माझे खाद्य प्रयोग: बिन ऑईल कढ़ी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in पाककृती
22 Apr 2024 - 12:15 pm

दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. आजकल तुम्हाला खाण्याचे डोहाळे खूप लागतात म्हणत, माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. पण आज सोन्याचा दिवस उगवला. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 ची असते. आज तिची बीसी होती. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा, तंबोला इत्यादी. मुख्य कार्यक्रम मनाला आनंद देणारा सांस्कृतिक आदान - प्रदान,. याशिवाय आज चिरंजीव ही ऑफिसला जाणार होते.
कढ़ी

सौ. ने सकाळी लवकर उठून स्वैपाक केला कारण चिरंजीव आठ वाजता निघणार होते. चिरंजीव गेल्यावर सौ.अंघोळीला गेली. हा मौका साधून तृतीयांश वाटी मूग डाळ एका वाटीत गरम पाण्यात भिजवली. वाटी बैठीकीच्या खोलीत माझ्या पुस्तकांची रेक आहे. त्यात ठेऊन दिली. माझ्या बाबतीत सौ.चे नाक कान आणि डोळे अत्यंत तीष्ण तरी तिला वास लागला नाही. अकरा वाजता सौ. बीसीला गेली.आता तीन वाजेपर्यंत काळजी नव्हती. वाटी आणून स्वैपाक घरात ठेवली.

दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली. दोन चमचे दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन टाकून मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला.

कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली. दोघांना आवडली. पहिला प्रयोग सफल झाला. "घरी बसून फालतूचे लेखन करणे ऐवजी एखाद्या ढाब्यात काम करा, काही पैका तरी मिळेल", सौ.चा शेरा.

प्रतिक्रिया

फोटो छान आला आहे. बिन तेलाची आणि बेसनाचे गोळे वरून टाकलेली कढी चविष्ट होईल असे पटत नाही. पण तुम्ही खुद्द अनुभव सांगता आहात म्हणजे तुमच्या हातात जादू असणारच. तसे नुसते ताक वेगवेगळे मसाले टाकून आपण पितोच. चवीला छान असले तरी त्याला बेसन गोळे/ पकोडेवाली कढी असे नाव योग्य ठरेल का? शंका आहे.

विवेकपटाईत's picture

25 Apr 2024 - 11:06 am | विवेकपटाईत

स्वाद हा मसाल्यांचा असतो. योग्य टाकले की स्वादिष्ट होईल नाही तर कितीही तेल टाका स्वाद येणार नाही. बाकी मूग डाळ आणि बेसन दोन्हींचा मूळ स्वाद स्वादिष्ट नसतो.

गवि's picture

22 Apr 2024 - 12:31 pm | गवि

मध्यंतरी यू ट्यूब वर बिनतेलाच्या पुऱ्या असेही बघितले होते. म्हणजे आपोआप समोर आले. उकळत्या पाण्यात कणकेच्या पुऱ्या लाटून सोडल्या होत्या. त्यांना उकडलेली कणीक म्हणता येईल. पुरी म्हणता येईल का? असा प्रश्न पडला.

बिनतेलाचे पदार्थ बनवण्यासाठी मूळ पदार्थाची आयडेंटिटी घालवण्यापेक्षा मर्यादित तेल घालून आणि महिन्यातून कमी वेळा मूळचे तेलात बनवलेले पदार्थ बनवलेले कमी पोर्शन साईज खाणे हे आरोग्यास अधिक चांगले असे वैयक्तिक मत.

अहिरावण's picture

22 Apr 2024 - 12:43 pm | अहिरावण

असले प्रयोग करता आणि मग पोट बिघडतं !!

स्वयंपाक करतांना काळजी घ्या (बाकीच्यांची... तुम्हाला काही होत नाही) :)

कंजूस's picture

22 Apr 2024 - 12:47 pm | कंजूस

जमलीय हो.
आमच्याकडे कढी/आमटी गोळे करतात. ते मुगडाळ/चणाडाळ वाटून गोळे केल्यावर थोडे वाफवून घेतात. मग कढी किंवा आमटीत टाकायचे. वरून फोडणी ऐच्छिक.

अहिरावण's picture

22 Apr 2024 - 12:53 pm | अहिरावण

अगदी. आणि ऐनवेळेस समजा गोळे नसणार जमणार तर खारी बुंदी !! टकाटक !!

कर्नलतपस्वी's picture

22 Apr 2024 - 2:16 pm | कर्नलतपस्वी

कमी तेलाच्या किवा बिन तेलाच्याच असतात. लसूण खोबऱ्याचे मिक्स तेलाचे काम करते.

पण कही म्हणा, तेलच्या आणी गुळवणीची सर कशालाच नाही.

नगरी's picture

25 Apr 2024 - 3:26 pm | नगरी

Gannapa yes

नगरी's picture

25 Apr 2024 - 3:28 pm | नगरी

शोधा म्हणजे सापडेल, तात्याचा दोस्त