रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार - सिनेमा समीक्षण

जावा फुल स्टॅक's picture
जावा फुल स्टॅक in काथ्याकूट
26 Mar 2024 - 5:26 pm
गाभा: 

Razakar : The Silent Genocide Of Hyderabad हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हैद्राबाद संस्थानातील हिंदू प्रजेवर तेथील राजाने रझाकारांद्वारे केलेले अन्वनित अत्याचार आणि त्यानंतर भारत सरकारने ऑपेरेशन पोलो राबवून हैद्राबादचे केलेले विलीनीकरण यांचे यथार्थ चित्रण करतो.

तेलंगणा, मराठवाडा व कर्नाटकाचा काही भाग हे हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली असतो. उर्वरित भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत असतात पण येथील प्रजेला मात्र शासन प्रणित (state-sponsored) अत्याचारांना तोंड द्यावे लागत असते. सक्तीची धर्मांतरे करविणे, पुरुषांना दिवसाढवळ्या वेदनादायक रीतीने ठार मारणे, स्त्रियांवर बलात्कार करून त्यांचे स्तन कापून टाकणे, तान्ह्या बाळांना तडफडवून ठार मारणे, लोकांना घरात कोंडून घरे जाळणे अश्या घटना वाढतच जातात. प्रतिकार होत असतो पण तो पुरेसा नसतो. अहिंसात्मक लढ्यालाही फारसे काही यश येत नाही. भारत सरकारही बराच काळ काही ठाम निर्णय घेत नाही. शेवटी १९४८ च्या सप्टेंबरमध्ये भारत सरकार ऑपरेशन पोलो द्वारे निझामाला शरणागती पत्करायला लावते आणि हैदराबाद संस्थानाचा स्वतंत्र कारभार संपुष्टात येतो. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रदेश भारतीय प्रजासत्ताकाच्या एक भाग बनतो.

रझाकार सिनेमातील सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख आहे. राज अर्जुनने कासिम रिझवीची भूमिका अगदी योग्य वठविली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन चांगले आहे, कथानक ठीकठाक आहे. चित्रीकरण उत्कृष्ट आहे. तेलुगु सिनेमाचा भडकपणा इथेही प्रकर्षाने दिसतो. एकूण सिनेमा पैसा-वसूल आहे.

रझाकार चित्रपटाचे विकिपान

रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार (२०२४) चे पोस्टर:
शब्द नरसंहार

प्रतिक्रिया

धन्यवाद....

अहिरावण's picture

26 Mar 2024 - 7:55 pm | अहिरावण

माहितीबद्दल धन्यवाद.

अशीच माहिती आणि चित्रपट ४८ च्या ब्राह्मण हत्याकांड आणि ८४ चे शीख हत्याकांडावर यायला हवी.

निपा's picture

28 Mar 2024 - 12:26 am | निपा

https://en.wikipedia.org/wiki/Category:Films_based_on_1984_anti-Sikh_riots

आले आहेत ना १९८४ वर सिनेमे.

१९४८ चे हत्यकान्द किति होते आनि त्या बद्दल फारच कमि महिति उप्लब्ध आहे.

याविषयावर चित्रपट यायला इतका काळ लागावा हे आपले दुर्दैव आहे असे वाटते.
रझाकारांनी हिंदूंवर केलेले अत्याचार ही अशा अनेक घटनांपैकी एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. या घटनेतून शिकणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकी महत्त्वाची आहे.

मुक्त विहारि's picture

28 Mar 2024 - 8:29 pm | मुक्त विहारि

अर्थातच...

गजवा-ए-हिंद, टाळायचे असेल तर, एकी महत्त्वाची आहे.

बऱ्याच लोकांना, "गजवा-ए-हिंद" माहीत नाही आणि काही लोकांना माहिती असली तरी, ते विश्र्वास ठेवत नाही...

माझा पण , "गजवा ए हिंद" वर विश्वास न्हावता, पण सौदीत काम करत असताना, एका मुस्लिम मुलाने, "गजवा ए हिंद" बद्दल माहिती दिली...

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Mar 2024 - 11:45 pm | अमरेंद्र बाहुबली

एका मुस्लिम मुलाने, "गजवा ए हिंद" बद्दल माहिती दिली... अन लगेच तुम्ही भ्यालात?? कसले कमजोर काळजाचे हिंदू तुम्ही??