डॉ सौ. आणि डॉ. श्री.

dadabhau's picture
dadabhau in काथ्याकूट
29 Mar 2024 - 12:18 pm
गाभा: 

सध्या माझ्या वार्डात चौकाचौकातील फ्लेक्सवर अचानकच बऱ्याच माननीयांनी श्री. ऐवजी "डॉ . श्री ." व माननीयांच्या सौ. नी सौ. ऐवजी "डॉ. सौ," लावायला सुरुवात केलीये. यातील बरेचसे माननीय " ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट" (GoI ) वाले आहेत.
रोज रोज हे फ्लेक्स बघून काही प्रश्न पडलेत , जाणकार मिपाकर मदत करतील व करियर घडायला आणि भविष्याची चिंता मिटायला मदत होईल ह्या उद्देशाने हा धागा काढलाय , कृपया ज्यांना अधिक माहिती व मदत करायची इच्छा असेल त्यांनी खालील पैकी एका वा अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत तर फार उपयोग होईल.
१) नावापुढे "डॉ" लावण्यासाठी P.Hd. मिळवायला साधारणतः किती खर्च येतो ? कॅटेगरी प्रमाणे - अंगुठा छाप , सातवी पर्यंत शिकलेले , दहावी नापास , दहावी पस , बारावी नापास/पास , पदवीधर असे शिक्षण असेल तर रेट कसे कसे बदलतात?
२) मुक्त विद्यापीठात दहावी पास नंतर किती वर्षात पदवी मिळू शकते? masters किती वर्षात होता येते? तिथे ही रेट प्रमाणे काम करून देणारे agents असतात का?
३) अशी "अचानक " मिळालेली P.hd. , सरकार पोषित सिनियर कॉलेजमध्ये ( जिथे २ लाखावर पगार व मरेपर्यंत ६ आकडी पेन्शन मिळते) नोकरी मिळण्यासाठी ग्राह्य धरतात का? तशी नोकरी मिळविण्यासाठी वयाची काही अट असते का?
४) "अचानक " मिळविलेल्या P.hd . वर "GoI " वाल्या कॉलेज मध्ये किती पगाराची नोकरी मिळू शकते? तिथे नोकरीसाठी वयाची अट असते का?
५) "अचानक P.hd " देणारे खाजगी विद्यापीठ सुरु करायचे असल्यास कमीत कमी "इन्व्हेस्टमेंट" किती लागू शकते? त्यासाठी सरकार "स्टार्ट-up " योजनेखाली काही मदत करते का? काही अनुदान मिळत असेल तर ते परत करावे लागते का? व्याजदर किती असतो?

कृपया जाणकारांनी जास्तीत जास्त माहिती देऊन मदत करावी. ही चर्चा मी माझ्या भविष्यकालीन स्टेडी इनकम साठी एक व्यवहार्य option काय असू शकते व त्यासाठी काय करावे लागू शकते , returns किती मिळू शकतात याचा अंदाज येण्यासाठी सुरु केलीये.

प्रतिक्रिया

पीएचडीसाठी लागणाऱ्या खर्चाचा अंदाज विविध घटकांवर अवलंबून असावा असे वाटते. उदा. खाजगी विद्यापीठे आणि संस्थांमध्ये सरकारी विद्यापीठांपेक्षा फी जास्त असू शकते. तसेच ही फी अभ्यासक्रमांवर अवलंबून असणार. काही अभ्यासक्रमांमध्ये इतर अभ्यासक्रमांपेक्षा जास्त शुल्क असू शकते.
+ तुमच्या संशोधनासाठी लागणाऱ्या साहित्य, उपकरणे आणि प्रवासाचा खर्च.
+ राहणे, खाणे आणि इतर खर्च व्यक्तिगत खर्च.

अनेक सरकारी विद्यापीठे पीएचडीसाठी शिक्षण शुल्क माफ करतात किंवा कमी करतात. University Grants Commission (UGC) वर अधिक माहिती असावी.

कंजूस's picture

29 Mar 2024 - 2:28 pm | कंजूस

डॉ. ही पदवी ब्लॉकच्या नावाच्या पाटीवर मालक स्वतःच लावतात. किंवा सोसायटीच्या नामफलकावर " डॉ. श्री/सौ अअअमुक तमूक लिहा सांगतात आणि तसे रंगवून घेतात. त्याबद्दल इतरांना काही आक्षेप नसावा. फार तर सभासद होण्यासाठी खरेदीखत नोंदणीवर जे पहिले नाव जसे लिहीले आहे तेच नामफलकावर लिहू असं कमिटी सांगू शकते. तरीही डॉ. श्री/सौ लिहा म्हटले तरी हरकत नसावी. डॉ आद्याक्षराचा आग्रह धरला तर "तुमचे इंडियन मेडिकल असोसिएशन नोंदणी दाखवा" असा काही पवित्रा घेणे कमिटीच्या अधिकाराबाहेर ठरेल.
पुढचा मुद्दा डॉ/डॉक्टरेट पदवी बद्दल. त्या चौकशा करणे इतरांचा अधिकार नाही. हल्ली नेचरोपथीचा सहा महिन्यांचा/वर्षांचा अभ्यासक्रम करणारेही डॉक्टर पदवी लावू शकतात असा दावा आहे कारण त्यांनी शरीर शास्त्राचाही अभ्यास केलेला असतो. तरीही एखाद्याचे मृत्यूसाठीचे प्रमाणपत्र देऊ शकतील का याबद्दल माहिती नाही.
डॉ - PhD याबाबत आक्षेप घेऊन तुमची कागदपत्रे दाखवा वगैरे तपासणीचा अधिकार किंवा संशय व्यक्त करण्यात इतर लोक काही करू शकणार नाहीत. ते लोक इतरांच्या जीवाशी काही उपचार करत नसल्याने तसे काही हक्क किंवा विशेष चौकशी करण्याचे कारण नाही. ते लोक या पदवीच्या आधारे संबंधित नोकऱ्या कुठे मिळवत असतील तर ती संस्था तपासणी करू शकते.
बाकी कुणी फलकावर, घराच्या दारावर, लग्नपत्रिकेवर काहीका छापेनात आपल्याला कशाला खंत?

विवेकपटाईत's picture

29 Mar 2024 - 3:47 pm | विवेकपटाईत

PhD करणे बारावी पास करण्यापेक्षा अत्यंत सोपे काम आहे. इथे कटिंग पेस्टिंगची मेहनत आहे. बाकी
हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटी PhD वाटतात. तो ३० एक वर्षांपूर्वी तांत्रिक अभ्यास क्रम शिकायला दिल्लीहून पर राज्यात निजी कॉलेजात गेला. अभ्यास जमला नाही. अर्धवट सोडला. एका बांध विरोधी पर्यावरण आंदोलनात गेला. अभ्यासात गति नसली तरी व्यवहारी होता. त्याचा फायदा घेऊन प्रसिद्ध अमेरिकन एनजीओ साठी प्रोजेक्ट्स करू लागला. नंतर हॉवर्ड मध्ये शिकून PhD झाला. दक्षिण भारतात एका सरकारी युनिव्हर्सिटीत लेक्चरर् आता प्रोफेसर. आत्मा विकायला तैयार असाल तर ऑक्सफर्ड असो हार्वर्ड तुम्हाला बिना अभ्यास PhD किँवा मोठी डिग्री सहज मिळेल. भारतातली त्यांची इकॉ सिस्टिम रोजगार ही मिळवून देईल.

प्रचेतस's picture

29 Mar 2024 - 5:36 pm | प्रचेतस

हास्यास्पद प्रतिसाद.

विवेकपटाईत's picture

29 Mar 2024 - 6:46 pm | विवेकपटाईत

मी सांगितलेला किस्सा शंभर टक्के सत्य आहे.

मुक्त विहारि's picture

29 Mar 2024 - 8:02 pm | मुक्त विहारि

सत्य कधी कधी कल्पने पेक्षा सुंदर किंवा भीषण असू शकते, ह्याचा प्रत्यय असेल...

चौकस२१२'s picture

30 Mar 2024 - 6:44 pm | चौकस२१२

नंतर हॉवर्ड मध्ये शिकून PhD झाला.
त्याआधी मास्टर करावे लागते ... एकदम पी एच डी ते सुद्धा हार्वर्ड मधून
काय राव ?

आत्मा विकायला तैयार असाल तर ऑक्सफर्ड असो हार्वर्ड तुम्हाला बिना अभ्यास PhD किँवा मोठी डिग्री सहज मिळेल.>>>
छान! हा प्रतिसाद त्याना फॉरवर्ड करायला पाहिजे. काय समजतात काय स्वतःला. काका तुम्ही चांगली जिरवलीत त्यांची. अजून येऊ द्या.

कर्नलतपस्वी's picture

29 Mar 2024 - 6:06 pm | कर्नलतपस्वी

तुकोबाराय म्हणतात,

चणे खावे लोखंडाचे तेव्हां ब्रह्मपदी नाचे

कृपया जाणकारांनी जास्तीत जास्त माहिती देऊन मदत करावी. ही चर्चा मी माझ्या भविष्यकालीन स्टेडी इनकम साठी एक व्यवहार्य option काय असू शकते व त्यासाठी काय करावे लागू शकते , returns किती मिळू शकतात याचा अंदाज येण्यासाठी सुरु केलीये.

लेखकाने स्वताची सद्य शैक्षणीक योग्यता उद्ध्रूत केल्यास समर्पक सहायता करता येईल. सांप्रत लेख वाचता लेखकास शिवधनुष्य पेलवेल असे वाटत नाही.

बाकी,तुकोबाराय म्हणतात ते खरेच आहे,

तोलावा शब्द

जसपाल भट्टी यांची पॅरोडी बघून जर मनात विचार आला असेल तर सोडून देणे उचित.

बाकी हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटी PhD वाटतात.

दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है गालिब

आयआयटीतून पीएचडी केलेल्या माझ्या लहानपणापासूनच्या मित्राने सांगितले की पीएचडी देणे हा आता निव्वळ धंदा झालेला आहे, आणि यात जगातल्या नामावंत युनिव्हर्सिट्याही आल्या. गेली अनेक वर्षे त्याच्या मार्गदर्शनाखाली एनेकांनी पीएचडी केलेले असल्याने त्यातली सगळी रहस्ये त्याला ठाऊक आहेत. त्यानेच सांगितले की यासंबंधी अभ्यासपूर्ण लेख कुणीतरी लिहीला आहे. त्याला विचारून आणखी सांगेन.

काही पीएचडी विश्लेषणात्मक माहितीवर असतात. तर काही खराखुरा वैज्ञानिक शोध घेण्याचा प्रयत्न असतो.

विजुभाऊ's picture

30 Mar 2024 - 11:43 pm | विजुभाऊ
भागो's picture

31 Mar 2024 - 8:58 am | भागो

व्हॉटसअप युनिवर्सिटी ही जगातील पहिल्या क्रमांकाची युनिवर्सिटी आहे. तुमच्या जवळ फक्त एक मोबाईल असायला पाहिजे. त्या नंतर तुम्ही गोमूत्र, आयुर्वेद, कॅनसर वर घरगुती उपचार, वेदातील विज्ञान अश्या दुर्लक्षित विषयावर संशोधन करून पी एच डी मिळवू शकता. खर्च? शून्य. विषय कठीण असेल तर प्रतिभेला जागृत करण्या साठी काही पेय असेल तर उत्तम.

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 10:38 am | अहिरावण

सहमत आहे.
>>>तुम्ही गोमूत्र, आयुर्वेद, कॅनसर वर घरगुती उपचार, वेदातील विज्ञान अश्या दुर्लक्षित विषयावर संशोधन करून पी एच डी मिळवू शकता. खर्च? शून्य. विषय कठीण असेल तर प्रतिभेला जागृत करण्या साठी काही पेय असेल तर उत्तम.

याचा काहीही अभ्यास न करता विरोधी मत ठोकले तर पेयाची पण गरज लागत नाही. फक्त डेटा पॅक आणि अंमळ वेळ.
फक्त टायपायचे "आयुर्वेदात काही तथ्य नाही."
कशावरुन " मीम्हणतो म्हणून"

हाकानाका

नठ्यारा's picture

10 Apr 2024 - 11:15 pm | नठ्यारा

लुडविग विज्जेनस्टेईन नाव ऐकलंय कोणी? नाही ना? काही हरकत नाही . मी ही नुकतंच ऐकलं होतं. त्याची चित्तरकथा ऐकवतो.

साहेब ऑस्ट्रियात ज्यू कुटुंबात इ.स. १८८९ साली जन्मले. बाप कार्ल विज्जेनस्टेईन चिक्कार श्रीमंत. ऑस्ट्रियन पोलाद उद्योगातला एकाधिकार कार्ल कडे. कार्लला पाच मुलगे आणि चारेक मुळी. पाच मुलांपैकी एक लहानपणी दगावलं, तर दोघांनी तरुण वयात आत्महत्या केली. तिसऱ्याने जरा प्रौढ वयात आत्मघात करून घेतला. असो.

लुडविग हा डफ्फड विद्यार्थी. कसाबसा कुठलीशी शाळा पास झाला. बापाने शाळेत न घालता घरीच शिकवणी लावली होती. मोठ्या भावांच्या आत्महत्यांनंतर बाप जरा नरमला व त्याने लुडविगला शाळेत दाखल व्हायची परवानगी दिली. तोवर शिक्षणाच्या नवे ठणठणाट होता. साहजिकंच लुडविग डफ्फड राहिला. असो.

असा हा ठणठणपाळ ऑस्ट्रियातल्या सुदूर खेडेगावात कुठे शालेय गणिताच्या शिकवण्या घेणे, लंडनच्या इस्पितळात भारवाहन करणे, न्यूकासलच्या कसल्याश्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करणे इत्यादी किरकोळ कामे करीत राहिला. असो.

१९२२ साली त्याने जरा हालचाल केली. बापाचा पैसा होताच. त्याने बर्ट्रांड रसेलची गाठ घेतली. तोच तो थोर तत्त्वचिंतक बर्ट्रांड रसेल बरंका. मला रसेलच्या क्षमतेवर वा कार्यावर काही शंका उपस्थित करायच्या नाहीयेत. फक्त सांगायचंय इतकंच की पैसा असेल तर रसेलही विकला जाऊ शकतो. असो.

तर हा बथ्थड लुडविग पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर चक्क प्रबंध सादर करता झाला. तो ही कुठे, तर लब्धप्रतिष्ठित केम्ब्रिज विद्यापीठात. रसेल होता ना तिथे कामाला. कुठल्याही विद्यावाचस्पती ( = पीएचडी ) पदवीसाठी जो प्रबंध सादर करायचा असतो, त्याचा सदर विद्यार्थ्याने साक्षेपी पुरस्कार ( square defense ) करायला हवा. बरोबर? पण आपल्या लद्दड लुडविगचा प्रबंध केवळ 'तपासला' गेला. आणि चक्क मंजूरही झाला. पैसा बोलता है राव, आहात कुठे ! असो.

या रद्दड इसमास पुढे केम्ब्रिज विध्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीही लागली. ही सारं १०० वर्षांपूर्वी घडलं. गेले किमान शतकभर तरी ही भ्रष्ट कीड इंग्लिश शिक्षणक्षेत्र पोखरीत आहे. जे आहे ते असं आहे.

आज आधुनिकोत्तर ( पोस्ट मॉडर्न ) म्हणून जे काही तत्त्वज्ञान आहे त्याचा प्रणेता म्हणून या मद्दड लुडविगचं नाव घेतलं जातं. एखाद्यास किती डोक्यावर चढवून ठेवावं ? काही सुमार ? या अंगठाछाप प्रोफेसरने आपल्या हयातीत केवळ एक पुस्तक लिहिलं. किती मोठ्ठं माहितीये का? तब्बल ७५ ( अक्षरी पंचाहत्तर ) पानांचं. असो.

ज्या वाचकाला स्वत:चं डोस्कं भंजाळून घ्यायचंय त्यासाठी हा खास बौद्धिक खाऊ : https://sites.uni.edu/boedeker/logicalform.pdf
घ्या आपटून डोंबलं.

-नाठाळ नठ्या

अधिक माहिती :

१. आधुनिकोत्तर तत्त्वज्ञान : https://en.wikipedia.org/wiki/Postmodernism

२. कचऱ्यापासून कला उत्पन्न करायचीये ? हा घ्या कचरा : https://en.wikipedia.org/wiki/Tractatus_Logico-Philosophicus

३. जगात फक्त तथ्ये आहेत. वगैरे वगैरे वगैरे ......

४. जग तथ्यांत विभागले गेले आहे. वगैरे वगैरे वगैरे ......

५. मी आता आत्महत्या करणार आहे ( म्हणे ). वगैरे वगैरे वगैरे ......

६. बसा बोंबलंत ! वगैरे वगैरे वगैरे ......

अहिरावण's picture

11 Apr 2024 - 9:29 am | अहिरावण

रसेल तोच ना १९ व्या शतकापर्यंत भारतीयांना सुई माहित नव्हती म्हणून गळे काढणारा ? बरेच भलते उद्योग त्याच्या नावावर आहेत.. पण अनेक डाव्या आणि पुरोगाम्यांना तो गुरुतूल्य आहे असे म्हणतात. त्याचे नाव घेतल्याशिवाय त्यांना "मोकळे" होता येत नाही असेही ऐकले आहे.

मोठ्ठा माणुस हो!!

नठ्यारा's picture

11 Apr 2024 - 6:45 pm | नठ्यारा

नक्की माहीत नाही. पण हा बर्ट्रांड रसेल भारतीय स्वातंत्र्यास अनुकूल होता म्हणतात.
-नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2024 - 5:55 pm | चौथा कोनाडा

भावूक डॉ शरद पवार

औरंगाबाद: ज्या मराठवाडा विद्यापीठाचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यासाठी सत्तेवर पाणी सोडावं लागलं. त्याच विद्यापीठाने तब्बल 32 वर्षानंतर डी. लिट देऊन गौरव केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अत्यंत भावूक झाले. या सोहळ्यात पवार काही क्षण स्तब्ध झाले होते. खासकरून जेव्हा त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला जात होता, तेव्हा शरद पवार भावूक झालेले पाहायला मिळाले.