मराठीतील काही शब्द संकल्पना बदलायला हव्यात का ?

योगविवेक's picture
योगविवेक in काथ्याकूट
1 Apr 2024 - 1:43 pm
गाभा: 

नुकतेच मला विंग कमांडर ओकांचे लेखन वाचायला मिळाले. वाचून विचारात पडायला झाले. म्हणून ते लेखन इथे चर्चेला सादर करू इच्छितो. ते म्हणतात...

नमस्कार मित्रांनो,
शिवाजी महाराजांची 'स्वराज्य' ही संकल्पना काय होती? या शिवाय गमिनीकावा ही शब्दयोजना महाराजांच्या युद्धनितीला समर्पक आहे का? नसेल काय पर्याय असावा? गुरिल्ला हा शब्द महाराजांच्या लढायांच्या संदर्भात गौरवाने वापरला जातो. त्याची सार्थकता काय आहे? यावर विचार व्यक्त करतो.
शहाजीराजे यांच्या पुणे जहागीरदारीचे वतन राखण्याची जबाबदारी तरुण महाराजांवर आल्यावर त्या अंतर्गत प्रजेला शांत आणि सुरक्षित जीवनयापन करायला मिळावे, शेतीच्या मालाची कर आकारणी, वसूली, योग्य दरात व्यापार करून जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, श्रद्धास्थानांना, विद्वानाना, कलावंतांना मान-सन्मान देणे आणि तत्पर सैन्य शक्तीला शस्त्रे, जनावरे यांचे नियोजन करणे, पूर आणि अवर्षण परिस्थितीत हानी कमी करणे ह्या जबाबदाऱ्या शासक म्हणून त्यांच्यावर आल्या.
त्या काळात ज्या राजकर्त्यांच्या वतीने ही जबाबदारी सनदशीर मिळत असे, त्यांच्या राजकारणातील घडामोडींचा प्रभाव जहागीरदारांवर पडून बदलत्या शत्रू आणि मित्रांवर हत्यारे चालवायची वेळ येत असे. त्यामुळे जनतेला निष्कारण असुरक्षित करावे लागत असे.
आपल्या जहागिरदारीच्या सीमांतर्गत जे गड आणि किल्ले येतात त्याचे नियंत्रण राजसत्तेकडून नेमणूक झालेले किल्लेदार करत असत. त्यांच्या आदेशानुसार जहागीरदारांवर वागण्याचे कडक बंधन असे. लढाई मोहिमांवर सैन्य पाठवायची जबरदस्ती होत असे. युद्धात पराभव किंवा तहातील करारानुसार राजसत्तांची हस्तांतरणे होत तेंव्हा नव्याने पेचाच्या राजकीय परिस्थिती निर्माण होत. जहागिरदाऱ्या, वतने बुडत असत. नवी निर्माण होत असत. नवे सत्ताधारी लोक आपापल्या परीने जनतेवर मनमानी करत. आपापसातले राजकारण करण्यात दंग होत असत.
आमच्या जहागिरदारीच्या सीमांतील किल्लेदाराची नेमणूक बाह्य राजसत्तांकडून झाली नसली पाहिजे. आमची आम्ही ठरवली पाहिजे. ते ठरवण्याचे 'स्वातंत्र्य' आम्हाला असले पाहिजे. ह्या विचारांतून स्वातंत्र्य संकल्पनेचा प्रवाह सुरु केला गेला. तरुण पोराचे काही तरी खूळ आहे. काही काळानी आपल्या आपण संपेल असे आसपासच्या जहागिरदारांना वाटून त्यांनी दुर्लक्ष केले. पण शिवाजी महाराजांचे निस्पृह न्यायदान, वेतनावर आधारित सैन्य उभारणी यामुळे महाराजांच्याकृतींना, विचारांना काही वरिष्ठ जहागिरीच्या सरदारांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळू लागले. यातून जहागीरदारांनी बाह्य राजसत्तांच्या राजकारणात आपण यात पडावे किंवा पडू नये, काय करावे किंवा करू नये, आपल्याकडील सैन्य शक्तीने कोणाच्या बाजूने उभे राहावे याचे निर्णय जहागीरदारांकडे असले पाहिजे ही विचारसरणी मान्य झाली.
ही स्वतंत्रतावादी विचारसरणी राज सत्ताधाऱ्यांना कधीच मान्य होणारी नव्हती. मग ते मुगल असोत किंवा इंग्रज असोत.
आपले स्वतः चे किल्लेदार नेमणे यातून ही मोहीम सुरू झाली. अनेक गड- किल्ले, भूभाग आपल्या अंतर्गत विचारसरणीला मानू लागल्यावर जहागीरदारी या सीमित संकल्पनेचे कवच फोडून सार्वभौम राजा म्हणवून घेणे शिवाजी महाराजांना आवश्यक झाले.
त्याची परिणिती शिवाजी महाराजांनी विद्वान प्रतिष्ठित ब्राम्हणांकरवी राज्याभिषेक करून राजा शिवछत्रपती अशी मान्यता मिळवली, शिवराई चलन, सल्लागार प्रधान मंत्री मंडळ, वार्षिक अर्थनियोजन, स्वतंत्र निस्पृह न्यायपद्धती यातून आपल्या संस्कृतीला आधारभूत स्वराज्य निर्मितीची ध्वजा उभारली.
स्वातंत्र्यः संकल्पनेत व्यक्तिगत, सामुहिक, आर्थिक, वैचारिक, धार्मिक स्वतंत्रता देणारी सर्व समावेशक कल्याणकारी समाजरचना हे ध्येय शिवाजी महाराजांच्या कृतीतून दाखवून दिले. यावर आपले विचार जाणून घ्यायला आवडेल.
=============
नमस्कार मित्रांनो,
गनिमीकावा या मराठीत रूढ झालेल्या शब्द योजनेवर विचार व्यक्त करायचे आहेत. सध्या गनिम म्हणजे शत्रू असा मवाळ अर्थ मानून शत्रूशी मुकाबला करायची शिवाजी महाराजांची युद्धनीती असे मानतात. गनीम [Ganiim• غنيم हा अरबी भाषेत - डाकू, लुटारू म्हणून प्रामुख्याने वापरला जाणारा शब्द आहे. कुराणात गनीम हे एक क्रियापद आहे ज्याचा अर्थ "युद्धात लूट म्हणून घेणे" आहे.] मुस्लिम लोकात कुराणातील कथनानुसार गैरमुस्लिम समाजाला उद्देशून हीन भावना निर्माण करण्याची प्रथा आहे. शिवाजी महाराजांच्या जीवनातील लढायांतून त्यांना लुटारू म्हणून हिणवणे मुसलमानांच्या दृष्टीने स्वाभाविक होते. कावा म्हणजे युक्ती, शक्कल. या दोन शब्दांना एकत्र करून मराठीत महाराजांची युद्ध कला असे भोंगळपणे म्हटले जाते. ही शब्दयोजना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नकळत नकारात्मक प्रभाव निर्माण करते.
याला पर्याय म्हणून Maneuver warfare असे इंग्रजीत जास्त समर्पक नाव देता येईल काय?
(Maneuver डावपेच, युक्ती योजणे) Warfare म्हणजे युद्ध तंत्र. सध्याच्या गनिमीकावा या हीन भावना निर्माण करणाऱ्या शब्दाऐवजी जास्त प्रभावी पर्याय मराठीत आणि हिन्दीत 'धूर्त (कावेबाज, हुशार, कुशाग्र बुद्धीचे) युद्ध तंत्र' असे म्हटले तर? धूर्त शब्दातून काय काय सूचित होते ते पाहू.
धूर्त - कुशल, अत्यंत ह्शार, सावध, चाणाक्ष, मुत्सुद्दी, कावेबाज, लबाड, बिलंदर, वरचढ कसे व्हायचे हे पटकन ठरवणारा, समयोचित योग्य कृती करणारा, astute.
शिवाजी महाराजांच्या जीवनातील युद्ध प्रसंगातून वरील अर्थछटा चपखल बसतात. म्हणून ‘धूर्त युद्धतंत्र’ शब्द योजना सुयोग्य आहे.
रुढ गनिमीकावा शब्दाला चालू ठेवण्याऐवजी कालांतराने का होईना सकारात्मक बदल करणे गरजेचे आहे.
या शब्दरचनेवर Copilot AI चा सल्ला घेतला. त्याचे म्हणणे खाली दिले आहे.
युद्धतंत्र (Yuddhatantra):
Certainly! I appreciate your thoughtful consideration. Let’s explore some Marathi terms that align with the essence of maneuver warfare and Shivaji Maharaj’s military tactics:
युद्धतंत्र combines two words:युद्ध (Yuddha): Refers to war or battle. तंत्र (Tantra): Implies a system, methodology, or strategy. Together, युद्धतंत्र encapsulates the systematic approach to warfare, emphasizing strategy, tactics, and maneuver. This term aligns well with Shivaji Maharaj’s innovative and adaptable military methods.
धूर्त युद्ध तंत्र (Dhurta Yuddha Tantra):
Shivaji Maharaj’s ‘Dhurta’ tactics often involved such clever maneuvers.

गुरिला तंत्र

या शब्दांना मराठीत गनिमीकावा असे भोंगळपणे नाव दिले जाते. बरेचदा गुरिला शब्द तसाच वापरतात. त्यातून कट, घातपात, अचानक दहशती हल्ले करून पळून जाणे अशा कारवाया अर्थ ध्वनित केला जातो. अशा घातक कृती करून शत्रूवर सैनिकी विजय मिळवणे अपेक्षित नसते. शत्रूच्या योजनात विघ्ने आणणे, गोंधळ उडवून देणे, निरपराधांना ओलीस धरणे अशा समाजविरोधी तंत्रांचा वापर करणे म्हणजे छापेमारीचे गुरिला तंत्र.
शिवाजी महाराजांच्या राज्य कारभार शैलीत आपल्या रयतेला असे त्रास देऊन राज्यकारभार करणे मुळात अमान्य होते. त्यांच्या सैनिकी मोहिमांतील विविध कल्पक डावपेचांना गुरिला तंत्र संबोधून मुंबई, अक्षरधाममंदिर, लोकसभागृहावरील हल्ले, किंवा नक्षली कारवायांच्या हीन स्तरावर उभे करणे किती योग्य आहे याचा विचार व्हावा.
व्हिएतनाम देशातील लोकांना अमेरिकेविरुद्ध संघर्षात शिवाजी महाराज आदर्श वाटतात. विदेशातील उच्च मिलिटरी कॉलेजात महाराजांच्या गौरवपूर्ण युद्धनितीचा अभ्यास केला जातो याचे महत्वाचे कारण शिवाजी महाराजांनी दरवेळी वापरलेल्या नवनवीन कल्पक युद्धरचना, खेळ्यांमधून मिळवलेल्या विजयांचे अनेक अंगांनी विश्लेषण करता येते हे आहे.
आता ‘कोपायलट’ नामक कृत्रिम बुद्दिमत्तेकडून काय माहिती मिळते ते पाहू. तिथे अजून मराठी भाषेत समर्पक उत्तरे मिळायला जड जाते. (मी मराठी अजून शिकत आहे, असे म्हटले गेले. असो.)
The word “guerrilla” emerged from Spanish language.
It connotes Irregular Forces: Guerrillas operate in small units and often blend into the civilian population. They conduct actions such as ambushes, sabotage, hit-and-run attacks, and harassment. In summary, while the term “guerrilla” may not fully encompass Shivaji Maharaj’s multifaceted military strategies, it does highlight his adaptability and effectiveness in both conventional and irregular warfare.
वरील संकल्पनांवर विचार व्हावा. काही काळाने का होईना अपेक्षित बदल होतील.

प्रतिक्रिया

शशिकांत ओक's picture

3 Apr 2024 - 10:07 am | शशिकांत ओक

माझे विचार आपण मिपावर सादर केलेत आता काय प्रतिक्रिया येतात ते पहाणे उत्सुकताचे राहील.

चित्रगुप्त's picture

3 Apr 2024 - 12:39 pm | चित्रगुप्त

'चातुर्य-युद्ध तंत्र' कसे वाटते ?
महाराजांच्या 'स्वराज्य' या संकल्पनेबद्दलही वाचायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

3 Apr 2024 - 7:09 pm | शशिकांत ओक

धन्यवाद चित्रगुप्त, आपण सुचवलेली पर्यायी शब्दरचना विचार करायला लावते. कोपायलट ने ही हे सुचवले होते. त्याला मी म्हटले की चातुर्य शब्द दिवाणखान्यातील राजकारणात बुद्धी- चातुर्य म्हणून समर्पक आहे. रणांगणात शस्त्रे, सैन्य रचना, बदलल्या खेळ्या या पार्श्वभूमीवर शौर्य, साहस आणि कल्पकता यातून शत्रूला जिवे मारायला लागणारी कणखर मानसिकता लागते ती कावा किंवा धूर्तता यातून जास्त प्रभावीपणे दर्शवता येईल.
गनिमीकावा शब्द बदलायची गरज आहे की नाही यावर देखील इतर विचारकांचे पर्याय समजून घ्यायला आवडेल.
विवेक चौघरींनी नवा शब्द तयार करायची गरज मान्य केली होती.

छ. शिवाजी महाराज यांच्या चतुर सत्ताकारणास निती आणि मर्यादा असत ज्या गुरीला, गनिमी, कावा, धूर्त या शब्दात येत नाहीत त्यामुळे या शब्द योजना नेहमीच खटकत आल्या आहेत. 'चतुर' शब्दाची व्युत्पत्तॉ माहित नाही पण धूर्त शब्दाची अर्थछटाही जराशी खटकते असे वाटते.

कंजूस's picture

4 Apr 2024 - 6:06 am | कंजूस

पटलं.

लिहीते राहा.

सर टोबी's picture

4 Apr 2024 - 1:16 pm | सर टोबी

असं काहीसं म्हणता येईल. इथे राजांसमोर जी उद्दिष्ट होती त्याला इतिहासातंच काय पण नजिकच्या भूतकाळात देखील काही समांतर असा दाखला नाही. प्रस्थापितांशी लढतांना तेथील जनतेची सहानुभूती आपल्याबरोबर राहावी अशी कसरत राजांना करणे भाग होते कारण ती त्यांची भविष्यातली रयत असणार होती. त्या जनतेचे असणारे राजे यांना कोणत्याही प्रकारे प्रस्थापितांविरूध्धचा आक्रोश सहन करावी लागण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे चढाई करतांना फक्त आणि फक्त शत्रूलाच त्रास होईल हे राजांना बघावे लागायचे.

शब्द अथवा वाक्प्रचार तयार करतांना “हे आणि यासम इतरही अनेक, कथित अथवा गृहीत, सध्या अस्तित्वात असणारे आणि भविष्यात तयार होणारे पर्याय” अशी सर्वसमावेशक भूमिका असते. तरीही आपल्या तीव्र भावना असतील तर संबंधित सरकारी खात्याशी विचारविनिमय करता येऊ शकेल असे वाटते.

'युद्ध कूटनीती ' हा शब्द सुचला.लेख खुपच अवर्णनीय आहे.
जय शिवराय!

धूर्त शब्दावर वरील पुस्तके वाचल्याचा परिणाम आहे असे असू शकतो. कदाचित सरावाने वापरून तो थोडा गुळगुळीत होईल.
युद्ध 'कूट'नीति यात लढायांची भीषणता जाणवत नाही. कूट शब्द , रहस्य, विष प्रयोग, पाठीवर वार असे दुष्ट काम करायला प्रवृत्त करतो असे वाटते.
'अपारंपरिक' शब्दात मुगल किंवा अन्य सेना पारंपरिक पद्धतीने युद्ध करत म्हणजे नक्की कशी व्यूहरचना करत? हा शब्द आधी रूढ झाला पाहिजे. त्यांच्या बरोबर असलेल्या बोजड तोफा, गोळे, बाजार बुणगे, बायका, मुले, युद्ध सामान वाहक जनावरे यामुळे मुगली सेनेला संथ गतीने पुढे सरकत जावे लागणे हे पारंपरिक पद्धतीचे होते. यातून युद्ध नीती जाणवत नाही.
१६७० नंतरच्या दूर जाण्यासाठी, जंगल आणि डोंगरी किल्ले या शिवाय दक्षिण दिग्विजय मोहिमांवर महाराजांच्या सैन्य तांडे, जाताना वाटेत किल्ले सर करायच्या नाविन्यपूर्ण योजना याचे वर्णन कल्पक साहसी पवित्रे असे करायला हवेत.
चतुर शब्द जरा सौम्य आहे. चाणाक्ष, खमक्या, हे बोलताना जास्त बरे वाटतात. पण लिहिताना चाणाक्ष युद्ध नीती मिळमिळीत वाटते

धूर्त शब्दावर वरील पुस्तके वाचल्याचा परिणाम आहे असे असू शकतो. कदाचित सरावाने वापरून तो थोडा गुळगुळीत होईल.
युद्ध 'कूट'नीति यात लढायांची भीषणता जाणवत नाही. कूट शब्द , रहस्य, विष प्रयोग, पाठीवर वार असे दुष्ट काम करायला प्रवृत्त करतो असे वाटते.
'अपारंपरिक' शब्दात मुगल किंवा अन्य सेना पारंपरिक पद्धतीने युद्ध करत म्हणजे नक्की कशी व्यूहरचना करत? हा शब्द आधी रूढ झाला पाहिजे. त्यांच्या बरोबर असलेल्या बोजड तोफा, गोळे, बाजार बुणगे, बायका, मुले, युद्ध सामान वाहक जनावरे यामुळे मुगली सेनेला संथ गतीने पुढे सरकत जावे लागणे हे पारंपरिक पद्धतीचे होते. यातून युद्ध नीती जाणवत नाही.
१६७० नंतरच्या दूर जाण्यासाठी, जंगल आणि डोंगरी किल्ले या शिवाय दक्षिण दिग्विजय मोहिमांवर महाराजांच्या सैन्य तांडे, जाताना वाटेत किल्ले सर करायच्या नाविन्यपूर्ण योजना याचे वर्णन कल्पक साहसी पवित्रे असे करायला हवेत.
चतुर शब्द जरा सौम्य आहे. चाणाक्ष, खमक्या, हे बोलताना जास्त बरे वाटतात. पण लिहिताना चाणाक्ष युद्ध नीती मिळमिळीत वाटते

धष्टपुष्ट's picture

5 Apr 2024 - 8:32 pm | धष्टपुष्ट

वक्राक्रमण

मायाघात = माया + आघात

यातुयुद्ध - यातु हा फारसी जादू च्या व्युत्पत्तीशी संबंधित शब्द आहे

युक्तियुद्ध - युक्ति = trick

व्याघ्राघात - कारण वाघ कावेबाज असतो

आपण उगाच प्रयत्न केलाय खरा त्यात आक्रमक पवित्रा महत्वाचा आहे. दबा धरून बसलेल्या पशूच्या कृतीने धूर्तपणा दर्शवतो. उंबरखिंडीतील नाट्य यात महाराजांच्या सेनेने दबा धरून करतलबखानाने केलेल्या साहसी कृत्याला तडाखेबंद फटके मारले. सामान, शस्त्रे व जनावरे खाली टाकून शरणागती पत्करावी लागली होती.

धष्टपुष्ट's picture

6 Apr 2024 - 1:51 am | धष्टपुष्ट

खरंय, पण तसा दोन शब्दांचा सुटसुटीत समास बनवणं अवघड वाटतंय. तीनेक शब्दांचा समास बोजड वाटतो.

व्याघ्राघात तेवढा थोडासा बसेल. आक्रमक इत्यादी येतं त्यात. चपखल आणि अचूक एखादा नीट शब्द नाहीये. वाघतडाखा?

जंगी इंगा?

काही विचार सादर केले तर आभारी राहीन.

नठ्यारा's picture

7 Apr 2024 - 8:53 pm | नठ्यारा

सावरकरांनी गनिमी काव्यास प्रतिशब्द म्हणून वृकयुद्ध सुचवला आहे. वृक म्हणजे नक्की काय ते मला माहित नाही.

भीम या पांडवाचं एक नाव वृकोदर होतं. यावरनं वृक ही द्वंद्व ( वा युद्ध ) खेळायच्या अनेक युक्त्यांची मोळी असावी. अनेक वृक आपल्या उदरात जपणारा ( दडवणारा ) असा चतुर योद्धा म्हणून भीमाचं वर्णन समर्पक वाटतं.

बाकी, गनिमी कावा याची फोड लुटारू गनिमांच्या विरोधात वापरण्यात येणारं धूर्त युद्धतंत्र अशीही करता यावी. गनीम या शब्दामुळे शिवाजीस कमीपणा यायचं कारण नाही, माझ्या मते.

-नाठाळ नठ्या

प्रचेतस's picture

7 Apr 2024 - 9:00 pm | प्रचेतस

वृक म्हणजे लांडगा, लांडग्यांचा कळप जसा आपल्या भक्ष्याला चहुबाजूंनी घेरून त्याची वाट बंद करून पकडतो त्यावरून हा शब्द सावरकरांनी दिला असावा असे दिसते.
वृकोदर मधल्या वृकाचा अर्थ मात्र भूकाग्नी असा होतो.

काळानुसार अनेक शब्दांचे आणि शब्दसमूहांचे अर्थ बदलत जातात. नवीन अर्थ रूढ होत जातात.

त्या शब्दांचा सध्याचा रूढ अर्थ काय आहे आणि त्यातून ऐकणारा काय समजतो आहे हे महत्वाचे मानावे. अगदी मूळ अर्थाकडे खणत जाण्याची गरज असतेच असे नाही.

मूळचे अगदी नकारात्मक असलेले काही शब्द नंतर बदलत बदलत सौम्य होऊ शकतात. अगदी सकारात्मक अर्थानेही कोणी वापरू लागू शकतो. वापरकर्त्याचा उद्देश आणि ऐकणाऱ्याचे इंटरप्रिटेशन महत्वाचे.

तेव्हा सध्या उदा. "गनिमी कावा" या शब्दाने अपेक्षित अर्थ पुरेपूर प्रवाहित होत असताना बहुतांश लोकांना माहीत नसलेला मूळ अर्थ वेगळा आहे म्हणून प्रचलित शब्द बदलण्याची गरज नसावी. असे वैयक्तिक मत.

सर टोबी's picture

8 Apr 2024 - 10:44 am | सर टोबी

प्रतिसाद दिला होता पण धागा लेखक फारच शब्दच्छल करण्याच्या मनःस्थितीत दिसले त्यामुळे नाद सोडून दिला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2024 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत.

-दिलीप बिरुटे

गवि म्हणतात तसे ही शक्य आहे. गनीम शब्दात शत्रू असेही अध्याहृत आहे. म्हणून तो शब्द मराठी भाषेने शत्रुला (मुस्लिम सेनेला) नामोहरम करण्यासाठी केलेल्या कावेबाज खेळ्या असे ठरवून कनिमीकावा आपलासा केला आहे. ज्यांना तो वापरावासा वाटतो ते तो वापरतील. मला ओक सरांचा आवडला तर मी तो वापरेन.

अहिरावण's picture

8 Apr 2024 - 12:39 pm | अहिरावण

कुणाला मडके हवे असले की कुंभाराकडे जातो आणि हवे असलेल्या आकाराचे मडके आणतो. नसेल तर घडवून घेतो.

माणसे भाषेतले शब्द असे वैयाकरण्याकडे जावून अहो महाराज मला अमुक अर्थाचा शब्द बनवून द्या मी तो वापरतो असे म्हणत नाही. मनुष्य त्याच्या मनाला, यदृच्छेने, परंपरेने, इतर भाषेतील तशा अर्थाचे शब्द जसेच्या तसे वा हवी तशी मोडतोड करुन वापरतो. ऐकणारा त्याक्षणी समजून घेतो. तो शब्द आवडला तर वापरु लागतो. हळूहळू सर्व जण वापरु लागतात. नंतर केव्हातरी वैयाकरणी हा शब्द कसा तयार झाला असेल त्याची व्युत्पत्ती शोधत बसतो, जमलं तर प्रबंध लिहितो, अजुनच जमलं तर त्याच्या चरितार्थाची सोय होते. तोपर्यंत कदाचित मुदलातील अर्थ बदलून तो शब्द वेगळाच अर्थ धारण करत असेल. जिज्ञासूंनी "ढालगज भवानी" शब्दाचा मुळ आणि आताचा अर्थ शोधावा.

चौथा कोनाडा's picture

10 Apr 2024 - 5:00 pm | चौथा कोनाडा

छान चर्चा.

शिव-युद्ध-नीती हा शब्द कसा वाटतोय ?

शशिकांत ओक's picture

11 Apr 2024 - 9:13 pm | शशिकांत ओक

शिव शब्द महाराजांशिवाय महाशिवला असा जवळ जाणारा वाटू शकतो. असो.
उरलेल्या स्वराज्य आणि गुरिला तंत्र यावर प्रतिसाद कमी आले. विवेक यानी मुघल असे म्हणावे का तर इंग्रजीतील स्पेलिंग Mughal असल्याने यावर आक्षेप काढला. मुगल शब्द कसा उच्चारला जातो पाहता मुघल असा केला जात नाही.
सिंह चा सिंग झाला नंतर सिंघ असे लिहिले, बोलले जाऊ लागले. इंग्रजानी आपल्या सोईने उच्चार स्पेलिंग तयार केली पण म्हणून ती आपण वापरताना तशीच का वापरावीत?
पूर्वी अमिताभ बच्चन म्हणाले होते रामा, अशोका, महाभारता असे का म्हणावे? आपण तरी तसे उच्चार टाळायला हवेत.
यावर विचार हवा.