२१ लाखाचे स्वयंवर
हातात वरमाला घेऊन राजकन्या लाजत मुरडत उभी आहे.
पिताश्रींनी ठेवलेल्या असंभाव्य अशा अटीवर तिचा विवाह सोहळा पहायला सज्ज राजदरबारी उपस्थित प्रजा उत्कंठेने वाट पहात आहेत. कोण वीर पुढे येऊन पण सहज जिंकून हसत हसत राजकन्येच्या हातून वरमाला गळ्यात घालून सजवलेल्या आपल्या रथातून घेऊन जात आहे.
कार्टूनमधील मांजर सापळ्यात ठेवलेल्या आमिशाकडे पहात वाट बघते. कधी एकदा बिचारा उंदीर येतोय.
एका गलेलठ्ठाला येताना पाहून मांजराची तारांबळ उडते.
सगळा उंदराच्या स्वयंवराचा खेळ खल्लास होतो.
आता परिकथेतील राजकुमार पण जिंकायची शक्यता नाही. पण सध्या नव्या पिढीला पण लावून जिंकून ₹२१ लाखपती व्हावे अशी सोय आहे. एका संस्थानाचे आयोजक यांनी स्वयंवर मांडले आहे असे वर्तमान पत्रातून जाहीर आहे.
काही गोष्टींचा हंगाम असतो. भारतात २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने स्वयंवराचे निमंत्रण रीतसर पुकारले गेले. आतापर्यंत माहिती झालेल्या अटी, नियम, शर्ती वगैरे पुन्हा एकदा उजाळा म्हणून सादर केल्या गेल्या. २१ लाखांची राजकन्या मिळवा असे घसघशीत प्रलोभन ठेवले.
जाहीर आव्हाने पुकारलेल्या गोष्टीत एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की समोर राजकन्या धडधडीत दिसत असते. उंदराला पकडायला ठेवलेले चीझ दिसत असते.
करोडोंच्या राशीच्या राशी पहायची सवय आजकाल झाली आहे. पण संस्थानाच्या आव्हानाच्या २१ लाख रुपयांचा ढीग कुठे दिसत नाही. पैशाच्या राशी प्रत्यक्ष दिसत नसतील तर तर मग स्वयंवराचा पण मोडायला कोण येणार?
आपले आव्हान स्वीकारून कोणी तरी पुढे येणे शक्य आहे का? आला तर त्याला स्वयंवराच्या आखाड्यात चीत कसे करायचे ह्या कलेत संस्थानिक प्रवीण आहेत.
कार्टूनमधील गलेलठ्ठ कुत्रा पुढे आल्यावर जशी मांजराची पळापळ होते. तसे एक एक व्यक्तिमत्व असे असते की ते पुढे आले की पकडले जाण्याची भिती वाटून पशार व्हायच्या वाटा शोधल्या जातात.
असे इतके पॉवरबाज कोण असणार?
मिपाकरांचे काही अंदाज?
प्रतिक्रिया
25 Apr 2024 - 3:20 pm | नगरी
.
25 Apr 2024 - 6:16 pm | शशिकांत ओक
शोधा. कोण असू शकते ते व्यक्तिमत्व... कुंडली मांडत असाल तर कदाचित ते तुम्ही असू शकता!
26 Apr 2024 - 6:04 am | चित्रगुप्त
मज अल्पमतीस काही समजले नाही. कोणते स्वयंवर ? (निडणुका ?) २१ लाखाची काय भानगड आहे ? उंदीर, मांजर, गलेलठ्ठ कुत्रा कोण, काहीही समजले नाही. (आम्ही वर्तमानपत्र वाचीत नाही आणि बातम्या पण बघत नाही)
26 Apr 2024 - 11:04 am | शशिकांत ओक
अमेरिकेत मराठी पेपर वाचत नसाल म्हणून कोड्यात पडलेल्यांना सोपे जावे म्हणून उत्तर देतो...
अंनिसचे प्रतिनिधी डॉ हमीद दाभोलकर यांनी एक पत्रकार परिषदेत सांगितले की येत्या लोकसभा निवडणुकीत किती व कोण निवडून येणार ही भविष्य वाणी करायला तमाम ज्योतिषांनी आमच्या समोर येऊन म्हणजे २१ लाखाचे स्वयंवर मांडले आहे, तिथे त्यातील (पण) आव्हान स्वीकारून २१ लाख रुपये रक्कम हातोहात घेऊन जावी...!
कोड्यातील दुसरा भाग मिपावरील अंनिस पूरक विचार करणार्या सदस्यांची जागरूकता समजून घ्यायला सध्या उघड करून त्यांचा विरस करू इच्छित नाही...
28 Apr 2024 - 12:40 pm | शशिकांत ओक
अंनिसच्या पणाला उत्तर म्हणून मी हे आव्हान स्वीकारून पुढे आलो आहे. असे म्हणणारे ते व्यक्तिमत्व कोण यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. अशा धाग्यावर हिरीरीने प्रकाश टाकणारे अजूनही शांत राहिले आहेत. पुर्वी ट्रोलींग करणारे डॉ दाभोलकरांच्या पठडीतील सदस्य चर्चेत सहभागी होणार का?
26 Apr 2024 - 6:14 pm | चित्रगुप्त
@ शशिकांत ओक : याबद्दल पुढे काय काय घडते ते या धाग्यात अवश्य देत रहावे. रोचक विषय आहे. पत्रकार परिषदेचा फोटो/बातमी किंवा व्हिडियो पण इथे देऊन ठेवावा. काही वर्षांनंतर या धाग्यावर येणाराला सगळी माहिती एका ठिकाणी मिळेल. ज्योतीष आणि राजकारण एकाच धाग्यात. लगे रहो.
-- यावरून एक खूप जुना प्रसंग आठवला. लंबकविद्येवरले एक पुस्तक तुम्ही मला दिले होते, ते वाचून लगेचच भविष्यकथनाबद्दलचा एक प्रयोग मी करून बघितला आणि तो शंभर खरा ठरल्याचे तासाभरातच समजले. यामुळे हुरूप येऊन मी त्यापुढली दीड-दोन वर्षे अनेकांचे भविष्य सांगू शकलो होतो. हे सगळे २०११ च्या खालील च्या धाग्यात लिहीलेही होते:
एक वजनदार धागा:
https://www.misalpav.com/node/19105
29 Apr 2024 - 4:05 pm | शशिकांत ओक
29 Apr 2024 - 4:06 pm | शशिकांत ओक
29 Apr 2024 - 4:07 pm | शशिकांत ओक
29 Apr 2024 - 4:39 pm | शशिकांत ओक
26 Apr 2024 - 7:30 pm | शशिकांत ओक
पुढे काय होणार याची उत्सुकता भविष्य कथनकारांकडे नेते. अनेकदा लोकांना असे ही प्रश्न असतात याचे नवल वाटते.
लंबकाचा धागा पकडून लिहिलेला तो लेख वजनदार होताच शिवाय तो रंगवून सांगण्याच्या हातोटीमुळे लोकप्रिय होता.
लंबकविद्या लष्करी कारवाईत उपयोगी पडेल असे प्रयोग पूर्वी केले होते. याची आठवण या निमित्ताने झाली. सुप्रसिद्ध डाऊझिंग तज्ज्ञ कै. डॉ वि ह कुलकर्णी यांच्यावर एक ई-बुक २७ (लिंक खाली दिली आहे) श्रद्धांजली म्हणून अर्पण करून शनिवार वाडा भुताटकीचा आहे का? असा शोध घेतला गेला.
https://drive.google.com/file/d/14ay2lopFO0oP2eECa0HZVV0ytHKYiB28/view?u....
27 Apr 2024 - 8:29 am | तिता
हे बरे आहे. ज्योतिष बघुन खासदार घोषित करा. पैसा आणि श्रम, दोहोची बचत. आमचे घरी आणि मित्रांबरोबर वाद ही होनार नाहीत.
27 Apr 2024 - 2:44 pm | शशिकांत ओक
कुंडलीतील ग्रहमान पाहून कोण जिंकतील. हे ठरल्यावर निवडणुकीच्या झंझटात पडा कशाला?
27 Apr 2024 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
ज्योतिष हे थोतांड आहे. पानीपत भाऊ ३ दिवस आधी लढणार होता. पण ज्योतिषाने चांगला मुहूर्त ३ दिवसानंतर आहे सांगितल. नी त्या मग पानीपत झाल. श्री. शरद पवार कधीही मुहूर्त वगैरे पाहून फॉर्म भरत नाहित तरीही मुहूर्त पाहणाऱ्यांना पुरून उरले नी कधीही हरले नाहीत.
27 Apr 2024 - 10:41 pm | मुक्त विहारि
हे नक्की का?
शीख आणि सुजा उदौल्ला हे फिरले...
----
बाकी... चालू द्या..
---
28 Apr 2024 - 3:49 pm | चित्रगुप्त
या न्यायाने अॅलोपॅथी' हे थोतांड आहे ...माझा एक जवळचा नातेवाईक 'अॅलोपॅथी' औषधोपचाराच्या दुष्परिणामामुळे ६२ वर्षे वयात दिवंगत झाला, याउलट माझा मोठा भाऊ कोणतेही औषध घेत नाही, तरीही औषध घेणार्यांना 'पुरून उरून' नव्वदीतही टुणटुणीत आहे.
अबा भौ, कधीही अॅलोपाथी औषध घेऊ नका, ते थोतांड आहे हे मी तुमच्याच पद्धतीने वर सिद्ध केलेले आहे.
11 May 2024 - 2:46 pm | पाषाणभेद
पानीपतात अनेक कुटूंबे गेली होती. देवधर्म, काशी यात्रा वगैरे उद्देश असेलच.
आपल्या पोथ्या पुराणात पुजा कशी करावी याचे वर्णने आहेत. (माझा पोथ्या पुराणांना नकार नाही.)
पण या असल्या पुजांत फुले कशी असावीत, पाने कशी असावीत, आसन कसे असावे असे आहे. यात पुजा करणार्या सैन्याचा, कुटूंबाचा वेळ निश्चित वाया गेला असणार.
11 May 2024 - 3:06 pm | अमरेंद्र बाहुबली
वेळ निश्चित वाया गेला असणार.
वेळ वाया गेला असणार?? वेळ वाया गेला, कुंजपुरा हल्ल्यानंतर लग दिल्लीत परतले असते तर वाचले असते पण नाही. कुरुक्षेत्रवर जाऊन तीर्थयात्रा करत बसले १५ दिवस (?) नी सापडले.
पानीपत म्हणजे सैन्याच्या सुरक्षेत निघालेली तिर्थयात्रा होती.
28 Apr 2024 - 4:46 pm | चित्रगुप्त
अरे कमांडरा, हा धागा उघडल्यावर सर्वात आधी रामायण सिरियलातले दोन फोटो - तेही पिक्सलेटलेले. त्यानंतर मिकिमाऊस किंवा तत्सम कार्टूनातले चार फोटो. एवढे बघून हे काहीतरी टीव्हीवरील कार्यक्रमांविषयी असावेसे वाटून काही वाचकांनी पुढचे काही वाचलेच नसेल . वाचले तरी काहींना काही समजलेच नसेल. समजले तरी अंनिस वगैरेमध्ये रुची नसणारांना काही खास वाटले नसेल. अश्या कारणांनी धाग्यावर हजार टिचक्या पडूनही पब्लिक प्रतिसादत नसावे.
--- त्याऐवजी "कोण जिंकणार आगामी निवडणुका" असे काहीतरी शीर्षक देऊन मोदी, फडणवीस, उबाठा, कंगना, राठा, रागा वगैरेंचे फोटो देऊन मग त्यात अंनिसचे आवाहन वगैरे लिहीले असते तर धागा सुसाट धावला असता, असे 'ह्यांचे' म्हणणे.
-- बाईसाहेब फुर्सुंगीकर मोगलगद्दीकर.
28 Apr 2024 - 7:30 pm | अहिरावण
आडनाव चुकले
मोगलगद्दीकर नसून गद्दीमेगीलाकर असे आहे समजते
29 Apr 2024 - 1:12 am | शशिकांत ओक
.
30 Apr 2024 - 1:49 am | शशिकांत ओक
30 Apr 2024 - 1:50 am | शशिकांत ओक
30 Apr 2024 - 1:59 am | चित्रगुप्त
5 May 2024 - 1:04 am | शशिकांत ओक
अंनिसच्या एका कार्यक्रमात जाऊन ज्योतिषाचार्यांनी आपण आव्हान स्वीकारले आहे. थोडक्यात कार्टून मधील तिसऱ्या फोटोतील परिस्थिती निर्माण झाली. या नंतरची आव्हानाची कारवाई पत्रकार परिषद बोलावून पार पाडायची आहे असे ज्योतिषाचार्यांनी म्हटले आहे.
लवकर याबाबतपुढे काय घडेल ते पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सूत्रांकडून असे समजते की या धाग्याला अंनिसपर्यंत पोहोचेल असे काम करणे चालू आहे.
या बाबतची बातमी अशी...
पुणे – मी अंनिसचे आव्हान स्वीकारण्यास सिद्ध आहे आणि आता अंनिसनेही प्रसारमाध्यमे अन् जनतेसमोर सार्वजनिक कार्यक्रमात पुढे यावे ! अंनिस सांगेल त्या ठिकाणी केव्हाही मी येण्यास सिद्ध आहे. भोंदूगिरी पसरवणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रत्येक वेळी केवळ भोंदूगिरी पसरवते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी ते हे करत आहेत. अशा संघटनेवर बंदी घातली पाहिजे; कारण ते केवळ आव्हाने देतात आणि कधीच समोर येत नाहीत, असे सडेतोड उत्तर ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी महाराष्ट्र अंनिसला दिले आहे. (अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक) ‘लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवा आणि २१ लाख रुपये जिंका’, असे जाहीर आव्हान अंनिसने ज्योतिषांना दिले आहे. त्याला ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत अंनिसचे आव्हान स्वीकारले आहे.
आता रंजक ठरणार आहे जेंव्हा २१ लाख रुपये समोर ठेवून ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी दिलेल्या प्रति आव्हानाला महाराष्ट्र अंनिस पत्रकार परिषद घेईल.
30 Apr 2024 - 1:59 am | चित्रगुप्त
30 Apr 2024 - 6:22 am | चौकस२१२
30 Apr 2024 - 6:23 am | चौकस२१२
30 Apr 2024 - 7:37 am | चौकस२१२
30 Apr 2024 - 6:09 pm | शशिकांत ओक
30 Apr 2024 - 6:09 pm | शशिकांत ओक
30 Apr 2024 - 6:55 pm | चित्रगुप्त
30 Apr 2024 - 7:23 pm | अहिरावण
30 Apr 2024 - 11:50 pm | चित्रगुप्त
3 May 2024 - 10:33 am | शशिकांत ओक
11 May 2024 - 6:57 pm | चित्रगुप्त
५ मे च्या तुम्ही दिलेल्या बातमीनंतर पुढे काय झाले आहे ? ती पत्रकार परिषद वगैरे झाली का? अंनिसची आव्हान स्वीकारले जाण्याबद्दलची प्रतिक्रिया काय आहे ?
11 May 2024 - 7:28 pm | अहिरावण
आता ते २०२९ ला उगवतील
12 May 2024 - 1:02 am | शशिकांत ओक
8 Jun 2024 - 9:56 pm | शशिकांत ओक
निकाल लागला. कोण जिंकले कोण पडले....ते सगळ्या माध्यमातून लिहून आले.
स्वयंवरात भाग घ्यायला मी येतोय असे चॅलेंज पत्रकार परिषद घेवून म्हणूनही आव्हान प्रक्रिया कर्त्यांनी जणू काही कोणी आव्हान स्वीकारलेच नाही असे भासवले. आणि आता आमच्या आव्हानाला कोणीच स्वीकारले नाही असे पत्रक काढले जाईल. पुढील निवडणुकांच्या आधी असेच २१ लाखाचे स्वयंवर उभे केले जाईल....