकशाहीत पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करावाच असक दंडक नाही. तसेच विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार “नकली डिग्रिवाला” नसेल एवढ्क निश्चित आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 11:02 am | अमरेंद्र बाहुबली

मी मित्रांसोबत लोणावळा किंवक dusaryaq कुठल्यातरी धबधब्यावर जाणार आहे. मी बाहेर असल्याने घरातलेही जाऊ शकणार नाहीत. पाच मित्रांच्याही कुटुंबाची हीच अवस्था असेल. निवडणुका आयोगाला सांगा पुढल्या वेळी मोदीना मदत करण्यापेक्षा सरल्क विजयिक घोषित करा. म्हणजे निवडणूक घेण्याचाक जो देखावा केला जातो त्याचा खर्च आहेच. कुणी बोंबलला ह्याविरुध्द तर त्याला केजरीवाल ह्याच्यासारख जेल मध्ये टाका.

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करता येतो याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या वृत्तीबद्दल!

पण अशक्त, केविलवाण्या सरकारांनी जे काम केलं त्याच्या जवळपास देखील कामगीरी नाही. आणि असेल कशी? छान छोकीनं रहायचं आणि बेताल भाषणं करायची यापेक्षा जास्त वकुबही नाही.

कांदा लिंबू's picture

1 May 2024 - 1:46 pm | कांदा लिंबू

पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीपूर्वी जाहीर करता येतो याला सर्वोच्च महत्त्व देण्याच्या वृत्तीबद्दल!

कुणी दिलं, कुठं दिलं?

मदनबाण's picture

1 May 2024 - 11:32 am | मदनबाण

१० वर्ष म्हणजे एक दशक ! एक पिढी या काळात पुढे सरकते. मोदी सरकारला याच मध्यम वर्गाने सलग दोनदा प्रचंड बहुमत दिले, याचे मुख्य कारण म्हणजे हा पिचलेला मध्यम वर्ग भ्रष्टाचार, अनाचार याला कंटाळला होता. त्यांना मोदींनी सांगितले ना खाऊंगा ना खाने दुंगा. सबका साथ सबका विकास !
पण प्रत्यक्षात या दशकात हे स्वप्न दाखवणार्‍या मोदींनी मुस्ल्मिम तुष्टीकरणाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले ! त्यांनी ३०० योजना राबवल्या ज्याचे मुख्य लाभार्थी मुस्लिम समाजच ठरला ! इकडे हिंदू मुली ३५ तुकड्यात कापल्या जात होत्या आणि तिकडे तुष्टीकरणात मग्न असलेले मोदी याच मध्यम वर्गाच्या कष्ट करुन कमावलेल्या रक्ताचा घामाचा पैसा प्रातिकरच्या माध्यमातुन ओरबाडुन काढुन फक्त मुस्लिम समाजातील मुलींसाठीच राबवल्या जाणार्‍या शादी शगुन योजनेत वाटत बसले होते, प्रत्येक मुलीला ५१००० असे है पैसे वाटले गेले.१० वर्ष मोदी आत्ममग्न राहुन मन की बात करत बसले पण जन की बात ऐकायला मात्र पूर्णपणे विसरले.
ज्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान १५ ऑगस्टला भाषण देतात त्यावर खलिस्तानी शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातुन चालुन गेले आणि त्यांनी झेंडा खाली उतरवला, पण सरकार फक्त बघ्याच्या भूमिकेत राहिले. हेच लोकांनी शाहीन बाग आंदोलनाच्या वेळी देखील पाहिले आणि अनुभवले ! मणिपूर तर आजही जळते आहे यात सरकारचे मोठे अपयशच दिसुन आले.
वक्फ बोर्ड ही समांतर न्याय प्रणाली जी घटनाबाह्य असुन राष्ट्राच्या आणि हिंदू जनतेच्या मूळावर उठलेली आहे त्याला या सरकारला १० वर्षात बरखास्त केले नाही ! का ?
उलट शहरी वक्फ संपत्त्ती विकास योजना मोदींनी राबवली आणि लाखो कोट्यावधी चे अर्थ सहाय्य दिले ! हे असे राष्ट आणि हिंदू हित साध्य केले जाते ?
मुसलमाना तुष्टीकरणाची मोदींना इतकी झिंग चढली की त्यांनी त्यांना फ्री युपीएसी कोचींग देखील दिले.युपीएसी जिहाद नावाचा प्रकार घडत असल्याचे सुदर्शन न्यूज़ ने सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकार त्यांच्या विरोधात न्यायालयात गेले.
या दशकात सगळ्यात भयानक काळा होता तो म्हणजे करोना काळ. या कालावधीत अनेक लोकांचे उध्योग धंदे / व्यवसाय ठप्प झाले, काही कायमचे बसले तर अनेकांच्या नोकर्‍या देखील गेल्या. यात प्रामुख्याने गरीब, मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गातील लोक अधिक होते.या वर्गासाठी सरकारच्या मनात कोणतीही दया निर्माण झाली नाही ना त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार ने प्रयत्न केला. सगळं राम भरोसे !
हाच मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग आयकर नावाच्या लुटीत पिचला गेलेला आहे, हा वर्ग आयकर भरण्या बरोबरच इतर सर्व प्रकारचे कर भरत असल्याने आता हा वर्ग आर्थिक दृष्ट्या विकलांग झालेला आहे.मोठ्या मोठ्या बाता मारणार्‍या मोदींनी आयकर प्रणाली बलण्याची बडबड केली होती पण केले काहीच नाही ! उलट जमेल तिथे लोकांची आयकर विभागाचा उल्लेख करुन विनोद निर्मीती करण्याचा प्रयत्न मात्र करताना ते सातत्याने दिसले ! देशातील ९७% लोक आयकर भरत नाहीत म्हणजेच ३% आयकर भरणार्‍या मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गाची आर्थिक पिळवणूक या सरकारने देखील १० वर्ष सुरुच ठेवली.आयकर समाप्त करुन या वर्गाचे जो त्यांचा प्रमुख मतदाता आहे त्यांना आर्थिक दृष्ट्या बळ देणे मोदींना सहज शक्य होते पण त्यांनी ते केले नाही, डॉ सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी या विषयावर एका मुलाखतीत भाष्य देखील केलेले आहे त्यात ते म्हणतात की ते हा आयकर कायमचा रद्द करण्या बद्धल ते मोदींना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत्,तसे केल्यास या देशातील जनता रस्त्यावर आनंदाने नाचेल पण मोदींनी काही त्यांचे ऐकलेले दिसत नाही !
पार्टी विथ डिफरन्स असे म्हणणारी भाजपा आता पार्टी विथ नो डिफरन्स झाली हे सामान्य जनतेला दिसते आहे. ज्यांनी मोदींना शिव्या-शाप दिले ते आणि मोदींनी / भाजपाने ज्यांना नावे ठेवली, फार मोठ्या भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गैरवर्तनाचे आरोप केले ते सर्वच आता भाजपात आहेत. सत्ता टिकवण्यासाठी कोणात्याही थराला जाण्याच्या स्थितीत भाजपा आता आलेली आहे हे उघडपणे दिसते. ना खाऊंगा ना खाने दुंगा फक्त घोषणाच होती आणि सबका साथ सबका विकास ! हा जुमला हिंदूंसाठी ठरला विकास मात्र मुस्लिम समाजाचाच केला गेला हे उघड झाले. खरं वाटत नाही ना ?
मग एक उदा. देतो :-
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात के मुसलमानों को एक बेशकीमती तौफा दिया हैं। मोदी की अध्यक्षता में कल सरकार ने गुजरात के सपाई और पतनी जमात या तुर्क जमात के मुसलमानों को भी अन्य पिछड़ी जाति यानी ओबीसी की सूचि में शामिल किया हैं। अब इस जाती के अंतर्गत आने वाले लोगो को केंद्र सरकार की नौकरियों और संस्थानों में ओबीसी कोटे के तहत आरक्षण का लाभ मिलेगा।

निवडणूक रोखे घोटाळा म्हणजे 'मोदीगेट' हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे सध्याचे अर्थमंत्री असलेल्या निर्मला सितारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी उघडपणे सांगितले आहे. हे संपूर्ण प्रकरणच तर आता पूर्णपणे दाबले गेल्याचेच भासत आहे.

भाजपाने नक्कीच इतर अनेक चांगली कामे केली आहेत आणि त्याचे त्यांना श्रेय द्यायलाच हवे परंतु मोदींच्या अतिरेकी मुस्लिम तुष्टीकरण्याच्या नितीने त्यावर पुरता बोळा फिरवला आहे इतके मात्र नक्की !

जाता जाता :- आता मला सांगा हे सर्व अनुभवल्यावर मध्यम वर्ग कोणत्या अपेक्षेने मतदानास जाईल ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HD

म्हणजेच राहुल गांधी होप्णार ना पीएम... बास झाले.. आम्ही खुश !! तुम्ही खुश !!

मदनबाण, दुर्दैवाने तुमच्या प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे.

---

हिंदूंना भारत नामक भूभागावर किमान सन्मानाने शिल्लक राहता यावे म्हणून मोदींनी हिंदूंनी मते दिली. तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी सरकारने मागच्या दहा वर्षांत हिंदूंच्या हिताचे एकही काम केलेले नाही.

त्यापेक्षा त्याआधीचे सरकार किमान आपल्या मुख्य मतदारांशी प्रामाणिक होते. "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" असे ठणकावून सांगण्याची त्यांच्यात धमक होती आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांच्यात हिंमत होती. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात तशी धमक कधीही दिसली नाही.

---

तीस्ता सेटलवाड आणि नुपूर शर्मा किंवा मोहम्मद जुबैर आणि टी राजा सिंह यांची तुलना नेमके हेच अधोरेखित करते.

हिंदुंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी सरकारने मागच्या दहा वर्षांत हिंदूंच्या हिताचे एकही काम केलेले नाही.
मी स्वतः माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत जात असे. परंतु आत्ताचा संघ हा मुस्लिम चाटुकारिता करणारा आहे असे माझे मत बनले आहे. मोहन भागवतांनी केलेली अनेक विधाने ही मुस्लिम तुष्टीकरणारी आहेत आणि हे हिंदू विरोधी धोरण आहे.
१० वर्षात हजारो हिंदू मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकल्या, अनेक बलात्कारीत झाल्या, अनेक पळवुन धर्मांतरीत केल्या गेल्या, अनेकांवर सामुहिक बलात्कार केले गेले, अनेक मुलींना लग्न करुन वारंवार त्यांचे गर्भपात केले गेले, अनेक मुलींचे लग्न केल्या नंतर त्याच कुटुंबातील इतर मुस्लिम पुरुषांनी शरीराचे लचके तोडले.
पुण्याच्या मंचर मधील हिंदू मुलीचा व्हिडियो पाहुन मी ढसा ढसा रडलो होतो, तिची जेव्हा सुटका केली गेली तेव्हा ती काळ्या बुरख्यात सापडली. तिला पळवुन तिचे वारंवार लचके तोडले गेले एका वेश्ये सारखे तिला विकले गेले आणि खरेदी केले गेले. तिच्या अंगभर सिगरेटचे डाग देण्यात आले. कोणत्या तरी गोळ्या देऊन तिला दिवसभर नशेत ठेवले जायचे आणि दिवसाला ३-४ वेगवेगळे जिहादी येऊन तिचा बलात्कार करायचे ! गोमास खाऊ घालायचे आणि जबरदस्तीने नमाज पढायला लावायचे. असा अत्याचार तब्बल ४ वर्ष तिच्यावर झाला ! ती इतकी मानसिक धक्यात होती की सोडवल्या समोर दिसणार्‍या प्रत्येक पुरुषाला ती पाहुनच घाबरत होती, ज्यात तीचे वडिल देखील होते. :( [ इतक सगळं समोर दिसत असताना न्यूज चॅनलचा संवादात विचारतो , हे प्रकरण लव्ह जिहादच म्हणायचं का ? अश्या प्रकारे बातमी देणारा इतका *डू व्यक्ती मी याधी कधीच ऐकलाच नव्हता. ]
https://www.youtube.com/watch?v=09rIclOac-4 [मी मूळ व्हिडियो पाहिलेला आहे इथे दिलेले व्हिडियो त्याच घटनेचे आहेत पण ते संपूर्ण नाहीत. ]
४ वर्षाच्या हिंदू मुलीला देखील जिहादी हैवान आता सोडत नाहीत आणि हिंदू मुलींचे तुकडे असलेल्या सुटकेस देशभर सापडत आहेत ! हा कोणता विकास ?
आता मतदानाची वेळ आल्यावर मोदींना हिंदू मुलींची आठवण येऊ लागली आहे.

नुपूर शर्मा तर भाजपाचीच होती ना ? काय चूक बोलली होती ती ? तिच्या विधानाशी नुसती सहमती दर्शवणार्‍यांचे गळे चिरले गेल्याची तुम्ही पाहिले ना ?
पण सत्तेत असलेल्या तिच्याच पक्षाने आणि मोदींनी तिची साथ सोडली, तिला पक्षातुन काढुन टाकले आणि जिहादी लांडग्यां समोर टाकुन दिले. सगळ्या जगाने हे पाहिले, जो मोदी स्वतःच्या पक्षातील नुपूर शर्माला वाचवु शकत नाही, तीची साथ देऊ शकत नाही तोच मोदी तुमच्या स्त्रियांची कसली घंट्याची रक्षा करणार ?

हिंदू संवेदनाहीन झाले आहेत इतक मात्र मला स्पस्ट दिसतय ! त्यांना स्व्तःला आई आहे, बहिण आहे, बायको आहे , मुलगी आहे याचे भान राहिले आहे का ? तेच मला समजेनासे झाले आहे,कारण आज त्यांच्या घरातील स्त्री ची भयानक अवस्था झालेली नाही,पण उद्याचे काय ?

जाता जाता :- जगात सगळ्यात जास्त विटंबना ही हिंदू स्त्रियांची झालेली आहे, अनेक शतके बदलली पण त्यांच्या वाटेला मात्र केवळ विटंबनाच आली आणि आजही ही परिस्थीती बदलत नाही हे अधिक वेदनादायी आहे. जो पर्यंत मुस्लिम तुष्टीकरण करणार्‍या कोणत्याही पक्षाला हिंदू मत देणे बंद करणार नाहीत तो पर्यंत हिंदू स्त्रियांची ही विटंबना थांबणार नाही, याला हिंदूच जवाबदार आहेत आणि स्वतःच्या स्त्रियांची सुरक्षा करण्यात आणि विटंबना थांबण्यात ते भयानक पद्धतीने अपयशी ठरले आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HD

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:41 pm | अमरेंद्र बाहुबली

पुण्याच्या मंचर मधील हिंदू मुलीचा व्हिडियो पाहुन मी ढसा ढसा रडलो होतो, मदनबाण मंचरचा व्हिडीओ पाहून रडलेला मला वाटलं होतं मी एकटाच आहे. मीही प्रचंड अस्वस्थ झालो होतो तो व्हिडीओ पाहून. भयानक मानसिक अवस्था झाली होती माझी, महिनाभर मला काही सुचत नव्हते. ती मुलगी कुणीही संकर आलं की डोळ्यापुढे हात धरायची. फार भयानक होतक तो व्हिडीओ. ह्यावर मात्रा म्हणून पुढील महिनाभर भगवा जिहाद वर जे काही सापडेल ते वाचले. आताही लव्ह जिहाद वर काहीही वाचायची माझी हिंमत होत नाही. विचित्र मानसिक अवस्थेत जातो मी.

हिंदू संवेदनाहीन झाले आहेत इतकं मात्र मला स्पस्ट दिसतय खरं आहे.
आणी ह्यामुळे माझा भाजप पक्षावरचा राग अजून वाढला आहे अरे ज्या हिंदू मतांवर तुम्ही निवडून आलात त्यांच्यासाठी एक टक्कर तर काम करा. ह्याना फक्त निवडणूकवेळीच हिंदू आठवतो. नुपूर शर्माबद्दल काय बोलावे. बिचाऱ्या त्या स्त्रीच्या मागे कुणीही उभे राहिले नाही. इतक्या मोठ्या पदावरच्या स्त्री मागे कुणीही नाही तर उद्या एखाद्या जिहादी लांडग्याशी लढणाऱ्या मुलीमागे कोण उभे राहिल?? नुपूर शर्मा शी जो मुस्लिम व्यक्ती डिबेट करत होता तो मात्र देवांना शिव्यादेऊनही सुरक्षित आहे. नुपूर शर्माला सपोर्ट करूनही काही लोकांचे गळे कापले गेले. त्याना न्याय मिळेल ह्याची शक्यता कमीच. बिचारा तो राजस्थानातला टेलर. कसा गळा चिरला गेला त्याचा??… लिहिलं जात नाही. काही मूर्ख लोकं वाटतं की ह्यावर भाजप हे सोल्यूशन आहे. पण त्या मूर्खाना मागच्या १० वर्षात हिंदूंसाठी भाजपने काहीहि केले नाही हे दिसत नाही.

रामचंद्र's picture

1 May 2024 - 10:33 pm | रामचंद्र

अबा, तुमची ही तळमळ बहुतेक जण समजूनच घेत नाहीत असं वाटतं.

अमरेंद्र बाहुबली तुम्हाला हिंदूंचा कळवळा कधीपासून आला ?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 10:07 am | अमरेंद्र बाहुबली

सर मी आधीपासूनच हिंदुत्व आहे. बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात आहात म्हणे. तुम्हाला हिंदूंचा कळवळा न येणं साहजिक आहे.
साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो.

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 10:13 am | चौकस२१२

बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात आहात म्हणे. तुम्हाला हिंदूंचा कळवळा न येणं साहजिक आहे.
काढलं परत मी कुठे राहतो ते !
एकीकडे मला हिंदूवादी भक्त गणात मोजता आणि दुसरीकडे म्हणत बाहेरदेशी राहतोय म्हणून हिंदूंबद्दल कळवलं नसणार? आ?
साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो.
काय वाटेल ते सावरकरांचा बुडला ? गांधींचा बुडला ? डॉक्टर आंनदीदीबाईंचा बुडला ?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 10:21 am | अमरेंद्र बाहुबली

हिंदूवादी भक्त गणात मोजता कशाला खोटे लेबल लाऊन घेताय?? मी अंधभक्त ह्या गणात मोजतो. अंधभक्त नी हिंदुवादी ह्यांचा काहीहि संबंध नाही. शंकराचार्यांची आई बहीण काढणारे हिंदुवादी कसे होऊ शकतील? (तूम्ही नाही. जनरल इतर अंधभक्तानी काढलि होती)

काय वाटेल ते सावरकरांचा बुडला ? गांधींचा बुडला ? सावरकरांनी खुलेआम सांगितल गोमांस खा. मानतक का सावरकरणा?? मग तिकडे चंगळ असेल.

बाकी तुम्ही मला विचारलकी कधीपासून हिंदुत्ववादी झालात? सांगू इच्छितो की हिंदूंमध्ये राहून हिंदूंसाठी जे जे करता येईल ते मी करत असतो. ख्रिस्ती देशात राहून ख्रिस्तींची सेवा करुन स्वतःला हिंदुत्ववादी नाही म्हणवून घेत. थोडक्यात उंटावरून शेळ्या नाही हाकत.

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 10:37 am | चौकस२१२

सावरकरांनी खुलेआम सांगितल गोमांस खा. मानतक का सावरकरणा??
हो मानतो कारण तर्क शुद्ध आहे ते याचा अर्थ केवळ ख्रस्ती बहुल देशात राहतो म्हणजे गोमास काय मास खातोच हे कसे गृहीत धरता ?
तुमहाला काय प्रदेशात राहणार्यांबद्दल राग आहे कोण जाणे
ख्रिस्ती देशात राहून ख्रिस्तींची सेवा करुन स्वतःला हिंदुत्ववादी नाही म्हणवून घेत.
असे असतंय का मग तुम्ही जिथे नोकरी करता त्या कंपनीला ख्रिस्ती लोकनकडून पैसे मिळत असेल ना तर घेऊ नका तेवडः पगार
काय वाटेल ते ... हा देश सर्वधर्म संभावी आहे याचा अर्थ काय वाटेल ते नाही तर एक देश एक कायदा पंचतंय का ?

रामचंद्र's picture

1 May 2024 - 2:06 pm | रामचंद्र

अगदी आत्तापर्यंत कडवे मोदी-भाजपसमर्थक असलेल्या अशा लोकांचे असे मतपरिवर्तन आश्चर्यकारक आहे.
<प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने गुजरात के मुसलमानों... को भी अन्य पिछड़ी जाति यानी ओबीसी की सूचि में शामिल किया हैं>
मग कॉन्ग्रेसने कर्नाटकात काय वेगळे केले?

मग कॉन्ग्रेसने कर्नाटकात काय वेगळे केले?

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे काँग्रेसने जाहीर केले आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्नाटकात मुसलमानांना आरक्षण दिले. ते त्यांच्या घोषित उद्दिष्टांशी किमान प्रामाणिक आहेत. संघप्रणीत भाजप त्यांच्या घोषित-अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का?

रामचंद्र's picture

1 May 2024 - 2:57 pm | रामचंद्र

मोदींनी आपल्या सत्तेसाठी पक्षाला आणि संघाला आपल्या दावणीला बांधले आहे असे दिसते. संघाच्या शंभर वर्षांच्या मेहनतीची फळे खाऊन, पक्षसंघटन आणि मोदींच्या धडाडी-डावपेचांमुळे सत्ता आली आहे, हे मोदींचे एकट्याचे कर्तृत्व नाही.
रामभाऊ म्हाळगींसारखे लोक आता (कुठल्याही) पक्षात नाहीत हे दुर्दैव.

उग्रसेन's picture

1 May 2024 - 3:34 pm | उग्रसेन

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही

" देशाच्या विकासाची फळं एकसमान पद्धतीने अल्पसंख्यकांना, विशेषत: मुस्लिमांनाही मिळावीत यासाठी आपण कल्पक योजना राबवायला हव्यात. देशाच्या संसाधनावर त्यांचा पहिला अधिकार असायला हवा'' असे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते.

विद्यमान पंतप्रधान सत्ता निसटून जाते की काय भितीने वाटेल तसं बोलत आहेत. भक्तांनी तरी विवेक बाळगला पाहिजे.

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे विधान प.मोदी प्रचारासाठी मतांसाठी वापरत आहेत. हे विधान काँग्रेसचे नाही

असे नाही. मोदी काय प्रचार करत आहेत याच्याशी संबंध नाही. यावर मिपावर आधीही चर्चा झालेली आहे.

मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान या नात्याने केलेले वक्तव्य -

"I believe our collective priorities are clear: agriculture, irrigation and water resources, health, education, critical investment in rural infrastructure, and the essential public investment needs of general infrastructure, along with programmes for the upliftment of SC/STs, other backward classes, minorities and women and children. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. The Centre has a myriad other responsibilities whose demands will have to be fitted within the over-all resource availability."

"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" हे त्याचे सार आहे.

अर्थात काँग्रेस त्यांच्या घोषित / अघोषित उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे आणि त्यांची प्रत्यक्ष कृतीही तशीच आहे. संघप्रणीत भाजप मात्र हिंदूहितवादी असल्याचा दावा करते, प्रत्यक्षात मात्र नेमके उलटे वागते!

---

अवांतर: जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २०११ प्रस्ताव पहा.

भागो's picture

1 May 2024 - 5:28 pm | भागो

https://thewirehindi.com/272820/loksabha-polls-manmohan-singh-modi-muslims/
वाचा.
जेव्हा ट्रंप अशाच प्रकारच्या फेका फेकी करत होता तेव्हा अमेरिकेत एकाने एक वेबसाईट उघडली होती. रोजच्या फेका काऊंट मोजण्यासाठी. मला वाटतंय आता इकडे पण अशी वेबसाईटची गरज आहे.

उग्रसेन's picture

1 May 2024 - 6:37 pm | उग्रसेन

प. मोदींनाच अर्थ कळला नाही. भक्त तरी काय करतील बिचारे.

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 5:36 pm | चौकस२१२

मतदान न करणे हा काही उपयाय नाही मग तो श्रीमंत असो वा मध्यम वर्गीय कि गरीब
काही देशात मतदान ना केलं तर दंड आहे ( खरंच हे पहा https://www.aec.gov.au/Elections/non-voters.htm
अनि भाजप ने तुमच्या सर्व पेक्षा पूर्ण केली नाहीत म्हणून मग काय काँग्रेस वर्षूनवर्षे सत्ता द्यायची का?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:25 pm | अमरेंद्र बाहुबली

मदनबाण +१, तुमच मतपरिवर्तन झाल ही आनंदाची गोष्ट आहे. मीपावरील अंधभक्तांचे डोळे उघडतील तो सुदीन.

लोक मूर्ख आहेत का मतदान करायला? मला तर वाटतं जे लोक मतदानाच्या सुटी वर मस्त चील मारायला शहराबाहेर जातात ते खरे हुशार. शहरात थांबून उन्हात मतदान करनारे नी स्वतःला लोकशाहीचा आधारस्तंभ समजणारे पारकोटिचे मूर्ख आहेत.

अबा भाषा सांभाळा. या देशात साठ सत्तर टक्के लोक मतदान करतात. एव्हढ्या लोकांना मुर्ख म्हणणे कितपत शहाणपणाचे आहे.....

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 2:44 pm | अमरेंद्र बाहुबली

कर्नल साहेब, मी देखील त्या सत्तर टक्क्यात होतो. पण आताची परिस्थिती पाहा. देशात लोकशाही राहिली आहे का?? निवडणूक आयोग उघडपणे मोदीसाठी काम करतोय. मग अश्या वेळी मतदान घेण्याची तरी औपचारिकता निवडणूक आयोग का करतोय?? अश्या वेळी मतदान करणारे मूर्ख नाहीतर आणखी काय ठरतात?

रामचंद्र's picture

1 May 2024 - 3:00 pm | रामचंद्र

ठीक आहे, मोदींविरोधात योग्य वाटेल त्या उमेदवाराला आपले मत देऊन कर्तव्य पार पाडा आणि मग छानपैकी पिकनिकला जा!

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 4:06 pm | कर्नलतपस्वी

सहमत.

मतदान टक्का वाढेल तर काही फरक पडू शकेल. जशी सत्ताधाऱ्यांची संख्या वाढेल तशीच विरोधकांची पण वाढेल.

कदाचित Law of Satiety च्या अनुसार केवळ विरोधकांच्या सदस्य संख्येत वाढ होईल व सत्तारूढ पक्षावर अंकुश ठेवता येईल.

पण इथे "सब घोडे बाराटक्के ", कौनसे घोडेपर दांव लगाये.

तरीसुद्धा मतदान टक्का वाढायला हवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:46 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या उमेदवारामागे ईडी लावुंक त्रास देऊन त्याला त्याच्या मनाविरुद्ध भाजपात घेतलं तर? त्यापेक्षा नकोच.

अशा परिस्थितीत नोटाचा पर्याय आहेच की.

देशात लोकशाही राहिली आहे का??
तुम्ही कोणत्या ग्रहावरून बोलताय? ९७० का काय मिलियन लोक मतदानास पात्र आहेत आणि त्याप्रमाणे मतदान होत आहे आणि म्हणे लोकशाही उरली आहे का
जा मतदान करा आणि हाकलून द्या चड्डीवाल्यांना हाय काय आणि नाही काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

1 May 2024 - 9:50 pm | अमरेंद्र बाहुबली

मतदार उत्तर कोरियातही आहेत. पण त्याला लोकशाही नाही म्हणू शकत नाही.

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 7:50 am | चौकस२१२

ओके सर भारतात उत्तर कोरिया सारखीच परिस्थितीत आहे !
चला रे सगळे पाय धरा यांचे

सुबोध खरे's picture

2 May 2024 - 10:20 am | सुबोध खरे

मी केंव्हा पासून सांगतोय

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय ?

अहिरावण's picture

2 May 2024 - 1:21 pm | अहिरावण

सहमत आहे

बिनडोक अक्कलशून्यांच्या नादी लागू नये. ४ जुनला त्यांचे थोबाड फूटणारच आहे

समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त असणे ह्यात काही नवल नाही. काटजुन्च्या मते ९० टक्के. ऐसा है म्हणून तर दुनिया झुकती है. आणि वर बहुमताची लोकशाही. म्हणजे ६० टक्यातले ३५ टक्के मिळाले तरी पंतप्रधान होऊ शकतो. First person to touch the pole!
राग माणू नका. ही सत्य परिस्थिती आहे.

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 5:44 pm | चौकस२१२

मग त्यावर उत्तर काय? अशी पद्धत अनेक देशात आहे फक्त भारतीय पद्धत चुकीची आहे असे का?
हे म्हणजे काहीसे असे झाले कि जर २०१६ साली ऑलिम्पिक मध्ये ज्याने १०० मीटर धावण्याचं शर्यतीत १० सेकंदात पळून सुवर्ण पदक मिळवले तर ते सुवर्ण पदक नाही कारण २०१२ साली सुवर्ण पदक ९ सेकंदात पळून मिळवले गेले होते?

ज्या पक्षाला जितकी मते मिळाली आहेत त्या प्रमाणात त्या पक्षाने आपले सुयोग्य प्रतिनिधी लोकसभेत पाठवावे. ती लोकसभा देशाची खरीखुरी प्रतिनिधिक लोकसभा असेल.
मला वाटत ही पद्धत ही काही देशात आहे.

भागो आपण म्हणता ते बरोबर आहे , बहुतेक नु झीलंड मध्ये आहे तसे ( पण तिथे २ संसद सभागृहे नाहीत )
पण त्याही पद्धतीत काहीतरी दोष आहेतच असो
प्रश्न येथे हा कि नाआवड्ता पक्ष जिकायला लागलं कीच मग लोकांना "निवडणूक पद्धत" का आठवते
आवडत पाकसह आलं जिकून तर विचारला जातो का हा प्रश्न ?

दुसरो पद्धत म्हणजे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडलं जाणे पण त्यात हि धोके आहेत
भारत , कानडा , ऑस्ट्रेल्या, बहुतेक पाकिस्तान पण येथे ब्रिटीश पद्धतीचे वेस्टमिनिस्टर पद्धत आहे

भागो's picture

1 May 2024 - 7:16 pm | भागो

https://en.wikipedia.org/wiki/Proportional_representation
हे पहा विकीचे पान. सखोल चर्चा आहे इथे.
आणि ही पहा देशांची यादी. थोड्या जास्त प्रमाणात हीच पद्धत फालो करत आहेत.
https://worldpopulationreview.com/country-rankings/countries-with-propor...
सर, तुम्ही ओपन माइंड ठेवून लिहित आहात म्हणून मी रीस्पोंस देत आहे.
८०% हिंदू समाजाला १४% मुस्लीम समाजाची भीति वाटावी?

८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान करतात. - ४० टक्के
१४ टक्के मुस्लिम १०० टक्के मतदान करतात - १४ टक्के

एकूण ५४ टक्के. (आकडेवारी कमी जास्त)

साधारण तीस टक्के मते मिळतात तो उमेदवार विजयी होतो

५४ च्या तीस टक्के १५-१८ टक्के

म्हणजेच काही भागात मुस्लिम येनकेन प्रकारेण कोण निवडून यावा हे ठरवतात
आणि मग तिथे हिंदूंची ससेहोलपट आणि मुस्लिमांचा वरचष्मा..

मुस्लिम मतदान करतात पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास नाही
हिंदू मतदान करत नाहीत पण त्यांचा लोकशाहीवर विष्वास

त्रांगडं मोठं कठिण आहे..

आता कॉंगेस सत्तेवर आली तर हिंदूंची अवस्था जर्मनीतील ज्युंसारखी होईल

आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात हा सगळ्यात LOL प्रतिसाद आहे.

अहिरावण's picture

1 May 2024 - 7:31 pm | अहिरावण

तुम्हाला मनसोक्त हसण्याची मुभा आहे. तेवढेच आमच्यामुळे तुमच्या चेह-यावर हास्य आले हे काय कमी आहे? :)

कॉमी's picture

7 May 2024 - 10:19 am | कॉमी

नाहीतर काय.

NiluMP's picture

6 May 2024 - 5:54 pm | NiluMP

I hate Votebank Democracy
I would love to live in
Shri Ram's RamRajya
or
Chhatrapati Swaraj

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2024 - 5:59 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे वो??

NiluMP's picture

8 May 2024 - 4:48 pm | NiluMP

Democracy without voting system.

सुरिया's picture

14 May 2024 - 5:18 pm | सुरिया

भाबडंय गं.
म्हणे दत्त दिसले.

मतदान पद्धतीमुळे वोटबँक निर्माण झाली
वोटबँक मुळे त्याचे लाड पुरविणे सुरु झाले, खैराती वाटणे सुरु झाले
शहराशहरात अनधिकृत झोपडपट्या निमार्ण झाल्या, अनधिकृत घुसखोर वसवून वोटबँक निर्माण केल्या
प्रत्येक धर्मासाठी इथं एक राजकीय पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षात प्रत्येक जातीचा नेता.

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 7:19 pm | कर्नलतपस्वी

बाकीच्या चाळीस ना कोणी घरात बसायला सांगीतल. बाहेर पडा सत्तर वाला प्रधान मंत्री निवडा. नाही तर पस्तीस वाला झेलावा.

असं कसं ... बायकोला कबुल केलं आहे मतदानाच्या दिवशी पिकनिकला जायचं...

संघप्रणीत भाजपला मोदींना पुन्हा पुन्हा सत्तेत बसविण्यामागे काय उद्देश आहे हे खरंच कळत नाही. म्हणजे सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते?

उदा. एका भ्रष्टवादी पक्षाला सत्ता हवी असते ती लहानमोठे घोटाळे, भ्रष्टाचार करून आपल्या नेत्या-कार्यकर्त्यांना पैसे मिळवून देणे यासाठी. येनकेनप्रकारेण ते बऱ्याचदा त्यात यशस्वी ठरत आलेले आहेत. त्या पक्षाचे ते उघड ध्येय आहे आणि ते त्या ध्येयाशी प्रामाणिक आहेत. काळ्या विनोदाची झालर चढवून असे म्हणता येईल की त्या पक्षाच्या मंत्र्यांचा सकाळी दहा वाजता शपथविधी झाला तर मंत्रालयात जाऊन किमान काही कोटींचा एखादा घोटाळा करूनच ते दुपारच्या जेवणाची सुट्टी घेतील.

सत्ता कधीही जाऊ शकते हे समजून घेऊन ते लोक पहिल्या दिवसापासून कामाला लागतात!

याउलट,

केंद्रात व अनेक राज्यांत भाजप वर्षानुवर्षे सत्तेत आहे. पण अजून त्यांना हिंदूंचे शिर्डी साईबाबा मंदिर (आणि देशभरातील इतरही अनेक श्रीमंत मंदिरे) सरकारी तावडीतून सोडवून हिंदूंच्या स्वाधीन करता आलेली नाहीत.

---

सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे
प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे
ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे
खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे
दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे
लव जिहादला आळा घालणे
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे
लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे
हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे
इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे
परदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे
... यादी मोठी आहे.

अशा करण्यासारख्या असंख्य बाबी होत्या. संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार?

हिंदू नागरिकांच्या मतदानाप्रती अनास्थेमागील मुख्य कारण हे असेल.

आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचणं, आपल्याच समर्थकांना तोंडघशी पाडणं!

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 10:46 pm | कर्नलतपस्वी

एकच वंश गादीवर, ते काय सरळ मार्गाने आलेत, अशा भ्रमात नका राहू.

बाजपेयी सरकार एक मताने तडकाफडकी पाडले.
तेव्हां कुणाला नाही पान्हा फुटला.

घड्याळ रितसर फुटले
धनुष्यातून बाण रितसर सुटले
त्यात कुणाचे काय चुकले

आता फक्त लक्षप्राप्ती कडे लक्ष.

संघप्रणीत भाजपच्या मोदींनी मागच्या दहा वर्षांत यातील काहीही केले नाही; मग पुढे काय करणार?
भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ...

अहो जरा परस्थिती समजवून घ्या कि
-एक तर पहिली काही वर्षे प्रथम मिळालेली निर्विवाद द सत्ता स्थापित करण्यात गेली
-फक्त हिंदूंचं हितासाठी असे उघडपणे करण्यापेक्षा देशाचे हित ज्यात हिंदूंचे हित आहे असे काही कायदे करणे जास्त योग्य भाजप ला वाटले आणि ते योग्य वाटते
- देशा ची प्रतिमां जगात उभी करणे ( पाठीला कणा आहे हे दाखवून देणे या अर्थी ) , आर्थिक उलढाल वाढवणे, रस्ते रेल्वे सारखे उपक्रम आधुनिक करणे, बुडीत असलेली सरकारी संस्था सुधरवणे
काश्मीर प्रश्न मिटवण्यासातिची काही पावले
सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे

आधीच भाजप ला शत्रू काही कमी आहेत का त्यात हिंदू हिंदू करणारेच जर भाजपचं जीवावर उठले तर असे होणार विचार करा

वामन देशमुख's picture

1 May 2024 - 5:55 pm | वामन देशमुख

भाजप / संघ सत्ते वर आले कि "जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही" असे म्हणारे म्हणजे कमा ल वाटते ...

१. "जादूची कांडी फिरवून हिंदूराष्ट्र केले कसे नाही" असे इथे कुणी म्हटले आहे? मी जे लिहिले आहे ते अगदी व्यावहारिक आहे.

२. तिरुपती बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश, शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र आणि इतर श्रीमंत हिंदू मंदिरे सरकारी कचाट्यातून सोडवण्यासाठी जादूची कांडी लागते का?

हे पहा -

आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!

asdf

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 6:48 pm | चौकस२१२

सिनेमा-टीवी वरून हिंदू संस्कृतीचा होणारा अवमान थांबविणे,
तसे काही उघड केले तर "अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलाकारांना व्यक्त होण्यावर बंदी आणली" म्हणून तुम्ही पण ओरडणार आणि डावखुरे पण त्यापेक्सह ज्या विषयांवर आता पर्यंत कलाकृती निर्माण करणे हे "टाबू / निषेधार्थ" समजले जायचे( किस कुर्सी का , आधी ) त्यावर चित्रपट तरी निघाले ( काश्मीर फाईल , स्वरकार इत्यादी ) हे हि नसे थोडके
प्रसारमाध्यमांवर हिंदू विचारधारेची पकड बसविणे ...
नाहीये का? उलट विरोधक तरबोंबलतात कि गोदी मीडिया म्हणून परत चाणक्य नीती हि कि एकीकडे एन डी ती व्ही सारख्यांचा चेहरा बदलायचा आणि दुसरी कडे बरखा ते वागळेंना तुरंगात वैगरे टाकण्याकॅरीकेच १९७५ सारखा मुर्ख ना करणे
ब्रिगेडी प्रवृत्तीला समूळ उखडून टाकणे
कसे करणार ? त्यासाठी हुकुमशाही यावी लागेल
खलिस्तानी प्रवृत्ती नष्ट करणे
काहीच प्रयत्न नाही केले? बार यात केवॉक भारतातील हुकेलेल शीख नाहीत तर त्यात पाकिस्तान आणि इतर देशातील हुकले शीख ( स्वात येथे ऑस्ट्रेल्यात याची उघड प्रचिती घेऊन हे बोलतोय ) आणि भारतविरोधी डावे आहेत ..
दक्षिणेतील फुटीर वृत्तींना लगाम घालणे
परत तेच जादूची कांडी कुठून अण्णांर हो? प्रयत्न नाही का चालू? तामिळनाडू, केरळ आणि नुसतेच दक्षिण नाही तर बंगाल आणि पूर्वे कंडील ७ राज्ये
अहो अगदी "काऊ बेल्ट " असलेल्या उतार आणि मध्य भारतात भाजप ला सत्तेत यायला ४० हुन अधिक वर्षे लागली! लांबे रेस की घोडा ...
लव जिहादला आळा घालणे
तसा कायदा आहे ना ? आणि लव्ह जिहाद होते हे तरी उघडपणे बाहेर आलं पुर्वी "ठरविक समाजाच्या भावना दुखावतील" म्हणून सगळं गुपचूप
शालेय-महाविद्यालयीन शिक्षण हिंदुहिताचे करणे
फक्त हिंदुहिता पेक्षा "जे सत्य आहे ते जास्त ठाम पाने मांडणे योग्य नाही का : खोटे हिंदू हित जर उर बडवून केले तर तालिबान आणि संघात फरक तो काय
लहान-मध्यम हिंदू व्यापाऱ्यांना अहिंदूंपासून संरक्षण देणे

हे काही कळले नाही नक्की काय ?
हिंदू देवदेवतांची होणारी निंदा नालस्ती प्रतिबंधित करणे
तसा कायदा आहे ना ?
इतिहासातील हिंदू नेत्यांची होणारी अवहेलना रोखणे
हे थोडेफार पटले पण परत अप्रत्यक्ष रित्या आणि प्रत्यक्ष रित्या ( अंदमान विमानतळाला सावरकरांचे नाव देणं) यातून चालू आह ए, औरंगजेब मार्गाचे नाव बदलणे इत्यादी अगदीच काही नाही असे कसे?
रदेशातील हिंदूंवर, हिंदू म्हणून होणाऱ्या अत्याचारांना अटकाव करणे
सी ए ए आहे ना? का माझी काहीतरी गैरसमजूत होतीय ?
... यादी मोठी आहे.

वामन देशमुख's picture

1 May 2024 - 7:41 pm | वामन देशमुख

प्रतिसादाचा आशय समजला.

मोदींनी त्यांच्या समर्थकांवर खरंच जादू केलीय!

---

आज जसे मोदी करतात नेमके तसेच १०० वर्षांपूर्वी गांधी करायचे.

  • गांधींनी शहीद सुऱ्हावर्दीला माझा भाऊ म्हणून गौरविले, मोदींनी मुलायम सिंघांना पद्मश्री देऊन गौरविले.
  • गांधींनी भारतीयांपुढे स्वतंत्र भारताचे स्वप्न ठेवले, मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले.
  • गांधींनी भगतसिंगांना वाचविले नाही, मोदींनी राजा सिंहांना वाचविले नाही.
  • १९२१ मध्ये केरळात मोपल्यांनी हजारो हिंदूंवर अत्याचार केले गांधींनी त्याकडे दुर्लक्ष केले,
  • २०२० मध्ये बंगाली मुस्लिमांनी शेकडो हिंदूंवर अत्याचार केले मोदींनी त्याकडे दुर्लक्ष केले.
  • गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला.
  • शंभर वर्षांपूर्वी मुस्लिमांनी पाकिस्तानची तयारी सुरु केली आणि १९४७ मध्ये पाकिस्तान घेतला.
  • आज मुस्लिमांनी गझवा-ए-हिंद ची तयारी सुरु आहे आणि २०४७ मध्ये ते पूर्णच हिंदुस्थान घेणार आहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी गांधींनी हिंदूंना गुंगीत ठेवले आज मोदी ठेवताहेत.
  • शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे,
  • नेमके तसेच ते आज मोदींचा उदोउदो करत आहेत.

आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे.

काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहे

अहिरावण's picture

1 May 2024 - 7:52 pm | अहिरावण

उद्या मोदींना म्हणेल असे वाचावे.

कांदा लिंबू's picture

1 May 2024 - 9:39 pm | कांदा लिंबू

आज जग गांधींना महान म्हणत आहे. उद्या मोदींना म्हणत आहे.

काल नथुराम होता.. आज वामन देशमुख आहे

LOL

---

हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 10:49 pm | कर्नलतपस्वी

हिन्दूच जबाबदार आहेत.

मोदींनी हिंदूंपुढे विकसित भारताचे ठेवले.
हे काही फक्त हिंदूंसाठी नाही ठेवले सगळ्या नागरिकांसाठी ठेवले.. आहे का असा नवीन कायदा कि ज्यात "फक्त हिंदूंसाठी विकास" अशी सोयाआहे ?
गांधींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, संघाने हिंदू मुस्लिमांचा DNA एकच आहे असा संदेश दिला.
दोन्हीत एक महत्वाचाच फरक आहे, खिलाफत चळवल हि भारताबाहेर होती भारतातील मुस्लिमांपैकी ९९ काय ९९. ९% टक्के हे मूळ भारतीय हिंदू आहेत आणि आज १४% + अधिक आहेत त्यामुळे संघाला त्यांना पूर्ण दुर्लक्ष करून चालणार नाहीच
संघाची मूळ भावनाच अशी आहे कि देश आधी मग ते काँग्रेस ने केले तरी त्याला संघ पॅथीमबा देईल , कडवे हिंदुत्वचाय पेक्सह स्वरकरवाडी हिंदू व्याख्या संघाला साधय तरी अपेक्षित दिसतीय , या शिवाय वर्षानुवर्षे संघ म्हणजे मुस्लिम विरोधी हे चित्र बदलले तर बिघडले कुठे? परत एकदा इथंही स्वरकरांची हिंदू कोण हि व्याख्या डोळ्यसमोर ठेवता येईल आणि मग विचार करता त येईल कि संघ असे का करीत आहे
शंभर वर्षांपूर्वी हिंदू अंधपणे गांधींचा उदोउदो करायचे,
असो पण तुम्ही म्हणत आहात तसे समाज फक्त व्यक्तिपूजा करीत असेल तर गांधी काय मोदी काय गावस्कर काय कि तेंडुलकर काय .. व्यक्तिपूजा हा आपल्या समाजचा डी एन या आहे असे समजूयात मग तक्रार का? चुपचाप भोगने भाग आहे ,
गांधींची व्यक्तिपूजा चालते पण मोदींची नाही ! हा कुठला न्याय ( अर्थात व्यक्तिपूजेचा समर्थक नाही, हे विधान फक्त जशास तसे हे दाखवण्यासारखे )

यासाठी सर्व हिंदू संघटना आणि नेत्यांनी एकत्र येणे गरजचे आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

6 May 2024 - 6:04 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ आणी भाजपा सारख्या हिंदूद्रोही पक्षास सत्तेतून हाकलने गरजेचे आहे.

स्टालिन च्या राज्यात झालाय ना तिथे भाजप आहे का सत्तेत ? मग त्यांची कशी चूक

वामन देशमुख's picture

1 May 2024 - 6:03 pm | वामन देशमुख

सामाजिक उन्नती साठी ट्रिपल तलाक रद्द करणे

कसली सामाजिक उन्नती? इस्लाममध्ये ट्रिपल तलाकला, हलाला निकाह, मुत्ताह निकाह यांना मान्यता आहे. ट्रिपल तलाक रद्द करणे हा इस्लामच्या धार्मिक बाबीत सरकारी हस्तक्षेप आहे. त्याऐवजी जन्माने मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाकच्या भीतीपोटी इस्लाम त्यागून सेक्युलर बनण्यासाठी प्रवृत्त करणे हे खरी सामाजिक उन्नती ठरली असती.

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 6:54 pm | चौकस२१२

१) काँग्रेस ने शाहबानो प्रकरणात मुस्लिम महिलांवर मुल्ला लोकांचं दबावामुळे शेपूट घालून अन्याय केला
२) भाजप ने ट्रिपल तलाक रद्द केला एक भारतीय नागरिक म्हणून ( हिंदू म्हणून नव्हे )
तुम्हीच सांगा समाजहिताच झाले नहि का हे काम? ( २)

कर्नलतपस्वी's picture

1 May 2024 - 4:16 pm | कर्नलतपस्वी

सारे अनुमान, भाकीते फेल होतात का काय?

काही भक्त कनफ्युजीया गेलेत. काही दुख्खी. चौथा का पाचवा स्तंभ सुद्धा विभाजीत झालायं. चार जुन लाच कळेल जेव्हां मतदाराने इ व्ही एम च्या कानात कय सांगीतले ते उघड होईल तेव्हां.

प्रसाद गोडबोले's picture

1 May 2024 - 4:45 pm | प्रसाद गोडबोले

पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ लेख !

जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.

ख्या ख्या ख्या .

मी मतदान करत नाही ( किमान गेले काही वर्षे तरी केले नाहीये) कारण मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की

१. सर्वच्यासर्व मंदिरे हिंदु संस्थांच्या अखत्यारित देणे अन सरकार्ने पुजारी वगैरे नेमण्याच्या ट्रस्टी वगैरे नेमण्याच्या भानगडीत न पडणे.
२. जिथे जिथे पुराव्याने शाबित करता येईल ती सर्व मंदिरे पुन्हा हिंदुंच्या ताब्यात देणे अन त्यांचा जीर्णोर्ध्दार करणे. + त्या बदल्यात कोणालाही पर्यायी जमीन वगैरे न देणे.
३. इन्डिव्हिजुअल इनकम टॅक्स पुर्णपणे अ‍ॅबोलिश करणे. ह्या मुळे निर्माण होणारा डीफिसिट हा जी.एस.टी. वाढवुन वसुल करणे. पेट्रोल आणि अल्कोहोल जी.एस.टी.च्या कक्षेत आणणे. वाहन खरेदी करताना वसुल केलेल्या रोड टॅक्स मधुन वापरानुसार टोलचे पैसे वसुल करणे. जिथे जिथे डबल टॅक्सेशन असेल तिथे तिथे ते ठरवुन संपवणे.
४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे.
५. पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीर आपण गमावलेला असुन तिथे हिंदुंना जगणे आता अन भविष्यत अशक्य प्राय आहे हे मान्य करणे अन तिकडे अन डिफेन्स वर होणारा खर्च अत्यल्प करणे.
६. बेसिक हेल्थकेअर आणि १२ पर्यंतचे शिक्षण ह्या व्यतिरिक्त सरकारने कोणतेही वेल्फेअर स्टेटचे काम न करणे. कोणत्याही विशिष्ठ समुदायांसाठी विशेष सरकारी संस्था न चालवणे.
७. शेतीला बिजनेस टॅक्स च्या कक्षेत आणणे आणि ज्या शेतकर्‍यांनी मागील वर्षी रीतसर बिजनेस टॅक्स फाईल केला असेल त्यांनाच शेती विषयक सबसीडी आणि कर्जमाफी देणे.
८. पोलीस आणि आर.टी.ओ आणि तत्सम सरकारी कर्मचार्‍यांना दंड रक्कम वसुल करण्याचा हक्क पुर्णपणे काढुन घेणे. कार्ड स्वाईप मशीन हातात घेऊन उभा असलेला सरकारी वर्दीतील माणुस हाच भ्रष्टाचाराचा पुरावा मानुन त्याला ताबडतोब सेवा मुक्त करणे.
९. mpsc upsc वगैरे सरकारी परीक्षांची कमाल वयोमर्यादा २५ करणे. सर्वच सरकारी सेंवांमध्ये लॅटरल इन्ट्री सुरु करणे.
१०. इन जनरल , - सरकार चालवणे - देश चालवणे हा एक प्रकारचा बिजनेस चालवणे आहे असे समजुन , जसे कोणत्याही खाजगी कंपन्यांचा सी.ई.ओ आणि डायरेक्टर हे त्या कंपनीच्या शेयर होल्डर्स ना आन्सरेबल असतात तसेच पंतप्रधान अन मुख्यमंत्री अन सर्वच मंत्र्यांबाबत करणे.

असो. ह्या सार्‍या स्वप्नवत अपेक्षा आहेत हे मान्य . म्हणुनच आम्ही मतदान करत नाही.

पण त्यातल्यात्यात न्याय्य योजना अन मनरेगा सदृष समाजवादी प्रकल्प राबवणार्‍या काँग्रेस , आत्मघातकी कम्युनिस्ट , संधीसाधु स्थानिक राजकीय पक्षांच्या पेक्षा बरं म्हणुन आम्ही बीजेपी ला चीअर्स करतो बस इतकेच =))))

वामन देशमुख's picture

1 May 2024 - 6:04 pm | वामन देशमुख

मला अपेक्षित असलेली धोरणे कोणत्याच पक्षाच्या मॅनिफेस्टोवर नाहीत , जसे की

सहमत

४. आरक्षणाची मर्यादा ५०% वर फिक्स करणे. त्यात सर्व ब्राह्मणेतर समुदायांना लोकसंख्येच्या प्रमाणात वाटणी करुन देणे.

चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!!

अहिरावण's picture

2 May 2024 - 1:23 pm | अहिरावण

>>>जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक नाहीतच !!!

आहेत? अरेच्या हे काय नवीन... ब्रिगेडी पवाराव्हाडइत्य्तादी वेग्ळेच सांगतात

ब्राह्मणांनीच उर्वरित समाजाला पिडले आहे म्हणून... =))

जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही.
१००%

ह्या देशात अजूनही लोकशाही आहे.
मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे.
अजून नॉर्थ कोरीया, चायना, रशिया, इराण स्टाईल लोकशाही यायला वेळ आहे. ४ जून पर्यंत तरी थांबा.
नंतर सुप्रीम लीडरला ९९% मते मिळतील.

चौकस२१२'s picture

1 May 2024 - 7:03 pm | चौकस२१२

मतदान न केअने हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे. ?

मतदान करणे हि जबाबदारी आहे जबाबदार नागरिकांची

वामन देशमुख's picture

1 May 2024 - 6:05 pm | वामन देशमुख

जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही.

सहमत

मतदान कमी झाले की सत्ताधारीच सत्तेवर येतात हा इतिहास आहे. सध्या सत्ताधारी एनडीए आहे.. तेव्हा विरोधकांनी २०३४ च्या तयारीला लागावे.

नठ्यारा's picture

1 May 2024 - 10:08 pm | नठ्यारा

वामन देशमुख,

आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! संघप्रणीत भाजपचे मोदी दहा वर्षांपासून प्रचंड बहुमतासह सत्तेत आहेत!

मोदी तामिळनाडूत सत्तेत नाहीत. बाकी, प्रचंड बहुमतासह राजीव गांधीही सत्तेत होते. काय केलं त्यांनी? मोदींच्या शतांशाने तरी काम केलं का?

बरं ते जाऊ द्या. तुम्ही काय केलं ते सांगा. हिंदूंच्या जिवाची काय किंमत आहे ते माहितीये ना ? मग मोदींना दोष कशासाठी ?

-नाठाळ नठ्या

जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो.
१ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने?
२ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे.
३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत.
४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत.
५ रुपयाची घसरण चालू आहे.
६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही.
७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया.
८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...?
प्रश्न खूप आहेत.
पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत.
बजाव रे. और जोरसे बजाव.

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 7:14 am | चौकस२१२

जर हिंदू हिंदू खेळून झाले असेल तर मी काही बोलू इच्छितो.
१ महागई चे आम्ही काय करावे? पेट्रोल डीझेल कुकिंग गॅसच्या औषधांच्या. किमती म्हणजे जवळ जवळ प्रत्येक गोष्टीने पाच पाच दहा दहा रुपयांनी जंप मारत आहेत. कसे जगावे माणसाने?
काँग्रेस असते तर काय फरक पडलला असता? महागाई जगभर वाढली आहे, फक्त भारतात नाही , उलट मेक इन इंडिया सारखया उपक्रमांमुळे नोकऱ्या वाढल्या परकीय चलन मिळते
२ नोकऱ्या कुठे आहेत? तुम्ही म्हणाल स्वतःचा व्यवसाय सुरु करा. आपल्या सुचणे बद्दल आभारी आहे.
नोकरी हा काही हकक नाही ,अर्थ व्यस्था वाढत आहे त्यात नोकऱ्या वाढतच आहेत कि उद्धरण देतो तुम्हला भारत स्वतः किती गोष्टी बनवतो याचे कौतिक नाही .. नुकतेच आमच्या देशातील एकमेव पॉलिएथिलिन उत्पादक बंद पडला , आणि हा छोटा देश असून जगातील १० वि मोठी अर्थव्यस्था असून दरडोई उत्तप्प्न अंदाजे ६०,००० डॉलर प्रति व्यक्ती असून ,, भारतात काही वर्षांपूर्वी किती तरी गोष्टीत नोकऱ्या अस्तित्वात नवहत्या ( सपलाय चेन / रिटेल , फिनतेक इत्यादी आज आहेत ! वाहन उत्पादन ! ( अर्हताःत याचे श्रेय फ्क्त मोदींना नाही राव आणि मनमोहन सिंग यानं पण आहे )
३ जागतिक सर्वेक्षणात असे दिसते आहे कि बांगलादेश, श्री लंका आणि मध्ये मध्ये पाकिस्तान आपल्या पेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. तुम्ही म्हणणार ते साले चोर लोक आहेत.

श्रीलंकणकेच मध्ये आर्थिक अराजक नुकतेच झाले ते विसरलात का
बांगलादेशने प्रगती केली आहे पण त्यात भाग स्वस्त मजुरी जास्त आहे , एकूण देश गरीबच आहे
पाकिस्तान आणि प्रगती????
४ आपण मंगळावर जाणार आहोत. पण इकडे मंगळी मुले मुली लग्नाच्या थांबल्या आहेत.
हे म्हणजे राष्टपतीने देश गरीब आह तम्हणून झोपडीत राहिले पाहिजे असे म्हण्यासारखे आहे , अंतरिक्ष उड्डाण हा उद्योग हाड लांब पाल्याचाच उपक्रम आहे त्याकडे तसेच बघितले पाहिजे
५ रुपयाची घसरण चालू आहे.
ती अनेक वर्षे चालू आहे त्याबरोबर उत्पन्न हि वाढत आहे , लोकांचे आणि देशाचे हि
६ चीनची घूस खोरी चालू आहे. ती कोण थांबवणार? कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा थांबत नाही.
याबाबत मला माहिती नाही तुमचे म्हणणे कदाचित बरोबर असेल हि पण चीन ला भूभाग किंवा पाकिस्तान सारखे धार्मिक युद्ध भारताबरोअबर खेळापेक्षा आर्थिक व्यापारी युद्ध चढाओढ खेळण्यात जास्त रस आहे असे वाटते
७ घुसके मारा म्हणायला मजा येते. पण सुसंस्कृत जगात आपली तुलना उत्तर कोरिया, रशिया अशा राष्ट्राशी होते आहे. चला आम्ही त्यांना फाट्यावर मारतो अस म्हणूया.
हे म्हणायची मानसिकता तरी आली? "डाव्या गालावर मारल्यावर उजवा गाळ पूढे करा शेवटी मारणारा
थकेल आणि निघून जाईल" या वृत्ती पेक्षा बरे कि
इस्राईल हे छोटुसे असून कितीतरी दशके "घुसेगें भी और मारेगें भी करीत आहे," अमेरिका करते इतर राष्ट्रांना एक सावधानतेचा इशारा म्हणून आशय गोष्टी सरकार करत असेल ,, असते
८ मालदीव पण आपल्याला भारी पडते आहे. आपण उगीचच तिकडे काडी टाकली. आत्ताच झालेल्या निवडणुकीत कुणाची वाट लागली. दोन महिन्या पूर्वी भक्त उड्या मारत होते. आता...?

प्रश्न खूप आहेत.
पण म्हणूनच हिदू मुस्लीम ढोल वाजवून लोकांची डोकी बधीर केली जात आहेत.
गेली ६० वर्षे हा ढोल कोणी बजावत आहे ? मान्य देशाचे / समाजाचे धर्म हेच फक्त प्रश्न नाहीत पण म्हणून ८०% च्या भावनाना मुद्डमून डावललं गेलं तो तराजू परत मध्ये आणला तर काय बिघडले आणि १० वर्षे भाजप सरकार जे करते ते फक्त हिंडून साठी हा खोटा प्रचार आहे ... कोणता कायदा आहे कि ज्यात तुम्ही अल्पसंख्यांक म्हणून तुम्हाला एखादी सरकारी ओशट मिळणार नाही पण तो गोष्ट ८०% न्या सहज देऊ?

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 10:10 am | अमरेंद्र बाहुबली

सर ऑस्ट्रेलियातील रस्तांवर खड्डे आहेत का?

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 10:16 am | चौकस२१२

ए भौ अमरेंद्र बाहुबली लै झाला तुझा बाष्कळपणा
ऑस्ट्रेल्यात खड्डे आहेत छान छान हॅगिंदाऱ्या आहेत .. यायचं बघायला ?

सुबोध खरे's picture

2 May 2024 - 10:26 am | सुबोध खरे

मी केंव्हा पासून सांगतोय

कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय ?

अहिरावण's picture

2 May 2024 - 1:24 pm | अहिरावण

सहमत आहे. ४ जुनला त्यांचे थोबाड फुटणारच आहे.

विवेकपटाईत's picture

5 May 2024 - 10:06 am | विवेकपटाईत

जर थोडी बहुत गुगल करून माहिती घेतली असती तर असला बिनबुडाचा प्रतिसाद दिला नसता. दहा वर्षात त्यापूर्वीच्या तीस-पस्तीस वर्षात जेवढ्या नोकऱ्या दिल्या गेल्या नाहीत त्यापेक्षा जास्त दहा वर्षात निर्मित झाल्या आहेत
१ . रेल्वे कोच निर्मिती 2004 ते 14 फक्त 7000. 2014 ते 23 - 40000. साडे पाच पट.
२. नवीन रेल्वे लाईन पूर्वीच्या३० वर्षांपेक्षा जास्त.
३. दोन्ही डीएफसी 90% पूर्ण झाले आणि इथे किमान एक लक्ष पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे पॅसेंजर गाड्या मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत.
४. पूर्वीच्या 23 हजार किमी विद्युतीकरण जागे 26000 किमी विद्युतीकरण दहा वर्षात.
५. शेकडो रेल्वे स्थानकाचे नवीन करण झाले साफसफाईसाठी लाखाच्या वर व्यक्तींची नियुक्ती केल्या केली सर्व कोचेस बाय टॉयलेट झाले घाण रूळवर पडणे बंद झाले आज एकही बिना मनुष्याचे रेल्वे क्रॉसिंग नाही.
६. आज दरवर्षी चार हजार जास्त किसान रेल्वे चालतात त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतो.
फक्त रेल्वेने लाखो नोकऱ्या दिल्या आहेत.
वीज उत्पादन. १७० टक्के वाढले. आज गावात अकरा तास ऐवजी वीस तासांच्या वरती उपलब्ध आहे. गावांमध्ये रोजगार वाढला. वीज निर्मितीत ही रोजगार दीडपट वाढला असेल.
७. मोबाईल उत्पादन 18 कोटींपासून चार लक्ष कोटींच्या वर केले अर्थात वीस पट रोजगार इथेच निर्मित झाला.
७. महामार्गांची निर्मिती पूर्वीच्या 70 वर्षांपेक्षा जास्त झाली.
८. वाढत्या मेट्रो नेटवर्क ने २ लाखाच्या वर ई रिक्षा फक्त दिल्लीत चालतात.
९. फायबर केबल अडीच हजार किलोमीटर जागी पाच लक्ष किलोमीटरच्या वर टाकल्या गेले ज्यामुळे कारोना काळात भारतात उत्तराखंडच्या दुर्गंध भागातूनही वर्क फॉर होम होताना मी स्वतः डोळ्याने बघितले आहे. जगातील अधिकांश नेटवर्क बेस रोजगार भारताकडे वळला.
९. अधिक लिहीत नाही गुगल करून आकडे पहा तर तुम्हाला कळेल मध उत्पादन असो की मत्स्य उत्पादन दूध उत्पादन असो की अन्न उत्पादन सर्व क्षेत्रात दुपटीपेक्षा जास्त प्रगती झाली आहे. मेडिकल कॉलेज AIIMS सर्वांची संख्या वाढली.
एवढे असूनही तुम्हाला नोकऱ्या दिसत नाही हे आश्चर्य आहे.

देशातील सर्वोच्च स्तरांच्या सुरक्षा अधिकारी सोबत काम केल्यामुळे एवढे निश्चित सांगू शकतो २०१४ पूर्वी चीनने आपल्या भूभागावर कब्जे केले आहे त्यानंतर एक इंच ही कब्जा केला नाही. काही परत मिळवली असेल हे वेगळे.
६० कोटी नवीन बँक खाते, खात्यात सब्सिडी upi, त्यामूळे मुद्रा लोन सहित विभिन्न स्कीम मध्ये २० कोटींच्या वर छोट्या लोकांना कर्ज मिळाले. कोट्यावधी रोजगार निर्मित झाला. उत्तर देत गेलो तर एक मोठा लेख होईल.
स्वतः ल शिक्षित म्हणाविणार्यानी प्रतिसाद देण्यापूर्वी तथ्य तपासावे पाहिजे.बाकी तुमच्या प्रतिसादाचा धग्याशी संबंध नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 May 2024 - 12:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

धन्यवाद विवेक. प्रश्न पडतो की ही एवढे काम झाले आहे तर 'घटना बदलणे/हिंदु मुस्लिम वाद्/मंगळ्सूत्रे' ह्या विषयावर निवडणुकीत चर्चा का? ते सॅम पित्रोदा काहीतरी वाह्यात बोलले की त्याची एवढी चर्चा? नितिन गडकरी/अश्विनी वैष्ण्व/जयशंकर अशा अनेक मंत्र्यांच्या खात्यांनी चांगली कामे केली आहेत. हे नेते ह्यावर बोलत का नाहीत?
गडकरी गेले ५ वर्षे अनेक परिषदांमध्ये दिसायचे."भारतात सर्वात जास्त सिमेंट माझे मंत्रालय विकत घेते. अमुक लाख लोकांना रोजगार मिळालाय.." वगैरे सांगायचे. हे सर्व आता सांगत का नाहीत?

या मंत्रालयांच्या कामाची लिटमस चाचणी आपोआप होतीय.

बेतालपणे भांडवली गुंतवणूक करुन नेत्रदिपक प्रगती तर कोणत्याही सरकारांना करता आली असती. पण भांडवली गुंतवणुकीचा परतावा मिळण्याचा कालावधी जर प्रमाणबाहेरचा दीर्घ असेल तर सरकारच्या इतर योजनांवर त्याचा वाईट परिणाम दिसायला लागतो. आरोग्य आणि शिक्षणावरील किरकोळ तरतूद आणि कर्जाचा वाढता बोजा या गोष्टी आताच दिसायला लागल्या आहेत. संरक्षणाच्या बाबतीत प्रदीर्घ युद्ध छेडण्याची क्षमता नसल्यामुळे केवळ पाकिस्तानला बेटकुळी दाखवण्यापलीकडे भारत काही करू शकत नाही असे दिसतंय.

वंदे भारतच्या चाहत्यांची फेसबुकवर तुफान धुलाई होतीय. सामान्य वेगाने जाणारी वंदे भारत दिसते आणि नया भारतवाल्यांचा बीपी इकडे वाढतोय असे मिम्स फिरतायत. पण सामान्य रेल्वे प्रवास अतिशय उबग येईल इतका घाणेरडा आणि त्रासदायक झाला आहे ही वस्तुस्थिती आहे.

परराष्ट्र मंत्र्यांच्या कुठल्यातरी भारतातीलच परिषदांमधल्या डरकाळ्या ऐकून भक्तांना हर्षवायू होत असतो. अशी मग्रूरीची भाषा ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वापरू शकत नाहीत आणि महुआ मोईतरा तसेच राहुल गांधींची बडतर्फी, महाराष्ट्रातील सरकार पडतांना न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे.

बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली का ते.

सुबोध खरे's picture

10 May 2024 - 8:09 pm | सुबोध खरे

न्यायालय आणि निवडणूक आयोग तसेच सभापती यांच्या वागण्याचे समर्थन ते देशाबाहेर करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, भारतीय जनता हे विसरली देखील असेल पण आंतरराष्ट्रीय समुदायाकडे याचा हिशोब आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने भीक घालणं कधीच सोडून दिलंय.

त्रुदो सारख्या भिकारड्या ला भीक घालत नाहीच.

अमेरिकेने पनून बद्दल भरपूर आरडाओरडा केलाय पण पुढे काय झालं? काही नाही

त्यांनी आपण S -४०० क्षेपणास्त्र प्रणाली घेऊ नये म्हणून catsaa ची धमकी दिली त्यांना भीक न घालता भारताने दोन बॅटरी (एक अपकिस्तान आणि एक चीनविरुद्ध) उभ्या केल्या सुद्धा

रशिया कडून तेल घ्यायचं नाही म्हणून युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने सांगितलं त्यांना भारताने फाटा मारला यानि आज आपल्या गरजेच्या ४० % तेल आपण रशिया कडून घेतोय.

युरोपीय देशांना स्वच्छ शब्दात सांगितलं तुम्ही आपलं तेल आणि नैसर्गिक वायू रशिया कडून घेणं बंद करा आणि मग आम्हाला सांगा.

चीनच्या नाकावर टिच्चून फिलिपाइन्स ला ब्राह्मोस क्षेपणास्त्रे विकत दिली. व्हिएतनामशी बोलणी चालू आहेत.

पाकिस्तानला तर असंच कुणीही विचारत नाही.

अरब देशांना फाट्यावर मारून भारताने इस्रायल ला दारुगोळा विकला आहे.

https://thewire.in/government/govt-owned-munitions-india-ltd-exported-or...

दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका त्यांना फुकट कोव्हीड लशी देऊन त्यांच्यवर उपकार करुन ठेवला आहे .

आता कुठला आंतरराष्ट्रीय समुदाय राहिला

फुकटचा बागुलबुवा कसला उभा करताय?

बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम मि आज पर्यंत पाहिला नाही! कोणि कितिहि पुरावे दिले तरि तुम्हि मोदिद्वेश आणि नेहरु गांधी घराण्याची चाटुगिरि करणे सोडनार नाही!! त्यामुळे राहुदे!!!

अमरेंद्र बाहुबली's picture

10 May 2024 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली

कंट्रोल अंधभक्ता कंट्रोल. थोडी सभ्यता पाळ.

.
लोल! कंट्रोल आणि सभ्यतेच्या बाता तुम्हि मारताय??
उठाले रे बाबा,, मेरेको नही रे इस.... :)

भागो's picture

2 May 2024 - 8:08 am | भागो

ओके, सर. अजून काही?

चौकस२१२'s picture

2 May 2024 - 10:18 am | चौकस२१२

भागो अजून काय? तुमच्या प्रश्नांना थोडी उत्तरे दिली बस एवढेच

विवेकपटाईत's picture

2 May 2024 - 10:48 am | विवेकपटाईत

प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद.मुद्दा मध्यम वर्ग कमी मतदान करतो हा आहे. कुणाला करतो हा नाही. राजनीतिक प्रतिसाद देण्याची गरज नव्हती. कारण हा धागा राजनीतिक नाही.

अहिरावण's picture

2 May 2024 - 1:25 pm | अहिरावण

असं कसं..? ४ जुनपर्यंत खांग्रेसींना ओका-या काढायची संधी आहे... ते काढत आहेत

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 1:54 pm | अमरेंद्र बाहुबली

अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय. डू आय डी असल्याने सन्माननीय सदस्यांनी ह्या आयडी कडे दुर्लक्ष करावे.

अरेरे ! आम्ही सहज हात फिरवल.. तुमच्या मुस्काटीत बसली.. खेद आहे.

अमरेंद्र बाहुबली हा बिनडोक, अक्कल शून्य इसम आहे त्याच्याकडे मनोरंजन म्हणून पहावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 May 2024 - 6:17 pm | अमरेंद्र बाहुबली

:)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 May 2024 - 4:21 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे?

२०१४ साली स्मार्ट सिटीज,
२०१४ साली सर्वात जास्त ६६% मतदान झाले होते. मीडिया/विश्लेषक ह्यांना मध्यमवर्गाला ठोकुन काढायची जुनी सवय आहे.श्रीमंत लोक सरकार/मीडिया सर्वानाच फाट्यावर मारतात तर गरीब वर्ग कधी जातीचा आधार तर कधी रोकड्/बीयर/बिरियाणीचा आधार घेउन मतदान करतो. त्यामुळे संपादकीय/विशेष लेख वाचणे हे सुशि़क्षित मध्यमवर्ग करत असल्याने त्यालाच ठोकुन काढतात.
वीशीतील्/तीशीतील अनेकानी ह्यावेळी उत्साहाने मतदान केले आहे असे ऐकले.

अर्धवटराव's picture

7 May 2024 - 9:55 pm | अर्धवटराव

सुशिक्षीत/उत्तम आर्थीक स्थितीतले लोकं मतदानाबद्दल उदासीन का असतात हा मूळ प्रश्न मोदि हिंदुविरोधी कसे आहेत या प्रश्नावर येऊन ठेपला.
बाकी काहि बदल झाला असेल नसेल.. मिपा ने आपला स्वभाव काहि सोडला नाहि :)

चांगलं आहे.
वेगाने बदलणार्‍या जगात एकतरी व्यवस्था आपलं स्वत्व टिकवुन आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2024 - 4:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

गेल्यावेळपेक्षा मतदानाची टक्केवारी थोडी घसरल्याने अनेक 'सेक्युलर' पत्रकारांना आनंद झालेला दिसतोय. कारण मतदान जास्त झाले तर भाजपा सत्तेवर येणार असा हिशोब अनेक तज्ञांनी हयाआधी वर्तवला होता. दुसरीकडे भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाउंचे विश्लेषण मलाही आवडते पण त्यांचे विश्लेषण हे दिवाणखान्यातले विश्लेषण वाटते. कपट्,कारस्थान्,टोला, त्या टोल्याचा अन्वयार्थ.. असे विश्लेषण असते. भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.
अर्थात सेक्युलर पत्रकारांचे विश्लेषण फार वेगळे नसते. भारतातील प्रत्येक समस्येला मोदी/शहाच जबाब्दार असतात. २ कोटी नोकर्या द्या.. म्हणणार्याना पानाची टपरीपण चालवता येइल की नाही ह्याची शंका आहे.

सर टोबी's picture

11 May 2024 - 5:46 pm | सर टोबी

अधिक वैचारिक आणि तात्विक वगैरे कधी वाटला नव्हताच. पण चुकून माकून सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढण्याच्या तुमच्या सवयीमुळे तुम्ही दहा वर्षाच्या अनागोंदी नंतरही कट्टर भाजपेयी असाल असं वाटलं नव्हतं. असो. अजून एका आयडीकडे दुर्लक्ष करायचे.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 May 2024 - 6:07 pm | अमरेंद्र बाहुबली

भाउ तोरसेकर्,आबा माळकर, सूर्यवंशी वगैरे 'ह्या'बाजुचे पत्रकार ३५०+ म्हणत आहेत. भाऊ तोसरेकर आणी पत्रकार?? खो खो.

मुक्त विहारि's picture

11 May 2024 - 6:10 pm | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

अहिरावण's picture

13 May 2024 - 2:07 pm | अहिरावण

>>>भाउंच्या विश्लेषणात सामान्य मतदाराला काहीही किंमत नसते. त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.

सामान्य मतदार अपेक्षा, होणारी कामे यासाठी नगरसेवक, ग्रामसेवक, जीपसदस्य यांच्याकडे जातो.
सामान्य मतदाराला अर्थव्यवस्था कशाशी खातात याचे काही देणे घेणे नसते
नोक-यांसाठी आमदार जवळचा वाटतो.

खासदार नक्की काय करतो हे बहुतांश खासदारांनाच माहित नसते तर सामान्य मतदारांची काय कथा !!

तरीही लोकशाही झिंदाबाद !! चेहरा यासाठीच लागतो. मुद्दे निष्प्रभ असतात. चेहरा चालत असतो.

मोदींचा चेहरा जनतेला आश्वासक का वाटतो याचा विरोधकांनी विचार करावा. पण विचार करता येणे ही एक अवघड कला आहे.

नठ्यारा's picture

11 May 2024 - 6:32 pm | नठ्यारा

माईसाहेब कुरसूंदीकर,


त्याच्या अपेक्षा,होणारी कामे, अर्थव्यवस्था,नोकर्या, ह्यापैकी काहीही नसते.

नेमक्या याच कारणामुळे ते मर्मग्राही असते. उगीच फापटपसारा नसतो. थेट मतदाराच्या डोक्यात काय चाललंय याची झलक असते.

-नाठाळ नठ्या

रात्रीचे चांदणे's picture

11 May 2024 - 7:06 pm | रात्रीचे चांदणे

भाऊ आपले म्हणणे संयमपणे मांडतात हे सोडलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये बाकी काही नसते. काहीही झालं तरी भाजपा आणि फडणवीस हेच कसे बरोबर आहेत हे पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यांचा २०१९ साली भाजपचे ३०० खासदार होतील हा अंदाज मात्र बरोबर ठरला होता.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 May 2024 - 2:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत. ह्यावेळीही त्यांचे अश्वमेध हे पुस्तक प्रकाशीत झाले आहे. भाऊंची अनेक मते मलाही पटत नाहीत पण त्यांचे बोलणे, पटवुन देणे छान असते. निखिल वागळे,हेमंत देसाई,ध्रुव राठी ह्यांच्यासारखे आक्रस्ताळी बोलणे नसते. व्यक्तिगत टीका नसते.

आग्या१९९०'s picture

12 May 2024 - 8:15 pm | आग्या१९९०

ध्रुव राठी ह्यांच्यासारखे आक्रस्ताळी बोलणे नसते

ध्रुव राठी आणि आक्रस्ताळी? संयमित आणि मुद्देसूद मांडणी असते त्याची. भले त्याचे विश्लेषण एखाद्याला पटत नसेल परंतू आक्रस्ताळी लेबल लावणे पटत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2024 - 8:19 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
भाऊ टोचरेकर सारखा कल्पना विलास नसतो तर फॅक्ट्स असतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 May 2024 - 8:57 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अमरेंद्रा, पण भाऊंचे २०१४,२०१९ मधील भाकीते अचूक आली. ह्याउलट आमचे कुमार केतकर "२०१९ मध्ये मोदी निवडणूकच घेणार नाहीत" असे म्हणायचे. मोदी निवडुन आले त्यामागे मोठा आंतरराष्ट्रीय व्यापक कट आहे असेही म्हणायचे. मात्र ४० वर्षे पत्रकारिता करणार्या केतकरांनी ह्याचे पुरावे द्यायची काही तसदी घेतली नाही.
आमचे माहिमचे निखिल वागळेही असाच प्रकार. उद्धव ठाकरे बावळट आहेत ह्या विधानापासुन ते आता उद्धव ठाकरे मुत्सद्दि आहेत ईतपर्यंत आले. असो..

सर टोबी's picture

12 May 2024 - 10:10 pm | सर टोबी

हा पत्रकार चांगला किंवा वाईट ठरवण्याचा निकष होऊ शकतो? आणि हेमंत देसाई आणि ध्रुव राठी आक्रस्ताळे? प्रतिसाद नक्की मराठीतच आहे ना?

आग्या१९९०'s picture

12 May 2024 - 11:19 pm | आग्या१९९०

ह्याउलट आमचे कुमार केतकर "२०१९ मध्ये मोदी निवडणूकच घेणार नाहीत"
काय चुकीचे म्हणाले? सुरत आणि इंदोर पॅटर्नने ही सुरुवात आहे.

काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई निवडणूक झाली ना? का त्यावेळी तुम्ही परग्रहावर होता ?

आग्या१९९०'s picture

13 May 2024 - 12:12 pm | आग्या१९९०

२०१९ ला घडले नाही पण त्यांनी दिलेला इशारा आता खरा ठरतोय. २०२४ नंतरच्या लोकसभा निकालावर पुढील प्रगती अवलंबून आहे.

सुबोध खरे's picture

13 May 2024 - 12:24 pm | सुबोध खरे

हां

करा सारवासारव